आकाश कंदील.. पुन्हा एकदा..

आकाश कंदील

मागच्या वर्षीच्या आकाश कंदीलाचा सांगाडा

आकाशकंदील बनवणे म्हणजे माझा आवडता  उद्योग. अशी एकही दिवाळी गेली नाही की ज्या मधे मी किल्ला आणि आकाशकंदील बनवला नाही . मध्यंतरी बराच काळ म्हणजे जवळपास २० -२५ वर्ष तरी आकाशकंदील बनवणे बंद झाले होते, ते मागल्या वर्षीपासून पुन्हा सुरु केले. मुंबईसारख्या ठिकाणी आकाशकंदील बनवण्यासाठी रॉ मटेरीअल ( म्हणजे बांबूच्या काड्या वगैरे)  कसे मिळवले ते मागच्याच वर्षीच्या पोस्ट मधे लिहिले आहे. ” मी आकाशकंदील बनवतो त्याची पोस्ट ” इथे आहे.

तर या वर्षी पण आकाशकंदील बनवायचा ठरवले. एका रविवारी धाकट्या मुलीने आठवण करून दिली   की दिवाळी जवळ आली आहे, आणि   माझ्या पण लक्षात आलं, की आता पासून सुरुवात केली तरच आकाशकंदील वेळेपर्यंत  पुर्ण होईल.  माळ्यावर टाकलेला मागच्या वर्षी बनवलेला आकाशकंदील  आठवला आणि तो बाहेर काढला .   त्याचा लावलेला कागद खूप खराब झाला होता, म्हणून मग सगळा कागद काढून टाकल्यावर  त्यावर नवीन कागद बसवावा का? की  हा आकार मोडून दुसरा एखादा आकार बनवावा? असा विचार केला. वेळ पण भरपूर होता, आणि काड्या पण होत्याच .. मग आहे त्याच काड्या वापरून दुसरा आकार बनवण्याचे ठरवले.

नविन आकाशदिव्याची फ्रेम

लहानपणी तीन आकाराचे आकाशकंदील बनवता यायचे मला. त्यापैकी एक चांदणी तर बनवून झाली होतीच.. आता शिल्लक होते ते विमान किंवा  षटकोनी डायमंड. या षटकोनी डायमंड  ( चार बाजुला चार कोन , एक वर आणि एक खाली असे सहा कोन )मधे बनवतांना आत मधे बल्ब आणि होल्डर लावावे लागते, आणि एकदा बनवला, की आतला बल्ब बदलता येत नाही. म्हणून त्याचा खालचा कोन न बनवता पंचकोनी बनवायचे ठरवले.

आकाशकंदील बनवणे= घरभर कचरा करणे

जुन्या आकाश कंदीलाच्या सगळ्या काड्या सुट्या केल्या आणि सम आकाराचे तुकडे कापून एक बेसीक स्ट्रक्चर तयार केले. या वेळेस काड्या जरा लहान पडल्याने आकारात सफाई आली नाही. पण स्वतः करण्याचा आनंद हा विकतचा आकाशकंदील  लावण्यापेक्षा खूप  जास्त असतो,  म्हणून आहे त्यात समाधान मानून आणि  कॉम्प्रोमाइझ करून एक स्ट्रक्चर बनवले. वर कागद कुठला लावायचा हा प्रश्न होताच. शेवटी जिलेटीन चे लाल रंगाचे आणि भगव्या रंगाचे फ्लुरोसंट कागद आणले आणि त्रिकोणी आकाराचे तुकडे कापून चिकटवण्याचे चिकट ( की किचकट?) काम  संपवायला जवळपास तीन तास लागले. आणि शेवटी एकदाचा आकाशकंदील तयार झाला.

शुभ दिपावली....बऱ्याच लहानपणीच्या गोष्टी आपण पुन्हा जेंव्हा करतो, तेंव्हा एक निराळाच आनंद देऊन जातात त्या  गोष्टी, आणि सणाचा आनंद द्विगुणित करतात.  तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन हे पोस्ट संपवतो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सण and tagged , , . Bookmark the permalink.

45 Responses to आकाश कंदील.. पुन्हा एकदा..

 1. वाह मस्तच..मलापण खूप खूप आवडत कंदील बनवायला 🙂
  तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभ दिपावली…

 2. स्वत: आकाशकंदिल बनवून लावण्याचा आनंद काही निराळाच! तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • कांचन
   धन्यवाद.. या वर्षी काड्या कमी पडल्या, जर थोड्या मोठ्या असत्या तर जरा जास्त व्यवस्थित झाला असता. पण स्वतःच्या हाताने केल्याचे समाधान मात्र नक्की मिळाले.

 3. Dipak Shinde says:

  एकंदरीत “क्रीएटीव्ह” पोस्ट. असंच काही तरी क्रीएटीव्ह शिकवणार्‍या पोस्टही लिहा.. म्हणजे थोडं हटके लिखाण होईल… आणि आम्हांलाही नवीन शिकायला मिळेल.

  आपणांस आणि कुटुंबियांना ही दिवाळी सुख-समॄद्धी आणि भरभराटीची जावो!

  • दिपक
   माझी धाव फक्त आकाशकंदीला पर्यंतच. इतर काही फारसं येत नाही. पुर्वी किल्ला बनवायचो, पण आता जागा पण नसते, आणि मुलांना पण फारशी आवड नाही…
   शुभेच्छांसाठी मनःपुर्वक आभार.

 4. वा काका, छान दिसतोय आकाशकंदील! मला पण आता प्रेरणा मिळाली आहे. फार वर्ष झाली हाताने आकाशकंदील बनवून. आता पुढल्या वर्षी मी पण घरीच करेन, या वर्षीचा तर लागला 🙂

  • पल्लवी
   पुढल्यावर्षी नक्की प्रयत्न कर. खरंच मस्त मजा येते बनवायला. घरच्या सगळ्यांना कामाला लावायचं.. 🙂

 5. सोनाली केळकर says:

  महेंद्रकाका,
  किती सुंदर बनवलाय आकाशकंदिल. एकदम छान.
  तुम्हाला सगळ्यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • सोनाली
   तुला, कॅपीटल ए आणि स्मॉल ए ला पण दिवाळीच्या शुभेच्छा. हेरंबाच्या ब्लॉग वरचं पोस्ट वाचलं की नाही??

   • सोनाली केळकर says:

    धन्यवाद, A आणि a नी खूप धमाल केली.
    हो वाचली ना, हेरंबची पोस्ट. ऎकदम डोकेबाज माणूस आहे तो. सही लिहीले आहे त्याने. प्रत्येकाची स्टाईल बरोबर पकडली आहे.

 6. Nachiket says:

  Utsaahaalaa daad deto..

  Mast..

  Diwali chyaa haardik shubhechchha..

  • नचिकेत
   उत्साह टिकुन असतो, घरच्या सगळ्यांनीच मदत केली तर.. एकट्याने करायचे म्हंटले की कंटाळवाणे होईल कदाचित..

 7. Ganesh says:

  Khoop chan…
  Diwali chya khoop khoop shubhechchha..

 8. sahajach says:

  महेंद्रजी मस्तच झालाय आकाशकंदील… 🙂

  तुम्हाला, सुपर्णाताईंना, राधिका आणि रसिकाला आम्हा सगळ्यांतर्फे दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छा!!!

 9. Prasad says:

  kaka Kandila 10/10 marks…!! kharach chan..!!
  ani killa suddha banawalat ka ghari…?? Photo tari takaycha ekhada….!!

  ani Tumhala ani tumchya parivarala… Diwali chyaa haardik shubhechchha..!!

  Shubha Dipavali..!!

  • प्रसाद
   शुभेच्छांसाठी आभार.. 🙂 अरे बनवतांना त्या काड्य़ा इतक्या लहान झाल्या होत्या की अर्धा झाल्यावर सोडून द्यावेसे वाटत होते , पण पुर्ण केला एकदाचा.. 🙂

 10. Smita says:

  I think this post sets a pleasant context to wish each other a happy diwali… Punha Ekda!

 11. महेश says:

  आकाशकंदील बनवताना ,लहानपणी किती गोष्टी केल्या असतील याची( आठवण )आनंद देणारा क्षण
  . मस्त दिलखुलास ,ती ओर एक मजा आहे ,दिवाळीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

 12. mau says:

  तुम्हाला सगळ्यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

  faar sundar jhalaay kandil……..swata banavalyaach aanand vegalach…….malaa shikavaal kaa???kasa banavataat ha kandil……..mala jyaam awad aahe kandil banavaayachi..pan jamala nahi ha.

  • उमा
   तुमच्यासारख्या कलाकाराला काय कठीण आहे??
   दिपावलीच्या शुभेच्छा , तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबीयांना पण..

 13. santosh Deshmukh says:

  काका,
  !!!!!!!!!!!तुम्हाला,आपल्या सर्व भारतीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेछा!!!!!!!!!!!
  काका ,छान दिसतीय मार्बलवर आकाश कंदील ची तयारी.. मी आपला मागील लेख वाचला होता व त्याच वेळेस ठरवले होते नी सेम तुमच्या सारखा ( जुना झाडू ,जिलेटीन कागद व दोरा ) यांचा बनवलाय चार चौकोन आठ त्रिकोण
  आम्ही त्याला आकाश दिवा म्हणतो काका यातही कोणीतरी कडमडले की, आता इको फ्रेंडली हवाय म्हणून . मुंबईत तर कागदी फुकट वाटताना दाखवलेत बातम्यात …चला मज्जा आहे मुंबईकरांची

  • संतोष
   चला, मला बरं वाटलं.. की अजूनही काही लोकांनी घरी बनवणे सुरु केलंय म्हणुन. कुटुंबासोबत एकत्र बसून बनवणे ही पण एक वेगळीच मजा असते..
   पुढल्यावर्षी नुसता कागदाचा बनवीन म्हणतोय..
   दिवाळीच्या शुभेच्छा.

 14. ravindra says:

  हाहाहा! पुन्हा एक नवा कंदील! असो कंदील खूप सुंदर बनला आहे. चांगली प्रगती दिसते.(मागच्या वर्ष्यापेक्षा :))

 15. ravindra says:

  अरे दिपावलीच्या शुभेच्छा राहूनच गेल्या! आपणास, सुपर्णा वाहिनीस व मुलींना हि दिवाळी सुख समृद्धीची जावो! दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

 16. Dhundiraj says:

  आकाशकंदील बनवणे= घरभर कचरा करणे
  अगदी बरोबर !!!

  दिवाळीच्या शुभेच्छा !!

  • धुंडीराज
   दिवाळीच्या शुभेच्छा…
   आकाशकंदील बनवणे म्हणजे घरभर कचरा.. हे खरंय माझ्या बाबतील तरी!

 17. Mandar Puranik says:

  Mahendraji,
  Akash kandil ekdam masta zalai.
  Maze baba pan darvarshi gharich kartat akash kandil.
  Te lahanpani akash kandil karun vikaiche…..
  Amhi apli jamel tevdhi madat karto tyanna.
  Pan ata pudchya diwali la sagla kandli mi swataha karaicha tharvlai tumchi post baghun.
  Amchya akash kandilacha photo lavkarach pathavto tumhala.
  Tumhala va tumchya sarva kutumbala aani mitranna Diwali chya hardik Shubheccha !!

  Dhanyawad
  Mandar Puranik

  • मंदार
   अवश्य प्रयत्न करा. मस्त वेळ जातो.. घरच्या सगळ्यांची मदत घेऊन करायला अजून मजा येते.. 🙂
   तुम्हाला पण दिवाळीच्या शुभेच्छा..

 18. salim mulla says:

  Rikama Navi—–xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx!!!!!!!!!!!!!!!!
  Lahanpanachaya athavani parat jagvanyacha mast udoyog
  Tuma sarva Lahan Thorana Happy Diwali !!

 19. रोहन says:

  ह्यावेळेला सर्व घरी करायचे ठरवले होते.. पण दिवाळीच हुकली… 😦 असो… तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा … आलो की भेटू एकदा… घरी चक्कर मरीन… 🙂

 20. सॉरी उशीर झाला प्रतिक्रिया द्यायला. मस्त आहे आकाश कंदील. पण हा माझ्या कपातला चहा नाही 😉
  माझ्या पोस्टमध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेतच (आणि तुमच्याकडूनही दिल्या आहेत ;- ) ).. पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

 21. रेणुका says:

  wow!! mast akash diva banavlas dada!! 🙂

 22. Ashwini Pawar says:

  kaka amchyakade pn ajun hatanech kandil kartat maze baba. amchya dadar la ranade rd la diwalit asse ekek akash kandil astat na, mastch ! mi tar diwalicya divast roj ranade rd la chakkar taktekhas te akash kandil baghnyasathi. amchya chalichya gharat astana maza dada tyachya lahanpani matiche kille banvaycha, pn te mala pahayla milalech nahit kadhi….

 23. महेश कुलकर्णी says:

  मस्त मज्जा येते ना आकाश कंदील बनविण्यासाठी ,मस्त छान,वाटला आकाशकांदिलचा लेख .दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s