लहानशी गोष्ट….

रोहन.. नुकताच ऑफिसमधून घरी आला होता. आल्याबरोबर हातातली लॅपटॉप ची बॅग नेहेमीच्या सवयी प्रमाणे  सरळ समोरच्या सोफ्यावर फेकली आणि सोफ्यावर बसूनच बूट काढणे सुरु केले. अपेक्षेने नेहाकडे पाहिले, की आता ती ओरडेल – “अरे बूट बाहेर काढून मग घरात ये…. लॅपटॉपची बॅग जागेवर ठेव.” पण आज काय झालं होतं कोणास ठाऊक? तिने रोहन कडे पुर्ण दुर्लक्ष करून, तिने स्वतः  त्याची लॅपटॉप ची बॅग उचलून जागेवर ठेवली.

खरं म्हणजे नुकतंच लग्न झालेलं होतं दोघांच, फार तर दोन वर्ष झाले असतील. लग्न झाल्यापासून दिवस कसे मस्त मजेत जात होते दोघांचेही. ऑफिस संपलं की बाहेर फिरणं, सिनेमा, नाटकं.. सगळी मज्जा मज्जा सुरु होती. तसं म्हंटलं तर रोहन पुण्याचा.. आणि नेहा पण पुण्याचीच. दोघांचेही आईवडील पुण्यालाच, त्यामुळे मुंबईला फक्त दोघंच रहायची. ठरवून झालेलं लग्नं, त्यामुळे दोघांनाही एकमेकांना समजून घ्यायलाच थोडे दिवस  सुरुवातीला अनोळखी इसमा  बरोबर रहायचं म्हणजे थोडं अवघडल्यासारखं झालं होतं नेहाला, पण लवकरच दोघांनाही एकमेकांची सवय झाली. आणि आज तर अशी परिस्थिती होती की दोघांचंही एकमेकांशिवाय पानही हलत नव्हतं.

काही गोष्टींची सवय झालेली असते. एखाद्या प्रसंगी बायकोने कसे वागावे? किंवा नवऱ्याने कसे वागावे याचे आराखडे मनात तयारच असतात. एखाद्या दिवशी मस्त पैकी नाटकाला किंवा सिनेमाला जायचा प्लान करावा आणि नेमकं ऑफिस मधेच काहीतरी महत्वाच काम निघावं, असं हल्ली बरेचदा व्हायचं. पण करणार काय?? प्रेम वगैरे ठीक आहे हो.. पण पोटासाठी पण बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. आज तर रोहनला अगदी खात्री होती की उशीरा घरी आलोय म्हणून घरात महाभारताचा पहिला अध्याय होणार! पण आजचं नेहाचं वागणं अगदी त्याच्या अपेक्षे विरुद्ध! काय झालं असेल बरं आज? रोहन मनातल्या मनात विचार करू लागला. मुंबईकरांच्या सवयी प्रमाणे रोहन पायातले सॉक्स काढून सरळ बाथरूममध्ये आंघोळीला पळाला. फ्रेश होऊन बाहेर येतो तर समोर चहाचा वाफाळलेला कप घेऊन नेहा उभी होतीच.

“सावध हो मित्रा, सावध!” त्याच्या सबकॉन्शस माईंडने त्याला सावध केले. रोहन सोफ्यावर बसला आणि आता काय बॉम्ब फुटणार याची वाट पाहू लागला. रोहन आपली मानसिक तयारी करून बसला होता… आता ती जे काही सांगेल ते ऐकून घेण्याची मानसिक तयारी! नेहा हळूच त्याच्या मुडचा अंदाज घेत समोर बसली आणि म्हणाली “आज किनई आईचा फोन आला होता.” चहाचा घोट तोंडात होताच; एकदम ठसका लागला रोहनला . “कशासाठी आलाय फोन? काय झालं??”

“लहान बहीणीचं लग्न ठरलंय.’ इती नेहा.

“बापरे!” उत्स्फुर्तपणे उद्गार निघाले रोहनच्या तोंडून आणि ‘अरे, अशी प्रतिक्रिया द्यायला नको.’ म्हणून लगेच म्हणाला, “इतक्या लवकर? अजून लहानच आहे ती!” आणि वेळ मारून नेली.”

त्याला आठवलं, एक वर्षा पूर्वीचीच तर गोष्ट आहे. तिची आई आली होती आणि म्हणाली होती की, “आता अधिक महिना आहे, म्हणून नेहाला माहेरी घेऊन जाते.” मोठ्या मुश्किलीने एक महिन्याचा प्लान १५ दिवसावर आणला होता. “या वेळेस किती दिवस?” कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं होतं रोहनच्या. काही न बोलता तो चहा संपवण्याचा मागे लागला. तशी नेहा होतीच सुंदर, आता समजा पुन्हा महिन्याभरासाठी नेलं तिला तर उगाच काहीतरी प्रश्न डोक्यात येत होते रोहनच्या. तिला सरळ विचारायची पण हिम्मत होत नव्हती की, “का गं बाई? किती दिवसाचा प्रोग्राम आहे या वेळी”? मागच्या वेळ प्रमाणे एकदम न चिडता, त्याने शांतपणे चहाचा कप बाजूला ठेवत तिला विचारले ” अवश्य जा, तू जायलाच हवंस. अगं, शेवटी तुझ्या सख्ख्या बहिणीचं लग्नं आहे घरी.” नेहा विचारात पडली. “अरे मला पण खरं तर जायची इच्छा नाहीच, पण काय करणार जावं लागेलच.” नेहाला वाटत होतं की रोहनने आपल्याला थांबवावं, आपली मनधरणी करावी, की तू जाऊ नकोस म्हणून. पण रोहन मात्र अगदी स्थितप्रज्ञासारखा बसला होता. तिला थोडी काळजी वाटली, “ही वादळापूर्वीची शांतता तर नाही नां?”

नेहा स्वयंपाक घरात गेली आणि स्वयंपाकाला लागली. रोहन नेहेमीप्रमाणेच मागे मागे आला आणि तिच्याजवळ घुटमळू लागला. पण त्याच्या वागण्यात नेहेमीचा सहजपणा नव्हता. रोहनला घडीच्या पोळ्या लागायच्या, पोळ्यावाल्या बाईंच्या हातचे फुलके त्याला अजिबात आवडत नव्हते. अजून तरी वजन आटोक्यात आहे, म्हणजे थोडं वाढलंय म्हणा लग्नानंतर, पण तेवढं तर होणारंच! शेवटी सुख मानवतच ना माणसाला- लग्नापूर्वी ५९ किलॊ असलेला रोहन आता चांगला ६५ किलो झालेला होता.

तिचे विचार चक्र सुरुच होते. आपण गावाला गेल्यावर त्याचे कसे होणार? बाईंच्या हातची भाजी तर अजिबात आवडत नाही त्याला. कसं मॅनेज करेल तो? पूर्वी पण म्हणजे लग्नापूर्वी एकटा रहायचाच नां.. त्याला काय फरक पडतो? मस्त पैकी स्वयंपाक बनवेल आणि खाईल आपला घरीच. पण त्याला स्वयंपाक येत नाही, हा पण तर एक प्रश्न आहेच!! तिच्या शेजारी किचन टेबल वर दररोजच्या प्रमाणे रोहन उभा होता – आणि कोशींबीरीचा कांदा चिरत होता. कांद्याटोमॅटॊची दाण्याचं कुट घालून केलेली कोशिंबीर त्याला खूप आवडायची आणि हे दररोजचं चिरण्याचं काम पण त्याचंच होतं. कांदे चिरल्यामुळे डॊळ्यात आलेलं पाणी पुसुन टाकलं त्याने.

जेवतांना पुन्हा नेहाने विषय काढला की उद्या दादा येणार आहे न्यायला. रोहन शांतपणे म्हणाला की ठीक आहे , “अवश्य जा तू” पुन्हा तोच डायलॉग – “तुझ्या बहीणीचं लग्नं आहे ना? तू तर जायलाच हवं…” नेहा आता मात्र वैतागली.. अरे हे चाललंय काय? हा माणूस खरं खरं मनातलं का बोलून टाकत नाही? कां बरं असं विनाकारण छळतोय हा?? एकदाचा ओरड, चिडचीड कर, मनातली सगळी आग ओकून टाक, म्हणजे तुला पण बरं वाटेल आणि मला पण. परंतु रोहन मात्र अगदी ढीम्म बसला होता. काहीच प्रतीक्रीया न देता! समोरचा माणूस जेंव्हा मनातलं न बोलता कुढत बसतो तेंव्हा दुसऱ्या माणसाला खरंच वैताग येतो. काही न बोलता तिने पानं घ्यायला सुरुवात केली. दोघंही अगदी काहीच विशेष झालेले नाही असे वागत होते. **********

पेल्यातली वादळं पेल्यातच शमतात. तशीच नविन लग्न झालेल्यांची भांडणं पण पाच सहा तासात संपून जातात. इथे तर भांडण पण झालेलं नव्हतं 🙂 टीव्ही लाऊन बसले दोघंही. नेहाला शेवटी रहावलं नाही. म्हणाली, “तू घरी कंटाळशील ना? “कंटाळा आणि मला?? तो का बरं? मी आपला मस्त मजा करीन घरी.” “म्हणजे तुला कंटाळा येणार नाही? अरे तुला जेवणात इतक्या व्हेरायटीज लागतात, कसं होईल तुझं?” ” त्यात काही विशेष नाही, मी करीन मॅनेज. एकच महिना तर आहे ना? ठीक आहे. तू जा लग्नाच्या तयारीला, मी माझा स्वयंपाक करीन नाहीतर कधी कंटाळा आलाच तर बाहेरून फोन केला की घरपोच डबा येतोच.” ”

“वा…..रे…….वा… ! म्हणे करीन मॅनेज. तू कसला करू शकतोस मॅनेज? रोजचं बाहेरचं खाणं तुला आवडणार तरी आहे का? काहीच्या काहीच बोलतोय तू.”

“विश्वास बसत नाही की मॅनेज करू शकेन म्हणून?? चल लागली आपली पैज, तू जाऊन ये माहेरी, आणि तू येई पर्यंत माझं वजन कमीत कमी एक किलो तरी वाढलेले असेल, आणि ते वाढलेले वजन हेच माझ्या निट राहील्याचा पुरावा असेल बघ”

“नेहा चपापली, आणि थोडा विचार करून म्हणाली, की चालेल, पण शर्यत कसली लावायची??” रोहन ने हळूच तिच्या कानात काहीतरी सांगितलं, आणि ती म्हणाली “चल हट.. काहीतरीच काय बोलतोस?” पण शेवटी स्वतःच्या जिंकण्याची नेहाला पूर्ण खात्री होती.

“तर ठरलं.. मी जाईन दादाबरोबर आणि एक महिन्यानंतर जेंव्हा घरी येईल तेंव्हा तुझं वजन एक किलो वाढलेले असेल – ठिक?? ” लेट्स सिल द डील…. रोहन म्हणाला.

************************

होता होता एक महिना गेला. नेहाच्या बहिणीचं लग्न झालं, लग्नात पण जावईबापू म्हणजे (रोहन) ची पण खूप वर वर केली गेली. रोहन एकदम खूष होता. तो परत आला मुंबईला, पण नेहा मात्र सगळं मागचं आवरायला म्हणून दोन दिवस थांबली एक्स्ट्रॉ तिथेच! रोहन परत मुंबईला आला. आता दोन दिवसांनी नेहा येणार, सगळ्या घराचा पार उकिरडा झालेला होता. महिन्याभरात घर आवरणे हा प्रकार केलाच नव्हता रोहनने. शेवटी सगळं घर स्वच्छ केलं, बेड वरची चादर बदलली, सोफ्यावरचे कुशन कव्हर्स बदलले, भांडी लावून ठेवली जागेवर आणि अशी अनेक फुटकर कामं संपवली.

सकाळची ९ ची वेळ . नेहाची ट्रेन येणार म्हणून तिला घ्यायला रोहन निघाला. सकाळी उठून घोटून केलेली दाढी, तिच्या आवडीचा पर्पल शर्ट आणि काळी पॅंट,कंबरेला वेस्ट बेल्ट ( रोहनला वेस्ट पाउच खूप आवडायचा , बरंच सामान मावतं त्या मधे म्हणून) घालून , दादर प्लॅटफॉर्म वर रोहन उभा होता.नेहा ट्रेन मधून उतरली , रोहन पुढे गेला आणि तिची बॅग हातात घेतली . प्रवासाने थकली होती ती, पण तीचे डोळे मात्र रोहनच्या वजनाचा नजरेनेच अंदाज घेत होते.

*************************

घरात शिरले दोघंही जण आणि सामान ठेवलं आणि नेहाची नजर आपल्या गैरहजरीत काय काय वाट लावून ठेवली आहे घराची या कडे नजर फिरू लागली. सगळं काही जागेवर बघून तिला खरं तर खूप आनंद व्हायला हवा, पण तिला मात्र काही फार बरं वाट्ल नाही. तिची अपेक्षा होती की घरामधे ती नसल्याने घराची पार दैना झालेली असेल, पण तसं दिसत नव्हतं. घर स्वच्छ आहे म्हणून आनंद मानावा? की आपली कमतरता भासली नाही म्हणून दुःख व्यक्त करावं? काहीच लक्षात येत नव्हतं. तिने रोहनचा हात धरला, आणि त्याला ओढत बाथरूम कडे घेऊन गेली आणि त्याला बाथरूम स्केल वर उभे केले.रोहन पण हसत हसत त्या स्केल वर उभा राहिला. आणि वजन पाहिले. चक्क एक किलो वाढलेले दिसत होते वजन..

नेहाचा चेहेरा खर्रकन उतरला आणि ती एकदम रागारागाने पलंगावर पालथी पडली आणि रडू लागली. रोहनला तर आपण काय करावं तेच सुचत नव्हतं. आपण तर काहीच केले नाही? मग का रडते आहे ही??

त्याने हलकेच तिच्या खांद्यांना स्पर्श केला, तर तिने त्याचा हात झटकून टाकला. ” जाउ दे, तुला माझी काही गरजच नाही, मी असले काय आणि नसले काय? तुझं मस्त सुरु आहे सगळं काही. पहा ना, मी इथे एक महिना नव्हती तरीही तुझं वजन वाढलेलं. म्हणजे थोडक्यात काय तर माझं अस्तित्त्व तुझ्या जीवनात अगदी कवडीमोलाचे.” रोहनला आता मात्र चांगलंच हसू येत होतं, आणि त्याच बरोबर त्याला पण काय करावं ते सुचत नव्हतं,

त्याने तिला म्हटल इकडे तर बघ, पण नेहा मात्र अजिबात पहायला तयार नव्हती रोहन कडे. मी आपली माहेरीच जाते बघ, आता म्हणून सरळ झाली आणि उठून बसली. रोहन च्या चेहेऱ्यावरचे मिश्किल भाव तिला अजून चिडवत होते, आणि रागाचा पारा अजून वाढवत होते.

रोहन म्हणाला आता जादू बघ, तुला मी एक जादू दाखवतो. आणि तो त्या स्केल वर उभा राहिला, म्हणाला, “वजन बघ माझं…” तिने डॊळे पुसत वर  पाहिले, म्हणाली, “मला नाही पहायचं तुझं वजन,  माहीती आहे तू जिंकलास शर्यत!!”

रोहन म्हणाला, अगं  आता बघ पुन्हा एकदा, आणि त्याने पायातले बूट काढले आणि पुन्हा वजनाच्या स्केल वर उभा राहिला, वजन चक्क पाउण किलो ने कमी झालेले होते. नेहाच्या लक्षात आलं की त्याने आपले इंडस्ट्रीअल शूज ( स्टिल टो वाले, जे तो नेहेमी माइन्स मधे जातांना वापरायचा ते) घातले होते, म्हणजे त्या बुटांचंच वजन चक्क पाऊण किलॊ आहे की..!

“आता दुसरी जादू बघ” असं म्हणत त्याने कंबरेचा पाउच काढून ठेवला बाजूला, आणि पुन्हा त्या बॅलन्स वर उभा राहिला. वजन चक्क एक किलो कमी झालेले दिसत होते. म्हणजे शर्यत हरला की तो! ……नेहाचा विश्वासच बसत नव्हता. तिने ती पाऊच उघडली आणि पहाते तर त्यामधे तिने आवडीने घेतलेला आयफेल टॉवरचा मेटॅलीक पेपर वेट तिच्याकडे पाहून वेडावत होता.

आता मात्र नेहा एकदम उठली आणि त्याला बुक्क्यांनी छातीवर मारू लागली, तू म्हणजे अगदी दुष्ट आहेस………. आणि त्याला न जिंकलेल्या शर्यतीचे बक्षिस पण द्यायला तयार झाली..

*****************

….बरेच दिवसापासून थोडं सिरियस लिखाण सुरु होतं म्हणून हा एक वेगळा प्रयत्न! मला कथा वगैरे नीट लिहिता येत नाही, पण तरीही ..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , , , . Bookmark the permalink.

96 Responses to लहानशी गोष्ट….

 1. स्नेहल says:

  खूप छान आहे लिखाण काका, जरा तरुण काकांनी लिहिलेले लिखाण वाटते आणि खूप जिवंत. मस्तच लिहिलंय

  • म्हणजे ??? तूला काय म्हणायचंय मी म्हातारा झालॊ की काय????? 🙂 😀

   • Nitin Potdar says:

    Mahendra,

    Hope you are doing well and fine! Where are you? You write really well on your blogs. Keep writing.

    Regards,

    Nitin Potdar

    • नितिन,
     प्रतीक्रियेसाठी मनःपुर्वक आभार.
     सध्या तरी मुंबईलाच आहे. काही पर्सनल प्रॉब्लेम्स मुळॆ थोडा बिझी आहे..
     सधन्यवाद..

 2. आल्हाद alias Alhad says:

  मस्त मस्त मस्त!

 3. aman says:

  bhakshish kay hota

 4. Sushant says:

  touching…. mast 🙂

 5. kalyani wagh says:

  waw kaka agdi jivant likhan kelay swapnat ramnyasarkh.

 6. tejas says:

  mastch…

 7. सचिन says:

  झकास

 8. sumedha says:

  solidddddddd…….

 9. काका मस्त.
  एक एक फुंडे असतात नुसते. ह्या मुलींना माहेरी जायचं तर असतं पण आपल्यावाचून नवर्‍याचे करमते हे ही सहन होत नाही. नवरे मंडळींनी करायचे तरी काय? सगळ्या जणी एक किलो वजन वाढवण्याच्याच पैजा लावून जातील असे नाही. 😉

 10. Nachiket says:

  aavdesh…lucky couple..

 11. mau says:

  zakaaaaaaaasssss !!!

 12. मी फक्त स्मित करतोय पोस्ट वाचून 🙂

 13. jyoti says:

  kuhp chaan, mastch

 14. kajal says:

  khupach chhan aahe aavadli mala

 15. अहा !! कसली झालीये कथा काका.. एकदम मस्त हलकीफुलकी… आज सकाळी खूप लवकर आलोय हापिसात.. सकाळी सकाळी तुमची एवढी मस्त कथा वाचून दिवस सही जाणार एकदम 🙂

 16. वाह वा! वाह वा! छान आहे कथा. 🙂 एकदम रोमँटिक. बर्‍याच गंभीर लिखाणानंतर ही कथा वाचायला छान वाटलं एकदम.

 17. Ajit Ghodke says:

  Sundar, halkiphulki katha.. mast jamaliye!

 18. कथा सुंदर आहे. असुरक्षिततेच्या भावनेतून पहिल्या काही वर्षांत असं होतं खरं. नंतर नंतर आपसूकच आपलं माणूस कसं आहे हे माहित होत जातं.

 19. महेश says:

  सुंदर ,अप्रतिम ,चाबूक ,सही ,

 20. हेमंत आठल्ये says:

  खुपंच सुंदर कथा. तुम्हाला एखादी कादंबरी सहज लिहिता येईल. जमवा..

 21. Pingback: लहानशी गोष्ट…. | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 22. mipunekar says:

  as usual layi bhari…

 23. खुपच भारी…लगे रहो महेंद्रजी…

 24. santosh Deshmukh says:

  काका , लिहिलंय ते खूपचं!!!!!!!!! वाचायला बर वाटते पण आमचासाठी ते स्वप्नागत कधी कधी गावाकडच्या लोकांकरताही लिहा घरात नऊ माणसे नी एक बाथरूम कस करायचं ?

 25. Smita says:

  Just curious: rohan mines madhye jayacha- industrial shoes ghalun? aNee laptop puN vaparayacha?koNata job asel ha? I know this is beside the point of the story, but could not help wondering out loud.

 26. Prasad says:

  kaka,,,,,,,,,, Masta Masta Masta…!! >>Chan Chan<<

 27. jyoti ghanawat says:

  mastch lihlay kaka…… तुम्हाला एखादी कादंबरी सहज लिहिता येईल. जमवा….. +++++++++++ 🙂 🙂

 28. hemant2432 says:

  Mahendraji
  It goes without saying ” Surprises add punches to the life”.
  Evdhi chhan halki-fulki a khup romantic gosht lihinaaraa manus kharya aayushaat nakkich romantik asanarach!

 29. sneha says:

  Wow! So cute.. God couple aahe ekdum. Kaka, mast jamlay. Amcha hi aata asach jhalay. Me jatey maheri 10 diwas, sangitlyavar lagech patidevancha chehra padla. N mag usna hasu aanun, ho nakki jaun ye, me mast enjoy karto ikde vagaire 😀

 30. Nisha says:

  Far chan aahe post – navra baykochya natyatil eka pailuche chan varnan aahe

  Mahendrakaka (sagale mhantayt mhanun mi pan mhanatey 🙂 mala tumcha blog khup aawadala – hallich follow karatey – Lekhan shaili sundar + vichar changale + bhavanechi jod yamule mala tumche lekh khup aawadtat
  Mi australia la asate with Hubby here since marriage almost more than 2 years

  • निशा
   ब्लॉग वर स्वागत. बहूतेक सगळे ब्लॉगर्स तीशी पसतिशीतले आहेत आणि मी एकटाच पन्नाशीतला असल्याने सगळे मला काका म्हणतात, आणि मला पण ते आवडतं ( स्त्रीयांना काकू म्हंटलेलं फारसं आवडत नाही, पण पुरुषांच तसं नसतं बरं का!!) .
   प्रतीक्रियेसाठी मनःपुर्वक आभार..

 31. छोटी पण खूप छान आहे…

 32. ऋषिकेश says:

  as usual mast ahe…!!

  Sadhya hi pan maherich geli ahe… tyamule sadhya mast ahe.. [;)]

 33. मालोजीराव says:

  आहा हा काका एकदम फ्रेश वाटलं, बऱ्याच दिवसांनी इतका हलकं फुलकं वाचायला मिळालं, शेवट बाकी छान गोड केलाय !
  कसाकाय सुचत इतक्या कामाच्या व्यापातून बुवा !

 34. दादा, सुंदर कथा, आवडली 🙂

 35. Ganesh says:

  सही!!!!!

 36. Prachi says:

  समोरचा माणूस जेंव्हा मनातलं न बोलता कुढत बसतो तेंव्हा दुसऱ्या माणसाला खरंच वैताग येतो.
  Very true..!! kharach khup khup raag yeto mag.. 🙂

 37. रोहन says:

  आयला दादा.. लास्ट टाईम पण कथा लिहिली तर रोहनच होता… 🙂

  पण हा…. ‘तो मी नव्हेच.’ माझे वजन ७० च्या पुढे आहे… हा हा हा 😀 … स्टोरी जबरी.. आवडली… 🙂

 38. नवीन मित्र- मैत्रीणींचे हार्दिक स्वागत – आणि प्रतिक्रियेसाठी सगळ्यांचेच मनःपुर्वक आभार. बरेच दिवसानंतर कथा लिहीण्याचा प्रयत्न केलाय. .

 39. Rajeev says:

  अरे अरे…. अरे…
  तूला काय झाले आहे ?ताप आहे का ?नाही ना ?
  का चखणा १९७०/७२ चा माहेर /सासर माहेर दिवाळी अंकात बांधून आणला होता?

 40. milind says:

  changle hote likhan avadle sarvachya garat asech chalte bayko maheri geli ki hi sarvanche vajan kami hote pan kahi janache apvad sodale tar

 41. SANGEETA BORKAR says:

  KHUP KHUP KHUP SUNDER, MAST LIHILE AHE, LIKE A GHARCHA PRASANG

 42. Maruti says:

  अगदी जणू खरे जीवनाचा उताराच असावा.

 43. Mrs. Sadhana Raje says:

  Hi Sir,
  Khoop chan katha aahe, ajun katha liha chan lihita

 44. रमेश म्हात्रे says:

  नेहमी प्रमाणे उत्तम लेख.

 45. Swati says:

  khup chhan…………….
  lagna nantarche khare chitra…………
  doghanchyahi manatil vichar……… ekmekanshi na bolalele

 46. wha chan vajan kami zalamule tiche thacha samor vajan vadale

 47. Rohit says:

  khup chan ahe………………….

 48. nishikant says:

  khup chhan…………….

  Chhan ahe. Avadali.

 49. nishikant says:

  khup chhan……………. Avadali.

 50. madhavi says:

  khup chan! ekdum heart touching !

 51. Mansi Mahesh Rajwadkar says:

  Hi,

  Khupch chan aahe katha. Pan Bakshis kay hot??????????? Far aawadali mala.

 52. deepali says:

  mast mast mast…………..

 53. Rajendra says:

  mast

 54. Tamanna says:

  khup chaan mala khup avadle very good

 55. laxman says:

  khup chhan Avadali
  >>>>>>>>>>>>>@

 56. Avinash A.Gurav says:

  ati sundar lai…… bhari ekadam jhak !!

 57. krupali says:

  khup masat

 58. Anup says:

  mastach………………

 59. Rajesh Lokhande says:

  Ekdam Zakkas Katha

 60. MANISH BHANDARI says:

  HI I AM MANISH THATS NICE STORY I LIKE THAT TYPE OF STORIES KEEP IT UP

 61. Shweta Nare says:

  “रोहन & नेहा” made for each other couple आहे वाटत… 😉

  तुमच्या प्रत्येक कथेचे नायक-नायिका.. 🙂 🙂

 62. pramod sane says:

  khup chan aahe………….pan ha shevat nhi as vathay…..mala khup avadel pudach vachayala

 63. Archana says:

  apratim likhan aahe ……….very nice

 64. suhas adhav says:

  ekdam saras mahendraji 🙂 vachtana agdi serial pahilyasarkha vatla ekdam jivanta varnan
  tumchya lekhan koushalyavarun tumhi enginner peksha ek sundar lekhak vata … 🙂

 65. तनुजा says:

  १ नंबर होता लेख…
  दोघेही खूप जवळचे वाटले 🙂

 66. Pooja Shukre says:

  khup mast mast mast… ekdam sadhya sopya bhashet lihilela pan tari manatle olakhanare ani manala bhavanare vatale. I liked it so much

 67. katkar chandrakant says:

  very nice story

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s