ब्लॉगींग..

एकटेपणा हा नेहेमीच नकोसा होतो,कोणी तरी बरोबर असावसं वाटत असतं नेहेमीच. बरेचदा तर अगदी हजार माणसांच्या घोळक्यात असूनही एकटेपणा वाटत असतो. गर्दीचा भाग असूनही नसल्याप्रमाणे – अळवाच्या पानावरच्या थेंबा सारखी परिस्थिती असते आपली. हा अनुभव तर मला बरेचदा येतो. एखाद्या गृप मधे बसलेलो असतांना पण एकटेपणा जाणवतो, मग कोण काय बोलतंय हे जरी कानावर पडत असलं तरी मेंदू पर्यंत ते पोह्चत असेलच असे नाही.

या एकटेपणाचा जरी कंटाळा येत असला, तरीही एकांत मला आवडतो. ’बिइंग विथ युवरसेल्फ’ हा कन्सेप्टच खूप छान आहे. बरेचदा तर एकांत ही एक आपली गरज आहे हे पण मला जाणवते. एकटेपणात आपण कंटाळतो, पण एकांतात मात्र तसे होत नाही. एकांत हा हवा हवासा वाटतो, कारण एकांतात आत्मपरीक्षण करण्याची संधी देतो म्हणण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्यासाठी वेळ देतो-आपले विचार , वागणूक योग्य की अयोग्य ते पारखून पहाण्याची सधी मिळते..

प्रत्येकच माणूस आपल्याला जे काही वाटेल ते करण्यास स्वतंत्र असतो. काहीही करण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून काही प्रत्येकच गोष्ट जी आपण करतो ती आनंद देईलच असे नाही. बऱ्याच गोष्टी तर जस्ट लाइक दॅट केल्या जातात. पण जी गोष्ट आवडीने केली जाते ती मात्र आनंद नक्कीच देऊन जाते.

एखादी गोष्ट अशीच आवडायला लागते, आणि ती केल्याने आनंद होत नाही पण एक वेगळंच समाधान मात्र लाभतं. ब्लॉगींगच्या बाबतीत पण माझं तसंच झालंय. मनातले विचार एकदा लिहून टाकले की मग एकदम हलकं वाटतं, समाधान वाटतं हे जरी खरं असलं, तरी एक गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे मी नेट ला अतीशय अ‍ॅडीक्ट झालोय. दर दिवसाआड एक तरी पोस्ट लिहिल्या शिवाय समाधान मिळत नाही, काहीतरी चुकल्या सारखं वाटत असतं. लिहिल्यावर जितक्या प्रतिक्रिया येतात, त्यांना उत्तर देणं, या साठी पण बराच वेळ जातो. संध्याकाळी घरी गेल्यावर पण चहा वगैरे घेऊन झाला की ब्लॉग वर चक्कर टाकावी, कोणाची प्रतिक्रिया वगैरे असेल तर उत्तर द्यावं अशी इच्छा होते आणि कळत नकळत पुन्हा लॅप टॉप सुरु होतो. ब्लॉगिंग किंवा व्हर्च्युअल वर्ल्ड च्या व्यतीरीक्त पण एक खरं जग आहे हे विसरल्यासारखं होतं बरेचदा- आणि घरच्यांकडे दुर्लक्ष होतं असं जाणवलं.

एखादी गोष्ट ही सवय कधी होऊन जाते तेच समजत नाही, आणि एकदा सवय झाली की मग त्या सवयीचं व्यसनात रुपांतर कधी होतं हे पण समजत नाही. व्यसनात रुपांतर झालेली कुठलीही गोष्ट वाईटच. एखाद्या गोष्टी कडे आपण कुठल्या दृष्टीकोनातून पहातो त्यावर ती गोष्ट वाईट की चांगली हे अवलंबून असतं. एकाच गोष्टी कडे निरनिराळ्या कोनातून पाहिल, तर प्रत्येक वेळेस ती गोष्ट  वेगवेगळीच दिसते. मग मानवी स्वभाव हा असा आहे की ’आपल्याला सुटेबल असेल त्या कोनातून त्या गोष्टी कडे पहाण्याचा कल असतो आपला.

आज पुणे ते मुंबई टॅक्सी   मधे प्रवास करतोय. एकांत आहेच.. म्हणून बराच विचार केला आणि  जे काही मनात आलं ते इथे फारसा विचार न करता लिहिलं आहे. थोडा कामाचा व्याप वाढलाय, इतरही गोष्टी आहेतच..  जो एकांत मिळाला त्यात ब्लॉगींग  बद्दल विचार केला , आणि लक्षात आलं की फार जास्त इन्व्हॉल्व्ह होतोय  या मधे..  आणि ठरवलंय की या पुढे नेट वरचा वेळ कमी करायचा . अर्थात ब्लॉगींग सुरु राहिलंच पण फक्त पोस्ट अपडेट्सची फ्रिक्वेन्सी थोडी कमी असेल फार तर ५-६ पोस्ट दर महिन्यात….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

65 Responses to ब्लॉगींग..

 1. vikram says:

  काका अगदी मनातले लिहिले आहे
  आपण या व्हर्च्युअल जगात कधी गुंतून जातो हे समजत नाही माणसाला इथे नाही आलो कि अस्वस्थ होते किंवा चीडचीड होते हे अनुभवले आहे
  आपला विचार योग्य असलातरी आमच्यासारख्या तुमच्या ब्लॉगच्या नियमित वाचकांसाठी अजिबात चांगला नाही 😦

 2. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू एकटेपणा हाच आहे. या एकटेपणापासूनच आपण सतत पळत असतो त्यासाठीचं नाती जुळवतो, समाजात राहतो पर्यायाने त्यासाठी जे जे करायला लागते ते ते सर्व उद्योग करतो. आणि इतके करूनही कधी कधी लक्षात येते की शेवटी आपण एकटेच आहोत. हा एकटेपणा कोणाला म्हणजे कोणालाही सोडत नाही. त्यातून सुटका म्हणजे हिंदूच्या भाषेत मोक्ष, बुद्धाच्या भाषेत निर्वाण तर जैनांच्या भाषेत कैवल्य. असो तो फार मोठा गहन विषय…

  एकांत हा प्रत्येकालाच आवडतो…जोपर्यंत तो एकटेपणात रुपांतरीत होत नाही…पुन्हा असो….

  काका तुमचा निर्णय खूप स्वागतार्ह आहे.
  कुटुंब पहिले बाकी सगळे नंतर…
  …आणि खूप काही लिहिण्यापेक्षा मोजकेच पण मौल्यवान लिहिणे केंव्हाही चांगलेच. मला तुमचा निर्णय आवडला.
  आता खरं तुमच्या मनातलं व्यवस्थीत लिहून होईल. उगाच पोस्ट टाकायची आहे म्हणून लिहिण्यापेक्षा हे केंव्हाही चांगलेच.

  • खरं तर खूप त्रास होतो नेट पासून दूर रहाण्याचा.. ’अती’ झालं होत्ं म्हणून थोडा दूर होतोय काही दिवसांसाठी.

 3. व्यसन, मग ते वाईट गोष्टीचं असो, वा चांगल्या गोष्टीचं, वाईटच! मी नियमीत ब्लॉगिंग करत नसले, तरी इंटरनेटवर बराच वेळ असते. काही दिवसांपूर्वीच असं वाटलं की हे खूप झालं आणि जरा इतर गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. इंटरनेटची सवय सुटायला थोडा वेळ जाईल पण आयुष्य बेशिस्त होण्यापेक्षा ते परवडेल. त्यामुळे आता पुन्हा माझं ब्लॉगिंग ललित लेखनाकडून कथा लेखनाकडे वळेल.

  • कांचन
   सवय सोडायची गरज नाही. ती एक काळाची गरज आहे. फक्त त्या मधे थोडं कमी गुंतून राहिलं की झालं!!

 4. अगदी मनातल बोललात बघा काका. गेले काही दिवस मी इंटरनेटपासून दूर होतो (मुद्दाम आणि काही कारणामुळे)..
  व्यसन लागला आहे हे मान्य पण ते कंट्रोल करता यायला हव मनापासून…

  • सुहास
   प्रयत्न करून पहातोय.. बघू या किती जमतं ते.. इतके विषय असतात लिहायला की टाळणं थोडं अवघडच होतंय.

 5. हेमंत आठल्ये says:

  बरोबर आहे. खर तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. सवयीची पुढे जाऊन व्यसन होते, हे अगदी पटल. तुम्ही हवे तेव्हा नोंदी टाकल्या तरी काही हरकत नाही. परंतु काहीच नाही असही नको. शेवटी आपले मराठी मुठभर ब्लॉग आहेत. त्यात सर्वात चांगला ब्लॉगर ब्लॉग टाकायचे बंद केले तर, मराठी ब्लॉग्सची दर्जा नक्कीच कमी होईल. त्यामुळे वेळ जसा मिळेल तसा, पण पूर्णही बंद नको. ही विनंती..

  • हेमंत
   सर्वात चांगला वगैरे काही नाही रे.. आणि बंद करणार नाही हे नक्कीच.. फक्त थोडी फ्रिक्वेन्सी कमी करेन.. बस्स.

 6. This decision may sound weird to some people but if you ask me, this is a very well decision and you took it at a very good time as well. Being a webmaster I have to spend 12-16 hours on internet daily. The thing which I have realized and is sure about is this is all virtual. You might have thousands of followers on blog and friends in facebook, but the people who are going to take care of you are those whom you meet daily not virtually but in daily routine life. So reduce the time on internet and spend that time, quality time, with people around you and your family.
  Best Luck!!

  Ashish Kulkarni

 7. मनोहर says:

  माझ्या मते ब्लॉगिंग हा विचाराना शब्दरूप (एकप्रकारे मूर्तरूप) देण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या मर्यादा आपल्याला जाणवल्या एवढाच या साऱ्याचा अर्थ आहे.

 8. माझ्या मते एकटेपणाला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो 🙂

 9. Meghana says:

  kaka…..aaishappath mala kalach intute zala hota ki tumhi banda karal mhanun blog pan thank god…tumhi fakta kami karat aahat…..aani khara sangayacha tar blogging madhe kharach khup vel jaat asel ki gharatlya mansanakade pan durlaksha hot asel….aamchya kade tar mi fakta tumha saglyanche blogs fakta vachate tari navryacha orda basato ki satat laptop gheun basleli aste ….mulankade laksha nahi…..kharatar ichcha asunahi tevdhyach sathi lihita yet nahi….pan sadhya vachanavar samadhani aahe….pls lihina band karu naka……Shubhechcha!!

  • मेघना
   गेला आठवडा मुद्दाम लॉग इन केलं नाही ब्लॉग वर. कारण एकदा आलं ब्लॉग वर की काहीतरी लिहावंसं वाटतं.
   या पुढे मात्र थोडं कमी करणारच.. हे नक्की. घरच्यांकडे दुर्लक्ष होतं हे मला प्रकर्षाने जाणवले, थोडं जास्त होतंय , पण एक पोस्ट लिहितोय यावर पण.. 🙂

 10. ngadre says:

  Ekdam sahi.

  Addiction jhale ahe ani te vaeet ahe he nakki.

  Baghu ya kase de-addict hota yeil…

  Tumhala shubhechchaa.

  Pan at least 2 in a week posts pahijet amhala ashi mee sarv vachakanchya vateene vinanti karato.

  Khaas lokagrahastav..yeu de.

  • नचिकेत
   एक आठवडा काढला.. म्हणजे जमतंय तर!!!
   लिहितोय एक पोस्ट .त्या पूर्वी एक दोन दिवाळी अंकाचे लेख लिहायचे आहेत. 🙂

 11. santosh Deshmukh says:

  लोक वेंड म्हणतील पण मी तर नेहमीच स्वताशीच बोलत असतो नेहमी एकटाच राहतो .काय माहीत ,असे का वागतो ? पण म तो कधीच एकटेपणा वाटत नाही नेहमी स्वताचाच दुनियेत स्वप्नात सत्यात …. खूप बर वाटते इतरांची बोलणी खावी लागतात त्यात बायकोची जास्त पण आपलाच स्वार्थ म्हणून पुंन्हा शांत नि परत बे चे पाढे बारा जाऊ दे ज्याचे त्याचे आयुष . मला तरी खूप गुड वाटते

 12. गेल्याच आठवड्यात माउताईशी हया विषयावर बोललो मी…मी पण खुप नेट ऍडिक्ट झालो आहे…बाहेरच लाईफ़,पुस्तके वाचण वैगेरे खरच खुप कमी झाल आहे…गेल्याच आठवड्यात व्यायामशाळा चालु केली आहे…उद्यापासुन गरबा त्यामुळे काही प्रमाणात कमी होइल हे सगळ पण नंतर आहेच….बाकी तुम्ही घेतलेला हा निर्णय मराठी ब्लॉगजगतासाठी अतिशय वाईट बातमी आहे…असो जमेल तेव्हा लिहत रहाच…

  • देवेंद्र
   मी पण सकाळी फिरायला जाणे सुरु केले आहे. सरळ सरळ नेट वरच येणं कमी करतोय ..

 13. स्नेहल says:

  हा खरच काका हे खूप मोठा व्यसन लागत चालले आहे बारावी पर्यंत पुस्तकांचा इतका नाद, आज काल खूप कमी वेळ वाचायला मिळतो वेळच नाही असा म्हणतो पण खरतर हि सगळी कारणे आहेत आपण नेहमी एकाच गोष्टीत गुंततो आणि त्यात खूप खूप गुंतत जातो. इंटरनेट हे तर खूपच मोठे व्यसन बनलाय त्यात बझ, ओर्कुट, ग्मैल, फेसबुक, ह्या मध्येच गुंतलेले असतो, पण तरी देखील तुम्हाला भेटणे किवा ऐकणे हे इथेच शक्य आहे………. असे तुम्ही संन्यासी नका होऊ scientist ( काकुच्या भाषेत)

  • संन्यास वगैरे घेत नाही. इथे असेनच मी.
   खरं तर मला पण थोडं अवघड जाणार आहे नेट पासून दूर रहाणं.. पण असो…

 14. काका…अगदी मनातलं लिहल आहे…मी पण खुप नेट अ‍ॅडीक्ट झालो आहे..आता नेटवर कमी वेळा येण्याचा प्रयत्न करतो.

  • योगेश
   माझ्या पण लक्षात आलं होतं ते.. अरे लग्न झाल्याबरोबर एकाच आठवड्यात नेट वर दिसलास तेंव्हाच ते समजलं होतं.

 15. Prasad Tharwal says:

  kaka yaar… waande karnar tumhi… Ashane…!! Mahinyala fakta 5 – 6 ch… Blogs..??? 2 – 3 diwasa aadh ek ek tari taakat jaa oh….!!

 16. Prachi says:

  खूप मस्त आहे..!! एकटेपणा चांगला पण जर त्याची ही सवय होऊन गरज बनली तर वाईटच.. तसंच ब्लोंग्गिंग च सुद्धा आहे, सवय चांगली आहे पण व्यसन नको.. addiction नकोच. आणि मला वाटत कि आपण वर्चुअल वर्ल्ड म्हणण्यापेक्षा वर्चुअल कट्टा म्हणूयात.. कारण शेवटी काय संध्याकाळी चहा नंतर मित्रांच्यात जाणं किंवा कट्ट्यावर जाण्याची सवय असतेच, सवय तीच फक्त इथे तो कट्टा “वर्चुअल कट्ट्यामध्ये” बदलला आहे.

 17. Vinay Garge says:

  काका, २-३ दिवसातून एखादी पोस्ट येऊ द्या. महिन्याचे टार्गेट ठेऊ नका. जेव्हा वाटेल तेव्हा लिहा.

  • विनय
   सध्या तरी थोडे दिवस कमीच असतील पोस्ट्स.. पण नंतर चांगले विषय मिळाले तर नक्कीच वाढवीन.

 18. mau says:

  अगदी मनातले लिहिलेत….नेट हे एक व्यसन होतय हे लक्षात येताच आम्हीही बर्‍याच जणांनी काही दिवस तरी नेट दुरी पत्करली आहे…त्यामुळे बाकि बरेच छंद पेंटिंग्ज,स्केचिंग पुन्हा सुरु झाले आहेत…

  छान लिहिलेत महेंद्रजी…….
  पण तुमच्या लेखांची इतकी सवय झाली आहे..की चैन पडणे मुश्किल…… सकाळी सकाळी तुमचे लेख आणि चहा चा कप…ह्याचेच एक व्यसन झालय म्हणा हव तर…[:)]बघा एकदा विचार करुन…आवडेल आम्हाला तुमचा ब्लोग वाचायला…

 19. सोनाली केळ्कर says:

  मला सुद्धा हा अनुभव आला आहे, नेट अ‍ॅडिक्ट होण्याचा, आर्यनच्या ब्लॉगमध्ये एवढी involve झाले की खुद्द आर्यनकडेच दुर्लक्ष होतेय असे वाटू लागले. ताबडतोब ब्लॉगिंग (लेखन – वाचन) थांबवले, हळुहळु परत सुरु करते आहे.
  आत्मपरीक्षण करावे, दिवसातला काही वेळ तरी स्वतःला द्यावा असे म्हटले आहेच पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच.

 20. Nachiket says:

  व्यसन सोडताना हळूहळू सोडावे लागते. तुम्हाला लिहिण्याचे व्यसन आहे आणि आम्हाला तुमचा ब्लॉग व्यसन वाचण्याचे आहे त्याचे काय?

  आम्हालाही हळूहळू सोडायला हवे..एकदम नव्हे. नाहीतर Withdrawal symptoms येतात.

  तुम्ही अजून एक वर्ष “रोज एक” पोस्ट लिहा. मग कमी करून दोन वर्ष “एका दिवसाआड एक” अशा प्रकारे लिहा.

  असं करून दहा वीस वर्षात हळू हळू सवय कमी करून महिन्यात ६ पोस्टवर आणा.

  • नचिकेत
   छान कल्पना आहे. लिहायला तर नक्कीच आवडेल. पण थोड्या दिवसाकरता पहातो नेट पासून दूर रहाणं कसं वाटतं ते..

 21. सिद्धार्थ says:

  नेटचं व्यसन मलाही चांगलचं लागलेलं. सध्या घरी नेट नसल्याने थोडातरी कंट्रोल आहे पण ती कसर ऑफीसमध्ये भरून काढली जाते त्यामुळे कामावर परिणाम होतोय.

 22. Sarika says:

  काका,

  १००% सहमत. मी पण नेट ऍडिक्ट झालेय, अगदि १५ मिनिटांसाठी जरी नेट डाउन असेल ना तर चिडचिड होते.. कामावर आणि व्यक्तिगत जीवनावर परिणाम होतोय. आणि हे व्यसन इतक्या सहज सुटत नाहिये….

 23. ब्लॉगिंग किंवा व्हर्च्युअल वर्ल्ड च्या व्यतीरीक्त पण एक खरं जग आहे हे विसरल्यासारखं होतं ……… its true

  • प्रसीक
   खरं जग आहे हेच विसरलो होतो. इतकी मोठी चूक झाली की त्या चूकीचे परीमार्जन होणेच शक्य नाही.

 24. sahajach says:

  >>>व्यसन सोडताना हळूहळू सोडावे लागते. तुम्हाला लिहिण्याचे व्यसन आहे आणि आम्हाला तुमचा ब्लॉग व्यसन वाचण्याचे आहे त्याचे काय?

  आम्हालाही हळूहळू सोडायला हवे..एकदम नव्हे. नाहीतर Withdrawal symptoms येतात.

  तुम्ही अजून एक वर्ष “रोज एक” पोस्ट लिहा. मग कमी करून दोन वर्ष “एका दिवसाआड एक” अशा प्रकारे लिहा.

  असं करून दहा वीस वर्षात हळू हळू सवय कमी करून महिन्यात ६ पोस्टवर आणा.
  🙂

  हे सहीये!!!

  व्यसन वगैरे मोठे शब्द होतात जरा पण तरिही कुटूंब, वैयक्तिक आयूष्य आधि हे सत्य बदलत नाही…..

  खूप काही लिहीत नाही, जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल याची खात्री आहे!!शुभेच्छा कायम आहेतच तुम्हाला!!! 🙂

 25. anukshre says:

  तुमचा निर्णय माझ्या सारख्या वाचकांसाठी चांगला नाही, परंतु एक गोष्ट नक्की कि आपण ज्या गोष्टीत मन वळवाल त्या मध्ये अजून काहीतरी निश्चित चांगलेच होईल, मलाही तुमच्या नवीन छंदातून अजून काहीतरी शिकण्यास मिळेल……. पोस्ट जेंव्हा येतील तेंव्हा वाचेनच..

  • अनूजा
   नवीन छंद वगैरे नाही अजूनतरी, फक्त घरी नेट वर कमी रहायचं ठरवलंय, काही वैय्यक्तीक कारणांमुळे.. बस्स…

 26. महेश says:

  सवय असल्यावर काय करणार ,व्यसन जरी वाईटवाटले तरी आपण करतोच कि चागले व्यसन असलेतर त्याला आपण वाईट किवा इतर लोक पण म्हणत नाही, जास्त प्रमाण झाले तर एकवेळ ठीक आहे उगीच स्वताचागैरसमज व मनाचा जास्त प्रक्ष्न किवा कोड्माराकरू नये व्यसन वाईट कि चागले हे आपण ठरवले पाहिजे,थोडा वेळ कुटुंबला जरूर द्यावा

 27. Smita says:

  too bad. I will miss your regular posts. mala ha blg tumchya spashta, swacchcha aNee balanced , susanskrut mandaNeemuLe , vicharanmuLe avadayacha. Hope you will keep writing al beit less frequently!

  I do however agree with you that family comes first.

  • स्मिता
   मनःपुर्वक आभार..
   लिहित राहीनच इथे .. ६-८ पोस्ट म्हंटलं तरीही आठवड्याला दोन होतातच. फक्त सध्या थोडे दिवस चार पाच च्या वर लिहिणार नाही.
   असो.. पुन्हा एकदा आभार.

 28. मित्रांच्या गराड्यात राहून एकटेपणा मी पण खूप वेळा अनुभवला आहे. सवयीचा व्यसनात होणारा बदल लवकर ओळखून संयम बाळगणे हा फारच कठीण प्रकार आहे. तो तुम्ही आचरणात आणताय हे छानच आहे. पण त्यामुळे आम्ही नवीन लेखासाठी आठवडा भर थांबण्याची आता सवय करून घ्यायला हवी 😦

  • निरंजन
   प्रतिक्रियेसाठी आभार..
   थोडा संयम वाढला की मग इंटरनेट वरचे वास्तव्य पण वाढ्वेन, तो पर्यंत नेट वरच कमी वेळ राहाण्याचे ठरवले आहे.

 29. ho addiction mala hi zala hota. Mag me 2 mahinyancha break ghetala. Tasa to mala ghyayalach lagala. Gharachi kama… navin ghar… samanachi bandhabandh hya sagalyat lihina shakya navhatach… pan ata 2 mahinyanni fresh vatatay…. navya gharachya anand upbhogata aala ani yogya veli gharasathi vel dilyacha samadhan hi aahech!

  Tumhala hi thody divasanchya break ne bara vatel kaka!

 30. satish chandekar says:

  MARATHI LEKHA WACHALE KI FAAR BARE WATTE YA ENGLISH CHYA YUGAT, TEHI NETWAR MARATHI JIWANTA THEWANE HI FAAR MOLACHI GOSHTA AAHE. THANKS FOR ALL MARATHI BLLOGAR

  • सतीश
   मराठी लिहिणे फारच सोपे आहे. शक्य झाल्यास http://baraha.com या साईट वरून फ्री सॉफ्ट्वेअर डाउनलोड करून घ्या. एकदम सोपं आहे वापरणं..
   प्रतिक्रियेसाठी आभार!

 31. santosh Deshmukh says:

  काका , तुम्ही नको ना टाळाटाळ करू !!!!!! शोभत का ह्या वयात ?असे करू नये ना, नाही तर देव बाप्पा रागावतो बघा………

  • संतोष
   सध्या थोडे फॅमीली इश्य़ूज आहेत. येईन लवकरच… 🙂 तसंही महिन्याला ६-७ पोस्ट म्हणजे आठवड्याला दोन तर झालेच!! पण सध्या थोडा बिझी असल्याने नेट वर नसेन अजून काही दिवस.

 32. kalyani wagh says:

  kaka tumhi tumachi savay kami karta ahat na. he khup chhan ahe. karan manasane kadhihi 1khadya gostichya khup jast ahari jau naye. pan sarvach savai vait nasatat kahi kahi savai khup changlya pn asatat. mazya mate tumhi tumacha thodafar vel ata gharchyansathi denar ahat. kharach khup chhan decision ahe tumcha. pn mhanatat na VACHANACHI savay kadhihi changali. Mag jar tumhi tumche blog varche likhan kami kele tar amchi vachanachi savay pan kami hoil tyach kay? 1ka changalya savai pasun tumhich amhala dur thevanar kaka?

 33. Smita says:

  Dasaryachya muhurtavar lihal asa vatatay…

 34. ravindra says:

  हे योग्य नाही महेंद्रजी. तुम्ही पुण्याला येऊन गेलात आणि आम्हाला भेटलाच नाही. असो. एक मात्र निश्चित कि एकटे पण माणसाला खलते. म्हणूनच तर मी माझ्या कुटुंबाला पुण्याला आणले.

 35. रोहन says:

  उत्तम केलेस.. मी सुट्टीवर आलो की लिखाण जवळ-जवळ बंदच करून टाकतो… 🙂 घराला वेळ द्यायला हवा ना शेवटी.. 🙂

 36. मालोजीराव says:

  करेक्ट आहे काका….मी पण नेट सोडून इतर गोष्टींमध्ये स्वताला गुंतवून घेण्याचा तरी करतो ….मित्रांना cal करणे किंवा बझ्झ, फेसबुक वर टिचक्या मारण्यापेक्षा मी त्यांना प्रत्यक्ष भेटी देतो….आता मला जास्त छान वाटतंय अगदी शाळेत भेटायचो तसं ! म्हणजे virtual जगातून बाहेर आल्यासारखं वाटतं थोड्या वेळासाठी का होईना.

  • मालोजीराव
   तुमचं नांव एकदम मस्त आहे राव!! अगदी महाराजांच्या काळात गेल्यासारखं वाटतं उच्चारताना.
   प्रत्यक्षातल्या भेटींची मजा वेगळीच असते, फक्त तुमच्या मित्रांना पण हक्काने बाहेर काढता यायला हवं..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s