काश्मिर एक वेगळा  दृष्टीकोन

फोटो शेवटी दिलेले आहेत. पण पहाण्यापूर्वी पुर्ण लेख वाचा ही विनंती

सकाळी सहा ची वेळ . चहाचा कप आणि पेपर हातात घेतला, आणि टिव्ही सुरु केला. बातम्या सुरु होत्या. काश्मीर मधला कुठला तरी एक भाग, तिथे एका १२-१३ वर्षाच्या मुलाला धरून नेतांना एक सुरक्षा सैनिक  दिसत   होता. काश्मीर मधल्या अनरेस्ट वर ती बातमी सुरु होती. अधून मधून काही जळणारी वाहनं, आणि भिंती, दुकानाची शटर्स , रस्ते ज्यावर ’ गो इंडीया गो’ लिहिले आहे ते  पण दाखवत होते. हे सगळं दाखवण्या मागचा उद्देश काय ते मला लक्षात आलं नाही.  बरेचदा तर वाटत होतं की हे  पीटीव्ही  चॅनल तर नाही??

थोडं वैतागूनच टीव्ही वरचे डॊळॆ हटवले आणि पेपर हातात घेतला. पहिल्याच पानावर “गो इंडीया” लिहिलेला मोठा फोटॊ आणि खाली पुन्हा काश्मिर मधल्या परिस्थितीला अब्दुल्ला सरकार कसे जबाबदार आहे वगैरे वगैरे….. लिहिलं होतं. बातमी मधला तो रस्त्याचा फोटो ज्यावर ’गो इंडीया गो’ लिहिलं होतं तो पाहून पुढे काही वाचायची इच्छाच झाली नाही. पेपर मधे अशाच बातम्या जास्त असतात. मिल्ट्रीच्या गोळीबारात १२ वर्षाचा मुलगा ठार, किंवा एक स्त्री ठार वगैरे  वगैरे….  पेपर समोरच्या टिपॉय वर टाकून दिला. सकाळच्या वेळेस अशा बातम्या पाहिल्या की मुड खराब होतो.

काश्मीर मधे सुरक्षा दलाची लोकं स्वतःचा जीव धोक्यात टाकून तिथली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असतात,  त्या प्रयत्नांना प्रसिद्धी देण्यापेक्षा   टीव्ही वरच्या बातम्यांमधे मात्र सैनिकांनी लहान मुलाला ,स्त्रियांना गोळ्या घातल्या – लाठी मार केला   अ्शा बातम्या  जास्तीत जास्त  दिल्या जातात आणि प्रसिद्धी माध्यमातून  उगाळल्या जातात.

मुलांनी किंवा स्त्रियांनी मिल्ट्रीच्या जवानांवर ग्रेनेड्स घेऊन हल्ले केले, आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला तर ती बातमी खास टीआरपी देणारी नसते, पण जर मिल्ट्री जवानांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या  गोळीबारात एखादा मुलगा किंवा स्त्री मारल्या गेली तर ती बा्तमी टीआरपी वाली म्हणून जास्त उगाळली जात असते.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल  आणि त्या सारख्या इतर   स्वयंसेवी एनजीओ ला तर काही कामच नाही. काश्मिरी फुटीर वादी लोकांना या संस्थेचा उपयोग करून कसा घ्यायचा हे चांगलं माहिती झालेले आहे. पेपर मधे एक त्यांचा कोणी तरी एक प्रवक्ता भारत सरकारला सांगत होता, की काश्मिरी जनतेच्य आयुष्या कडे रिस्पेक्ट देऊन पहाणे कसे आवश्यक आहे ते सांगत होता.

या अशाच मानवतावादी संघटनांच्या प्रेशर खाली  लागून आणि मिडीयाच्या एकांगी बातम्यामुळे  किंवा  एकांगी फोटॊ वरून वगैरे पण  तिथे तैनात असलेल्या  सैनिकांवर पण कारवाई केली जाते.  सरकार कारवाई करत असते .  कारवाई केली आहे ही गोष्ट पण पेपर मधे  मुद्दाम प्रसिद्ध  केली जाते. (कॊणाचे मनोधैर्य वाढवायला??)

हे पण आता नेहेमीचेच झालेले आहे. मला बरेचदा प्रश्न पडतो, की आपल्याच सरकारला  अशा फुटीरवादी लोकांच्या  गोबेल्स रणनीती प्रमाणे दिलेल्या माहिती वर विसंबून   आपल्याच सैनिकांवर कारवाई करण्याची इच्छा होऊ तरी कशी शकते? दिवस बर बख्तर बंद गाडी मधे किंवा रेतीच्या पोत्यांच्या आड बसून काश्मिर मधे  या टेररिस्ट लोकांपासून आपल्या देशाची शकलं होऊ देण्यासाठी जीव धोक्यात घालणारे आपलेच जवान अशा अघोषित मिडीया युद्धाचे बळी  व्हावेत या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही.

पोलिसांचे, किंवा सैनिकांचे मुलांना पकडून नेतांनाचे, किंवा प्रसंगी मेलेल्या १०-१२ वर्षाच्या मुलाच्या प्रेताचे फोटो  नेहेमीच ह्या  टेररिस्ट संघटना लोकांच्या भावनांना साद घालण्यासाठी   निरनिराळ्या ठिकाणी पब्लिश करत असतात, की जे पाहिल्यावर कुठल्याही सर्हदय माणसाला मिल्ट्रीच्या जवानाचा राग यावा.

कधी तरी एखाद्या ब्लॉग वर मोठ्या अभिमानाने पब्लिश केलेल फोटो , की  ज्या मधे १२-१३ वर्षाची पोरं पण सुरक्षा जवानांवर कसा हल्ला करतात?  किंवा त्यांच्याही मनात ही फुटीरता वादी भावना कशी ठासून भरली गेली आहे, हे दाखवायला म्हणून प्रसिद्ध केलेले फोटो वेगळीच गोष्ट सांगत असतात ते. ते मला सापडले म्हणून हा लेख लिहायला घेतलाय, आणि त्यातलेच काही फोटो  या ब्लॉग वर  टाकले  आहेत.

गेला आठवडा पुर्ण काश्मीर मधे फुटीरतावादी संघटना जागोजागी  मिल्ट्री वर हल्ले करत होते. त् अब्दुल्ला च्या नावाने तर नुसती ओरड सुरु होती.वेळोवेळी कर्फ्यु इंपोज केला जात होता.  सरकारचे सर्वपक्षिय दल आता काश्मिरला जाउन परिस्थितीचा आढावा घेईल असे सरकारने जा्हीर  केल्या बरोबर एका चॅनलने दुपारी महबुबा मुफ्ती सैद  चा इंटरव्ह्यु लाइव्ह दाखवणे सुरु केले.

ती बाई मोठ्या तावातावाने सरकारने डिक्लिअर केलेल्या ७२ तासाच्या कर्फ्यु बद्दल बोलत होती. म्हणत होती की  तिथल्या अनरेस्ट साठी भेट देण्यासाठी जाणारे जे राजकिय दल आहे, त्याने तिथल्या जनतेशी संवाद साधायला हवा- त्यांचे म्हणणे काय आहे ते समजून घ्यावे आणि  त्यासाठी कर्फ्यु असणे अतिशय घातक आहे.  ही  अशी महबुबा मुफ्ती आणि तिचं ते प्रोव्होकेटीव्ह भाषण टिव्ही वर लाइव्ह दाखवलं जात होतं. लोकल फुटीरतावादी लोकांना काश्मिर भारतापासून वेगळा हवा आहे  म्ह्णून काय काश्मीर सोडून द्यावा असे म्हणणे आहे का तिचे?? टी आर पी साठी मिडीया काहीपण दाखवत असतो हल्ली. मला तर बरेचदा आपण पाकिस्तानी टीव्ही पहातो आहे का? असा संशय पण येतो.

काश्मिरचे विस्थापित पंडीत लोकं /हिंदू लोकं.. त्यांना काय हवंय हे विचारा असं का म्हणत नाही ही महबुबा?? जेंव्हा तिथल्या का्श्मिरी पंडीतांची घरं जाळली, त्यांच्या स्त्रियांची अब्रू लुटली गेली, तेंव्हा हा मिडीया, किंवा ऍम्नेस्टी वाले कुठे गेले होते?? काय ऍक्शन घेतली गेली त्यावर? अजूनही विस्थापितांचं जिवन जगावं लागतंय त्या लोकांना.

काल संध्याकाळी एक कुठल्यातरी फडतूस चॅनलची रिपोर्टर कर्फ्यु पास घेऊन काश्मीर मधे कार ने फिरत होती. म्हणत होती की सात किमी अंतर पार करायला तिला ४० मिनिटं लागली. आणि याच गोष्टीचा ती गवगवा करत होती.  तिला  या गोष्टी मधून काय सांगायचं होतं ते मला समजलं नाही.

मध्यंतरी एका ११ वर्षाच्या सुसाईड अ्टॅकरला पकडल्याची बातमी वाचली होती. जर हे अतिरेकी १०-१२ वर्षाच्या मुलांना पण वापरू लागले तर  त्या मुलांना एक मुलगा म्हणून ट्रिट करावे की टेररिस्ट म्हणून?

भारतीय मिल्ट्री चे लोकं तिथे का्श्मीरमधे गोळ्यांच्या आणि बॉंबस्च्या वर्षावात आपले संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना आपण सगळ्यांनी मॉरल सपोर्ट हा दिलाच पाहिजे.  मिडीयाच्या टीआरपी  साठी दिलेल्या बातम्यांकडे   कडे दुर्लक्ष करून जवानांना सपोर्ट करणे आवश्यक आहे एवढंच सांगायला हे ब्लॉग पोस्ट.


खाली दिलेले फोटो नेट वरून घेतलेले आहेत.

मिल्ट्रीच्या आर्मर्ड व्हेइकल वर अटॅक. जर मनात आणलं , तर आतले सैनिक या सगळ्या टेररिस्ट लोकांना झोपवू शकतात एका मिनिटात.

टिनेजर्स आर्मर्ड व्हेइकल्स वर अटॅक करताना. याच मुलांना ग्रेनेड्स पण दिले जातात, आणि मग एादा मुलगा मारला गेला की ह्युमन् राइट्स वाले बोंबाबोंब करतात.

या मुलाच्या हातात ग्रेनेड आहे. एका साईट वर प्राउड फोटॊ म्हणून पोस्ट केला गेलाय हा .

स्त्रियांवर गोळ्या झाडल्या, स्त्रियांना सुरक्षा बलाने मारले, म्हणूनही ओरडा केला जातो मिडीया तर्फे. अशी चित्र- स्त्रिया बंदुका घेउन असलेल्या कधी पब्लिश केले जात नाहीत.. काय कारण असेल ??

ही अशी चित्रं कधी पेपरला पाहिली आहेत का?

असे फोटो कधी पाहिल्याचे आठवतात का??

मिल्ट्रीच्या एकटया मिळालेल्या वाहनावर पण असे हल्ले केले जातात. स्वसंरक्षणासाठी जरी गोळ्या झाडल्या तरीही मिडीया ........असो.

हे असे फोटो मिडीया खूप जास्त प्रसिध्द करते. स्पेशली फॉरिन मिडीया. हा फोटॊ पाहिला की मिल्ट्री जवान मुलांना मारताहेत हा ग्रह होणे सहाजिक आहे. असे फोटॊच मिडीयाला आवडतात. हा फोटो वॉशिंगटन पोस्ट मधला आहे

दगड मारणारे लोकं तर बरेच आहेत. त्या लोकांच्या हातात दगड आहेत की ग्रेनेड्स?? हा प्रश्न आहेच.

८-१० वर्षाची मुलं पण आजकाल वापरले जातात. दगड फेक करण्यासाठी. प्रसंगी त्यांच्या हातात ग्रेनेड पण दिले जातात आणि मग त्यातला एखादा मुलगा मारला गेला की मग मिल्ट्री वर सगळा मिडीया तुटून पडतो.

यामुलांच्या हातात पण दगड आहेत, दंगली मधे कोणी लहान मोठा नसतो सगळे फक्त दंगलखोर..

एकेकट्या शिपायाला घेरुन मारणं.. आणि त्याने काही प्रतिकार केला की सैनिकांनी अत्याचार केले म्हणून बोंबा मारायच्या...

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

84 Responses to काश्मिर एक वेगळा  दृष्टीकोन

 1. दगड काय, बंदुकीची गोळी काय… कुणाचं नाव किंवा चेहेरा पाहून लागत नाही. अतिरेक्यांनी सामान्य जनतेलाच शस्त्र बनविण्याची नामी युक्ति काढली आणि त्याला बळी जाताहेत जवान. त्यांना रोखल तर म्हणणार सामान्य जनता भरडली जाते, नाही रोखलं तर देश वाचत नाही. पण चित्राची ही दुसरी बाजू नेहमीच का अंधारात रहाते, हे एक न सुटणारं कोडं? कधी कधी असं वाटतं की आपल्या लोकांमधेच कुणीतरी फुटीर आहे आणि जे काम शल्याने महाभारतात केलं, तेच काम तो आपल्यात राहून करतो आहे. मनोधैर्य खच्ची करण्याचं. शल्याने जे केलं ते चांगल्यासाठी…हा जो कुणी फुटीर आहे किंवा असावा, तो हे कुठल्या उद्देशातून करत असेल? त्याचं नाव कळलं की आपोआप लोकं त्याचा धर्मही ओळखणारच.

  • अतिरेकी सामान्य जनतेकडूनच आपली कामं काढून घेत आहेत. आणि मग सामान्यातला कोणी दगावला की त्या संदर्भात नुसती बोंबाबोंब केली जाते सैन्याच्या नावाने. ही दुसरी बाजू आपला मिडीया का दाखवत नाही हा पण एक मला पडलेला मोठ्ठा प्रश्न!!

   • Swapnil says:

    मला पण हा प्रश्न नेहमीच पडतो.

    आपला मिडीया पण हेच करतो याचे अतिशय वाईट वाटते. त्यांना सध्या देश वगैरेशी काहीही घेणे देणे नाही फक्त टीआरपी!! आणि त्यांनी मुंबई हल्ल्याच्या वेळेस हे दाखउन दिलेय.

    फॉरेन मिडियाचे हे नेहमीचेच धोरण आहे याचबाबतीत म्हणुन नाही तर कुठल्यापण ..साध्या पिक्चरचच उदाहरण घ्या .. भारत दाखवतांना फक्त गरीबी दाखवणार आणि ह्यांचे स्वतःचे देश फक्त पॉश अशाच जागा, रस्ते दाखवणार.

    सगळ्यात वाईट या गोष्टीचे वाटते की आपलं सरकार सैनिकांच्या बाजुने ठामपणे उभं न राहता, त्यांच्यावरच कारवाई करते.

    काश्मीरला जे काही वेगळे लॉज आहेत ते बदलुन भारताचं एक अविभाज्य अंग बनवायला पाहिजे. मग सगळे सुधरेल. जास्तीच्या सुविधा दिल्यात तर हे फुटीरतावादी गट असेच माजणार. त्यांचा कायमचा इलाज करण गरजेचं आहे.

    पण आपलं सरकार 😦

 2. खरं तर खेळाच्या नियमानुसार “गो इंडिया गो” ह्याचा अर्थ भारताला चिअरिंग देत आहेत असा होतो… तर तुम्ही सर्व आंग्लभाषिक राष्ट्रातले खेळ पाहिले तर हे तुमच्या नक्की लक्षामंदी येईल कि वो… 🙂

  • (बहुदा) ऍटलांटा ब्रेव्हज चा कुऱ्हाडीसारखा मॅस्कॉट असलेल्या संघाचे चाहते दोन्ही हातांनी तसे आघात करत आपल्या संघाला प्रोत्साहन देतात असे कधिसे पाहिल्यासारखे ८वते…

   अधिक शोधाअंती हुरियतचे मिरवैझ उमर फारुख यांची पत्नी अमेरिकन नागरिक आहे…

   तेव्हा आता नक्की काय आणि कसे वाचायचे ते वि४ करून शांत चित्ताने ठरवा…

   • आता मिरवैझ फरूख यांची पत्नी अमेरिकन आहे असे लिहिल्याने आमची पत्नि कानडी आहे आणि मला कन्नड भाषा बिल्कुल येत नाही हे सांगणे न्याय्य ठरेल…

    बाकी सर्व क्षेमकुशल…

    • इथे नुसतं ’गो इंडीया गो’ नाही तर ते ’ गो ईंडीया गो बॅक’ असं लिहितात. ते फोटो मुद्दाम ब्लॉग वर लावले नाहित. मिडीयाने ऑलरेडी सगळीकडे ते फोटो फेमस करुन ठेवले आहेतच..

 3. Smita Ghaisas says:

  this is a very touching poem (http://blogs.timesofindia.indiatimes.com/indus-calling/entry/whose-man-is-that-soldier-fighting-in-kashmir)
  —————
  Why do I still serve you?

  How you play with us, did you ever see?
  At Seven, I had decided what I wanted to be;
  I would serve you to the end,
  All these boundaries I would defend.

  Now you make me look like a fool,
  When at seventeen and just out of school;
  Went to the place where they made “men out of boys”
  Lived a tough life …sacrificed a few joys…

  In those days, I would see my “civilian” friends,
  Living a life with the fashion trends;
  Enjoying their so called “college days”
  While I sweated and bled in the sun and haze…
  But I never thought twice about what where or why
  All I knew was when the time came, I’d be ready to do or die.

  At 21 and with my commission in hand,
  Under the glory of the parade and the band,
  I took the oath to protect you over land, air or sea,
  And make the supreme sacrifice when the need came to be.

  I stood there with a sense of recognition,
  But on that day I never had the premonition,
  that when the time came to give me my due,
  You’d just say, “What is so great that you do?”

  Long back you promised a well-to-do life;
  And when I’m away, take care of my wife.
  You came and saw the hardships I live through,
  And I saw you make a note or two,
  And I hoped you would realise the worth of me;
  but now I know you’ll never be able to see,
  Because you only see the glorified life of mine,
  Did you see the place where death looms all the time?
  Did you meet the man standing guard in the snow?
  The name of his newborn he does not know…
  Did you meet the man whose father breathed his last?
  While the sailor patrolled our seas so vast?

  You still know I’ll not be the one to raise my voice
  I will stand tall and protect you in Punjab Himachal and Thois.

  But that’s just me you have in the sun and rain,
  For now at twenty-four, you make me think again;
  About the decision I made, seven years back;
  Should I have chosen another life, some other track?

  Will I tell my son to follow my lead?
  Will I tell my son, you’ll get all that you need?
  This is the country you will serve
  This country will give you all that you deserve?

  I heard you tell the world “India is shining”
  I told my men, that’s a reason for us to be smiling
  This is the India you and I will defend!
  But tell me how long will you be able to pretend?
  You go on promise all that you may,
  But it’s the souls of your own men you betray.

  Did you read how some of our eminent citizens
  Write about me and ridicule my very existence?
  I ask you to please come and see what I do,
  Come and have a look at what I go through
  Live my life just for a day
  Maybe you’ll have something else to say?

  I will still risk my life without a sigh
  To keep your flag flying high
  but today I ask myself a question or two…
  Oh India…. Why do I still serve you?

  • हे खरच भयानक आहे. आपले जवान कुठल्या परिस्थितीत कश्मिरमध्ये ड्युटी बजावताहेत याची जाणीव करुन देणारे पोस्ट. आपण आता ठामपणे आपल्या जवांनाच्या पाठेशी उभे राहायला हवे.

  • स्मिता
   धन्यवाद. मी पण वाचली होती काल ही.. ही कविता म्हणजे मनातला राग वाढायला एक कारण झालं, आणि हे पोस्ट लिहिलं!

 4. Pingback: Tweets that mention काश्मिर एक वेगळा व्ह्यु… | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 5. काळं काय पांढरं काय?
  सारी षंढपणाची कमाल आहे…
  आमच्या नसांमध्ये पाणी,
  त्यांचं रक्त तेवढं लाल आहे…

 6. swapna says:

  aaplya javanana ashi marhan hote?? this is really horrible.. bar zala tumhi tari ase photo takale.. kalal tari aamhala ki asahi ghadtay.. aamhi hya post chi link jastit jast spread karu.. chalel na?

  • स्वप्ना
   त्यांनी प्रतिकार केला आणि एखादा मुलगा/स्त्री वगैरे मारल्या गेली की मग तर मिडीया तुटून पडतो त्यांच्यावर. वाईट परिस्थिती आहे. आपल्या मिडीयाने आपल्या सैन्याच्या हार्डशिप्स दाखवायला हव्या, पण ते सगळे उलट बातम्या दाखवतात की सैन्य कसे अत्याचार करते आहे वगैरे….
   अवश्य फॉर्वर्ड करा लिंक.. 🙂 धन्यवाद.

 7. लीना चौहान says:

  दादा आता चार वर्षे मुसलमान देशात राहून डेमोक्रसी म्हणजे काय हे मला चांगलं कळलयं.. हे असले फोटो दाखवून इथे सगळे भारतीय मुसल्मान सिंपथी मिळवत असतात. मानवाधिकारवाले नक्की भारतीय आहेत का पाकिस्तानी असा हल्ली मला प्रश्न पडतो. पूर्वी सैनिकाला खूप मान असे पण असे प्रसंग पाहिले की कळते हल्ली सैन्यात कोणी का जात नाही. सैनिक म्हणजे शूरवीर अशी प्रतिमा मनात येते, पण काश्मिर मधले चित्र पाहिले तर सैनिक म्हणजे एक कठपुतली असेच वाटते, फार निराशाजनक आहे हे. इथे दोहा डिबेट्स खूप पॉप्युलर कार्यक्रम आहे. मध्यंतरी इथल्या कॉलेज चा एक ग्रूप दिल्ली मधे आला होता, डिबेटचा विषय, भारतात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत असा होता, फॉर अ चेंज सचिन पायलट जो कॉंग्रेस चा खासदार आहे त्याने विरोधात भाषण केले. णि शेवटी दोहा ग्रूप ने मान्य केले की भारतात मुसलमानांना समान वागणूक आहे. भारतात राहून कळत नाही आपल्याला पण बाहेर मुख्यतः आखातात असा समज आहे की भारत पाकिस्तान वर खूप अत्याचार करत आहे आणि विषेशतः मुसलमान फारच असुरक्षित आहेत भारतात.

  • लीना चौहान says:

   आधी पाकिस्तान ने पंजाब वेगळा करायचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न सपशेल फसला कारण शीख अतिरेक्यांना लोकांचा पाठिंबा फारसा मिळाला नाही. १९८४ मधे इंदिरा गांधींनी जे धारिष्ट दाखवले, ते नक्किच नेहरुंना जमले नसते. ८० च्या दशकात पंजाबात खूप हिंसाचार झाला पण अखेरीस सगळं सुरळित झालं कारण मुळात सामान्य लोक शांतता व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. तिथे ही अनेक निरपराध मारले गेले अनेक कुटुंबांची वाताहत झाली. (जर मिळाला तर गुरुदास मानचा ‘देस हुआ परदेस’ हा चित्रपट बघा, मी ४ वर्षापूर्वी पाहिला होता पण अजून आठवण आली तरी अंगावर काटा येतो) पण जे झाले ते स्विकारुन लोक सावरले. काश्मिरचा प्रश्न ६० वर्षात सुटला नाही कारण मुळात या अतिरेक्यांना बाहेरुन खूप मदत येत आहे. लॉजिकली विचार केला तर आज पाकिस्तान ची काय अवस्था आहे आणि बाहेर काय व्हॅल्यू आहे? दुबईच्या एयरपोर्ट वर जर पाकिस्तानी गेला तर त्याची कसून तपासणी होते. मुस्लिम देशात ही अवस्था आहे. अमेरिकेत तर सरळ पाकिस्तानी लोकांना इम्मिग्रेशन च्या लाईन मधून वेगळं काढतात आणि त्यांच्या सामानाची आणि त्यांची स्वतःची भरपूर वेळ लावून तपासणी होते. असे असताना काश्मिरी लोकांना भारतात राहणे जास्ती फायद्याचे आहे की पाकिस्तानात? ही नेते मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी देश विकायला निघाले आहेत.

   • पाकिस्तानी लोकांमधे जो द्वेश भरलेला आहे तो नेहेमी साठी रहाणारच. जसं गोवा भारतात समावून घेतलं तसं काश्मिर समावून घ्यायला पाहिजे. एकदा भारताचा अविभाज्य अंग झालं की सगळे प्रश्न सुटतिल.

  • लीना
   हे असे फोटो जास्त सर्क्युलेट करण्यात आपला मिडिया पण मागे नाही याचं दुःख वाटतं . आपला मिडीया तरी दूसरी बाजू समोर मांडणारा असायला हवा. काश्मिरी पंडीत जे दिल्लीला विस्थापित झाले आहेत ते बिचारे पुर्णपणे दुर्लक्षित झाले आहेत. त्यांच्याबद्दल मिडीया एक शब्दही लिहायला तयार नाही. अंगावरच्या कपड्यानिशी त्यांना पळून यावं लागलं होतं.

 8. Nachiket says:

  अगदी सत्य..नवीन एंगल खराच.

  पण मला कळत नाही की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे:

  मुलांनी किंवा स्त्रियांनी मिल्ट्रीच्या जवानांवर ग्रेनेड्स घेऊन हल्ले केले, आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला तर ती बातमी खास टीआरपी देणारी नसते, पण जर मिल्ट्री जवानांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात एखादा मुलगा किंवा स्त्री मारल्या गेली तर ती बा्तमी टीआरपी वाली म्हणून जास्त उगाळली जात असते.

  असं का आहे? खरं तर अगदी धंदेवाईक दृष्टी कोनातून पाहिलं तरी वरील दोन्ही प्रकारच्या बातम्यांना टी.आर.पी असायला हरकत नाही.

  “मुलांनी किंवा स्त्रियांनी मिल्ट्रीच्या जवानांवर ग्रेनेड्स घेऊन हल्ले केले” यात लोकांना इन्टरेस्ट नाही पण “मिल्ट्री जवानांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात एखादा मुलगा किंवा स्त्री मारल्या गेली तर” जास्त रस आहे हा प्रकार अनाकलनीय आहे. का असावं असं ? लॉजिकल नाही वाटत.. म्हणून… जर मिडीया मुद्दाम या दुस-या टाईपच्या बातम्यांना उठाव देत असेल आणि पहिल्या टाईपच्या बातम्या दाबत असेल तर त्यात टीआरपीपेक्षाही काहीतरी वाईट हेतू दिसतो. एकदम हिडीस शत्रूधार्जिणा हेतू आहे हा मिडीयाचा..उगीच भडकावणारा…

  • नचिकेत
   मला पण नेमका हाच प्रश्न पडला आहे. हे मी जे फोटॊ वर पोस्ट केले आहेत, ते कधी कुठल्या पेपरला पाहिले आहेत ?? या उलट गो ईंडीया गोबॅक हा फोटॊ पहिल्या पानावर???

   १०-१२ वर्षाच्या मुलांना पण नेउन ट्रेनिंग दिलं जातं. वरच्या एका फोटो मधे पाहिलं का? सगळीमुलं १०-१५ वर्षाच्या रेंज मधली आहेत. या मुलांच्या घरच्या लोकांना प्रसंगी धाक दाखवून मुलांना दगडफेकी साठी किंवा इतर कामासाठी वापरले जाते.

   एखादा मुलगा मारला गेल्यावर, फक्त सैन्याच्या कारवाईत एक १० वर्षाचा मुलगा मारल्या गेला असे छापुन येते. त्याच बरोबर तिथे ह्या वयातली मुलं काय काय करतात ते पण यायला हवं…

  • Sanket says:

   तुम्ही एक मुद्द अजिबातच विचारात घेतला नाही . ” लॉबिंग”.
   आखातातून भारतविरोधी आणि पाकिस्तानच्या बाजूने जनमत असण्याचे कारण म्हणजे समान धर्माच्या धाग्यामुळे पाकिस्तान ला तिथे आपसूकच सिंपथी मिळते आणि मग त्याचा पुरेपूर फायदा उठवुन पाकिस्तानी धार्मिक पुढारी आणि मुत्सद्दी तिथे लॉबिंग करुन जनमत त्यांच्या बाजुने वळवतात.

   बार्काइने विचार केला, तर लोबिंन्ग चि अनेक उदाहरणे वर्ल्ड पॉलिटिक्स मधे सापडतात. अमेरिकेत सरकारच्य पोलिसिवर तेलाच्य बिझीसिनेस्स चे धागे-दोरे हाति असणार्यान्चि जबर्दस्त पकड आहे- हे त्यानि कसे अचिवे केले?- लॉबींन्ग.

   अजुनहि भारतामधे पाश्चात्य विचार सरणिची अपत्ये श्रेष्ठ मानली जातात- उदाहरन- बी बी सी, मानवतावाद, जंक फ़ूड आनि बरेच काहि. नीत विचार केल तर असे दिसुन येते कि, ह्या जि टॉप लेवेल चि एन्टीटीज आहेत, ते जे द्रुष्टिकोन बाळगतात, तोच खालि (खालच्य मानल्य गेलेल्य) मेडिआ मधे झिरपत येतो (ज्याप्रमाने फॅशन हि बॉल्लीवूड च एखद हीरो पहिले एखाद्या मूव्ही मधे डिस्प्ले करतो, आणि मग बाकिचे सगळे- वर पासुन खाल्पर्यन्त च्या आर्थिक स्तरातले सगळे- ती फ़ॅशिओन फ़ोल्लो करतात. किंवा ज्याप्रमाणे बदलत्या व्हॅलुज य सिनेमा मधे सर्वप्रथम दाखवल्या जातात आणि मग त्या हळुहळु समाजात सर्व स्तरान्मधे ज़िरपतात- उदाहरणार्थ प्रेम हि सन्कल्पना किन्वा लव्ह मॅरेज हि पहिले हिन्दि सिनेमात दाखवलि गेलि- अगदि ६-७ दशकान्पुर्विपासुन, तेन्व्ह सर्व सामन्य लोक काहि लव्ह मॅरेज करत नव्हते, पन नंअत्र हळुहळु त्यास समाजात सुरुवात झालि आणि नन्तर समाज मान्यताहि मिळालि. तिच गोष्ट कॅजुअल सेक्स च्या बाबतित. आसो फ़ार विषयान्तर नको.)).

   टेक मेडिआ च्य सन्दर्भातहि लागु होते. उदा, शकाल या पपेर पेक्शा नक्किच टाइम्स ऑफ़ ईन्डि पेक्शा ल अधिक महत्व दिले जाते. त्यामुले होते असे कि, या या टॉप लेव्हल मेडिआ ला एकदा का इन्फुलेन्स केले कि काम सोपे होते. रीअर्टस आणि बीबीसी ने काहि एक खास द्रुष्टिकोन घेतला कि लगेच आपल्याकडचि बाकिचि ऎन्ग्लिश मेडिअ आणि त्याखालोखाल रीजनल लंग्वेज मेडिअ हि तोच द्रुष्टिकोन घेतो आनि मग आपन त्य सर्व गोश्ति बघतो कि ज्यान्बद्दल तुम्हि हे आर्टिकल लिहिलय.

   आत मुख्य विषयाकडे येउ.
   पाश्चात्य विचारसरणी हि कधिहि कोणतेहि आशियाई राष्ट्राला त्यांच्या बरोबरची लेखात नाही. म्हणुनच भारत दाखवताना इथलि झोपद्पट़्टि दाखवायचि आनि त्यान्चे देश दाखवताना फ़क्त तिथल्य पॉश गोश्टि दाखवायच्या अशा गोश्टी घडतात.
   य़ विचारसरणि नुसार भारताचि लायकि नाहि त्यांच्य बरोबरिने उभे राहण्याचि. आनि त्यामुळे सदैव इथल्या नेगटिव्ह गोश्टि दाखवुन भारताचि (किन्वा इतर कोणत्याहि एशिअन देशाची ) बदनामि करण्याचि मोहिम अखन्ड कार्यरत असते. भारत बरिच वर्शे अमेरिकेच्य पन्खाखालि नसल्याने (रशिय चा मित्र असल्यामुळे) सर्व पाश्चात्य मेडिअ ह कधिच भारताच्य बाजुने नव्हता.
   य़ाच पुरेपुर फ़ायद पाकिस्तान ने घेतला. आनि पाकिस्तान ल लोब्ब्यिन्ग करण्यासाठि प्लॅट्फ़ोर्म- जनमत (पाकिस्तान ल त्य काळि पुर्न सुप्पोर्ट करणार्य आखाति देशांमुळे)- रेअडिमडे मिळाले. बहुसंख्य मानवता वादि सन्घट अन या विचारसरणि वर पोसलेल्य आणि भारताचे वैचारिक शोशण करणारी बान्डगुले आहेत. नीट विचार करुन बघा, य सन्घटनांना जन्म देण्यासाठि पैसा कुठुन आला? त्याननंतरही य सन्घटना चालवण्यासाठी जो पैसा येतो, त्याचे मुळ स्त्रोत काय आहे?
   सापडले का उत्तर- य मानवतावादि सन्घटनाचा मानवता वाद फ़क्त दहशत वादि आनि नक्क्शल्वादि आणि त्यान्न डायरेक्ट आनि इन्डायरेक्ट सुप्पोर्ट करणार्यांच्या पुरत सीमीत आनि नेहमिच भारतिय अडमिनिस्टेटिव्ह स्सिस्टीम (पोलिस, मिलिट्री , एत्च) च्य विरोधात क असतो ते!!!!!!!!
   खलले क, कि य सन्घतनान्न भारतिय जवान सुद्ध्ह मानसेच आहेत आनि त्यान्नही मानवतावादाचि प्रिनिच्प्लेस लागु होतात याच सोयिस्कर रित्य विसर क पदतो ते!!!!!!!!

   • संकेत,
    ब्लॉग वर स्वागत..
    धन्यवाद..
    मराठी मधे टाइप करण्यासाठी http://baraha.com ह्या साईट वर सॉफ्ट वेअर विनामुल्य उपलब्ध आहे. तिथून डाऊन लोड करू शकता. किंवा हिंदी मधे गुगल ट्रान्सलेट मधे http://translate.google.com/#en|hi| या साईट वर टाईप करुन इथे पोस्ट करू शकता. फक्त ळ टाइप करता येणार नाही, तो इतर कुठून तरी कॉपी पेस्ट केला तरी काम होऊ शकतं.

    तुम्ही लिहिलेला एक वेगळा ऍंगल आहे. तो लिहायचा राहून गेला. तुम्ही जो या संघटना ( मानवतावादी वगैरे इतर) चालवण्यासाठी जो पैसा येतो तो कुठुन येतो हा प्रश्न अगदी योग्य उभा केलेला आहे. त्यावर एक पोस्ट लिहिलंय मी पूर्वी..
    आभार.

 9. vikram says:

  काका काश्मीरची परिस्थिती मागील काही दिवसात खूपच बिकट झाली आहे किंवा केली गेली आहे फुटीरवाद्यांकडून.३-३ महिने संचारबंदी जरा विचार करा
  सामान्य माणूस कसा जगात असेल ? व्यवसाय नाही नोकरी नाही कमवायचं नाही .. मग जगायचं कस ? अन्नधान्य मिळायचं मुश्कील झालाय त्यांची मानसिकता काय होत असेल ? लहान मुल,आई बाप अन्न वाचून तडपडत असतील तर त्यांनी काय करायला हव ? याचा विचार सरकारने करावा
  आज जर ३ महिने संचारबंदी करण्याची वेळ येत असेलतर ती सर्वस्वी सरकारची चूक किंवा त्याचे अपयश आहे.
  तुम्ही दिलेले वरील फोटो हे एक सत्य आहे ते नाकारत नाही आपल्या सैनिकांना मोरल सपोर्ट हा दिलाच पाहिजे.
  त्याच बरोबर तेथील सामान्य माणसाच्या मनातील भीती कमी करून आपल्या देशाबद्दल एक विश्वास निर्माण करायला हवा तर तेथील परिस्थिती सुधारेल. आजही तेथे आपल्या देशाबद्दल आदर असणारे खूप लोक आहेत काही बहकले आहेत त्यांना आपलेसे करावे लागेल नाहीतर हे असेच चालू राहील .. मग ते आपणही पाहणार आणि आपली पुढील पिढी सुद्धा 😦

  यावर मी मागील आठवड्यात माझ्या ब्लोगवर लिहिले आहे तुम्ही वाचले असेल अशी आशा करतो त्यात तो कायदा नक्की कसा आहे हे सुद्धा नमूद केले आहे.

  जय हिंद

  • विक्रम
   या भागाची एकॉनॉमी पुर्ण पणे टूरिझम वर अवलंबून आहे. गेली दहा वर्ष टूरिस्ट लोकांना ते काही करत नव्हते. आपले टुरिस्ट तिकडे जाउन पैसे खर्च करायचे, त्याच पैशातून टेररिस्ट लोकांना फंडींग केलं जायचं. मस्जिद मधे मोठं भावनिक आवाहन केलं जातं, इस्लाम खतरेमे है! आणि लोकं जे कमावलं, असेल त्यातली मोठी रक्कम त्यांना देतं!
   टूरिस्ट नाहीत.. तर पैसा पण नाही. पैसा नाही म्हणजे अतिरेक्यांवर फायनान्शिअल वचक…

   आज जी तिन महिने संचार बंदी करावी लागते, त्याचं कारण म्हणजे सध्या त्यांची पोटं भरलेली आहेत. गेल्या दहा वर्षात टुरिस्ट लोकांनी भरपूर पैसा खर्च केलाय तिकडे. त्याच्याकडे सध्या भरपूर पैसा आहे गाठीशी. म्हणून सुरु आहे हे सगळं- भरल्यापोटी रामायण. पुर्वी काहिवर्षापुर्वी पण अशिच वेळ आली होती. पैसा संपला, टेररिझम कमी झाला होता…

   • Sachin says:

    काका,

    माफ करा, एरवी मी दुर्लक्ष केले असते परंतु आपले लेख आवडतात आणि आपल्याकडून सर्वाना विचारपूर्वक प्रतिक्रिया येतात म्हणून हि प्रतिक्रिया..

    लेख तितकासा पटला नाही पण या वरील प्रतिक्रियेपेक्षा बरा म्हणेन..
    खरी परिस्थिती सगळीच आपल्या समोर येत नाही हे ही तेवढेच खरे आहे.. पण हे मत टोकाचे झाले.

    माझा एक काश्मिरी मित्र आहे, जी शाळा जाळली तिथे शिकलेला.. आणि एक हिंदू मित्र जो जम्मूच्या थोडा उत्तरेला काश्मीर जवळचा.. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी कळल्या..

    तिथे हेलावून जावे अशी स्थिती आहे सगळ्यांचीच (अतिश्रीमंत व नेते मंडळी नव्हेत तर सर्वसामान्य), गरिबांची तर खूपच.. आणि आज नाही सदा सर्वकाळ.. आपल्यासमोर येत नाहीत फक्त (इथे मिडिया नक्कीच जबाबदार..!)

    आणि बरयाच गोष्टी आहेत मी इथे मांडत नाही..

    पण आपल्याच देशाच्या लोकांबद्दल असा एकतर्फी विचार नाही पटला आणि तो बरोबर अथवा तथ्य असलेला तर नाहीच..

    कमीत कमी अशा राज्यातला जिथे सर्वात जास्त मतदान झाले आहे गेल्या निवडणुकीत तेच लोक रस्त्यावर का येतात हा प्रश्न महत्वाचा आहे (हो ‘तेच’ लोक .. कोणी अतिरेकी म्हणून मागवलेले असे म्हणून दुर्लक्ष नाही करता येणार)..
    आणि लोकांबद्दल विचाराल तर अमरनाथ यात्रा करून आलेले बरेच सांगू शकतील ते कसे आहेत ते…

    विषय बराच मोठा आहे आणि सैन्याला नक्कीच पाठींबा आहे पण नक्कीच सारासार विचार हवा …

    • हा एक तर्फी विचार नाही, केवळ एकतर्फी विचार करणाऱ्या आपल्या मिडीया बद्दल लिहिलंय इथे. मिडीया एकाच प्रकारचे चित्र समाजापूढे उभे करतो. कधी हिंदू विस्थापीतांच्या बद्दल कुठे काही वाचलंय का>? नाही नां??? हे का झालं , हे लोकं असे कां वागतात, याचं कारण आहे यांचा पाकिस्तानातला आका.
     जर आयर्न फिस्ट वापरून रझाकार मुव्हमेंट दडपली नसती, तर आज भारताच्या मध्य भागी एक पाकीस्तान राहिला असता. अशा गोष्टी आयर्न फिस्ट नेच दाबायच्या असतात. पंडीत नेहेरुंनी युनो समोर…..जाऊ दे , खूप कठीण विषय आहे तो, आणि माझा त्यावर एवढा अभ्यास पण नाही.
     आपल्याच देशात राहून जर आपलीच माणसं देश फोडायच्या कारवाया करत असतील तर मग त्यांना विरोध हा करायलाच हवा,अणि मिलिटरीला सपोर्ट करायलाच हवा. मिडीया नेमकं उलट करतोय.

     • Sanket says:

      mala tumacha ha “iron fist” drushtikon kaahi cases mahde laagu honyaasandharbhaat patato. Faar kami lok asha prakaare openly support karataat iron fist chya drishtikonaala. Pan tumachyaa-maazyaasaarakhe hajaaro, laakho lok asatil ch na asa vichaar karanaare. kadhi hee vichaarsarani ughadpane samaaj maany zaaleli disaliye? kaa naahi? -ya vichaarsaranichya lobbying chi kamatarataa aani yaachya virudhdha baajune jordaar lobbying.

 10. Mrunal says:

  He sagale Poto India madya pratyekala send kele pahijeth manje 90% jantela kalel ki nakki kai chalale ahe the ahi tehi tabdtob.
  pratyek blocg vachnaryane aplya javal asnarya e-mail var he sagle pathvale paje. kaka tumala kai vathe

  • अवश्य.. सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणुनच तर हे पोस्ट लिहिलं. आपल्या सैनिकांचं मनोधैर्य आपणच वाढवायला हवं.त्यांना भावनिक आणि इतर सपोर्ट करायलाच हवा..

 11. संताप येण्यालायकच आहे हे सगळं !!
  कसं आणि केव्हा थांबणार आहे हे देवालाही ठाऊक आहे की नाही कोण जाणे 😦

  • जयश्री
   तो दिवसच असा वाईट गेला माझा. सकाळी टाइम्स ऑफ इंडीया च्या पहिल्या पानावर गो इंडीया गो.. नंतर दूपारी ती मेहेबुबा मुफ्ती..
   लवकर थांबायला हवं हे ..

 12. thanthanpal says:

  काश्मीर समस्या नेहरू मुळे निर्माण झालीच पण पुढे त्या समस्येचा राजकीय फायदा पाहून कॉंग्रेस आणि विरोधी पक्ष सुद्धा ती समस्या मिटवण्या करता फारसे उत्सुक नाहीत . अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल, मानवाधिकार वाल्यांना तर ३ पेज वर TV वर झळकण्या साठी मुंबई बोंबस्फोट काश्मीर हे तर पर्वणीच वाटतात. सर्वात पाहीले या लोकांना (ONIDA TV मधल्या जाहिराती प्रमाणे) मोठा दगड बांधून खोल समुद्रात आधी बुडवून द्यावे. नंतर सर्व मुफ्ती महमद ते गिलानी सारख्या नेत्यांना एका रांगेत उभे करून श्रीनगर च्या लाल चोकात जाहीरपणे गोळ्या घालून ठार करावे. सावरकरांनी सुचविल्या प्रमाणे तेथे माजी सैनिकांच्या वसाहती उभ्या कराव्यात आणि जो विशेषअधिकरचा राज्याला दर्जा दिला तो काढून टाकावा. रोग जास्त झाला तर जसे ऑपरेशन करावे लागते, तसे ऑपरेशन केल्या शिवाय काश्मीरचे दुखणे बरे होणार नाही.आणि महात्म्याच्या अहिंसेच्या नसबंदीने षंढ झालेले आपले राजकारणी हे ऑपरेशन करू शकत नाही , तो पर्यंत देशाचा हा तमाशा TV वर पाहणे भाग आहे. http://thanthanpal.blogspot.com/2010/08/blog-post.html नेहरूंच्या हिमालय एव्हड्या महाकाय चुकी मुळे भारताच्या जन्मा पासून देशाला रक्तबंबाळ करणारी जखम आता गंग्रीन प्रमाणे भारताच्या शरीरात पसरली आहे.

  • तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. युनो मधे प्रश्न उभा करण्याची जी घोड चूक केली त्याचे परीणाम अजूनही आपण भोगतोच आहो.
   तिथे माजी सैनिक कशाला? इव्हन तिथे नविन इंडस्ट्रीज जरी सुरु केल्या तरीही मुख्य प्रवाहात येतिल ते सगळे. भारतातले सगळ्या भागातले लोकं तिकडे जातिल , एकदा इंडस्ट्रीज सुरु झाल्या की.
   काश्मिर मधून पळवून लावलेले लोकं जरी परत गेले, आणि सरकारने त्यांना सपोर्ट केला तरीही रिलिजियस बॅलन्स राहिल बऱ्या पैकी.

 13. आपली सगळी प्रसारमाध्यमं बाहेरच्यांनी विकत घेतलेली आहेत याचा प्रत्यय वारंवार येतोय…. अतिशय दुखःद.. आणि याला जवाबदार घरचे भेदीच आहेत…..

 14. arthantar says:

  हे सर्व बघायला काश्मीरला कशाला जायला हवे काका? मुंबईतही मोर्चे, दंगलींमध्ये(etc.) ह्याहून वेगळे काही घडते का?
  पण मुंबईकरांची समजूत (मिडियाची नव्हे) पोलीस म्हटला की तो ‘लाचखाऊ’ अशी असते, तसेच काहीसे काश्मिरींचे झाले असेल .

  • खरं आहे.. मुंबईकर कशाला सगळ्याच लोकांना तसं वाटतं..
   काश्मिर मधली परिस्थिती वेगळी आहे. तिथे चक्क सैन्य उभं असतं सगळीकडे.. म्हणून दोघांची तुलना करता येणार नाही.

 15. हेमंत आठल्ये says:

  यावर मला वाटत पाकिस्तान नष्ट करणे हाच एकमेव पर्याय आहे. अणुबॉम्ब टाकून तिथली लोकच काय तिथली जमीन नष्ट करून टाकणे. किती दिवस आपण गांधीजींची माकड प्रमाणे पहाणे, बोलणे आणि ऐकणे बंद करणार. उरला प्रश्न कश्मीर लोकांचे. त्यांचे लाड बंद करायला हवे. असो, नुसते बोलून काहीच फायदा नाही. कृती करावीच लागेल..

  • Rahul says:

   vaa saheb….. pakistan nasht karnar ! kasa karnar ? nuclear bomb takun ?
   Nuclear bomb mhanaje kaay te samajate ka ? uchalai jeebh lavli talyalaa ase bolu naye. Jara practical bola.

  • Nachiket says:

   आठल्ये साहेब.. आपल्या भावना प्रखर आहेत. पण असे करून प्रश्न सोडवले जात नसतात हे ही खरेच.
   ..पाकिस्तानातल्या सामान्य जनतेविषयी तुम्हाला काहीच सहभावना नसाव्यात याचा खेद झाला.

   अणुबॉम्बने मूळ समस्या नाहीशी होणे तर दूरच पण आणखी गुंता उत्पन्न होईल.. केवळ काही योग्य उपाय सापडत नाही म्हणून मग असे काही आततायी करायचे हे शहाणपण नव्हे.

   • लीना चौहान says:

    नचिकेत तुला कधी पाकिस्तान्यांशी इंटरॅक्ट करायला मिळाले आहे की नाही हे मला माहित नाही. पण मी गेली ३ वर्षे कतार मधे रहात आहे. इथे अनेक पाकिस्तान्यांशी कामामुळे आमचा संपर्क आला. भारतद्वेष अगदी सर्वसामान्यांच्याही रक्तात भिनला आहे, काही ही झाले तरी भारतामुळे पाकिस्तान चे किती नुकसान झाले आहे असेच सारखे बोलत असतात. आत्तापर्यंत ३-४ लोकांनी मझ्या नवर्याला मुसलमान होण्यासाठी गळ घातली आहे. त्यामुळे ह्या विषयावरच्या माझ्या भावना फारच तीव्र आहेत. १९७१ ची हार त्यांच्या इतकी जिव्हारी लागली आहे की त्यामुळे काही झाले तरी भारत तोडायचा असे पाकिस्तानी सरकार पासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच मनावर घेतले आहे. त्यातून तिथे निरक्षर खूप आहेत, अश्या लोकांवर तर मौलवींचा खूप प्रभाव आहे. जर मौलवी ने सांगितले कि भारत आपला शत्रू आहे तर हे लोक डोळे मिटून ऐकतात. धर्माच्या नावाखाली मौलवी जे काही सांगतील ते करायला ते तयार होतात.

    • सगळ्यांच्या भावना तिव्र आहेतच. हेमंत ने जे लिहिलंय ते शब्दशः घेउ नका, त्या पाठच्य भावना बघा.

     प्रत्येकालाच असं कधी ना कधी तर वाटत आलंय…
     धर्माच्या नावाखाली ते मौलवी जे सांगणार ते सगळी लोकं ऐकायला तयार असतात. आणि तिथे असलेले मदरसे- त्या मधे ’शिकुन’ तयार होणारे ’सुशिक्षित’ …. त्यांच्या बद्दल तर न बोललेलेच बरे.

    • Nachiket says:

     लीनाजी..तिथेच तर मेख आहे ना.. मी आणि हेमंत (बहुधा) दोघांनीही पाकिस्तानी लोकांशी इंटरएक्ट केलेलं नाही. दोघेही ऐकीव माहितीवरच बोलतोय. हेमंत यांनी जे विधान केलंय ते ही इंटरएक्ट न करताच केलं असावं. हे विचार म्हणजे तुम्ही पाहिलेल्या भारतद्वेषी पाक नागरिकांचा बरोब्बर व्युत्क्रम नाही का? (म्हणजे पाकद्वेषी भारतीय नागरिक). आणि ते ही कोणी द्वेष मनात भरवण्यासाठी शाळा. कँप वगैरे न घेताच?

     इंटरएक्ट न करताच आम्ही त्यांना नष्ट करून टाकण्याचा उपाय सांगतो. हेच ते विष नाही का?

     तुम्ही काही अनिवासी पाकिस्तानी लोकांशी इंटरएक्ट केलेत आणि अनुभव घेतलेत. तुम्हाला स्वत:ला तरी खरंच असं वाटतं का की त्या चार लोकांच्या अनुभवावरून एकूणात पाकिस्तानी जनतेची अपरिमित हानी होईल किंवा ते भस्म होतील असा जालीम उपाय करून भारताचे असले प्रश्न सुटतील?

     पाकिस्तानातही खूप हिंसाचार आणि दहशतवाद आहे. त्यातला कोणी कामानिमित्त इथे आला आणि उपरी निर्दिष्ट पाकद्वेष पाहून म्हणाला की या भारताच्या (की “भारतडयांच्या”) डोक्यावर बोंब टाकून त्यांना नष्ट करा म्हणजे पाकचे प्रश्नच सुटतील..तर?

     • लीना चौहान says:

      गॅंगरिन झालेला भाग कापूनच काढावा लागतो. नाहितर जीव जातो. काही प्रश्न हे एक घाव दोन तुकडे याच पद्धतीने सोडवावे लागतात. २-३ दशके पाकिस्तान भारतात अतिरेकी कारवाया घडवून आणत आहे. एक अख्खी नवी पिढी आली आहे ज्यांना मूळ प्रश्न माहितच नाहिये. आज जे १०-१२ वर्षाची मुले सैनिकांवर दगड्फेक करत आहेत त्यांना कधी कोणी १९४८ च्या लढाईबद्दल काही संगितलेच नाहिये. ती मुले सैनिकांच्या पहार्यातच वाढलेली आहेत. आजची जी पाकिस्तान ची युवा पिढी आहे त्यांना शाळेत इतिहासात हेच शिकवतात की भारताने पाकिस्तनचे २ तुकडे केले, पण मुळात पुर्व पाकिस्तान मधे खूप असंतोष होता हे त्य़ांना माहित नाहिये. इथे नुसती ब्लॉग वर चर्चा करण्याशिवाय आपल्या हातात काहिही नाहिये. ज्यांच्यावर आपण देशाचे सुरक्षाविषयक महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळे दहशतवाद संपूर्ण देशात पसरत चालला आहे. अश्या वेळेस हेमंत ची काय किंवा माझी काय जी तीव्र प्रतिक्रिया आहे ती अश्याच हताशपणातून आली आहे. मला पाकिस्तान्यांविषयी द्वेष नाहिये. पण जर केवळ मी मुसलमान नाहिये आणि मी भारतीय आहे म्हणून कोणी सतत मला काहि बाहि बोलत असेल तर मला चालणार नाही. आता हा प्रश्न इतका चिघळला आहे णि आंतरराष्ट्रिय बनला आहेक युद्ध ही करता येणार नाही आणि शांतिपूर्ण मार्गाने आ प्रश्न सोडवता येणारच नाही. शांतिपूर्ण म्हणजे एकच उपाय आहे काश्मिर पाकिस्तानला देऊन टाकणे. बर समजा पड खाऊन भारताने हा भाग देऊन टाकला तरी पाकिस्तान शांत बसेल अस नाही कारण ते अजून अजून आत घुसतील. म्हनजे काय आज असा कुठलाही उपाय नाहिये की ज्यामुळे हा प्रश्न सुटेल. जर उद्या पेट्रोलियम ला काही पर्याय मिळाला तर सगळे पाश्चिमात्य देश एकत्र होऊन आखातावर हल्ला करु शकतील. मगच ह्या धर्मांध लोकांची रसद तुटेल. ह्याला २० वर्षे किंवा २०० वर्षे सुद्धा लागतील. तोपर्यंत हरी हरि करा आणि परत कोणीतरी शिवाजी महाराज, राजा रणजितसिंग किंवा गुरू गोविंदसिंग येण्याची वाट बघा.

 16. मनोहर says:

  काश्मीरपासून लडाख व जम्मू टॅक्टिकली वेगळे काढण्याचा विचार केंद्र सरकार करून नंतर मुस्लीमाना धूप घालणार नाही याची खात्री पटल्याने या दंगली आयोजित केल्या जात आहेत.

  • मनोहर
   या विषया संदर्भात काही लिंक असतिल तर देऊ शकाल का? कारण मी पुर्ण अनभिज्ञ आहे या बाबतीत.

 17. मी नुकताच श्रीनगर-कारगील-लेहा ला जाऊन आलो. श्रीनगरला पुर्ण शहरात संचारबंदी आहे. गेले तीन महिने हे असच चाललय पण त्या लोकांची चरबी अजून तशीच आहे. मला आलेले अनुभव माझ्या ब्लॉगवर लोहिले आहेत.

  • नरेंद्रजी
   धन्यवाद.. त्यांच्याकडला पैसा जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत ते असेच वागणार. पूर्वी पण असंच झालं होतं. नंतरची काही वर्ष शांत गेली.. थोडा पैसा जमा झाला, की असेच वागतात ते..

 18. ravindra says:

  बाकी सर्व ठीक आहे पण त्या लहानग्यांचे भवितव्य काय? १२ व्या वर्षी हातात ग्रेनेड?

  • रविंद्रजी
   त्यांना अगदी लहानपणापासूनच शिकवण दिली जाते भारत द्वेशाची. त्यांचं भवितव्य पुर्ण पणे अंधःकारमय आहे . इतक्या लहान मुलांना अशा पोलिटीक्स मधे ओढायलाच नको. पण जर त्यांचे पालक त्यांना परवानगी देत असतिल तर मग मात्र तेच जबाबदार आहे या मुलांच्या भवितव्यासाठी.

 19. खरंच भयंकर आहे हे. मला वाटतं सगळ्यात प्रथम कोणाला ताळ्यावर आणायचं असेल तर ते म्हणजे या एनजीओज ना.. !!

  • nayanraut says:

   एनजीओज बद्दल तुमच मत एकदम बरोबर आहे… एनजीओ आणि दानधर्म ह्याविशावी मी मागच्या आठवड्यात काही लिहाल होत, कदाचित तुम्हाला पटणार नाही पण माझहि मत 🙂

   http://nayanraut.wordpress.com/2010/09/18/charity/

   • धन्यवाद हेरंब आणि नयन… भारतामधे असलेले ९० टक्के एनजीओ हे मनि लॉंड्रिंग साठी वापरले जातात. मग या मधे आसाराम बापूचा एन्जीओ पण आला ..

 20. खरच महेंद्रजी खुप खुप आभार हया पोस्टबद्दल…मी तरी हया बाजुने कधीच विचार केला नव्हता हया घटनेंचा…हे जे होत आहे ते मात्र अतिशय धक्कादायक आहे…

 21. nayanraut says:

  गेली ५० वर्ष काश्मीर मध्ये सैन्य आहे. काय साध्य झाले आहे त्या सैन्याने? अर्धा काश्मीर पाकिस्तानात गेला, लाखो नागरिक मेले, हजारो सैनिक मेले, वादी अजूनही जळत आहे. सैन्य नसेल तर काश्मीर काही भारतापासून वेगळा होणार नाही. मग त्या सैन्याचा उपयोग तो काय. मला सैन्यावर केलेला खर्च जर बंध करून तोच पैसा काश्मीरच्या विकासासाठी वापरला तर कदाचित लोक शांत होतील.

  एकदा काश्मीरमधून सेना काढून शांतीला संधी दयायलाच हवी.

  • नयन
   शांतीची संधी दिली गेली होती. सैन्य काढलं की इतर तिथे शिल्लक असलेले हिंदूंचे शिरकाण पून्हा सुरु होईल. बारामुला भागात मी स्वतः जाउन पाहिले होते जळलेली घरं… सैन्य असतांना पण जर शांती राहू शकत नाही तर सैन्याशिवाय काय होईल याची कल्पनाच करवत नाही.

   सैन्याने काही साध्य करायचे नसते. सैन्याचे काम फक्त देशाची अखंडता राखायची. कारगील वरच्या विजयाने आप्ण काय मिळवले असाही विचार केला जाऊ शकतो पण.. असो..

 22. nayanraut says:

  आणखी एक, मला नाही वाटत कि भारतीय सैन्य काश्मीर मध्ये कुणावर अत्याचार करते. सैनिकांना ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाते त्यात त्यांना नागरी समस्या सोडीविण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही, कारण ते काम पोलीस दलाचे आहे. सैनिकांना दिले जाणारे प्रशिक्षण हे रोखटोक असते. जर १० वर्षाच्या मुलाने बॉम्ब फेकला तर सैनिक गोळी मरणारच, त्याविरुद्ध मानव अधिकारवाले किठीही ओरडले तरी त्याने काहीही होणार नाही कर तो सैनिक त्याच प्रकारे शिकला आहे. त्या सैनिकाची ह्यात चूक नाही, चूक त्या माणसाची आहे ज्याने त्या सैनिकाला हि समस्या सोडविण्यासाठी पाठवले आहे.

  • नयन..
   ह्या प्रशनाचं उत्तर शोधायला मी जेंव्हा प्रयत्न केला तेंव्हा चक्रव्युहात फसलेल्या अभिमन्युला काय वाटलं असेल याची जाणिव झाली मला.
   समस्या कुठली? आझाद काश्मिर हवाय त्यांना.. ही समस्या.
   सोडवणार कोण??
   -सैनिक?? छेः.. ते तर स्टेटस्को मेंटेन करायला आहे तिथे.
   – राजकीय नेते?? मे बी.. जर त्यांनी मनात आणलं तर , आणि सगळे जण एकत्र झाले आणि काश्मिरला भारतात इन्क्लुड करुन घेतलं तरच ही समस्या सुटू शकेल.. तो पर्यंत नाही असे वाटते मला तरी..
   -भाजप जेंव्हा सत्ते वर होती, तेंव्हा सत्तेवर येण्यापुर्वी ते काश्मिरचे कलम रद्द करू म्हणून घोषणा केली होती. पण सत्ते वर आल्यावर काहीच केलेले नाही त्यांनी सुध्दा!

 23. vrusha says:

  “काम शल्याने महाभारतात केलं, तेच काम तो आपल्यात राहून करतो आहे. मनोधैर्य खच्ची करण्याचं. ” >> answer is Media!!
  Is there any website where we can put our concerns regarding any specific media/channel?

 24. mau says:

  महेंद्रजी,
  नाण्याची दुसरी बाजु तुम्ही दाखवुन दिलीत…न्युज वाले तर स्वताःच्या स्वार्थाकरीता काय करतील ह्याचा नेम नाही….
  हे सगळ कधी थांबेल कोण जाणे…[:(]

  • दोन दिवस सारखं त्याच त्या बातम्या पाहून अतिरेक झाला होता म्हणून मनात बरंच काही साठलं होतं.
   असे अनेक फोटो आहेत नेट वर . त्यांच्या साईट्स वर. हे लवकर थांबायला हवे कुठल्याही परिस्थितीत ही हार्दिक इच्छा..

 25. महेश says:

  काश्मीर प्रश्न तसाच राहणार ,ह्याला कारण आपल्याकडील राजकारण ,राजकीय शक्ती आपल्याकडे अजिबात नाही ,राजकीय लोकांन्मध्ये अजिबात एकवाक्यता नाही ,शिष्टमंडळ नेऊन काय उपयोग झाला?

 26. लीना चौहान says:

  आज हे दोन लेख वाचनात आले. आतले भेदी हे असलेच पेज ३ वाले लोक असतील.
  http://ibnlive.in.com/news/india-is-a-corporate-hindu-state-arundhati/130817-3.html
  http://blogs.timesofindia.indiatimes.com/politically-incorrect/entry/two-years-on-mumbai-is-marginalizing-muslims

 27. दीपक says:

  हे फोटो कुठल्या साईट्सवरुन घेतले आहेत त्याची कृपया लिंक द्यावी.

  • दिपक
   अशा अनेक साईट्स आहेत सर्फिंग करतांना एक एक सेव्ह करत गेलो होतो.go india go back किंवा kashmir kids attacking military etc सर्च करा बऱ्याच साईट्स सापडतील. ज

 28. poojashree says:

  namskar, khupach educational blog hota haa,yaa ashyaa drishtikonane kadhi mi vichaar kelaa navtaa.tumhi 19 sept cha MAHARASHTRA TIMES CHAA SAMWAD CHA FRONT PAGE warchaa yaa vishyasambadhi lekh waachalaa kaa?totally, times ne sudhaa lashkaralaach target kele aahe.!!!

 29. jyoti ghanawat says:

  sarv vachun …..ani news baghun chid yete…. baryachada ashya lahan mulana baghitla ki tyanchi daya hi yete….. pan hich mul kay karu shakatat….te mumbaivarlya hallyat anubhavlay……sarvanich….pan tevha hi manav adhikravalyani…..polisanchi baju ghetli nahi……. kashmir madhye milirty valyanchi halat tar tyahun bhayank…… eka bajune pakistani…..dusarya bajune jyanchya surakshesathi te pran lavun ladhtayat te kashmiri lok……. tar ekikadun apale swatachya swarthasathi kahihi karayla laaj na balgnare swarthi nete…..tyana kashyach kahi nasat….. ani deshyat sagalikade militry ani police yanchich badnami jast hot asate… tyalahi karnibhut apanach…. peoples memory too shorts…..aaj charcha karnar udya sagale visarun janar…… aplyala tyachyashi kay… apan bhale ani apale kaam bhale…..halli ashich vruti disate sarvanchi…..

 30. महेंद्र,

  अगदी ह्याचा विचारावर आमच्या मित्रांच्या न्युजग्रूप मध्ये चर्चा झाली होती. बातमी कशी दाखवली त्यावरून जनमानसा वरचा परिणाम ठरतो हे खरेच आहे. एकांगी बातम्या दाखवणे हे गुन्हेगारी कृत्य ठरले पाहिजे.

  छान विवेचन झाले आहें.

  • निरंजन

   बातमी कशी दाखवू नये हे पहायचं असेल तर सध्याच्या प्रायव्हेट चॅनलच्या बातम्या पहा.. अर्धवट बातमी, किंवा एकांगी दाखवणं हा पण गुन्हा ठरायला हवा.

 31. रोहन says:

  गेल्या १५ वर्षात आर्मीने ‘ऑपरेशन सदभावना’ राबवून बरेच चित्र बदलले असले तरी मिडीया काही बदललेली नाही. खरच असो… लिहावे तितके कमीच!!!

 32. shreenivaas says:

  lok voting chya veli paise gheun nivdun detat an nantar oradat bastat
  atal baba hote tevha navhat as kahi
  congress ka hat gundo ke sath

  • श्रीनिवास
   योग्य नेते निवडून देणं आपल्या हातात आहे. सगळ्यात जास्त मतदान हे काश्मिर मधेच झालं हे पण विसरता येत नाही. पण मिडीया अजूनही चीप बातम्यासांठी बातम्यांना तोड्मरोड करून दाखवतोय ह्याचं वाईट वाटतं.

 33. ppb says:

  Mulatach kashmir prashna ha bharatche pararshtra dhoran kiti kamakuvat aahe hech dakhavate. Bharat ha kasmir prashni pratyek varshi punha punha harato aahe hech satya . Kashmir prashan kuni nirmaan kela ? Aapalya neharuni, jeva sampoorna kasmshmir aani pakistan cha kahi bhaag bharatiya sainya padakrant karu shakat hote teva neharuni tyana thambabvale aani var javun sanyukta rashtra madhe ha prasna ubha kela .

  Prashna aapanach nirmaan kela . Aaj kashmir war aapan 10% rashtriya utpanna kharcha karato , fayada kaay ? Tyana pakistan sarakhya tuchha shatrucha aadhaar watato . Kashmir madhe kadhi kuni tax bharat nahi kiva kuni kadhi upashi marat nahi ka ? Sarakari sawalti aahet na aapalyach shatruna mothe karayala .
  Mulatach kashmir ha prashna dharmashi nigadatit aahe pan he satya kunihi swikarayal tayar nahi . Tithalya hinduna yasathich paraganda vave lagale .
  Yawar ekach upaay aahe , dilution , kashmir che sarwabhumatwa sampwa , jeva sampoorna dehsatil lok tithe javun rahatil aani yaanchi sankhya kami hoil tevaach te sudharatil .

  China madhe suddha haach prashna aahe ek pranta madhe . Tyani kaay kele ?
  Railway aani road network ne ha bhaag aadhi jodala tithalya sthanik lokana dusarikade nokarya milayal mdat keli aani tyach veli itar lokana tya prantamdhe nokaryanshthi pradhanya dile . Kay zale ?
  Majority, minority zali aani prasna sampala …

 34. Mahesh Chinchani says:

  Media asshya batamya ka deto?
  Fakt TRP sathi? Mala nahi watat.
  Bharata Madhala media konachya hatat aahe yacha abhyas karawa lagel.
  Media mhanje adhunik gobbels aahet je 100 wela khote ordun sangatat.
  Mahye ek mail wachali hoti aani tyamadhye Brartatil 80% media ha foreign cristan michanary chalawatat aani urlela Arab madhil pisa. Aani samanya Bhratiya manus kay confuse aasato to yach mule

 35. Gurunath says:

  होम पीच,

  कश्मीरात जे काही होते त्याला बघायचे आपले काही द्रुष्टीकोन तयार असतात आपण फ़ॅक्ट्स फ़क्त आपापले साचे वापरुन री-मोल्ड करत असतो…..

  कट्टर नशनलिस्ट लोकांना काही….
  हिंदुत्ववादी लोकांना काही………..
  मुस्लिम कट्टरपंथीयांना काही…….

  मुळात कश्मीर मधे आर्मी किंवा फ़ोर्सेस (ह्यात पॅरामिलिटरी पण आली म्हणजे सी.आर.पी वगैरे) ह्यांना काही स्पेशल हक्क दिले आहेत

  आर्मड फ़ोर्सेस स्पेशल पॉवर अ‍ॅक्ट…. ए.एफ़.एस.पी.ए म्हणतात त्याला…. ज्याच्यामुळे लोक बरेचदा जेरिस येतात….

  थोडे डीफ़ेन्स च्या बाजुने विचार केल्यास,

  आमचा एक दादा आहे, आर्मीमॅन तो म्हणाला… ह्युमन राईट वाले काय भुंकायचे भुंकू द्या…

  स्पष्ट परिस्थिती आहे…. एखादे ५ वर्षांचे पोर चॉकलेट मागत जवळ येते… आम्ही ही माणसे आहोत…

  घरची पोरांची याद येते म्हणुन आम्ही ते पोर जवळ घेतो… गोंजारतो… तेवढ्यात ते पोर एक कळ दाबते अन माझे ५-६ साथी खल्लास होतात

  नेक्स्ट टाईम, मी का माणुसकी दाखवावी? ते पोर गिल्टी असेल अथवा नसेल…. पर अ‍ॅझ अ अफ़सर ऑफ़ द फ़ौज मै मेरे जवानों की जान खतरे मॆं नही डाल सकता….

  यही कारण है… बस यही….

  दोन्ही म्हणणे आपापल्या ठीकाणी बरोबर म्हणले तरी तटस्थ न राहता झुकते माप आर्मी कडे जाते… पण कश्मीरी तेच वेगळॆ इंटरप्रीट करतात… त्याचे जिओ पॉलिटीकल इंपॅक्ट्स म्हणजे हे पश्चिम धार्जिणे अ‍ॅम्नेस्टी वगैरे बांडगुळॆ….. मुळात अजुनही डेव्हलपिंग नेशन असल्या मुळॆ आपली अंतरराष्ट्रीय पातळी वर ही मुस्कुट्दाबी होत असते….

  त्यामुळॆ कश्मीर हे अवघड जागचे दुखणॆ आहे हे मात्र नक्की…..

  • काश्मिर हे अवघड जागचं दुखणं आहे. हे मात्र नक्की +१
   सध्या कोंकण रेल्वे ने काश्मिरला जोडण्याचे घाटते आहे. पहिल्यांदा जेंव्हा काश्मिरवर पाकने कब्जा केला होता, तेंव्हा काश्मिरला जाणे फार अवघड होते. जर श्रीनगरच्या विमानतळावर आपले विमान पोहोचले नसते, तर काशिर हातचे गेले असते. इतके असूनही काश्मिरपर्यंत सरळ रस्ता अजुन बनवला गेला नाही. फक्त एक टनेल बनवलाय जवाहर टनेल! असे अनेक टनेल्स बनवून काश्मिर जोडल्या गेले पाहीजे जम्मूशी.

 36. Gurunath says:

  thnks to IR books for UPSC…. aapali jalat astana hi ti tatsth pahane an tyache analysis karane hech khare admin che kam aste….. so we can say administration is tht blob in the chasis of nation tht maintains the Centre of Gravity of the sensetive vehicle

 37. Gurunath says:

  जवाहर टनेल बहुतेक जगातला सर्वात लांब आहे, त्या ऊंची वर…..

  जम्मू ते उधमपुर नवी रेल्वे फ़्लॅग ऑफ़ झाली तर आहे…. ती एक स्ट्रॅटेजीक विन आहे भारताची…

  पृथ्वी, हे भारताचे आय.आर.बी.एम म्हणजे मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टीक मिसाइल आहे…. अन फ़ॉर्च्युनेटली ते मोबाइल रेल कॅरीयर ने कुठे ही नेले जाऊ शकते…

  मुळात ह्या रेल्वे ने भारताने २ पक्षी मारले आहेत. पहीले… कश्मीर कनेक्टीव्हीटी….

  दुसरे, पोटेंशिअल थ्रेट टू चायनिज व्हेंचर इन तिबेट… क्विंघाय-ल्हासा रेल्वे (जगातली सर्वात उंचीवरची)

  ही आता भारतीय मिसाईल अटॅक ला व्हल्नरेबल झाली आहे….

  फ़ायनली, काहीतरी बेटर झाले आहे

 38. भारतात काश्मिरी लोकांना कसली मस्ती आहे मला कळत नाही , ह्या लोकांच्या कडे टीव्ही व नेट नसेल तर ते सरकार ने पुरवावे व शेजारी पाकिस्तान मध्ये काय चालले आहे , बलुचिस्तान मध्ये पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार त्यांच्या प्रमुख शहरात पॉलिटिकल
  किलिंग भरीस भर शिया सुन्नी ह्यांचे वैर , द्रोण हल्ले जगात बदनामी , भारतातून वेगळे झाल्यावर त्यांची आज काय स्थिती आहे हे यु ट्यूब पाकिस्तानी वाहिन्यांवर दाखवावे, उद्या जर काश्मीर चुकून स्वतंत्र झाले तर जगातील प्रमुख राष्ट्रे तेथे तडमडून काश्मीरचा दुसरा अफगाणिस्तान करतील. एवढे साधे कळत नाही , त्यांचे भौगोलिक महत्त्व त्यांच्या मुळावर येईल.
  आणि गिलानी व मलिक सारख्या नेत्यांना तर कोवेर्ट ऑपरेशन करून मारले पाहिजे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s