बडोदानूं खारी सिंग..

खूप वर्षापुर्वी  जेंव्हा मी नुकताच मुंबईला आलो होतो, तेंव्हा बऱ्याच दुकानासमोर  ’सिंगनू तेल’, किवा चक्क ’शिंग का तेल’ अशा पाट्या लागलेल्या दिसायच्या. मला  सुरुवातीला हे तेल म्हणजे  कुठल्यातरी  जनावराच्या शिंगाचं तेल असेल असंही वाटलं होतं ,पण नंतर एका  दुकाना समोर ’शेंगका तेल’ लिहिलेले वाचल्यावर  हे   समजलं की ते ’शिंग म्हणजे शेंगदाण्याचं तेल आहे म्हणून.  शेंगदाणा या शब्दाचा शिंग हा अपभ्रंश म्हणजे ’अती’ होतोय असे वाटत नाही का?

मुंबईचे  मराठी लोकं पण दुकानात गेल्यावर शेंगदाणे काय भाव दिले हे न विचारता, सिंग क्या भाव दिया , किंवा नाक्यावरच्या भैय्या कडे भाजी घ्यायला गेले की  ’ भैय्या  वो चवळीका सिंग कैसे दिया? ’ असे विचारतांना दिसतात. असो.

पूर्वी एकदा अहमदाबादला गेलो असतांना एका मित्राकडे पार्टीसाठी गेलो असता तिथे ’खारी लेमन फ्लेवर्ड सिंग’ खाल्ली होती. लेमन फ्लेवर्ड म्हणजे खारे दाणे तळून त्याला लेमन मिरी वगैरे लावलेले नव्हते, तर चक्क लेमनचा स्वाद असलेले खारे दाणे होते ते, या चवीबद्दल   आश्चर्य व्यक्त केले , तर तो  तेंव्हा  तो म्हणाला होता, की  हे तर काहीच नाही, आमच्याकडे काजूच्या , नारळपाणी   ,मिरी फ्लेवर चे पण शेंगदाणे पण  मिळतात बडोद्याला. अर्थात हे काही खरं वाटण्यासारखं नाही, त्यामुळे त्याला चक्क धुडकावून लावलं.

पण तो मित्र मात्र सिरियसली पुन्हा पुन्हा सांगत होता, की बडोद्याला एक दुकान आहे शेंगदाण्यांचं तिथे सगळ्याच प्रकारचे दाणे मिळतात. तेंव्हाच ठरवलं होतं की बडोद्याला गेल्यावर हे दुकान शोधायचे, पण बडोद्याला इतकी वर्ष येऊन सुद्धा ते काही शक्य झाले नव्हते. एक तर दुकानाचा पत्ता माहीत नव्हता, आणि दुसरे म्हणजे वेळेचा पण प्रॉब्लेम असायचा!  फक्त इतकंच लक्षात होतं की गणपती मंदीराजवळ जुन्या शहरात हे दुकान आहे कुठेतरी .

This slideshow requires JavaScript.

आज कामा निमित्याने बडोदा जुन्या शहरात जाणे झाले , चहा पितांना सहज चौकशी केली तर समजले की ह्या प्रकारचे सिंग बनवणारा एक  रामभाई आहे, आणि त्याचं दुकान पण अगदी शेजारीच आहे. इतकी लहान गल्ली होती, की तिकडे कार नेली तर नक्की अडकेल अशी भिती वाटली, म्हणून कार रस्त्यावरच उभी केली आणि सरळ त्या गणेश मंदीराकडे चालत निघालो. पाच मिनिटातच एका लहानशा घर वजा दुकान -फॅक्टरीत शिरलो. सगळीकडे शेंगदाण्यांचे डोंगर रचलेले दिसत होते. मार्केटला पाठवायला काही लोकं शेंगदाणे  प्लॅस्टीक पिशव्यांमधे पॅक करत होते, तर दोघं जण मोठ्या भट़्टीवर  काळ्या कुळकुळीत कढई मधे रेती मधे शेंगदाणे भाजत होते. दाण्याचा आकार पण नेहेमीपेक्षा मोठाच.. भरूचनूं सिंग मोठी असतेच म्हणा तशी, आणि या भागात तेच दाणे मिळतात.

दुकानात शिरलो तर एक भरपूर लठ़्ठ पोट सुटलेला जाडा माणूस एका खुर्चीवर बसलेला होता.  सहज लक्ष गेलं तर त्याच्या शेजारी, मागे सगळीकडे शेंगदाण्याची पाकीटं किंवा चण्याची पाकिटं रचून ठेवलेली.  इथे बसून नुस्ता खारे दाणे खात असेल दिवसभर म्हणून जाडा झाला असावा का? स्वतःशीच हसलो.आम्ही जेंव्हा आत शिरलो, तेंव्हा थोडा चिडलेलाच दिसत होता, पण जेंव्हा त्याला सांगितले की मी मुंबई हून इथे आलोय, आणि बराच शोध घेतल्यावर त्याचे दुकान सापडले, तेंव्हा मात्र तो भाऊ एकदम खूश झाला आणि मस्त गप्पा मारणं सुरु केलं.

म्हणाला आम्ही इथे रिटेल विकत नाही, जे काही आहे, ते सगळं इथल्या काही   दुकानात पाठवलं जातं, पण आता तुम्ही आले आहात म्हणून तुम्हाला दोन चार पाकीटं देईन. सांगत होता की , दाणे  व्यवस्थित भाजणे ही एक कला आहे, जर चांगले भाजले गेले नाहीत तर ते लवकर खराब होतात, आणि जास्त भाजले गेले तर फ्लेवर बिघडतो खूप काळजीपुर्वक काम करावे लागते इथे. कढईमधे दाणे घातले की सारखे हलवत रहावे लागतात- त्या कढईवरच्या माणसाचा फोटो काढलाय, त्याची मुव्हमेंट इतकी जास्त होती   की फोटो पण हलल्यासारखा दिसतोय. 🙂

इथे लेमन  , मिरी  , काजू  , तसेच नारळपाणी फ्लेवर्ड शेंगदाणे मिळतात. हे  प्रकार म्हणजे रामभाईची खास स्पेशालिटी आहे, त्याच्याशिवाय असे फ्लेवर्ड दाणे कुणीच बनवत नव्हते, पण हल्ली अजून काही लोकांनी बनवणे सुरु केले आहे, तरीही म्हणाल की त्याचा ब्रॅंड जास्त फेमस आहे .आता बरीच वर्ष म्हणजे जवळपास पन्नास एक वर्ष   हाच व्यवसाय असल्याने ब्रॅंड इमेज तर आपोआप तयार होतेच. सुरुवातीच्या काळात फक्त खारे दाणे बनवून विकायचे, पण नंतर वेगवेगळ्या  चवीचे  आणि फ्लेवरचे दाणे तयार करणे सुरु केले. जेंव्हा ह्या सगळ्यांना प्रतिसाद चांगला मिळायला लागला, तेंव्हा  इथल्या मोठ-मोठ्या दुकानात हे दाणे एका ब्रॅंड ’हरी ’ च्या नावाने पॅक करून विकायला देणे सुरु केले.   आम्ही जेंव्हा तिथे होतो तेंव्हा सध्या फक्त काजू  आणि कोकोनट वॉटर फ्लेवरचीच शेंगदाणे  बनवणे सुरु असल्याने आम्हाला फक्त हे दोन प्रकारच मिळाले, उरलेले प्रकार पुढल्यावेळी बडोद्याला गेल्यावर  नक्की आणणार..

पाकीटं घेतल्यावर, खरं तर तिथेच एक पाकीट फोडून खाण्याची इच्छा होत होती, पण कार मधे पोहचेपर्यंत धीर धरला आणि मग पाकीट उघड्ले. खरोखरच एक अप्रतीम प्रकार आहे हा. साधे खारे दाणेच..पण एका वेगळ्या चवी मधे  छान  वाटतात. काही दिवसापूर्वी दाण्यांना शुगर कोटींग केलेले चॉकलेट्स  स्ट्रॉबेरी चवीचे   खाल्ले होते, पण ते काही तितकेसे आवडले नव्हते..   हा प्रकार म्हणजे   एकदम मस्त!! मस्ट ट्राय!!!

बाय द वे, याचं दुकान श्री हरी सिंग सेंटर, गजराज वाडी ,गोमितपुऱ्याला गणपती मंदीरा जवळ आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , . Bookmark the permalink.

29 Responses to बडोदानूं खारी सिंग..

 1. Aparna says:

  ढी शे ण …..
  माझा खाऊ मला द्या……
  र च्या क मार्चमध्ये आई येतेय…तुम्हाला लिस्ट पाठवू का?? हे शेंगदाणे, खाकरा आणि बरच काही….:) आणि घर तर तुम्हाला माहीतच आहे….

 2. अजय. says:

  खादाडीचा एक छान लेख झालाय.
  बरेच वर्षांपुर्वी माझ्या एका गुजराती वर्गमित्राने हे दाणे बडोद्याहुन आणले होते व आम्ही सर्वांनी वर्गात बसुन असे फ्लेवर्ड दाण्याची मजा घेतल्याचे आठवते. हल्ली मुंबई ठाण्यात पण गुजरातचे खारवलेले दाणे मिळतात पण हे फ्लेवर्ड दाणे आढळले नाहित.
  गोंदियाला असताना एक मराठी माणुस खारवलेले दाणे विकायचा त्यालाही काहितरी वेगळिच चव असायची व छान असायचे.
  आजची पोस्ट वाचताना हे सर्व प्रकारचे दाणे आठवले. जिभेवरचा ताबा वाढवल्याने सध्या हे सर्व प्रकार बंद आहेत, पण आज मात्र लेख वाचल्यावर तोंडाला पाणी सुटलेय !!!

  • अजय
   विदर्भात मिळणारे दाणे वेगळेच असतात, देशी दाण्यांची चव वेगळीच असते. खरं तर मराठवाड्यामधल्या दाण्यांची चव पण अप्रतीम असते, जरी आकाराने लहान असले तरीही..दाणे खाल्याने काही ्फार कॅलरीज वाढत नाहीत. 🙂 नेट वर पाहीलं आहे मी. नुसते प्रोटीन्स आहेत त्यामधे, कार्बोहायड्रेट्स एकदम कमी असतात त्यामधे.

 3. वाह सही..काय भन्नाट लागत असतील ना..आणायचे होते की आम्हाला पण 😉
  पोस्ट मस्तच 🙂

 4. mazejag says:

  Attal la miltat ka karan Navra gelay tikde aaj match saathi aanave mhanun sangayla

  • दुसऱ्या दिवशी मोहनजी येणार होते, त्यांचे बोर्ड पाहिले बऱ्याच ठिकाणी. अटलजी बहूतेक अहमदाबादला कांकरीया तलावाच्या महोत्सवाला येणार होते मोदींच्या बरोबर.. वर पत्ता दिलाय.. तिथुन मा्गवा..

 5. Rajeev says:

  बीर बरोबर कशे लागले ते सांग !!!

 6. रोहन says:

  अरे… सही आहे रे.. शामिकाचे काही नातेवाईक बडोद्याला असतात… ती बहुदा ३१ तारखेला तिकडे लग्नाला जाणार आहे… 🙂 चला.. ऑर्डर द्यावी लागणार… हे हे हे … 😀

 7. निनाद होंबळकर says:

  काश… मायाजालावरून प्रत्यक्ष चव घेता आली असती तर…

  चिकन शवारमा नंतर अजून १ पदार्थ लिस्ट मध्ये add झाला.. बघुया कधी नशिबात आहे लिस्ट मधल्या पदार्थांचा आनंद घेणे…

  • निनाद
   बॅक ऑफ द माईंड लक्षात असू द्या.. 🙂 कधी गेल्यावर मग बरं पडतं विकत घ्यायला..

   • निनाद होंबळकर says:

    काका.. भविष्यात ज्यावेळी फिरायला जाईन, त्यावेळी तुमच्याशी संपर्क साधीन.. म्हणजे फिरण्याचा अधिकच आनंद घेता येईल..

    • अवश्य!तसेही इथे काही पोस्ट्स आहेतच गोवा, इंदौर वगैरे ठिकाणचे.. 🙂 खाद्ययात्रा मधे.

 8. mau says:

  he bar aahe..aamchya gujarathet yeun jata aani amhala pattach naahi????? … : O…..
  Bharuch aani he Badodyache dane khup famous aahet..
  post as usual mastch.. : )

  • तिन दिवस होतो बडोद्याला. रिटर्न फ्लाईट अहमदाबादहूनच होती, दिवसभर काम करून बडोद्याहून सरळ अहमदाबाद एअरपोर्टलाच गेलो होतो.
   इतक्या वेळेस इथे आलो होतो, पण या वेळेस घेणं झालं विकत..
   प्रतीक्रियेसाठी आभार.

 9. Pingback: बडोदानूं खारी सिंग.. | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 10. Prasad Tharwal says:

  Kaka, Hya Flavoured Shengdanyan warun lakshat ala mage ekda Water Melon Flavoured Kaju Khalle hote.. Mitra Kankavali hun gheun aala hota..!! Vichitrach Prakar hota nahi titkasa awadala… Karan God God hote te..
  Pan He.. Flavoured “Khare” Shengdane.. Sounds unique..n Intresting.. Will try for sure…!

 11. kapila says:

  thod mojkyach shabdat ani kahi navin issues mandat calana pls.
  nahitar shigdanane acidity hoel.
  spasta sabdabaddal sorry

  • कपिला
   धन्यवाद. अगदी खरं सांगितल्याबद्दल.
   मला पण नविन काही सुचत नाहीये हल्ली. थोडी विश्रांती घेऊन नंतर पुन्हा लिहिणं सुरु करायचा विचार आहे.
   🙂

 12. काका हे बर नव्ह….आमच्यासाठी थोड तरी ठेवायच होत.. 🙂

 13. ह्या दौर्यात भरूच स्टेशनला ‘गुजरातनी बदाम’ म्हणून लिहिलेले आपल्या कडील शेंगदाण्यापेक्षा जवळजवळ दुप्पट असे टपोरे शेंगदाणे खायचा योग लाभला मला….. 🙂

  बाकी हे वेगवेगळ्या फ्लेवरचे शेंगदाणे खायला मिळाले कि काय मजा येईल …

 14. mayurv veer says:

  mala sampurna mahiti bhetel kai kase karayache yachi lavkarat lavkar havi ahe

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s