कालभैरवाय नमः-उज्जैन

गणपती दूध पितोय… टिव्हीवर सारखं दाखवत होते, मनोहर पंत पण दुधाचं भांडं हातात धरून सिद्धीविनायकाला दूध पाजताना सारखं टिव्ही वर दाखवत होते. सगळा देश पेटला होता , एका वेगळ्याच फ्रेन्झी ने. नंतर बातमी पसरली की आता प्रत्येकाच्या घरचे देवातले गणपती पण दूध पित आहे . सगळा देश भक्ती भावाने नतमस्तक झाला होता. काही लोकं याला ग्रॅव्हीटी मुळे दूध पितळेच्या मुर्तीमधे ओढल्या जाते (?? म्हणजे नेमकं काय??) असं काहीसं विधान करीत होते. एखादी गोष्ट का होते ते बरेचदा अनुत्तरीतच रहाते त्यातलीच ही एक.

काही दिवसापूर्वी माहीमच्या दर्ग्याच्या मागच्या समुद्रातलं पाणी गोड झालं, हा त्या दर्ग्यातल्या बाबाच्या कृपेने झाले म्हणून मुस्लीम समुदायाची झुंबड  त्या समुद्र किनाऱ्यावर उडाली होती. बरेच लोकं बरोबर आणलेल्या बिसलेरीच्या बाटल्यात भरून ते पाणी नेत होते. टिव्हीवरच्या त्या अ‍ॅंकरच्या तर अंगातच आले होते. दिसेल त्याला मूर्खासारखे ( माफ करा मला मुर्खासारखे ऐवजी “नेहेमीप्रमाणेच” म्हणायचं होतं) प्रश्न विचारत सुटली होती.आपको क्या लगता है ये पानी पिनेसे आपकी बिमारी दूर हो जायेंगी? यावर त्या भावीक मुस्लीम महिलेचे उत्तर होते, की जरूर होगी, ते घाणेरडं मळकट रंगाचं पाणी भक्तीभावाने पिऊन दाखवत म्हणत होता………..

कदाचित वरच्या दोन्ही घटनांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येईल सुद्धा, पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने मात्र  वरच्या दोन्ही घटना  चमत्कार या सदरात मोडतात. या शिवाय  हिमाचल मधली ज्वाला देवी, आणि तिच्या अनुषंगाने  असलेल्या आख्यायिका आहेतच खोकला आला की तोंडातून कफच्या ऐवजी सोन्याचा गोळा काढणारे सत्य साई बाबा असो किंवा असेच काही बाबा, संत लोक असो, कुठेही चमत्कार सदृष काही दिसले की त्या गोष्टीला एकदम धार्मिक स्वरूप येते.  बरं ही गोष्ट केवळ हिंदू किंवा मुस्लीम धर्मात आहे असे नाही. काही दिवसापूर्वी जिझसच्या फोटोमधून रक्त बाहेर वहाणे, किंवा साईबाबाच्या फोटो मधून अंगारा बाहेर येणे , तसेच ब्रेड टोस्ट वर जिझसचे चित्र दिसले आणि मग तो तो टोस्ट इ बे वर काही हजार डॉलर्स ला विकल्या जाणे  – असे अनेक प्रकार ऐकिवात होते. श्रद्धा म्हणा किंवा अंध श्रद्धा, पण या अशा चमत्कार सदृष्य घटना दिसल्या की नकळतच लोकांचे  हात जोडले जातात.

अशाच एका जागी जाण्याचा योग परवा आला. इंदौरहून घटीया नावाची एक जागा आहे , उज्जैन पासून १७-१८ किमी , तिथे काही कामानिमित्य जाणे झाले.  परतीच्या वाटेवर कालभैरवाचे मंदीर आहे, अर्थात त्यासाठी साधारण पणे दोन एक किमी ची वाट वाकडी करावी लागते, पण माझे  आवडते मंदीर आहे हे ,कारण या मंदीरातले  वेगळंच भितीयुक्त वातावरण , म्हणून ह्या मंदीराला हमखास भेट देतो. तर तिथे आम्ही दर्शनाला थांबलो. या मंदीरात मी पूर्वी पण बरेचदा येऊन गेलेलो आहे -आणि एकदा पोस्ट पण लिहिले होते कालभैरवाय नमः याच नावाने. पण या वेळी मंदीर एकदम फ्रेश दिसत होतं. समोर फुलांच्या दुकानात दारूच्या बाटल्या , उदबत्ती, सुर्ययंत्र वगैरे प्रकार विकायला ठेवलेले होते. तिथे पोहोचलो, आणि तिथल्या सगळ्या फुलं, दारूच्या स्टॉल वाल्यांनी घेराव घातला. ’”भैरवको दारू चढावो, अंग्रेजी दारू केवल १०० रुपया  और देसी ५०.

फुलांच्या दुकानात दारू म्हणजे काही विचित्र वाटतं कां? हो ! इथे कालभैरवाला दारूचा नैवेद्य दाखवला जातो. पुर्वीच्या काळी पंच ’म’काराने कालभैरवाची पूजा करण्याची पद्धत होती. मद्य, मांस, मैथुन ,मीन  आणि मुद्रा हे  प्रकार आहेत . तर त्यापैकी चिताभस्म आणि मद्य  यांचा कालभैरवाला नैवेद्य दाखवला जातो, असंही म्हंटलं जातं की दररोज एक तरी ताजे  चिता भस्म  कालभैरवाला मिळतेच..

मंदीर   हजारो वर्षापेक्षा जास्त जुने आहे असे म्हंटले जाते. या मंदीराचा उल्लेख स्कंद पुराणातही सापडतो. मंदीराचे पुनःनिर्माण पण बरेचदा केल्याने केवळ मुर्ती जुनी आणि मंदीर नविन आहे असे वाटते. मंदीराच्या आवारात एका झाडाखाली भग्न मुर्त्यांचे तुकडे ठेवलेले दिसत होते. त्यांना पण कोणीतरी फुलं वाहून पूजा केलेली होती. अशा विटंबना झालेल्या मुर्त्या देवळापेक्षा एखाद्या म्युझियम मधे ठेवणे जास्त  योग्य असे मला वाटते.

पुजा करायला मंदीरात प्रवेश केला की समोरच एक कोल्हा (की लांडगा?) मंदीराच्या बाहेर नंदीच्या जागी बसलेला दिसतो- हा लांडगा म्हणजे कालभैरवाचे वाहन. त्याला नमस्कार करुन खूप वाकून त्या लहानशा दारातून आत शिरलो. खरं सांगायचं तर माझी त्या लांडग्याला नमस्कार करायची अजिबात इच्छा होत नाही,किंवा कालभैरवाला पण नाही- पण संस्कारांचा नेहेमीच विजय होतो आणि हात जोडले जातात.

आत शिरल्यावर एकदम दारूचा भपकारा नाकात शिरला. त्या वासाकडे दुर्लक्ष करून देवाच्या मुर्तीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू लागलो, पण मन काही कॉन्सन्ट्रेट करू शकलो नाही.समोर जे दोन पुजारी बसलेले होते, ते पण कालभैरवाच्या “प्रसादाने” झिंगल्यासारखे दिसत होते. आम्ही आपली पूजेची थाळी त्याच्या समोर केली, त्याने फुलं घेऊन देवावर फेकली, आणि दारूची बाटली उघडून त्यातली दारू एका अल्युमिनियमच्या एका प्लेट मधे काढून त्या कालभैरवाच्या तोंडाला लावली.त्या कुंद वातावरणात दारूचा वास भरला होता, एक वेगळंच फिलिंग येतं मला या मंदीरात आलो म्हणजे. श्रद्धा असते का? कदाचित नाही.. पण हा त्या मंदीराचा वेगळेपणा मला इथे  खेचून आणतो प्रत्येक वेळेस  उज्जैनला आ्लो म्हणजे.

या पूर्वी पण मी  जेंव्हा कधी इथे आलो, तेंव्हा  हा प्रसंग रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रत्येकवेळी त्या भटजीने  कॅमेरा बंद करायला लावला होता. या वेळी मात्र मी सरळ कॅमेरा सुरु करण्यापुर्वीच्या त्या भटजीला ५१ रुपये दिले, आणि मग त्या पुजाऱ्याने     काही ऑब्जेक्शन घेतले नाही, आणि   तो दारू पाजण्याचा प्रसंग  पहिल्यांदा रेकॉर्ड करता आला 🙂 .  जशी त्या पुजाऱ्याने ती ताटली  कालभैरवाच्या तोंडाला लावली, तशी हळू हळू त्या ताटलीतील दारू त्या मुर्तीच्या तोंडातून आत रिती झाली.आजूबाजूचे सगळे लोकं त्या कृतीकडे लक्ष देऊन पहात होते.  हात जोडलेले, चेहेऱ्यावर  श्रद्धापुर्ण भाव….

ती दारू कालभैरवाने प्यायलेली कुठे जाते हे कुणीच सांगू शकत नाही. जवळपास प्रत्येकच देवाच्या स्थाना प्रमाणे  इथे पण  बऱ्या अख्यायीका ऐकायला मिळतात की बाजूला बरंच खोल खणून पाहिलं तर , तिथे दारूचा अंश पण सापडला नाही , औरंगजेबाने पण ही मुर्ती तोडण्याचा प्रयत्न केला  पण त्याला जमले नाही आणि मग शेवटी तो पण कालभैर्वाचा भक्त झला …वगैरे वगैरे…

या मंदीराच्या समोर असलेली दगडी दीपमाळ तेलाने भरलेली दिसत होती. दीपमाळ ही बहूतेक शिवरात्र, दिवाळी असे सण असले की पेटवली जाते- आणि नुकतीच दिवाळी झालेली असल्याने  दिव्यातून ओघळलेल्या तेलाने न्हायलेली ती दीपमाळ, नुकतेच केस धुवून आलेल्या स्त्री सारखी स्वच्छ दिसत होती.

असो.. जे काही असेल ते असो, हा चमत्कार म्हणा किंवा काही म्हणा, मी रेकॉर्ड केलेली  ती लहानशी फिल्म यु ट्युब वर टाकुन इथे लोड करतोय. त्या मुर्तीच्या तोंडाला लावलेली ती ताटली  बघा, त्यातली दारू हळू हळू त्या मुर्तीच्या तोंडातून आत जाते आहे. अजून काही  फोटो पण आहेत, ते नंतर लोड करीन.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

25 Responses to कालभैरवाय नमः-उज्जैन

 1. mau says:

  malaa aaj ha lekh vachun aathwale ki me pan kaahi mhanje sumare 15 yrs purvi ujjain la gelele..temvha kalbhairav mandirat jaayacha yog aalela..pan ka kon jaane tithle sagle vatavaran baghun mala aat mandirat jaayachi ajibat ichha jhali nahi..khup bhayan vaatalele….man vishann hote..kuthe hi prasannata naahi..majhe sagle natewaik aat jaun darshan karun aale..me ekati baher..parking space la ubhi rahun baherunch hat jodalele..kalbhairavabaddal khup kahi aikle hote..mhanun asel bahuda..aani te chita bhasm vagaire…mala kalpnanech bhiti watleli….daru prashan baddal bolatay tar te kharach aahe..konacha vishwas basel ka shankach aahe….chhan lihilet..

  • मंदीरातले वातावरण थोडे वेगळेच असते. उग्र वास, आणि एक भिषण शांतता. त्या यु ट्युब मधे बॅकग्राउंडला पण पहा खूप कमी आवाज आहेत. विचित्र वाटतं हे मात्र अगदी खरं, पण तरीही मला तिथे जावंसं वाटतंच.. तुम्हाला तिथे आत जावेसे वाटले नाही यात काही आश्चर्य नाही. ती जागाच तशी आहे.

 2. ngadre says:

  nehamee pramanech vegala vishay. Vegalya jagaache darshan.

  Uttam..

  Dhanyavaad..

  • नचिकेत
   इथे रात्री बेरात्री येऊन पुजा करणारे पण आहेत. मंदिरासमोर बळी वगैरे पण दिला जातो अमावस्येला . काही लोकं बळीचा पण नवस बोलतात असे समजले.

 3. हाहाहा
  तुमच्या या असल्या अनुभवांचा कधी कधी खरंच हेवा वाटतो.
  ठरवूनही अशा जागी जाणे आमच्याबाबतीत केवळ अशक्य.

  भारताला Incredible India हे विशेषण वा नाव किती योग्य आहे ह्याचा पुनश्च अनुभव..

  यथा राजा तथा प्रजा (की यथा प्रजा तथा राजा? confused) हे माहित होते…पण हे सूत्र देवांनाही लागू होते हे माहित नव्हते.

  • आहे खरा वेगळाच अनूभव. दर वेळी इथे गेलो की एक वेगळंच फिलिंग येतं.. याच विषयावरची आधीची पोस्ट वाचली का? त्या मधे लिहिलंय कालभैरवाबद्दल.. त्याच रस्त्यावर ज्या ठिकाणी श्रीकृष्णाचे शिक्षण झाले ती जागा पण आहे. तिथे थांबलॊ नाही, पण पुढल्यावेळेस त्याबद्दल लिहिन

 4. आणि हो….फक्त ५१ रुपयात कालभैरवाचे स्टिंग ऑपरेशन करण्याची कल्पना भन्नाट.

  • आजपर्यंत चार पाचदा तिथे जाऊन आलोय, पण प्रत्येक वेळी पेटीत पैसे टाकायचो, या वेळी समोरच्या थाळीत टाकले पैसे.. आणि झालं……. 🙂

 5. रोहन says:

  चला ५१ रुपयात सर्वांना काल भैरवाचे दर्शन झाले… 🙂 राजमाचीला भैरवनाथाचे देऊळ आहे. त्याचे वाहन मात्र घोडा.

  हा फोटो बघ. http://picasaweb.google.com/chaudhari.rohan/BikeTripToRajmachi#5344843790703515138

 6. Nachiket says:

  How much deshi / videshi daru is sold as offering? (Quarter?)

  Just curious… fun..

 7. छान माहितीपुर्ण.

 8. मागे ऐकलं होतं, आज पाहायलाही मिळालं…
  शिव शिव शिव … 😉

 9. smita says:

  काळ भैरवाबद्दल ऐकले होते, त्यात अजुन भर पडली. धन्यवाद, काका.

 10. हा हा हा.. देवाला दारू? एकदम कैच्याकै वाटतंय हे.. 😀

 11. महेश says:

  भावनिक अंधश्रद्धा.आपण चागली व जागृत माहिती दिली.उत्तम धन्यवाद .

 12. tejali says:

  video upload kelyabaddal dhanyawad. me ajun gele nahiye tikade pan eikun hote.

  • कधी गेलात तर अवश्य भेट द्या. बरेच लोकं उज्जैनला जाऊन परत येतात. पुढे ह्या मंदीराला जात नाही कोणीच.

 13. Gurunath says:

  अकोला जिल्ह्यात अकोला ते मुर्तिजापुर (वसंतराव देशपांडेंचे मुळ गाव) हा रस्ता एन.एच सहा वर आहे ,तिथे मुर्तिजापुरच्या अलिकडे १५ कि.मी

  शेलु वेताळ नावाचे ठीकाण आहे, वेताळाचे मंदिर आहे….. बाधा झालेली माणसे इथे देवळाच्या उंबर्या पर्यंत आणली की वेताळा ला शिव्या देत सुसाट धावत सुटतात…. अन कुठे तरी काट्याकुट्यात जाऊन पडतात… इथे दारु चे प्रस्थ नाही पण रोडगा(गव्हाच्या पीठाचा) अन वरणाचा नैवेद्य़ असतो….. मुल बाळ वगैरे साठी पण इथे नवस बोलतात….. अस्मादिक त्याच नवसाचे फ़ळ असल्याचे मातोश्री सांगत असतात…

  (नशीब ,बाळबोध नाव वेताळ ठेवले नाही माझे!!)

  इथली पध्दत म्हणजे बाधलेलं माणुस किंवा नवस फ़ेडायचे आहे ते पोर देवा समोरे आणतात अन देवाला आंघोळ घातलेले जे तिर्थ असते त्याचा शिपकारा त्याच्या तोंडावर मारतात…. बाधलेलं माणुस पळुन जाऊ नये म्हणुन बाहेर खांब चेन वगैरे पण जय्यत तयारी असते…..

  तिथे पण असेच भारलेले वाटते…..

  बरेच वेळी अशी भारलेली माणसे उतरवायचे काम दत्ताच्या ठिकाणी पण करतात जसे की, गाणगापूर……

  माझे आयुष्यात कधी ही काही चांगले झाले की आई मला तिथे (शेलु ला) घेऊन जात असते!!

  • माहीती आहे मला . ऐकलं आहे त्याबद्दल. तुझं नांव वेताळ का नाही ठेवलं ते विचारायला हवं! कारण तू आहेस तसा वेताळासारखाच.

 14. Gurunath says:

  ओ काय हो दादा तंगडं ओढताय गरिब सोज्वळ मुलाचे

  😀

 15. धनंजय राजेन्द्र भुसे says:

  मी सुमारे 8 वर्षाआधी ओंकारेश्वर उज्जैन या ज्योतिर्लिगाला गेलो होतो त्या वेळी दारु पिणारा भैरवनाथ एवढेच मला माहित होते पण तिथे गेल्यावर माहिती मिळाली की खुप पुर्वीपासुन भैरव बाबा दारु पितायेत मग आजपर्यंत किती दारु बाबा पिले असतील मी विचारले ही दारु नेमकी जाते कुठे तर म्हणाले ते आज पर्यंत कोणीही शोधु शकले नाहीये भरपुर चैनेल वाले तसेच शोधकर्ता येथे येऊन गेले पण त्याना देखील अपयश आले पण क

  • धनंजय
   खरं आहे तुमचं. मी पण बरीच चौकशी केली, पण काही माहिती मिळाली नाही. काही गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयन्त न केलेलाच बरा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s