सखी…

सखी...

देवाने योजलेला  आणि दैवाने मिळालेला सखा कोण?? प्रश्न खूप कठीण वाटतोय का?? उत्तर अगदी सोपं आहे. पण बऱ्याच लोकांच्या मनात राधा- कृष्ण म्हणजे कृष्णाची सखी राधा,  किंवा त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूःश्च सखा त्वमेव… हे आठवून प्रश्नाचं उत्तर म्हणजे ’देव’ असावं का?? असंही वाटलं असे,पण तसे नाही..

ह्या प्रश्नाचं उत्तर  पुरुषांसाठी आहे ’पत्नी’ आणि स्त्री साठी आहे ’पती’. खरं म्हणजे हा प्रश्न एक यक्ष प्रश्न आहे.. यक्षाने धर्मराजाला विचारलेला.  आणि या प्रश्नाचे धर्मराजाने दिलेले उत्तर आहे ’सखी’ !!

’सखी’  किती सुंदर शब्द आहे नाही का?? सुरुवातीच्या काळात म्हणजे लग्न होई पर्यंत  या शब्दाचा एकच अर्थ माहीत असतो, तो म्हणजे ’मैत्रीण’- किंवा सखा म्हणजे मित्र!  कुठल्यातरी एका सिनेमात अमिताभ बच्चनने पण हाच शब्द वापरला होता कुठला सिनेमा ते आठवत नाही. तेंव्हा पासूनच हा शब्द मनामधे घर करून बसला होता.

वैदीक पद्धतीने लग्न करताना, लग्नाच्या वेळेस पण सप्तपदी चे सातवे पाऊल टाकताना ’सखा सप्तपदी भव’  असा मंत्र म्हटला जातो. याचा अर्थ,  वर वधूला म्हणतो की आपण सात पावलं चाललो, आता  हे सातवे पाऊल -तू माझी ’सखी’ झालीस. इथे समान हक्क दिलेले आहेत स्त्रीला पण . समान म्हणण्यापेक्षा इथे थोडे जास्तच अधिकार दिलेले आहेत. तू घरावर सत्ता गाजवणारी साम्राज्ञी हो अशा अर्थाचा मंत्र आहे वैदीक विवाह पद्धती मधे.

काल परवाच वाचण्यात आलाय एक श्लोक
’अर्ध भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्टतमः सखा
भार्या मुल त्रिवर्गस्य  भार्या मूल तरिष्यतः
यत्र नार्यस्तू पूज्यत्न्ते रमन्ते तत्र देवताः !

ज्या घरात स्त्रीला मान आहे  त्याच घरात देवांचे वास्तव्य असते. ज्या घरामधे स्त्रीचे अश्रू जमिनीवर पडतात तिथे लक्ष्मी वास करत नाही, अशा अर्थाचा एक श्लोक आलाय .म्हणजे स्त्रियांना हिंदू संस्कृती मधे जितका मान दिला गेलाय तितका दूसरी कडे दिला गेलेला नाही. ’पती पत्नीचे’ नाते हे म्हणूनच (कॉम्प्लीमेंटींग इच अदर) एकमेकांना पूरक असेच असायला हवे. भारतीय संस्कृती मधे पुर्वी पासूनच स्त्रियांचे आणि पुरुषांचे काम वाटून दिलेले आहे. घराबाहेरची कामं पुरुष करेल तर घरातली कामं आणि मुलांचं संगोपन ही स्त्री ची जबाबदारी.

आजच्या काळात जरी हे शब्दशः शक्य नसतं कारण स्त्री पण घराबाहेर पडलेली आहे आणि पुरुषाच्या बरोबरीने  नोकरी करून पैसा कमावते. हे जरी खरं असलं, तरीही पूर्वापार चालत आलेली घरची कामं पण एकट्या स्त्रीलाच करावी लागतात- घराचे घरपण टिकवून ठेवण्यासाठी. तसं म्हंटलं तर , पुरुषही हल्ली घरातल्या कामामध्ये थोडी मदत करतातच… पण…..

पण ती सगळी वरवरची कामं असतात. स्त्री घरामध्ये काय काय कामं करते हे लक्षात फक्त जेंव्हा ती आजारी पडते तेंव्हाच येते. सकाळी उठल्यावर पांघरूणाच्या घड्या करणॆ असो , किंवा समोरच्या सोफ्यावर पडलेली नवऱ्याची ऑफिसची बॅग, डायनिंग टेबलवरची मुलांची अभ्यासाची पुस्तकं, समोरच्या शू रॅक वरचे व्यवस्थित लावून ठेवलेले बुट, जास्तीच्या  दुधाचे लावलेले विरजण, उरलेलं सगळं फ्रीज मधे ठेवणे.. अशी असंख्य कामं आहेत जी तुमच्या नकळत बिनबोभाट होत असतात.  पण जेंव्हा घरची स्त्री  आजारी पडते तेंव्हा घराची रयाच पार बदलून जाते आणि घरामधे किती कामं असू शकतात याची जाणीव होते- केवळ  इतकेच नाही, तर एक वेगळं औदासीन्य पण साठून रहातं घरात. कुठल्याही परीस्थितीत तिने लवकर बरं व्हावं आणि घराकडे पुन्हा पहिल्यासारखं लक्ष द्यावे असे वाटू लागते. आणि ती जन्माची सहचारिणी ’सखी’ – तिची आपल्या आयुष्यातली खरी जागा समजते.

स्त्री लग्नानंतर जरी नवऱ्याने सप्तपदी मधे  सातव्या पावलावर तू ’सखी’ हो म्हटलं असलं, तरीही  ते काही लग्न झाल्याबरोबर ताबडतोब होत नसतं. जरी लग्नापूर्वी पासून ओळख असली तरीही ’बायकॊ’ची ’सखी’ व्हायला बरेच दिवस लागतात.सोबत राहिल्यानंतर एकमेकांच्या स्वभावातले गुण दोष जेंव्हा नीट माहीत होतात तेंव्हाच बायको नवऱ्याने न सांगता त्याच्या मनातलं ओळखू लागते, आणि तेंव्हाच ती  खऱ्या अर्थाने ’सखी’ होते. सखी म्हणजे कोण?? तर भोजनेषू माता , शयनेशू रंभा, वगैरे काहीतरी म्हणतात ना, तसे नाही, तर या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे तुमच्या आमच्या आयुष्यात!

नुसता मित्र किंवा मैत्रीण हे दोन्ही शब्द एकेकटे असतांना कसे मस्त वाटतात, पण बायकोचा मित्र किंवा नवऱ्याची मैत्रीण हे नातं आलं की कसं वाटत ना?? तरीही बरं, चाळीशी पर्यंतच  पझेसिव्ह कन्सेप्ट असतो, नंतर मग समजतं, ’ती’ त्याची’ मैत्रीण जरी कोणीही असली तरीही सखी मात्र ’ मी’च! पण चाळीशी पर्यंत?? छेः… कुठ्ल्याही प्रकारे कोणीच भागीदार नको असतो बायको मधे नवऱ्याला, आणि नवऱ्यामधे बायकोला, पण एकदा चाळीशी ओलांडली,  की तो पर्यंत परस्परांना व्यवस्थित समजून घेतलेले असते म्हणून सगळे संशय वगैरे संपलेले असतात.

(पूर्व प्रसिद्धी- मोगरा फुलला दिवाळी अंक २०१०)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , . Bookmark the permalink.

81 Responses to सखी…

 1. sushamey says:

  ज्या घरात स्त्रीला मान आहे त्याच घरात देवांचे वास्तव्य असते. khar aahe

 2. Bharati says:

  कदाचित नवऱ्याला सुधारायला किव्हा त्याचा संसार करायला,देवाला तीच… योग्य वाटली असावी आणि खास तिचीच निवड त्याने केली असावी..आपण संसार मोडतो तेव्हा देवाने आपल्यावर टाकलेला विश्वासही तोडत असतो तेव्हा स्त्रियांनी आव्हान पेलायची सवय लावून घ्यायला हवीच! म्हणून भारतीय स्त्री आजही संसारात सोशिक समजली जाते…

  • Smita says:

   Lagna tikaVayachee poorNa jababdaree stree chee ahe hee vicharsaraNee badalalee pahije. In indian marriages the onus of keeping a marriage intact is entirely on the woman, and that’s not fair. Even the working women have the so-called “support from husbands”, because they ( I mean most of the women -not all) are doing everything in addiiton to their household responsibilities and not as a substitution for house-work( ghar sambhaLun karate tee mhaNun kuNacha kahich jaat nahee!!! sagLe roles, saN-war, managing the home plus a nice earning job- what a wonderful package most husbands get! )If we continue to glorify this by saying .”..apuN vishwas moDat asato” “stree soshik asate” vagaire , this will never change! And that’s not healthy for marriages.

   • Bharati says:

    स्मिताजी , मान गये ..आज तुमच्या सारख्या विचारांच्या स्त्रिया अनेक जनीना मार्गदर्शक ठरतात.आज मला नाही वाटत की एक स्त्री दुसर्या स्त्रीची शत्रू आहे.तिला समजून घेऊन तिच्यात स्वत्व निर्माण करणारी आज स्त्रिच आहे….वाईट याचे वाटते आजही एखादी स्त्री आजारी पडली आणि तिचा नवरा जर घर कामात तिला मदत करू लागला तर तिला टोमणे मारायला एक स्त्रिच पुढे असते म्हणते कशी” तुला काय बरे आहे नवरा सगळे करतो नाही?”त्याच वेळी उत्तर डेयला पाहिजे केलन तर काय zआले माज़ा नवराच आहे ना? नोकरी करणार्‍या ठीक आहे..,ज्याना माहेरचा पाठिंबा आहे त्याना पण ठीक आहे..पण ज्या असंख्य स्त्रिया आहेत… ज्याना
    तिची जबाबदारीच नको वाटते ….सासर- माहेर परके ज़ालेले.. नोकरी नसलेली स्त्री स्वाताची समजूत काढत असते.खोटी स्वाताच्या समाधानासाठी…ती कशी तर अशी..तुमचे विचार 100%मान्य! आज असेच वागले पाहिजे टीट फॉर त्य्ट…आज पर्यंत सोसले ते फार zआले आता आपले अस्तित्व दाखवायची वेळ आली आहे 🙂

    • Smita says:

     no bharati NOT giving back as you seem to put it. look at my earlier comment. sometimes, due to cultural conditioning, husbands don’t even realize that their help would be expected/ needed/ will make life easier. So instead of putting up with it, there should be an open dialog- that explicitly states these wishes/ feelings. Many women don’t do that.May be they will just see the point and life would be harmonious at leats in some cases. Of course if the othe rparty is not open to dialog as you describe, then this wd be just wishful thinking.

     • स्मिता, भारती
      मनःपुर्वक आभार.
      मी स्मिताच्या दुसऱ्या कॉमेंटशी पुर्ण सहमत आहे. बरेचदा पुरुषांना आपली मदत घरच्या स्त्रीला हवी आहे हेच लक्षात येत नाही . आणि काही वेळेस तर लक्षात आलं तरीही दुरलक्ष केले जाते.

 3. mau says:

  =d>=d>=d>
  excellent…………..

 4. Aparna says:

  kaka tyasathi baiko aaajari padayala nako khar tar pan nakalt baikanna khup gruhit dharala jat he pan khar aahe…tya babtit mi thodi nashibwaan aahe…
  jamal tar he wachun paha…..

  http://majhiyamana.blogspot.com/2010/11/blog-post_25.html

 5. sahajach says:

  आवडली मनापासून ही पोस्ट महेंद्रजी 🙂

 6. shubhalaxmi says:

  khupch chan ahe sir……..

 7. Smita says:

  chaan ahe post. Eka Women’s day la amachya office madhye amhala entrance pashee thambun kahee lok fula det hote. I thought that was nice, puN mazee ek maitreeN mhaNalee apalyaya ithe fula deNyapeksha gharee bayakola thodee madat kelee ya lokannee tar Women’s day jara jasta meaningfully sajara hoil… good point. ( arthat tyatale kahee madat karat asateelahee, puN largely ya bateet sensitivity kamee asate he kharay) . jyana he bayako ajaree na paData kinva faar ushira vayachya adhee kaLata tynna – tya doghana ek chaan ‘maitra’ anubhavayala miLata evaDha nakkee. at times because of cultural conditioning ya goshtee lakshat yet naheet, puN lakshat aNun dyayala kahee harakat nahee- bhanDaNacha soor na lavata factually kahee goshtee sangun, arthaat na magata miLala tar tyat jasta godee asate.

  • स्मिता
   पुर्वी एक पोस्ट लिहिली होती मी .. मला वाटतं की …..जाऊ दे, पुन्हा लिहित नाही.. इथे वाचा.. http://wp.me/pq3x8-1Ld

   • Smita says:

    vachalee tee post. nemakepaNane mandalay tumhee tumcha mudda. puN as apaha- tumhee jo lahanpaNeecha
    anubhav lihilay- kee handicap ho mhaNun lok manadharaNee karayache tasach kaheetaree bhav- mhaNaje yachya vachun apalyala kahee astitva nahee asa vichar bayakanchya mant asel ka? mhaNun tya evadhe kautuk karatat navaryacha ? mala swatala tyalach nahee tar tyachya sagaLya natewaikanna SOLID impress karaNa he big deal vatayacha- tynech sangeetale- not worth your time mhanun:-) mag meehee te prakar thambvun takale:-) . kethetaree apuN upkrut ahot asa vaTata ka baryach bayakanna kay maheet? pun mala nahee vaTat kee serials pahun koNee tasa vagayala pahat asel- he gharee daree apalyach aai/ mavashee/ kaku yanna pahun chukiche dhade ghetale jatat aNee handicap ho asa message dila jato.

    pallavi mhaNate tase this can be a part of marriage counselling- jevadha changulpaNa ‘ long term sustainable ‘ asel tevadhach dakhavava suruvateela:-) ugach nantar pashchatap nako.

    • स्मिता
     मला वाटतं की लग्नानंतर कशा तर्हेने वागावे ह्याचे बाळकडू अगदी लहानपणापासूनच मनात भरवले जाते. एक मुलगी आणि एक मुलगा असेल तर मग त्या मुलाने रात्री अंधार पडेपर्यंत बाहेर खेळलेले चालते, पण मुलगी मात्र सहाच्या आत घरात यायलाच हवी ( हे माझ्या घरी पण होते) . बऱ्याच गोष्टी अशाच मनावर कळत नकळत बिंबवला जातो. म्हणूनच नवऱयाचे इतके कौतूक करतात त्या- अगदी लहानपणापासून नवऱ्याला ओळखत असली, आणि लव्हमॅरेज असलं तरीही… 🙂

     मी पण त्या लेखात हेच सांगितलंय.. की सुरुवातीपासूनच पांगळा बनवून ठेऊ नये नवऱ्याला ( मला दोन्ही मुली आहेत म्हणून म्हणतो असे नाही) हे माझे स्वतःचे खरे खुरे मत आहे.

     • Smita says:

      very true. Anee mulee ahet mhaNun jaree tumhee mhaNalat taree kay chuk ahe tyat ? problem tar
      representative swarupachach ahe na?
      actually ata muleenahee kaam karayachee savay kameech -in fact nasatech- career, job ya prakarat- tymuLe
      jastach doLaspaNe charcha vayala havee yawar. division of labor cha problem ahe ha chakka.
      purvee baherche sagaLe stresses purush ghyayache ata donheekadache taaN
      bayakahee share karatat- muG gharee tyane swata:che chahache 4 cups sofyakhalee
      na sarakavata sink var thevayala kay harakat ahe?:-)

      • मुलींची काम करण्याची सवय ’न’ च्या बरोबर असते. कॉलेज, क्लासेस, टर्म वर्क मध्ये त्या इतक्या गुंतल्या असतात, की त्यामुळे स्वयंपाक घर म्हणजे फक्त मॅगी/पास्ता/सुप बनवण्यापुरतंच वापरता येतं.

       आणि हो.. ते सोफ्याखाली कप सरकवायचे 🙂 ’ तिची चिडचिड पहायला मजा येते’ म्हणून सरकवले जातात. थोडी जास्त चिडली, की मग समजूत पण काढतो नां……… 🙂
       तिला पण ते चांगलं माहीती असतं.

 8. महेश says:

  स्त्रियांना मान व महत्व आहेच ह्यात कोणाचेही दुमत नाही,प्रत्येक पुरुषाच्या मागे जशी बाई असते तशी बाईच्या मागे पुरुष असतो ,दोघानाही महत्त्व आहे .दोघ म्हणजे संसाराची चाक असतात दोघांना घरात मान पाहिजे सुखी घरात असे चित्र असेल तर देवाचे वास्तव्य तेथे नक्कीच असते

 9. smita says:

  Kaka….Mastach zhaliy post…
  स्त्री घरामध्ये काय काय कामं करते हे लक्षात फक्त जेंव्हा ती आजारी पडते तेंव्हाच येते. असंख्य कामं आहेत जी तुमच्या नकळत बिनबोभाट होत असतात. कुठल्याही परीस्थितीत तिने लवकर बरं व्हावं आणि घराकडे पुन्हा पहिल्यासारखं लक्ष द्यावे असे वाटू लागते. आणि ती जन्माची सहचारिणी ’सखी’ – तिची आपल्या आयुष्यातली खरी जागा समजते.

  PAn he samjayla gharchya stri ne ajari nako ho padayla…Mhnaje mala as mhanych ahe ki jar stri aaj purushachya barobarine kam kartey tar tichya gharchya jababdarya pan samjun, madat keli pahije purushanni….Tila gruhit dharun chalnar nahi…

  Dhanyavaad…

  • स्मिता
   काही गोष्टी लहानपणापासून माहीती असतात, पण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही… 🙂

 10. मस्त आहे लेख एकदम.. खरं तर हे लग्न करताना सांगितले गेले तर किती छान होईल नाही? हे सारं कसं असायला हवं असं आहे, प्रत्यक्ष मात्र फार वेगळी परिस्थिती आहे. जसं आपण स्वयंपाक, सण-वार, कुलाचार याबद्दल लग्न ठरलेल्या मुलीशी बोलतो ना तसेच सहजीवन या शब्दाचा खरा अर्थ मुलाला आणि मुलीला का नाही सांगत? मला फार वाटते की हे खूप गरजेचे आहे.
  कडेकडेच्या गोष्टींवर सखोल चर्चा केली जाते पण या नात्याच्या गाभ्याबद्दल कधी बोललेच जात नाही. कालांतराने नाती दृढ होतात पण ती कशी करता येतील याबद्दल सगळ्यांना अनुभव असुनही बोलले नाही जात. म्हणजे गर्भसंस्कार कसे बाळ जन्माला येण्याआधी केले जातात ना तसे हे संस्कार नाती जन्माला येण्याआधी व्हायला हवेत खरं तर.. नाही का?

  • पल्लवी
   खूप गहन विषय आहे हा. बऱ्याच गोष्टी आपोआपच समजतील म्हणून सांगितल्या जात नाही. कुठलाही प्रिज्युडीस न ठेवता त्यांनी स्वतःचे अनूभव घ्यावे म्हणून..

 11. amha doghana tumacha ha blog khup avadala

 12. Pingback: सखी… | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 13. मस्तच पोस्ट काका..आधी पण आवडली होती आणि आत्ता पण… 🙂

  >> ज्या घरात स्त्रीला मान आहे त्याच घरात देवांचे वास्तव्य असते. + 1000

  • सुहास
   धन्यवाद. अरे मागचा पुर्ण आठवडा बिझी होतो म्हणून उत्तर द्यायला उशीर होतोय..

 14. काका, अतिशय सुंदर पोस्ट !! मागेच आवडली होती 😀

 15. दादा, नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेख. तुमचे लेखन नेहमीच अतिशय संतुलीत असते. कुठेही किंतु बाळगायला जागाच ठेवत नाही तुम्ही. म्हणुनच आम्ही नेहमीच तुमच्या नव्या लेखनाची वाट पाहत असतो. धन्यवाद.

 16. sidhu says:

  Kaka…

  This is the first time i am commenting on your blog, but i have been a regular follower of your blog 🙂

  I don’t understand one thing. How come men change so much after marriage, when it comes to self-dependency. Most of the kids are taught to do small things on their own like, taking the towel to bathroom for bath, keeping the schoolbag @ proper place after getting back home from school, filling your glass of water before you start the meal, keeping your plate in the sink after the meal, keeping your bed neat once you get up in the morning, keeping your clothes ready with ironing for the next day and the list goes on.. 🙂

  But most of the men fail to these small things once they get married. Of course, there maybe exceptions, but still.

  Since i am gay, all these small things which my mother taught me as a kid, are handy to be a self dependent man 🙂

  Another point is, yes, if there is no respect for a woman in the house, there is no peace in that house. But sometimes, when woman turns against another woman (it could be wife vs. mother), its disheartening to see the way men take sides. I am sure this is more of ’घरोघरी मातीच्या चुली’ kinda thing and everyone will have something or more to add. But i’ll mention one ‘case’ wherein wife has actually threatened the husband that as long as she’s in the house, she wouldn’t allow his mother to enter this house. And wife in this case is my office friend. Independent, smart. But actively lacking on the humane ground. And the astonoshing part is, husband is ok with this arrangement. So its been 3 yrs, that his mother has not visited them.

 17. Gayatri says:

  Sundar lihilay…
  Khup khar aahe he…
  Aai chi khari kimmat tila bar nastana kal’li.. Tevapasun binbhobhaatpane me gharatli kaame karayla laagle…

 18. Anukshre says:

  मागेच पोस्ट वाचली होती, नेहमीप्रमाणे अत्युत्तम!! आज मला मात्र सुपर्णाची आठवण आली, जपा तुमच्या जीवन सखीला आणि माझ्या मैत्रिणीला.

 19. Ganesh Pawar says:

  khupach chhan

 20. मधुकर says:

  क्या बात है. मस्त लिहलात साहेब.

  आवडलं.
  ————
  काहि मतांतरे

  १) ज्या घरात स्त्रीला मान आहे त्याच घरात देवांचे वास्तव्य असते.>> आमच्याकडे मात्र नसतो.

  २) म्हणजे स्त्रियांना हिंदू संस्कृती मधे जितका मान दिला गेलाय तितका दूसरी कडे दिला गेलेला नाही.>> हे साफ खोटं आहे. इतिहासात जायची गरज नाही. आजही खेडयापाडयात जाऊन बघा. स्त्रीला कसं वागवलं जातं याचां अंदाज येईल.

  • मधुकर
   प्रतिक्रियेसाठी आभार..
   मते मतांतरे असणारच.. दोन सख्ख्या भावांची मते एक सारखी नसतात, पण तुमच्या मताचा पण आदर आहेच.
   गावामधेच काय पण शहरामधे सुध्द्दा वाइफ बॅशिंग चालतं. भारतातच नव्हे तर पाश्चात्य देशातही हा प्रॉब्लेम आहेच. माझे वडील नेहेमी म्हणतात की , घरची स्त्री लक्ष्मी असते, तेंव्हा तिच्यावर कधिच हात उचलू नये.. आणि ती गोष्ट अजूनही कटाक्षाने पाळत आलोय. असो..

 21. मस्तच पोस्ट काका..नेहमीप्रमाणेच…

 22. मस्तच आहे हा लेख. पण मी हा नाशिकच्या लोकमत ’सखी’ एडीशन (दि. ८ किंवा ९ डिसें २०१०) मध्ये वाचला होता. नाव तुमचेच आहे.
  >> सोबत राहिल्यानंतर एकमेकांच्या स्वभावातले गुण दोष जेंव्हा नीट माहीत होतात तेंव्हाच बायको नवऱ्याने न सांगता त्याच्या मनातलं ओळखू लागते, आणि तेंव्हाच ती खऱ्या अर्थाने ’सखी’ होते. +100

  • प्रज्ञा
   मी स्वतःच त्यांना पाठवला होता.. 🙂

   • Rani says:

    काका लोकमत कड़े लेख माला पण पाठावयाचा आहे please माला संगल का लोकमत पर्यन्त में मज़ा लेख कसा पोचवू शकेल ते ………..

 23. Janhavi says:

  Mastt………

  pan sakhi mhanje fact navryachi bioko ch asu shakte asahi nahi……..

  kontyahi mulat anu mulit athva stri purushat je ek ghatta bonding aste kaslihi apeksha, force asa asat nahi tevha apan tya vyaktila sakhi athva sakha mhanu shakto……
  pan aaj kala ase sakhe kimva sakhya milna kathinach nahi ka?

  • janhavi,
   पहिले वाक्य पहा या लेखाचे.. “देवाने योजलेला आणि दैवाने मिळालेला सखा कोण?”
   इतर मित्र मैत्रीणींवर एक वेगळा लेख लिहायचाय.. प्रत्येक वेळेस जिवनातल्या प्रत्येक वळणावर मित्र मैत्रीणी बदलत असतात- पण सखा मात्र एकच असतो.
   रोग्याचा मित्र कोण? तर याचं उत्तर डॉक्टर असं होईल.. नाही का?? यावर एक वेगळं पोस्ट लिहिन लवकरच..
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 24. JANHAVI says:

  अगदी मान्य पण खरा सखा मिळाल्यावर तय्च्यापासून दूर जावा लागला तर त्यपेक्षा कठीण क्षण कोणता असू शकतो कारण लग्न पर्यंत मैत्री ठीक असते म्हणजे अशा साख्याशी पण लग्नानंतर जर असा सख् असणा आपल्या समाज रचनेत मान्य केला नाही जात त्याचे अनेक अर्थ काढून अशा नात्यातला गोडवा आणि पवित्र कलंकित केला जाता लोकांकडून अशा वेळी की करायला हवा अशा सख्या अथवा साखीशी नात तोडून टाकावा कि सगळ्यांची मत झुगारावीत यात आपल्या मनचे ऐकले तर आपण ते नात घट्ट ठेवू आणि सुखी होऊ पण बाकीचे नाही आणि जर इतरांच्या मतांचा आदर केला तर आपल्या मांची कुचंबन होते ……अशा वेळी काय करावे असे आपल्याला वाटते ……..

  • जान्व्हवी
   मी इथे जे लिहिले आहे, ते पहिले वाक्य पहा.. हा लेख खरंतर मित्र, मैत्रीण या संदर्भात लिहिलेला नाही, तर केवळ पतीपत्नी या नात्यातला एक वेगळा कोन, जो महाभारतात दिलेला आहे त्याचा संदर्भ घेऊन लिहिलेला आहे.मित्र-मैत्रीण दोन्ही पुर्ण पणे वेगळा विषय होईल

 25. ravindra says:

  महेंद्रजी, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे हा! माझ्या मते खरी सखी, सुखात व गहन दुखात सुध्दा व शेवट पर्यंत संगत देणारी सखी म्हणजे अर्धांगिनी बायकोच असते. जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत शेवटच्या स्वस पर्यंत तीच सोबत करू शकते. चाळीसी पर्यंत ज्या शंका कुशंका मनात असू शकतात त्या निव्वळ प्रेमापोटीच असू शकतात. असो लेख सुंदर झाला आहे.

  • रविंद्रजी
   धन्यवाद. तुम्ही पण समवयस्क असल्याने छान समजून घेतलत मला काय म्हणायचंय ते.

 26. yogita says:

  khup chan aahe post tumcha

 27. sukhada says:

  Namaste Sir,

  Khup chan vishay aahe… Mahendraji jevha ek prashna aahe. Ek sri lagna karun yete tevha tila aaplya sathidarachi sath havi aste sarvana samjun ghenya sathi. Pan ekatra kutumba padhati madhe khup adchanina samora java lagta. Chuk konachi hi asudet dosh fakta tilach dila jato. Tevha tine kay karav? Tevha tichi bhumika kay asli pahije?

  • एकत्र कुटुंबपद्धतीचे फायदे तर आहेतच, पण सोबतच तुम्ही म्हणता तो एक तोटा पण आहेच. सुरुवातीला स्त्रिला त्या नवीन घरात स्वतःला एस्ट~ब्लिश करायचं असत– पण खरं सांगू कां? तुमचा विषय खूप कठीण आहे. त्यावर असं एकदम काही लिहिणं खरंच खूप कठीण आहे. नवऱ्याची पण आईकडून बोलावं की बायको कडून ह्या चक्रव्युहात अडकल्याची भावना असते, म्हणून तो घर तुटू नये म्हणून कोणाच्याही कडून बोलत नाही ,पण नंतर काही दिवसांनी सगळं व्यवस्थित होतं. स्त्री पण घरात एस्टॅब्लिश होते .
   प्रतिक्रिया एकदम काही मुद्देसुद देता येत नाही……. पण लवकरच एखादं पोस्ट लिहिन यावर. ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.

 28. tejali says:

  khup chaan…agadi patala..:)

 29. POONAM says:

  agadi khare ani mazya manatle vichare shabdat utaravle tumhi.maz lagn tharat aalay,khar tar kanda-pohyanchya karyakramala mi khup ghabarali hoti karan mi sadhya job karte ani mala bhiti vatat hoti ki lagnanatar mala job karayla milel n milel,tya gharat mazi mazya education chi kadar hoel n hoel,pan sasubai ni mala job karnyachi parvangi dili ani mhanalya etak shikshan milalay mag ghari basun ka vaya ghalavte?tya kshaniii tumcha lekh athavlaaaaaa……..pu

  • पुनम
   ब्लॉग वर स्वागत. शेवटी नवऱ्यासोबत घरच्यांची पण साथ ही हवीच.लग्न ठरल्याबद्दल शुभेच्छा. 🙂 आणि प्रतिक्रियेसाठी आभार.

 30. santosh w samarth says:

  mala ek gost kalat nahi, navaryacihi maitrin mhanaje navaryachi rakhelech asali pahije ka Ti navaryachi sakhi hou shakat nahi pratyek natyat vasanecha dhumakul ka.manasane strishi entelechual relationship theuch naye ka.

 31. Gytha says:

  That’s really tiknhing out of the box. Thanks!

 32. Gurunath says:

  म्हणजे स्त्रियांना हिंदू संस्कृती मधे जितका मान दिला गेलाय तितका दूसरी कडे दिला गेलेला नाही. ’

  हे मात्र मनापासुन पटलेलं नाही दादा, म्हणजे बाकी कुठे हिंदु धर्मापेक्षा जास्त मान आहे अश्यातला भाग नाही तरी हिंदुत्वात खुप जास्त मान आहे असे ही नाही, असे असते तर विधवा केशवपन, आलवणच घालायचे वगैरे नसते, स्त्री ला वेद वाचणेस परवानगी नसणे हे ही नसते. राजा राम मोहन राय ते फ़ुले हे सगळे कदाचित ह्याच विपर्यासा विरुद्ध होते असे वाटते,एका विधवेशी लग्न केल्यामुळे कर्वेंची पण नाच्चकी झाली होतीच ना?? फ़ार मागचे पण नको, ८३ कोटी हिंदु असणा~या आपल्या देशात स्त्री भ्रुण हत्या का होतात हा पण एक प्रश्न आहेच???? मनुस्मॄती नुसार पुत्र व पत्नी ह्यांचे उत्पन्न हे यजमान/पित्याचे असते. “कालीमातेची” उपासना करुन झालेल्या पोराचे नाव ठेवायचे कालिदास, कालिचरण पण ह्याच कालिदासाच्या पत्नीपोटी जर एखादी दुर्गा असेल तर ती मात्र आम्ही सोनोग्राफ़ी सेंटरवरच खलास करणार, शुद्ध दांभिकतेत आपला धर्म अडकल्यासारखे वाटते अश्याने……. कदाचित स्वामी विवेकांनंद ह्याच दांभिकतेवर प्रहार केल्यामुळे “विद्रोही संन्यासी” म्हणवल्यागेले असतील का?? स्वामीजींना पडलेला प्रश्न मला ही पडतो, कुठे आहे आपला विशाल धर्म?????

 33. dipti says:

  hello sakhi, lekh manapasun aavdla. striche man samudrapramane athang ahe jyacha kothe thang nahi. te jar ticha sahchari 50% jari samjun gheu shakla tari tichysathi te purese ahe.
  strivadachahi artha stritva nakarne nahi ahe. pan jar koni tichya bhavna japat nasel, tar pratikar karnyacha adhikar tilahi ahe.

  • दिप्ती
   ब्लॉग वर स्वागत. लहानशी गोष्ट समजायला पण बरेच दिवस जावे लागतात, काही लोकांना लवकर समजतं.. काही लोकांना कधीच समजत नाही.. नशिबाचा भाग आहे थोडक्यात..

 34. sakshi nerkar says:

  mahendraji, tumache june lekh vachtey sadhya, mala sagalyat awadala to ha lekh, apratim sadarikaran saral ani sope pan agadi khare khure. kahi shear karate aahe, amachya natyat nashib phar changale aahe, to maza sakha ani mi tyachi sakhi aahe, kadachit mhanunach mala watate ki we are the happiest couple in the world.

  • साक्षी
   तुझे अभिनंदन.. इथे लिहिले आहेत ते माझे अनुभवलेले क्षण आहेत हे सगळे. मनःपूर्वक आभार.

 35. Yogita says:

  Aj pahilyanda visit dili ya blogla.ani sakhi he nav vachun lekh vachayle ghetla.Kharch chan ahe lekh.bayko jenvha sakhi bante tenvhach khari maja ahe sahjivanachi.

 36. swati manoj karnekar says:

  Ho khar aahe baykola maan aani devache vaastavya jya gharat aahe te ghar sukhi . Mi sakhi khup vaachte pn he je vaachal tr Mala vaatal mazya navryala fakat maan aahe. kharch maan aahe tumaala Mala lagan mahantal ki khup vegal vaatayche pan dev barobar gaat maarto .devane Mala dileal vardaan aahe. Kharch mi vichar Sudha nahi kela pan Mala Maza navra .tyancha badal bolin tevad kami aahe kharch Mala vatat ki saglyanla aasach navaradevo bhale Mala daakhavat nastil pan maaz maan barobar kalte. Mala Maza navra mazi sakhi aahe.Maza dosat .mazya saati mazi duniya .he lihitaanaa maaz maan kuap bolaav vaatal pan kiti lihnaar .sevat mi mazya rajachi Rani .

 37. amita says:

  धन्यवाद

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s