ब्लॉग माझा स्पर्धा-३

सर्वप्रथम या स्टार माझा तर्फे आयोजित ब्लॉग माझा या स्पर्धे मध्ये पारितोषिक मिळालेल्या सगळ्या ब्लॉगर्सचे मनापासून अभिनंदन. स्टार माझा तर्फे मराठी ब्लॉगर्सला उत्तेजन म्हणून दर वर्षी मराठी ब्लॉगच्या स्पर्धा घेतल्या जातात. या वर्षी पण या स्पर्धा घेतल्या गेल्या आणि त्याच्या विजेत्यांची यादी आजच जाहीर करण्यात आलेली आहे.  अशा प्रकारच्या स्पर्धांमधून मराठी ब्लॉगिंगला आणि नवीन मराठी ब्लॉगर्सला   लिहिण्यासाठी प्रोत्साहन  मिळावे  हा उद्देश आहे,  त्याबद्दल स्टारमाझा चे सगळ्या मराठी ब्लॉगर्स तर्फे  त्यांचे आभार मानावेसे वाटतात.

या स्पर्धा कशासाठी?? ब्लॉगर्स कडून तुम्ही कुठलं लिखाण अपेक्षित करता? या स्पर्धांमधे  बक्षिस पात्र ब्लॉग निवडीसाठी निकष कसे लावले जातात? असे अनेक प्रश्न हे ज्या ब्लॉगर्सनी या स्पर्धेमधे ब्लॉग पाठवले त्यांच्या मनात आले असतीलच!

ज्या लोकांचे ब्लॉग्ज पहिल्या पाचात आले नाहीत किंवा उत्तेजनार्थ या सदरात आले आहेत, त्या लोकांना कदाचित या मधे आपल्यावर अन्याय झालाय असे वाटू शकेल. मनापासून तिरस्काराची भावना निर्माण होणे पण शक्य आहेच!  कदाचित परीक्षकांच्या निर्णयाबद्दल पण थोडी फार शंका येऊ शकते. जे ब्लॉग तुम्हा आम्हाला माहीत पण नाहीत, त्यांच्या नावे पारितोषिक प्राप्त म्हणून झाले याचे पण आश्चर्य वाटू शकते. असंही वाटू शकते की आपला ब्लॉग एखाद्या पारितोषिक प्राप्त ब्लॉग पेक्षा जास्त चांगला आहे, मग आपल्याला उत्तेजनार्थ का म्हणून?? किंवा आपला ब्लॉग इतका वाईट आहे का की तो अगदी उत्तेजनार्थ म्हणूनही सिलेक्ट होऊ नये?

या वर्षी मात्र स्टार ने जास्तीत जास्त लोकांना पारितोषिकं देऊन जास्तीत जास्त लोकांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादे वेळेस तो काही लोकांना चुकीचा पण वाटू शकेल, पण त्या मुळे  बरेच लोकं उत्साहित होऊन लिखाण करू लागतील याची  खात्री आहे. – आणि म्हणूनच  थोड्या विचारांती त्यात (जास्तीत जास्त लोकांना पारितोषिक देण्यात) काही गैर आहे असे मला वाटत नाही. .

कांही लोकांना असेही वाटत असेल की , परीक्षकांना ब्लॉगर्स कडून जर   ’छापील साहित्य’ प्रमाणे भाषा, शुद्धलेखन, आणि  साहित्यनिर्मितीच्या अपेक्षा   असतील तर, त्यांच्या पसंतीला  आपले लिखाण कसे काय   पडू शकेल?  ब्लॉग वर लिहिणारे बहुसंख्य लोकं हे  आयटी किंवा इंजिनिअरींग अशा टेक्निकल फिल्ड मधले आहेत, की ज्यांना मराठी मध्ये लिहिण्याचे फारच कमी काम पडते. किंबहूना ते सगळे लोकं फक्त  ब्लॉग वरच मराठी लिहितात असेही असू शकते . तसेच बरेच ब्लॉगर्स हे इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत, तरी पण केवळ मराठी प्रेमामुळे मराठी मध्ये ब्लॉगिंग करतात, तर काही    कुठल्या ना कुठल्या व्यवसायात आहेत.   काही रिटायर्ड झालेले   केवळ एक आपली हॉबी म्हणून ब्लॉग लिहिणारे लोकं पण आहेत. जेंव्हा अशा स्पर्धा घेतल्या जातात तेंव्हा भाग घेणारे कुठले लोकं आहेत हे पाहून ब्लॉग तपासण्यात यायला हवे असेही वाटते नां?

या वर्षीच्या स्पर्धे मध्ये मी  भाग घेतला नव्हता. याचे कारण म्हणजे  तसेही सध्या बरेच वाचक ब्लॉग वर येत आहेतच, आणि  म्हणून या प्लॅटफॉर्मचा फायदा हा नवीन ब्लॉगर्सला मिळावा  हा मुख्य उद्देश होताच.

मला असं वाटतं की बहूतेक प्रत्येकाचा ब्लॉग म्हणजे त्याचं अपत्य असतं. आपल्या ब्लॉग वर जे काही आपण लिहितो त्यावर आपले स्वतःचेच खूप प्रेम असते. जेंव्हा तुमचा ब्लॉग तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये उतरवता , तेंव्हा परीक्षकांचे मत हे त्यांच्या अनुभव विश्वावर, किंवा ते नेहेमी काय वाचतात यावर अवलंबून असते.

ब्लॉगर्स वर बऱ्याच नविन टेम्प्लेट्स वापरण्याची मुभा आहे, तशी वर्डप्रेस वर नाही. तेंव्हा ब्लॉगर्सवर आणि वर्डप्रेसवर   बनवलेल्या ब्लॉग ची सजावटीच्या किंवा दिसण्याच्या ( म्हणजे अपिअरन्सच्या) बाबतित एकमेकांशी तुलना केली जाऊच शकत नाही, या गोष्टीची जाणीव परीक्षकांना असायला हवी. नुसती सजावट किंवा टेकनिकली उच्च दर्जाचे एचटीएमएल वगैरे वापरले म्हणजे ब्लॉग सुंदर दिसतोच- पण नॉन आयटी च्या लोकांना मात्र ते सहज शक्य नसते. जेंव्हा मराठी ब्लॉग या विषयावर स्पर्धा असते, तेंव्हा ती लिखाणाची क्वॉलीटी कन्सिडर करून ब्लॉग्ज ला पारीतोषकं दिल्या जायला हवी असे मला वाटते.  सजावट वगैरे सगळ्या गोष्टी  नगण्य आहेत.

मागल्या वर्षी  अच्युत गोडबोले हे परीक्षक होते, तेंव्हा बहूतेक सगळ्या  टेक्निकल विषयावरच्या लिहिलेल्या ब्लॉग्ज ला  पारितोषिक दिले गेले होते. कुठल्याही स्पर्धे  मध्ये परीक्षकांची वैय्यक्तीक आवड ही महत्त्वाची असते ,ज्या   प्रकारचे साहित्य त्यांना आवडते  तशाच प्रकारच्या साहित्याला  त्यांनी पुरस्कार देणे साहजिकच आहे. या वर्षाचे परिक्षक पण एक पत्रकारितेतील संपादक,  दुसऱ्या पण उच्च दर्जाचे लिखाण स्वतः करणाऱ्या!

तेंव्हा जर या वर्षी पहिल्या पाचात नाव नसेल तरी याचा अर्थ आपला ब्लॉग वाईट आहे असा अर्थ घेऊ नका, आणि  अजिबात उदास न होता, पुन्हा नव्या जोमाने लिहीणे सुरु  ठेवा . आणि सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन करून हे पोस्ट संपवत.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मराठी and tagged , , . Bookmark the permalink.

40 Responses to ब्लॉग माझा स्पर्धा-३

 1. Pingback: Tweets that mention ब्लॉग माझा स्पर्धा-३ | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 2. मान्यवर,
  बरोबर लिहीलंय.. खरं तर ब्लॉगची सुरूवातच मुळी स्वांतःसुखाय या कल्पनेतून झालेली आहे. त्यामुळे आपल्या मनातले उतरवत रहावे. कोणी वाचो अथवा न वाचो. कुणाला आवडो अथवा न आवडो.
  मी IT मध्ये यायच्या आधी बराच काळ Thermax मध्ये होतो हे तुम्हाला माहीती आहेच. अनु आगांचे यजमान रोंहिटन आगा तुम्हाला माहित असतीलच. मोठा उमदा आणि तत्वचिंतक माणूस. एकदा त्यांची मुलगी मेहेर (म्हणजे सध्याच्या Thermax chairperson मेहेर पदम्‌जी) पियानो वाजवत बसली होती. मागून आगासाहेब आले. ते आल्याचे पाहून तिच्या सुरावटीत बदल झाला असावा. अंमळ थांबून रोहिंटन म्हणाले – “Play to express……. Not to impress !!!” ’स्टार माझा’च्या स्पर्धेत बक्षिस न मिळालेल्या सर्व ब्लॉगर्सना माझे हेच सांगणे आहे. खट्टू व्ह्यायचे काही कारण नाही. Take it sportingly and keep on writing !!!!!!!!

 3. vijaysinh holam says:

  i am going to write on it, but KAKA you start it. well. i wiill post my artical soon.

  • धन्यवाद.. तुम्ही पण लिहा अवश्य! मी फक्त ज्यांना काही बक्षिस वगैरे मिळालेले नाही, त्यांच्यासाठी लिहिलंय पोस्ट! बरेचसे ऍंगल्स सुटले आहेत या परिक्षणाचे. त्यावर एखादी चांगली पोस्ट होऊ शकते.

 4. ngadre says:

  Mahendra ji.

  Thanks for article and wishes.

  The point about selection criteria came to my mind too, in the sense, the look and feel of blog can be best managed by web designers/ programmers.

  Content is different thing. Maybe they have weightage assigned for each parameter.

  • नचिकेत
   कंटॆट्सला अजिबात महत्व दिलेले दिसत नाही.. अर्थात हे माझे मत आहे. :)मी यात भाग घेतलेला नाही, त्यामुळे एक तिसरा माणूस म्हणून मी नक्कीच माझे स्पष्ट मत कुठलाही पूर्वग्रह दूषित नसलेले म्हणून कन्सिडर केले जाऊ शकते.

 5. काका,
  खूप आभार!!
  आणि तुम्ही लिहिलेलं अगदी पटलं मला!

 6. सुजाता पाटील says:

  जातीयावादी आणी विचित्र विचार हिंदू विरोधी असलेल्या रामटेकेच्या ब्लोगला पारतोशक कसे काय दिले गेले?शॆंडा ना बुडखा, पोस्ट , सगळीकडे मंदीराचे स्तुप वगैरे सारखे लेख लिहिलेले ! इथे परीक्षकाचे शंभर टक्के चुकले. पहिल्या बक्शिसाचा ब्लोग पण सामान्य आहे. परिक्शकानी काळजीपुर्वक काम करायला पाहीजे होते.

  • सुजाता
   बरेच दिवसानंतर प्रतिक्रिया दिलीत.. आभार.
   एक सांगतो, मधुकरचे काही पोस्ट निश्चितच वादग्रस्त आहेत. किंबहूना मला तर असे वाटते की प्रसिद्धी साठी म्हणून त्याने मुद्दाम असे पोस्ट्स लिहिले असावेत. पण त्याचे इतर पोस्ट चांगले आहेत- विशेषतः भामरागढ बद्दलचे.
   त्याने जर जातीय तेढ निर्माण करणारे लिखाण टाळले असते, तर हा दिलेला पुरस्कार योग्य ठरले असता, आणि त्याला कोणी आक्षेपही घेतला नसता. सवर्णांवर चिखलफेक न करता पण पुस्तक लिहिले जाऊ शकते- नरेंद्र जाधवांचे पुस्तक त्याचे उदाहरण आहे.

   जरी मला त्याचा ब्लॉग आवडतो, तरी मधुकरचे इतर लिखाण पहाता, त्या ब्लॉग ला पुरस्कार देणे म्हणजे परिक्षकांना हे विचार मान्य आहेत असा होतो.. आणि ्परिक्षकांची इतकी वैचारीक अधोगती पाहून मला व्यक्तीशः फार वाईट वाटले, कारण …..असो.

 7. sahajach says:

  महेंद्रजी तुमची मतं पटताहेत मला…. स्पर्धेत भाग न घेण्याचा मोठेपणा वाखाणण्याजोगाच आहे… आणि तुम्ही श्रीमंत आहातच ब्लॉगमंडळाचे!!

  मनापासून आभार!! 🙂

  • तन्वी
   त्यात मोठेपणा वगैरे काही नाही. सध्या बऱ्यापैकी लिहिलेलं वाचल्या जातंय, आणि मी स्वतःपण ब्लॉगिंग कमीच करतोय, म्हणून यात भाग घेतला नाही.
   तुझे मनःपुर्वक अभिनंदन!! एक बाकी वाटलं, काही चांगले ब्लॉग पण सुटले आहेत यादी मधून.

 8. दिपक says:

  तेंव्हा ब्लॉगर्सवर आणि वर्डप्रेसवर बनवलेल्या ब्लॉग ची सजावटीच्या किंवा दिसण्याच्या ( म्हणजे अपिअरन्सच्या) बाबतित एकमेकांशी तुलना केली जाऊच शकत नाही….
  >> मान्य! मात्र ब्लॉगस्पॉट वरचे निवडलेले ब्लॉगही डिझाईनच्या दृष्टीनेही तसे एवॉर्ड विनिंग म्हणता येतील असे असायला हवे होते ना!!

  • दिपक
   हा लेख लिहिला तेंव्हा मी सगळे ब्लॉग पाहिले पण नव्हते. घरी एक लग्न असल्याने थोडा बिझी होतो. मला वाटतं वेगवेगळ्या कॅटॅगरीज करायला हव्या होत्या आणि मग बक्षिसं द्यायला हवी होती. असो.
   हा मुद्दा श्रेयाच्या बझ वर वाचला होता, आणि म्हणून लेख लिहितांना लिहिला गेला.

 9. ह्या स्पर्धेच्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!! ह्या स्पर्धेचे निकष काय होते हे माहित नाही. पण माध्यमे मराठी ब्लोग्गिंगची दखल घेत आहेत आणि त्याच्या वाढीला प्रोत्साहन देतायत हे ही नसे थोडके!

  -निरंजन

  • निरंजन
   केवळ याच मुद्यासाठी म्हणून हा लेख लिहीला. दखल तरी घेतली जाते मराठी ब्लॉगिंगची या निमित्यने.

 10. काका, निकष काय होते याची मला खरंच उत्सुकता लागली आहे. कंटेंट बरोबरच लिखाणाची वारंवारता हाही एक मुद्दा असायला हवा होता.. कित्येक विजेत्या ब्लॉग्जवर ५-६ महिने काहीही लिखाण नव्हतं.. आणि दुसरा मुद्दा म्हणजे एन्ट्रीज जास्त आल्या म्हणून जास्त बक्षीस वाटप ही कल्पना मला स्वतःला तरी अजिबात पटली नाही… असो..

  सर्व विजेत्यांचे अभिनंदन.. !!

  • हेरंब
   निकष .. जे परीक्षकांनाही आवडेल ते बक्षिसपात्र एवढाच निकष असतो !
   परीक्षकांच्या आवडीनुसार ठरतो विजेता.
   जास्त काय लिहिणार यावर??
   जास्त बक्षिसं.. ही संकल्पना ठिक हे, फक्त जास्त प्रवेशिका आल्या म्हणून ब्लॉगचे विभाग पाडायला हवे होते.. ब्लॉग चे वय आणि पोस्ट्स, कंटेंट्स, टेक्निकल ,वाचकांचे अभिप्राय, वाचकसंख्या,स्त्रियांचे ब्लॉग , वारंवारीता वगैरे अनेक प्रकारे वर्गीकरण करता आले असते, आणि मग प्रत्येक विभागात पहिले तिन बक्षिसं उत्तेजनार्थ देता आली असती.
   असो, आता वेळ निघुन गेलेली आहे..

 11. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एखाद्या विशिष्ट जाती/समाज/धर्माला वारंवार लक्ष्य करून त्यांच्यावर आणि त्या समाजाला पूज्य असणार्‍या व्यक्तींवर कुठल्याही पुराव्याशिवाय हीन पातळीला जाऊन टीका करणार्‍या ब्लॉगला विजेत्यांच्या यादीत स्थान दिल्याबद्दल ‘स्टार माझा’चा आणि स्पर्धेच्या परीक्षकांचा मी वैयक्तिक निषेध करतो !!!!!!!!!

  • हेरंब
   मधुकरचा ब्लॉग इतर लिखाण मला आवडतं, पण हे जे काही पोस्ट्स त्याने लिहीले आहेत ते वाचून वाईट वाटले. एखाद्याच्या श्रद्धास्थानावर हल्ला करणे कधीही वाईटच!! वाद विवाद घडवून टीआरपी वाढवण्यासारखा हा प्रकार आहे. आणि कदाचित परिक्षकांना आपण किती पुरोगामी आहोत हे दाखवायचे असेल……..असो..

 12. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन….!!!
  एंट्रीज जास्त म्हणुन एवढी जास्त बक्षि्स….खरच पटण्यासारख नाही…१३ च ब्लॉग असते तर त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली असती,आता एकदम गर्दी झालेली आहे…असो.

  • देवेंद्र
   खरं सांगतो, मी बरेच ब्लॉग पाहिले, त्यांच्या पेक्षा तुझा ब्लॉग निश्चितच उजवा आहे… 🙂 असो..

   • मला माझ बक्षिस मिळाल… 🙂
    बाकी कोल्ह्याला द्राक्ष आंबट असली तरी ती गर्दी खरच आवडली नाही उलट श्रेयाताईंनी सांगीतल त्याप्रमाणे कॅटेगरीज केल्या असत्या तर चालल असत….

 13. lalita says:

  he results kothe vachavayas miltil ?

 14. माझ्या मते सहा विजेते आणि तीस उत्तेजनार्थ एकत्र काढण्यापेक्षा; लिखाणाच्या दृष्टीने, सजावटीच्या दॄष्टीने, या आणि अश्या गोष्टी विचारात घेऊन तीन ते सहा वेगवेगळ्या कॅटॅगरीज काढून त्यातला एक एक विजेता आणि पाच पाच उत्तेजनार्थ असे क्रमांक काढायला हवे होते.
  दुसरे म्हणजे वर्डप्रेस.कॉम आणि ब्लॉगरवरचा ब्लॉग याची तुलना होऊन शकत नाही ती सजावटीच्या दॄष्टीने(हेच मत मी बझ वर ही मांडले होते). बाकी कंटेट अलहिदा.
  आश्चर्य म्हणजे यातले बरेचसे ब्लॉग्ज मी कधी पाहिलेच नव्हते.

  • tumache mat mandunach mi ithe lihile hote. mI sadhya ek lagnala aloy, parava savistar lihin .

  • श्रेया
   तुमचाच बझ वाचला होता मी आणि नंतर रात्री लिहायला घेतले, तेंव्हा तो पण मुद्दा लिहिला पोस्ट मधे. तुमचे म्हणणे अगदी पुर्णपणे मान्य !! तसेच व्हायला हवे होते. पण इथे पुरस्कार मिळाला म्हणजे वाचक येतील असे नाही. मागच्या वर्षी पुरस्कृत ब्लॉग वर या वर्षी किती लिखाण झालंय?बहूतेक ९० टक्के तर थंड्या बस्त्यात गेले आहेत. असो.

 15. विजयसिंह होलम says:

  या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला ही चांगली गोष्ट आहे. याचाच अर्थ ही स्पर्धा आता लोकप्रिय होत आहे. त्यामुळेच संयोजक आणि परीक्षक यांची जबाबदारी वाढली आहे. स्पर्धेचे परीक्षण पारदर्शीपणे करण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी महेंद्र म्हणतात तसे काही तरी निकष ठरविले पाहिजे व ते जाहीर केले पाहिजेत. त्यामुळे गैरसमज होणार नाही. परीक्षकांना चांगलेले वाटलेला ब्लाॅग कदाचित इतरांना आवडणार नाही, तर इतरांना आवडणारा ब्लाॅग निकषात बसत नसल्याने पुरस्कारप्राप्त ठरणार नाही, असेही होऊ शकते. मात्र, त्यासाठी निकष असले तर याबद्दल मतमतांरे होणार नाहीत.
  पुरस्कारप्राप्त ब्लाॅगची संख्या वाढविणे संयोजकांना आवश्यक वाटत असेल तर त्यामध्ये गट करता येतील. कारण ना ना विविध विषयांवरील ब्लाॅग आहेत. त्यांची रचना जशी वेगळी आहे, तसाच विषयही वेगळा आहे. त्यांना मिळणारा प्रतिसाद वेगवेगळा आहे, त्यांचा तो चालविण्याचा उद्देशही वेगळा आहे. काही ब्लाॅग तर अगदी मिडियाच्या तोलामोलाचे काम करीत आहेत, अन त्यांना प्रतिसादही तेवढाच मिळत आहे. तर काही ब्लाॅग हे अगदीच आत्मकेंद्री असतात. त्यामुळे खरे तर याचे परीक्षण करणे हेही अवघड काम आहे. त्यामुळेच काही तरी निकष हवे आहेत, असे वाटते. एका चांगल्या उपक्रमाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलू नये याची काळजी घेण्याची गरज आहे. तशी ते संयोजक घेतली याचीही खात्री आहे.

  • विजयजी
   खूप छान लिहिलंय तुम्ही.अगदी बॅलन्स्ड विचार आहेत. तुमचे शेवटचे वाक्य खरंच विचार करायला लावणारे आहे .. “एका चांगल्या उपक्रमाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलू नये याची काळजी घेण्याची गरज आहे. तशी ते संयोजक घेतली याचीही खात्री आहे.”

 16. वरील सर्वांशी सहमत 🙂
  महेंद्रदादा आवडली ही देखील पोस्ट ! फ़ेबु वर श्रेयाताईंनी मांडलेला विचार इथेही मांडतो…
  तुम्ही नव्हता म्हणुन आमचे फ़ावले 😉

 17. anukshre says:

  yogy ani chan post. avadali.

 18. Pingback: ’स्टार माझ्या’च्या ब्लॉग माझा स्पर्धेतलं यश. | माझी मराठी

 19. http://nandanji.blogspot.com/
  पंडित रामभाऊ विजापुरे हे नामवंत पेटीवादक नुकतेच दिवंगत झाले. मी त्यांच्याबद्दल थोडेसे लिहिले आहे. कृपया वाचावे.
  नंदन

 20. Bharati says:

  महेन्द्रजी , अपेक्षेप्रमाणे सुंदर पोस्ट..इतराना छान आदर्श दिला आहे..प्रत्तेकानी हा आदर्श डोळ्या समोर ठेवावा.

 21. Pingback: ’स्टार माझ्या’च्या ब्लॉग माझा स्पर्धेतलं यश. | माझी मराठी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s