मुलखावेगळी माणसं

अविनाश धर्माधिकारी

काय रे?? मोठं झाल्यावर तू कोण होणार? हा प्रश्न जवळपास प्रत्येकानेच लहान असतांना ऐकलेला असतो. खरं तर आपणही एखादा लहान मुलगा भेटला की हा प्रश्न विचारतो. आजकालच्या मुलांचे कन्सेप्ट्स खूपच  ’क्रिस्टल क्लिअर’  आहेत.पुढे काय करायचं हे अगदी लहानपण पासून  ठरलेले असते. जवळपास प्रत्येकच मुलगा मला   इंजीनिअर , सीए, किंवा डॉक्टर व्हायचंय असं सांगतो. माझी मुलं पण याला अपवाद नाहीत.

आजकाल तर इतकी इंजिनिअरींग आणि मेडीकल कॉलेजेस सुरू झालेले आहेत की भारतातल्या प्रत्येकच मुलाने जरी इंजिनिअर/डॉक्टर व्हायचे म्हंटले तरीही ते सहज शक्य  आहे असं म्हंटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही  . ज्या मुलांना मेडीकल किंवा इंजिनिअरींग चे शिक्षण परवडत नाही , ते  बी कॉम करून एमबीए  किंवा सी ए करणार हे छाती ठोकून सांगतात.हे फक्त मुलांच्याच बाबतीत खरं आहे असे नाही. मुलांचे आई वडील पण सुरुवातीपासूनच अशा प्रकारे मुलांची मानसिकता तयार करण्यात हातभार लावतात- अगदी ११वी कॉमर्स ला अ‍ॅडमिशन घेतली की आपण सीए पुर्ण केलंय अशा तऱ्हेने वागताना दिसतात.

इंजिनिअर किंवा डॉक्टर होऊन  अमेरीकेला किंवा इग्लंडला  जायचे, हे स्वप्न जवळपास प्रत्येकच मुलाचे असते.त्यामधे काही वाईट आहे असेही नाही..  ही वस्तूस्थिती आहे आजची. भारताच्या तरूण पिढीची ही मानसिकता बरेचदा विचार करायला लावते की हे असे का असावं??

एक दुसरी बाजू म्हणजे प्रशासकीय सेवा!आजपर्यंत मला एकही मराठी मुलगा इंजिनिअरींग नंतर  आयईएस किंवा   इतर ग्रॅज्युएशन नंतर  आय़ए़एस करणार आहे असे म्हणणारा भेटलेला नाही. प्रशासकीय सेवांच्या मधे आजकाल मराठी मुलांना अजिबात इंटरेस्ट शिल्लक राहिलेला दिसत  नाही. ’प्रशासकीय सेवा’ ह्या केवळ उत्तर भारतीयांची  मक्तेदारी झालेली आहे – कुठल्याही डिपार्टमेंटला गेलो की तेच लोकं दिसतात.   विषयापासून भरकटलंय, मला खरं तर   दुसऱ्याच विषयावर  लिहायचं होतं.

युध्दस्य कथा रम्यः -असे म्हणतात. अ ब्रिज टू फार, ब्रिज ऑन द रिव्हर क्वॉय, किंवा  डर्टी डझन्स वगैरे युद्धपट बघायला सगळ्यांनाच आवडतात. वॉर फिल्म्स तर बहुतेकांचे फेवरेट.. इतक्या आवडीने हे सिनेमे  पाहिले जातात, पण  आजपर्यंत मला एकही मुलगा असा सापडला नाही, की ज्याने मिलिटरी , एअर फोर्स, नेव्ही    मधे जाण्याची इच्छा व्यक्त केली . खरं तर विचार केला तर सुशिक्षित मुलांसाठी मिलिटरी , नेव्ही मधे अतिशय उत्तम करीअर असतांना पण मराठी मुलं फारसे उत्सुक दिसत नाहीत याचं कारण काय असावं? देश प्रेमाची भावना  मुलांच्या मनात निर्माण करण्यास पालक कमी पडतात का? की पालकांनाच फारशी माहीत नसल्याने मुलांना ते जास्त काही सांगू शकत नाहीत? खरं कारण काय असावं याचं?

एकीकडे असे विद्यार्थी आणि त्याच पार्श्वभूमीवर अविनाश धर्माधिकारी यांच्या सारखे  १९८६ च्या बॅच चे  IAS अधिकारी,  ज्यांनी  दहा वर्ष नोकरी करून प्रशासकीय १९९६  मधे राजीनामा दिला.  नोकरी सोडल्यावर  ’फ्री लान्स जर्नलिझ” आणि समाज सेवेचे   व्रत अंगीकारले आहे .

ब्लॉगर्स  मेळावा, मुंबईच्या वेळी अपर्णा संख्ये अमेरिकेहून आली होती. तेंव्हा तिने एक सीडी दिली मला. त्या सीडी मधे अविनाश धर्माधिकारी यांची काही भाषणं होती. विषय म्हणाल  तर शिवाजी महाराज , इस्रायल, जपान, कारगील, आणि इतर .इतकी ओघवती भाषण शैली आहे की भाषणं ऐकतांना अंगावर रोमांच उभे रहातात. प्रत्येक विषयावर भरपूर अभ्यास  असल्याने अस्स्खलित तास-दीड तास  सलग बोलतात. भाषण ऐकतांना ते तुम्हाला  पुर्ण पणे ए्का वेगळ्याच विश्वात नेऊन सोडतात – काय होतं ते शब्दात  सांगता येणार नाही. त्या साठी ती भाषणं ऐकायलाच हवीत. पहिले दहा पंधरा मिनिटे फारशी ग्रीप घेत नाही, पण नंतर मात्र सीडी बंद करवत नाही. इ स्निप वर आहे बरीच भाषणं.  .

पहिलं भाषण अर्थातच शिवाजी महाराजांच्या वरचं. ते तर उत्कृष्ट आहेच, पण त्याच बरोबर इस्रायल, आणि जपान वरचे   भाषण ऐकतांना तुमच्या डोळ्यापुढे ते चित्र उभे करते.    तुम्ही कुठल्याही विचारसरणीचे  डावी, उजवी ,मध्यम  किंवा इतर  असला तरी किंवा, ब्राह्मण द्वेष्टे, मराठा द्वेष्टे, नवबुध्द द्वेष्टे, मुस्लीम  द्वेष्टे किंवा इतर कुठल्याही प्रकारचे असाल, तरीही ही भाषणं जरूर ऐका.  प्रत्येक भारतीयाने  ऐकली  पाहीजे अशी भाषणं  आहेत ही.

मी इथे फक्त एका भाषणाची लिंक देतोय. इतर भाषणं ऐकण्यासाठी  तुम्हाला यु ट्युब वर जाऊन इंग्रजी मधे ’अविनाश धर्माधिकारी’ आणि पुढे  ’शिवाजी’, ’कारगील’, ’इस्रायल’, ’जपान’, ’सावरकर’, ’गांधी’,  लिहिलं की त्या त्या विषयावरची भाषणं ऐकता आणि पहाता येतील.  सगळी भाषणं ऐकायला जवळपास १० -१२ तास लागू शकतात.  ह्या सगळ्या कथा ऐकतांना जाणवतं की हे  अविनाश धर्माधिकारी म्हणजे एक वेगळंच रसायन आहे .

पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतोय, कृपया सगळे भाग अवश्य ऐका. नेहेमीच्या विनोदी , प्रेम कथा  च्या कथा-कथना पेक्षा काही तरी चांगलं ऐकल्याचं समाधान लाभेल. कदाचित आपल्या मुलांना पण आपण काही तरी व्यवस्थित समजाऊन सांगू शकू…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in व्यक्ती आणि वल्ली, सामाजिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

91 Responses to मुलखावेगळी माणसं

 1. meharsha says:

  SIR,
  kharokhar aikayala pahije .link dilyabaddal dhanyawad.
  mala aase watate ki north lokanchya peksha aaplyakade mulana jasta laksh deun wadhavatat tyamule mulanch fayada honyapeksha nukasan hovu shakate arthatach aata paristithi khoop badalt aahe shevati apavad ahetach
  nehami sivaji shejarchya gharat jnmala yava ase vatate

  • पहिले कारगील वरचं ऐका, नंतर इस्रायल.. आणि नंतर इतर सगळी.. बऱ्याचशा गोष्टीं बद्दलची मतं बदलतील तुमची.. ( माझी बदललीत)

 2. mau says:

  महेंद्रजी,

  छान माहिती दिलीत…धन्यवाद…

 3. काका, करियर बद्दल आजच्या पिढीबद्दलची मतं मान्य. प्रशासकीय सेवांबद्दल कधी काही कानी पडत नाही आणि आजूबाजूला त्या परिक्षांचा अभ्यास करणारं देखील कुणी नसतं. याउलट इंजिनियरिंगनंतर GRE/Toefl चा अभ्यास करून परदेशात MS कसं करायचं किंवा नोकरीत आल्यावर H1व्हिसा कसा अप्लाइ करायचा हे सांगणारे कचर्‍याने भेटतात. अर्थात आम्ही देखील कधी वेगळ्या वाटेने जाण्याचा विचार करीत नाही हे ही तितकेच खरे.

  • सिद्धार्थ,
   हेच म्हणतो मी पण . माझी मुलगी पण आता पासूनच जीआरई चा विचार करते आहे . मी स्वतः तिला आयईएस ला बस म्हणतोय. बघू काय होतं ते.

 4. भाषणाची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. मला फार आवडतं असं काही ऐकायला.
  मांडलेला विषय छान आहे.. पण मला नाही वाटत की आता सगळे इंजिनिअर/डॉक्टरच व्हायचं म्हणतात. माझ्या आजुबाजूला अनेक जण वेगळी वाट धरलेले/ वेगळ्या वाटेने जायचे ठरविलेले आहेत. आणि काही मराठी मित्र सैन्यातही आहेत.
  आता बदलतीये मानसिकता. अहो, आता इंजिनिअर/डॉक्टरना पुर्वीसारखी किंमत नाही राहिलेली, हे आता कोणीही सांगेल. त्यामुळे वेगळे वाट अनेकजण धरू पहातात.

  • पल्लवी
   असंच असायला हवं, सगळी कडे थोडी वेगळी वाट धरायला हवी मराठी मुलांनी. स्पेशली मिलिटरी, नेव्ही वगैरे मधे पण जॉइन करायला हवे.
   खूप सुंदर आहेत भाषणं.. १०-१२ तास लागतील , पण एक ऐकलं की इतर ऐकल्या शिवाय समाधान होणार नाही. इस्रायल तर माझं सगळ्यात आवडतं.

 5. वा, छान माहिती दिलीत. धन्यवाद.

  • परवा तिकोना ट्रेक ला गेलो होतो, तेंव्हा पूर्ण वेळ कार मधे हीच सीडी सुरू होती. सगळ्यांनाच खूप आवडली. म्हणून इथे पोस्ट केलाय लेख.

 6. Thank you!! I am someone who is interested in geopolitics and history. A while back i read a book called The Third World War By Dr.Aniruddha D.Joshi. I am currently watching “Discovery of India”. The way you have explained Avinash Dharmadhikari seems to be like something good is in store.

  • संदीप
   जर इतिहासात इंटरेस्ट असेल , (इतिहास म्हणजे फक्त शिवाजी महाराज असे नाही) तर तुम्हाला ह्या सगळ्या लिंक्स अवश्य पहायलाच हव्या. तुम्ही नक्की एंजॉय कराल.

   • इतिहास = शिवाजी महाराज. अगदी बरोबर. त्याच्या अलिकडे पलिकडे कुणी जातच नाही.

 7. खूप छान माहिती दिलीत. अविनाश धर्माधिकारींचे पुस्तक वाचले आहे. पण भाषणांबद्द्ल माहित नव्हतं. आता नक्की ऎकेन.

  • प्रज्ञा
   ऐकलं का ?? मला पण नवीन सीडी घ्यायच्या आहेत विकत, शोधतोय मार्केटला कुठे मिळतात त्ते.यु ट्युब पेक्षा नुसतं सीडी लावून ऐकायला जास्त मजा येईल.

 8. फार चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • विनोदजी
   वेळात वेळ काढून , शिवाजी महाराजांच्यावरचे यांचे भाषण नक्की ऐका. अप्रतीम भाषण आहे.

 9. vikram says:

  हो नक्कीच
  धन्यवाद 🙂

  • विक्रम
   एकदा ऐकणं सुरु केलं की पुर्ण ऐकेपर्यंत बंद करता येत नाही, इतकं ऍडक्टीव्ह आहे.

 10. Prachi says:

  Thank you very much for sharing this link.

 11. Smita Ghaisas says:

  at any point in time, the most lucrative options will be sought after by the ambitious lot. In the 1986 or around batches, it wa snot all that common to to US for education, we had only a few Indians there until early 90s and they were the highly educated elite- Ph Ds, and such ( I mean intellectually elite). .
  then the IT hoards began to swarm in and the rest as they say is history.
  Now if the US policies start discouraging IT influx, students will need to/ be forced to look at other options as well .
  One of the articles by Avinash Dharmadhikaree had a neat point to make: A guru asked a Shishya to count the number of disciples around. Each one who tried this exercise counted everyone else except himself. The guru urged ” Do not forget yourself while looking at others”. This was Dharmadhikari’s advice to the students he was counselling. Younger crowds naturally tend to follow in herds- whatever the current trend.

  • बरोबर आहे. वेळे प्रमाणे लोकांच्या प्रायोरिटीज बदलतात.

   पूर्वी पासून आय ए एस ला ग्लॅमर आहेच. मी पण मुलीला एकदा बीई पुर्ण केलं की एमएस साठी प्रयत्न न करता आय ई एस ला बस म्हणून तिची मानसिक तयारी करतोय. पण बरोबरचे सगळे मुलं जी आर ई च्य़ा गप्पा मारतात, त्या मुळे तिला पण तेच जास्त योग्य वाटतंय. अर्थात बीई आयटी केल्यावर एम एस साठी जाणे हा सध्या सर्व सम्मत ऑप्शन आहेच.. प्रवाहाबरोबर चालायची इच्छा असते मुलांची..

   एके काळी लोकांना नेव्ही मधे जाण्याची क्रेझ असायची. माझ्या बरोबरचे दोन मित्र नेव्ही मधे गेले होते. नेव्ही मधे जाण्यासाठी बंगलोरला जी एंट्रन्स एक्झाम होते, ती अतिशय टफ असते. हजारातुन चार पाच मुलंच सिलेक्ट होतात.

   माझा मुद्दा असा होता, की मिलिटरी मधे , किंवा नेव्ही वगैरे मधे जाण्यास मुलं उत्स्तुक का नसतात हल्ली?

   • Smita says:

    ka asateel utsuk?

    You have the answer in your own article on Kashmir issue. it’s a thankless job isn’t it?
    Plus. mulee hee military madhalya mulansbarobar lagna karayala tayar nasataat, he mala amachya mitra mandaLeenkadun maheet ahe. itaka hushar anee good looking mulaga asun suddha ekahee mulgee tayar nahee, mug Aai wadeel puN vegaLa vichar karaNa yogya samajataat,

    • –एकाच प्रश्नाला किती प्रकारचे कंगोरे असू शकतात नाही??

     पण काश्मीर मधे लढणारे जे सैनिक वगैरे , ज्यांच्याबद्दल लिहिलंय ते अतिशय खालच्या पातळीवर काम करणारे आहेत.

     इंजिनिअरींग करून गेल्यावर तुम्ही जर नेव्ही मधे सेकंड लेफ्टनंट म्हणून जर सिलेक्ट होत असाल, तर जॉइन करण्यास काही हरकत नाही. युनिफॉर्म ची एक वेगळीच क्रेझ असते.

     मुली लग्नासाठी तयार नसतात, कारण त्यांना त्या आयुष्यातलं – म्हणजे मिल्ट्री, एअरफोर्स मधलं ग्लॅमर माहिती नसतं म्हणून. आज पर्यंत किती अधिकारी युद्धात मारल्या गेले आहेत?? अतिशय कमी. म्हणजे ती भीती की आपण मारले जाऊ ही व्यर्थ आहे .

   • Smita says:

    also: if the US policy towards H1 visa sponsorship to IT related candidates changes, the current trend will change and studnets will look at other options. It looks like that may happen in the coming years and then what you suggest as career options ( IAS / civil service sin india) may once again pick up as a glamorous career.

    • सगळं अवलंबून आहे ते एच१ वर आणि आउट सोअर्सिग पॉलिसी वर.. बघु या काय वाढून ठेवलंय पुढे आयुष्यात ते..
     धाकटी मुलगी यंदा ११वीत आहे, ती पण आयटी मधे जायचं म्हणून आता पासूनच मागे लागली आहे. माझी इच्छा होती की एकीने तरी डॉक्टर व्हावं..
     — पण काय करणार?? आपण तरी कुठे आपल्या वडीलांच्या मनाप्रमाणे वागलॊ???????

     • Smita says:

      I honestly don’t think you would want your kids to behave exactly as per your wish. tyanchya manasarakha houde asheech tar iccha asate

      yes the IT related policies are going to be very decisive in determining the future , and they don’t look very good , going by the current sentiment there.

      • आजकाल कोणालाच काही आग्रह करता येत नाही. त्यांची मतं अगदी पक्की झालेली असतात आणि तसंही, आजकालची मुलं कुठे ऐकतात तुमचं?
       शेवटी ज्या गोष्टी मधे इंटरेस्ट आहे तीच गोष्ट करणार मुलं.

 12. Vidyadhar says:

  काका,
  बर्‍याच गोष्टींबद्दल पालकांनाच माहिती नसते हे सत्य आहे!
  कारण आपल्याकडे क्लोन बनवण्याची पद्धत आहे. आपण कामगार निर्माण करणारे कारखाने स्थापन केलेत(शिक्षणसंस्था). ब्रिटीशांना तेच हवं होतं…पण आपल्याला काय हवं ह्याचा निर्णय आपण घेऊ शकलो नाही हेच कटू सत्य आहे.
  बाकी…आता ही भाषणं ऐकतोच…धन्यवाद!

  • विद्याधर
   पालकांचं कॉंट्र्युब्युशन मुलांच्या करीअर मधे, हा तर अतिशय महत्वाचा मुद्दा आहेच. कामगारांचे कारखाने हे तयार करणे इतकाच त्यांचा उद्देश होता.
   शिवाजी महाराजांच्या भाषणात त्यांनी ब्युरोक्रसी बद्दल बोललेले आहे.

 13. गौरी says:

  मराठी माणसं प्रशासकीय सेवांमध्ये कमी दिसतात याची २ कारणं आहेत – एक तर आपल्याकडे भरपूर प्रमाणावर खाजगी नोकर्‍या उपलब्ध आहेत, तसं यूपी / बिहारमध्ये नव्हतं. सरकारी नोकरी या एकाच पर्यायाचा विचार तिथे व्हायचा. दुसरं म्हणजे या परीक्षांसाठी मार्गदर्शनाचा आभाव – दिल्लीला अनेक नावाजलेले यूपीएससीचे क्लासेस आहेत, आणि त्यांनी असे पॅटर्न तयार केले होते, की क्लासला आलेला मुलगा पास होऊनच बाहेर पडेल. महाराष्ट्रात
  दहा वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती, की प्रशासकीय सेवेत जायचं असेल, तर दिल्लीला जाऊन अभ्यास करण्याला पर्याय नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. मुंबई, पुण्याला आता यूपीएससीसाठी उत्तम मार्गदर्शन उपलब्ध आहे. दर वर्षी या परीक्षांमधला मराठी उमेदवारांचा सहभाग वाढतो आहे, त्यांचं यशही वाढतं आहे.
  (पोस्टाच्या मूळ विषयापासून माझी प्रतिक्रिया भरकटलीय, पण स्पर्धा परीक्षा म्हणजे जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे …)

  • इंजिनिअर झालेली बिहारी मुलंच फक्त आय ई एस ला बसतात, ( ती मुलं पण इथे प्रायव्हे कंपन्यांमधे प्रयत्न करू शकतात, आणि करतात सुध्दा, पण त्यांचा पहिला प्रिफरन्स प्रशासकीय सेवा असतो – मराठी मुलं त्या मानाने या वाटेला फार कमी जातात.
   मी जेंव्हा कुठल्याही शासकीय कार्यालयात जातो, तेंव्हा रेल्वे मधे वगैरे फक्त बिहारी मुलंच दिसतात उच्च पदावर. अविनाश धर्माधिकारींचे पण क्लासेस पुण्याला आहेतच.
   आता तर, सगळेच जण अमेरिकेला जायचं डोक्यात घेऊनच बसले असतात. दूसरा विचारच नसतो डोक्यात.

 14. काका. . ..इंजिनीअरिंगला असतानाच व्याख्यानमालेत त्यांना ऐकल होत.अत्यंत ओघवती वाणी आहे….त्यांची पुस्तक सुद्धा खुप वाचनीय आहेत. . .त्यांनी जेव्हा शिवसेनेच्या माध्यमातुन राजकीय आखाड्यात उडी घेतली तेव्हा खुप आश्चर्य वाटल होतं. . .”चाणक्य मंडल”च्या माध्यमातुन त्यांच काम उत्तम आहे.

  • प्रत्यक्ष ऐकलंय़?? अरे वा .. ग्रेट.. लकी आहात तुम्ही सगळे..
   चाणक्य मंडल च्या माध्यमातून ते कसलं काम करतात?? शोधतो नेट वर..

 15. काका, मस्तच माहिती..
  तुमच्यामुळेच तर कळला आम्हाला त्यांच्याबद्दल..धन्यवाद 🙂

  • सुहास
   माझ्या मुळे नाही, तर अपर्णा मुळे..
   ती सिडी पुर्ण ऐकली की नाही???

   • हो सीडी पूर्ण ऐकली..एक एक क्षण असा डोळ्यासमोर येतो म्हणून सांगू…अतिशय थरारक अनुभव, रक्त खळवळणार वक्तव्य आहे त्यांच…

    आणि हो आज तुम्ही त्रिवार लक्षाधीश होताय…
    मनापासून अभिनंदन 🙂 आता तुमच्याकडून एक पार्टी मिळायलाच हवी 🙂

 16. महेश says:

  खरोखर आपण चांगली माहिती दिली सर्वानी ती आवश्यक वाचावी ताच्या भाषणाचा मला ३ दा योग आला

 17. धर्माधिकारी यांचं भाषण प्रत्यक्ष ऐकायचा एकदाच योग आला होता. फारच सुरेख बोलतात ते. अपर्णाने दिलेली सीडी पूर्ण ऐकून झालीच नाही 😦 .. आता मात्र सवड काढून पूर्ण ऐकतोच.. (सॉरी अपर्णा)

 18. छानच आहे हो ते.एकदम चित्र उभ राहते डॊळ्यांसमोर अस सादरीकरण आहे…लवकरच घेतो ते तुमच्याकडुन..

  • Mrunal says:

   Mulisathi Nevi, Airforce ahe ka. asel tar vayachya kitvya varsapsun Suruvath karavi lagel.
   And kai kai karave lagel. Mazi Mulgi atha 6 varshchi ahe.

   • मृणाल
    एक मुलगी आहे ठाण्याची, आता नांव विसरलो, पहिली मराठी मुलगी एअरफोर्सला जाणारी..
    कुठल्याही ग्रॅज्युएशन नंतर जॉइन करता येतं. पण त्यातल्या त्यात इंजिनिअरींग आणि मेडीकल स्ट्रिम करून गेलेलं जास्त चांगलं. नेव्ही मधे सेकंड लेफ्टनंट ची पोस्ट मिळते, आणि रिटायरमेंट पर्यंत सहज व्हाइस ऍडमिरल पर्यंत किंवा कमीत कमी कमांडर पर्यंत तरी नक्कीच पोहोचता येतं
    एअर फोर्स मधे विंग कमांडर पर्यंत किंवा स्क्वाड्रन लिडर पर्यंत पोहोचता येतं शिकलेले असाल तर..

  • देवेंद्र
   सगळं काही आहे नेट वर.. डाउनलोड करून सीडी बनवता येईल.

 19. Nachiket says:

  इव्हन डॉक्टर बनूनही ग्रामीण भागात काम करणारे डॉ. बंग, किंवा लोकसेवा करणारे प्रकाश आमटे.
  डॉक्टरी सोडून समाज कार्याला वाहून घेतलेले पत्रकार श्री. अनिल अवचट…वगैरे हे लोकही जगावेगळेच.

  अशा जगावेगळ्या माणसांना राजकारणात ऑनररी पोझिशन आणि पॉवर देऊन आणलं पाहिजे असं माझं फार तीव्र मत आहे. आहेत त्या राज्यकर्त्यांच्या जोडीला यांना ही आणावं .

  निस्वार्थी लोक यातूनच मिळतील. ते स्वत:हून राजकारणाच्या घाणीत येऊ इच्छिणार नाहीत. पण त्यांना सन्मानाने आणलं तर घाण नक्कीच घाण राहणार नाही मग या लोकांचा चांगुलपणा वेगळ्या कार्याची ओढ, प्रामाणिकपणा, आणि जोडीला चालू राज्यकर्त्यांची राज्य हाकण्यातली कुशलता, मुत्सद्दीपणा, प्रसंगी आवश्यक असलेली कूटनीती याचं एक पूरक कॉम्बीनेशन होऊन राजकारण एक आहे त्याहून खूप चांगली गोष्ट बनेल.

  • नचिकेत
   ते राजकारणात कधीच येणार नाहीत ही अगदी सुर्य प्रकाशाइतकी स्वच्छ गोष्ट आहे. कितीही मान देऊन बोलावलं तरीही नाही…

   राळेगणसिध्दी चे अण्णा हजारे.. एक सैनिक होते पुर्वी , त्यांनाही वाटलं होतं की ही व्यवस्था बदलू आपण म्हणून. प्रयत्न करताहेत, पण यश किती मिळालं आजपर्यंत ते आपण पहातोच आहे. त्यांनी राजकारणात, यावं म्हणून कित्येक पार्ट्यांनी त्यांना गळ घातली, पण ते काही आले नाहीत राजकारणात.. काय कारण असेल?? अविश्वास?? की दुसरं काही??

 20. संकेत आपटे says:

  छान आहे लेख. आत्ता सहज इकडेतिकडे भटकताना तुमच्या ब्लॉगवर आलो. काही लेख वाचले. छान आहेत. 🙂

  एक शंका: हा ब्लॉग फॉलो करता येत नाही का? इतर ब्लॉग्जवर फॉलो करण्याची लिंक असते. Gmail अकाऊंट वापरून ते फॉलो करता येतात. इकडे तशी सोय नाही का?

  • संकेत
   फॉलो करण्याची लिंक नाही, पण इ मेल मधे कळवले जाण्याची सोय आहे. काय वाटेल ते तुमच्या इ मेल मधे म्हणून उजव्या बाजूला एक ऑप्शन आहे, तिथे रजिस्टर केल्यास नविन लेखाची सुचना इ मेल मधे मिळू शकेल.

 21. swapna says:

  kaka…….. 300000 houn gele ki ho… ata 3 lakh dhanyvad dya!!! party dya ekhadi mast… am I first one to notice????

 22. महेश नाईक says:

  खुपच छान व्याख्याने आहेत. पुर्ण ऎकली. एका चान्गल्या विषयाला हात घातल्याबद्दल आभार.

 23. Sachin Deshmukh says:

  काका नमस्कार,

  लेख छानच .. अविनाश धर्माधिकारी यांचे एक पुस्तक वाचले होते शाळेत असताना ’एक विजयपथ’ म्हणून .. स्पर्धा परिक्षा तयारीचे उत्तम पुस्तक तर आहेच पण अभ्यास कसा करावा याबद्दलचे आदर्श असे हे पुस्तक आहे.. पण हे पुस्तक परत कुठेच काही मिळाले नाही..
  तुम्हाला काही माहिती मिळाली तर सांगाल का ?

  आभार,
  सचिन

 24. chaitanya says:

  Kya baat hai kaka…man gaye!!

  tumache kharokar Dhanywad…. tumhi aathavanine ya vishayavar post lihili…..jya lokana Itihas janun ghenyat ras tya lokansathi ha ek KHAJINACH aahe.

 25. Aparna says:

  काका ती सीडी तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्की त्यावर लिहाल म्हणूनच दिली होती…पोस्ट छान झालीये..अजूनही लिहिता आलं असतं पण प्रत्यक्ष ऐकलं तर जे वाटत ते शब्दातीत आहे….जपानचा भाग पण तुमच्या सीडी मध्ये आहे का आठवत नाही पण जातिव्यवस्थेमधूनही बाहेर येऊन प्रगती होते हे ऐकलं तेव्हा खरच आपल्या देशात अस काही करता आलं तर असं मनात आल्याशिवाय राहात नाही…..
  आम्ही नेहमी लांबच्या प्रवासात ऐकतो…माझ्या ipod मध्ये आहे त्यामुळे इतर वेळीही ऐकत असते….

 26. Shrikant says:

  I feel lucky that I came across such a wonderful speech..Thanks!

 27. प्रसाद रोकडे, पनवेल. says:

  नमस्कार महेंद्र,
  आपण लिहिल्या प्रमाणे सर्वच मुलांना हे माहित नसतं कि आपण पुढे कोण होणार? ज्यांचा vision इतका clear असतो ते खरेच यशस्वी होतात. हे मात्र अगदी खरं आहे कि, प्रशासकीय सेवेत जायला तेवढी उत्सुकता नाहि. मी माझ्या दहावीतल्या मुलाच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र त्याला ते पचनी पडत नाही. कारणं पण कळत नाहीत. मग IIT / IIM चा ऑप्शन समोर ठेवला. निदान स्वप्नं तरी मोठी असावीत.
  श्री. धर्माधिकारींना माझा एक मित्र रायगडावर भेटला. तिथे ते चाणक्य च्या मुलांसोबत आले होते. तो मुलांच्या मागे जावुन leacture ऎकत उभा राहिला आणि भारावुन गेला. संपल्या नंतर त्याने श्री. धर्माधिकारींशी ऒळख करुन घेतली. परत आल्यानंतर एक महिना त्यांच्या विषयीच बोलत होता. आता तुमचा लेख वाचला आणि आठवण झाली. सारी भाषणे नक्की ऎकेन. धन्यवाद.

  • प्रसाद
   प्रदिर्घ प्रतिक्रियेसाठी आभार. माझा पण अनूभव असाच आहे.. कमीत कमी स्वप्नं तरी मोठी असावी हे तुमचे मत अगदी योग्य आहे..

 28. Smita says:

  Dhanyavad Kaka. Kharach great ahet hi jagavegali manase. Mi Tyanche kahi bhag roj eaikte ahe. Tyat kargilchi suruvat zhali ahe. Pan kharach pudhe pudhe eaikatach jav as vatat. Tya vishwat neun sodtat Avinashji apalyala. Tyancha Captain vaerma jayveli vidai kartat pakistani gafur la tyavelch tyanch vaktavya tr phar surekh..Abhimanane sangava asa apala itihas an apale Sarv Sainik, mhanjech Airforce, Navy and army…Hats off to them..

  Thanks for making us listen such a wonderful speech…

 29. Pushpraj Nimbalkar says:

  अविनाश धर्माधिकारी म्हणजे माझ्या मते एक तेजस्वी राष्ट्रीय विचारधारा आहे…मी त्यांचा मोठा चाहता आहे त्यांची व्याख्याने भरपूर वेळा एकूण झालीत आणि अजूनही एकतोय…..प्रवासात वैगेरे तीच तीच गाणी एकात बसण्यापेक्ष्या अशी व्याख्याने नक्कीच तुमची विचारधारा बदलू शकतात….आजही मी धर्माधिकारी , प्रा. शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे ह्यांची प्रवचने वेळ मिळेल तसा एकात असतो……
  कुणाला जर धर्माधिकारींची प्रवचने mp3 मध्ये हवी असतील तर इथून डाऊनलोड करा…..http://www.mediafire.com/mymarathi

 30. रोहन says:

  अपर्णा आली होती तेंव्हा तिने मला सुद्धा दिल्या होत्या ह्या सीडीज… मस्तच आहेत सर्व भाग… 🙂

  • अरे मी अजून नविन भाग डाउन लोड केले आहेत. विवेकानंद, गांधीजी,शाहू महाराज, सावरकर, आणि कारगील, – इथे आलास की देईन तुला.

 31. Prajakta says:

  Lekh nehamipramane uttam.
  videos youtube var ahet mahit navat. ratri ch fanna udavala pahije.
  mazi tari airforce madhe jayach khup ichha hoti. ekulatiek mulagi, airforce madhe nako…. vagere vagere madhun paay kadhata ala nahi. ichha khup asali tari aai-baba n chya virodhat jaata ala nahi. manasarakh karata nahi ala, mag ata paise tari kamavuya, asa mhanun computer madhe utarale zapad lavun. pudhe kahi paradeshat uchhashikshan vagere ghetal nahi. pan deshi shikshan gheun deshi-(ata)videshi kam karat ahe. pagar vagere uttam asato. pan aat dhumasat rahatach na. ani var tyala sansarik jababdaryanchi fodani basate.
  jeva ha vishay ghari nighato… maza ekach vakya asat bharatatali pahili fighter pilot zale asate, pan mulagi field var na marata ashi jagaleli jast bari. thike mi nahi tyat pan navara tari tyatala asude, tar te hi nahi.
  so called secured, safe life!
  aso aliya….mag jaga zapad lavun. ata maza mulaga kay karato baghayach. arthat mazya anubhavavarun mi kahich sangayala janar nahiye tyala. mala je ata vatat tasa tyala nako vatayala nantar 🙂
  aga aisa kiya hota to jindagi kuch aur hoti! amach sagal manatach.

  • प्रतिक्रिया वाचली. क्षणभर काय वाचलंय याचा बोध झालाच नाही. एकुलतं एक असल्याचे असेही परिणाम होऊ शकतात
   . सैन्यात जाण्याची इच्छा तर बऱ्याच मुलांची असते, माझी पण होती> माझ्या बरोबरचा ’फक्त एक” मुलगा सिलेक्ट झाला होता नेव्ही मधे. फारच टफ एक्झाम्स/ गृप डीस्कशन्स, ईंटरव्ह्यु असतात त्यांच्या बंगलोरला. डायरेक्ट सेकंड लेफ्टनंट म्हणून पोस्टींग मिळतं. नुकताच भेट्ला तर रिटायर्ड झालो म्हणून सांगत होता.
   मुलांना काय करायचं हे सांगावं की नाही?? हा खरच एक खूप विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्यावर सरळ प्रतिक्रिया देता येणारच नाही. कदाचित थोडा विचार करून त्यावर एक पोस्ट लिहीन. इतका सोपा प्रश्न नाही तो.
   मनासारखी गोष्ट झाली नाही आणि कॉम्प्रोमाईझ करावं लागलं की मनात थोडा ’सल’ तर रहातोच, आणि ते सहाजिक पण आहे.

 32. Gurunath says:

  aaj first time je karatoy tyacha rast abhiman vatato ahe….. , UPSC karayche he graduation chya 2 year pasunach tharavale hote…..

  mi dharmadhikari siraanchi bhashane aikali ahet….. sagali nahi pan barich….. tumhi jya goshti sangta ahat tya meji restoration, israelites chya vagaire tar uttam ahetch pan jamlyas jonathan levingstone segull chi story siraanchya tondun aika…. besttttttttttt

 33. Gurunath says:

  dada how to connect my blog to yours? didnt found a way to follow you…. kindly help

 34. Santosh Kudtarkar says:

  Kaka… Namaskar!!!

  Fakta dhanyawaad mhanen… 🙂

 35. kailash vhavan says:

  thanks sir

 36. Prashant says:

  खुप छान पोस्ट आहे सर… अविनाश सरांचे एकूणच सर्व लेख व् भाषण प्रेरणादायी व् इतिहासाची वर्तमानशी सांगड घालनारी आहेत

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s