इ मेल फॉर्वर्ड्स..

काल सकाळीच एक इ मेल आला. त्यात दिलं होतं की जर मोबाईल पॅंटच्या खिशात ठेवला तर शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, आणि म्हणून सेल फोन पॅंटच्या खिशात ठेवणे टाळा . बरं त्याच इ मेल मधे हे पण दिलेले होते की जर सेल फोन शर्टच्या खिशात ठेवला तरी  सुद्धा तुमच्या हार्ट वर परिणाम होऊ शकतो, आता जर मागच्या खिशात ठेवला तर  मुळव्याध होते असा इ मेल फॉर्वर्ड आला तरीही मला काही  आश्चर्य वाटणार नाही . अरे मग सेल फोन वापरणं तर टाळू शकत नाही ना, मग ठेवायचा कुठे??

बरं मोबाइलचे प्रॉब्लेम्स इतक्यावरच संपत नाहीत, तर कोणीतरी बंगलोर मधे सेल फोन चार्जिंगला लावलेला असतांना एक कॉल आला आणि तो एका माणसाने चार्जिंग बंद न करता घेतला, तर तेवढ्यात त्या सेल फोन चा स्फोट झाला आणि त्या माणसाच्या डोक्याची शकलं ऊडाली, आणि म्हणून कॉशन करायला   हाच   इ मेल माझ्या  निरनिराळ्या २२ मित्रांनी मला  पाठवला होता. कधी कधी तर चक्क वैताग येतो हो या सेल फोन च्या संदर्भातल्या इ मेल्सचा.

तुमच्या कारची किल्ली आत कार मधे राहिली तर घरची स्पेअर किल्ली वापरून कार कशी उघडायची याचा पण एक मेल बरेच दिवस फॉर्वड मधे टॉप लिस्ट वर होता. मला वाटत नाही कोणी ती आयडीय़ा ट्राय करून पाहिली असेल, पण मी पाहिली – आणि सांगायची गोष्ट ही की कारचं लॉक उघडलं नाही सेल फोन वरून घरचा रीमोट वापरून!

काही दिवसापूर्वी आपल्या इंडीय़ा टीव्ही वर पण एक बातमी आली होती, त्या मधे सांगितलं होतं की तुमच्या सेल फोन वर एक कॉल येइल त्या नंबरची अक्षरं लाल रंगाची असतील, तुम्ही तो कॉल रिसिव्ह केला तर तुमचा सेल फोन जळून जाईल.टिव्ही बरे्च मोबाइल्स पण दाखवले होते जळालेले. इंडीया टीव्ही वरच्या बातम्या अर्थात रम्य आणि सुरस कथा या पलीकडे घ्यायच्या नसतात, पण तरीही ह्याच बातमीवर आधारित इ मेल मात्र दुसऱ्याच दिवशी फॉर्वर्ड मधे आला होता.

टीव्ही मुळॆ निर्माण होणारे मॅग्नेटीक फिल्ड मुळे पण तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो ही गोष्ट तर इतक्या वेळा इ मेल मधे आलेली आहे की मला त्यातले कंटेंट पाठ झालेले आहेत. म्हणे तुम्ही आय पॉड चे स्पिकर्स कानात लावून गाणी ऐकल्याने तुम्हाला बहिरेपणा येऊ शकतो तेंव्हा आयपॉड लावून गाणी ऐकू नका ही  सावध करणारी नोट पण एका मित्राने पाठवली होती. तसेच मोबाइल वर पण गाणी ऐकू नका असाही सल्ला होता त्या मेल  मधे, कारण त्यामुळॆ पण बहिरेपणा येऊ शकतो असं म्हंटलं होतं..

एकदा म्हणे एक माणूस समुद्रावर फिरायला गेला होता, तेवढ्यात आकाशातून विज कोसळली आणि त्या माणसाच्या खिशातल्या सेल फोन कडे आकर्षित झाली. दहाच सेकंदात त्या माणसाचा जळून कोळसा झाला. ही बातमी वाचल्यावर एका मित्राने सेल फोन बॅगेत ठेवणॆ सुरु केले होते. फक्त ब्ल्यु टुथ झुरळ ( हेडसेट जो कानात घातला की एखाद्या झुरळासारखा दिसतो तो) कानाला लावून ठेवणं सुरू केलं. पूर्वीच्या काळी जेंव्हा सेल फोन नव्हते तेंव्हा पण एखाद्या झाडाखाली माणूस उभा राहिला तर त्याच्यावर विज कोसळून तो मेला ही बातमी  पण ऐकायला मिळायचीच की नाही?? म्हणून काय लोकांनी पाऊस आल्यावर झाडाखाली आसरा घेणे बंद केले का?? नाही ना? मग सेल फोन वरच बंदी का आणायची हा प्रश्न आहेच.

वॉटर थेरेपी पण बरेचदा इ मेल मधे येत असते, त्यात म्हणतात की सकाळी ऊठल्या बरोबर चार ते सहा ग्लास पाणी प्या आणि नंतरच सगळे कार्यक्रम उरका. मी हे सुरु करणारच होतो, तर दुसऱ्याच दिवशी एक दुसरा इ मेल येऊन थडकला त्यात  म्हंटलं होतं की  जास्त पाणी पिऊ नका, जर प्याल तर एक्सेसिव्ह हायड्रेशनचे बळी व्हाल. झालात की नाही तुम्ही कन्फ्युज? दोन मेल पैकी एक मेल बायकोच्या भावाने पाठवलेला, तर दूसरा मेल तुमच्या भावाने….. 🙂 कोणावर विश्वास ठेवायचा?? नंतर एका डॉक्टर मित्राला विचारलं, तर म्हणाला की भंकस आहे सगळी! दुर्लक्ष कर या अशा इमेल कडे!

मायक्रोवेव्ह मधे शिजवलेले अन्न खाऊ नका. त्याने कॅन्सर होऊ शकतो हा मेल पण बऱ्यापैकी फेमस झाला होता ( फेमस म्हणजे मला दहा पेक्षा जास्त लोकांनी पाठवला होता ) त्याच सोबत एक मेल ज्या मधे एका माणसाने  मायक्रोवेव्ह मधे तापवलेली कॉफी बाहेर काढली आणि त्यात साखर टाकून ढवळणार ,तेवढ्यात ते पाणी अंगावर उडालं आणि संपूर्णपणे भाजून निघाला तो माणूस.. ( तो माणूस कोण होता?? हे कोणीच लिहित नाही, बहूतेक वेळा तो कॅलीफोर्निया किंवा तत्सम देशातलाच असतो. पाणी सुपरहीट होऊन अंगावर उडू शकते हा शोध मात्र नवीनच लागलाय, आणि सगळ्य़ाच लोकांनी  यावर विश्वास पण ठेवलाय.आम्ही आजकाल मायक्रोवेव्ह मधे काही गरम केलं की बाहेर काढण्यापूर्वी थोडा वेळ थांबतो- बरं का. अशा एखाद्या कुठल्याही शेंडा ना बुडखा गोष्टींचा आपल्यावर किती परिणाम होतो नाही का??..

तुम्ही एकटेच कार मधे आहात, आणि रस्त्याने जात आहात, तेंव्हा जर तुम्हाला एकदम हार्ट अटॅक आला तर तुम्ही काय कराल? हा मेल पण खूपदा येऊन धडकतो. मला तर आजकाल या माहिती तंत्रज्ञानाची भीतीच वाटू लागली आहे.  हे सगळे इ मेल्स तुमच्या मित्रांकडून किंवा शुभचितकां कडून   येतात, त्यामुळे उघडून वाचले  जातातच.जरी एखाद्या चांगल्या उद्देशाने पाठवले गेले तरी पण असे मेल केवळ बॅंड्विडथ वेस्ट करण्याचे , आणि गैरसमज पसरवण्याचे काम करतात दूसरे काही नाही..

या पोस्टचा उद्देश हाच, की हे असे येणारे इ मेल्स फॉर्वर्ड करणॆ बंद करण्याचा आपण प्रण करू या या दसऱ्याच्या दिवशी. कारण कुठलाही वैज्ञानिक  आधार नसलेले असे मेल उगाच कोणीतरी टाइम पास म्हणून  तयार करतो आणि  फॉर्वर्ड करून गम्मत पहात असतो. म्हणून असे मेल्स  करण्यापूर्वी कृपया विचार करा आणि कुठल्याही गोष्टी बद्दल गैरसमज पसरवण्यास, घाबरवण्यास हातभार लावू नका  ह्याच नोट बरोबर दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन  हे पोस्ट संपवतो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

39 Responses to इ मेल फॉर्वर्ड्स..

 1. सगळ्यात आधी दसर्‍याच्या शुभेच्छा 🙂

  खरंय तुझं……. मी तर शक्यतोवर मेल फ़ॉरवर्ड करत नाही. अगदीच वाचनीय असलं तरच वर्षातून १-२ पाठवते. अशा मेल्स आल्या तरी वाचायचा कंटाळा येतो खरं म्हणजे.

  • मनःपूर्वक आभार 🙂

   • सगळ्यांनाच येतात हे सगळे मेल. कमीत कमी दहावेळा तरी आले असतीलच.

    • संजीव says:

     अशा मेल जर आल्या, (“Forward this to 10 people and you will win a lottery” टाइपच्या), तर त्या sender लाच दहा वेळा forward करा ! (इति सायरस साहुकार, एम टी व्ही)

  • मी पण नाही फ़ॊरवर्ड करत अशा मेल्स. फ़ोटो बिटो ठिक आहे. पण…..
   सद्ध्या एक अशीच मेल फ़िरतेय भारतीय वृत्तपत्रांच्या मालकीविषयी. मी ज्याला त्याला कळवतोय हि चुकीची महिती पसरवु नका म्हणुन.

 2. हा हा… मला आलेल्या प्रत्येक ईमेल चा उल्लेख आहे पोस्टमध्ये 🙂
  ह्या अश्या गोष्टींनाच कंटाळून मी माझा ईमेल अड्रेस बदलला …

 3. मला पण खुप वैताग येतो हया आणि इतर काही स्पॅम मेल्सचा…ते नेहमी मला कोणत कोणत बक्षिस देत असतात…गेल्या आठवड्यात चक्क आयटी विभागाकडुन मेल आला होता पुर्ण तुम्हाला अमुक अमुक रीटर्न्स मिळणार आहे ही माहिती भरुन पाठवा म्ह्णुन आणि तो मेल इतका पद्धतशीर पाठवला होता कि काय सांगु..मी त्यांच्या लिंकवर जाउन पाहिल तर आयकर विभागाची साईट ही उघडली,पण वर ऍड्रेसबार मध्ये http बघुन कळल हा फ़िशिंगचा प्रकार आहे.शिवाय मित्रांचे ’हा समस दहाजणांना पाठवा तुमचे भाग्य उजळेल’ सारखे मेसेअजही डोक्यात जातात.समस पाठवुन तुमच नशीब बदलायला लावणारे हे प्रतीब्रम्हदेव दुसरे तिसरे कोणी नसुन हे टेलिकॉम ऑपरेटरच आहेत.बाकी मेल मधुन येणारया परस्पर विरोधी सुचनांमुळे भेजाफ़्राय होतो एकदम…असो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

 4. Vinay says:

  मला एकदा मजेशीर फॉर्वर्ड आला होता. जेवताना थंड पाणी पिऊ नका. कारण त्याने पोटातल्या स्निग्ध पदार्थ गोठून जाऊ शकतात आणि हे गोठलेले पदार्थ आतड्यांत गेले तर आतड्यांचा कॅन्सर होऊ शकतो. आणि कोणी येर्‍या-गबाळ्याने नव्हे, तर चक्क IISc मधे Ph.D. करणार्‍याने हा पाठवला होता 🙂 आता बोला!! ते म्हणतात ना, half knowledge is much more dangerous than ignorance, त्यातला हा प्रकार आहे.

 5. असे फॉरवर्ड्स मलाही येतात, हे आता काही वेगळं सांगायला नको. त्यात देवाचे ईमेल्स… म्हणजे १५ लोकांना पाठवा, तुम्हाला यश मिळेल इ.इ. हे ईमेल्स जास्त असतात. काही देवाचे ईमेल्स तर इशारा देतच येतात – “जर तुम्ही हे ईमेल फॉरवर्ड करू शकत नसाल, तर उघडूच नका!” कमाल आहे… मग पाठवताच कशाला? शास्त्रीय माहिती देणारे ईमेल्स मी पूर्वी जपून ठेवत असे, मग लक्षात आलं की कुठल्यातरी वेबसाईटवरूनच संकलित केलेली माहिती असते ही. मग सरळ डिलीटच करायला लागले. मला आपला वारस नेमणारीही काही ईमेल्स येतात :-P. मला आणखी एक फॉरवर्ड नेहमी येतं. ज्यात बहुतांश एक लहानशी मुलगीच जीवघेण्या आजाराने ग्रासलेली असते, तिच्या उपचारांसाठी पैसे नसतात आणि अमूक अमूक कंपनीने सांगितलेलं असतं की जर हा संदेश देणारं ईमेल फॉरवर्ड केलं, तर प्रत्येक दहा ईमेल मागे एक पैसा, एक पेनी असं त्या मुलीच्या खात्यावर जमा होईल. खरं खोटं देवालाच माहीत! डिलीट करावं असं वाटूनही हे ईमेल मात्र मी फॉरवर्ड करते. न जाणो, असली बातमी खरी असेल, तर निदान आपल्या एका छोट्याशा प्रयत्नामुळे त्या मुलीला काहीतरी मदत व्हावी या हेतूने.. अर्थात माझ्या मित्र मैत्रीणींना या ईमेल्सचा नक्की त्रास होत असणार पण मी विचार करते की इतकी फॉरवर्डस जातात त्यांना. त्यात देवांच्या आणि काही विभूतींच्या फोटोंची असह्य मॉर्फींग केलेलीही ईमेल्सही असतातच. या एका ईमेलने काही विशेष फरक पडत नसेल. त्यांना आवडलं नाही तर डिलटून टाकतील.

  • अगदी योग्य. कमीत कमी आप्ल्याकडून तरी असे मेल फॉर्वर्ड करू नये एवढं पाळलं तरीही पुरेसे आहे..

 6. आका says:

  अझुन एक खतरी मेल यायचा, पाणिपुरी वाल्याला एडस झालेला, त्याच्या हाताला जखम होती, त्यामुळे त्याने बनवलेली पाणिपुरी खाऊन खुप जणांना एडस झाला…
  अश्या ईमेलस पडताळण्यासाठी त्याचे कंटेन्ट कॉपी करुन गुगल मध्ये सर्च करायचं, ईमेल हॉक्स या वेबसाईटवर याबद्दल खुप माहीती मिळते…

 7. फॉरवर्डस चा..त्यातही इन्फॉर्मेशनवाले आणि देवाचे फोटोवाले..ह्यांचा मला प्रचंड वैताग येतो.
  ह्या वैतागावरच एक उत्तम कविताही मधे आयरॉनिकली इमेल फॉर्वर्ड म्हणूनच फिरत होती. 🙂

  • देवांचे फॉर्वर्ड्स तर सिझनल असतात, हा सिझन आहे कोल्हापूरवासीनीचा.. इतर वेळी साईबाबाचे जूने खरे फोटो येतच असतात.
   मी स्वतः कधीच करत नाही फॉर्वर्ड्स..

 8. kapila says:

  Dasaryacha hardik shubhecha.
  Ek dam patale, ugach avicharane kuthalehe mail forward karane kharach khup chuliche ahee.

 9. Smita says:

  http://www.madetostick.com/excerpts/

  Several versions of the first story/ ueban legend on this blog had been doing rounds for a while too, they are all alike. and as you say these things always happen to some untraceable person (friend of a friend :-). Similary the sms that one receives. I have stopped counting how many times I have won some thousands of GBP ( not rupees of course pounds/ dollars are catchier…naturally ) and I should just submit my acount details to claim those:-)
  RaChyaKA: mee mhaNale hote tumhee dasaryachya muhurtavar lihal punha mhaNun!!!:-)) refer to the last comment on your earlier post!

  • मी पण बरेच कोटी पाउंड जिंकलो आहे आज पर्यंत. 🙂 हा नायजेरीयन स्कॅम चा प्रकार, पण याला अजूनही बरेच लोकं बळी पडतात 🙂

 10. Aparna says:

  दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा …

  mi he mails wachanapan band kelay…Fwd tar jaudech….tyaat te rare photos of Balaji and Sidhhivinayak…Dev tyana kadhi maaf karnaar nahi…:).

 11. ganesh nimbalkar says:

  दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा sir…
  lekh chan aahe.

 12. ganesh nimbalkar says:

  last week pasun me tumchya bolgcha niyamit vachak aahe, sir. karch tumche lekh kup prabhavi aahet.

 13. ganesh bagal says:

  तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा

 14. सध्या पाकिस्तान का बांगलादेशात बनावट शीतपेये कशी बनतात, याचा एक मेल सारखा येतो. काही वेळेस मायक्रोसॉफ्टने उदारहस्ते पैसे (डॉलर) वाटायला घ्यायचा व त्यासाठी आपण आणखी दहा-बारा जणांना बकरा करण्याचा एक मेल येत असतो.

  • हे फॉर्वर्ड्स सारखे येत असतात. एकदा आला तर ठीक आहे, पण तोच फॉर्वर्ड सगळ्याच मित्रांकडून यायला लागला की मग मात्र वैताग येतो. जवळपास ५० टक्के मित्र कॉमन असतात, तेंव्हा एका मित्राने पन्नास टक्के लोकांना केला की तोच मेल तेच पन्नास टक्के मित्र पुन्हा तुम्हाला पाठवतात, कारण सगळ्यांची मेलींग लिस्ट बहूतेक सारखीच असते.

 15. संकेत आपटे says:

  सगळ्यांत वैतागवाणं फॉरवर्ड म्हणजे ‘हे मेल आणखी दहा जणांना पाठवलं नाही तर संकट कोसळेल’. बर्‍याचदा यात एखाद्या देवाचा फोटो असतो. आणि सांगितलेलं असतं, ‘हे शुभशकुनी मेल आहे. ही साखळी तोडू नका. हे मेल तुम्ही पुढे पाठवलंत तर तुमच्या आयुष्यात काही चांगली घटना घडेल.
  ५ माणसं : १ वर्षात तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल.
  १० माणसं : ६ महिन्यांत तुमचं नशीब उजळेल.
  १५ माणसं : १ महिन्यात तुम्हाला खुशखबर मिळेल.
  २० माणसं : १ आठवड्यात तुमच्या आयुष्यात चांगली घटना घडेल.
  २५ किंवा त्यापेक्षा जास्त माणसं : आत्ता तासाभरात तुमच्या नशीबात जमीन‍अस्मानाचा फरक नाही पडला तर बापाचं नाव लावणार नाही राव!’ आणि कहर म्हणजे या अशा मेल्समध्ये एक धमकीही असते. ‘हे मेल मूर्खपणाचं समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. दत्तोपंत टोणगे लय माजोरडा मानूस. त्यानं या म्येलकडे लक्स दिलं न्हाय आन्‌ त्याची बायको नामू सुताराचा हात धरून पलून ग्येली.’ वगैरे वगैरे….

 16. santosh Deshmukh says:

  काका, मी तर अनोळखी मेल उघडतच नाही, सरळ डीलीट त्यामुळे फोरवर्ड करायचा प्रश्न येत नाही कधी कधी थोडस अडाणी असलेल परवडल पण नको ती नसतीउठाठेव

  • अनोळखी मेल विषयांवरूनच कशावर आहेत ते समजू लागलं आहे हल्ली. प्रॉब्लेम हा आहे, की सगळे मेल हे मित्र मंडळी कडूनच फॉर्वर्ड आलेले असतात.. 🙂

 17. mazejag says:

  ROFLoL…he mails vachtanna mala pot dharun hasu yet….aani kadhi kadhi raag hi…pan kahi majeshir forwards pan astat…to aathvto..airtel ka network kahi bhi..tyat ek premi yugul ast…tyatli ti marte…tichya phone sakat tila dafan kel jat…ticha priyakar bahregavi gelela asto tyala dhaaka basel mahun tyala konihi kahihi sangat nahi…to tila behtayla tichya ghari jato teva tyala kalat ki ti kahi divsanpurvi maran pavli aahe..pan tyach veli ticya phone varun tyala call yeto…and mailchya shivti tag line..air tel ka attut network……hahahahahaha……pakao panacha kalas…..

 18. Gauri says:

  Kaka, Kharach vaitag ahe asha emails cha. Forwards mhanje tari kiti karayche, hyala bandhanach nahit. Changle post ahe dasrya nimitt. Thanks

 19. amit says:

  Forward karayla far waitag alay

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s