क्राइम पेज…

(दीर्घ कथा- एकाच भागात)

लिव्हाइस ची जिन्स , त्यावर काळा टी शर्ट, पायात पांढरे पण वर डिझाइन असलेले स्पोर्ट शूज , डोळ्यावर काळा रेबन चा ओव्हल शेपचा गॉगल घालून मी तिथे उभा होतो. सकाळचे ११ वाजले होते. त्या शॉपींग मॉल ची दारं नुकतीच उघडलेली होती. अजूनही लोकांचे येणे काही सुरु झालेले दिसत नव्हते. दारावरचे काळी पॅंट आणि निळ्या रेघांचा शर्ट घातलेले हातात एक दांडू घेतलेले सिक्युरीटी सेवक समोर उभे होते. दोन स्त्रीया  सिक्युरीटी ऑफिसर्स  पण मुख्य द्वाराजवळ उभ्या होत्या. एक चौकट लावलेली होती- सो कॉल्ड मेटल डिटेक्टर. त्या चोकटी मधुन लोकं पास होत होते.

माझं लक्ष गेलं तिकडे. एक सुंदर तरूणी   त्या चौकटीतून पास झाली. त्या चौकटीतून जाण्यापूर्वी तिचा सेल फोन त्या सिक्युरीटी ने काढून घेतला होता. एकदा त्या मेटलडीटेकटर मधुन पास होतांना टींग असा आवाज झाला, तरीही तिकडे त्या सिक्युरीटी गार्डने अजिबात लक्ष दिले नाही. त्या दारातून पार झाल्यावर मात्र त्या मुलीला तिचा सेल फोन परत दिला. आणि ती मुलगी निघून गेली. मी सावकाश पणे त्या दाराकडे वळलो आणि निर्विकार पणे त्या मेटल डिटेक्टर मधुन पास झालो. वॉचमनने माझ्याकडे अजिबात लक्ष दिले नाही, आणि तो चहा कधी येतो याची वाट पहात उभा राहिला.

गेला पुर्ण आठवडा भर मी यांच्या या प्रोसिजर्स चा पुर्ण अभ्यास केला होता.  त्या मूळॆ पुढे काय होणार हे पुर्ण माहिती होते.एकदा आत शिरल्यावर…… अरे हो.. मी कोण हे तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. मी राज देसाई. वय ४०, शॉर्ट कमिशन घेऊन रिटायर्ड झालो मिल्ट्रीमधून. कॅप्टनच्या पोस्ट वर होतो मिल्ट्री मधे. तसा मी मूळचा एका अतिशय लहान खेड्यातला. कोल्हापूरजवळच्या एका नकाशावर पण न दिसणाऱ्या गावात माझा जन्म झाला. ग्रॅज्युएशन  मधे जेंव्हा पहिला वर्ग मिळाला, तेंव्हा गावातल्याच सुभेदार संभाजीराव पाटील यांनी मिल्ट्रीमधे जा म्हणून सांगितले. त्यांचा तो रुबाबदार युनिफॉर्म , कपडे वगैरे पाहून तर त्या मिल्ट्रीच्या नोकरीची भुरळच पडली होती. मिल्ट्रीच्या नोकरी करता अर्ज केला आणि नशिबाने मिल्ट्री मधे सिलेक्शन झाले. दोन युध्द लढलो, त्यामुळे युनिफॉर्म वर दोन फिता चढल्या होत्या. अगदी शेवटले काम म्हणजे सोमालिया मधे जाऊन आठ महिने राहून आलो, आणि आल्यावर रिटायर्ड झालो..

रिटायरमेंट नंतर परत आल्यावर नुसतं कॅप्टन साहेब म्हणून गावात तर खूप मान मिळायचा. मी एकटाच कॅप्टन झालो होतोना मिल्ट्री मधे. पण थोड्याच दिवसात रिकामा बसण्याचा कंटाळा आला. सुरुवातीला खूप वाटायचं की रिटायरमेंट नंतर शेती करू, पण लवकरच लक्षात आलं की ते आपलं काम नाही. म्हणून सरळ चंबू गबाळं आवरून मुंबईला आलो. इथे आल्यावर नोकरी शोधणे सुरु केल्यावर तर सगळीकडे फक्त सिक्युरीटी ऑफिसर चीच नोकरी ऑफर केली जात होती. माझे ग्रॅज्युएशन मधले मार्क्स, आणि माझे नंतर मिल्ट्री मधे असतांना केलेले पोस्ट ग्रॅज्युएशन, आणि एमबीए ला पण कुठलीच कंपनी महत्व देत नव्हती. आमचे एक जूने कर्नल एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होते, त्यांना भेटलो , तर त्यांनी पण स्पष्टच सांगितलं , की सिव्हिलियन्स मधे मिल्ट्री मधल्या खालच्या पोस्टवाल्यांना सिक्युरीटीमधेच नोकरी मिळते. इतर ठिकाणी जर अधिकाऱ्याची नोकरी हवी असेल तर कमीत कमी कर्नल तरी असावे लागते.

तर असा मी. उंची सहाफुट दोन इंच,  टिपिकल देशावरच्या लोकांसारखी शरीर यष्टी. खूप कमावलेलं शरीर, दररोजचा व्यायाम मी कधीच चुकवला नव्हता गेल्या कित्येक वर्षात. गेले दोन वर्ष मुंबईला रहातो आहे मी . एक दोन बिएचके चा फ्लॅट घेतला आहे भाड्याने दादर सारख्या उच्चवर्गीयांच्या वस्ती मधे. इतकी वर्ष नोकरी मिल्ट्रीची केल्यामुळे कधी लग्न करायची इच्छाच झाली  नाही. कदाचित आपल्या अपरोक्ष आपल्या बायको मुलांचे कसे होईल ह्याची काळजी असावी म्हणून लग्न केले नसावे.

तर त्या मॉल मधे शिरलो. शॉपर्स स्टॉप च्या त्या  घड्याळाच्या काउंटर कडे गेलो. तिथे जाउन त्या काउंटर वर जाऊन घड्याळं पहात   होतो. त्या काउंटर वरच्या मुलाने जवळपास दहा बारा घड्याळं काढून ठेवली होती समोर. माझे लक्ष समोरच्या त्या सर्व्हिलन्स कॅमेऱ्याकडे गेलं.  संपुर्ण स्टॊअर हे सर्व्हिलन्स कॅमेरा इक्विप्ड आहे म्हणुन मला माहिती होतं. तो काउंटर वरचा मुलगा खालच्या शोकेस मधलं घड्याळ काढायला मागे वळला, तेवढ्यात त्या घड्याळातलं एक दिड हजार रुपये किमतीचे घड्याळ मी हळूच काढून खिशात सरकवले.

मला माहिती होतं, की सर्व्हिलन्स कॅमे्ऱ्याने हे सगळं टीपलं असेल, आणि खालच्या दाराजवळच्या वॉचमन ला हे कळवलं गेलं असेल. माझे लक्ष समोअरच्या  दारावरच्या वॉचमन कडे गेलं,  तो वकीटॉकी वर बोलत होता, आणि माझ्याकडेच पहात होता बोलता बोलता त्याने  माझ्या दिशेने चालणे सुरु केले  आणि म्हणाला की ’

साहेब, ’तुम्ही जरा सोबत चला माझ्या बरोबर.’
’अरे मी देणारच होतो त्या घड्याळाचे पैसे’ , आणि ते घड्याळ काढून समोर काउंटरवर ठेवले आणि वॉचमन सोबत त्याच्या केबिन कडे गेलो. तिथे गेल्यावर मला एका खोली मधे बसवून ठेवण्यात आले. मी शांतपणे सोबत असलेले पुस्तक काढून वाचत बसलो होतो. जवळपास दिड तास झाला,  माझ्या जवळच्या बॅग मधलं सॅंडविच काढलं आणि कोल्ड ड्रिंक की जे आता कोमट झाले होते त्याच्या सोबत सॅंडविच  गिळलं. गेले बरेच दिवस हे सगळं होतांना मी पाहिलेले होते.  त्या वॉचमनला पण आश्चर्य वाटलेलं दिसत होतं . मला तिथे बसवून ठेवल्यापासून मी त्याला एकही प्रश्न विचारला नव्हता. युजवली ज्या  वेळेस एखाद्याला शॉप ्लिफ्टींग साठी ज्याला पकडून तिथे बसवून ठेवलं असतं, तो आता पुढे काय होणार असे म्हणून सिक्युरीटीला  भंडाउन सोडतांना मी बरेचदा पाहिले होते.

घड्याळात पाहिलं आणि लक्षात आलं की आता कुठल्याही क्षणी पोलीस येतील. तेवढ्यात पोलिस सायरनचा आवाज आला आणि पोलीसांची जीप येऊन पुढे थांबली. त्यातून उतरलेला एक इन्स्पेक्टर लेव्हलचा माणुस उतरलेला पहाताच, सिक्युरीटी ईंचार्ज तिकडे त्याला रिसिव्ह करायला गेला. थोडावेळ त्यांचं बोलणं झालं, आणि तो इन्स्पेक्टर  मला घेऊन निघाला. सोबत तो सिक्युरिटी ऑफिसर पण होता.

आमची वरात पोलिस चौकी वर पोहोचली. तिथे गेल्यावर सिक्युरीटी ऑफिसरने कम्प्लेंट रजिस्टर केली आणि तो निघून गेला. हे सगळं होई पर्यंत तिन वाजले होते. मला आणि अजून लॉकप मधल्या चार लोकांना घेउन इन्स्पेक्टर कोर्टात पोहोचले. कोर्टात माझी केस पुट अप करण्यात आली, आणि माझ्या वरचे आरोप वाचून दाखवण्यात आले.

जज ने विचारले ” गुन्हा कबूल आहे का? आणि अजून काही तुला सांगायचे आहे कां?”

“हो, मला सांगायचंय – साहेब मी पंधरा दिवसांपूर्वी याच शॉपिंग मॉल मधुन एक १२०० रुपयांची एक कफलिंक चोरी केली होती.”
जज आश्चर्याने पाहू लागले, त्यांना अजिबात समजले नाही की मी स्वतः न पकडल्या गेलेल्या चोरीची कबुली का देतोय ते.. त्यांनी पोलिसांना सांगितले की  माझ्या बरोबर माझ्या घरी जा आणि ते कफलिंक जप्त करून घेऊन या.’पोलिस इन्स्पेक्टर आणि मी माझ्या घरी निघालो.

घरी पोहोचल्यावर मी घराचे दार उघडले .  दाराचे लॉक उघडले आणि  आत डॊकावल्याबरोबर तो हवालादार एकदम ओरडलाच… “इन्स्पेक्टर साहेब अहो साहेब…..” त्या हवालदाराच्या  आवाजातली अर्जन्सी एकदम लक्षात आली आणि  इन्स्पेक्टर घरात शिरला.    आणि इन्स्पेक्टरने हेडक्वॉर्टरला फोन केला – इथे पिकासो चे  ओरीजिनल पेंटींग , आणि तशाच अनेक इतर पुरातन वस्तू, जडजवाहीर जे बहूतेक नबाबाच्या काळातलं आहे, ते आहे, आणि या सगळ्या वस्तू चोरीच्या आहेत असा संशय आहे तेंव्हा – ताबडतोब   काही सिनिअर ऑफिसर  साईटला आले तर बरे होईल .

पिकासोचे गेली पन्नास वर्षापासुन एक पेंटींग जे एका मोठ्या अननोन उद्योगपतीने घेतले होते, ते भारतात आहे हे माहिती होते, पण ज्याने ते घेतले ते बहूतेक काळ्या पैशातून.. त्यामूळे त्याचा मूळ मालक कोण ते कोणालाच ठाऊक नव्हते. त्या पेंटींगचीच  किम्मतच कमित कमी २० एक करोड रुपय असेल, असे आणि इतर दाग दागिने वगैरे होते तिथे. सगळे खूप जूने.. व्हींटेज व्हल्यु असले, बहूतेक सगळे निझामाच्या खजिन्यातले. ( असं म्हणतात की हैद्राबादच्या निझामाने आपलेच दागिने  जे सरकारने जप्त केले होते तेच चोरून पुन्हा आपल्या स्वतःकडे ठेवले होते, आणि हे दागिने त्यातलेच असण्याचा  संशय होता) .. सगळ्या सामनाची मोजदाद सुरु करण्यात आली.
******************************

हवालदाराने इन्स्पेक्टरला म्हंटले, साहेब , किती लाखाचा माल असेल हा ? इन्स्पेक्टर म्हणाले, ’लाखाचा?? अरे कमीत कमी  ४० करोडचा तरी असेल हा माल” .. पण एक गोष्ट लक्षात येत नाही, इतकी महागाची चोरीची वस्तू या माणसाने चोरली, आणि पोलिसांना का घेऊन आला घरी दाखवायला हा माणूस??  काय कारण असेल बरं??माझ्या कडे बघत इन्स्पेक्टर म्हणाला. त्याच्या ही गोष्ट लक्षात येणे शक्यच नव्हते…….

*********************************
जज समोर मला पुन्हा उभं करण्यात आलं, मला जज ने विचारले, की ह्या सगळ्या वस्तू मी कुठून चोरल्या म्हणून? माझं उत्तर अर्थात एकच होतं, ते म्हणजे ह्या सगळ्या वस्तू माझ्या स्वतःच्या आहेत.जज ने  पोलिसांना या वस्तूच्या चोरीची तक्रार कोणी केली आहे का? हे चेक करायला सांगितले  . आणि ह्या सगळ्या वस्तूंचा मालक कोण आहे हे शोधण्यासाठी पोलीसांना एक आठवड्याची वेळ दिली.

मुंबईचे सगळ्यात प्रख्यात बकील, जे एका स्टॅंडींगचे पन्नास हजार रुपये घेतात, त्यांना मी अपॉइंट केले होते. माझ्या पूर्वीच्या ( म्हणजे मिलिटरी च्या) पार्श्वभूमीवर आणि मी स्वतः पोलिसांना घरी नेले होते  या पार्श्वभूमीवर मला बेल मिळावा म्हणून त्यांनी  कोर्टात माझीबाजू मांडली आणि   बेल वर बाहेर सोडण्यात आले., अर्थात मुंबई सोडून कुठे जाऊ नये ही अट होतीच .मला कुठेच जायचं नव्हतं..

पोलिसांनी एक आठवडा सगळा शोध घेतला, पण कुठल्याही वस्तूच्या चोरीची कम्प्लेंट कोणीही केली नव्हती.. कोर्टापुढे तशी कबूली दिली पोलिसांनी, फक्त एक नेकलेस आपला आहे, असा दावा एका सोनाराने   केला.  म्हणजे इतक्या करोडो रुपयांच्या सामानापैकी फक्त एक लाखाच्या वस्तूवर चोरीचा म्हणून शिक्का बसला.  केस जवळपास एक दिवस चालली,  इतका सगळा शोध घेतल्यावर सुध्दा, एकही वस्तू म्हणजे ते पेंटींग वगैरे चोरीचे आहे असे सिध्द करू शकले नाहीत पोलीस,(काळ्या पैशानेव िकत घतलेले ते पेंटींग होते म्हणून मूळ मालक गप्प बसला होता बहूतेक) म्हणजे आता त्या सगळ्या वस्तूंचा कायदेशीर मी मालक होतो.

आठवड्या नंतर केस लागली, आणि त्या मधे कुठलीही चोरी  सिध्द न झाल्यामूळे मला सहा महिने  साधा तुरुंगवास, आणि तो पण ओपन जेल मधे अशी शिक्षा देण्यात आली.
**********************************************

ज्या पिकासोच्या पेंटींग ( चोरीचे असताना) साठी अल्ताफ भाई फक्त पन्नास लाख द्यायला, तयार होता, त्याच पेंटींगला मी ऑफिशिअली  ईंटरनॅशनल  ऑक्शन ला ठेवले, आणि त्याचे मला८० कोटी रुपये आले. त्याच बरोबर सगळी ज्वेलरी, आणि इतर सामान पण ऑक्शन केलं.. ( हे सगळं मी कसं चोरलं, हे सांगत बसलो तर ती एक वेगळी कथा होईल, म्हणून इथे जास्त लिहीत नाही.. सगळं विकल्यावर ९० कोटी रुपये आले, आणि ते सगळे ’व्हाईट’!! ) सहा महीने जेल मधे राहून मी आता जवळपास शंभर कोटी रुपयांचा मालक झालो होतो. पहिले काम केले, की सगळ्यात महाग वकिलाला आपल्या पे रोल वर ठेवले. वकील चांगला असायलाच हवा, तिथे कंजूशी करून चालत नाही!
इन्स्पेक्टर देसाइंच्या आता लक्षात आलं की मी  का बरं  चोरीची कबुली दिली ते. त्यांनी ठरवलं होतं, की या माणसाच्या मनात नक्की काय ते शोधून काढायचं म्हणून.
************************************************

सहा महिने  जेल मधे .. त्या काळात पार्लमेंट्च्या अ‍ॅक्ट्स जे सध्या पार्लमेंट मधे डिस्कस केले जात होते, ते  वाचत होतो. हे सगळं वाचता वाचता,” डीजिटल पब्लिकेशन अ‍ॅक्ट”वरचे डीस्कशन वाचले. १९९२ साली हा कायदा सम्मत झाला होता पार्लमेंट मधे- त्यानंतरच्या सगळ्या अमेंडमेंट्स पाहिल्यावर  त्यामधली कमतरता लक्षात आली , आणि मग पुढे काय करायचे ते  ठरवलं!
आपल्या वकिलाला भेट्ण्यासाठी एक अर्ज दिला होता, आणि वकिलाच्या माध्यमातून भारतात प्रसिद्ध होणारे प्रत्येक बिझिनेस मासिक  मला वाचायला देण्यात यावे अशी कोर्टाकडे विनंती केली. कोर्टाने अर्थातच होकार दिला.
त्या नंतरचे दिवस हे सगळे बिझीनेस मॅग्झिन्स वाचून, त्यातल्या जाहिराती – ज्या कमीत कमी तिन मासिकात आल्या आहेत अशा  कापून ठेवणे सुरु केले.
जेंव्हा जेल मधून माझी सुटका झाली, तेंव्हा माझ्या जवळ दोन गोष्टी होत्या, एक म्हणजे डीजिटल पब्लिकेशन अ‍ॅक्ट बद्दल संपूर्ण ज्ञान ,  आणि जाहिरातींची कटींग्ज.! या सहा महिन्या मधे डीजिटल पब्लिकेशन ~अ‍कट कोळून प्यायलो होतो मी, आणि या देशात तरी माझ्याइतकं त्या बाबतीत ज्ञान असलेला दुसरा कोणी नाही हे मी खात्रीपुर्वक सांगू शकत होतो.

***************************************
इन्स्पेक्टर देसाईं माझ्यावर पूर्ण लक्ष होतं. जेल मधून मी बाहेर निघाल्याबरोबर, माझ्या मागे त्यांचे पोलिस लागलेले होते. पण मला त्याची अजिबात पर्वा नव्हती. हवालदारने इन्स्पेक्टर देसाईंना माझ्या अ‍ॅक्टीव्हिटीज बद्दल रिपोर्ट दिला- तो साधारण असा होता-

राज देसाई एका पंचतारांकित हॉटेल मधे जाउन पहिले चार दिवस राहिला आणि नुसता आराम केला. नंतर एका प्रिंटींग प्रेस मधे जाऊन  त्या प्रिंटींग प्रेसच्या मालकाला भेटून एक नवीन मासिक प्रिंट करायची ऑर्डर दिली.  जे मासिक छापायला टाकले – त्याचे नांव बिझिनेसे इंडीया, आणि प्रती छापायला सांगितल्या फक्त ९९.. (  बिझिनेस इंडीया नावाचे एक मासिक आहे ऑलरेडी, ज्याचा खप आहे ५ लाख प्रती) कॅप्टन राजच्या  मासिकाचे नांव अगदी त्या मासिकासारखेच आहे अगदी थोडा फरक आहे. मुख प्रृष्ट पहायला मिळाले, ते पण अगदी ओरिजिनल बिझिनेस इंडीया प्रमाणेच ठेवले आहे. मासिकाचा कागद, एकदम उच्च दर्जाचा – ओरिजनल बिझिनेस इंडीयाच्याच तोडीचा होता. छापलेल्या सगळ्या प्रती कॅप्टन राजने नेल्या. आणि त्यातल्या बऱ्याचशा पानांच्या झेरॉक्स कॉपीज पण काढल्या. नंतर अडीच हजार च्या आसपास उत्कृष्ट क्वॉलिटीचा कागद कॅप्टन राजने हॉटॆलवर मागवला आणि नंतर, आणि   ब्राउन पेपरच्या एनव्हलप मधे काही तरी पोस्ट केले. सेंडर्स अ‍ॅड्रेस च्या जागी पोस्ट बॉक्स नंबर होता.

हा रिपोर्ट वाचल्यावर इन्स्पेक्टर देसाई विचारात पडले, पण जे काही केलं होतं त्या मधे काहीच कायद्याच्या विरुध्द नव्हते. इन्स्पेक्टरची डॊके दुखी वाढली होती. असे जवळपास १५ दिवस गेले,  दुसरा रिपोर्ट पण इन्स्पेक्टर देसाईंच्या टेबलवर आलेला होता.

कॅप्ट्न राज दररोज ठराविक वेळेस पोस्ट ऑफिस मधे जाऊन पोस्ट बॉक्स मधून आलेली पत्र गोळा करतात, आणि बॅंकेत जातात चेक वगैरे जमा करणे, पैसे काढण्यासाठी असावे बहूतेक. बस्स… इतकंच.. या व्यतीरिक्त कॅप्टन राजची कुठलीही गतीविधी संशयास्पद दिसत नाही .. हा रिपोर्ट इन्स्पेक्टर देसाईंच्या टेबलवर होता.. आणि तो वाचून इन्स्पेक्टर विचार करत बसले.. काहीच ्बेकायदेशीर  नाही या  मधे.. ते स्वतःशीच म्हणाले.
*****************************
जवळपास दिड वर्ष असंच सुरु होतं. काहीच बेकायदेशीर दिसत नव्हत कॅप्टन राजच्या वागणुकीत. पण एक दिवस मात्र इन्स्पेक्टर देसाईंना एक  टेबलवर एक कम्प्लेंट होती. त्यात म्हंटलं होतं की त्यांच्या कंपनी कडे म्हणजे मेरीयन आय एन सी कडे एक बिल आलंय , त्यांनी न दिलेल्या अ‍ॅडव्हर्टाइझ चं!

इन्स्पेक्टर देसाईंनी जेंव्हा पाहिलं की ते बिल कोणाचं आहे, तेंव्हा त्यांनी ताबडतोब  कम्प्लेंट लिहून घेतली . ते बिल माझ्या  पब्लिशिंग कंपनीच्या नावाचे होते. इन्स्पेक्टर देसाईंचे  इन्वेस्टीगेशन जवळपास सहा महिने चालले, आणि त्या नंतर माझ्या दाराशी इन्स्पेक्टर देसाई स्वतः मला अटक करायला आले.  या वेळेस इन्पेक्टर देसाईंनी पूर्ण पणे अभ्यास करून केस तयार केलेली दिसत होती.

दुसऱ्या दिवशी कोर्टात माझ्या वकीलांनी बेल करता अर्ज दिला, आणि मला बेल मिळाला, फक्त माझा पासपोर्ट जमा करून घेतला पोलीसांनी.
*********************************

कोर्टात केस लागली.  हिअरींग सुरु झाले. माझ्या वर फ्रॉड चे चार्जेस लावण्यात आले होते.  ज्या कंपनीने  मेरियन्स आयएनसी ने माझ्याविरूध्द केस दाखल केली होती त्याची पहिली उलट तपासणी माझ्या वकिलाने सुरुकेली.
मेरीयन्सचे फायनान्स जीएम आलेले होते. त्यांचे नांव शुक्ला.

वकिलाने क्रॉस करणे सुरु केले, ’तर शुक्ला साहेब तुम्ही मेरीयन्स मधे जी एम म्हणून काम करता ??
’होय’
’तुम्हाला ज्या जाहिरातीचे बिल आले ती जाहिरात तुम्ही पाहिली का

’होय’

आणि जर पाहिली असेल तर ती तुमच्या कंपनीच्या स्टॅंडर्ड प्रमाणे होती काय? म्हणजे पेपर क्वॉलिटी प्रिंटींग वगैरे…”

’होय होती, पण…..’

पण वगैए नाही, फक्त विचारले तेवढीच उत्तरं द्या.. आणि पुढे विचारणे सुरु केले..

’त्या इनव्हाईसचे पेमेंट तुम्ही केले का?’

’नाही- माझ्या  सबॉर्डीनेटने लक्षात आणून दिले की ही जाहीरात आम्ही दिलेली नाही, म्हणून पेमेंट केले नाही’

’ हं..  म्हणजे एका मासीकात तुमच्या कंपनीची जाहिरात आली, जी तुमच्या स्टॅंडर्ड्स प्रमाणे होती, ज्या साठी तुम्ही पेमेंट केलेले नाही- बरोबर??’

’होय’

’तो इन्व्हॉस तुम्ही कोर्टाला वाचून दाखवाल??  त्या मधे जे काही लिहिलंय ते वाचून दाखवा..”

फायनान्स जी एम ने वाचणे सुरु केले..सगळं वाचून झाल्यावर खालची तळ टीप वाचली, त्यात लिहिलं होतं,

” जर तुम्ही आमच्या सेवे बाबत समाधानी नसाल, तर तुम्ही या इनव्हाईसचे पेमेंट न केले तरीही चालेल’

यावर माझ्या वकिलाने पुन्हा प्रश्न सुरु केले,

’तुम्ही पेमेंट केलेले नाही? बरोबर??’

’होय, बरोबर’

’मग तुमची  तक्रार आहे तरी काय??”

हे वाक्य ऐकले, आणि  माझ्या वकीलाने सगळी केस सम अप करुन  म्हंटले, की यांच्या कंपनीची जाहिरात एका मासीकात आली, त्या साठी यांनी कुठलेही पेमेंट केले नाही, सबब कुठलाही गुन्हा घडलेला नाही, म्हणून आमच्या अशीलाला निर्दोष मुक्त करण्यात यावे.

इन्स्पेक्टर जोशींनी ज्या  इतर लोकांनी बिलाचे पेमेंट केले होते, त्यांना कोर्टापुढे आणायचा खूप प्रयत्न केला, पण  ते अ‍ॅडव्हर्स जाहिरात नको म्हणून कोर्टापुढे येण्यास तयार नव्हते.  दिवसाचे काम संपले म्हणून कोर्ट अ‍ॅडजर्न झाले, दूसऱ्या दिवशी केसची सुनवाई सुरु रहाणार होती.
************************

दुसऱ्या दिवशी, सरकारी वकीलाने मला विटनेस बॉक्स मधे बोलावले.

माझे नांव, कॅप्टन राज देसाई, आणि इतर माहिती सांगुन झाल्यावर प्रश्न विचारणे सुरु केले सरकारी वकीलाने..

’तुम्ही जे मासिक सुरु केले त्याचे नांव एका प्रथितयश मासीकाशी साधर्म्य असलेले का ठेवले?”

’मला ते नांव आवडले म्हणून. आणि मी जे माझ्या मासीकाचे नांव ठेवले आहे, ते मी स्वतः रजीस्टर केलेले आहे, आणि कायद्याने त्यात काही गुन्हा नाही- आजही अशी बरीच नांवं आहेत की ज्या मधे खूप सारखे पणा आहे – जसे फायनान्शिअल टाइम्स , आणि फायनान्शिअल एक्स्प्रेस  फायनान्शिअल अ‍ॅडव्हायझर वगैरे.

’तुम्ही किती कॉपीज छापल्या या तुमच्या मासिकाच्या?

’९९ कॉपीज ’

’कारण?” वकिलाने विचारले.

’१०० कॉपीज छापल्या तर ते मासीक प्रायव्हेट सर्क्युलेशन म्हणून  ट्रीट केले जात नाही, क्लॉज २, पार्ट १३ ,  डीजीटल पब्लीकेशन अ‍ॅक्ट., (आणि  मनातल्या मनात म्हणालो, की याच कारणामुळे तुम्ही माझ्यावर पब्लीक फ्रॉड चा गुन्ह्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकत  नाही’)

वकील एकदम गप्प बसला. पण अजूनही काही प्रश्न मला विचारले की माझे विचार चोरी करण्याचे किंवा फसवणूकीचे होते हे सिध्द करू शकू अस वाटलं होतं त्याला. म्हणून त्याने पुढचा प्रश्न विचारला.

’दर महिन्याला किती जाहीराती छापता तुम्ही या मासिकात?’

’१७८ जाहीराती आणि मुख्य़ पृष्ठ आणि मल पृष्ठ वेगळे.

म्हणजे १८ महिन्यात २७८ गुणीले १८=५००४ जाहीराती- बरोबर? आणि या पैकी प्रत्येकाला तुम्ही आपली बिलं पाठवली आहेत . त्या पैकी किती लोकांनी पैसे दिलेत तुम्हाला?”

’साधारण ७० टक्के लोकांनी’

’प्रत्येक जाहीरातीचे ५० हजार?? ”

’नाही, प्रत्येक जाहीरातीचे वेगवेगळे रेट्स आहेत. फ्रंट पेज चे दोन लाख रुपये , मागच्या पानाचे एक लाख वगैरे वगैरे”

’९९ कॉपीज छापून जाहीरातीचे  इतके पैसे मागणे, हे अनएथिकल आहे असे वाटत नाही तुम्हाला?

’कदाचीत तुम्हाला तसे वाटत असेल, पण ते इल्लीगल नक्कीच नाही. कायद्याच्या कक्षेत राहून मागितलेले पैसे आहेत ते. तुम्हीच बघा राजकीय पक्ष पण असेच लिफलेट छापून पहिल्या पानाचे दहा लाख मागतात- ही एक सर्वमान्य प्र~क्टीस आहे आणि ती इल्लीगल नाही असे मला वाटते. राजकीय पक्षांच्या  मानाने हे कमीच आहेत मी मागितलेले”

’तुम्ही  या सगळ्या प्रकरणात जवळपास विस कोटी रुपये मिळवले , आणि ते पण मिळवतांना आपण लोकांना फसवले आहे असे तुम्हाला वाटत नाही का?”

’नाही, कायद्याप्रमाणे मी कोणालाही फसवलेले नाही, प्रत्येक इन्व्हॉइस च्या खाली एक वाक्य लिहिले असतेच, की तुम्हाला जर आमचे काम आवडले नसेल तर तुम्ही पैसे देउ नका- म्हणजे पैसे मागितले, पण आग्रह केलेला नाही’

’प्रत्येक बिला बरोबर तुम्ही झेरॉक्स लावायचे आपल्या जाहीरातीचे, पण कायद्याप्रमाणे तुम्ही मासिकाची कॉपी देणे जरूरीचे होते,”

’होय, पण ते पण कुणी मागितल्या वरच.. ”

’मग मागल्या वर्षी तुम्हाला किती लोकांनी कॉपीज मागितल्या?”

’१०७ ’

’तुम्ही दिल्यात?’

’होय, काही लोकांना’

’म्हणजे काही लोकांना कॉपीज दिल्या नाहीत? ज्या कायद्या प्रमाणे तुम्ही द्यायला हव्या होत्या?’

’होय, हा गुन्हा तर मंजूर करावाच लागेल’

’कुठल्या कंपनीच्या जाहीराती द्यायच्या हे तुम्ही कसे ठरवायचे?’

’सोपं आहे, बॅलन्स शिट पाहून, जी कंपनी प्रॉफिट करते आहे, आणि शेअर होलडर्स ना डिव्हिडंड देते त्याच कंपन्यांच्या जाहीराती घेतल्या मी, अर्थात ह्या गोष्टीचा केसशी संबंध नाही, पण तुम्हाला  उत्तर दिलंय मी’
वकिलाच्या चेहेऱ्यावर एकदम हरल्याची चिन्हंदिसत होती. शेवटी त्याने क्रॉस एक्झाम बंद केली. कुठल्याच कायद्याने मला शिक्षा होऊ शकत नव्हती, फक्त ते लोकांना मासीक न देणे- या कलमा अंतर्गत जास्तित जास्त शिक्षा क्लॉज २२, कॉलम १२ च्या अंतर्गत शिक्षा होऊ शकत होती.
*****************************

जज साहेबांनी शिक्षा ठोठवली- की जाहीराती छापणे, आणि पैसे मागणे या मधे कुठल्याही कायद्याचा भंग झालेला नाही,फक्त मासिकाच्या कॉपीज न देण्या बद्दल जास्तित जास्त शिक्षा ही दहा हजार रुपये ठोठवण्य़ात येत आहे..
*****
कोर्टातून  दंड भरून बाहेर निघालो. इन्स्पेक्टर देसाई  माझ्याकडेच ालत आले, म्हणाले, की  हा कायदा नक्कीच अमेंड होईल, मग काय करणार? मी म्हणालो, आता आयुष्यभर काही करायची गरज नाही, पण इतर अजून असे अनेक कायदे आहेत, त्यांचा अभ्यास करणार……..

कोण म्हणतं क्राइम डू नॉट पे?? इट पेज इन बिलियन्स!!

( जेफ्री आर्चर  यांच्या मूळ कथा कल्पनेवर बेतलेली कथा) पूर्वप्रकाशीत जालरंग दिवाळीअंक २०१०, केवळ आपल्या स्वतःच्या पण संग्रही पण रहावी म्हणून ब्लॉग वर पोस्ट करतोय..)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

47 Responses to क्राइम पेज…

 1. ngadre says:

  jaam jholar aahe tumacha Raj Desai.
  Pan manale tyachya dokyaalaa.
  Mast katha..

 2. mazejag says:

  Mi asunahi suun aahe…kadyachi par waat lavli hya “Raj”ne…pratyakshathi asch karat astil kahi lok

 3. Mrunal says:

  Vha! farach chan katha ahe.

 4. Sundar….atyant sundar….
  Agadi Badmaash Company chi aathvan aali vachtana….
  bar zale kramsh: cha taap nahi thevla ithe te….

 5. mau says:

  खरचं मानल तुमच्या राज देसाईला…मस्त जमलीये कथा…

 6. फॅंटॅब्यूलस.. आवडली कथा 🙂

  • सुहास
   धन्यवाद. मला वाटलं होतं की त्या दिवाळी अंकात वाचल्या गेली असेल, त्यामुळे इथे कोणी वाचणार नाही, पण तसं नव्हतं. इथे टाकली ते बरं केलं. 🙂

 7. परफ़ेक्ट योजना ! मुळ कथा जरी आर्चरची असली तरी तुमच्या लिखाणावर कुठेही आर्चरचा प्रभाव जाणवत नाही हे तुमचे श्रेय दादा !
  मुजरा 🙂

 8. swapna says:

  ektar.. “dirghkatha- EKACH BHAGAT” he aavdala.. link lagali ki akhhi goshta vachayla maja yete..
  aani var farch mhanje atich uttam jamliye.. shevat paryant mast utsukata tanun dharli thevali hoti…
  ajun goshti sanga… aamhi vachtoy…

  • स्वप्ना
   अवश्य.. बऱ्याच शॉर्ट स्टॊरीज आहेत आर्चरच्या. लिहिन नंतर पुन्हा कधीतरी.

 9. Ketaki says:

  फारच हुशार आहे बुवा हा राज देसाई. छान आहे कथा. जेफ्री आर्चरच “नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस” पण मस्त आहे.

  • केतकी
   ते तर मास्टरपीस आहे .. तसेच नो कमबॅक्स म्हणून एक शॉर्ट स्टॊरी कलेक्शन आहे, ते पण अप्रतीम आहे. त्यातली एक गोष्ट मी नक्की लिहिणार आहे लवकरच.

 10. व्वा….. मस्त उतरलाय राज. थंड डॊक्याने गुन्हा करणारा…… ग्रेट !!

 11. Rajeev says:

  दाणकन डोक्यावर पड्ण्याचा आवाज ऐकला होता.
  ते डोके कोणाचे होते ते कळाले नव्हते…..
  क्राईम कथा वाचून ते समजले…
  Take care……

 12. मनोज says:

  झकास पोस्ट. एकदम मस्त.

 13. swapna sapre says:

  zakkas re mahendra dada……..
  ashyach jara ajun goshti tak translate karun……
  mahanje mala winglish katha wachalyach samadhan milel……….
  (winglish faras zepat naay re)
  mala fakt pu la,wa pu,ratnakar matkari wagaire mandali aani faar faar tar jayant narlikar aani naredr dabholkar yanch likhan zepat……………

  • स्वप्ना
   नक्की लिहिन. बऱ्याच गोष्टी वाचल्या आहेत. वर राजीव ( माझा मावस भाऊ) काय लिहितो ते वाचलंस कां? डॊकं तपासून घे म्हणतोय, अर्थात त्याने फारसा फरक पडत नाही म्हणा…
   थोडं सिरियस लिहून झालं की बदल म्हणुन एखादी लव्हस्टॊरी वगैरे लिहित असतो मी. लिहिन लवकरच.”. नो कमबॅक्स ” नाव असेल त्या गोष्टीचं.

 14. Ganesh says:

  लई भारी!!!

 15. sagar says:

  “कोण म्हणतं क्राइम डू नॉट पे?? इट पेज इन बिलियन्स!!” एकदम मस्त ..जबरदस्त डोकं लावलंय राज देसाईने..कथा आवडली .. 🙂

 16. bhaanasa says:

  एकदम डोकेबाज… 🙂

 17. Gayatri says:

  Jefry’s NOT A PENNY MORE NOT A PENNY LESS
  is fantastic book

 18. भारीच जमलय. मस्त आहे कथा.
  ‘कोण म्हणतं क्राइम डू नॉट पे?? इट पेज इन बिलियन्स!!’ – मास्टर स्ट्रोक

 19. Smita says:

  nicely adaped, enjoyed reading this one. romantic peksha ya genre chya jasta changlya jamataat tumhala ( puNeri lokanna parikshaNacha moha awarat nahee:-)) na vicharata sangeetalyabaddal- apologies in advance:-)

 20. vishaal says:

  ya captain Raaj na nakkich Maharashtracha bhavi MukhyaMantri karayala pahije.

 21. Prasad Patil says:

  Mahendrajee,

  Really good one!

  Velat Vel kadhun adhun madhun ashya katha takavyat, hee vinantee!tevdhech thodesh vegale! Mastach!!

 22. आल्हाद alias Alhad says:

  मान गये काका…

 23. Mahesh Ingale says:

  Bhannat Katha !!!
  Sagale Supik Dokyche Pratap..

 24. Shankar says:

  Khupach interesting story ahe

 25. geeta says:

  1 No.

  • गीता
   माझा आवडता लेखक॰ त्याची फक्त सेंट्रल आयडीया आहे . याचा दुसरा भाग घेतोय लिहायला.. पुन्हा मूळ संकल्पना जेफ्री आर्चरचीच.. ( म्हणजे फक्त थीम बरं कां.. प्रसंग वगैरे सगळे माझे )

 26. Pingback: नो कमबॅक्स……१ | काय वाटेल ते……..

 27. truptisalvi says:

  काका कथा आवडलीच आणि आता प्रकाशित झालेले “नो कंबॅक्स” चे पण
  भाग वाचणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकाराचे लिखाण प्रभावी आणि कन्विन्सिंग करू शकता.

  • तृप्ती
   प्रतिक्रियेसाठी आभार. जेफ्री आर्चर मस्त लेखक आहे. माझा फेवरेट. त्याच्या आयडीया घेतो, आणि आपली भारतीय कथा लिहीतो.. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s