गोवा..

कोलव्याचा समुद्र किनारा खूप सुंदर आहे आणि अजूनपर्यंत तरी येणाऱ्या रशियन  लोकांनी खराब केलेला नाही. बागा बिच वर ज्या प्रमाणे तुम्हाला अर्धनग्न   पर्यटक दिसतात, किंवा जसे त्या कारवार रोडवर असलेल्या ( मडगाव पासून ४० एक किमी.. असलेला बिच, नांव मुद्दाम देत नाही इथे) बिच वर पुर्ण नग्न लोकं दिसतात  तसे इथे दिसत नाहीत. इथे येणारे पर्यटक कदाचित थोडे सिव्हिलाइझ्ड जास्त असावेत  . गोवा माझे आवडते शहर, पण या रशियन बायकांनी इथे येऊन अक्षरशः धुमाकुळ घातलेला आहे.  हल्ली गोव्याला बऱ्याच ठिकाणी दुकानांवर असलेल्या पाट्या या रशियन भाषेत लिहिलेल्या दिसतात -विशेषतः बागा , कलंगूट भागात, आणि त्यावरूनच  लक्षात येतं की लोकल लोकांना त्यांच्या अस्तित्वाची दखल घ्यावीच लागते, आणि त्यांना इंग्रजी निट समजत नाही म्हणून त्यांच्या मातृभाषेतले बोर्ड लावावेच लागतात.

माझा टॅक्सीवाला योगी एक अनुभव सांगत होता, रात्री हॉटेल वर नेऊन सोडल्यावर पैसे न देणे वगैरे नेहेमीचेच झाले आहे. सरळ तुला जे काही करायचे ते कर पैसे नाहीत असे म्हणतात म्हणे त्या स्त्रिया…. .  सिझन मधे एका दिवसाचे ह्या स्त्रिया २५ हजार ते एक लाख रुपये कितीही चार्ज करतात. या स्त्रियांवर गोवा सरकारने काहीतरी कारवाई  करण्याची आता अतिशय जास्त निकड झाली आहे असे मला वाटते. एक बाकी बरं की सर्वसाधारण पर्यटकांना अजूनही यांच्या ठिकाणां बद्दल फारशी माहिती नाही. यांचा धंदा त्या मी वर नांव न दिलेल्या बिच वर खुले आम सुरु असतो  आणि त्यांचे लोकल एजंट्स सगळीकडे फिरत असतात.इथे भारतामधे टुरिस्ट व्हिसा वर येऊन राजरोस पणे वेश्या व्यवसाय करतात  या स्त्रिया. अर्थात सगळ्याच तशा नसतात, पण.. येणाऱ्या बहुसंख्य रशियन्स तशाच आहेत .

गोव्याला हॉटेल मधे न रहाता फ्लॅट्स भाड्याने घेऊन रहाणे हे लोकं पसंत करतात. या स्त्रिया गोवा आणि दिल्ली मधे जाऊन येऊन असतात- धंदा दोन्ही ठिकाणी सुरु असतो. जर याच वेगात गोव्याला हा व्यवसाय वाढत राहिला तर नक्कीच बॅंककॉक प्रमाणे गोव्याची पण ख्याती जगात पसरायला वेळ लागणार नाही. असो. ज्या गावाला आपल्याला जायचेच नाही, त्याचा रस्ता कशाला विचारायचा? म्हणून विषय बदलला. .

प्रत्येक वेळेस कोलवा बिच वरच्या एका हॉटेल मधे उतरतो, कारण ह्या बिच वर अजूनही फारशी अनैतीक गतिविधी चालत नाही- (म्हणजे ड्रग्ज वगैरे).इथला समुद्र किनारा पण स्वच्छ असतो, आणि फारशी गर्दी पण नसते. फक्त कंडक्टेड टूर्स वाले लोकं बसेस भरून टुरिस्ट आणत असतात तेवढेच.गोव्याला दोन प्रकारचे  परदेशी टूरिस्ट  असतात- एक पुर्ण कपडे घालून फिरणारे, आणि दूसरे म्हणजे बागा बिच प्रमाणे उघडे फिरणारे.  इथे रहाणारे फॉरिनर्स पहिल्या प्रकारचे. असो.

गोव्याच्या खाद्ययात्रे बद्दल आधी बरंच काही लिहिलं आहे.मला वाटतं की दोन पोस्ट्स तरी नक्कीच आहेत- पण  या वेळेस एक नवीन खादाडीची मस्त जागा सापडली, ती शेअर करायला म्हणून हे पोस्ट. खरं तर गेल्या प्रत्येक वेळेस कोलवा बिच वर रात्री एक माणूस काहीतरी लटकवलेले चिकन स्क्रॅप करून लोकांना पावात टाकून देतांना पाहिले होते, पण कधी खाण्याची मात्र इच्छा झाली नव्हती- कारण हे खाल्लं की पोट भरेल , आणि मग फिश खाता येणार नाही हा मुळ मुद्दा मनात घर करून असायचा.   काल  संध्याकाळी दिवसभराची कामं आटॊपुन नेहेमीच्या हॉटेल वर पोहोचलो. संध्याकाळचे सात वाजले होते- पण समुद्रकिनाऱ्यावर एक चक्कर मारायचा मोह काही आवरला नाही, म्हणून सरळ समुद्रावर फिरायला निघालो आणि समोर ही पिंटोची गाडी दिसली. आज पर्यंत या गाडीभोवती प्रत्येकदा खूप गर्दीच पाहिली होती, पण आज मात्र पिंटो एकटाच दिसत होता. सिझन सुरु न झाल्याची ही एक खूण!

त्याच्याजवळ थांबलो आणि गप्पा मारणे सुरु केले. साधारण तिशी मधला स्मार्ट मुलगा होता. स्वच्छ कपडे, अंगावर पांढरा ऍप्रन, डोक्यावर शॆफ ची कॅप,  आणि समोर चिकन शवारमा ची गाडी.  एका तिन चाकी ऑटो रिक्षावर त्याने शवारमा चे मशीन  बसवले होते .  त्या मशीन मधे समोर एक उभे स्टेनलेस स्टीलचे हिटर युनिट लावलेले होते. कॉइल्स लाल बुंद झालेल्या होत्या. एका लोखंडी सळीवर चिकनचे पिसेस पत्त्यांच्या कॅट सारखे एकावर एक  रचून ठेवले होते.  सळी वर एका मोटरला जोडलेली असल्याने सारखी फिरत होती, आणि चिकनचा प्रत्येक भाग त्या हिटर कॉइल्स समोरून पास होत होता. थोडक्यात तंदूर सारखा प्रकार म्हंटले तरीही चालेल.

This slideshow requires JavaScript.

चिकनच्या खाली एक परात होती, आणि त्या मधे काही सॅलड्स चे पदार्थ ( पा्न कोबी , टोमॅटॊ वगैरे)बारीक चिरून ्ठेवलेले दिसत होते. पिंटोला ऑर्डर केली दोन चिकम शवारमाची. त्याने  समोर ठेवलेली अतीशय शार्प पण पातळ अशी सुरी उचलली आणि त्या सळीवर   टांगलेल्या चिकनचे बारीक पिसेस हातातल्या सुरीने श्रेड केले  ते खालच्या परातीत पडले. त्यावर क्रिम, बटर, मेयो, पिकल्ड चिली आणि काही सिक्रेट स्पायसेस मिक्स करुन  एका पावाच्या मधे ( पावा ऐवजी पिटा ब्रेड / किंवा चपाती पण वापरली जाऊ शकते)  भरून , आणि त्यावर एक पिकल्ड चिली ठेऊन   (हॉट डॉग प्रमाणे) दोन  मिनिटातच मस्त पैकी चिकन शवारमा हातात दिले. एक घास घेतला, आणि बस्स.. खल्लास!! जबरदस्त टेस्ट !! सरळ हिटरसमोर रोस्ट केल्याने एक मस्त फ्लेवर (तंदूरी चा नाही – हा वेगळाच फ्लेवर होता) आला होता . पिंटो म्हणाला हे बनवणे पण इतके सोपे नाही, कारण  जास्त रोस्ट केले तर चिकन सुकुनही जाऊ शकते, आणि कमी हिट ठेवली तर निट रोस्ट पण व्हायला हवे. चिकन मधला ज्युस जो खाली परातीमधे  पडला होता तो पण चिकन फिलिंग करतांना त्यात मिक्स केला होता आणि त्यामुळे चिकनचा सॉफ्ट नेस खातांना जाणवत होता. बरेच  लोकं ब्रेस्ट पिसेस किंवा लेग पिसेस वापरतात या साठी पण पिंटोने तो काय वापरतो हे मात्र सांगितले नाही. 🙂

जे लोकं मिडल इस्ट मधे रहातात त्यांना  हा प्रकार माहीत असेल . पिंटो ला विचारले की हे युनिट तू कुठून आणलेस? तर म्हणाला की मी स्वतः पूर्वी दुबईला होतो, तेंव्हा तिथे हेच काम करत होतो. तिथे पैसे कमावले आणि येतांना इतर काही न आणत हे चिकन शवरमा चे हे मशीन आणले, आणि गोव्याला येऊन हा धंदा सुरु केला. इथे भारतामधे पण जवळपास दुबईइतकाच पैसा कमावतो . चिकन शवारमा ची किंमत पण फक्त  ४० रुपये आहे. एक चिकन शवारमा खाल्लं की पोट भरून जातं- एक चिकन शवारमा  सोबत एक-दोन बिअर  घेऊन कोलव्याच्या बिचवर बसायचं आणि बस्स… और क्या चाहिये?? तर मंडळी गोव्याला गेलात, तर शक्यतो कोलवा बिच वर संध्याकाळी जा आणि हे चिकन शवारमा टेस्ट करायला विसरू नका.
सगळे फोटो काढले, पण शेवटी त्याने जेंव्हा ते शवारमा बनवून दिले ,तेंव्हा त्याचा फोटो मात्र काढायचा विसरलोच!!!!!

गोव्याच्या खादाडीवरचे जुने पोस्ट  वाचायचे असल्यास, खाद्ययात्रा या टॅग मधे सापडेल. या नंतर पण गोव्यावर एक पोस्ट लिहायचे आहे.. ते बहूतेक उद्या किंवा सोमवारी 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा. Bookmark the permalink.

44 Responses to गोवा..

 1. Mayuresh says:

  sir in Belgaum also we get dt sawarmaa frm hotel Niyaaz which is very femous in north Karnataka for Kabab, Biryanee…n so many Arebic dishes…

  • इथे मुंबईला पण बांद्र्याच्या एका हॉटॆल मधे या नावाने एक पदार्थ मिळतो, पण खरी रोस्टेड चव त्यात वाटली नाही. त्यामधे चक्क चिकन टिक्का श्रेड करून घातला होता.
   बेळगांवला कधी येणं झालं नाही, पण कधी आलो तर नक्कीच जाइन तिथे पण टेस्ट करायला.

 2. निनाद.. says:

  दररोज email check करत असतो की तुमच्या ब्लॉग वर आज काही update असेल..
  ज्यावेळी पाहिलेंदा तुमचा ब्लॉग वाचनात आला त्यावेळी अधाशासारखा सगळा वाचून काढला.

  तसा गोव्याला मी एकदाच जाऊन आलोय आणि ते पण मित्रांबरोबर ३-४ वर्षांपूर्वी, पण त्यावेळी जास्त नाही पाहता आले.. परत जाईन त्यावेळी नक्की चिकन शवारमा ची चव घेईन..

  निनाद

  • निनाद
   ब्लॉग वर स्वागत..
   हल्ली कामाच्या व्यापामुळे फार लवकर अपडेट करता येत नाहीत , पण तरीही एकदोन पोस्ट तरी आठवड्यात टाकायचा प्रयत्न करतो.
   गोव्याला जाणार असाल, तर या पुर्वीचे पोस्ट ’चविने खाणार गोव्याला” लिंक दिलेली आहे वर ते अवश्य वाचून जा. :)धन्यवाद.

   • निनाद.. says:

    काका… तुमचा ब्लॉग वाचला की एकच प्रश्न पडतो.. तुम्हाला एवढे अनुभव कसे काय मिळतात.. ??
    का तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे एक अनुभव म्हणून पाहता..?? आता मीही प्रयत्न करीन प्रत्येक गोष्टीतून अनुभव घेण्याचा..

    धन्यवाद..

    • निनाद
     ब्लॉग वर स्वागत.. सभोवताली जे काही घडते, त्याकडे डोळे उघडे ठेउन पहाणे बस्स! अगदी सोपं आहे. तेवढं केलं की प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याचा एक वेगळा ऍंगल दिसू लागतो.

 3. वाह..काय बोलू काका आता….जेवलो आताच पण पण एक चिकन शवारमा जाईल 😉
  मस्तच असेल हे चिकन शवारमा .. आवडल एकदम 🙂

  • सुहास
   मस्त आहे टेस्ट.. एक वेगळा फ्लेवर आणि टेस्ट, तसेच टेक्स्चर पण मस्त असतं याचं. आपल्याकडे बांद्ऱ्याला काही हॉटेल मधे मिळते , ट्राय करून पहा एखाद्यावेळेस.

 4. s.k. says:

  kaka what u said about chicken shwarma is correct. u get it at colva beach.. I’m from Goa and notice it everytime I visit Colva
  I have been following ur posts for quite sometime and let me tell you tumhi apratim lihitat. i came across your blog i think while reading sahajach by tanvi. chaan astat tumche blog posts.
  keep posting..
  dhanyavaad

  • मनःपुर्वक आभार.. आणि ब्लॉग वर स्वागत..
   कोलवा बिच वरून जवळच असलेले शेरे पंजाब मधे तंदूरी चिकन अप्रतीम. फक्त तो ८०० ते ९०० रुपये लावतो बेबी किंग फिश चे.. चार पाच लोकं सोबत असतिल तर अवश्य ट्राय करता येईल. या पुढ्चे पोस्ट पण बहूतेक गोव्याचेच असेल..

 5. Pingback: गोवा.. | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 6. santosh Deshmukh says:

  काका राम राम ,
  बरेच दिवसांनी आपला आवडता विषय आला ,चरणे ते ही चवीने . वर्णन खूपच छान केलाय पण जरा जवळच शोधा की !! अहो चाळीस रु ची चव ४००० रु ला पडते तुमची मज्जा आहे बाकी सर्व कुशल मंगल

  • संतोष
   चार हजार खर्च झाले तरी हरकत नाही, इतरही बऱ्याच चवी घेता येतील. सध्या गोवा म्हणजे मोस्ट हॅपनिंग प्लेस आहे. हिवाळ्यात अप्रतिम. जर जायचे असेल तर हॉटेल मिळवून देण्याची व्यवस्था मी करतो.. 🙂

 7. smita says:

  काका, मस्तच झाली आहे पोस्ट…काय वर्णन आहे काका…पण मी नॉन-वेज अजिबातच खात नसल्यामुळे ह्याचा काही उपयोग नाही हो…बहुतेक सर्व खादाड यात्रा तुम्ही नॉन-वेज वरच लिहिता….आमच्या साठी पण काही तरी प्यूर-वेज पण शोधा ना…गोव्याचे सर्वच समुद्र किनारे खूप सुंदर आहेत. बाकी गोव्याचेच काय सगळ्या पर्यटन स्थळांवर हल्ली हेच धंदे बिनबोभाट चालतात….काही वेळा उघडकीस येतात काही वेळा नाही…थोडे दिवस चर्चा होते, मग सर्व परत जैसे थे…कोण दखल घेत का ह्याची?

  धन्यवाद…

  • स्मिता
   जगात व्हेज स्वयंपाक आपल्यापेक्षा जास्त चांगला दुसरा कोणी करूच शकत नाही अशी एक प्रत्येक स्त्रीची भावना असतेच .. ( या गोष्टीला बायको पण अपवाद नसते ) आणि मी सोडून घरचे सगळे लोकं शंभर टक्के व्हेज आहेत, त्या मुळे मी व्हेज वर लिहिण्याचे टाळतो. 🙂

   विनोदाचा भाग सोडा, पण खरंच तसं होतं खरं.. या पुढे एक पोस्ट नक्कीच व्हेज वर असेल.

 8. mazejag says:

  Kaka…thank you very much….haa pinto shodhlach bahga aata…by d way mi nehi goa turizmchya hotel uterte I guess tyachach ullekh kelat kai….last vacation madhe ratri 3 wajata uthun kolyanchi lagbag pahili hoti….ekdat livly wata tikde…kolva rocks…

  • हो, ते गोवा टूरिझम चे हॉटेल आहे तिथे किनाऱ्यावरच. फक्त तिथे रुम सर्व्हिस चांगली नसल्याने थोडा प्रॉब्लेम होतो. नक्की शोधून काढा पिंटोला.. 🙂 अगदी समोरच उभा असतो आइस्क्रिमच्या गाड्यांशेजारी.

 9. Smit Gade says:

  Kaka,
  Punyatahi kamala Nehru park samor milato.
  Baki post as usual mastach zali ahe.

  • स्मित
   तो बनवला कशावर त्यावर पण बरंच अवलंबून असतं. इथे त्या स्पेसिफिक मशीन मुळे एक वेगळाच फ्लेवर येतो. मुंबैला पण दोन ठिकाणं आहे बांद्रा हिल रोडवर.
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 10. ऋषिकेश says:

  महेन्द्रजी,
  मी आपला ब्लॉग रोज वाचतो. आपला अनुभव खरोखरच दांडगा आहे. आपली प्रत्येक पोस्ट म्हणजे माहीती चा मोठा खजिना असतो. आणि ‘खादाडिची पोस्ट्स’ तर अप्रतिम :). पुढच्या वेळेस गोव्याला जाताना गृहपाठ करून जावे म्हणतो !!

  तुम्ही सांगितलेल्या ‘मारटिन्स कॉर्नर ‘ ला आम्ही गेलो होतो. अड्वान्स बुकिंग करून जावे लागते एवढी गर्दी असते तिथे. चव आणि सर्विस उत्तम. आंबियेन्स पण छान आहे.

  – ऋषिकेश

 11. ngadre says:

  उशीरा वाचली पोस्ट.

  कोलवा बीचवर अनेकदा जाऊनही हा पदार्थ खाल्ला नाही म्हणून हळहळ वाटली. तिथे बरेच फूड जॉईंट्स आहेत आणि अज्ञानामुळे किंवा परिचय नसल्याने बरेचसे खाल्ले जात नाहीत. आता पुढच्या वेळी एकदम फिक्स.

  बाकी बियर ऐवजी फेणी सुचवतो..

  हाच पदार्थ चिकन प्रमाणेच बोनलेस फिशचा (फिल्ले सदृश) बनवता येईल का असा विचार यायला लागलाय.

  🙂

  तसेच एक गोवन सॉसेजेस म्हणूनही पूर्वी एअरलाईनमधे असताना गोवा फ्लाईटच्या स्टाफशी संधान बांधून एअर होस्टेस सोबत आणवून खाल्ले होते. ते मिळण्याचे ऑथेंटिक ठिकाण कळले तर बहार.

  • महेंद्र,
   सकाळी सकाळी तोंडाला पाणी सुटलं. हा शवारामा प्रकार न्यूयोर्क मध्ये पहिला होता, पण रेड मीट असेल असे वाटल्याने कधी त्या बाजूला फिरकलोच नाही. आता मात्र खायला पाहिजे.
   नचिकेत,
   फिशचा शवारामा होईल असे वाटत नाही. सगळेच फिश चिकनप्रमाणे घट्ट नसते ना ! झालेच तर टूना फिश चे होईल.

   • निरंजन
    प्रतिक्रियेसाठी आभार. सध्या मी स्ट्रिक्ट डायटवर आहे, पण कधीतरी अशी चैन करतो 🙂

 12. Smita says:

  hmmm. shuddhadha shakaharee minority madhye ahet ithe tumchya blog war-kharach ek pure veg post haveech- I guess ek hotee- tya anaspure cha photovalya restaurant chee , pun jara partial ahat tumhee towards meat eaters

  Eat something not someone:-) asa mee gharee pun recommend karat asate.

  btw Govyatala to russian prakar even Manali madhye chalto- tithe israel madhun 18 varshanantar army trg nanatar destress karayala alele itake befam vagatat, tithe jewish menu, films, russian madhye menu card he sagala Vasishtha Kunda pahayala gelat kee vaTevar disata.
  aNee locals itake mindhe asataat kee vait vaTata.
  Govyat amhala ekda sahakutumb taxi valyane arambol beach var pohochavala hota:-) – total cultural shock. tithe apale gujju bhai sodale pahijet garbo aNee kadhee khichdee stalls hoteel aNee drugs/ aNee inevitable ” bakeries” banda hoteel as aMhee gamateene mhaNato

 13. Smita says:

  chicken shawarama sounds/ looks like rotessori chicken.

 14. सोनाली केळकर says:

  महेंद्रकाका,
  ठाण्याला आमच्या घराजवळच एक फ़ूड जॉईंट आहे तिथे हा पदार्थ मिळतो. मी नेहेमी बघायचे एका स्टीलच्या सळीला चकत्या चकत्या लावून गोल फिरत असायचे, एकदा मी उत्सुकता म्हणून त्याला विचारले पण हे काय आहे, त्याने सांगीतले चिकन. मग मी त्याच्या फंदात पडले नाही.
  तुम्ही या आमच्याकडे तुमच्यासाठी मागवू, गोव्याला गेल्यासारखे वाटेल तुम्हाला 🙂

  • सोनाली
   अवश्य!!

   🙂

  • mazejag says:

   Hi Sonali,

   Mi pan thanyalach rahte..kuthlya areayat aahe

  • Nachiket says:

   कोरम मॉल का? की आणि कुठे?

   • Mahendrakaka,

    काल काही जण विचारत होते ठाण्यात शवरमा कुठे मिळते. त्याचा पत्ता खाली देत आहे, त्या पोस्टवर कमेंट देता येत नाहीये.

    Laziz Biryani & Shawarma Corner, Kolbad, Near Pratap Cinema, Thane West

    चव बिव माहिती नाही हा! देखीव माहिती 🙂
    Best Regards,

    Sonali Kelkar

    सोनालीची कॉमेंट इथे पेस्ट करतोय .. 🙂

 15. shubhalaxmi says:

  hello sir mi aaj pahila post chan ahe goa vachtach kas fresh vatal. mala beach khup avadatat pan jayla kadhi sandhi nahi milat…. pan jevha jain tumchi athavan nakkich yeil. mi tashi vegetarian ahe mhnun mala he chikan vagaire vachal ki kas tari vatal, pan tumhi lihilel vachan khupch chan vatat…….. tumche post khup chan asatat nehmi navin post yenyachi vat pahte… by tc

  • शभलक्ष्मी
   मी पण तसा व्हेज खाणारा. आमच्या घरी अंडं पण चालत नाही, पण बाहेर मात्र सगळे जिभेचे चोचले पुरवतो. कदाचित फार वेळ ऑफिशिअल कामानिमित्य टूर वर जावे लागल्याने असेल.
   प्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार.

 16. siddhesh says:

  ha vishay chal vatla.
  tumhi blog ver navin topic takla he mala mail dvare kasa kalel. tya sathi kay setting change karavi?

  • सिद्धेश
   उजव्या बाजूला एक ” ’काय वाटेल ते….’ वर लिहिल्या गेलेल्या लेखांची माहिती तुमच्या इ मेल मधे मिळवण्यासाठी इथे इ मेल नोंदवा..” असे लिहिलेले दिसेल. तिथे तुमचा इ मेल नोंदवा,नंतर तुम्हाला एक मेल येईल त्यावर तुम्ही कन्फर्म केले की नवीन लेखनाची सुचना तुम्हाला इ मेल मधे मिळेल.

 17. siddhesh says:

  tumhi blog ver navin topic takla he mala mail dvare kasa kalel. tya sathi kay setting change karavi?
  ha vishay pan chan ahe.

 18. bhaanasa says:

  अरे वा! चांगला जॊंईट शोधलास तू. चला पुढच्या वेळी बेटर हाफला मजा येईल. 🙂 ( होपफुली तोवर तो तिथून दुसरीकडे गेलेला नसेल… )

 19. pratal says:

  काका आता गोव्याला जावूनच यावे लागेल स्पेशली त्या डिश साठी तर नक्की !

 20. माझ दुर्भाग्य बघा आज चक्क दत्ता जयंतीच्या दिवशी ही पोस्ट वाचली ,तोंडाला पाणी सुटलेल असतानाही मनातल्या मनात पण नाही खाऊ शकत हा चिकन शवारमा …. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s