चविने खाणार कोल्हापूरला…

पुणेरी लोकांना चवीने खाण्यात मुंबईकरांपेक्षा थोडा जास्तच इंट्रेस्ट आहे.  मुंबईकर  बाहेर खायला जायचं म्हंटलं की आपला नेहेमीच्या शेट़्टीच्या हॉटेल मधे जाउन ठरलेल्या डीश खाणार – किंवा नॉन व्हेज असेल तर एखादं कोंकण किनारा, मालवणी  हॉटेल शोधणार- फॉर अ चेंज. पण पुणॆकरांचं  मात्र तसं  नाही. पुणेकर मंडळी अगदी निरनिराळ्या चवीचे पदार्थ टेस्ट करण्यास सदैव तयार असतो.   एखाद्या चांगल्या जागी जाण्यासाठी थोडा जास्त प्रवास करावा लागला तर त्याचीही तयारी असतेच.

पुणं म्हंटलं की   स्वीट होम सारखी साबुदाणा खिचडी आधी आठवते.  तशी खिचडी अजूनही जगात कुठेच मिळत नाही असं माझं मत आहे. मी जेंव्हा सदाशिवात रहायचो, त्या काळात स्वीट होम ची खिचडी म्हणजे जीव की प्राण होती. बरेचदा तर रात्रीच्या जेवणा ऐवजी खिचडी खाऊनच झोपायचो.  पुना कॉफी हाउस समोरच्या त्या कंपाऊंड च्या समोर एक माणूस बरेचसे महाराष्ट्रियन पदार्थ विकायला बसायचा. तिथलं थालीपीठ एकदम अप्रतिम असायचं ( ज्यांनी खाल्लं असेल ते नक्कीच मान्य करतील). थालीपीठ , त्यावर लोण्याचा गोळा, थोडी चटणी – कांदा वगैरे… एकदम अफलातून जागा होती ती. नंतर मग मात्र ते बंद पडलं. बेडेकरांची मिसळ वर्षानूवर्ष आपली चव चव आणि गिऱ्हाइकं टिकवून आहे.

आर आर आबांचा फोटो लागला होता समोर भिंतीवर..

पुणेकरांच्या ह्याच गुण(चव)ग्राहकतेची दखल घेत बऱ्याच हॉटेल वाल्यांनी आता  आपली हॉटेल्स स्पेशॅलिटी फूड सोबतच आऊट्स्कर्ट्स ला  उघडली आहेत.मुंबई महामार्गावर नेहेमीच फक्त फूड प्लाझा वर आपण थांबतो. नुकतंच मला कोल्हापूरला जावे लागले . या वेळेस पुण्याहून एक मित्र सोबत येणार होता. सरळ त्याच्या घरी कोथरूडला जाउन त्याला सोबत घेतलं आणि न थांबता   एक्स्प्रेसवे ने कोल्हापूरचा रस्त्याला लागलो तरीही पुण्याबाहेर पडायला १२-१५ वाजले.

वनपत्रें बंधूंचं हॉटेल..

पुण्याहून सोबत आलेला मित्र म्हणाला, की  जातांना जो पहिला घाट लागतो तो संपल्या नंतर मग  थोडं पुढे गेलं की एक हॉटेल आहे त्या हॉटेल मधे आपण जेवुन नंतर पुढे साईटला जाऊ. प्रवासात डाव्या हाताला बरीच हॉटेल्स दिसत होती. पण माझ्या मित्राला जे हवं होतं ते यायला आम्हाला ३-४ किमी प्रवास करावा लागला. त्या हॉटेल मध्ये शिरलो आणि समोर पहातो तर चक्क गृहमंत्र्यांचा फोटो लागला होता तिथे जेवताना. वनपत्रे यांचं हॉटेल आहे ते.  गृहमंत्री इथे जेवतात म्हणजे मी कुठल्यातरी खास माणसाच्या हॉटेल मध्ये आलोय हे लक्षात आलं.

साजूक तूपातलं पिठलं भाकरी. आणि अख्खा मसूर

जेवण झाल्यावर स्वीट डीश शिरा - अर्थात साजूक तूपातला.

जेवायची ऑर्डर देण्याचं काम की एक्स्पर्ट असलेल्या त्या मित्रावरच सोडलं. त्याने  साजूक  तुपातलं पिठलं, भाकरी आणि आख्खा मसूर मागवला. पिठल भाकरी मला माहिती होती, पण शुद्ध तूपातली? काहीतरीच काय असा विचार आला मनात. हात धुवुन येई पर्यंत समोर डिश मांडून तयार पण होत्या. गरम गरम पिठलं.. त्यावर तूप आणि भाकरी हा म्हणजे एकदम अफलातून मेन्यु आहे. जर कधी पूर्वी ट्राय केला नसेल तर एकदा अवश्य ट्राय करा. ती आख्खा मसूर काही फारशी आवडली नाही. खूप मसालेदार असल्याने असेल कदाचित- पण एक गोष्ट मान्य करायलाच हवी, की तो मसूर पण छान होता चविला. जेवण झाल्यावर विचारलं की स्विट डीश काय आहे? तर म्हणतो  शिरा बनवून आणतो. त्याने शिरा ’बनवून आणतो’ म्हंटल्यावर थोडा धक्काच बसला. वाटलं की कमित कमी अर्धातास तरी लागेल. पण पाच दहा मिनिटातच शिऱ्याची डिश टेबलवर होती. साजूक तूपातला शिरा एकदम अप्रतिम होता. काजूचे तुकडे चक्क दिसत होते .तृप्त होऊन परत निघालॊ.

कोल्हपुरचं ओपल;

ओपल हॉटॆल कोल्हापूर

साताऱ्या जवळच्या एका साईटची कामं आटोपुन कोल्हापूरला पोहोचलो. कोल्हापूरला आल्यावर तिन जागी जायचं असते. एक म्हणजे अंबाबाईचे मंदीर, दूसरे म्हणजे वुड हाउस , आणि चोरगे ची मिसळ .व माझ्या बरोबरचा मित्र तसा व्हेज पण  फक्त कोल्हापूरलाच आला की नॉन व्हेज खातो- आणि ते पण फक्त ओपेल मधे!जर तुम्ही जुने चित्रपट पाहिले असतील.. राजा गोसावीच्या काळातले, तर त्या मधे बरेचदा एका मोठ्या बंगल्याचे शुटींग दिसते. तो बंगला  म्हणजेच हॉटेल ओपल .

कोल्हापूरचं ओपल प्रसिद्ध आहे ते नॉन व्हेज साठी. कोल्हापूरी म्हणजे खूप तिखट असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. पण कोल्हापूरी  म्हणजे तसं नाही तर  कोल्हापूरी ही एक चव आहे .. (हे वाक्य माझं नाही) . मुंबईकरांना  किंवा पुणेकरांना कोल्हापूरी म्हणजे शेट़्टी हॉटॆल मधली थोडी तिखटावर जाणारी , आणि मध्य भागी एक तळलेली लाल मिरची खोचलेली भाजी असे काहीसे चित्र डोळ्यापुढे येते – पण  खरं कोल्हापूरी तसं नसतं.  खरं म्हणजे इतकी कोल्हापूरी मंडळी ब्लॉगिंग करतात की कोल्हापूरी खादाडी वर काही लिहायचा चान्स मला मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते. 🙂

तांबडा रस्सा,पांढरा रस्सा आणि चिकन + मटन

इथे डीश चा वगैरे नाजूक प्रकार चालत नाही. सरळ घरच्या सारखं ताट समोर मांड्लं जातं

ओपेल चा   मटण, चिकन आणि सोबतचा तांबडा आणि पांढरा रस्सा एकदम फेमस. लोकं  कोल्हापूरला आले की ज्या श्रद्धेने अंबाबाईचे दर्शन घेतात, त्याच श्रद्धेने ओपेल ला भेट दिल्याशिवाय जात नाहीत. इथुन बाहेर निघालेल्या लोकांच्या तोंडी    मी किती वाट्या संपवल्या रश्श्याच्या  ह्याबद्दल चर्चा बाहेर निघतांना सुरु  दिसतात. या ट्रिप मधे काय ऑर्डर करायची हे ठरवण्याचे अधिकार माझ्या बरोबर असलेल्या मित्राला दिले होते.

ओपल मधे गेल्यावर दूसरा काहीच चॉइस घ्यायचा नाही हे नक्की केलेलं होतं त्याने. सरळ चिकन , मटण दोन्हीची ऑर्डर दिली. इथे सर्व्हिस खूप फास्ट आहेल.पाचच मिनिटात समोर डीश लागल्या, आणि त्याने तांबडा रश्श्याचं आणि पांढऱ्या रश्श्याचं बाउल आणि गरम गरम भाकरी. खूप भूक लागली होती. संध्याकाळी ओपलला यायचं म्हणून दुपारचं थोडं लाइटच जेवण घेतलं होतं. तसेच संध्याकाळचा स्नॅक्स पण अव्हॉइडच केला होता.इतकं सगळं समोर दिसलं आणि एकदम तुटूनच पडलो. नंतरची पंधरा मिनिटे आम्ही सगळे शांत होतो- उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म हेच काम सुरु होते.

ओपल म्हणजे कोल्हापूरला गेल्यावर ’चूकवु नये असे काही’ या सदरामधे मोडते. पुर्वी एक बावडा नावाची  जागा होती. तिकडे माझा एक खास कोल्हापूरी मित्र मिसळ खायला घेऊन गेला होता. कोल्हापूरकरांचा विक पॉइंट म्हणजे एक दुखती रग. बहूतेक सगळे कोल्हापूरकर मिसळ आणि कट वड्याचे डाय हार्ड फॅन्स असतात. भरपूर आलं लसून घातलेला बटाटे वडा, आणि त्यावर कट रस्सा.. अप्रतीम कॉम्बो.  एक कोल्हापूरकर मित्र सांगत होता, की मटनाचा शिळा तांबडा रस्सा घातलेली मिसळ म्हणजे कोल्हापूरकरांचे कोणाला न सांगितलेले एक रहस्य आहे. हा रस्सा स्टॉक मधून तयार केलेला असतो, त्यामूळे खूप छान चव असते या मिसळची. मिसळ बरोबर अर्थातच “स्लैस” खाण्याची पद्धत आहे कोल्हापूरला.

सकाळी मंदीरात अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर मग मिसळ खायला म्हणून चोरगे यांच्या हॉटेल मधे गेलो. आज पर्यंत जितक्या वेळी कोल्हापूरला गेलो आहे, त्तितक्या वेळी हा क्रम म्हणजे आधी दर्शन, आणि नंतर ब्रेकफास्ट मिसळ पावाचा हा कधीच चूकलेला नाही. चोरगे यांचं एक लहानसं हॉटेल आहे, पण इथली मिसळ छान असते. मंदीराजवळच अजून एक झाडाखाली पण मिसळचं हॉटेल आहे ( वर्कशॉप शेजारी)  तिथली पण मस्त असते मिसळ. चोरगेंच्या दुकानतली मिसळ  चांगलीच चमचमित होती.

मिसळ आणि स्लैस ( स्लाईस नाही स्लैस )

दोनदा एक्स्ट्रॉ रस्सा घेतला, कांदा पण एक्स्ट्रॉ घेतला ( तिथे एक्स्ट्रॉ रस्सा घेतल्यास एक्स्ट्रॉ पैसे द्यावे लागतात. प्रत्येकच जण एक्स्ट्रॉ रस्सा घेतातच, त्या पेक्षा सरळ भाव वाढवून का टाकत नाहीत चोरगे? हा प्रश्न आहेच )खाऊन झाल्यावर , बिसलेरी मागितलं. तर ते नव्हतं. त्या ऐवजी मग कोल्ड ड्रिंक.. तिथे चहा मिळत नाही. फार पुर्वी एकदा याचं कारण विचारलं होतं, तेंव्हा चोरगे म्हणाले होते, की लोकं येऊन एक कटींग चहा घेऊन तास भर गप्पा मारत बसतात म्हणून चहा ठेवलेला नाही इथे. सही नां.. मी तर आवाक झालो.. अहो त्यांची , जागा फार लहान आहे, तेंव्हा लोकं नुसते बसले तर उगाच जागा अडून रहाते. माझी आवडती जागा कोल्हापूरची .

खर्डा आणि घाटी मसाला ..

कोल्हापूरला गेल्यावर एकदा तरी घरगुती व्हेज जेवणासाठी वुड हाऊस या हॉटेल मधे गेल्याशिवाय राहिलो नाही. बांबुच झोपडी वजा बांधलेलं हॉटॆल होतं हे पूर्वी. समोर टेबल, आणि आत हात धुवायला गेलो कीचुलीवर भाकरी शेकणाऱ्या बायका दिसायच्या.

वुड हाऊस मधे काही मजा राहिली नाही पूर्वी सारखी..

या वेळी त्या झोपडीच्या जागी मोठी बिल्डींग उभी राहिलेली दिसत होती. आत   गेलो आणि टेबल वर बसलो तर  तोच चिरपरिचित मिरचीचा खर्डा आणि लाल तिखट समोर आणून ठेवलं  टेबलवर. जेवायला ठरलयाप्रमाणे कांदा बेसन आणि मटकी मागवली. भाकरी मिळणार नाही असे मालकांनी सांगितले, म्हणुन शेवटी चपातीच मागवली.

दही मडकं  मागवलं आणि ते मात्र एकदम   पूर्वी सारखंच होतं. जेवण झाल्यावर एक  निर्णय घेतला की ही वूड हाउसची  शेवटची  भेट. चूल गेल्यावर गॅस वरचा स्वयंपाक – म्हणजे वुड हाऊस ची यु एस पी ( चुली वरचा स्वयंपाक )गेली. एकदम सामान्य वाटलं जेवण. सर्व्हिस पण   खूपच वाईट.

एक शेवटची गम्मत बघा. मुंबईला परत येतांना वनपत्रे बं धूंच्या दूसर्या हॉटेलात थांबलो. तिथे एक फोटॊ होता.. खाली दिलाय बघा…. गॉगल लावून जेवणारा…. आवरा…… म्हणायची वेळ आलेली  आहे. या वेळेस पोकळा+ भाकरी आणि जयसिंगपूरचा भडंग , दिपकचा चिवडा राहिलाच  खायचा.

हा थ्रेड  आता मी  कोल्हापूरकरांकडे सोपवतो.  अजून काही चांगल्या जागा असतील तर नक्की अपडेट करा .

आवरा.....

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , . Bookmark the permalink.

81 Responses to चविने खाणार कोल्हापूरला…

 1. ngadre says:

  te Khed Shivapurche hotel apratim ch. sajuk tupatale pithale addictive.

  Tambada ani pandhara rasaa..
  Nashib changle ki agadee kolhapurchach authentic tambda aani pandhra rassa,suke matan taat vagaire Thane yethe eka hotelaat milate. Tyamule faar virah hot nahee.

  Sangli Kolhapur madhe majhee khoop varshe geli ahet.

  Lekh jibhela khavaLoon sodnaaraa..Nehmeepramaanech agadee ‘vaaeet’.. 🙂

  • इतके कोल्हापूरचे ब्लॉगर्स आहे, पण कोणीच लिहित नाही, म्हणून मी लिहायला घेतला हा लेख…
   कोल्हापूरची खादाडी पुर्ण कव्हर केलेली नाही, दुसऱ्या कोणी केली तर ठिक, नाही तर मी पुन्हा एक दुसरा भाग टाकेन नेस्ट व्हिजिट नंतर.

   • Nachiket says:

    ते जे ठाण्यातले हॉटेल म्हटले ते एकदा ट्राय करा.

    केवळ fancy म्हणून कोल्हापुरी जेवण देणारे हॉटेल नव्हे ते. (उदा. पुरेपूर कोल्हापूर नावाची fancy चेन)

    हे आहे अगदी १००% कोल्हापुरीच.

    तलावपाळी जवळ कोल्हापूर याच नावाचे हॉटेल आहे.

    • व्होल्टास मधे कधी आलो तर नक्की जाईन तिकडे.

    • वेदांत says:

     त्या हॉटेलचे नाव ‘पुरेपुरं कोल्हापुर’ आहे. घंटाळी मंदिराजवळ्च आहे. मि गेलो होतो एकदा तिथे. आम्ही ३ जणांनी ३ वेग-वेगळ्या डिश मागवल्या होत्या. तांबडा रस्सा फारच सुंदर होता. पांढरा रस्स्यामधे काही खास मजा नाही आली.

     गर्दी असल्यामुळे जेवण टेबलावर यायला २५ मिनीट्स लागली.
     मेन्युकार्ड हवे असल्यास येथे पहावे
     http://www.zomato.com/mumbai/restaurants/thane/thane-area/purepur-kohlapur-37037/menu#tabtop

     • वेदांत
      ऐकलं आहे त्या हॉटेल बद्दल.. आमचा एक मित्र कोल्हापूरी जेवणाचा फॅन आहे, त्याने काढले शोधून.

 2. कोल्हापूरच्या आधी हाय-वे वर इस्लामपूर फाट्याजवळ मणिकंदन म्हणून एक प्रवासी बसचा स्टॉप आहे. तिथून यू टर्न मारुन सर्व्हिस रोडने तीनशे मीटरवर त्रिमूर्ती भुवन आहे. आख्या जगात त्यापेक्षा भारी मटण मिळाले नाही मला आजवर. चुलीवर रटरटणारे मटण आणि चुलीवरच आपल्या समोर थापलेल्या भाकरी. आयला… तोंडाला पाणी सुटले ना.

  • इतके फ़ोटो टाकायची गरज नव्हती…. 🙂
   तुम्ही खादाडीवर पोस्ट बर्याच अंतराने टाकतात पण टाकतात ती अशी…..णिशेद….

   • देवेंद्र
    फोटॊ शिवाय पोस्ट तशा मनाला भिडत नाही…. म्हणून फोटॊ….ठाण्याला पण एक आहे म्हंटलंय नचिकेतनी..तिकडे जाउ या एकदा. 🙂

  • सही.. चुलीवरची भाकरी आणि ते चुलिवरच्या स्वयंपाकाचा एक वेगळाच सुगंध असतो. याच रस्त्यावर मी बरेच हॉटेल्स पाहिले, चुलीवरच्या स्वयंपाकाची जाहिरात करणारे. पण पुढल्या वेळी हे नक्की बघीन.

  • Nachiket says:

   सही स्पॉट..

   इव्हन त्या मनीकन्डनमध्येही अंडाकरी आणि गरम चपाती मस्त मिळते.

 3. तोंडाला पानी सुटलंय… सगळया स्थळांची नोंद केलेली आहे. कोल्हापूर भेटीत नक्की भेट देणार या जागांना.शाकाहारी असल्याने काही मर्यादा आलेल्या आहेत मला. याआधी कोल्हापूर भेट पार विस्मृतीत गेलीय.

  • संकेत
   व्हेज पण छान मिळतं. स्पेशली चुलीवर बनवलेलं अप्रतीम. ते साजूक तुपातलं पिठलं तर एकदम अ‍ॅडक्टिव्ह आहे. अजुन बऱ्याच जागा आहेत,रंकाळा तलाव वगैरे…

 4. घ्या.. आणि आम्ही फक्त अंबाबाईचं दर्शन घेऊन आलो.. 😦

 5. जाहीर निषेध !
  अतिशय उत्तेजीत करणारे फ़ोटो टाकुन जनतेचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणा्र्यांचा आणि जनतेला जळवण्याचे पाप करणार्यांचा जाहीर निषेध ! 🙂
  तोंडाला पाणी सुटलय राव……., आता पुन्हा एकदा कोल्हापूरला जायलाच पाहीजे !

 6. Aakash says:

  वाह! सकाळी सकाळी खादाडी वाचायला काय मजा येते हो!
  ओपल साठी तर माझापण वरंगुठा (वर+अंगुठा) आहे.

 7. Gaurav says:

  पाहुनच तोंडाला पाणी सुटल…लवकरच कोल्हापुर गाठाव लागेल..

 8. Vidyadhar says:

  काका,
  आम्ही नेहमीच सातार्‍याला जातो.. तेव्हा विरंगुळा मध्ये थांबतो…
  पण एकदा इथेही थांबलो होतो…
  त्या भागामध्ये मकरंद अनासपुरे SRK आहे…
  मी हसून हसून लोळलो होतो..

  • विद्याधर
   त्याचा तो फोटो- गॉगल लावून, जिभ बाहेर काढून जेवतांनाचा – खरंच आवरा कॅटॅगरी आहे. अरे जेवताना कोणी गॉगल लावतं का? पावटेपणाचा कळस आहे अगदी.

 9. असच आणखी एक अस्सल मांसाहारी भोजनाचं ठिकाण इचलकरंजी मध्ये आहे, ते म्हणजे “बुगड यांची खानावळ”.

  कोल्हापूरहून सांगली रोडने इचलकरंजीत गेलं की आंबेडकर चौकामध्ये उजवीकडे वळायचं, थोडं पुढे गेलं की पहिल्याच
  उजव्या वळणाला पुन्हा वळायचं तसच थेट पुढे गेलं कि एक छोटासा चौक लागतो, त्या चौकात उजव्या बाजूला बोळामध्ये
  माडीवरती आहे बुगड यांची खानावळ.

  गरम-गरम भाकरी आणि मसाले-भात, तुम्ही तृप्त होईपर्यंत आग्रह करून वाढणे ही इथली खासियत. इथल्या फ्राय
  मटणा बातच न्यारी. पुन्हा कोल्हापूर मुक्कामी याल तेव्हा आवर्जून भेट द्या.

  • इचलकरंजी ला पण येतो बरेचदा. पण ते मुख्य रस्त्यावरचं हॉटॆल आहे, तिथेच जेवतो. नाव लक्षात नाही, पण पुढल्या वेळी बुगड खाणावळी वर हल्ला बोल…. 🙂

 10. वाह…मिसळ खाण्याची इच्छा झाली आहे…

  >>>स्वीट होम सारखी साबुदाणा खिचडी आधी आठवते. तशी खिचडी अजूनही जगात कुठेच मिळत नाही असं माझं मत आहे+१२३४५६

  >>बालगंधर्व च्या पुलावरुन आपण नारायण पेठेकडे येताना तिथे चौकात एक हॉटेल आहे…तिथे पण मस्त खिचडी मिळते. 🙂

  • योमू
   नाव काय त्या हॉटेल चं? स्वीट होम आहे का अजून सुरु? बरेच वर्षात तिकडे जाणं झालंच नाही. एकदा पुन्हा नक्की जायला हवं.

   • Nachiket says:

    पुण्याच्या गंधर्व पूल ते नारायण पेठ या एरियात खिचडी वगैरेची खूपच चांगली हॉटेल आहेत. ते तुम्ही लिहिलेलंसुद्धा.

    तिथेही मी काही वर्षं काढली. संध्याकाळचा अड्डा नारायण पेठेतच असायचा. फक्त प्रोब्लेम एकाच होता की पुण्यात खिचडी कमी आणि “खिचडी संपली”च्या पाट्या जास्त पाहिल्या. वेळा खूप काटेकोरपणे सांभाळाव्या लागतात. हे वेळेचे भान सुद्धा सर्व पुणे रिलेटेड खादाडी पोस्ट मध्ये आले पाहिजे. शिवाय मंगुश इफेक्ट खिचडी प्रेमींच्या निराशेला ब-याचदा कारणीभूत होतो.

    मंगुश इफेक्ट ज्यांना माहीत नाही त्यांजसाठी:

    साबुदाणा खिचडी (फक्त मं.गु.श. सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा शिल्लक असेपर्यंत) : २२ रुपये

 11. >> तांबडा रस्सा,पांढरा रस्सा आणि चिकन मटन
  जिव्हारी लागणारा एकच फोटो

  बाकी उरलेल्या खादडीबद्दल बाबा बर्वे बोले तो मौन व्रत.

  • सिद्धार्थ
   रत्नागिरी पासून जवळच आहे. एखाद्या वेळेस अंबाबाईच्या दर्शनाला आलास की भेट देउ शकतो इकडे. 🙂

   • अहो काका बंगलोरहून रत्नागिरीला जाताना नेहमी कोल्हापूरलाच रत्नागिरीची बस पकडतो. पण जाता येता कोल्हापूर बस स्टॅंड हे प्रेक्षणीय स्थळ आणि तिथले एस् टी कॅंटीन हे खादडीचे ठिकाण. रत्नागिरीला जाताना घरची ओढ आणि परत बंगलोर जाताना ऑफीसची ओढ 😉 त्यामुळे कोल्हापूरकडे केवळ बस थांबा म्हणून बघतो. आत्ता एक दिवस सकाळीच अंबाबाईचे दर्शन घेऊन शुभ कार्याला लागले पाहिजे.

 12. लीना चौहान says:

  दादा तुमची खादाडी वाचून पोटात भुकेचा डोंब उसळला आहे. पण इथे मला यातला एकही पदार्थ मिळणार नाही, म्हणजे स्वतः बनवले तरच मिळतील आणि ते इतके चविष्ट नक्किच नसतील……

  • लीना
   जमेल, घरी केलं तर त्यापेक्षा छान पण जमेल. फक्त एकच गोष्ट कमी पडते ती म्हणजे चूल. चुल नसली की तो टीपिकल फ्लेवर येत नाही.
   जशी बासुंदीची मजा शेगडीवर केल्यावरच. घरी कोळशाची शेगडी आणून त्यावर बासूंदी आटवत बसणे हा माझ्या मित्राचा छंद आहे. तासन तास बसला असतो एक पुस्तक घेऊन वाचत – आणि बासूंदी आटवत. सहज सहज आठवलं म्हणून लिहिलं..

 13. MAdhuri says:

  khasbag restaurent madhye misal ani mag ice cream…solanki kade mala watte..Opal che jewan pun chan aste……..kahi diwas tithe rahilyane khadadi keleli ahe
  bhadang pun ekdam tasty…..

  • सोळंकी चं नांव रजिस्टर करतो. पुढल्या वेळी कोल्हापूरला गेलो की हा लेख रेफर करीनच. बरीच नविन ठिकाणं माहिती झालेली आहेत ..

 14. Nachiket says:

  कोल्हापुरी सुके मटण आणि रस्से हे भाकरी सोबत बेस्ट लागतात अशी एक समजूत मुंबई कडे फेमस आहे.

  पण थोड्या जाडसर मोठ्या पोळ्या (चपात्या) ज्या कोल्हापूर एरियातच बनू शकतात त्या मटणासोबत जास्त चांगल्या लागतात. भाकरी विशेषत: तांदळाची ही मालवणी कालवणासोबत चांगली लागते.

  कोल्हापूरहून गोव्याकडे जाताना राधानगरीच्या पुढे दाजीपूर अभयारण्य लागते. त्यातून फोंडा घाटाची सुरुवात होते. नेमक्या त्याच खिंडीत बापू घोलप नामक मनुष्याची खानावळ आहे. हा आपला खास मित्र. कोल्हापूर एरीयात आठ वर्षे काढून ठीक ठिकाणी जेवणे ओरपूनही फायनली बापूचे मटण ताट म्हणजे मोक्ष आहे हे १००%.

  बापू व्हेज नॉन व्हेज वेगळे वेगळे शिजवतो.

  मटण आधी सांगावे लागते कारण ते ताजे बनवूनच देतात. फोन नंबर आहे माझ्याकडे.

  दूर जंगलात आहे. निर्जन आणि दाट जंगल. समोर राधानगरी चे अथांग सरोवर.. हॉटेल पण डोंगर माथ्यावर. तिथून काही पावले पुढे गेल्यावर ३०० डिग्री दिसणारा क्षितिजापर्यंतचा दरीचा व्ह्यू.. आयुष्यभर लक्षात राहील.

  मी कार घेऊन इथून मुंबईपासून दाजीपूर खिंडीपर्यंत फक्त त्या मटणासाठी गेलो. यावरून काय ते कळेल.

  • क्या बात है.. राधानगरीला कधी जेवायला थांबलो नाही. कारण एकदाच फक्त कोल्हापूरहून गोव्याला बाय रोड गेलो होतो. पण तो घाट ६० किमीचा अजून लक्षात आहे. मस्त घाट आहे तो. सारखं आता संपेल असं वाटत असतं…. पण मजा येते घाटात.

   • Nachiket says:

    राधानगरीच्या पुढे ३० किमी फोन्डाघाट सुरु होतो ती पर्वत माथ्यावरची खिंड तिच्या काही पावले अलीकडे ही खानावळ कम हॉटेल आहे. गाड्या काढून उठून जाउया तिथे आपण एकदा. जंगल सफारी ही करून येऊ. म्हणजे दाजीपूरच्या फोरेस्ट रेस्टहाउस मध्ये राहून.

    तीन चारदा चापता येईल बापूचे जेवण. हातात जादू आहे त्याच्या. मी गेली वीस वर्षे खातो आहे.

    • म पुढल्या महिन्यात कस्टमर्स व्हिजीट्स प्लॅन करतोय.तेंव्हा टाकतो मेसेज..

     • Smita Ghaisas says:

      Just look where all you people are willing to travel for food and you say “Punekaranna thoda jastach interest ahe khaNyamadhye, ????:-) 🙂 karaN nasatana PuNyachya lokanna target karayacha ….:-)

      • स्मिता
       तो आरोप नाही, ती तर चक्क पुणेकरांची तारीफ आहे. आता नचिकेत हा मुंबईकर नाही.. तो तर पक्का पूणेकर . अ‍ॅक्सिडेंटली मुंबईकर झालेला. 🙂

       • Nachiket says:

        घ्या.. गेली चौदा वर्षे मुंबईत आहे. त्यात दोनच ब्रेक.. एक वर्षभर तमिळनाडूत..आणि मग दीड वर्ष पुण्यात..तिथे नोकरी लागली म्हणून..एरव्ही गेली दहा वर्ष सलग इथेच आहे. पुणेकर नका हो म्हणू मला.

        हां..एक मात्र आहे..पुण्यात महिनाभर राहिले तरी लाईफलाँग ठसा उमटतो आपल्या व्यक्तिमत्वावर..तसं झालाय काहीसं.

        पुणेकर होणं जमलं नाही. पण इच्छा फार आहे. काय हवा आहे तिथली..काय ते पब्लिक..काय ते पूल.. अहा..

       • Smita says:

        ok there’s a new place in Pune -off Karve road near Abhinav School
        that serves “non-veg” misal and chicken thaleepeeth
        personally, I cannot think of non-veg versions of these dishes of course..
        might interest you people who are so fond of AbhakSHya BhakshaN …:-))

        by the way ( and on a very light note) I noticed that a lot of people – bloggers who are likely to be in
        in their late 20s or early thirties as inferred form their writings/ profiles/ references
        ( way older than your kids)
        seem to address you as ” Mahendrakaka”:-))

        how do you reconcile to this phenonmenon?

 15. Meenal says:

  काका, छान झाली आहे पोस्ट..
  इथे शाकाहारींना तसा स्कोप कमीच.. वुडहाऊसने मूळची जागा हलवल्यापासून दर्जा घसरला आहे.
  सोळंकीला नक्की भेट द्या. देवळामागे विद्यापिठ हायस्कूल जवळ्चे चाट खाल्ले आहे का? सुगंधा लस्सीही चांगली असते.

  • तुम्ही कोल्हापूरकर काही लिहित नाही कोल्हापूरच्या खादाडी बद्दल म्हणून मला लिहावं लागलं. आता हे पोस्ट पुढे तूच कंटीन्यु कर. 🙂
   सोळंकी अनेकांनी रेकमंड केलं आहे, तिकडे नक्की जाईन.

 16. sneha says:

  Kaka,

  Tumhi Raja Bhau chi Bhel nahi khalli? Keshavrao bhosale natyagruha javal ek khau galli aahe. Tithe Raja bhau chi bhel, tyachya samorchi Pani Puri /Shev Puri /Parvati misal. n tya nantar Irwin Christian school samoril Ice cream parlor madhe Cocktail. Sarvaguna sampanna menu. Bass ch, ha menu mhanaje swarg agadi 2 botavar. Pratyek veli ghari gele ki bhel hi khalli ch pahije, anyatha majhya drushtine te ek paap aahe 😀 Te khalle ki ithli Ganesh bhel n Kalyan bhel pan nakoshi hote.
  Pudchya veli nakki tikade jaun ya. Baki me tithli ajun khadadi chi list dete tumhala.

  • मला तर राजवाड्यासमोर ते म्हशी घेऊन दुध काढत बसलेले लोकं असतात, त्यांच्याकडलं धारोष्ण दूध प्यायचं आहे. या वेळेस अंबाबाईचे दर्शन घेउन रात्री येतांना दिसले होते , पण थांबलो नाही.
   ह्या ब्लॉग वरच्या कॉमेंटच्या प्रत्येक जागी भेट देणार आहेच.. 🙂
   माहितीसाठी आभार..

 17. Aparna says:

  “मुंबईकर बाहेर खायला जायचं म्हंटलं की आपला नेहेमीच्या शेट़्टीच्या हॉटेल मधे जाउन ठरलेल्या डीश खाणार – किंवा नॉन व्हेज असेल तर एखादं कोंकण किनारा, मालवणी हॉटेल शोधणार- फॉर अ चेंज. ” ——–हा सपशेल चुकीचा गैरसमज आहे तुमचा….त्यामुळे double नि षे ढ …….काय फोटो टाकलेत आता कोल्हापुराक जावाच लागेल…..मागच्या वेळी आमंत्रण होत पण वेळ नवता….now its a must….

  • अपर्णा
   मुंबईला एक तरी आहे का पिठलं भाकरी, किंवा मटन भाकरी (चुलीवरची ) मिळणारं हॉटेल? नाही नां… म्हणूनच मी तसं म्हंटलं. इथे खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप लिमिटेशन्स आहेत. मी पुणे कर नाही, पण पुण्याला जास्त छान जागा आहेत खादाडीच्या. आपलीमित्र मंडळी काही लिहित नाहीत त्यावर हा प्रश्न निराळा…

 18. mau says:

  प्रतिक्रीया द्यायला उशीर झालाय हे मान्य..तशी ह्या पोस्ट वर द्यावीशी वाटत ही नाही आहे..कारण केवळ निषेधच द्यायचा आहे….[:P]
  अरे देवा..काय पण रसभरीत वर्णन !!!
  आजच ही पोस्ट मी का वाचली ह्या करता मी स्वतःलाच कोसत आहे..कारण एकतर आज सकाळी gas संपला आणि दुसरा लावायला गेले तर तो लिक होतोय..म्हणजे आज kitchen बंद…………त्यात ही पोस्ट………अन्याय नुस्ता…..
  सगळं कस झणझणीत डोळ्यासमोर मांडुन ठेवले आहे…आता नुस्ते पहात बसावे लागणार………

  रहावत नाही म्हणुन सांगतेय….बढीया झाली आहे पोस्ट !!!तुम्ही खात जा आणि आम्हाला माहिती देत जा………

  • सध्या खाणं क्वॉंटीटी कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी पून्हा गोड खाल्लं की सगळं कॉम्पनसेट होतं…….

 19. jyoti ghanawat says:

  kaka tumchya post ani postvarchya comments varun khup sarya navin khadadi thikanchi mahiti milali….. nishedh nahi karnar karan ajun bharpur vel ahe ani bandhanhi nahi ye khanyavar…….mhanun thnks navin navin thikan ani thithali khasiyat ashich kalvat raha amchyasarkhyansathi……

 20. jyoti ghanawat says:

  kaka tumhala poklyachi bhaji mahitey….. mazi awadati bhaji ahe konihi gavavarun yenar asel ki mi poklyachi bhaji ani katyachi wangi anayla sangate …… krushnakathachi khasiyat……. pokla mi khup thikani shodhala dadar market pasun te amchya ithalya mafco….APMC paryant pan nahi milala…mathachi bhaji dakhvatat…. Kaka tumhala mahiti ahe ka ti bhaji kuthe milel mumbait?

  • कोल्हापूरलाच खाल्ली. खूप चवदार भाजी असते. आणि भाकरी सोबत एकदम बेस्ट..
   इथे मिळत नाही कुठे मी पाहिली बरेचदा.. 😦

 21. चोरगे मिसळ पुढल्या खेपेला नक्कीच ट्राय केली पाहिजे. आम्ही अलंकार म्हणून देवळाजवळ टपरी आहें तिकडे मिसळ आणि पायनापल शिरा खातो. ओपल मध्ये सुद्धा छान मिसळ मिळते.

 22. anukshre says:

  माझे सासर घर ताराबाई पार्क ला आहे. पुरेपूर कोल्हापूर ला खरेच जा… तशीच चव आहे. हे बेत रोज घरी होतच असतात. मी मस्कत चे लिहिते म्हणून कोल्हापूरचे लिहित नाही. पुढची पोस्ट लवकर येऊ दे.

 23. anukshre says:

  राजाभाऊ भेळ कोल्हापूर ला अवश्य खा. झक्कास!!! एन डी टी व्ही गुड टा ईम वर पण कोल्हापूर फोकस केले होते..

 24. anand joshi says:

  yaar,
  he sagala vahun mala pan non veg khaychi eechha hotey…..but control
  I am joshi brahmaan. endriyawar control..

  • आनंद
   काही हरकत नाही . पण व्हेज बद्दल पण बरंच लिहिलंय इथे. इतर पोस्ट्स आहेत चविने खाणार इंदौर ला वगैरे.

 25. लेखाचे नांव वाचविल्यावर असे वाटले की “कोल्हापूर” नांवाची एखादी खायची गोष्ट (म्हणजे “खाष्ट”) आहे की काय?

  असो आपली पायधूळ तिकडेही झाडलीत हे कळून आनंद जाहला… म्हणजे नक्की काय?

  🙂

 26. मालोजीराव says:

  पूर्वी कोल्हापूर ची ‘पद्मा गेस्ट हाउस’ ची मटन थाळी म्हणजे कोल्हापुरात वर्ल्ड फेमस होती, पण यंदाच्या २-३ वर्षात ती मजा नाही राहिली.
  इथली फडतरे मिसळ आणि बावड्यातली मिसळ पण खाऊन बघा झक्कास आहे
  आणि काका पुढच्या वेळेला गेलात कि ‘वामन गेस्ट हाऊस’ च मोरी मटण नक्की वरपा, हे ‘वामन गेस्ट हाऊस’शाहूपुरी मध्ये आहे बरंका….एकदम पेशल
  कोल्हापुरी-मालवणी हायब्रीड डिश आहे …..एकदम नादखुळा

  • शिरिष, मालोजीराव
   प्रतीक्रियेसाठी आभार. पुढल्या वेळेस कोल्हापूरला गेलो की हा लेख रेफर करून सगळ्या जागा नक्की ट्राय करणार आहेच..

 27. santosh Deshmukh says:

  काका , शेतकरी ढाबा नावाचे एक हॉटेल आहे बावडा रोडला ,गावापासून ७ / ८ किमी वर एकदा जाऊन या. निसर्ग रम्य वातावरण शक्यतो सायंकाळी जा नी, जाताना उपाशीपोटी व येताना तृप्तीची ढेकर ……..काका ,लिहिताना लाळ गळ्तीय करा मज्जा !!

 28. vickstp says:

  छ्या उगाच परत वाचली भुकेच्या वेळी ही पोस्ट !!!!!!!!!!

 29. अमोघ says:

  कोल्हापूरचे जेवण म्हणजे नाद खुळा!!!!!!!!!!!! इथल्या प्रत्येक पदार्थ तोंडाला पाणी आणणारा!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  कोल्ह्पूराचे मटण, राजाभाउची भेळ, फडतरे आणि खासबागेतील मिसळ…..
  सगळच जगात भारी………………
  आणि जर ह्याचे फोटोज पाहायचे असतील…. तर …

  http://www.facebook.com/album.php?aid=30811&id=1691990262

  • अमोघ
   प्रतीक्रियेसाठी आभार.
   नागपुरचे सावजी पण तसेच.. अप्रतीम जेवण असते.कधी ट्राय करा..

 30. shrirang says:

  I am from kolhapur proper but I don’t know where is chorge hotel and the taste of misal.Thanks for suggestion and when I will be at India I will go to kolhapur for misal and mutton only.

  • श्रीरंग
   ब्लॉग वर स्वागत. मला वाटतं दोन ठिकाणं फेमस आहेत. एक फडतरे,आणि दुसरा हा चोरगे. मला पण एका कोल्हापूरच्या मित्रानेच दाखवले हे दुकान. अवश्य जा. पण फडतरे जास्त चांगली असते.

 31. Anup says:

  Sir, you must try mutton & bhakari at shetakari Dhaba, fulewadi, Mutton chops at Daulat hotel, Mangalvar Peth and Mundi rassa at Nilesh, Shanivar Peth, kolhapur also try fadatare misal & Dipak Misal in Dasara Chouck.

 32. अमोघ केळकर says:

  कोल्हापुरी पद्धतीची चमचमीत मिसळ खायची असेल तर मी घेउन आलो आहे एक नवीन ऑप्शन …पुण्यात कोथरूड मध्ये …
  कोल्हापुरात घरी बनावलेल्या मसल्यापासून बनलेली आणि एकदम कोल्हापुरची चव असलेली मिसळ आता कोथरूड मध्ये सुरु केली आहे …
  एकदा अवश्य भेट दया आणि आपला अनुभव सांगा

  पत्ता
  कोल्हापुर मिसळ सेंटर
  यशोमंगल अपार्टमेंट
  शीलाविहार कॉलनी
  किमया होटल आणि सदानंद रेसीडेंसी च्या मधील गल्लित,
  कर्वे रोड
  कोथरूड …

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s