फोर्ट अग्वादा- गोवा

गोवा म्हंटलं की समुद्र,मासे, काजू (बाटलीतली आणि पाकिटाला 🙂 ) आणि परदेशी पर्यटक, अंगात शर्ट न   घालता भाड्याने घेतलेल्या बाइक वर फिरतानाचे आठवतात. आपल्याला त्यांच्या गोऱ्या रंगाचे कौतूक तर त्यांना कातडी टॅन करून घेण्याचे डोहाळे.  फेअर ऍंड लव्हली ची जाहीरात पाहताना ह्या  लोकांच्या मनात  काय येत असेल ? हा विचार नकळतच मनात आला आणि एकदम हसू फुटलं . हे लोकं टॅनिंग साठी असे उघडे फिरतात, पण अशा उघड्या फिरण्यामुळे त्यांची त्वचा टॅन होण्याऐवजी अक्षरशः   लाल ला रंगाची दिसायला लागते, आणि त्यांना पाहिलं की   सोलून उलटा टांगलेल्या बोकड किंवा लाल तोंड्या माकडाची आठवण येते मला!

समुद्र हा तर गोव्याचा एक महत्वाचा अट्रॅक्शन फॅक्टर आहेच, पण सोबतच इतरही बऱ्याच जागा आहेत , ज्यांच्याकडे फारसं लक्ष जात नाही-  फोर्ट अग्वदा’   हा पण त्यातलाच एक.  पोर्तुगीज लोकांनी १६व्या शतकात सिंकेरीम बिच ( ताज हॉटेल जवळ) जवळ  बांधलेला  हा एक किल्ला ( मी स्वतः पण हा किल्ला कित्येक वर्ष गोव्याला येत असलो तरीही पाहिला नव्हता म्हणून दुर्लक्षित म्हणतोय).  अग्वादा हा एक पोर्तुगीज शब्द, याचा अर्थ म्हणजे पाणी भरण्याची जागा ( वॉटरींग प्लेस) . जहाजा मधे पाणी भरण्यासाठी इथे जवळपास २४ लाख गॅलन पाणी स्टोअर केले जात असे.  १७ कॉलम वर उभी असलेली ही अंडरग्राउंड टॅंक पूर्वीच्या काळी खूप महत्त्वाची होती.  पोर्तुगल हून येणाऱ्या जहाजांचा हा भारतातला पहिला स्टॉप असायचा, त्यांना  पाणी पुरवठा करण्यासाठी हा किल्ला बांधला होता. किल्ल्यावरून पाहिले असता चारही बाजूला व्यवस्थित नजर ठेवता येते, त्यामुळे किनाऱ्यावर येणाऱ्या पोर्तुगीज जहाजांना पुर्ण संरक्षण पुरवता यायचे.

तांबड्या चिऱ्याने बांधलेला हा किल्ला अजूनही दिमाखात वारा पावसाशी टक्कर देत उभा आहे. चिरा म्हणजे एक प्रकारच्या अग्निजन्य खडकातून कापून काढलेला दगडाचा तुकडा. हे असे दगडाचे/खडकाचे तुकडे  तसं म्हंटलं तर  फारच कच्चे असतात , पण या मधे एक जांभा नावाने ओळखला जाणारा चिरा, जेंव्हा उन- पावसाला  जसा एक्स्पोझ होतो तसा तो जास्त पक्का होत जातो .  हा किल्ला पण जांभा चिऱ्यातून बनवलेला आहे.

लहानपणापासूनच चांदोमामा चांदोमामा, रुसलास का? लिंबोणीच्या झाडामागे…. कविता ऐकत मोठे होतो  कवितेतला  मामाचा वाडा चिरेबंदी हे ऐकत मोठं होत  असतो आपण , पण हा चिरा म्हणजे काय ते मात्र कित्त्येक वर्ष माहीत नव्हते. या कच्च्या चिऱ्याचा किल्ला इतका कसा काय टिकला  हा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.  ४०० वर्षाच्या काळात ह्या किल्ल्यावर कधीच कोणाचा हल्ला वगैरे झालेला नाही. सलग शेकडो वर्ष हा किल्ला पोर्तुगीज अधिपत्याखाली होता. जेंव्हा पोर्तुगीज गेले, तेंव्हा १९६२ च्या सुमारास हा किल्ला आपल्या ताब्यात आला.  किल्ल्याचे कच्चे बांधकाम पाहिले की नकळतच आपण त्याची तुलना शिवाजी महाराजांच्या दगडी किल्ल्यांशी करतो.   महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यापुढे हा किल्ला एकदम तकलादू वाटतो- चार पाच तोफेचे गोळे डागले,तर तटबंदी कोसळून पडेल  पत्त्याच्या बंगल्या सारखी असे वाटते! याच किल्ल्याच्या भरवशावर गोव्याच्या किनाऱ्यावर येणाऱ्या जहाजावर नजर ठेवण्याचे काम पोर्तुगीज करत हो्ते.

तर अशा ह्या चिऱ्यांपासून बांधलेला हा फोर्ट अग्वादा मांडवी नदीच्या मुखावर आहे. इथून पुढे मांडवी नदी अरबी समुद्राला मिळते.  या ठिकाणी खरं तर आधी एक लाईट हाऊस बांधले गेले, आणि नंतर मग   पाण्याची टाकी बांधली गेली. लाईट हाऊस वरचा दिवा दर सात मिनिटांनी चालू बंद होऊन   समुद्रातून येणाऱ्या जहाजांना किनाऱ्याची कल्पना द्यायचे, नंतर १८६४ साली ह्या दिव्याची फ्रिक्वेन्सी पण ३ मिनिटे करण्यात आली आणि शेवटी १९७६ साली ह्याचा वापर पुर्ण बंद करण्यात आला.

इथे पाण्याचा खूप मोठा साठा पण करून ठेवण्यासाठी एक मोठी टॅंक बांधलेली आहे-( पाणी इथल्या झऱ्यांचेच जमा केले जाते. )खरं तर ह्या किल्ल्याचा मूळ उद्देश हा पाण्याचा साठा करण्यासाठी आणि दारूगोळा  साठा करण्यासाठीच केला जायचा. दारू गोळ्याची कोठारं वगैरे आता बरीचशी तुटलेली आहेत- पण अवशेष पहायला मिळतात.  किल्ल्याची तटबंदी अजूनही अभेद्य आहे. या किल्ल्यावर एकही तोफ आढळली नाही , आणि ती का नाही हे पण  काही लक्षात आले नाही. पाण्याच्या टाकीच्या निर्मिती साठी  डोंगराला पोखरताना जो दगड निघाला, तोच या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला गेला असावा असे वाटते.

एक मह्त्वाची साईट, पण टूरिस्ट अट्रॅक्शन म्हणाल, तर अजिबात नाही अशी म्हणजे ही साईट. मी जेंव्हा या ठिकाणी अर्धा तास होतो तेंव्हा  इथे फक्त काही गोरे टुरीस्ट दिसले, आपले भारतीय टुरिस्ट्स फारच कमी प्रमाणात होते.  या किल्ल्याच्या पायथ्यापासून कित्येकदा जाणे झाले होते, पण इथे वर चढून कधी पहायला गेलो नव्हतो.   ड्रायव्हर म्हणाला, अगर देखना है तो २०-२५ मिनिट बहूत है.. म्हणून तिथे थांबलो आणि नुकतेच जेवण झाले असल्याने थोडा पाय मोकळे केल्यासारखे होईल म्हणून किल्ल्यावर जायचे ठरवले. अगदी किल्ल्याच्या जवळ पर्यंत कार नेली जाऊ शकते- आणि अजिबात चढण वगैरे नसल्याने फार तर ५ मिनिटात तुम्ही तटबंदी जवळ पोहोचता.

किल्ल्याच्या सभोवताली असलेला खंदक जो आता रिकामा आहे तो  ओलांडून आत पोहोचल्यावर   एक विस्तीर्ण पठार , मध्यभागी टाकीचा भाग, आणि चारही बाजूला तटबंदी  दिसते. एका बाजूला अगदी मुख्या दिंडी दरवाजाजवळ दिमाखात उभा असलेला १६व्या शतकातला लाईट हाऊस चा टॉवर लक्ष वेधून घेतो. या टॉवरवर चढण्याची परवानगी नाही.किल्ल्याच्या चारही बाजूंनी एक खंदक खणलेला आहे. पूर्वी इथे पाणी वगैरे भरत असावेत, पण सध्या मात्र अगदी कोरडा पडलाय तो खंदक. किल्ल्याचा विस्तार उगीच समुद्राच्या आतपर्यंत गेल्यासारखा वाटतो.

एकीकडे मांडवीचे पात्र, तर दुसरीकडे उफाळणारा अरबी समुद्र. एक सुंदर कॉंबो ऑफर. किल्ल्याच्या उजव्या बाजूला पाहिले, तर समुद्राच्या पाण्याने झिज झालेला किनारा, आणि सिक्वेरीम बिच दिसतो. किल्ल्याच्या तटबंदीला समांतर  असलेली दुसरी तटबंदी ही मुद्दाम  दोन्हीच्या मधे पाणी भरुन किल्ला सुरक्षित करण्यासाठी बनवलेली आहे. किल्ल्याच्या आतल्या भागात मध्य भागी एक अंडरग्राऊंड पाण्याची टाकी आहे. जमिनीवर पण जांभा चिरे बसवलेले असल्याने कुठेही उघडी जमीन दिसत नाही आणि किल्ला एकदम स्वच्छ वाटतो.

किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्राकडे लक्ष देता यावे म्हणून तटबंदीला आतल्या अंगाने सैनिकांना चालण्यासाठी  काही ठिकाणी तिन -चार फुट रुंद तर काही ठिकाणी सहा फूटा पेक्षा जास्त अशी जागा बनवलेली आहे.  बऱ्याच ठिकाणी तोफांची पण जागा दिसून येते, पण एकही  तोफ इथे दिसत नाही. या फुटपाथवर उभे राहिले की मागे अरबी समुद्राचे विराट रुप पहायला मिळते.समुद्रावरून  येणारा सुसाट वारा उन्हाची काहीली अजिबात जाणवू देत नाही, आणि फेसाळणारा अरबी समुद्र नजरेला शांत करतो- पण दमटपणा मुळे घाम मात्र खूप येतो. पुर्ण किल्ल्याच्या तटबंदी भोवती चक्कर मारायला साधारण ३० मिनिटे पुरतात.

किल्ल्याच्य पार्श्वभूमीवर एक रेखीव गाव दिसते, ते म्हणजे ताज व्हिलेज रिसॉर्ट! लोकेशन तर खूप छान आहे, पण रुमचे दर वगैरे परवडण्या पलीकडे आहेत.  याच किल्ल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की इथे गाईड  नाहीत , त्यामुळे पुर्वी दारूखाना कुठे होता, आणि इतर जागाबद्दलची माहीती अजिबात मिळत नाही- आणि बहूतेक जागा अंदाजानेच  समजावून घ्याव्या लागतात. पण जरी गाईड नसला तरीही किल्ला  पहायला मस्त वाटते  . पोर्तुगीज सत्तेच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचे ठिकाण म्हणजे हा किल्ला. एकदा अवश्य भेट द्या गोव्याला गेल्यावर.

This slideshow requires JavaScript.

तळटीप:- या किल्ल्याच्या समोर पाण्याची बाटली, सोडा वगैरे विकत मिळतो, पण त्याचे भाव मार्केट रेटच्या तिप्पट -चौपट किंवा त्या दुकानदाराला वाटतील तेवढे असतात , आणि दुकानदार पण उद्धट आहेत. तेंव्हा आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू शक्यतो सोबत घेऊन जावे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , . Bookmark the permalink.

44 Responses to फोर्ट अग्वादा- गोवा

 1. Hemant Pandey says:

  kaka khupach molachi mahiti dilit. Khas karun taltip. Govyatle javalpas sarva dukandar vishesh karun hotelatle waiters, indian ani tyatlyatyat marathi tourists cha prachanda duswas kartana maza anubhav aahe. Baki, Post nemi pramanech- maastaa! Request- ekhade post kilyanchya dashevar lihal ka?

  • हेमंत
   ब्लॉग वर स्वागत.. गोव्याला एखाद्या बार मधे जा, वेटर येऊन विचारतो काय घेणार? बिअर न मागता पाणी मागितलं की जसे मॅक डी मधले वेटर आपल्याकडे तुच्छतेने पहातात, तसा तो पहातो आपल्याकडे. हा अनूभव बऱ्याच ठिकाणी येतो.किल्ल्यांच्या दशेवर बरंच काही लिहिलं गेलंय;गोनिदांची बरीच पुस्तकं आहेत त्यावर.. म्हणून मी हिम्मत करत नाही लिहायची. 🙂
   अभिप्रायासाठी आभार.

 2. Smita says:

  ha fort pahilay mee, puN itar kille pahataa jasa charged up vaTata tasa vaTat nahee- tasa mundane upygacha ( paNee bharaNe) asalyane asel.. puN the view it offers is good.

  arthat govyat kuthehee samudra kinva tee chaanshee mandavee nadee bheTat rahate tyamuLe view sundarach asato sarvatra..

  • इथे आल्यावर मस्त वारं सुटलं होतं. उन्हाचा अजिबात त्रास होत नव्हता. एक आहे, डॊळ्याला पाणी खूप सुखावतं ,आणि खूप शांत वाट्त या ठिकाणी.

   इथे चार्ज्ड अप न वाटण्याचे कारण म्हणजे ह्या किल्ल्याशी कुठलाच इतिहास जोडल्या गेलेला नाही, त्यामुळे अटॅचमेंट अजिबात नसते आपली.

   • sumedha says:

    हे अगदी खरं ,मी पण गेले होते तिथे ,पण जराही attachment वाटली नाही . आणि बाहेरच्या विक्रेत्यांचा असाच अनुभव आला .

    • सुमेधा
     त्या ठिकाणी उन्हात फिरून आलं की घसा कोरडा पडतो, आणि तहान लागतेच.. त्या ठिकाणी तुमच्या गरजेचा विचार न करता, त्याकडे धंदा म्हणून पाहिले जाते .

 3. गोव्याच्या पोस्टमध्ये खादडी फोटो सोडाच पण उल्लेख देखील नाही याबद्दल सर्व प्रथम धन्यवाद. 😉

  किल्ल्याबद्दल बोलायचे तर अजुनही मजबूत आणि सुस्थिती मध्ये आहे. आणि हो कोकणात सगळी बांधकामे चिर्‍याची असतात. फक्त इमारती बांधायला सिमेंट ब्लॉक वापरतात पण घरे वैगरे बांधायला अजूनही चिरा वापरला जातो. लहानपणापासून सगळीकडे चिरेबंदी बांधकामे पाहिलेली. त्यात पिक्चरमध्ये नेहमी हिरोचा मार खाऊन गुंड विटांच्या भिंती तोडून पडतात हे पाहिल्यामुळे शहरातली विटांची बांधकामे म्हणजे फडतूस असे वाटायचे. 😉

  • सिद्धार्थ,
   खादाडीचा उल्लेख राहिला, कारण दुपारी जेवायला वेळच मिळाला नाही. एकदम संध्याकाळीच जेवलो. आणि गोव्याच्या जवळपास सगळ्याच फेवरेट जागा मी इथे आधीच्या पोस्ट मधे लिहिलेल्या आहेतच.. 🙂
   चिरे हे विटांपेक्षा कधीही जास्त मजबूत असतात.

 4. >>सोलून उलटा टांगलेल्या बोकड किंवा लाल तोंड्या माकडाची आठवण येते मला..

  ख्या..ख्या..ख्या..ख्या..

  पुर्वीची बांधकाम ही स्थापत्य शास्त्राची अप्रतिम नमुने आहेत…आम्ही गोव्याला गेलो होतो तेव्हा इकडे जाण काही शक्य झाल नव्हत…बघु या कधी जायला शक्य होतय ते.

 5. Pingback: Tweets that mention फोर्ट अग्वादा- गोवा | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 6. किल्ला बर्‍यापैकी दिसतोय..मी कधी ऐकला नव्हत ह्याच्याबद्दल..पण फोटो छान आहेत.
  माहितीपूर्ण पोस्ट. आवडली 🙂

  • सुहास
   एक वेगळ्या पद्धतीची पोस्ट लिहिली या वेळेस. नाहीतर तोच तो पणा येऊ शकतो लिखाणात.

 7. आल्हाद alias Alhad says:

  दिल चाहता है चं शूटींग झालं तो हाच किल्ला की वेगळा?

 8. madhuri mate says:

  Good information. guide kinwa nidan mahiti falak lawne awashyak watte. Americet agdi barik goshta asel tari tyachi neat kalji ghetat. aplyakade etkya junya goshti histiry sangtat tyache mahatva rahile pahije. aso…

  ya weles jamle tar goa trip karaycha wichar ahe

  • गाईड नसल्याने खूप चुकल्यासारखे होते. आपल्या कडे खजुराहोला कॅसेट प्लेअर्स देतात भाड्याने. त्यामधल्या कॅसेट मधे सगळी इनफर्मेशन असते. पॉइंट्स मार्क केले असतात, त्या ठिकाणी जाऊन कॅसेट सुरु करायची की त्या स्पॉटची सगळी माहीती समजते.
   गोवा म्हणजे एक विरंगुळा असतो. कधीही गेलं तरी- अगदी कामासाठी गेलं तरीही!!

 9. मस्तच आहे हा फोर्ट अग्वादा… पहिल्या वेळी गेलो होतो तेव्हाच आवडला होता आणि त्यानंतर प्रत्येक गोवा ट्रीपला आवर्जून जातो आम्ही इथे. ती भुयारं, तटबंदी आणि तिथून दिसणारा समुद्र आणि भन्नाट वारा हे सगळं समीकरण मस्त जुळून येतं ना 🙂

  >> गोव्याच्या पोस्टमध्ये खादडी फोटो सोडाच पण उल्लेख देखील नाही याबद्दल सर्व प्रथम धन्यवाद. 😉

  +३४५६४५४५६४ 😀

  • मला फार वेळ नव्हता घालवायचा. अगदी अर्ध्या तासात आम्ही बाहेर पडलो. ती भुयारं वगैरे रस्ते आता लॉक केलेले दिसले त्यामुळे पहाता आले नाही. पण फोर्ट छान आहे .

 10. sahajach says:

  मस्तच आहे किल्ला महेंद्रजी… आधि मलाही असेच वाटले होते की ’दिल चाहता है’ चे शुटिंग इथलेच की काय? पण हेरंबने ती शंका दुर केली… 🙂

  फोटो, हिरवाई आणि समुद्राची गाज मस्त आहे एकूणात….

  >>>>> गोव्याच्या पोस्टमध्ये खादडी फोटो सोडाच पण उल्लेख देखील नाही याबद्दल सर्व प्रथम धन्यवाद. 😉

  +३४५६४५४५६४ 😀

  यासाठी मात्र +१ 🙂

 11. shubhalaxmi says:

  khup chan sir/kaka
  mala ya baddal ajibat mahiti navhati pudhe bhavishhat kadhi govyala gele ki nakki jain, pan tumchi post vachun ani photo pahun tithe jaun alyasarkh vatal…….. ani itki chan mahiti dilya baddal danyavad!! ani ho te lal makdanch khup chan bolalat tumhi, ekdam barobar……… by tc

 12. Pingback: फोर्ट अग्वादा- गोवा | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 13. smita says:

  Kaka…Mahitpurna post ahe…Mala itake varsha govyat rahun, an itkyanda geley tari mahit navhate hya fort baddal…
  Pan tithun mandavi nadi, an Arabi samudra pahanyachi maja kahi aurach ahe…Specially sunset chya veles…
  Dil chahata hai ch shooting vagator beach ithe right side la vagator fort(some say Shapora) …tithale ahe…purna modakalila alay ha fort pan ithun pan kay najara disato samudracha mhanun sangu? Ithe barech gore lok drugs, an madya parti kartat asa eikala ahe tyamule tithe pharsa kuni jat nahi…

  Dhanyavad once again killyachi sair karun analit tyabaddal…

  • स्मिता
   माझा खास गोवेकर मित्र, जन्म पण गोव्यातलाच असलेला, जवळपास वय आहे ५९ , अजूनही त्याने हा किल्ला पाहिलेला नव्हता. 🙂 जिथे पिकते तिथे विकत नाही म्हणतात नां.. तसेच आहे हे..
   वगोतरच चा किल्ला अजून पाहिलेला नाही. पण पुढ्ल्या वेळेस नक्की पहायला जाईन.

 14. Namaskar,

  uttam mahiti. kille ha maza jivhalyacha vishay asalyane, thodi adhik mahiti deto. Ha killa upper fort ani lower fort asa don bhagat aahe. tumhi pahila to upper fort. lower fort chi tatabandi aksharsh: kinaryalagat aahe. khali taj hotel chya javal jo samudrat ghusalela buruj aahe (baryach cinema madhe to pahayvayas milato) to lower fort cha bhag aahe. tar donhi bhag milun baryapaiki motha asa ha killa ahe. http://asi.nic.in/ncf/Goa.pdf

  hya killyache (ekunach portugesani bandhalele sarva kille) bandhkam dandanit aahe. tatabandichi rundi, khandakat utarnarya bhintichi rundi sagalech atishay majaboot (pahunach shatrula bhiti vatel) ase ahe. ajun ek, je me vasai killyat hi pahile, te mhanaje tofa tatavar chadhavanyacha ramp. tumhi kadhalelya photot hi to disatoy (chirebandi jameen…ani mage disatoy to panyacha tank) itar killyavar asa ramp disat nahi. tethe evadhya vajandar tofa burujavar kashya chadhavalya asatil asa prashna padato.

  Rajan Mahajan

  • राजन
   माहीतीसाठी आभार. तो रॅम्प पाहिल्यावर मला पण तो कशासाठी दिलाय हा प्रश्न पडला होताच. तो ताजच्या जवळचा समुद्रात शिरलेला भाग पहाणे झाले नाही. फक्त अर्धा तास असेल हातात आमच्या , तेवढ्यावेळात सगळं काही पहायचं होतं. खालच्या अंगाला असलेले जेल पण पाहिले. अर्थात आत जाणॆ अलाऊड नाही, पण बाहेरूनच पाहून आलो.

 15. रोहन says:

  लवकरच गोव्याला जातोय मी.. 🙂 बोललो होतो ना तुला.. इकडे नक्की जाईन.

  आणि चिरा हा दगडच असल्याने जात्याच मजबूत असतो. कोकणातील अनेक किल्ले आणि जलदुर्ग ह्या दगडाचेच आहेत.. 🙂

  • मस्त जागा आहे. नक्की जा. गोव्याला अजून तिन चार किल्ले आहेत. एक किल्ला जो भुईकोट आहे तो पण चांगला आहे. कधी जाणार आहेस?? आणि रहाणार कुठे? काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, चांगलं हॉटेल सजेस्ट करतो तुला खूप कमी भावात .:)

 16. गोव्याला गेलोय चारदा. पण हा किल्ला सुटलाच.
  आता पुढच्या खेपेस नक्की. 🙂

  • शक्यतो सकाळी जा, म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही. किल्ला पहायला फार तर अर्धा तास पुरतो, अर्थात तुम्हाला वेळ असेल तर जास्त वेळ पण घालवू शकता इथे.

 17. >> गोव्याच्या पोस्टमध्ये खादडी फोटो सोडाच पण उल्लेख देखील नाही याबद्दल सर्व प्रथम धन्यवाद. 😉

  +१२३४५६४५४५६४०००००००
  अजून गोव्याला जायचं अहोभाग्य लाभलेलं नाही,तुमच्या पोस्टस मधूनच फिरतोय गोव्यात ,लवकरच प्रत्यक्ष गोवा पादाक्रांत करण्याचा मुहूर्त येवो….

 18. Shankar says:

  Ha killa me pahila ahe.Chan vatato tasa pancherebandi khalachi jamin kashyasathi ahe he mahit nahvate te yamule kalale..Dhanyavad!

  • शंकर
   प्रतीक्रियेसाठी आभार. किल्यावर गेल्यावर जी मस्त समुद्राची खारी हवा असते तिची मजा काही औरच.. मस्त वाटतं एकदम.

 19. मालोजीराव says:

  नोहेंबर १६८३ साली धाकल्या धनींनी गोव्यावर हल्ला चढवलेला तेव्हा ह्या फोर्ट अग्वादा मुळेच पणजी वाचली नाईतर ६०% गोव्याच्या ऐवजी १००% गोवा शंभूराजांनी जिंकला असता.पोर्तुगीस वोईसरॉय आणि सगळा सैन्य या किल्ल्यात लपला, आणि मोकळं रान मिल्यालेल्या मराठा सैन्यांनी इतर सगळे किल्ले ताब्यात घेतले,आणि गोवा लुटला ! तरीपण पोर्तुगीस शिस्तबद्ध सैन्याचा आणि त्यांच्या या किल्ल्याचं कौतुक करायलाच पाहिजे!

  • मालोजीराव
   ही माहीती मला नव्हती.. मला हा किल्ला पहातांना गन्स ऑफ नवरॉन आठवत होता.
   माहीती साठी आभार.

 20. kaka phirat phirat kolhapur la yenar asal tar maza blog vacha.

  • नुकताच येऊन गेलो मागच्या आठवड्यात. ब्लॉग चांगला आहे. पण माझेयेणे नेहेमी कामानिमित्यच असते ! आभार.

 21. amrat patil says:

  mi aajun govyala alo nahi pan watchun far yawesi wattey yeen nakki ani mahendra tumhi mala hotel sthi nakkich madat karal hi vinanti.

Leave a Reply to Smita Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s