नवस…

navashya ganapati, nashik, नाशिक, नवशा गणपती

नवशा गणपतीजवळ बांधलेल्या नवसाच्या घंट्या..

नाशिकला एक गणपती मंदीर आहे, त्याला ’नवशा गणपत” म्हणतात- हा गणपती नवसाला पावतो अशी वंदता आहे. तसं हे  मंदीर मला काही नवीन नाही, पुर्वी पण इथे बरेचदा येऊन गेलो आहे- पण या वर्षी दिवाळीला नाशिकला होतो आणि दिवाळीत कुठल्यातरी देवाच्या दर्शनाला जायचं म्हणून पुन्हा ’नवशा गणपती’ चे दर्शन घ्यायचे ठरवले! कारण   माझा फार जास्त विश्वास आहे असे नाही, तर   पार्किंगची सोय चांगली आहे या  मंदीरात म्हणून.

मंदीराच्या पायऱ्या उतरल्या बरोबर काही   लोकं सत्यनारायणाच्या पूजेचा नवस फेडण्यासाठी पूजा  करत बसलेले दिसले. गणपतीला सत्यनारायणाच्या पूजेचा नवस?  काहीही होऊ शकतं आजकाल ! काहीतरीच विचार आपल्या डोक्यात उगीच येतात म्हणून तिकडे दुर्लक्ष केले, आणि तेवढ्यात समोर एका खांबावर बांधून ठेवलेल्या निरनिराळ्या आकाराच्या घंटा  दिसल्या.  या घंटा बहूतेक नवस पुर्तीसाठी बांधल्या गेल्या असाव्यात . इथे बहूतेक लोकं मुलगा व्हावा म्हणून नवस बोलतात, आणि तो पुर्ण झाला की इथे घंटा बांधतात.सहज मनात प्रश्न आला की जर नवस बोलूनही  एखाद्याला मुलगी झाली तर……… ???

मला एक प्रश्न नेहेमी पडतो, की कुठल्याही मंदीरात गेलात तरीही देव तर एकच आहे, मग केवळ काही स्पेसीफिक मंदीरातलेच देव का बरं पावतात- किंवा नवसाला रिस्पॉंड करतात? जर सगळे देव एकच आहे, तर मग कुठल्याही मंदीरात ला किंवा घरच्या  पुजेतला देव पण नवसाला पावला पाहीजे – नाही का?? पण  तसे असले तरीही ते लोकांच्या सहज पचनी पडत नाही, आणि लोकं ठरावीक मंदिरासमोर रांगा लावून उभे असतात.

देवांचे पण आपले बरे असते, मंगळवार हा मला देवीचा वार म्हणून माहीती होता, इथे मुंबईला आल्यावर मंगळवार गणपतीचा पण असतो आणि मारूतीचा पण कधी कधी असू शकतो हे समजले. ठराविक दिवशी ठरावीक देवांची पूजा का करायची हे तर कधीच लक्षात येत नाही. एक बाकी आहे, की नवस बोलतांना मात्र आज कुठला वार आहे, याचा विचार न करता, आपल्या आराध्य देवालाच नवस बोलला जातो . देवांनी आपले वार वाटून घेतल्याने भक्तांनाही बरे पडते- सगळ्या देवांची सारख्याच भाविकतेने पूजा करता येते  आणि आपापसात काही भांडण वगैरे होत नाही.

आमच्या घरी माझी आजी एकादशी चा उपवास करायची, एकादशी म्हणजे विष्णूचा उपवास, आणि नंतर दुसऱ्या दिवशी प्रदोष म्हणजे एकादशीचा दोष घालवायला म्हणून शंकराचे भक्त उपवास करतात, तो उपवास  पण करायची. कुठलाच देव    नाराज व्हायला नको अशी काहीशी भावना असावी 🙂

शिर्डीच्या साईबाबाला कोणा एका भक्ताने काही कोटी रुपये किमतीचे सोन्याचे सिंहासन भेट दिले ,तसेच    तिरुपती बालाजीला कोणीतरी एका भक्ताने हिरेजडीत मुकुट वाहीले अशी बातमी होती.  ह्या दोन बातम्या आणि आणि त्याच बरोबर काही महिन्यापूर्वी शिर्डीच्या मंदिरात झालेल्या केल्या गेलेल्या घोटाळ्याबाबत आणि त्या मधे  ट्रस्टीपैकी काही लोकांच्या   इन्व्हॉल्व्हमेंट बद्दल  वाचलेले आणि तिरूपतीच्या पुजाऱ्याने केलेल्या करोडॊ रुपयांच्या अपहारा बद्दल पण आठवले -आणि मनात आले की  देवाला स्वतःचेच रक्षण करता येत नाही??. असो…   – थांबतो इथेच, नाहीतर मुद्दा पुर्णपणे डायव्हर्ट व्हायचा.

नवस बोलणे हे अगदी लहान असतांना पासूनच शिकतो आपण  . परीक्षेच्या दिवसात बोललेला नवस असो की पेपर चांगला जाऊ दे म्हणून किंवा मार्क्स कमी मिळाले म्हणून आईने रागावू नये म्हणून देवाची केलेली प्रार्थना पण नवसाचाच एक भाग म्हणता येईल. नवस हा पुर्ण करण्यासाठीच असतो असे नाही. म्हणजे तुम्ही पुर्ण कराल , तरीही ठिक आहे, नाहीतरी देव काही तुम्हाला विचारायला येत नाही – की कारे बाबा, तू का बरं पूर्ण केला नाहीस बोललेला नवस – हे विचारायला  .

नवस  हा साधारणपणे विसरण्यासाठीच असतो. तो  पुर्ण करायची आठवण ही फक्त पुन्हा काही संकट आलं की मग  येते . पुन्हा काही संकट आलं की आपल्या मनात पहिले हेच येतं की , की आपण पुर्वी बोललेला नवस पुर्ण केला नाही, म्हणूनच आता हे संकट आलंय पुन्हा- आणि नंतर पहिले काम म्हणजे लोकं आधी देवाकडे पोहोचतात माफी मागायला- नवस पुर्ण करायचा विसरलो याची आणि नवीन नवस बोलायला.

मी लहान असतांना समोरच रहाणारी मुलगी , तिने माझ्याकडे पहावे आणि माझ्याशी मैत्री करावी म्हणून बोललेला नवस  (देवा्पुढे साखर ठेवीन म्हणून 🙂 ) हा अगदी वयाच्या ११व्या वर्षी घडलेला प्रसंग आणि मला आठवणीत असलेला पहीला नवस! हा नवस बोलतानाच एक ’सेकंडरी- नवस’ म्हणजे  हा पण त्या पहिल्याच   नवसाचा दुसरा भाग पण होता – तो म्हणजे त्या मुलीने माझ्याशी माझ्या मित्रांसमोर बोलू नये हा… ! विनोदाचा भाग जरी सोडला तरीही असं व्हायचं हे मात्र अगदी खरं .आजही तुम्हाला चांगले कॉलेजमधे शिकणारी मुलं   सिद्धिविनायकाच्या रांगेत आपल्याला आवडलेल्या मुलीने आपल्याला  होकार द्यावा,  म्हणून उभे राहिलेले दिसतात.

माझं लहानपण यवतमाळला गेलं. तिथे आमच्या घरा शेजारुन वाहणाऱ्या मोठ्या नाल्या शेजारी असलेले ते पिंपळाचे झाड, आणि त्याचा सळसळ करणाऱ्या पानांचा आवाज -यांची   संध्याकाळी त्या झाडाखालून येतांना खूप भिती वाटायची. मग देवाला मनातल्या मनात नवस बोलला जायचा, मला सुखरूप घरी घेऊन जा, मग तुझ्या पुढे  साखर ठेवीन. अर्थात घरी सुखरूप पोहोचलो की मग तर पुर्णपणे विसरून जायचो हा नवस.. पुन्हा नंतर दुसऱ्यांदा त्या पिंपळा खालून जातांना ,आपण ठरवल्या प्रमाणे किंवा आधी कबूल केल्याप्रमाणे देवापुढे साखर ठेवली नाही ही गोष्ट आठवायची, आणि मग काय पून्हा एकदा दुसरा नवस,  देवाची मनातल्या मनात माफी मागून. 🙂

एक बाकी आहे, कमकुवत मनाच्या  आपल्याला   एखादे संकट आले की   हा  बोललेला नवस  खूप मानसिक सामर्थ्य देतो , आपला प्रॉब्लेम आपण एखाद्या ’भाईला’  सुपारी दिल्यावर जसा तो आपला प्रॉब्लेम राहात नाही ,   त्याच प्रमाणे देवाला  नवस   बोलला   की देव निश्चितच आपल्याला  समोर असलेल्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढणार  अशी काहीशी भावना/खात्री  असते आपली. आपल्या पाठीशी तो  आहे  ही खात्रीच आपल्याला   कितीही कठीण प्रसंगाला तोंड द्यायला मानसिकरीत्या तयार करते  .म्हणूनच बरेचदा अंध विश्वास म्हणून नाही, तर विश्वास म्हणून जरी कोणी देवाला नवस वगैरे बोलत असेल तर त्याची थट्टा करणे मी टा्ळतो .

आपले नेते आपल्याला देव मानतात 🙂 मी हे काय भलतंच लिहितोय असं वाटत असेल, पण तसे नाही . तुम्हाला खोटं वाटतंय का? अहो खरंच… असं बघा की जेंव्हा कधी इलेक्शन येते, तेंव्हा त्यांना तुमची आमची आठवण येते . मग ते येऊन तुम्हाला  खूप आश्वासनं देतात , कार्पोरेशन च्या इलेक्शन मधे रस्ते दुरुस्त करू, २४ तास पाणी देऊन, डासांचा नायनाट करू वगैरे वगैरे , आणि तेच विधानसभेचे इलेक्शन आले की मग मराठीचा कळवळा, महाराष्ट्रातला ऑक्ट्रॉय कमी करू   ,लोकलच्या गाड्यांच्या फेऱ्या   वाढवायला सरकारला भाग पाडू, अशी गाजरं  दाखवून मतांचा जोगवा मागितला जातो. एकदा निवडणूक झाली की मग त्या सगळ्या नेत्यांना पुन्हा तुमची पुढल्या निवडणूकी पर्यंत आठवण येत नाही.

जसे देवाला नवस बोलून लोकं विसरतात ,तसेच ते नेते  लोकं पण देवरूपी मतदाराला दिलेला आपला वचननामा, जाहीरनामा विसरून स्वतःच्याच विश्वात रममाण होतात. नेत्यांना  पण  याची पुर्ण खात्री असते, की ह्या जाहीर नाम्यातले ९० ट्क्के काम जरी केले नाही तरी काही फरक पडणार नाही कारण पुढल्या इलेक्शन पर्यंत सगळे मतदार   देव   आपण दिलेली वचनं   विसरून जातील याची खात्री असतेच, आणि समजा नाही विसरले तर मग पुन्हा एकदा  नवीन नवस बोलल्याप्रमाणे , हाच जाहीरनामा पुन्हा नवीन नवसा प्रमाणे नवीन वेष्टणात गुंडाळून मतदार देवाला दाखवायचा -झालं!!! ………….
जाऊ द्या .. चालायचंच…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged . Bookmark the permalink.

57 Responses to नवस…

 1. Ninad says:

  Khoopach Chan lihita. Saral Kalajala touch karnare!

 2. AJKhare says:

  farach sundar lihila aahe….
  नवस हा साधारणपणे विसरण्यासाठीच असतो.

 3. Pingback: Tweets that mention नवस… | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 4. स्नेहल says:

  आता काय सांगायचे काका खरच आहे हे. सोमवारी, मंगळवारी आणि गुरुवारी, शनिवार शाहाकारी खायचे वा पशुभक्षण करू नये कारण तो शंकर, गणपती, महालक्ष्मि किवा हनुमान, साईबाबा वगैरे ह्यांचा वार असतो आणि मग
  एरवी काय देव माफ करणार आहे काय? हा पोस्ट आई ला वाचायला देते म्हणजे मासाहार खायचे दिवस वाढतील [:D]

  • पशू भक्षण नाही, तर पक्षी भक्षण करावे.. नाहीतर मासे आहेतच. गोव्याला एक मित्र सांगत होता, म्हणे त्याच्या घरी श्रावणात जेवायला बसले, की निखाऱ्यावर सुके मासे घालतात, आणि मग त्या माशाच्या सुगंधात जेवतात….
   आठवड्यातले जर चार दिवस गेले तर मग राहीले तरी किती?? फक्त तीन दिवस?बहूत ना इन्साफी है..

 5. मी देवाला एक श्रद्धा,प्रेरणास्थान म्हणून मानत असलो तरी हे नवस वैगेरे पटत नाही मला….

  >>>>>कमकुवत मनाच्या आपल्याला एखादे संकट आले की हा बोललेला नवस खूप मानसिक सामर्थ्य देतो …. हे मात्र पटेश….

  तुमचा पहिला नवसही भारीच…. 😉

  • देवेंद्र
   इथे इमानदारीने लिहिले आहे अगदी खरं खरं.. काहीच न लपवता :)मला वाट्तं की प्रत्येकाच्याच बाबतीत असे होत असेल बहूतेक- फक्त लोकं मान्य करत नाहीत. :)तुझं असं झालं होतं का?

 6. Umesh Dande says:

  Not that good, or i will say not up to MK’s mark ):

  • उमेश
   प्रतिक्रियेसाठी आभार..
   असं होतं बरेचदा.. 🙂 सुरुवातीला पब्लिश करतांना मला पण फारसा आवडला नव्हता लेख, पण असं बरेचदा होतं, म्हणून पब्लिश केला.

 7. Rajeev says:

  नवस बोलून घंटा ? दाखवण्या पेक्शा टांगणे कधीही बरे !!
  कुठल्या ही आठ्वड्याच्या वारात, देवाचा “वार” कसा पडेल हे कोण सांगू शकेल ?..
  असो ,
  जूना वीनोद आठ्वला ….देवा मला “पाव” …..वट पौर्णीमेला मला “पाव”वडा

  • देवाचा वार कसा पडला असेल? हया प्रशनाच उत्तर मला पण आवडेल ..
   तो घंटा टांगण्याचा नवस .. खरंच ’आवरा’ कॅटॅगरी वाटतो मला.

 8. bhaanasa says:

  बोललेले नवस हे हमखास विसरण्यासाठीच असतात. त्यांचा जीव हा त्या त्या काही सेकंदापुरताच असतो ना. येताजाता देवाला साकडे घालायची सवयच जडून गेली आहे. आणि नेतेमंडळींच्या नवसाबद्दल काय बोलावे… 😀 रोजचेच झालेय ते. मला बाबा तुझा ११व्या वर्षीचा नवस आवडला… 😛

 9. मनोहर says:

  देव ही संकल्पना आपल्या संकल्पाला बळ लाभावे म्हणून अस्तित्वात आणली गेली. नवस हा त्यातलाच एक प्रकार.

 10. NEERAJ says:

  MALA WATATE KI ‘NAWAS’ ANI TE BOLNARYANCHI YAMAGCHI EK MANSIKTA LAKSHAT GHETLI PAHIJE. ”MI NAWAS BOLALA AAHE ANI HA AMUK AMUK DEV MAZE KAM PURNA KARNAR” YATUN MALA TARI EK POSITIVE THINKING DISTE KI,YES HE KAM AATA PRUNA HONAR. NANTAR JO PARYANT TE KAM HOT NAHI TOPARYANT, NAWAS BOLALELA MANUS MAG SARKHE ATHAWAT RAHTO KI ARE MI NAWAS BOLALELA AAHE KAM HONARCH.KAM HONARCH. KAM HONARCH ASA BARYACH VELA TO VICHAR KARAT RAHTO.ANI APOAP TI EK ” स्वयंसूचना ” HOTE. MAG संमोहन SHASTRACHYA SIDHANTANUSAR, JI स्वयंसूचना WARNWAR JEVA BOLALI JATE, TEVA ANTARMANAT JAATE ANI TYA NUSAR BAHYAMAN WAGUN APEKSHIT KRUTI GHADTE. SAMJA EKHADYANE MAZA HA ASADHYA ROG BARA HOU DE ASA NAWAS KELEA ASTO.ANI TO BARA HI HOTO. KARAN,MI BARA HONAR HI TYAMAGCHI सकारात्मक भावना.MHANJECH TYACHA NAWAS KHARA HOTO. PAN HA SRADHECHA BHAG AAHE.JAR THODI HI SHANKA AALI TAR MATARA ANTARMANACHYA KARYAT BADHA YETE.
  YAMULECH AAPAN SHIKLYA SAWARLELYA LOAKNCHE NAWAS PURNA HOT NAHI KARAN APLYA KUTHLYAHI ATARKIK GOSHTI BADDAL SHANKA GHENYACHI SAWAY ASTE.
  THODKYAT MI ASE MHANEN JO TO JYACHYA TYACHYA THIKANI BAROBAR ASTO.

 11. Mahesh says:

  Neeraj,

  Try using http://www.google.com/transliterate/Marathi next time.
  I haven’t seen a better Marathi typing application.

  Mahendra,

  Are you an atheist? Just admit it. 🙂 I am.
  Loved the post like I always do.

  Mahesh

 12. फारच चपखल आणि वास्तवदर्शी लेख !!

  हैद्राबादच्या बाहेर एक चिलकुर नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथला बालाजी असाच नवसाला पावतो असं म्हणतात. पण कुठला नवस? ते स्पेशल आहे.. ऐका..
  हैद्राबादमधल्या लोकांचं असं मत आहे की या बालाजीला १०८ प्रदक्षिणांचा नवस केला की हमखास अमेरिकेचा व्हिसा मिळतो. साधारण ९५-९६ पासून ही समजूत लोकांमध्ये पसरली.. आणि डॉट कॉम बूममध्ये ती अजूनच वाढीस लागली. आणि तीही इतकी की आता त्या देवाला चिलकुर बालाजी न म्हणता व्हिसा बालाजी म्हणतात. रोज पहाटेपासून इथे हजारो लोक प्रदक्षिणा घालत असतात. अक्षरशः धावत असतात !! 😦
  इथे वाचा.. http://en.wikipedia.org/wiki/Chilkur_Balaji_Temple

 13. नेहमीप्रमाणे लेख छान झालाय. माझे काका नाशिकला असतात. त्यांच्या मुलाने (माझ्या चुलत भावाने) बारावीला अमुक टक्के मार्क मिळावे म्हणून नवश्या गणपतीला “चालत येऊन नारळ फोडेन” असा नवस बोलला होता. त्याचा १२ वीचा निकाल लागला तेंव्हा मी नाशिकला गेलो होतो आणि त्याच्या बरोबर नवस फेडण्यासाठी नवश्या गणपतीला ६-७ किमी चालत गेलो होतो. तेंव्हा तिथे बांधलेल्या घंटा आज आठवल्या.

  नवसावरुन अजुन एक आठवलं, आमच्याकडे रत्नागिरीमध्ये शिमग्याला कोंबडी-बोकडाचा नवस बोलतात आणि तो देखील जाहीर. मग काय गाव जेवणात कोंबडी-बोकड खायला मिळणार म्हणून समस्त गावकरी देखील नवस पूर्ण व्हावा म्हणून “व्हय म्हाराजा” असा जोरदार कोरस लावून गार्‍हाणे घालतात 😉

  जाता जाता – आठवड्यातले जर चार दिवस गेले तर मग राहीले तरी किती?? फक्त तीन दिवस?बहूत ना इन्साफी है.. +1

  • ’व्हय महाराजा’ हे आपल्याला आवडलं. जर चिकन वगैरे खायला मिळत असेल तर काय हरकत आहे??
   नाशिकला हवा वगैरे मस्त आहे, त्या मुळे ६-७ किमी सहज चालत जाऊ शकतो आपण. नाशिक जागाच मस्त आहे.
   कौल देण्याची पद्धत माहीती आहे का?? नुकताच मी जेंव्हा गोव्याचा एका मंदीरात गेलो होतो तेंव्हा तिथे हा कौल देण्याचा प्रकार पाहीला. देवाच्या डोक्यावर फुल ठेउन उजवा, की डावा ते पहातात ..नविन प्रकार दिसला हा, आजपर्यंत फक्त ऐकूनच होतो, या वेळी पाहीले सुद्धा..

   • हो कौल लावण्याची पद्धत खूप प्रसिद्ध आहे. गावातल्या बहुतेक देवळांमध्ये देवाचा कौल घेण्याची पद्धत आहे. कोकणातली बरीचशी माणसे कोर्ट कचेर्यांच्या कामात अडकलेली तेंव्हा कोर्टात जाण्याआधी वरच्या कोर्टात कौल घेतला जातो. देवाच्या डोक्यावर फूल लावण्या बरोबरच शेतातला तांदूळ (टरफलासकट दाणा ) ओला करून देवाच्या कपाळावर डाव्या उजव्या बाजूला चिकटवला जातो. त्यात सुद्धा डावा उजवा कौल मागितला जातो. गंमत म्हणजे काही गुरव हवा तो कौल मिळेपर्यंत हा प्रकार करतात.

 14. shubhalaxmi says:

  hello sir/kaka
  khupch chan nehmi pramane ani mazya barobar pan ase prasng yetat. mala navas vagaire kahi bhaltach vataych pan… mi nakalat devakade navas magun mokli hote, ani swatahavar haste. ani te devache var pahun nonveg. na khane ha tar murkh panach vatato…. aplya nete lokanch bolaych tar agdi 100% khare bolalat. ani ho mazi ek maitrin yavatmal javal khuthe rahte, tichi athavan zali, tila phone karaycha hota mala. by tc

  • शुभलक्ष्मी,
   हा नवस म्हणजे एक प्रकारचा मनाला दिलासा हवा म्हणून देवावर सगळं सोपवण्याची मनोवृत्ती.बरेचदा हे अगदी नकळत घडतं, आणि आपण जे मनातल्या मनात ठरवतो तो नवस आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. मला आता यवतमाळ सोडून जवळपास ३५ वर्ष झालीत, पण बऱ्याच जुन्या आठवणी आहेत गाठीशी. मस्त गाव होतं ते.

 15. sahajach says:

  महेंद्रजी आत्तापर्यंत तीनेक वेळा ही पोस्ट वाचली… नवश्या गणपती म्हटले की मनात सारख्या नासिकच्या आठवणी येतात आणि मग कमेंटायचे रहाते!!!

  माझे अत्यंत आवडते ठिकाण नवश्या म्हणजे, जरी तिथे आजवर एकही नवस बोलले नसले तरी 🙂 … पेशव्यांनी बांधलेले नदीकाठावरचे शांत मंदीर आणि बाजूच्या मशिदीच्या अस्तित्वासह शांतता राखणारे हे स्थळ मला प्रचंड आवडते… पुर्वी आजूबाजूची गर्दी कमी होती, तेव्हा आणि प्रसन्न वाटायचे…. 🙂

  असो, नवश्या म्हटल्यावर मी स्वत:लाच विषयांतर करू दिले जरा 🙂 … नासिकला माझ्या घराजवळ एक असेच म्हसोबा मंदीर आहे तिथे तर सिनेसृष्टीतले लोकंही नवसाच्या घंटी बांधायला येतात…

  मला तुमचे प्रायमरी/ सेकंडरी नवस फार आवडले 🙂 , मी स्वत: फारशी या फंदात पडत नाही… गौरा होण्याआधि मात्र गौरीला नवस बोलले होते, मुलगी होऊ दे म्हणुन 🙂

  खरय पण नवस बोललं की देव आपल्या सोबत आहे असं वाटतं 🙂

  पोस्ट आवडली!!!

  • जागा खरंच खूप छान आहे. आता अजून एक मंदीर सुरु झालं आहे बालाजीचे.. ते पण त्याच रस्त्यावर थोडं पुढे गेलं की मग आहे , ते पण खूप छान आहे.

 16. Ravindra says:

  Mahendraji,

  Navra maza navsacha ha cinema athawala.

 17. रमेश म्हात्रे says:

  काका,
  लय भारी…………..

  एक लिंक देतोय खाली.
  वेळ असेल तर बघा.
  प्रेमात पडलेल्यांची लक्षणं…………….
  तुमचाच लेख ऑरकूट वर आहे, दुसय-च्या नावावर……..

  http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=26878227&tid=5531537265887089733

  • रमेश
   मनःपुर्वक आभार.. मला सापडला नाही तो लेख , ते ऑर्कूटचं पानच दिसत नाही.

   • रमेश म्हात्रे says:

    ऑरकुट वर १ communitie आहे कवितांच्या घरात…! तिथे तुम्हाला तुमचा लेख सापडेल.

 18. kalyani wagh says:

  amche nashik ahech khup chhan…
  sorry kaka tumachya blog che kautuk karayche sodun mi adhi amchya nashik che kautuk kele…
  pn khup chhan lihilay tumhi.
  manasachi 1khadi ichchha jr devachi madat ghevun purn honar asel tr navas bolayla kahich harakat nahi na..
  arthat tyach kam tyalach karave lagate.. pn devacya swarupat manala fakt ubhari… nahi ka????

  • कल्याणी
   आभार..नाशीक आहेच मस्त.. पण नाशीककर काही नाशिकबद्दल लिहित नाहीत, म्हणून मलाच लिहावं लागलं. 🙂

 19. हे हे हे एकदम भारी…माझे शाळेत असतानाचे नवस आठवले एकदम 😉
  मनाला दिलेल एक तात्पुरत समाधान आहे हे नवस, पण खूप वेळी बळ देत तेच नवस पूर्ण करायाच देवाच्या भीतीने का असेना 🙂

  • सुहास
   देवाला नवस बोलला की आपण एखाद्या भाईला सुपारी दिलेली आहे अशी भावना असते, मग आता तो काय ते पाहून घेईल म्हणून.. 🙂

 20. SIR PLEAS KADHITARI PACHIM MAHARASHTRA SATHI KAHITARI LIHAV
  MALA VATATE
  AAJCH NAVASACH BLOG PAN MANSPASUN PATALA

  • यादव साहेब
   अहो असं ठरवून लिहित नाही, मी ज्या भागात गेलो त्या भागातल्या एखाद्या घटनेवर लिहिले जाते. पण कोल्हापूर माझी आवडती जागा आहे, आणि आता तर सातारला पण एक बहीण रहाते, तेंव्हा तिकडे पण येणे होईलच..

 21. Sonali says:

  Hi,

  We have shortlisted this article for Netbhet eMagazine Dec 2010. We seek your permission for incorporating this article in magazine.

  Please provide your full name and email id.
  Please write to salil@netbhet.com or call Salil Chaudhary – 09819128167 for more information.

  Regards,
  Sonali Thorat
  http://www.netbhet.com

 22. Hemant Pandey says:

  तुमचा लेख खूपच आवडला.

 23. Dhundiraj says:

  पोस्ट आवडली….
  मला आता आठवत नाहीये कि, मी शेवटी कधी नवस केला होता,… याचा अर्थ असा नाही कि, मी कधीच नवस केला नाही…. पण जेंव्हा कळायला लागलं कि, प्रयत्नांती परमेश्वर, तेंव्हापासून नवस कारण सोडून दिलं . .. अर्थात काही गोष्ठी आपल्या हातात नसतात … . पण म्हणून मी नास्तिक वगैर नाही . . मंदिरात गेलं, देवाच्या पाया पडलं कि एक प्रकारचा आत्मविश्वास येतो आणि आपण आपल्या कामात यशस्वी होऊ याबद्दल आशा वाढते. . . . थोडक्यात काय…………… it acts as my confidence builder……:)

 24. ravindra bhatewal says:

  hi sir,
  tumache mat mala aavadale chan, mala tumacha mobile number bhetanar ka aajun kahi mahite have hote plz. me pan nashikcha aahe.

 25. ravindra bhatewal says:

  hi sir,
  Mala Tumacha Mobile Number Bhetanar Ka Aajun Kahi Mahite Have Hote Plz. Me Pan Nashikcha Aahe.

 26. ravindra bhatewal says:

  Hi sir,
  good mornong & thanks lavkarach me tumahala phone karato…

 27. मानला तर देव न मानला तर दगड ………….ज्याच्या ज्याच्या नवसाला पावला तो जागृत .अन नाही पावला ……तर नाही पावला .दुसरा शोधू ३३ कोटी देव आहेत आपल्या जवळ …….अन कोट्यावधी देवळे आणि धर्मस्थळे …………..

  श्री. चंद्रकांत गोखलेच्या चारोळ्या आठवतात या क्षणी :

  लोक देवळात गेल्यावर दुकानात गेल्यासारखी वागतात..
  अन चार-आठ आणे टाकून काही ना काही मागतात ….

  ….मानली तर श्रद्धा नाही तर अंधश्रद्धा ……..ज्या प्रश्नांची (?) उत्तरे मानवाजवळ मिळत नाहीत त्यांची उत्तरे मानव त्या विधात्याकडे मागत असतो ………..

  ….नारायण… नारायण…

 28. मानला तर देव न मानला तर दगड ………….ज्याच्या ज्याच्या नवसाला पावला तो जागृत .अन नाही पावला ……तर नाही पावला .दुसरा शोधू ३३ कोटी देव आहेत आपल्या जवळ …….अन कोट्यावधी देवळे आणि धर्मस्थळे …………..

  श्री. चंद्रकांत गोखलेच्या चारोळ्या आठवतात या क्षणी :

  लोक देवळात गेल्यावर दुकानात गेल्यासारखी वागतात..
  अन चार-आठ आणे टाकून काही ना काही मागतात ….

  ….मानली तर श्रद्धा नाही तर अंधश्रद्धा ……..ज्या प्रश्नांची (?) उत्तरे मानवाजवळ मिळत नाहीत त्यांची उत्तरे मानव त्या विधात्याकडे मागत असतो ………..

  नारायण… नारायण…

  • धनंजय ,
   .मानली तर श्रद्धा नाही तर अंधश्रद्धा ……..ज्या प्रश्नांची (?) उत्तरे मानवाजवळ मिळत नाहीत त्यांची उत्तरे मानव त्या विधात्याकडे मागत असतो ………..

   याच विषयावर एक लेख लिहिलाय आज.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s