कैच्याकै..

सकाळची वेळ होती राजाभाऊ घरून निघाले होते ऑफिसला जायला.. रस्त्याने थोडे फास्टच चालत निघाले होते,९-०१ ची लोकल पकडायची होती . तेवढ्यात एक समोरून एक   ऑटॊ वाला स्पिड आला आणि राजाभाऊंना  धडक मारणार,   तेवढ्यात  अ‍ॅबरप्टली ब्रेक मारल्याप्रमाणे उभा राहिला! राजाभाऊ   वाचले थोडक्यात, नाहीतर राजाभाऊंचा अ‍ॅक्सिडेंट झालाच असता.  आज सकाळी कोलगेटने ब्रश केल्याने त्यांच्या  भोवती  कोलगेटचं  सुरक्षा चक्र होतं, त्या मुळेच तर ते वाचले.

राजाभाउंनी  चालणं सुरु ठेवलं, इकडे तिकडे पहात होते, की आता दुसरा कोणी धडक मारू नये म्हणून- अजिबात टवाळक्या न  करता राजाभाऊ  निघाले होतो. तेवढयात चार पाच मुलींचा गृप समोरून  जात  होता तो एकदम थांबला, आणि  एकाएकी त्यांनी आपली डायरेक्शन बदलली आणि राजाभाऊंना झोंबू लागल्या. एकीने त्यांची कॉलर धरून ओढली,दुसरीने बाही, तिसरी त्यांना पाठीमागून लटकली , या सगळ्या गोंधळात राजाभाऊंचं   शर्टचं बटन तुटलं. ते  तुटकं बटन पाहिल्याबरोबर एका  मुलींच्या चेहेऱ्यावर एकदम लखलखीत हास्य   उमटलं!

तिने  पटकन आपल्या पर्समधुन सुईदोरा काढून राजाभाऊंच शर्टचं   बटन शिवणं सुरु केलं आणि…….त्यांच्या  लक्षात आलं की  ती सुई टॊचणार आपल्याला  म्हणून.त्या जाहिरातीतल्या प्रमाणे ती सुई टोचलीच छातीला – आणि एका मुलीने चक्क आलेलं रक्त चोखायच्या निमित्याने तिथे ओठ टेकवले आणि……….. शिव शिव…… अहो  हे असं नेहेमीच होतं राजाभाऊंच्या बाबतीत, म्हणून त्यांनी आता ठरवून टाकलं की या पुढे अ‍ॅक्स वापरायचं नाही.. अगदी काहीही झालं तरी.. चक्क चाळण झाली त्यांच्या छातीची सुया टॊचून टोचून.  म्हणे   अ‍ॅक्स इफेक्ट.

आता इतक्या सुंदर मुली राजाभाउंच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या म्हंटल्यावर,त्यांना  आजूबाजूच्या लोकांची  नजर लागणं ( म्हणजे दृष्ट हो) सहज शक्य आहे असं तुम्हाला वाटत असेल नाही?? पण नाही!!राजाभाऊ खूप हुषार आहेत , म्हणून तर त्यांना   कधीच नजर लागत नाही.त्यांच्या खिशात लिंबू मिरचीचा हार नेहेमी ठेवलेला   असतोच  .( जर त्याची काही गरज पडली नाही- म्हणजे राजाभाऊंना दिवसभर दृष्ट लागली नाही  तर राजाभाऊंची बायको त्या लिंबू मिरचीची चटणी करते ( थोडं विषयांतर-  अहो मध्यंतरी लिंबू पाच रुपयाला एक झालं होतं, आणि मिरची शंभर रुपये किलो, पण ही लिंबू मिरची माळ फक्त दोन रुपयाला मिळायची .एक लिंबू आणि आठ दहा मिरच्या…  मग काय राजाभाऊ लिंबू मिरचीची माळ आणायचे आणि त्याची चटणी करायला लावायचे सिमा वहिनींना त्याच लिंबामिरचीची !)

अशी ऑरेंज नजर लागते बरं कां..

हे तर काहीच नाही, ’ नजरेपासून’ डबल सेफ्टी म्हणून त्यांच्या गळ्यात ते  ’नजर रक्षा कवच’ पण नेहेमी असतं .  नजर रक्षा कवच मुळे लोकांच्या ऑरेंज कलरच्या नजरा (दृष्ट) राजाभाऊंच्या  शरीरा पर्यंत पोहोचूच शकत नाहीत. त्या ऑरेंज नजरा आल्या,एक निळ्या रंगाचं प्रकाश सर्कल त्यांच्या शरीराभोवती तयार होऊन  त्या नजरेला रोखत होतं. नजर रक्षा कवचाचा हा फायदा त्यांना  खूप समाधान देऊन गेला.नाहीतर त्यांच्या लहानपणी किती वैताग होता नां.. नजर लागली की मीठ मोहऱ्या मिरच्या ओवाळून टाकायची आई अंगावरून डायरेक्ट चुली मधे. आजकाल तर चूल नसतेच, मग ह्या ओवाळलेल्या मिठ मोहऱ्या टाकणार तरी कुठे?  म्हणून हे नजर रक्षा कवच खूप पॉप्युलर झालंय हल्ली. राजाभाऊंना बरं वाटलं आईची आठवण झाल्यावर. कसातरी त्या मुलींच्या गराड्यातून वाट काढून आपल्या  घरच्या रस्त्याला लागलो.

हे असं प्रोटेक्शन निळ्या रंगाचं... कैच्याकै... व्हिडीओ पहायचा असेल तर या चित्रावर क्लिक करा

थोडं पुढे गेले राजाभाऊ, तर एका मुलगी चांगली १० फुट उंचीची असेल समोरून जातांना दिसली. त्यांनी  दुरुनच ओळखलं, ती  मुलगी आहे कॉम्ल्पान गर्ल म्हणून. अहो, लहानपणापासून तिच्या आई वडलांनी तिला कॉम्प्लान दिल्याने तिची वाढ इतर  मुलींपेक्षा ( म्हणजे बोर्नव्हिटा घेणाऱ्या)  दुप्पट झालेली दिसत होती.  नवीन कॉम्प्लान खूप इफेक्टीव्ह  आहे , त्यांना जाणवलं. ( अशीच आमूची आई असता च्या चालिवर, त्यांना  पण वाटल, की त्यांनी पण आपल्या मुलांना कॉम्प्लान दिलं असतं तर कसा मस्त उंच मुलगा झाला असता. सध्या तो ५ फुट १० इंच आहे, तो चक्क ११ फुट ८ इंच उंच झाला असता! आपल्याच नशिबाला कोसत बसले राजाभाऊ..

दोन प्रकारचे  गट झालेले आहेत लोकांमधे ,  कॉम्प्लान घेणारे ( म्हणजे खूप उंच ), आणि न घेणारे ( म्हणजे ठेंगणे ५- ते सहा फुट उंच),  . पुर्वी म्हणे असेच गट शिया सुन्नी, प्रोटेस्टंट- कॅथलिक, हिंदू- मुसलमान असे पडले होते . या उंच पिढीचे म्हणणे असे की सगळ्या बसेस उंच करा,बसच्या पायऱ्या पण उंच करा,  तर हे कमी उंचीचे लोकं म्हणत होते, की उंच पायऱ्या नको, आम्हाला चढतांना त्रास होतो वगैरे.. वगैरे.. शेवटी काही उंची कमी असलेल्या लोकांनी तर कॉम्प्लान वर बंदी आणा म्हणूनही कोर्टात पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन केलं होतं- २०० वर्षापुर्वी. आता अजून पुढल्या दिड एकशे वर्षात नक्की निकाल लागेल त्या केसचा. सुप्रीम कोर्टत केस आहे ती.   तशीच ती श्री  शिवाजी महाराजांचे गुरु कोण ? ही केस पण गेली चारशे वर्ष सुरु आहे कोर्टात…. राजाभाऊ त्या केसचा निकाल जर लागला तर किती गोंधळ उडेल याचा विचार करत पुढे निघाले.

संतूर साबण...

१८-१९ ची दिसणारी एक सुंदर मुलगी अगदी बेताच्याच उंचीची  होती ती, राजाभाऊंना वाटलं की ही आपल्या मोठ्या मुलाला अगदी योग्य होईल – आवडेल सून म्हणून मला ही ! त्या मुलीला म्हणावं की ’का गं तुझे बाबा कुठे असतात ? कुठे रहातेस तू? “असे विचारावे म्हणून तिच्याकडे निघाले, तर तेवढ्यात  तिकडून एक दहा  वर्षाची मुलगी धावत आली, आणि तिला मम्मी… म्हणून मिठी मारली. धत तेरी तो.. ही पण संतूर वाली का??? संतूर साबणामुळे ,वापरणाऱ्याच  खरं  वय लक्षात येत नाही कधीच.  १० वर्षाची मुलगी म्हणजे ती आई  नक्कीच  ३०-३५ च्या घरातली होती. तुम्हाला गम्मत वाटत असेल हो, पण आहे की हा वैताग मुलाच्या बापासाठी??   रेशो पण कमी झालाय मुलींचा. दर दहा मुलांपाठी एक मुलगी असा रेशो आहे.. राजाभाऊ विचार करू लागले, की आपल्याला पण एक मुलगी असती तर?? कमीत  कमी लग्नाची कळजी तरी करावी लागली नस््ती,

तेवढ्यात एक  ट्रक आला आणि त्याचं एक चाक खड्ड्यात अडकलं. सगळा ट्राफिक जाम झाला,  काय करणार? क्रेन मागवा, नंतर मग ट्रक बाहेर काढा- कोण इतकं करत बसेल. त्या ट्रकच्या मागे एक कार होती. कार एक मुलगी चालवत होती. ती खाली, उतरली, आणि लवकर ट्रक बाहेर काढ म्हणून ड्रायव्हरला म्हणाली. ड्रायव्हर म्हणाला, की क्रेन येईल मग ट्रक निघेल बाहेर? त्या मुलीने काय करावं?? आपले चांगले कंबरेपर्यंत खाली लांब असलेले केस मोकळे सोडले, आणि त्या ट्रकला बांधून चक्क तो ट्रक खेचून बाहेर काढला. राजाभाउंच्या लक्षात आलं की हे मजबूत केस म्हणजे लोरिअल शॅंपूचा परीणाम आहे . नाही तर काय शक्य होतं का? अशी हुशार मुलगी आपली सून व्हायला हवी असे मनातल्या मनात मांडे खात बसले राजाभाऊ.

ह्या जाहिराती पासून आवरा.. बस्स झालं आता.

या जाहिरातींनी अगदी वैताग आणला होता राजाभाउंना. सकाळी टॉयलेटला गेले की ते टीव्ही मधे दाखवल्या सारखे भलेमोठे किटाणु  दिसतात का हे बघायचे आणि मग नंतरच सिट वर बसायचे.  या जाहिराती सारख्या त्यांना त्रास द्यायच्या. शनिवार – रविवार दुपारी बायकोसोबत जेवायला बसले की टिव्हीवरची ती टॉयलेट क्लिनरची मोठे मोठे किटाणु असलेली जाहिरात पाहिली, की राजाभाऊची जाम चिडचीड व्हायची.   ही जाहिरात नेमकी जेवणाच्या वेळॆसच   का दाखवतात या प्रश्नाचं उत्तर काही राजाभाऊंना अजून तरी मिळालं नाही.  या जाहीरातीच्या अतीरेकामुळेच राजाभाउंनी मराठी चॅनल पहाणं बंद केलंय

परवाचीच गोष्ट , राजाभाऊ दुकानात गेले होते, तिथे त्याच्याशेजारी एक माणूस येऊन उभा राहिला, आणि एकदम विज कडाडली.च्यायला तरी बायकोला म्हंटलं होतं की रीन वापरू नकोस म्हणून.. एखादा रीन न वापरणारा समोर आला, की असेच विजांचे कडाडणे सुरु व्हायचे – आणि मग इसकी कमि्ज मेरी कमीज से सफेद क्यु? असे डायलॉग कोणीतरी तो आकाशातला म्हणायचा. एकदा तर खूपच मजा आली होती. सिनेमा हॉल मधे राजाभाऊ सिनेमा पहायला गेले होते, तर तिथे सारख्या विजा चमकायला लागल्या- इतक्या की शेवटी त्यांना सिनेमाच्या बाहेर काढले वॉचमनने..

हे कैच्याकै पोस्ट लिहायचं कारण नचिकेत. त्याने परवा मेल टाकला होता की जुन्या अ‍ॅड वर लिहा म्हणून……

क्रमशः… पुढला भाग  या  विषयावर  जर लिहावंसं वाटलं तरच   येईल नाहीतर हाच शेवटचा भाग!!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in जाहिरातिंचं विश्व and tagged , , , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

76 Responses to कैच्याकै..

 1. हा, हा, हा. भारी कैच्याकै पोस्ट झाली आहे. असं प्रत्यक्षात झालं तरी आधी तोंडातून येईल, “कैच्याकै” आणि मग विश्वास बसेल.
  काळी जादू वर आज उद्या पोस्ट टाकणारच होते. त्यात याची भर.

  बाय दे वे, तुम्ही बघता का त्या नजर सुरक्षा कवच वाल्या जाहिराती. खरंच कैच्याकै असतात.

  • रोज सकाळी ती जाहिरात लागते. मला आवडते पहायला. स्पेशली ती ऑरेंज नजर निघते, आणि मग निळं सर्कल त्याला रेझिस्ट करते तो शॉट खूप आवडतो..
   अशीच एक महालक्ष्मी कवच ची जाहिरात. त्यात एक करोडपती बनतो.. अशा खूप जाहिराती आहेत – कैच्याकै कॅटॅगरीच्या.. आणि ते फोटो पण मी घरीच काढले आहेत टिव्हीचे.. 🙂

 2. ngadre says:

  Arey va..jabardast..
  Thanks for the treat..

  Dusara bhaag havaach.

  Bagha sagle vaachak hech mhannar aani tumhala 2nd part lihayla laagnar..

  • नचिकेत
   अतीपरीचयात अवज्ञा.. तोच तो पणा येईल म्हणून थांबलो.
   खरं म्हणजे जुन्या जाहिरातींवर लिहायला बसलो, ती पहिली जाहिरात कोलगेटका सुरक्षा चक्र अपनाईये ची घेतली.. पण नंतर सगळ्या नविनच आल्यात.. असो..
   मस्त टॉपिक दिलात लिहायला, मजा आली. एक तास मस्त गेला लिहीण्यात.. 🙂

 3. sumedha says:

  lai bhari post..
  dusara bhag yahun besht asnaar….ya postla ti limboo-mirchi aahech lavaleli,najar na lage!!!:)

 4. Vidyadhar says:

  काका,
  एकसेएक कैच्याकै जाहिराती!

 5. mau says:

  hahahaa…sahich ekdam !!

 6. mau says:

  शनिवार – रविवार दुपारी बायकोसोबत जेवायला बसले की टिव्हीवरची ती टॉयलेट क्लिनरची मोठे मोठे किटाणू असलेली जाहिरात पाहिली, की राजाभाऊची जाम चिडचीड व्हायची. ही जाहिरात नेमकी जेवणाच्या वेळॆसच का दाखवतात या प्रश्नाचं उत्तर ………….हे मला ही समजत नाही..चिड्चिड होते नुस्ती..
  पोस्ट मस्त झाली आहे…

  • दर शनिवारी ती जाहिरात लागतेच. मी हल्ली मराठी चॅनल पहाणं बंद केलं य ह्या जाहिरातीपायी.

 7. एकदम सही लेख लिहिला आहे. डोके न वापरता बनवलेल्या बर्याच जाहिराती सध्या लागतात.

  नजर सुरक्षा कवच ची जाहिरात तर कहर आहे. बरेचदा बघतो मी पण ती !

  • अभिजीत
   अरे माझी मुलगी जाम वैतागते ती जाहिरात लावून पहात बसलो की.. मला खूप आवडते. त्यातली ती व्हिलन दृष्ट लावणारी बाई मस्त आहे एकदम. 🙂 एकच वाक्य मी ’लै भारी’, जाहिरात.

 8. vikram says:

  दुपारी मी हि अशीच एक जाहिरात पाहत होतो त्यावेळी त्यावर एक पोस्ट लिहायचा विचार करत होतो पण आता हि पोस्ट आलीय म्हंटल्यावर काय लिहिणार 🙂

  बाकी त्या जाहिराती जो पूर्ण बघतो त्याला खरच मानले पाहिजे बुआ

  बाकी कैच्याकै झालीय पोस्ट 🙂

  • विक्रम
   ती कॉम्प्लानची जाहिरात पहिल्यांदा पाहिली, तेंव्हा अगदी डॊक्यात शिरली होती. दुप्पट वाढ होते मुलांची असा दावा केला होता. आपल्याकडे काही कंट्रोलच नाही जाहिरातींवर..

 9. आयला मी पण हाच विषय घेणार होतो लिहायला 😉
  कैच्याकै मस्त पोस्ट 🙂

 10. सही.. कैच्याकै post झालीये. मी याच शीर्षकाने एक post लिहीणार होतो. विषय वेगळाच होता. आता बघितले तर त्याच शीर्षकाने एक नवी post .. अन ती सुद्धा अगदी भन्नाट झालेली.तुम्ही खूप high standard सेट करून ठेवला आहे या शीर्षकासाठी. आता नवे शीर्षक शोधावे लागणार.:-D
  पुढचा भाग यायलाच हवा….. सविनय आग्रह आहे हा.

  • संकेत
   अरे या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. लिही ना एक पोस्ट.. 🙂 सगळ्या ब्लॉगरनी जरी यावर लिहायचं ठरवलं तरीही संपणार नाही..

 11. काका…कैच्याकै भारी झाली आहे पोस्ट.. 🙂 :

 12. हे हे हे.. अगदी बिनडोक असतात काही काही (मी चुकून कै कै लिहिणार होतो 😉 ) जाहिराती.. पण तरीही मला आपलं जाहिराती बऱ्याचदा intellegent वाटतात.. इकडच्या जाहिराती इतक्या बिनडोक आणि अर्थहीन असतात ना कि प्रोडक्ट आवडलं तरी जाहिरात आवडली नाही म्हणून वस्तू विकत घ्यावीशी वाटत नाही 🙂

  • जाहीराती इंटेलिजंट आहेतच. म्हणूनच ही कवडीमोल किमतीची वस्तू हजारो रुपयात विकत घेतात लोकं. मी परवाच एक मेडीकल दुकानात हे कवच लावलेलं पाहिलं.

 13. महेंद्र तुमच्या ब्लॊगला दृष्ट लागेल बर! एखाद ब्लॊगसुरक्षा कवच शोधा हॆहॆहॆ
  तुमच्या भोवती आमच्या सदिच्छांच्या कवच आहेच

 14. swapna says:

  अरे महेंद्र दादा ,जबरी झालंय……….एक छोटस नाटुकल होईल यावर…………..

 15. Arti Darekar says:

  कैच्याकै..ch jhaliye post…… mast!!
  pan, kahi ads changlya pan astat, mhanje mala aavdtat ads pahayla! jashi ti “Big Babool chi ad! mummy bhaiyya adopted hai! vali…….. asha kahi nivdun tyavar pan liha, aamhi vaat pahu tumchya postchi!

 16. हा हा हा …. भारी

 17. sagar7488 says:

  कैच्याकैच 🙂

 18. Nachiket says:

  I am trying to begin a list of brands which are probably gone forever or lost their visibility. But all of them were seen in ads long back..

  Moonbeam matress.

  Binaka..turned cibaka top toothpaste

  Ajanta toothbrush papa ka mamma ka

  Maltova..now taken by Glaxo

  Zing thing Goldspot

  Lehar pepsi yehi hai right choice baby

  Bole mere lips I love Uncle chips

  Sarf ki kharidari mein hee
  samajhdari hai.

  Dhanraksha policy

  Bharpoor fasal laye sardar..laxmi ka hai ye vardaan..navyug ka sandesh hai sardar.. Rashtriy chemicals and fertilizers

  M80 jhunjaar patrkar anirudhh ghadage

  Machcharon ko jis se lagta hai dar woh hai casper

  Ye rajdoot hai shaan ki savari.raftaar se daudi jaye har vajan ye le jaye..kharcha bhi hota hai kam. Technique ka kamal hai..furti bemisaal hai..chalaaye duniya saari.

  Pan pasand goli.pan ka svad gazab ki mithas

  Chahe jitna bhi khao aha svad se pachao.mithai ki mithai hajme ki davai.

  Naya nau din purana sou din.khasi ke liye to bas glycodin

  Mera pyaar shalimar..nariyal tel.

  Godrej ka sabun Vigil..parivar ka rakshak vigil.

  Siyaram..coming home.

  Dinesh suitings.

  Garden vareli

  Sathe drinking chocolate

  Please add on..

 19. ashishsawant says:

  सुंदर पोस्ट झाली आहे. हा पण विषय असु शकतो वाटले नव्हते.
  अप्रतीम.

 20. Maithili says:

  😀 😀 😀
  Bharii…….!!!

 21. sahajach says:

  महेंद्रजी मस्तच झालीये पोस्ट… आणि नचिकेत ला पाठिंबा… भाग २, ३,४ आलेच पाहिजेत… कारण हा एक न संपणारा विषय आहे…..आणि त्यावर तुमच्या शैलीतले हे पोस्ट , मजा आली वाचताना!!!

  • पुढलं पोस्ट तू लिही ना.. म्हणजे थोडा वेगळा प्रकारचा लेख होईल. 🙂 मी लिहिला, तर तोच तो पणा येऊ शकतो असे वाटते.

 22. लीना चौहान says:

  मस्त आहे पोस्ट. खरच काही जाहिराती इतक्या कैच्याकै असतात की प्रॉडक्ट प्रमोट करायला जाहिरात केली आहे की चेष्टा करायला कळत नाही. अन्नपूर्णा मीठाची जहिरात बघून मी पण आईला एकदा म्हणले होते, बघ आई जर तू लहानपणापासून मला हे मीठ दिलं असतस तर मी पण आय ए एस झाले असते….

  • लीना
   जाहिरातींचा परीणाम मुलांवर खूप होत असतो. त्यांचा टार्गेट ऑडीयन्स पण तोच असतो नेहेमी

 23. महेश says:

  अप्रतिम, सुंदर, छान ,

 24. poojashree says:

  namsakar, nehamipramane chanch blog aahe:)
  bye the way, majhe greeting tumhalaa milale ka ibibo warche?
  GANESH CHATURTHICHYAA HARDIK SHUBHECHAA:)
  kaay mahante tumchyaa gharchii GANESH CHATUR THI?jar celebrate karat asaal tar.

 25. Gaurav says:

  मला ती नजर चक्राची Ad फार भारी वाटते, हसुन हसुन पुरेवाट होते ती Ad बघितली की..

  • माझी फेवरेट आहे ती… आणि दूसरी महालक्ष्मी कवच. एकदम भारी. घरचे लोकं पाहू देत नाहीत, रिमोट ओढून घेतात हातातून.. 🙂

 26. Gaurav says:

  (कदाचित माहित असेल), जुन्या Ads हव्या असतील तर त्या या ब्लॉगवर मिळतील, http://ddnational.blogspot.com/

 27. हेमंत आठल्ये says:

  मस्त,,, खुपंच छान..

 28. जहापनाह , तुसी ग्रेट हो…
  तोहफ़ा कुबूल करो….
  (आयला इथे फ़ोटो कसा टाकायचा आता? 😉 )

 29. ऋषिकेश says:

  पोस्ट छान झाली आहे…

  काही अड्स ज्या आम्ही अजून वापरतो मित्रा मध्ये बोलताना…

  १. ‘आपकी पारखी नजर और निरमा सुपर, दोनो का जवाब नाही…’
  २. काही चुकले तर… ‘sorry शक्तिमान’
  ३. ‘लाइफबॉय है जहा तंदुरुस्ती ही वहा..’
  ४. ‘काय झाल, बाल रडत होत गुडवर्डस दे त्याला तू लहान असताना मी सुद्धा तुला हेच देत होते.. ‘
  ५. ‘मेरा नंबर कब आयेगा..?’
  ६. ‘येडे मच्छरने सपने को रनआउट कर दिया…’
  अजून बरेच आहेत…

  • काय झालं?? बाळ रडत होतं– मग त्याच्या कानफटात दोन ठेउन दे, मी पण तुला लहान असतांना तेच देत होते…
   एकदम खास..
   जुन्या जाहिराती एकदम मस्त असायच्या. अजूनही आठवतात..मेरा नंबर कब आयेगा? ही पण मस्त आहे ..

 30. नंदनवनात हिंसाचाराचा
  नेहमीच नंगानाच आहे…
  लढणार्‍या जवानाला मात्र
  मानवाधिकाराचा जाच आहे !

  ********************************************

  त्यांच्या हातात हँडग्रेनेड…
  आमच्या…., निषेधाचा खलिता आहे
  त्यांच्या रक्ताला नेहमीच भुतदया
  आमच्या…., पेटता पलिता आहे…!

  ********************************************

 31. आयला, ही पोस्ट राहून गेलेली वाचायची. मस्त लोळालोळी.

 32. Nachiket says:

  त्यात एक ट्रेंड सुद्धा आहे. पूर्वीच्या जाहिराती जिंगलवर भर देणा-या होत्या. कारण त्या रेडीओ कल्चरमधून उगवत होत्या. पूर्वी -हाईम होणा-या जिंगल्स लोकांच्या मनात ठसतील अशा बेताने पुन्हा पुन्हा प्रोडक्टचे नाव त्यात घालून म्युझिक देऊन बनवल्या जायच्या. दातोंको सडने से बचाता है कोलगेट …आणि काय काय करता है कोलगेट.. नोगा नोगा जॅम जब हो..नोगा जॅम मस्तीभरा स्वाद खरा.. वगैरे.. नोगा किंवा कोलगेट शब्द कानात ठसवणा-या..

  टी .व्ही खूप इव्होल्व झाला असल्यामुळे आत्ताचा मार्केटिंग मधला सेन्स असा दिसतो की विज्युअलवर भर जास्त आणि कमी बोलबच्चनगिरी.

  • हा खरा मुद्दा आहे. व्हिज्युअल्स आणि जिंगल्स एकत्र असले की जाहिरात जास्त अपिल होते. उदा. रसना, निरमा, लिज्जत पापड वगरे..
   नुसते व्हिज्युअल्स असले की प्रॉडक्ट लक्षात रहात नाही, फक्त ते ग्राफिक्सच लक्षात रहातात. आजकाल बऱ्याच जाहिरातींच्या बाबतीत असं वाटतं मला तरी.

 33. Aparna says:

  राजाभाऊ लिंबू मिरचीची माळ आणायचे आणि त्याची चटणी करायला लावायचे सिमा वहिनींना त्याच लिंबामिरचीची ………..कैच्याकै 🙂

 34. स्नेहल says:

  mast mast mast kaka
  agadi postmortem zalay sagly jahiratinche

 35. Smita says:

  Kaka…He mhanje Lai Bhari kam Haye baga. Baki jahiratinchya jingles pharach chann astat. Mala ti amitabh bachaan chi ad athavate. (I hope it was amitabh only, dont remember)
  ” Jab main chota baccha tha badi shararat karta tha, meri chori pakdi jadi, jab roshan deta Bajaj”. Mastach ahe hi ad mala phar avadaychi. Washing powder Nirma, rajanigandha Pan masala etc.. Ekdam Zhaakkkaaas………………………………

  • ती बजाजची जाहिरात अमिताभची नव्हती, पण होती खूप छान. मला पण आवडायची..वर एक लिंक दिलेली आहे जुन्या जाहिरातींची… तिथे पहाता येतील.

 36. santosh Deshmukh says:

  काका मला ती दाताने उजेड पाडायची जाहिरात लई आवडते बघा मी नी पोरांनी पण प्रयत्न केला पण पिवळाच…………
  तेरा मन रौशन ……..तेरा तन रौशन

 37. hasa leko says:

  kaka
  ha lekh http://www.hasaleko.com war gheu ka?

  ani parwanagi asel tar tumche nav pan lavto :p

 38. Ashwini says:

  baki m saglya add baddal sahamat asle , tri santur chi add amchya gharatch ahe.mazi aai 42+ ahe ani tari 30-32 peksha jast watat nhi. tyamule kahi lokannna tar mazya papa n ch dusr lagn ahe ashi watta. pan tich mazi khari aai ahe.
  ( NOTE: he maz waiyaktik mat nasun, khar ahe. Krupaya wishwas thewawa.)

  • अगदी पूर्ण विष्वास आहे. माझ्या बायकोबरोबर बाहे गेलो, की ही तुमची मोठी मुलगी का म्हणूनही विचारणारे लोकं होते…. 🙂

   • =D =D कैच्याकै ! खपत नसलेला माल कसा खपवावा हे जाहिरात दाखवते, ३० पैश्याची पेप्सी १५ ते २० रुपयांना विकली जाते , काय तर मग ह्रित्विक रोशन पितो मग तुम्ही बी प्या अन व्हा गार …त्यासाठी तो एका जाहिरातीचे ७ ते ८ करोड घेतो. असो ,लिबू सरबत, लस्सी ची जाहिरात कधी पहिली का टीव्हीवर ! उत्तर नाही असेच असेल, आपल्या भारतात इस्ट इंडिया कंपनी आल्यापासून आजमितीपर्यंत आपण परदेशी वस्तूच ( इं.गांधीच्या सुनबाई ) वापरत आलो.
    पण स्वदेशीचा स्वीकार अजून केला नाही, काय करणार आपलीच क्रुकर्म ! पण या सर्व जाहिरात विश्वात मला फेविकोलच्या जाहिराती बऱ्या वाटतात, कारण फेविकोल जोडे रखे हमेशा. (y)
    http://youtu.be/UxQzUr-XErk हि लिंक जरूर पहा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s