घटस्फोट..

कालचा मुंबई मिरर पाहिला का?? ती गोंडस चेहऱ्याची , थोडीशी जाड पण अट्रॅक्टीव्ह असलेली डिलनाझ आणि तिचा नवरा दोघांचाही फोटो दिलेला होता पहिल्याच पानावर.  या दोघांनाही एका टिव्ही वरच्या डान्स रिअअ‍ॅलिटी शो मधे पूर्वी पाहिले होते .दोघंही उत्तम नाच करतात-  ’नच बलीये’ बद्दल लिहितोय मी, ज्या शो मधे पूर्वी सचिन सुप्रिया पहिले बक्षिस मिळवून विजयी झाले तोच शो..

बातमी काही फारशी चांगली नव्हती, जवळपास १४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे अशी काहीशी बातमी होती ती.दोघंही म्युच्युअल कन्सेंट वर डायव्होर्स घेत आहेत असंही म्हंटलं होतं बातमी मधे. लग्नानंतर १४ वर्षानंतर अशी वेळ का बरं यावी दोघांवर??  याचाच अर्थ आता ’जुळवून घे” एकत्र रहाण्या पेक्षा वेगळं झालेलं बरं असे विचार जास्त फोफावतात असे दिसते.

घटस्फोटाच्या कायद्या बद्दल मला काही फारसे माहिती नाही – वाचलेले सुद्धा नाही .घटस्फोट किंवा काडीमोड हे शब्द पुर्वी फार क्वचित ऐकू यायचे- जे आजकाल सर्रास ऐकू  येतात. याच बरोबर अजून एक नवीन शब्द कानावर पडतो तो म्हणजे ’ लिव्ह इन’.   बरेचदा घटस्फोट न घेता केवळ म्युचुअल कन्सेंट वर दुसरा विवाह करण्याचे प्रकारही आपल्या इथे खूप दिसून येतात. त्या  पैकी काही प्रसिद्ध लोकांच्या बाबतीत ( जसे धर्मेंद्र हेमा, कमला-सारीका, अशी अनेक उदाहरणे देता येतील.) पहिले लग्न झालेले असतांना पण  , दुसरे लग्न हे  ही हिंदू कायद्यानुसार अवैध ठरते असे असले तरीही दुसरीला पण तेवढेच मानाचे स्थान मिळालेले दिसते .  दुसरे लग्न हे बेकायदेशीर आहे ,  पण नेमकं ह्याच गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करून कायद्याचा चोळामोळा बिनदिक्कत पणे केला जातो. ( कायदा म्हणतो की जर दुसरीने तक्रार केली तरच काहीतरी कारवाई करण्याचा पोलीसांना अधिकार आहे)

धर्मेंद्र ने लोकसभेच्या फॉर्म मधे  बायकोचे नाव प्रकाश दिले होते, आणि हेमा मालीनीने राज्य सभेच्या फॉर्म मधे धर्मेंद्रचे नांव नवरा म्हणून दिले होते.  दोघांनीही निरनिराळी नावं दिल्यावर मात्र यावर खूप गदारोळ पण माजला होता, तरीही  दोघांनाही काहीच झालं नाही.

अशा प्रकारे दुसऱ्या लग्नाच्या बायकोला पुर्वी ’रखेल’, ’स्टेपनी’ म्हंटले जायचे, पण हल्ली   तसं काही नसते. बरेचदा तर ह्या  स्टेपनीने खऱ्या चाकाची जागा घेतलेली आहे असेही दिसून येते. काही दिवसा पूर्वीची गोष्ट आहे. एक मित्र आहे माझा , चेन्नाइ ला रहातो .एकदा संध्याकाळी त्याचा रस्त्यावर अ‍ॅक्सीडॆंट झाला म्हणून त्याला एका दवाखान्यात दाखल करण्यात आले.  बराच सिरियस अ‍ॅक्सीडॆंट होता . दुसऱ्या दिवशी दवाखान्यात त्याच्या दोन्ही बायका कर्म धर्म संयोगाने एकदमच आल्या , आणि त्याचं भांडं फुटलं. ही काल्पनीक गोष्ट नाही – अगदी शंभर टक्के खरी आहे. लग्नाची बायको असताना, एकाच गावात दोन घरठाव केले होते त्याने आणि जवळपास २१ वर्ष बिनबोभाटपणे सगळं काही व्यवस्थित सांभाळलं होतं त्याने.   बरं त्याने  , एकाही अगदी जवळच्या  मित्राला  पण त्याच्या या दोन बायकांची ’गम्मत’ कळू दिली नव्हती कधीच . आता  दोघींनाही मुलं आहेत , मोठा मुलगा इंजीनिअरींगला आहे- काय बोलणार ? मला जेंव्हा हे समजलं तेंव्हा तर सुरुवातीला विश्वास ठेवणेच अवघड होऊन बसलं होतं.

लग्न करून रहाणे आणि नंतर मग पुढे कधी पटलं नाही तर मग पुन्हा हा डीव्होर्सचा गोंधळ , त्या पेक्षा मग  पाश्चात्य देशातल्या प्रमाणे ’लिव्ह इन’ रिलेशनशिपचे काय वाईट?? म्हणून हे  फॅड पण भारतात आले. काही खूप मोठी नांवं जसे ’शेखर कपूर’ वगैरे किंवा ’अर्चना पुरणसिंग’ , ’ सैफ़ अली खान , रोझा’  किंवा ” जॉन बिपाशा “सारख्या प्रसिद्ध लोकांची नांवं या संदर्भात घेतली जाऊ लागली. या संबंधात  दोघांनाही एकमेकांना नीट ओळखता यावं, आणि समजून घेता यावं म्हणून कुठलीही बंधन न पाळता  दोघांनीही जितके दिवस वाटेल तितके दिवस एकत्र रहायचं आणि मग नंतर  पटलं तर सोबत रहाणं  कंटीन्यु करायच,  आणि  समजा कधी पटलं नाही तर एकमेकांपासून वेगळं व्हायचं हा कन्सेप्ट आहे. म्हणजे “विषय सुखासाठी” एकाच पार्टनरशी बांधून घ्यायची गरज नाही- हवे तेवढे दिवस एका बरोबर रहा, नंतर दुसरा/री जास्त चांगली  मिळाला/ली की हा सोडून द्या.. कायद्याची काही भिती नाही, दोघंही सज्ञान, मग काय ??

एकत्र रहाणे आणि मग नंतर कंटाळा आला, आता दुसरी /दुसरा कोणीतरी हवा म्हणून वेगळे होणे ! अतिशय डेंजरस कल्पना आहे ही. कमिटमेंट नाही म्हंटल्यावर सेक्स्युअली ट्रान्समिटेड आजार होण्याचे चान्सेस हे १०० टक्क्यांनी वाढतात.

विचार करा की एखादी तरुणी २५ व्या वर्षापासून जर पुढली दहा ते पंधरा वर्ष लिव्ह इन मधे होती,    आणि नंतर तिला तिच्या सोबत रहणाऱ्याने सोडून दिले, तर तीचे भवितव्य काय?? तिला पुन्हा  दुसरा कोणी मिळणे सहज शक्य होईल का?? जरी समजा दुसरा एखाद  पुरुष आकर्षित झाला  तरीही तो केवळ  ’तेवढ्या’ एकच कारणासाठी , म्हणजे ही “टाकून दिलेली” किंवा  “सहज अव्हेलेबल” असलेली स्त्री म्हणून असेल.  आणि याला कारण  म्हणजे आजची सामाजिक मानसिकता. एखादी एकटी स्त्री ( अर्थात डिव्होर्स्ड किंवा लिव्ह इन सेपरेटेड) म्हणजे सार्वजनिक मालमत्ता  असा काहीसा समज असतो समाजाचा.  पण एक बाकी आहे की,  विधवा स्त्रियांना अजूनही आपल्या  पुर्णपणे मान दिला जातो समाजात.

सहज आठवलं म्हणून लिहितोय, जुनीच एक म्हण आहे ” म्हातारा नवरा, आणि कुंकवाला आधार” तिची सार्थता अशाच प्रसंगी लक्षात येत असते.

याच पार्श्वभूमीवर अजून एक बातमी आली होती पेपर मधे . सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मधे  एखाद्या स्त्रीला सोडून दिलं तरीही ती पोटगी मागू शकत नाही- आणि ह्या निर्णयामुळे बऱ्याच पुरुषांना विवाह बाह्य संबंध ठेवण्यास मोकळीक मिळणार आहेच..  पण एक प्रश्न रहातोच- अशा संबंधातून निर्माण झालेल्या मुलांचं पुढे भवितव्य काय?  त्यांनी नांव तरी कोणाचं लावायचं बाप म्हणून??

अजून तरी ही कीड केवळ उच्च समाजातच आहे, पण खाली तळागाळापर्यंत पोहोचण्यास    वेळ लागेल असे वाटत नाही, आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय वाचून खंत वाटली..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

48 Responses to घटस्फोट..

 1. खरय काका एकदम…काय होणार आहे पुढे देवालाच माहिती..

  सगळा खूप खूप कठीण होत जातय.. 😦 😦

 2. Pingback: Tweets that mention घटस्फोट.. | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 3. vikram says:

  एक बातमी आली होती पेपर मधे . सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मधे एखाद्या स्त्रीला सोडून दिलं तरीही ती पोटगी मागू शकते.
  ^^^^
  he batami mala jara chukichi vatate nemeke yachya ulata nikal courtane dila aahe 2-3 divasapurvi ase mala vatate

  link shodhavi lagel

 4. Dinesh D says:

  लिव इन रिलेशनशिप पेक्षा “लिव विदाउट एनी रिलेशनशीप” हाच शब्द योग्य आहे. आणि माझ्या माहितीनुसार लिव इन मधून बाहेर पडल्यानंतर महिलेस पोटगि देणे बंधनकारक नसल्याचा निर्णय दिलाय सुप्रीम कोर्टान.
  http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=14005

 5. ngadre says:

  Vikram + 1

  Ulati batmi khari ahe.

  Baki ‘Gharthaav’ ha shabd sahaj sundar aahe. Bahutek pradeshik shabd asava. Ase shabd likhanaat aale ki phaar god vattaat.

  Using such words keep language alive and healthy.

  Lekh ekdam uttamach. Live in ha prakar teen kinva young age madhe akarshak vatu shakto.

  Jara jag paahile,grow up jhale ki tyatalaa pokal pana lakshaat yeto.

  Atta je teen kina early 20s madhe ahet tyanna nahi patnaar mee mhantoy te.

  • तरूणपणी अंगात रग असे पर्यंत हा प्रकार योग्य वाटू शकतो. पण समजा वयाच्या ४०-४५ व्या वर्षी स्त्रिला किंवा पुरुषाला एखादा आजार झाला, तर तिने त्याला किंवा त्याने तिला सोडून द्यायचे का?? अर्थात नाही… पण लिव्ह इन मधे अशी कमिटमेंट असण्याची शक्यता कमीच आहे असे वाटते.

 6. स्नेहल says:

  लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या लोकांची आयुष हि प्राण्यान प्रमाणे आहेत, त्यांचे हि असेच होते ना एका विशिष्ट वेळे नंतर ते दुसरया मादी कडे जातो मुल किवा त्यानंतरचे परिणाम हे तिलाच भोगायला लागतात, आणि जरी एक स्त्री अश्या नात्यात राहायला तयार असेल तरी आपण स्वताहून मानव जात का आपल्यला प्राण्यान मध्ये समाविष्ट करतेय हे देखील नाही कळत
  मला पुस्तकाचे नाव नाही आठवत पण बहुतेक अमृतवेल किवा उल्का कशात तरी वाचले होते, त्यात स्टोरी अशी होती कि त्या नायिकेचा नवरा बाहेर गावी असतो काम निमित्त असतो आणि त्याचे एका बाईशी संबंध असतात आणि त्या वेळी जेव्हा ते या नायिकेला कळते तेव्हा तिचे उदगारकाही असेच असतात.

 7. दादा, तुमच्या लेखामधे थोडं तथ्य आहे. मात्र काही मुद्दे केवळ लिव्ह-इन रिलेशनशिपला समोर ठेवून मांडल्याने पटत नाहीत. मी लिव्ह इनचा पुरस्कार करते आहे, अशातला भाग नाही पण लिव्ह इनला कीड समजण्यापेक्षा त्याचे चांगले कंगोरेही पाहिले पाहीजेत.

  घटस्फोटाच्या बाबतीत हल्ली सर्रास पणे ऐकू येतं. तेच पूर्वी ऐकू यायचं नाही पण कित्येक घरात विवाहांतर्गत घटस्फोट झालेले आहेत. याची कारणं:

  १. घटस्फोट घेतला समाज काय म्हणेल? बायकोला ही भिती की माहेरी पाहूणीच समजणार. भाऊ-भावजयीला अडचण शिवाय लोकांच्या बोचर्‍या नजरा, तर पुरूषाला काळजी की मित्र-नातेवाईक म्हणतील, “एक बायको धड सांभाळता आली नाही.”

  २. घट्स्फोटाची इच्छा असणार्‍या जोडप्याला मुलं असतील, तर आपल्या दोघांच्या वादात मुलांचं काय होईल, हा समजूतदार विचार करूनही घट्स्फोट टाळले जायचे. प्रत्यक्षात नवरा-बायको एकाच घरात राहूनही विभक्तच असायचे (माझ्या एका मैत्रीणीचे आई-वडील गेली २५ वर्षे असे रहात असलेले मी स्वत: पाहीलेले आहेत. नुसते रहातच नाहीत तर स्वयंपाकही निरनिराळा करून घेतात).

  ३. घटस्फोट घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता. आरोप-प्रत्यारोप. यातून वकीलाला होणारा आर्थिक फायदा आणि स्वत:ला व कुटुंबियांना होणारा मन:स्ताप.

  ही कारणं प्राथमिक आहेत. विवाहांतार्गत घट्स्फोट होण्याची आणखीही कारणं असू शकतात.

  विवाह-विच्छेद करताना कुणीच ते आनंदाने करत नाही. जेव्हा गोष्टी पराकोटीला येऊन पोहोचतात तेव्हाच हा निर्णय घेतला जातो. या मुलांची फरफट होते हे माहीत असतानाही जेव्हा घटस्फोट होतात, तेव्हा पति-पत्नीला एकत्र रहाणं अशक्य आहे व ते संभाव्य कलह टाळण्यासाठी विभक्त होत आहेत, या त्यांचा विचाराचा आदर इतरांनी करायला हवा.

  पूर्वापार चालत आलेल्या पुरूषप्रधान संस्कृतीमधे घटस्फोटीत पुरूषापेक्षा घटस्फोटीत स्त्रीकडे किंवा विधूर पुरूषापेक्षा विधूर स्त्रीकडे पहाण्याचा समाजाचा (यात स्त्रियाही आल्या) दृष्टीकोनच निराळा होता. स्त्रीला उपभोग्य वस्तूपलिकडे किंमत दिली जात नव्हती. मुलीसाठी एकवेळ बिजवर चालत होता पण विधवा स्त्रीशी लग्न करणं म्हणजे अवघ्या समाजाविरूद्ध पुकारलेलं बंडच! घट्स्फोट घेतलेली किंवा परित्यक्त्या स्त्री म्हणजे “नवर्‍याने टाकलेली”. पुरूष कधीच “स्त्रीने टाकलेला बिकलेला” नव्हता. मर्दानी म्हणजे शूर आणि निर्भय स्त्री पण “हातात बांगड्या भरलेल्या असणे” म्हणजे दुर्बलतेचं (?) लक्षणं. ही वरची वाक्यं कितीही चावून चोथा झालेली असली, तरी तेच वास्तव होतं.

  आता मुलांसोबत मुलीही बरोबरीने शिक्षण घेतात. आपल्या कर्तृत्वाचा अवाका त्यांना माहीत आहे. एखाद्या मुलाने प्रपोज केलं की “धन्य झाले” ही भावना त्यांच्या मनातून जाऊन “पाहू आधी, त्याचा स्वभाव कसा आहे”, याविचारावर त्या जास्त भर देतात. पूर्वी स्त्रीला फारसे पर्यायच उपलब्ध नसायचे, कार्यक्षेत्र मर्यादीत होतं. आता काम हीच आवड आणि तेच आयुष्य असा दृष्टीकोन बाळगणारे स्त्री-पुरूष एकत्र काम करत असतात. मानवी गरजा (ज्या प्रत्येक प्राणीमात्रांमधे निसर्गत:च आहेत) कुणाला चुकलेल्या नाहीत. त्यामुळे विवाहबंधनात अडकून अपेक्षित नसलेल्या अपेक्षांचं ओझं मनावर ठेवून आयुष्याची धुळधाण करण्यापेक्षा समविचारी साथिदार निवडून लिव्ह इन रिलेशनशीपमधे रहाणार्‍या स्त्री-पुरूषांचं वागणं मला चुकीचं वाटत नाही.

  कमिटमेंटचं म्हणाल, तर लिव्ह इन मधे तशी शक्यताच गृहीत धरता येत नाही पण लग्नाच्या बंधनात अग्निभोवती घातलेल्या फेर्‍यांपासूनच त्याची अपेक्षा केली जाते, नव्हे त्या अपेक्षेनेच लग्नसंस्काराची निर्मिती झाली आहे. पण सगळीच विवाहीत जोडपी एकमेकांशी कमीटेड असतात का?

  प्रतिक्रिया अंमळ मोठी झाल्याबद्दल क्षमस्व! लिहील्यावाचून रहावले नाही. वाद घालण्याचा उद्देश तर अजिबात नाही. तुमच्या मताचा आदर आहेच, मी केवळ स्वत:चं मत व्यक्त केलं.

  • कांचन
   इतर सगळे मुद्दे मान्य.. पण लिव्ह इन मधे राहून नंतर लग्न करणे हा मुद्दा काही पटत नाही. कारण अजूनही भारतीय समाजाची मानसिकता ही योनी शुचितेला फार जास्त महत्व देते. अजूनही आपल्या कडे डेटींग वगैरे सुरु झालेले नाही. समविचारी पुरुष स्त्री जर लिव्ह इन मधे राहू शकतात, तर तसेच ते लग्न करूनही राहू शकतात. लिव्ह इन मधे फक्त हवे तेंव्हा वेगळे होण्याचे स्वातंत्र्य हाच एक मुद्दा महत्वाचा. पाच दहा वर्ष एकत्र राहून त्या पुरुषाने जर दुसरे लग्न केले तर ते संयुक्तिक ठरेल का? अर्थात नाही.. लग्नानंतर एक प्रकारची कमिटमेंट असतेच.. एकमेकांच्याबद्दलचा आदर हा पण असतोच. सगळीच जोडपी एकमेकांना कमिटेड नसली तरी बहुसंख्य असतात, आणि केवळ काही लोकं कमिटेड नाहीत म्हणूनही विवाह संस्थेचे मह्त्व कमी होत नाही.
   विवाह विच्छेद.. हा एकवेळ मान्य होऊ शकतो. पण लिव्ह इन अजूनही पटत नाही मला .

  • मी कांचनच्या मताशी सहमत आहे.
   वि म दांडेकरांकडे मी १९८८ च्या दरम्यान गेलो होतो. मतिमंदत्व , वैवाहिक सौख्या बाबत घटस्फोटित हा विषय असा वि म दांडेकरांच्या संशोधनाचा विषय होता . त्यांना ज्योतिषाबद्दल आस्था होती. मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्‍या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले)
   वि.म कधी वारले ते मला आठवत नाहि पण १९९९ पुर्वी. त्या आगोदर काही काळ भारत इतिहास संशोधक मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमात त्यांनी मतिमंदाच्या शंभर कुंडल्यांसाठी जर शंभर नियम असतील तर त्यात काही अर्थ नाही. असे सांगितले होते. तेव्हाही मी कार्यक्रमाला हजर होतो. हा पहा वि म दांडेकरांचा सा.सकाळ मधील ८ जुलै १९८९ चा लेख
   http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/06/blog-post.html

 8. sumedha says:

  कांचन ,मी तुझ्या मताशी सहमत आहे.
  लिव इन रिलेशनशिप मध्ये केवळ शारीरिक संबंध असतात असे मानणे योग्य ठरणार नाही .तिथे देखील भावनिक गुंता आहेच.
  या तून जन्माला आलेल्या संततीला काय नाव द्यावे हा प्रश्न? मुळातूनच ही समाजाची मानसिकता बदलायला हवी . संततीला आईचे नाव देणे हे सोयीचे असूनही आपला समाज हे स्वीकारत नाही. संततीचा पिता ,म्हणजेच त्या मातेचा पालनकर्ता/पुरुष कोण आहे ? हे समजून घेणे समाजाला हवे असते असे मला वाटते.

  • सुमेधा
   भावनिक गुंता… अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय. त्याच गुंत्यामधे अडकून कायमचा आयुष्याचा खेळखंडॊबा होऊ शकणार नाही काय?संतती ला आईचे नाव द्यायचे- याच संदर्भात ते एक पुस्तक किशोर शांताबाई आडनांव विसरलो – यांचे पुस्तक वाचले की समाजाला कसे तोंड द्यावे लागते हे वाचून वाईट वाटते.
   हा भावनीक गुंता सोडवला जाऊच शकत नाही . लिव्ह इन मधे एक दोन वर्ष राहूनही जर त्या मुलाने लग्न करण्याचे टाळले आणि दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले तर त्या पहिल्या स्त्रीचे काय होईल?? जर ती स्वतःचं आयुष्य कसंही जगण्यास तयार असेल तर ठीक, नाहीतर ……..??

 9. maya says:

  maza maat thoda wegla aahe.. lagna nantar kadacchit doghe ekmekanshi adjust hoo asa prayatna karat asavet.. aani lagna zalya zalya navra aani baiko ekmekanshi changlech wagtat.. kimbahuna.. it will be too early.. mhanun wel ghalavtat.. in the meanwhile… mhanje varshachya aatach bahutek jananna mul hote.. aani paay adhikach fasto… nanter mulansathi kasetari ekatra rahtat… karan tyancha kai dosh mhanun…aani asch kudhat kudhat aayushya kaadnare jast… 14 varsh kadachit… tyamulech kadhali asavi… aashevar… pan… roj marnya peksha aani 25 varsha vegla swyampak karnyapeksha …kadimod bara…..

  • माया,
   १४ वर्ष.. म्हणजे जवळपास एक तप!! इतकी वर्ष एकत्र राहिल्यानंतर पण वेगळं व्हावंसं का वाटलं असावं हा प्रश्न डोक्यात आला म्हणून हे पोस्ट लिहायला घेतलं.
   लग्न म्हणजे एक प्रकारची ’तडजोड’च आहे शेवटी!!
   कॉस्ट ऑफ अपॉर्च्युनिटी प्रमाणेच कॉस्ट ऑफ डिसिजन हा पण एक प्रश्न आहेच..

 10. ngadre says:

  I kind of agree with Maya and Kanchan.

  Mul lavkar honyache pramaan khoop ahe.

  Mag mulasathi ekatr rahoo mhanoon compromise hot rahate.

  Pan mala disate ki ghatasfot houn ektya aaikade rahaave laagnaari pore comparison madhe baryaa sthitit mhanaaveet.

  Ekatr rahoon roj ekmekaanna orkhade kadhat, haataane naahee tar shabdaanni maarat, kutrya saarkhe bhaandnaare aai baba..ashaa gharaat mulaanche jaast haal hotaat..

  • नचिकेत
   दोन सख्खे भाऊ, दोन बहीणी पण भांडल्या शिवाय राहू शकत नाही. म्हणूनच या नात्यातही भांडणं ही होणारच. ती कुठल्या लेव्हलला न्यायची हा प्रश्न आहे महत्वाचा. आई वडीलांशी भांडण झालं म्हणून काही कोणी आईवडीलांना घराबाहेर काढतं का?? नाही ना.. मग हे नाते पण तसेच का समजले जात नाही??
   आईवडीलांची भांडणं तर सगळेच जण पहात मोठे होतात, पण जर ते अगदी विकोपाला गेले तरच घटस्फोटाचा विचार केला जाऊ शकतो. मॅरेज काउन्सिलिंग साठी पण जाऊन भेटायला हरकत नाही, अशा परीस्थितीत.

   फरक पहा इथे आहे:-

   १) लग्न झालेले असेल तर स्त्रीला पोटगीचे पैसे मिळणार, मुलाला त्याचा बापाच्या इस्टेटीवर अधिकार मिळणार..
   २) जर लिव्ह इन असेल तर असे सेपरेश झाल्यास स्त्रीला काहीच मिळणार नाही, मुलाला पण वडीलांच्या प्रॉपर्टीवर अधिकार नसेल..

   अजूनही समाज मान्यता नाही अशा संबंधातून निर्माण झालेल्या संतती साठी. शेवटी त्याला समाज बास्टर्ड म्हणूनच ओळखणार. अर्थात एकादा नविन जीव अशा बॅकग्राउंड सहीत या जगात आणणं कितपत योग्य??

   • Nachiket says:

    सॉरी..ते कांचनच्या या ओळींविषयी विषयी अग्री झालो होतो:

    “विवाह-विच्छेद करताना कुणीच ते आनंदाने करत नाही. जेव्हा गोष्टी पराकोटीला येऊन पोहोचतात तेव्हाच हा निर्णय घेतला जातो. या मुलांची फरफट होते हे माहीत असतानाही जेव्हा घटस्फोट होतात, तेव्हा पति-पत्नीला एकत्र रहाणं अशक्य आहे व ते संभाव्य कलह टाळण्यासाठी विभक्त होत आहेत, या त्यांचा विचाराचा आदर इतरांनी करायला हवा. ”

    लिव्ह इन ला विरोधच..

    घटस्फोट घेण्या पर्यंत वेळ येते तेव्हा (भारतात तरी) खूप सहन करून झालेलं असतं. एकत्र जगणं हे मरणापेक्षा वाईट हराम झालेलं असतं. तेव्हाच हा विचार होतो.

    अशा स्थितीत मात्र पोरांसमोर होणारी रोजची भांडणं व्ह्यायोलंट असतात. पोरांच्या मनाला आघात करत राहतात.

 11. hemant2432 says:

  Mahendra saheb aaplya kadeel chali-riti apanach ghalavlya aahet. Prattek gosht western countries kade paahun karaayachi aani Bhogvaad-Changalvaad chalu karaaycha. Ek maatra barobbar lihilet ki ya sarva prakaarachi kimmat “ILI-Independ from Lived in Relation”chya stree/mulgi /baai….yannach basnaar…….. he nakki!

  • हेमंत
   धन्यवाद. मला पण हीच गोष्ट म्हणायची होती. स्त्रियांच्या दृष्टीकोनातून त्या स्त्रीचं जिवन इतकं साधं सोपं रहाणार नाही वेगळं झाल्यानंतर…

 12. गौरी says:

  काका, माझं मत कांचनसारखंच आहे. आजपर्यंत आपल्याकडे घटस्फोट नव्हते, म्हणजे सगळे आनंदात गुण्यागोविंदाने नांदत होते असं नाही. नाइलाज होता, आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं, समाजात एकटीने जगणं शक्य नव्हतं म्हणून प्रचंड कुचंबणा सोसत कित्येक स्त्रियांनी आयुष्य काढली, लोक काय म्हणतील म्हणून कित्येक पुरुषांनी केवळ रीत निभावली.
  घरी अगदी जवळच्या एका नात्यामध्ये बघून केलेल्या लग्नानंतरचा घटस्फोट बघायला मिळाला. त्यावेळचा मनस्ताप, वेळ, शक्ती मुलांचा प्रश्न हे सगळं पाहिल्यावर खरंच दोन – तीन वेळा भेटून लग्नाचा निर्णय घेणं हा जुगार आहे असं वाटलं. भारताबाहेर असताना लिव्ह इन ची अनेक उदाहरणं बघितली. दोन – तीन वर्षं एकत्र राहून एकमेकांना समजून घेऊन मग लग्न करणारे बघितले, लिव्ह – इन मधून झालेली मुलं मोठी झाली, आता ती आईवडिलांना म्हणतात कशाला तुम्ही आता लग्न करता – एवढी वर्षं राहिलात तसेच शेवटपर्यंत रहा असा एक मजेदार किस्सा बघितला. मूल होईपर्यंत लिव्ह इन, त्यानंतर लग्न असा विचार करणारे जोडपीही बघितली. लग्न करून स्वैराचार करणारेही असतात, आणि कायद्याने लग्न झालं नसूनही आयुष्यभर कमिटेड राहणारेही असतात. लिव्ह इन म्हणजे वाईट आणि लग्न म्हाणजे चांगलं असं मला वाटत नाही. लग्न न करता पाट लावून राहण्याची पद्धत आपल्याकडेही होती – ती मध्यमवर्गात किंवा उच्च मध्यमवर्गात आता ‘लिव्ह-इन’नावाने आधुनिक म्हणून येते आहे.
  अजून सविस्तर लिहिता लिहिता प्रतिक्रिया पोस्टपेक्शा मोठी होईल 🙂 त्यामुळे आता आवरतां घेते.

  • गौरी
   प्रतिक्रियेसाठी आभार.
   कदाचीत मी मागच्या पिढीतला म्हणूनही असेल, अजूनही विचार मान्य होत नाहीत तसे.. जर आपल्याच नात्यातल्या कोणी असं केलं तर आपल्याला आवडेल का?? हा विचार मनात येतो आणि मग जे लिहिलंय ते खरंय असं वाटू लागतं.
   पूर्वी पण घटस्फोट हा होताच. आपण कोणासाठी जगतो??
   लहानपणी :- हे कधीच माहीत नसतं की कोणासाठी जगायचं.. म्हणून स्वतः साठी.
   थोडं मोठं झाल्यावर :- २०-२२ व्या वर्षी .. आई वडीलांसाठी. तेच देव असतात या वयात.
   लग्न झाल्यावर : – बायको साठी आणि आई वडील हे तर मनात असतातच.
   मुल झाल्यावर : – मुलांसाठी
   शेवटलं वाक्य मुलांसाठी!!!
   मग त्याच साठी थोडं कॉम्प्रोमाईझ करावं लागलं तर काय हरकत आहे असंही वाटतं मला.

 13. संजीव says:

  साहेब, तुमचा मुद्दा पूर्णपणे अमान्य !

  १. जर धर्मेंद्र – हेमा एकत्र राहू शकतात, मुलं जन्माला घालू शकतात, तर इतर का नाही? शेवटी हा मानसिकतेचा प्रश्न आहे. आज समाजाला हे मान्य नसेल, पण एकेकाळी co-ed शाळाही मान्य नव्हत्या.
  ———-
  २. Quote :’एकत्र रहाणे आणि मग नंतर कंटाळा आला, आता दुसरी /दुसरा कोणीतरी हवा म्हणून वेगळे होणे ! अतिशय डेंजरस कल्पना आहे ही. कमिटमेंट नाही म्हंटल्यावर सेक्स्युअली ट्रान्समिटेड आजार होण्याचे चान्सेस हे १०० टक्क्यांनी वाढतात.”

  माफ़ करा, पण हे जरा हास्यास्पद वाटलं. Do you seriously mean that 50% of the AIDS patients in India got it from a live-in partner? Or is it because of unsafe sexual practices, adopted by them, in no small measure due to the ‘taboo’ nature of the very subject in India?
  ——-
  ३. Quote :’एकटी स्त्री म्हणजे सार्वजनिक मालमत्ता असा काहीसा समज असतो समाजाचा.”

  बरोबर. पण याच समाजात पराकोटीचे जातिभेददेखील आहेत. मग त्याला घाबरून मी सोवळं, शिवाशीव इ. पाळायचं का?
  ————-
  ४. लिव्ह इन जोडपी वेगळी झाली, तर पोटगीचा प्रश्न येत नाही हा निर्णय योग्य आहे. लग्न हा एक समाजमान्य संस्कार आहे. त्यामुळे या संस्काराची पवित्रता ही समाजाची जबाबदारी आहे. Live In Relationship हा केवळ दोन जिवांनी केलेला करार आहे, “अलविदा” चा पर्याय नजरेसमोर ठेवून ! मग पोटगी कसली आणि कशाला?
  ———-
  ५.माफ़ी असावी, पण “कीड” हा शब्द शोभला नाही.

  • संजीव
   अभिप्रायासाठी आभार.

   एक गोष्ट आहे . बघा जगात १०० टक्क्यांपैकी जवळपास ३० टक्के तोंडाचा कॅन्सर होणारे हे तंबाखू खाणारे असतात…
   याचाच अर्थ हा ७० टक्के लोकांना तंबाखू न खाल्याने कॅन्सर झाला असे घेता येईल का??

   नाही.. एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टीकोन ठरवतो काय योग्य आणि काय नाही ते..

   तुमचे इतर मुद्दे जसे जातीभेद वगैरे त्यावर तर खूप काही लिहिलं जाऊ शकतं.

 14. संजीव says:

  एक मुद्दा राहिला. बापाचं नाव लावायचं की नाही, हा मुलांचा प्रश्न आहे. त्याची सक्ती कशाला? आईचं नाव लावलं तर कुठे बिघडलं?
  ———
  उत्तर गुजरातमध्ये “मैत्री करार” पद्धत आहे. प्रौढ विधुर आणि विधवा (साधारणतः ज्यांची मुलं संसाराला लागली आहेत अशी) सरळ एक लिखित करार करून एकत्र राहतात. करारामध्ये सगळी कलमं असतात. काडीमोड झाला तर कुणाला काय मिळेल तेही लिहिलेलं असतं. या सर्वाला दोन्ही कुटुंबांची मान्यता अगोदर मिळवली जाते (आणि ती दिलीही जाते). किती सुंदर आणि माणुसकीची पद्धत आहे, नाही? कुठल्याही Live In च्या तोंडात मारेल ! 🙂

  • मुलाला आईचे नांव लावणे .. ठीक आहे, पण त्या मुलाला पुढे आयुष्यात किती कठीण परीस्थितीला तोंड द्यावं लागेल याचा विचार व्हायला हवा.
   समाजात राहून विद्रोह इतक्या सहजासहजी मान्य होईल असे वाटत नाही.

 15. Pingback: घटस्फोट.. | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 16. Mrunal says:

  mazya mate jase vadilanchi nav lavnyachi parmision ahe tasech aichehi nav lavnyachi manyata
  govermentkadun milavi. tasahi kayada asava. ata thyaci farch garaj vatu lagli ahe.

  • मृणाल,
   तशा शासकीय मान्यतेची गरज नाही. अजूनही वाटल्यास कोणीही आपल्या आईचे नांव लावू शकतो . फक्त समाजाचा त्या मुलाकडे पहाण्याचा दृष्टीकोन एकदम बदलतो, म्हणून असे कोणी करत नाहीत.

  • Nachiket says:

   आईचे काय आणि वडिलांचे काय.. नाव लावायचे म्हणजे हा प्रश्न राहणारच. दोघांचीही नावे लावायची तर किती नावे जोडून रेल्वेगाडी वाढवत रहायची?

   त्यापेक्षा सरळ प्रत्येक जन्मलेल्या बाळासाठी युनिक पूर्ण नाव (आय डी असते तशी) निवडावी आणि रजिस्टर करावी.
   कशाला हवा नाव- मधले नाव-आडनाव असा “format” ??

   आत्ता विचित्र वाटेल पण हेच होणार आहे पुढे..बघत रहा..

 17. hemant2432 says:

  Mahendraji
  Baryaach blog-friends ni abhipraay dile aahet ki Live in Relation concept chaanglaa aahe. Mala kharach tyaanaa vichaarave vaatate ki -te swatahachya mulila or swatahachya bahini babaat ha vichaar karuu shakataat kaa?
  Aai che naav aaplya vadilanchya nava sobatach jodane jaasta yogya tharel.
  for reference Shree Sanjay Leela Bahnsali (He is proud to put his mothers name. Great person!)

 18. Smita says:

  swata:chya gharatalya lokanbaddal hach kay puN kuThalahee unconventional samajat acceptance nasalela asa vichar karana hee kaTheenach goshta asate. puN nidan itaranchya choice baddal judgemental tar hou naye. lagech labels kashala lavayachee? apalyala nahee paTat, tar tya pasun swata: dur rahu shakata, aNee gharatalyanna jevadha jamel tevadha dur thevu shakata tumhee.

 19. पुन्हा प्रतिक्रिया देतेय:

  आईचं किंवा वडीलांचं नाव लावणं हा मुद्दा, जर वादाचा केला तरच होऊ शकतो. संजय लीला भन्साळी, किशोर शांताबाई काळे ही आपल्याकडची उदाहरणं आहेत. परदेशातून आलेल्या लिव्ह इन… संस्कृतीचा पुरस्कार जर केला जाऊ शकतो तर परदेशात अपत्यांना आईवडीलांपैकी कुणाचं नाव लावायचं याचं स्वातंत्र्य दिलेलं असतं, त्याचाही पुरस्कार करायला हवा. लिव्ह इन मधे रहाणार्‍या जोडप्याला जर मूल झालं, तर त्याचं त्याने ठरवावं की त्याला पालक म्हणून कुणाचं नाव लावायचं आहे. परदेशात हीच गोष्ट अतिशय सहज घडते. हां, जर लिव्ह इनमधे असताना अपत्य जन्माला आलं आणि नंतर स्त्रीने लग्न केलं, तर त्या मुलाचा बाप म्हणून कुणाचं नाव लावायचं ही जर समस्या असेल, तर कुंती, माद्री, कृष्णकथा यांचा आदर्श ठेवावा की. जैविक (बायोलॉजिकल) बापापेक्षा पालन पोषण करणारा बाप अधिक श्रेष्ठ असतो.

  मी पुरूषप्रधान संस्कृतीविरूद्ध दंड थोपटून उभी आहे वगैरे अशातला भाग नाही पण उपरिनिर्दीष्ट समस्यांचा उगम या मानसिकतेतच आहे. महेंद्रदादांनी एक मुद्दा अतिशय चांगला मांडला. “लग्न न करता रहायचे – फेअर इनफ पण मग त्या पार्टनरला सोडून आणखी कुणाशी लग्न करायचे, ही दांभिकता झाली.” स्वत:च्या शारिरीक सुखासाठी वापर करून घेण्यापलिकडे मग लिव्ह इन… ला किंमतच उरत नाही. पूर्वी ही दांभिकता केवळ पुरूषांमधे दिसायची, तेव्हा स्त्रीला आपल्याला फसवल्यासारखं वाटायचं. तिने लग्न केलं तरी तिला मन खात रहाणं इ. हे प्रकार व्हायचे. कारण पुरूषप्रधान संस्कृतीशी कितीही बंड करून तिने लिव्ह इनचा पुरस्कार केला, तरी ती मानसिकता संपूर्णता मेंदूतून नष्ट झाली नव्हती. आता स्त्रीयादेखील याच व्यावहारिकपणे विचार करताना दिसतात कारण त्या मानसिकतेची तीव्रता कमी झाली आहे पण समूळ नष्ट झालेली नाही. याला आपण लग्नसंस्थेवर अजूनही असलेला विश्वास असं तर मुळीच म्हणू शकत नाही. दुहेरी आयुष्य जगण्यासाठी किंवा नवीन सुरूवात करण्यासाठी पूर्वीपासून उपलब्ध असलेल्या एका संस्काराला इथे सोय म्हणून वापरलं जातं.

  गेल्या वर्षी मुंबई मिरर मधेच एक बातमी आली होती. ६७ वर्षांचा नवरा आणि ६५ वर्षांची बायको यांचा घटस्फोट झाला. यात पुढाकार त्या बायकोचा होता. बायकोने कोर्टात कारण दिलं की “गेली जवळजवळ ३५ वर्षे मी या माणसाच्या लहरी सांभाळते आहे. पण इतक्या वर्षांत मला काय हवं आहे, याचा कधीच विचार झाला नाही. माझा नवरा सधन आहे. मला त्याने पैशा-अडक्याची कधी चिंता करू दिली नाही पण मीही एक माणूस आहे, हे तो विसरलाच होता. आता माझी मुलं खूप मोठी आहेत. माझ्या घट्स्फोट घेण्याने त्यांच्या आयुष्यावर काहीही परिणाम होणार नाही. माझा नवराही निवृत्त झाला आहे, त्यामुळे त्यालाही नोकरी सांभाळून कसरत करत घर सांभाळावं लागणार नाहीये. तेव्हा मला मोकळं जगू द्या.” इतक्या वर्षांत त्या स्त्रीच्या मनात किती साचून राहिलं असेल याचा विचार मी करत होते.

  • Anita says:

   Hello Kanchan,
   tuze vichar vachale ani vatale, chala konitari aaplyasarkhe aahe…………Tu ekdam barobar bolalis……jevha 65vya varshi konitari divorce ghet asel tar tya baene kiti sahan kele asel ha vichar tari koni karen ka?
   Tiche sukh he mahatvache nahi ka?
   Ka ayushyabhar pahilyanda navara ani nantar mule yanchysathi tine sagle karave?

 20. Ravindra says:

  I think irrespective of what kind of a relationship it is, the most important factors are love for each other, commitment towards the relation and being practical about it. As the constitution has already laid down the rules in case of a divorce, I think people going in for a ‘live-in’ relationship should first enter into a contract (without even thinking, ki tyala/tila kaay vatel or majhyavar vishwas nahi ka etc etc), with clear terms for a graceful exit for both the parties. Now that both of them know clearly what will happen in case of breakup, the ground realities will be clear for both of them.

  I had a friend in Europe who was getting married, after 7yrs of ‘live-in’, worrying more about the terms of the contract that they needed to sign than the actual preparations for the wedding :). Very practical I should say.

  As far as the question of having the mothers name of fathers name, it should be left to the individual to decide once he grows up.

 21. santosh Deshmukh says:

  काका , इन औटची भानगड त्यांची की खरच ज्यांना समाजाशी काही घेणे देणे नसते .. वरून ते एक नवीन उदाहरण बनतात आता कपूर भगिनीचेच पहा त्यांना न वापरलेली गोष्ट वापरयची सवयच नाही. पांढरी पावडर मीठ नसते तसं खारट आहे म्हणून ते मीठच असायला हवे असही नाही चाखा नी ठरवा ……..वाटीने खाऊ नका
  मेट्रोत आलंय ,भीती वाटते गावाकडे ही येईल पण काय करणार ? पाण्याचा ओघळ शेवटी लवण्याकडे येणारच

 22. Pratham says:

  Hya Live-in walyaanee Alan Rickman cha udaharan dolyasamor thevala tar faar uttam.

  Rickman is a one-woman man. He has had the same girlfriend for more than 40 years – Rima Horton, an economics lecturer at Kingston University.
  Source: http://living.scotsman.com/features/A-man-for-all-seasons.2796621.jp

  Now that’s commitment.

 23. Hi,

  We have shortlisted this article for Netbhet eMagazine Nov 2010. We seek your permission for incorporating this article in magazine.
  Please provide your full name and email id.
  Please write to salil@netbhet.com or call Salil Chaudhary – 09819128167 for more information.

  Regards,
  Sonali Thorat
  http://www.netbhet.com

 24. Avinash Digambar Hanchate (Bhavsar) says:

  barech veles pahilya stri sudha purushala lagna nantar vishwas ghat karte. lagna nantar baykola shikvile ani tine payavar ubhi rahilyavar dusrya pursha barobar sambadh suru kele.yevadech nahi tar ek mulga astana tyacha sudha vichar na karta tine par purshabarobar rileshan kele. navryalla sodnyacha hi vichar kela.kay chukle navryache?- kay tyane shikvayla nako hote baykola,stri shikshnacha mla hi agrah ahe,pan ase hot asel tar kon baykola shikvinar…?

  • अविनाश
   चूक कोणाची हा प्रश्न नाही, पण घटस्फोट असावा की नाही हा महत्त्वाचा प्रश्न पडला होता. काय झालं असेल की १५ वर्षानंतर घटस्फोट घ्यावासा वाटला असेल बर? म्हणून हे पोस्ट लिह्ले.

 25. Priyanka nikalje says:

  Maje jabrdstine lagn zale hote me tri pn tya vyktisobt rahaycha prytn kla pn mla nahi jmle me ek varsh zale tyajya sobat nahi rahat. Mla sodchitthi havi aahe pn to det nahi ani natyat lagn zalyamule vadil mhntat case nahi kraychi tyanchyavr pn to tr sodchitthi det nahi. Ata me as kay krave ki tyane mla sodchitthi dyavi.

 26. pankaj says:

  maze lagan houn 7 mahine zale ahe. ek divas mazi aai tv pahat basli pan pictur changla hota 10 pm time hota me driver aahe mi gaadi chalvun aalo hoto ratricha gaadi ne problem dila tari pan me patni sathi ratricha divas kela pan tine 10 pm lach aai tv baghat astana tv cha chanel badli karun sangetale ki piture samplay mala te sahan zale nahi mala ti 1 tas mhanat hoti ki aai la udhaun lay pan tila mi sangitle ki tu zop ti piture sampla ki jain pan tine chanel badali kela remot hatatun het hoto mhanun tile mala nakhane rakt kadhale mala sahan zale nahi aani me gila kanakhali lavali nantar tine kamalch keli mala mazya aai vadilana ulat bolli ani tichya aai vadilana bolaun khup bhanfane keli khartar ti mazya aai vadilanvhi kapdepan dhuat nahati…… ti mazya mana virudha nehami vagte…… mala vattay ki mi malach sampvave karan me aai vadilana suneche sukh deu sbkat nahi…… maze sasu sasre mala marnyachi dhamki detayet……. boyko tar aai che ekum amhala khup tras detiy….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s