शिवसेना की मनसे? हा मुद्दा कोण उचलणार?

vt, victoria terminus, WOrld heritage,

छत्रपती शिवाजी टर्मीनस

मराठी आहात?? मुंबईला रहाता?? मनसे, शिवसेनेचे कार्यकर्ते आहात?? काय म्हणताय- उत्तर होय असं आहे?? बरं अजून एक प्रश्न कधी छत्रपती शिवाजी टर्मीनसला गेले आहात का? कधी त्या भव्य इमारतीसमोर उभे राहून त्या इमारती कडे डॊळे भरून पाहीले आहे?  मी आजपर्यंत बरेच वेळा त्या इमारतीमध्ये किंवा त्या इमारती समोरून   गेलो आहे पण त्या इमारतीचे सौंदर्य डोळ्यांमधे साठवून घेण्या पुरता पण वेळ नसतो. मला वाटतं सगळ्यांच्या बाबतीतही असंच होत असावं, आपण आपल्या कामामध्ये इतके गुंतलेले असतो की बऱ्याचशा सुंदर गोष्टींकडे आपले लक्षच जात नाही..

१९९६ मधे शिवसेनेच्या आग्रहामुळे या व्हीटी स्टेशनचे नामकरण छत्रपती शिवाजी टर्मीनस करण्यात आले . आपल्या गुलामगिरीच्या खुणा पुसून टाकायच्या म्हणून  जे काही केलं गेलं त्या मधे काळा घोडा राणीच्या बागेत नेऊन ठेवणे, तसेच इंग्रज अधिकाऱ्यांचे मुंबईभर लावलेले पुतळे काढून टाकणे आणि राणीच्या बागेत नेऊन टाकणे वगैरे तर झालेच पण त्याच बरोबर इंग्रज अधिकाऱ्यांच्या काळातली नावं बदलून त्या जागांना किंवा रस्त्यांना  हिंदुस्थानी नावं देणं  हे पण झालंच..

परवाचीच गोष्ट आहे, एका  मित्राची वाट पहातो रेल्वेच्या मुख्यालयासमोर म्हणजे सीएसटी समोर उभा होतो. तो यायचा होता, म्हणून इकडे इकडे पहात वेळ काढत होतो. मुंबईचे हे बाकी बरे आहे, तुम्ही कुठेही उभे राहिलात तरी तुम्हाला  कंटाळा येऊच शकत नाही. बऱ्याच निरनिराळ्या लोकांची / किंवा ट्रॅफिकची गम्मत पहात वेळ छान जातो.

पण आजचा दिवस थोडा वेगळा होता. काही फिरंगी लोकं घेऊन एक बाई आल्या होत्या आणि त्या  सगळ्यांना ही वर्ल्ड हेरीटेज असलेली इमारत दाखवत होत्या. आपसूकच माझी पण  ट्रॅफिककडे पाठ झाली आणि मी  पुन्हा सिएसटी च्या इमारती कडे (खरं सांगायचं तर त्या  फिरंग्यांकडे  🙂 )  पाहू लागलो. समोरच कोळशाच्या इंजिन्स मधे पाणी भरण्याचे दोन पाईप शोभे करता लाऊन ठेवलेले आहेत. नुकतीच ही इमारत स्वच्छ करण्यात आल्याने कमानीवर वापरलेल्या दगडांचे वेगवेगळे रंग उठून दिसत होते. जेवायला बसावं, आणि आकस्मित पणे एखाद्या चिंबोरी मधे एक सुंदर सा मोती निघावा तसे झाले होते माझ्या बाबतीत. ब्रीटीश काळापासून लावलेल्या काचेची रंगीत कलाकुसर केलेली तावदाने सुंदर दिसत होती. तसेच काही दगडाच्या कोरीव  जाळ्या पण लक्ष वेधून घेत होत्या. “द ग्रेट इंडीयन पेनिनसुला “चा लोगो (भारतीय रेल्वेचे ब्रिटीशकालीन नांव होते ते) दिमाखात इमारतीच्या समोरच्या  दर्शनी भागात कोरलेला दिसत होता.

खरं सांगायचं, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे माझे लक्ष गेले  ते केवळ साईटसिइंग करता आलेले फिरंगी ह्या इमारतींचे फोटो काढत होते म्हणून माझं पण कुतुहल चाळवल गेलं, नाहीतर मी सुद्धा इकडे तिकडे  बघत   वेळ काढला असता. गाईड असणारी तरूणी सांगत होती की ही इमारत केवळ दहा वर्षात बांधून झालेली आहे, आणि बांधकाम करतांना सिमेंटचा वापर अजिबात करण्यात आलेला नाही वगैरे वगैरे.

vt station, world heritage

पितळेची पाटी वर्ल्ड हेरीटॆज म्हणुन लावलेली.

समोरची मुंबई महापालिकेची इमारत पण सारखी लक्ष वेधून घेत असते. सीएसटी समोरचे कंपाउंड पण लोखंडी ग्रील चे आणि ब्रिटीशांच्या काळापासून चे आहे, तरीही अद्याप त्याचा डौल काही काही कमी झालेला नाही. त्याच कंपाउंडवर  असलेला एक बोर्डावर युनिस्को ने या इमारतीला संरक्षित स्मारकाचा दर्जा ( वर्ल्ड हेरीटेज ) दिल्याची पितळी पाटी समोर लावलेली दिसत होती.  पाटी व्यवस्थित चकाकत होती, ब्रासो ने पॉलीश केल्यामुळे. त्या पाटीचा फोटो काढण्यात सगळे गुंतलेले पाहून मग मी पण सेल फोनने एक फोटो काढला.

तेवढ्यात दर्शनी भागाकडे लक्ष गेले, आणि तिथली ’एक रिकामी जागा ’ लक्ष वेधून घेत होती. वर  दगडी छत्री, खालती पण एक दगडी बेस असलेली ती रिकामी जागा का सोडली असेल बरं?? त्या गाईडला   विचारावे म्हणून तिला एक्सक्युज मी म्हंटले, तर काय हा काळा माणूस माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय म्हणून किंचित रागाने आणि तुच्छतेने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले तिने, आणि आपल्या बरोबर असलेल्या त्या फिरंगी पाहुण्यांना घेऊन निघून गेली. मी एकदा स्वतःकडे पाहिले, आपण अगदीच काही वाईट दिसत नाही , कारण   मिटींग असल्याने काळी पॅंट पांढरा शर्ट ,हातात सॅमसोनाईटची सॅक. इतका वाईट नव्हता अपीअरन्स! स्वतःशीच हसलो, की अजूनही त्या ब्रिटीश धार्जिणा मनोवृत्तीचे किती गुलाम आहोत आपण नाही? केवळ गोऱ्यांसोबत ती होती म्हणून तिला काळ्यांशी बोलायची पण इच्छा होत नव्हती.. असो!अजून पुढल्या किती पिढया हीच मानसिकता घेऊन जगणार आहेत कोण जाणे!

या फोटो मधे लाल रंगात केलेला चौकोन जो आहे त्याच जागी पुर्वी राणीची मुर्ती होती.

हे सगळं होई पर्यंत १० एक मिनिटं झाली असतील. अजूनही माझा मित्र पोहोचलेला नव्हता. मुद्दाम त्या इमारती कडे निरखून पाहिले, आणि तिचे सौंदर्य एकदम नजरेत भरले. आजपर्यंत इतक्या वेळेस येऊन गेल्यावर पण  न दिसलेले रंगीत लाल आणि काळ्या दगडांनी साधलेली रंगसंगती, आणि मगराचे पुतळे.. सगळं काही नीट पाहिलं. काचेच्या तावदाना वरच्या नक्षी काम बघून वाह ! म्हणून शब्द तोंडातून निघाला.

समोरच  एक रेल्वेचा पोलीस उभा होता. हातामध्ये घेतलेली मशिनगन, खाकी स्मार्ट युनीफॉर्म, आणि त्यावर असलेली शिंदे हया मराठी नावाची पाटी! नमस्कार! शिंदेंशी बोलणे सुरु केले. शिंदे पण तसे कंटाळलेलेच दिसत होते. अहो दिवसभर गेट वर हातात मशिनगन घेऊन उभं रहायचं म्हणजे काय चेष्टा आहे की काय? कंटाळा हा येणारच!

त्या इमारतीवरची ती  रिकामी जागा मात्र  मला खूप अस्वस्थ  करीत होती. शिंदेंना विचारले, तर ते  म्हणाले, की ब्रिटीशांच्या काळात  त्या जागेवर  राणी व्हिक्टॊरीयाचा पुतळा होता पण काढून टाकण्यात आला, आणि त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचे ठरवले होते, पण युनेस्कोच्या नियमा प्रमाणे वर्ल्ड हेरीटॆज असलेल्या इमारतीचा दर्शनी भाग ( एलीव्हेशन) बदलता येत नाही म्हणून तिथे शिवाजी महाराजांचा  पुतळा लावण्याचे कॅन्सल करण्यात आले.  ही गोष्ट ऐकली आणि संताप आला, ठरवले की हा मुद्दा आपण शिवसेनेच्या साईटवर आणि मनसेच्या साईटवर मांडायचा. अर्थात त्यांना माहीती असेलच … तरीही..

युनेस्को कडून मिळणाऱ्या मेंटेनन्सच्या पैशासठी  तिथे श्री शिवाजी महाराजांचा पुतळा न बसवणे  कितपत योग्य वाटते? तो पैसा मिळाला नाही तरीही काही फारसा फरक पडत नाही,पण तिथे पुतळा मात्र बसवायलाच हवा.आपल्याच देशात शिवाजीमहारजांचा पुतळा लावायची पण जर चोरी असेल तर याला आपण स्वातंत्र्य  कसे काय म्हणू शकतो  ?

यावर जास्त काही लिहायची इच्छा नाही, फक्त ती रिकामी जागा मात्र खूप डोळ्यांना खुपत राहील या पुढे  छत्रपती शिवाजी टर्मीनस  च्या समोरून जातांना.इथे  खाली जुना   फोटो देतोय त्या मधे राणीचा पुतळा आहे बघा,निटसा दिसत नाही पण अस्तित्व मात्र जाणवते., कारण  १८९४ चा  फोटॊ आहे तो.

कार्पोरेशन मधे शिवसेनेचे लोकं असूनही हे काम होऊ शकत नाही ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे !

ह्या फोटॊ मधे पहा तो व्हिक्टोरीया राणीचा पुतळा दिसतो. पण खूप जुना फोटो असल्याने जास्त क्लीअर नाही..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

80 Responses to शिवसेना की मनसे? हा मुद्दा कोण उचलणार?

 1. भारतात आणि जगात आणखी किती तरी UNESCO World Heritage sites आहेत . मग कुठे कुठे आणि कोण कोणाचे पुतळे बसवायचे ? आणि मग तालिबान्यांनी बौद्ध मूर्तींचा जो विद्वांस केला त्याचे समर्थन करायचे का ?

  खालील माहिती UNESCO च्या website वरून …….

  World Heritage/The ओन्वेन्तिओन What is World Heritage?
  World Heritage is the designation for places on Earth that are of outstanding universal value to humanity and as such, have been inscribed on the World Heritage List to be protected for future generations to appreciate and enjoy. Places as diverse and unique as the Pyramids of Egypt, the Great Barrier Reef in Australia, Galápagos Islands in Ecuador, the Taj Mahal in India, the Grand Canyon in the USA, or the Acropolis in Greece are examples of the 911 natural and cultural places inscribed on the World Heritage List to date.

  • माझा मुद्दा निटसा लक्षात आलेला दिसत नाही तुमच्या. जेंव्हा राणीचा पुतळा काढला तेंव्हाच शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचे ठरवले होते, आणि केवळ युनेस्कोच्या नियमाला मान म्हणून ते टाळले गेले.

   जगात बऱ्याच ठिकाणी अशा जागा आहेत त्या बद्दल ची कॉमेंट जरा टॅंजंट जाते आहे म्हणून उत्तर देत नाही.

   पण जर कोणी भारताबाहेर राहून भारतावर केवळ पैशाच्या जोरावर नियंत्रण ठेउ पहात असेल तर ते अयोग्य आहे असे माझे मत आहे.

   तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा लावल्याने त्या पुतळ्याचा मान वाढेल असे नाही. पण जर तिथे लावल्यानेही वर्ल्ड हेरीटेजला काही फरक पडेल असेही नाही.

   • मला जे सांगायचे होते ते खाली नचिकेत आणि अभिजित च्या प्रतिक्रियेत व्यवस्तीत माडले आहे .
    आपल्याला माहित असेल पण तरीही एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि UNESCO हि जगातील 197 plus 7 देशाची संस्था आहे . आणि आपण हि त्याचे सदस्य आहोत आणि आपला हि पैसा तिथे वापरला जातो .त्या मुले कोणी भारता बाहेर राहून पैश्या च्या जोरावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्नच येत नाही .
    World Heritage sites बाबतीतले सर्व नियम हे इतिहास , पुरातत्व शास्त्र , सामाजिक शास्त्र यातील तज्ञ लोकांनी बनवले आहेत आणि त्यांनी ते सर्व गोष्टीचा / शक्यतांचा विचार करून बनवले आसतील .
    क्षण भर विचार का कि समजा उद्या कोणी म्हणाले कि ताज महालात महादेवाची पिंड ठेवावी आणि तसे केल्याने World Heritage site मध्ये काही फरक पडणार नाही . या विचाराचे consequences काय असतील हे न विचार केलेलेच बरे !
    बाकी आगोदरच्या प्रतिक्रियेतील harsh tone बद्दल sorry !

    • काय होतं , प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतात. तुमच्या मताचा पण आदर आहे. इथे मूळ मुद्दा इतकाच.. कदाचित तुम्हाला माहीत नसेल म्हणुन सांगतो. साधारण पन्नास वर्षापुर्वी एक आंदोलन झाले होते , त्या मधे सगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या पुतळ्यांना हलवण्याची मागणी केली गेली होती. काही पुतळ्यांचे शिरच्छेद पण करण्यात आले होते. तेंव्हाच मग ह्या पुतळ्याचे पण स्थानांतरण करण्यात आले ( कुठे ते ठाऊक नाही). त्याच वेळेस या ठीकाणी रिकामी जागा वाईट दिसते म्हणुन नवीन पुतळा लावण्याचे ठरले होते, पण ते बारगळले..
     हा मुद्दा आहे.. आणि माझे म्हणणे फक्त इतकेच की त्यावर पुतळा लावल्याने बिल्डींगचे सौंदर्य कमी होणार नाही. पुतळा सिंहासनावर बसलेला पण लावला जाऊ शकतो.. असो.. केवळ शिवाजी महाराजांचा एवढ्यासाठी म्हंटले, कारण की पुर्वीपासून तोच पुतळा बसवायचे सुरु होते.
     ताज महालाचा मुद्दा पुर्ण वेगळा आहे. त्यावर ताजमहाल की तेजोमहाल यावर एक वेगळे पोस्ट होऊ शकेल, तुम्ही पण लिहू शकता…. 🙂

     • Mahendra Sapre says:

      In the very first place, there was no need to remove all the statues of the English persons from Mumbai. On top that there was also no need to remove Queen Victoria from the Victoria Terminus. These are stark reminders of the colonial periods. Removing the statues as well as changing name of the terminus is an act of a mindset of a populace which lacks self confidence. The British gave us the Railways, Postal system, Ports, Shipyards and most of all the language which we are using to dominate in Industries worldwide that require English as a vehicle of knowledge even over Japanese and Germans. If you are a proud Indian, start a railway system such as Tube/subway, magnetic levitation, erect great terminus of beauty surpassing the Victoria Terminal now renamed Chhatrapati Shivaji Terminus. It is a hijack of an existing terminus. If you call yourself patriotic, do something constructive of which you will be proud of and which will surpass the beauty of prexisting heritage monuments.

      • Well, partially i agree with your views. I am also not in favour of installations of stautes. There is one earlier post पुतळ्यांचे राजकारण where i have covered this issue. Installations of he statues do not add any respect to the existing .. any way.. i will write a sepeate post on this.. 🙂
       Thanks for the comment.

       • Mahendra Sapre says:

        I would like to draw attention of all to the the magnificent bridge the chinese built recently, the Osaka Terminus, literally there is a city under the road junction, a hotel called Osaka Centre with beds in excess of 6000 beds, the railways are on seven tiers literally below in the basement of the Hotel. Proud Indians there a wake up call to all of us. Dont throw “Firangi Statues” away, throw the corrupt politicians into the dungeons. Indians always sold their souls to others. Rajasthan has the best of palaces in a place where even a blade of grass never grew, Rajputs are brave but they were hardly ever rulers, they always compromised with the Mughals and built their palaces and wealth on blood money of their highly impoverished population. Today’s Indians are doing nothing else. Any takers to counter my arguments?? Rajputs from Marwad have gone and baniya Marwaris have replaced them. The song remains the same. So I suggest we learn from history, not obliterate it. The JNU historians have already done with with the blessings og the Nehruvian Socialism.

 2. काका सर्वप्रथम ह्या लेखाबद्दल तुमचे खूप आभार. खूप महत्वाच्या विषयाकडे तुम्ही लक्ष वेधलेत.

  काका युनेस्कोने परवानगी नाकारल्यावर आपले रक्त उसळले (माझेही असेच झाले असते) पण जर युनेस्कोने ह्या वास्तूची दखल घेतली नसती तर कदाचीत आपण तिची डागडुजीही केली नसती.
  इतक्या वर्षात साधे लक्षही जेथे गेले नाही तिथे तुमचेही लक्ष फिरंग्यामुळेच त्या वास्तूकडे गेले. आपले असे उलटेच आहे…आपण स्वत:च आधी आपल्याबद्दल उदासीन आहोत…हीच वास्तू का इतरही अनेक किल्ले वगैरे आपली वाट पहात कित्येक वर्षे तिष्ठत उभे आहेत..त्यांचे काय?
  युनेस्कोमुळे निदान हिची तरी देखभाल होईल..
  व राहिला प्रश्न राणीच्या स्मारकावर महाराजांचा पुतळा लावण्याबाबत तर ते ही मला तरी नाही पटत.

  महाराजांसाठी अशा दुसऱ्याच्या वास्तूत तिसऱ्याच्या परवानगीने जागा करणे पटत नाही. आपल्याला खरचं जर आपल्या महापुरुषांची चाड असेल तर त्यासाठी आपण स्वतंत्र जागा वा वास्तू करणे केंव्हाही योग्य.

  यासाठी शिवसेना व मनसेवर आंधळा विश्वास ठेवणे वा विसंबून रहाणे हेही अयोग्यच कारण जर आपण स्वत: ह्यासाठी काही करू शकत नाही तर इतरांकडून ती करणे व्यर्थच…

  ह्या लेखातून वा घटनेतून आपणच आपले आत्मपरीक्षण केले पाहिजे व आपले नक्की कुठे व काय चुकते ते समजून घेतले पाहिजे.

  • रणजीत

   ही वास्तू भारतीय लोकांनीच बांधलेली आहे इंग्रजांच्या काळात. तिच्यावर पुतळा बसवायला तिसऱ्याच्या परवानगीची गरज नसावी हीच गोष्ट मला पण म्हणायची होती.

   युनेस्कोने जरी पैसे दिले नाहीत तरीही भारत सरकार या वास्तूचे संरक्षण करु शकते, अर्थात आपल्याकडे असलेले खाबू नेते पाहिले तर ते त्यातही आपलाच स्वार्थ पहातील यात संशय नाही, पण युनेस्कोच्या मदतीशिवाय वास्तू मेंटेन केली जाऊ शकते.

   नुकतेच मुंबई महापालीकेच्या बिल्डींगचे पण स्वच्छतेचे काम करण्यात आले. ( त्या साठी इतर कोणीच मदत दिलेली नाही युनेस्कोने सुद्धा) सगळ्या बाहेरील भागाला स्वच्छ करण्यात आले. वांद्रे स्टेशनची इमारत पण नुकतीच म्हणजे ४-५ महिन्यापुर्वीच स्वच्छ करण्यात आली. सांगण्याचा उद्देश हा की आपणही हे सगळं करू शकतो, फक्त जाणीव व्हायची गरज आहे.

   • पैसे दिले की आम्ही वाट्टेल ते काम करतो असे म्हणायचे आहे का?

    मला तर वाटते की खरा भारतीय पैसे खावून सुद्धा अयोग्य काम करत नाही… 🙂

    • म्हंजे काय आहे की घरी आलेल्या लक्ष्मीला आम्ही नाही म्हणत नाही पण तिला घरातल्या नितीनियमानुसारच काम करावे लागते ना?

     हे आम्ही स्वतःबद्दल बोलत नसून काही स्वच्छ व्यक्तिमत्वांचे मनोद्वंद्व पाहिल्यानंतरची आमची प्रतिक्रिया आहे…

     • म्हणून काम अडकले की आम्ही स्वतः नेहमी… काय गडबड नाही सावकाष करा असेच सांगतो… आणि आमची सर्व कामे वेळेतच पूर्ण…

     • लक्ष्मी पुढे सगळेच नमते घेतात.

      • “तिथे आपल्या मनीमानसीचाच पुतळा आहे” अशी पाटी युनेस्कोच्या जाहिरातीशेजारीवरखालीबाजुला लावली तरी उदंड…

       • आता त्याला “पाटी” म्हणायचे की “करवंटी” हा वेगळा मुद्दा आहे म्हणून “फलक” हा योग्य शब्द वाटतो पण तो पडला गैर मराठी म्हणून बॅनत तर नक्कीच नको…

        आता ह्या ठिकाणी “शब्द” शोधताना समग्र सावरकरी वाङमयाव्यतिरिक्त काय काय उपयोगी आहे ते शोधा…

 3. अगदी तात्विकतेच्या मुद्द्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा चालत नसेल तर त्यांच्या राणीसाहेबांचा किंवा माँसाहेबांचा लावायला काय हरकत आहे… मस्त नऊवारी साडीतला…

  १०० टक्के अनुमोदन…

  म्हणजे काय आहे की हा गुंता सोडवायलाच हवा… राणीचा पुतळा असल्यावरच जर युनेस्को हेरिटज साईट राहात असेल अन्यथा नाही तर गेले युनेस्को तेल लावायला….

  इति
  मम्मत

  • 😉 राणीचा पुतळा नऊवारी साडीतला…. भन्नाट कल्पना आहे.. 🙂 काही हरकत नसावी कोणाचीच..

   • खरोखरच तो तात्विक मुद्दा कागदोपत्री आहे की अशी अफवा उठवून महाराजांचा पुतळा लावण्ण्यात अडथळा आणलाय हे पहिल्यांदा तपासायास हवे…

    इंदिरा गांधीच्या आणिबाणी काळातली घोषणा आठवली का?

    अफवांवर विश्वास ठेवून का? मकरू नका!

   • harshal bagal mahadeo says:

    uttam aahe maja mate ranichya putalya cha jagi sambhaji rajacha putla baswawa

    • काहीतरी बसवा म्हणाव.. बस्स… 🙂

     • श्री गुरुदेव दत्त प्रसन्न भागवत says:

      त्यापेक्षा आपण ती जागा सर करू आणि तिथेच पर्वतारोहण करून जाऊन त्या जागी हात हावून घरीच येऊन बसू…

 4. काका,
  ह्यातनं बरंच पॉलिटिकल मायलेज मिळू शकतं..तरी कुणी हे हाती का घेत नाहीत हा एक प्रश्नच आहे… 😉

  • पोलीटीकल मायलेज खूप मिळू शकते, पण अजूनही हा मुद्दा कोणीच कसा उचलला नाही याचं मलाही खूप आश्चर्य वाट्लं होतं

 5. आल्हाद alias Alhad says:

  मुद्दा पटला…
  अवांतर:
  “द ग्रेट इंडीयन पेनिनसुला” हे भारतीय रेल्वेचे नसून आजच्या सेंट्रल रेल्वेचे जुने नाव आहे. जीआयपी सारखीच मुंबईत बॉम्बे बरोडा अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया (BBCI) म्हणजे आजची वेस्टर्न रेल्वे आणि चर्चगेट स्टेशन हे मुख्यालय.
  याशिवाय कोल्हापूर साईडला MSM म्हणजे मद्रास अ‍ॅण्ड सदर्न मरहट्टा (मराठा) ही रेल्वे पण होती.
  या व अशा अनेक रेल्वेज्‌ची मिळून आजची भारतीय रेल्वे बनते. आजची पाकिस्तान रेल्वेसुद्धा याचाच भाग!

  🙂

 6. ngadre says:

  lekhatale CST station che barkaaeene kelele varnan khoop avadale.

  Chimbori t moti nighava hee kalpana majeshir ahe.

  (BTW .. Tisarya madhe nighava asa mhanayacha hota ka tumhala?)

  • चिंबोरी म्हणजे एक प्रकारचा शिंपला. एकदा मित्राकडे खाल्ला होता, तेंव्हाच हे नांव समजले. तिसऱ्या म्हणजे खूप लहान , हा थोडा मोठा असतो त्यापेक्षा. 🙂
   माझ्या दृष्टीने चिंबोरी काय किंवा तिसऱ्या काय , दोन्ही एकच.. शेवटी काय, तर “उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म” समजायचं…

 7. फ़क्त त्यांच्याकडुन मिळणारया पैशामुळे आपण तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा लावत नसलो तर ते चुकीचेच आहे.ती खाली जागा आधी नाही पण हा लेख वाचल्यानंतर खरच डोळ्यांना खुपतेय.बघु आता कोण उचलते का हा मुद्दा…

 8. ngadre says:

  achchaa.

  Sorry..mool vishay sodun ugeech chimbori vagaire avaantar jhale.

  Mala vatat hote ki chimbori ha blue khekda asato..

  Ajoonahee gondhal vatatoy jara.

  pan mool vishay to nahi tyamule punha sorry.

  Lekh jhakas ch.

  CST kade baghayala kharech vel nasato..

  Ani asala tari ichchaa nasate..ghari pochayachi ghaai.

 9. दादा, खुप महत्वाचा मुद्दा मांडलात. पण खरे सांगु, ती जागा रिकामी आहे आणि रिकामी राहतेय यापेक्षाही हि गोष्ट याआधी कधीच का लक्षात आली नाही माझ्या, हे जास्त खलतेय मला.

  • विशाल
   मला पण ते जाणवलं केवळ तिथे अर्धा तास उभा होतो म्हणून. नाहीतर लक्षातही आलं नसतं.

 10. जबरदस्त,
  मला वाटते जसे तुमचे लक्ष त्या वास्तूकडे गेले तसे प्रत्येकाने आजूबाजूला ठेवून असे मुद्दे प्रकाशात आणले पाहिजेत. उदासिनता झटकायला हवी.

  • पल्लवी
   मी स्वतःच मान्य केलंय की तिकडे लक्ष कसे गेले ते. आपण फारच निष्काळजी आहोत या बाबतीत. पुढल्या वेळेस पुण्याला आलो की विश्रामबाग वाड्याला नक्की जाणार.

 11. Nachiket says:

  व्हिक्टोरियाचा पुतळा काढला तिथेच दर्शनी भाग बदललाच की..

  मग कसले युनेस्कोचे नियम?

  की आधीच काढला होता..?

  आणि जर आधीचा पुतळा (ब्रिटिश गुलामगिरी वगैरे बाजूला ठेवून फक्त एक शिल्प किंवा मेमरी म्हणून पाहिलं तरी) आता काढलाच आहे त्या जागेवरून तर मोकळी जागा अधिक विद्रूप दिसण्यापेक्षा त्या आर्किटेक्चरला शोभून दिसेल असा काही आयकॉन तिथे लावावा ना.

  शिवाजी महाराज हे सर्वात आदरणीय व्यक्तिमत्व आहेतच. पण सर्व वाद आणि गोष्टी शिवाजीमहाराजांपाशी सुरू आणि त्यांच्यापाशीच (त्यांचे नाव/ पुतळा यापर्यंत येऊनच) समाप्त व्हावेत असं नाही..

  • कोल्हापुरचे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट (काळं)बेरी ह्यांना अवश्य पाचारण करावे कारण तिकडचे रविंद्र मेस्त्री आता फक्त परमेश्वराच्या दरबारात काम करतात त्यामुळे त्यांना वेळ नाही…

   अर्थात बेरी फक्त घरेच बांधतात त्यामुळे तेही ते काम करू शकणार नाहीत पण कदाचित काहितरी चांगला (आदर्श) सल्ला देतील…

   • शिरीष
    प्रतिक्रियेसाठी आभार.. 🙂
    नचिकेत
    अगदी योग्य मुद्दा मांडलाय. जे काही बदल व्हायचे ते झाले आहेतच… अजून काय फरक पडणार आहे ??

 12. Nachiket says:

  “सामान्य मुंबईकर माणूस” असा एक सिंबॉल /आयकॉन/पुतळा, आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन च्या धर्तीवर बनवावा आणि तोच सर्व वादग्रस्त जागी लावावा. कॉमन मॅन सारखा कार्टून फॉर्मॅट मधे करू नये हवं तर..

  किंवा मग आता सी एस टी चा संदर्भ म्हणून दहशतवाद्यांकडून शहीद झालेल्या तडफदार जवान्/पोलीस अधिकारी/कॉन्स्टेबल यांची त्रिमूर्ती किंवा शिल्प किंवा सिंबॉलिक मूर्ती लावावी.

  • नचिकेत

   ह्या गोष्टीवर खूप चर्चा होऊ शकते. 🙂

   • Nachiket says:

    मग होऊ दे की..

    चांगलेच आहे.. 🙂

    हा माझा मुद्दा चुकीचा वाटतोय का?

    • मुद्दा एकदम बरोबर आहे.. RK Laxaman चा कॉमन मॅन एकदम बेस्ट!!

     • Smita says:

      why not JRD Tata? Tatas have contributed so much to modernization of India and Mumbai is their turf indeed.

      • इथे कोणाचा पुतळा लावायचा हा मुद्दा माझ्या मनात नव्हता, फक्त पैशाच्या जोरावर युनेस्को आपल्याला वाकवते, आणि आपण तसे वाकतो … हे पाहून मला अवघडल्यासारखे झाले. बस्स, इतकाच मुद्दा होता. जे आर डी बद्दल तर कोणालाच आक्षेप असणार नाही. यावर भानू काळॆंचा एक सुंदर लेख वाचला होता, तेंव्हाच जेआरडी किती मोठे ते लक्षात आले..

       • Nachiket says:

        मुळात महेंद्रजींचा आग्रह अमुक एका (छत्रपती शिवाजी महाराज) पुतळ्यासाठी किंवा व्यक्तीसाठी नाहीच आहे म्हटल्यावर वादाचा हा भाग आता उरतच नाही.

 13. abhijeet says:

  चार मुद्दे :
  १) जेव्हा युनेस्को ने CSTला world heritage site दर्जा दिला, त्याच्या आधी किमान ४० वर्षे महेंद्र यांनी लाल चौकोन करून दाखवलेला तो कोनाडा मोकळाच होता. त्यामुळे, दर्शनी भाग न बदलण्याची अट लागू आहे ती त्या मोकळ्या कोनाड्याला देखील लागू असली पाहिजे. युनेस्को ही काही फक्त एका वर्ण, देश, प्रदेश, भाषा वा वंशाच्या लोकांची संस्था नाही — तिचे जे नियम जागतिक वारश्याच्या भल्यासाठी आहेत, ते न पाळण्यासाठी प्रादेशिक संघटनांना मदतीचे आवाहन कशाला?
  २) छत्रपती शिवाजी महाराजांचा उभाच्या उभा पुतळा ? कसा दिसेल तो?
  शिवाजी महाराज माहीत नसलेल्यांना, तो उभा पुतळा आणि मंदिरांच्या दाराशेजारील मूर्ती यांतला फरक कळणे कठीण व्हावे… हा दिवस आपल्याला पहायचा आहे काय?
  ३) CST स्टेशन चा इतिहास, त्याच्या अंतरंगात आणि बह्यांगात असलेली सौदर्यस्थळे जाणून घ्यावीत असे मराठी माणसांना वाटत नाही का? मग, मराठीतून CST च्या माहिती-फेऱ्या (गायडेड टूर्स) का नाहीत? ( जर कुणाकडे मदत मागण्याचा सूर महेंद्र यांना CST संदर्भात लावायचाच होता तर गायडेड टूर्स कोण करणार, असे त्यांनी म्हणणे अधिक योग्य झाले असते.
  ४) हेरीटेज वॉक चे गाईड सहसा दुसऱ्या कुणाशीच बोलत नाहीत. त्यामुळे त्या बाईकडे अगदी काळ्या कुळकुळीत रंगाच्या माणसांचा ग्रूप असता, तरी महेंद्र यांच्याकडे, किंवा मध्येच बोलणार्या अन्य कुणाहीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त होती!

  • युनेस्को ची ही अट मान्य करणे योग्य आहे का? हाच माझा प्रश्न आहे. जर युनेस्कोने जागतीक धरोहर म्हणुन दर्जा हा आपल्या स्वाभिमानापेक्षा मोठा असू शकत नाही.

   उभा पुतळा लावा ही माझी मागणी नाही- फार जूनी मागणी आहे ती. जेंव्हा नामकरण झाले, त्यापुर्वीचा हा मुद्दा आहे. तेंव्हाच शासनातर्फे नविन पुतळा लावण्याचे योजीले होते, पण नंतर ते बारगळले.

   मुद्दा क्रमांक ३ मान्य.

   हेरीटेज वॉक चे गाईड्सचे दुसऱ्या कोणाशी न बोलणे हे शिष्ठाचाराला धरून नाही, त्यामुळे त्याचे समर्थन होऊ शकत नाही. फिरंगी हा शब्द परदेशी नागरीक या अर्थाने वापरला होता. तिथे वर्णभेदाचा मुद्दा अपेक्षित नव्हता. फक्त लिहिण्याच्या ओघात जसे लिहिले गेले त्यामुळे तसा समज झाला असेल.

   • Nachiket says:

    युनेस्को ची ही अट मान्य करणे योग्य आहे का?

    ……………….

    वर्ल्ड हेरीटेज दर्जा हवा असेल तर युनेस्कोची अट मान्य करायला हवी, किंवा अशा “हेरीटेज दर्जा” चा आग्रह सोडायला हवा.

    युनेस्कोचा नियम “बदल न करण्याचा” आहे.. “शिवरायांचा पुतळा” नको असा नाही किंवा
    अमुक एका व्यक्तीचाच हवा किंवा नको असा आग्रह ही नाही. जैसे थे ठेवले तरच हेरीटेज होईल असा त्यांचा नियम आहे.

    मला यात स्वाभिमानाला मुरड घालण्याचा प्रकार वाटत नाही.

    उद्या एखाद्या पिरेमिडमध्ये सध्याच्या इजिप्तला न आवडणारा दुष्ट राजाचा काही सिम्बॉल सापडला तर तो तोडून आणि सध्याच्या किंवा हिरो असलेल्या राजाचा सुटला /सिम्बॉल बसवून त्यांनी पिरामिडसारख्या पुरातन गोष्टीचे रूप बदलून टाकावं का?

    भारतावर राज्य करण्या-या (पर्यायाने गुलामगिरीत टाकणा-या) शहाजहानने बनवलेला ताजमहाल तोडणार का? ते ही मग गुलामगिरीचेच प्रतीक झाले की तसे पाहिले तर..फक्त जुनी केस इतकंच..

    प्रश्न गहन आहे खरा..

  • Nachiket says:

   किमान चाळीस (आणि त्याहून अधिकच) वर्षांपासून तो कोनाडा मोकळा आहे आणि त्याचा निर्णय अजून अधांतरी आहे हे माहीत नव्हते. शरमेची बाब आहे.

 14. Smita says:

  for whatever reason kahee Vastu taree heritage sites mhaNun japalya jatayat, he kahee kamee nahee, mala alikade sarakhee bhitee vaTat asate kee eke divashee Sinhgad fodun tithe plots paDun Nanded city phase 2 ( for example) hoil kee kay???

  putaLa ya babteet mala swta:la taree udaas vaTata . tumhee tithe putaLa asata taree pahila asataat ka? notice kela asataat ka? kitee ase putaLe tumchya margavar ahet aNee tumhala abhimaan vatanyaitaka veL deta yeto?? ( tumhee generically mhanatiye, apuN asach mhaNayacha hota. photo chaan.

 15. sahajach says:

  महेंद्रजी तूफान मुद्दा आहे हा…. माझा मुंबईशी संबंध कामानिमित्ताने कधितरीच यॆणारा पण CST अत्यंत जिव्हाळ्याचे कारण मामाचे रेल्वेचे ऑफिस त्याच कॅम्पसमधे होते… जेव्हा जेव्हा ही वास्तू पाहिली जाते तीचे सौंदर्य मनात उतरत रहाते पण तूम्ही म्हणताय ती मोकळी जागा कधिही पाहिली नव्हती…. किती हलगर्जीपणा असतो आपल्या वागण्यात असे वाटतेय आज…

  बाकि नचिकेतचा कॉमन मॅनचा मुद्दा पटतोय…. खरचं कूठल्या तरी पक्षाने (कोणिही) हा मुद्दा मनावर घ्यायला हवाय!!!

  • धन्यवाद. मी तिथे अर्धातास उभा होतो, तेंव्हा जे काही मनात आलं< ते इथे लिहिलंय. फारसा विचार केलेला नाही लिहितांना.

 16. काका, हा खरं तर इतका जबरदस्त मुद्दा आहे ना आणि अतिशय योग्यही.. पण त्यामुळेच वाटतं की दोन्ही सेना हा मुद्दा उचलणार नाहीत.. कारण कुठलेच ‘योग्य’ मुद्दे ते कधीच उचलत नाहीत !!

 17. Rajeev says:

  भांडा आणी पुतळ्यावरून वाद घाला….
  तीकडे मायावतीला समजल तर ती स्वत:च्या पुतळ्या साठी सी.एस.टी स्टेशन बनवेल, मग
  भरलेली जागा बघायला UPला जा……

 18. Rajeev says:

  असा रीकामा कोनाडा ( मेहेराब) मुस्लीम समाजाच्या प्रार्थना स्थळी असतो…
  ते तीक डे ( काबा कडे) बघून नमाज पढ्तात…
  CST वर तो तसाच राहीला तरी आपण आपल्या मनात आपल्या ला हवी ती मुर्ती
  ठेउन बघत जा….

 19. Rajeev says:

  राणीचा पुतळा काढ्ला, हे काय कमी झाले का ?
  भारतात रहाणार्या ” ईंडीयन ” लोकांना कळाले तर त्यांना राग येईल बरें!!

  • अरे राणीचा पुतळा काढला, याचं कारण म्हणजे साधारणपणे ५० वर्षापुर्वी झालेले पुतळ्यांचे शिरकाण. चक्क ्पुतळ्यांची डोकीऊडवली गेली होती इंग्रज लोकांच्या, नाही तर आमच्या मधे इतका दम आहेका शिल्लक?

 20. Monica Bhoite says:

  Hi

  I am reading your blog since few days.Its nice to read so many different topics from the same person.Well all the best.Always keep writing !!

  Best Wishes,
  Monica.

  • मोनिका
   ब्लॉग वर स्वागत आणि मनःपुर्वक आभार. अशा कॉमेंट्स मुळेच लिहिण्याचा उत्साह टीकून आहे. धन्यवाद..

 21. shardul says:

  Aaplyala putalyacha yevdha kavtuk ka aahe mahit nahi? yacha putala tyacha putala
  Tyani honar kay aahe?
  ek tar building bandhali british lokanni, aapan tyat kay bhar ghatli? geli 50 varsha swatantra maharashtra aahe, aapan rajjyachya saundryat kay bhar ghatli? kuthali vastu ubharli, kuthlya baaga ughadlya? navin jay dyat killyanchi kay awastha aahe? swatahach kahich kartrutva nastana ugachch ikade putale lava, tikde frames lava, naava badla yaala kay artha aahe?
  Tithe maharajancha putla lavnyas kunachich harkat nasavi, pan rikamya jaga bharnyasathi maharajancha putla kashala?
  Shivaji maharajancha putla ha tyanna shobhel asha vastutach hava, tashi layak vastu aapan banvu shaklo nahi yachi khant aahe.
  Ugichch UNESCO var khade phodnyat kay artha aahe? tyanche niyam aahet te badlat nahit (niyam ashakartach astat)
  (Aani chimbori mhanje khekda, shimplyala tisrya mhantat 😉 )

  • शार्दुल
   धन्यवाद.. प्रतिक्रियेसाठी आभार..
   पण ही वास्तू पण भारतीयांनीच बनवलेली आहे.
   आणि हो.. ते चिंबॊरी आणि तिसऱ्या– याच्या क्लिअरीफिकेशन बद्दल थॅंक्स! 🙂

 22. आयला, भारतमातेचा उभा पुतळा बसवा की तिथे, तो प्रसिद्धच आहे, कोणालाही ओळखू येईल ! शिवरायांचा उभा पुतळा शोभणारच नाही, सिंहासनातला पुतळा पण व्यवस्थित बसणार नाही. म्हणून भारतमातेचा पुतळा बेष्ट पर्याय !

  दुसरा मुद्दा युनेस्कोचा. युनेस्कोचे नियम फ़क्त भारतासाठी नाहीत तर जगभरातल्या सगळ्याच हेरिटेज साईट्ससाठी आहेत. त्यामुळे तो स्वाभिमानाचा मुद्दा बनत नाही.युनेस्कोचे नियम अगदीच कठोर आहेत म्हणून वास्तू आहे त्या स्थितीत टिकून राहतेतरी, नाहीतर आपल्याकडे किल्ल्यांच्या भिंतींवर दिलात लिहीलेले “बाळू loves बाळी” काय कमी असतात. जर यूनेस्कोला आणि भारतीयांना पण आपण अगदीच खात्रीपूर्वक हमी देऊ की आम्ही वास्तूची अगदीच निगा राखायला तयार आहोत, तर मात्र हेरिटेज यादीतून ही वास्तू काढावी आणि तिथे भारतमातेचा पुतळा लावावा!!!

 23. Dilip Vaidya says:

  This world heritage site has been disfigured permanently when the Queen’s statue was removed.
  In my opinion a proper representation has to be made to UNESCO to make them understand the circumstances which make it necessary to install a new figurine there.
  It might be just a blind assumption that UNESCO will not allow installing a new statue there and withdraw the World Heritage Status etc etc.
  Who can take the lead to make representation to UNESCO? But ofcourse, first the consensus has to be reached as to which new statue will be put up

  • दिलिप
   ब्लॉग वर स्वागत..
   युनेस्कोचे काही बेसिक रुल्स आहेत असं वाचण्यात आलं होतं, त्यामधे हा पण एक रुल आहे, की बिल्डींग डिफेस करू नये, आणि कुठलेही मॉडीफिकेशन करू नये म्हणून.

   तसे, तुमचे शेवटचे वाक्य पटलं.

 24. Ransangram says:

  mag takalaat ki nahi ha mudda Sene chya kinwa Manase chya site war…

  Mudda kharach changala aahe…

  • होय.. दोघांनाही कळवलंय. काही पदाधिकाऱ्यांशी पण संपर्क साधला होता. बघू या काय करतात ते?

 25. Gurunath says:

  British vicharanche ajun hi apan gulam ahot he tumhi var sangitlele agadi barobar aahe dada, mhanun…. fair and lovely khapate….. imported te changale vatate……. arvind mills la aplya product la “peter england” kinva “louis philip” “ferrino mezzoni” ashi nave dyavi lagatat kay karanar….. “Siyaram’s” che suite ghalanara tikat nahi….. siyaram chya fakt gulami safarya shivata yetat!!!!!….. pudhil sagale lavakarach majhya blog var okin mhanato!!!!!

 26. Gurunath says:

  चाणक्य म्हणतो ” धर्माचे पण मुळ धनात आहे, कुठला धर्म किती प्रभावी होईल हे त्या धर्मदायतले दान ठरवते….”

  राष्ट्रधर्म सुद्धा काही एक्सेप्शन नसावा बहुदा

 27. balika dhole says:

  thodas vishayantar, ani navin mudda,
  sagale paksha dava karatat ki aamhi maharashtriy, marathi manus ahat vishesh mhanaje shivsena ani mns pan aaj paryant kiti karyakarte shivnerichya payrya chadhun darshanas gele? aajhi shivneri andharat zurto aahe, aani wan khate tyachi andharat rakshan karat aahe. puratatwa wibhag, sarvjanik bandhkam vibhag, wan vibhagat tanta chalu aahe koni light bill bharayche mhanaje shivaji maharaj yanche kon hote nahi ka?

 28. Anonymous says:

  maharajancha putla jya divshi basel tya divshi marathi mansachya maana garvane unchavtil

 29. UDHDAV MALI VARANGAON says:

  maharajancha putla jya divshi basel tya divshi marathi mansachya maana garvane unchavtil

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s