नविन वर्ष २०११ रिसोल्युशन्स

नवीन वर्षाचा ठराव.. काय करावं बरं या वर्षी? काय धरावं आणि काय सोडावं ? असे हजारो प्रश्न मनात येतात.   जसे नवीन वर्ष जवळ येते तसे मागल्या वर्षीच्या ठरावाचे काय झाले हे आठवून आलेला गिल्टी कॉन्शस दूर ढकलून  या वर्षी तरी नक्कीच काहीतरी करायचं   एवढं  तरी आपण नक्की ठरवतो  .  खरं म्हंटलं तर  तुम्ही   काहीही ठरवले तर तसा  काहीच फारसा फरक पडत नाही, कारण     ठरवलेली गोष्ट    काही तीन चार दिवसापेक्षा  किंवा फार तर एखाद्या  महीन्या पेक्षा जास्त दिवस पाळली  जात नाही.

दर वर्षी नवीन रिसोल्युशन्स काय असावे म्हणून  उगीच कशाला डोकेफोड करायची, म्हणून मी इथे संभाव्य रेसोल्युशन्स लिहून  ’ऍज अ रेडी रेकनर’ म्हणून पोस्ट करतोय . तुम्हाला या पैकी ज्या योग्य वाटतील त्या गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता आणि जर काही सुटल्या असतील तर त्या कॉमेंट्स मधे नक्कीच ऍड करू शकता.  माझ्याबद्दल विचाराल, तर मी स्वतः सिरियल नंबर  ५६ पाळण्याचे ठरवले आहे.

१) नॉन व्हेज बंद करणे.

२) सकाळी उठून बेड टी बंद करणे, सदगुणी नवऱ्या प्रमाणे बायको जे कित्येक वर्ष ( २२ झाले की हो आता)  डोके फोड करून सांगते , की आधी दात घास मग चहा घे… ते मान्य करून तसे वागण्याचा प्रयत्न करणे.

३) सकाळी उठल्यावर पांघरूणाच्या घड्या करून ठेवणे.

४)चहा घेतल्यावर चहाचा कप सोफ्याखाली किंवा टिपॉय वर न ठेवता  सिंक वर नेऊन ठेवणे.

५) जेवायला बसायची वेळ झाली की पानं घेणे.

६)जेवण झाल्यावर टेबल आवरायला बायकोला मदत करणे. (डायनिंग टेबवल वरची भांडी किचन मधे नेऊन ठेवायला वगैरे.).

७)घरी आल्यावर आपली ऑफिस बॅग सोफ्यावर न फेकता आपल्या जागेवर ठेवणे.

८) पायातले बुट काढले की ते सो्फ्याखाली न सरकवता जागेवर नेऊन ठेवणे.

९) कुठलंही टिव्ही सिरियल बायको किंवा मुलींनी लावले की ते कुरकुर न करता, आणि त्यातल्या कुठल्याही घटनेवर, पात्रावर टीका न करता पहाणे. ( अगदी ससुराल गेंदा फूल सारखे बिनडोक सिरियल सुद्धा!, किंवा ते गोपी बहू वाले सिरियल सुद्धा !!)

१०) कधी बायको मुलांचे कपडे विकत घ्यायला गेलो की आणि त्यांनी विचारलं- ’हे चांगलं दिसते नाही कां? ” की सरळ हो म्हणणे आणि किंवा जर त्यांनी खालच्या पद्धतीचे वाक्य म्हंटले तर.. ’हे तसं बरं आहे, पण हे डिझाईन त्या रंगात हवे होते, किंवा ते डिझाईन या कपड्यात हवे होते तेंव्हा आपण सरळ म्हणायचं…. की हे काही तितकंसं बरं दिसत नाही ! अर्थात ही गोष्ट तितकीशी सोपी नाही- पण..

११) बायकोच्या किंवा मुलींच्या मैत्रिणीवर कॉमेंट करायच्या नाहीत, आणि तिच्या बाल मैत्रिणीवर तर अज्जीबात नाही…

१२) चहाचा कप विसळून ठेवावा की नाही? याचा विचार अजून पक्का झालेला नाही.

१३) मुन्नी बदनाम हुयी किंवा शीलाकी जवानी  गुणगुणलं की बायको करवादते, म्हणून ती गाणी अजिबात गु्णगुणायची नाहीत. मुन्नी काय नाचली आहे त्या गाण्यात…. असं सुद्धा म्हणायचं नाही. ( मुन्नीचा डान्स न आवडलेला पुरुष विरळाच 🙂 )

१४) बायकोने अहो तुमचं वय किती, इतक्या मोठ्या मुली झाल्या आ्हेत, आता तरी थोडं सिरियस रहाणं सुरु करा, असं म्हंटलं की खरंच तसं रहायचा प्रयत्न करायचा.. सिरियस रहाणे म्हणजे नेमकं काय हे समजलं नाही  अजून तरी मला , पण  तरीही बहूतेक फालतू जोक्स/पीजे  मारणे बंद करणे वगैरे काहीतरी असावं असा माझा अंदाज आहे !!?? ( जर कोणाला माहीती असेल तर मला कृपया सांगा)

१५) करण जोहर चे हाव भाव (कॉफी विथ करण मधले) पाहून त्याच्याबद्दल उगीच फालतू शंका घ्यायच्या नाहीत. ( हे खरंच शक्य होइल?)

१६) कुठल्याही फॅशन मधलं आपल्याला काहीच समजत नाही हे मान्य करणे आणि खरेदी करतांना मुलींचा/बायकोच्या सिलेक्शन वर कमेंट करणे टाळणे.

१७) कार ड्रायव्हिंग करत असतांना एखादा माणूस कट  मारून पुढे गेला , विचित्रपणे ओव्हरटेक करून गेला, किंवा अजिबात गर्दी नसतांना पण उगीच उजव्या  लेन मधे हळू हळू गाडी ड्राइव्ह करून ट्राफिकची वाट लावत असला -तरी  त्याच्या सात पिढ्यांचा उद्धार  ( गाडीत मुली /आणि बायको असतांना )करायचा नाही.

१८)  वाहतूकीचे  नियम शक्यतो मोडायचे नाहीत जसे…  पोलीस नाही, आणि  सिग्नल लाल असतांना सिग्नल मोडून गाडी पुढे काढणे, रॉंग साईडने ओव्हरटेक करणे वगैरे वगैरे…..करायचे नाही

१९) भाजीवाल्याशी  पाच रुपयेका कोथिंबर इतनाच आता क्या? म्हणून जर सौ. वाद विवाद घालत असेल तर आपण आपला तोल ढळू द्यायचा नाही.

२०) बायकोने नवीन साडी वगैरे नेसली , किंवा नवीन ड्रेस घातला की आवर्जून  तू कित्ती छान दिसतेस म्हणून कौतूक करायचे . (हल्ली ज्या कडे फारसं लक्ष दिलं जात नाही ती  ही एक गोष्ट!)

२१) न आवडणारी भाजी असली, तरीही न कुरकुर करता संपवायची.

२२) रवीवारी बायकोला आराम द्यायचा. म्हणजे काय की पोळ्य़ा करायला मावशी येतात, भाजी करणे आणि कुकर लावणे ही दोन्ही कामं करायची.

२३) रवीवारी बाथरूम/ टॉयलेट स्वच्छ करणे हे काम कोणी आठवण करून देण्यापूर्वीच करून टाकायचे. हे काम टाळायला म्हणून मुद्दाम सकाळी लवकर आंघोळ करून- मग.. सॉरी  हं.. अरे माझी आंघोळ झाली, आता विसरलो बघ.. असं बायकोला म्हणायचं  नाही.

२४) रवीवारी सकाळी ( रिपीट सकाळी )११ च्या आत बायकोला राग येण्याची वाट न  पहाता, आंघोळ करायची. उगीच दुपारी तीन चार पर्यंत टाइमपास करत बसणार नाही..

२५) लोकल मधे प्रवास करतांना  लॅपटॉप ची  बॅग मागे पाठीवर न लावता हातात घेऊन मगच चढेन, आणि  गाडीत असे पर्य्ंत बॅग पाठीवर लावणार नाही.

२६) लोकल मधे लोकांच्या पायावर पाय देऊन त्यांना बाजूला व्हा म्हणून सांगणार नाही.

२७)रविवारचे पेपर वाचल्यानंतर सकाळची पानं मटा मधे, मटाची पानं लोकसत्ता मधे घालून ठेवणार नाही. पेपर आले की आधी स्टेपलर घेऊन सगळ्या पेपरला स्टेपल करून ठेवीन.

२८) शिव्या देतांना ’भ’ कार युकत शब्दांचा वापर किंवा ’फ’ कार युक्त शब्दांचा वापर टाळायचा. अगदी फारच राग वगैरे आला तर, वेंधळा, मुर्ख, नालायक , अगदीच गेला बाजार भेंडी वगैरे शब्द्व वापरले तर चालतील.

२९)पार्किंग करतांना शक्यतो इतरांना त्रास होणार नाही अशा तर्हेने गाडी पार्क करणार

३०)कपाटात ठेवलेल्या इस्त्रीच्या कपड्यांच्या गठ़ठयात नेमका तुम्हाला सगळ्यात खालचाच शर्ट घालायची इच्छा होते ( ते का म्हणून ? ते मला पण माहीत नाही) तो शर्ट ओढून बाहेर काढतांना वरच्या कपड्यांची इस्त्री  खराब होते, म्हणून आधी वरचे शर्ट्स व्यवस्थित बाहेर काढून , हवा तो  खालचा शर्ट घेतल्यावर, वरचे कपडे व्यवस्थित लावून  कपाट व्यवस्थित लावून ठेवणे.

३१) रोज  सकाळी उठून व्यायाम करणे, फिरायला जाणे वगैरे वगैरे…

३२) सिगरेट तंबाखू सोडणे.. हे  बहुतेक सगळेस स्मोकर्स ठरवू शकतात. तसंही  म्हणतातच नां, की सिगरेट सोडणं फार सोपं आहे, मी हजारो वेळा सोडलेली आहे… 🙂

३३) शाळेतले कमीत कमी पाच  जुने मित्र शोधून काढीन .. जय गुगल बाबा..

३४) बायकोला  सुटीच्या दिवशी जास्तित जास्त वेळ देणे. घरी येऊन  उगीच ऑफिसच्या कामाच्या नावाखाली  उगीच लॅप्टॉप घेऊन  फेस बुक वगैरे साईट्स वर टाइम पास करत न बसणे.

३५) लोकांकडुन वाचायला म्हणून आणलेली पुस्तकं परत करणे .

३६) ब्रेकफास्ट मधे मुसली, किंवा ओट्स सारखे निरुपद्रवी पदार्थ पण कुरकुर न करता खाईन.

३७)  वजन कमी करणे.

३८) कम्पल्सिव्ह  शॉपिंग  टाळेन.गरज नसतांना शॉपिंग मॉल मधे गेल्यावर उगीच काहीतरी वस्तू विकत आणणे टाळेन.

३९) पि्झा, पावभाजी, बर्गर वगैरे  हाय कॅलरी जंक फुड, तसेच गोड पदार्थ  खाणार नाही.

४०) कमीत कमी ८ तास तरी रोज  झोपणे. रात्री  बेरात्री जागून नेट वर टीपी करणार नाही.

४१) एलिव्हेटर न वापरता पायऱ्यांनी वर चढेन  ( सात मजले… बापरे…. ! )

४२) कमीत कमी दोन तरी फॅमीली व्हेकेशन्स ??

४३) स्वतःचे सामान व्यवस्थित ठेवणे. बाहेर  निघतांना.. ” अगं, माझं पाकीट कुठे? कारची किल्ली कुठे आहे? सॉक्स ची पेअर बरोबर नाही, दोन्ही सॉक्स वेगवेगळे आहेत , सेल फोन कुठे आहे? , ” असे होऊ देणार नाही. स्वतःच्या वस्तू व्यवस्थित ठेवेन

४४) गेलेल्या वर्षात काय गमावले, याची काळजी करत  बसणार नाही. तर पुढल्या वर्षात काय  होईल याची काळजी करण्यात वेळ घालवीन.

४५) सुटी साठी अर्ज करतांना प्रत्येक वेळी तेच ते कारण देणार ्नाही. काहीतरी इनोव्हेटीव्ह कारण शोधून का्ढेन.

४६) एकाच वेळेस एकाच माणसाशी इंटरनेट चॅट, इ मेल, फोन वगैरे गोष्टींवर गप्पा मारणार नाही.

४७) प्रत्येक पार्टी मधे तेच ते जोक्स सांगुन लोकांना बोअर करणार नाही. लोकांना तेच ते जोक्स ऐकुन कंटाळा येतो याची मला जाणीव आहे.

४८) दिवसभरात फार तर फार एक तास इंटरनेट वर सोशल साईट्स वर घालवीन.

४९) टिव्ही वरचे काही खास प्रोग्राम्स  रेगुलरली फॉलो करीन. काही जुन्या प्रोग्राम्सचे ( जसे लिप्स डोन्ट लाय, फ्रेंड्स , कॅसल वगैरेचे)  जुने सिझन्स डाउनलोड करून पाहीन.

५०) एकाच गर्ल फ्रेंड / बॉय फ्रेंडला मी जास्त दिवस बोअर करणार नाही. शक्यतो सहा महीन्यात त्याला/ तिला डंप करून दूसरा फ्रेंड शोधेन.

५१) तुमची आई भेटली की  म्हणते नां, की “तू कित्ती बारीक झाला आहेस?? ” तर मग काही किलो वजन वाढवायला काय हरकत आहे? दररोज  कमीत कमी एक  आइस्क्रिम, आणि चार चॉकलेट  खाणे, सुरु करेन.

५२) सस्पेन्स सिनेमा आणि कादंबरीचा शेवट कोणालाच सांगणार नाही. अगदी सगळ्यात मोठ्या शत्रूला सुद्धा!  बरेचदा एखाद्याचा बदला घ्यायचा म्हणून शेवट सांगून टाकणे हा माझा छंद होता

५३) जेंव्हा  मला नाही म्हणायचे असेल तेंव्हा समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता सरळ नाही म्हणायला शिकणार.

५४)अंगातले काढलेले कपडे नीट हॅंगरवर लावून ठेवीन.

५५) नवीन टूकार सो कॉल्ड विनोदी – फार्सीकल नाटकं, सिनेमे पहाणार नाही.

५६) माझे नवीन वर्ष माझ्या वाढदिवशी सुरु होते, एक जानेवारीला नाही- म्हणून मला आता या क्षणी काहीच ठरवायची गरज नाही. 🙂 😉

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक. Bookmark the permalink.

82 Responses to नविन वर्ष २०११ रिसोल्युशन्स

 1. रोहन says:

  मोठी लिस्ट काढली की तू…
  १. तू किती दिवस पळतोस ते बघतो… 😛
  १७. मनातल्या मनात करतो.. 😀
  १८. कधीच करत नाही.
  २३. लक्ष्यात ठेवणे जरा कठीण आहे. सारखे लक्ष्य जात असून देखील… 😉
  ३९. ठीक आहे. विचार करीन.. 😀
  ४१. आमच्याकडे फक्त जिनेच आहेत… 🙂
  हा हा … अब तक ५६… 🙂 सही..

  • अरे माझे नवीन वर्ष माझ्या वाढदिवसाला सुरु होते, म्हणुन मला सध्या तरी फक्त ्नंबर ५६ पाळले तरीही ्पुरेसे आहे.

 2. mau says:

  वाह वाह…क्या बात है!!!!
  ह्याची एक झेरोक्स काढुन नवर्‍याला देते..ह्यातले काही विशेष म्हणजे ९,११,१३,१४,१५,१८,२८,३१,३२,३३..हे फोलो करणे अगदी आवश्यक आहे….

  मस्त लिहिले आहे…

 3. काका, मी ५७ नंबरचा पाळणार 😉

 4. mahesh mohan shinde says:

  kaka
  non-veg sodnar ka? no way…………
  tumche chavine khanar che sarv lekh vachle tyavarun non-veg manje tumcha jiv ki pran aahe ase vatate.
  tarihi all the best………

  • मोहन
   मी फक्त ५६ नंबर पाळणार.
   इतर सगळे लोकांसाठी आहेत. त्याचं काय आहे, की लोकांना काहीतरी रिसोल्युशन करायचं असतं, पण नक्की काय करावे हे एकदम सुचत नाही, म्हणून त्यांच्यासाठी हे इथे लिहीलंय रेडी रेकनर..

 5. हा हा हा हा ..
  काका, एकदम भारीच (वजन नाही हां, पोस्ट लिहली भारी आहे ;))

 6. दिपक says:

  … बापरे! ५६ रिसोल्युशन्स?

  … यातील बरीचशी माझ्याही लिस्टवर आहेत… आत्ताच सांगत नाही… अंदाजे एक महिन्याच्या प्रामाणिक प्रयत्नांनंतर लिहिन 🙂

 7. मी गेल्या १०-१२ वर्षांपासून तेच तेच संकल्प करतो. पण ४ दिवसांपेक्षा जास्त दिवस कधीच पाळता येत नाहीत. आताही तेच करणार आहे.

  • दिपक
   सगळ्यांचेच तेच हाल असतात. फक्त एकच संकल्प मी पुर्ण करू शकलो, तो म्हणजे सिगरेट सोडणे, आणि गुटखा सोडणे .. ते पण १५ -२० वर्षापुर्वी.. त्या नंतर एकही जमलेले नाही.

 8. Rajeev says:

  काहीही “पण ” न करणे हाच नवीन वर्षाचा “पण ”
  हा पण वेडा पण करू शकेल.

 9. अजय. says:

  अनुभवावरुन मी पण केला आहे कि यापुढे कोणताही पण करायचा नाही पण तशी परिस्थीती उद्भवली (!) तर तात्पुरता (थोड्या कालावधी साठी) एखादा पण करायचा (सोप्पय ते !).

 10. Audumber says:

  me nehami kahitari tharavto pan aplya sarkha bhetto ani ani mhanto ek wel karu, nantar band, survat tar apanch karta na? mag kase palnar 1 to 56 sevati 56 golyo ghyavach lagtat ho.

  • दिल चाहे लेकीन दिमाग न चाहे ऐसी चिज करनेमे तकलीफ तो होतीही है..
   इती ज्युबिलीकुमार राजेंद्रकुमार ( कुठल्यातरी एका सिनेमात .. नाव आठवत नाही आता 🙂 )

  • Rajeev says:

   use baraha pad for Devnagari script

 11. कोणतेही रिसोल्युशन करायचे नाही हे रिसोल्युशन मी गेली कित्येक वर्षे मोठ्या कसोशीने पाळत आलेलो आहे. 😉

 12. बाय द वे…हात बाजूला घ्या आता नाहीतर सूर्य मावळणार नाही. 🙂 ( फोटूज मस्त )

 13. निनाद होंबळकर says:

  काका… आत्ताच तुम्हाला सांगणार नाही काय पाळायचे ठरवलेय ते.. जर यशस्वी झालो तरच जाहीर करेन… उगाच हवा व्हायला नको… हा.. हा..हा..

  • यशस्वी होईल. कोणे एके काळी मी अशीच सिगरेट सोडली होती. 🙂 आता जवळपास १५-२० एक वर्ष झालीत सुरु केलेली नाही अजून तरी पुन्हा.

 14. Sanjaykulkarno. says:

  हा हा … अब तक ५६… सही.

 15. Pingback: नविन वर्ष २०११ रिसोल्युशन्स | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 16. mazejag says:

  sahi aahe kak number 17 ani 27 Hemu la suchvyala havet….mastch…

 17. Umesh Dande says:

  I hate this blog…………………………
  This is why i don’t read these Marathi blogs. My wife has got 55 new topics to fight with me. Anyways … men are always men, even i will love to follow 56’s one 🙂

  This post is nice one 🙂 thank you!!!

  • उमेश
   तसाही हे सगळे मुद्दे नेहेमीच असतात ,इथे फक्त सगळे एकत्र लिहिले आहेत बस्स..
   आभार.

 18. Prasad Tharwal says:

  Mastach kaka….!! Nehmipramanech Chan..!!!
  Ani Navin Varsha Sathi Hardik Shubheccha….!! Asech Liheet raha…………………………….

 19. Hemant Pandey says:

  Kaka,
  Soooooliiiidddd. Abtak chhappan!(56)
  By the way – whish you a happy birthday!

 20. etake sagale reply vachun vichar padala aapan kay reply pathavaycha……… kay aapan jo vichar karato aapalyala vatat to fakt aapanach karato,pan tas nasat. sagale karatat tasa vichar,to aaplya paryant pohachat nahi evadhach.Tumhala kay mhanu kaka ki dada. navin varshacha nishchay karaych me sodal.To yach divashi ka karaycha? Jya divashi aapalyala kalat aapan chukich vagto,vait karo………etc.tyach divashi pan kara na? (mehi aale tyat) new year chi kashala vat pahayachi. jau dya.Tumhala “NAVIN VARSHACHYA HARDIK SHUBHECHHA”(in advance).

  • भारती
   काहीही म्हंटलं तरी चालेल.काही लोकं दादा म्हणतात, तर काही काका.. मला दोन्ही आवडतं. आता नुकतेच ५० पुर्ण केल्यावर फारशा आवडीनिवडी शिल्लक रहात नाहीत( खाण्याच्या सोडून)
   आज पर्यंत सक्सेसफुली फक्त सिगरेट सोडू शकलो मी. नंतर पुन्हा दुसरं काही जमलं नाही. या वर्षी आधीपासूनच म्हणजे १५ डिसेंबर पासूनच साखर, बटाटा आणि भात सोडलाय…
   🙂 थोडं वजन कमी करु या असा विचार केलाय..

 21. Leena says:

  Post mastach zali ahe….mi regular vachate…
  Vajan kami karanyasathi idea Sangate. Apalach ek tarunpanicha (aapan slim and trim asalela )photo ghayacha ani aapalyala satat disel asa tangayacha…….khup inspiration milate.mi kela ahe to prayatna …barach successful pan zalay.

 22. महेन्द्रकाका,
  ५६ ची लीस्ट मस्त आहे एकदम.
  गरमा गरम बटाटावडा समोर आला की आपोआप विसराल, १५ डिसेंबरला काय सोडलय तुम्ही ते 🙂

  • सोनाली
   नाही.. काही फरक पडणार नाही.. मी तसा निश्चयाच्या बाबतील पक्का होतो (!) जर सिगरेट सोडू शकतो, तर इतर गोष्टी का नाही जमणार?
   सध्या तरी – साखर, बटाटे, तळलेले पदार्थ, आणि भात सोडलाय. 🙂 आणि हो… या सगळ्यांचा परीणाम म्हणजे वजन कमी होणं सुरु झालंय.. 🙂

 23. मनोहर says:

  यापेक्षा आपण जे काही करतो ते केल्यास काय फायदा होईल याचा विचार प्रथम करण्याचा निश्र्चय अधिक सोयीचा ठरेल.

  • स्वतःला काय फायदा होईल याचा विचार केल्यास निश्चितच सोपे पडेल. पण आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती साठी काही सोडणे – हे जास्त समाधान देऊन जाते.
   जसे मी लग्नानंतर सिगरेट सोडली… आता झालेत २२ वर्ष… पण It gives satisfaction .

 24. Smita says:

  This ready rec is mostly meant for men- though some do apply to both. I think for women you could have at least a few distinct ones like- ” I will not shop for any more clothes” ” Naveen dress eks peksha jasta veLa vaparen” vagaire vagaire…

  • स्त्रियांसाठी मला वाटलं कोणीतरी लिहिल.. पण..
   इथे काही लिहितो पहा..
   १) नवरा उशीरा घरी आला तर त्या मागे काहीतरी कारण असेल हे लक्षात घेऊन कुरकुर करणार नाही.
   २) ऑफिसच्या स्टॅग पार्टीला जायची नवऱ्यावर वेळ आली, तर समजून घेईन. पार्टी असेल त्य दिवशी नवऱ्याला कार घेऊन जा म्हणून मागे लागणार नाही. ( दारू पिऊन ड्रायव्हिंग करतांना पकडले तर खूप दंड होतो हे माहीती असल्याने बायका पार्टी असली की आज , तू गाडी घेऊन चल, आणि मला पण ड्रॉप कर दादरला.. वगैरे वगैरे… )
   ३)मेकप करण्यासाठी फार तर ५ मिनिटं खर्च करेन. बाहेर जाण्यासाठी नवरा बाहेर सोफ्यावर तयार होऊन बसलाय, आणि हो.. मी आलेच एकच मिनिटात -हं…. असं म्हणून अर्धा तास लावणार नाही.
   ४) एकदा नेसलेली साडी ही जुनी होत नाही – ही गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करेन. एखाद्या लग्नाला वगैरे एकदा नेसलेली साडी पुन्हा दुसऱ्या लग्नाला जातांना नेसतांना मी ” शी, बाई.. माझ्याकडे साड्य़ाच नाहीत… ” अशी कुरकुर करणार नाही.
   ५) शॉपिंग मॉल मधे फिरायला गेल्यावर गरज नसलेल्या वस्तू विकत घेणार नाही.
   ६) स्वतः नॉन व्हेज खात नाही, पण बाहेर जेवायला गेल्यावर नवऱ्याने एखादी डीश मागवली तर डोळे मोठे करून दाखवणार नाही..आणि स्वतःचा मुड खराब होऊ देणार नाही.
   ७) एकद्या दिवशी नवऱ्याने जेवायचे नाही म्हणून सांगितले,” तर बाहेर काय खाऊन आलास?? घरी मी आपलं मर मर करून तुझ्यासाठी खास डायट चा स्वयंपाक करते, आणि तु बाहेर काहीतरी वडे बिडे खाऊन आला असशील ” अशा शंका घेणार नाही. एखाद्या दिवशी त्याला पण डीनर स्किप करण्याचा अधिकार आहे हे समजून घेईन.
   ८) वर्ष सहा महिन्यातून एकदा कपाटातल्या काही साड्य़ा कधीतरी बाहेर काढून ही आता खराब झाली, जुनी झाली, फॅशन गेली, वगैरे कारणांनी मोलकरणींना वाटून टाकल्यावर, पुन्हा आता माझ्याकडे साड्याच नाहीत फारशा .. अशी कम्प्लेंट करणार नाही.
   ९) गार्डनचा सेल हा माझ्यासाठी नसतो हे मनाशी पक्के ठरवीन.
   १०) रोजच्या नेसायला म्हणून घेतलेल्या गार्डनच्या साड्या ह्या ” मुंबईला फार गर्मी होते, म्हणून , किंवा पॉलिस्टर फार चिप दिसतं म्हणून नेसणे टाळून आपलं कॉटनची/ प्युअर सिल्कची साडीच बरी म्हणणार नाही..( किंवा थोडक्यात पॉलिस्टरच्या साड्या विकत घेणारच नाही )
   ११) बस्स.. झालं आता , थांबतो इथेच नाहीतर इथे दुसरे पोस्ट व्हायचे तयार.

 25. Smita says:

  And about resolution 54: I shared this with my husband- the response was; Hanger la lavun Thevayacha tar dukanatach Thevuyat, gharee kashala aNayacha” naveen varsha suru Vhayachya adheech he resolution moDeet nighalay! kaheetaree naveen idea suchava:-)

  • मला वाटतं की नंबर ५६ नक्कीच आवडेल पाळायला..
   वर लिहिलेल्या रेसोल्युशन्स मधे मी माझे स्वतःचे अनूभव बरेच लिहिले आहेत . जसे बाहेरून आल्यावर मी लिफ्ट मधेच शर्टची बटन्स लुझ करणे सुरु करतो आणि घरात शिरलो की आधी अंगातला शर्ट काढून ्सोफ्यावर फेकतो. दुसरीकडे ऑफिस बॅग ……. जाऊ द्या हो.. बऱ्याच गोष्टी समजत असतात की आपलं चुकतंय इथे.. पण तरीही ……!शेवटी मानवी स्वभाव आहे हा.

 26. रमेश म्हात्रे says:

  काका,

  संकल्प कशासाठी करतात…………….. मोडण्यासाठी………..:)):)):)):)):))

  • संकल्प करायला काय हरकत आहे? करून पहावा एकदा- गाजराची पुंगी, वाजली तर वाजवली, नाहीतर मोडून खाल्ली.. 🙂

 27. sahajach says:

  भन्नाआआआट 🙂

  हेरंबशी सहमत मी ५७ वा संकल्प पाळणार 🙂

  मजा आली वाचताना…. खास म्हणजे स्त्रीयांसाठीचे संकल्प तर कहर आहेत 🙂

 28. Dev says:

  He zala lagn zalelyansathi pan jyache lagn zala nahi tyachyasathi ……………

  • त्यांच्या साठी एकच संकल्प:- एखादी सुबक ठेंगणी , पटवायची- कसंही करून.. 🙂

   आता हे एकटं रहाणं खूप झालं असं वाटत नाही का?

 29. रिजोल्युअशन्स हे फ़क्त करण्यासाठी असतात ते सर्व पाळले तर पुढच्या वर्षी काय करणार??? त्यामुळे सगळे रिजोल्युशन्स केले आहेत पण ते पाळले तर त्याच महत्व कमी होईल. 😉

 30. dtawde says:

  नविन वर्ष २०११ रिसोल्युशन्स
  Resolutios list kharch khup ch lamb lachak (mothi) ahe… ani vachtaana khup maja ali….

  vakti paratwe tyachya avadi ai naivadi badalatat… number 56 pramae…. tumhi sudha sankalp yadi madhil no.1 te no. 55 pramane badalyacha prayatna kara… tymule tumchya pekha family members la yacha jast phayda hoil….

  PS:(its a comlimetory comment, nothing anything personal).

  all the best for new era.

  have a great year (from your birthday)

  🙂

  • दिगंबर
   मनःपुर्वक आभार. मी जे वर लिहिले आहे ते एक विनोदी पोस्ट म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केलाय 🙂

 31. काका जबरा List आहे ही. सगळयांचे प्रश्न सोडवले तुम्ही !

  मी तीन रीजोल्यूशंस केले आहेत या वर्षासाठी –
  1. महिन्याला 500 रुपयांची मराठी पुस्तके विकत घेणार
  2. फोटॉशॉप शिकणार
  3. माझी आई आणि वडील दोघांनाही computer वापरायला शिकवणार.

  • अगदी सिरियसली केलेले दिसताहेत. मी पण ठरवलंय की रोज सकाळी अर्धातास योगा आणि फिरणॆ सुरु करायचे. 🙂

 32. रच्याक… लैई भारी…
  नंबर १ चा जाहीर निषेध. हे लिहायला तुमचे हात कसे धजले?
  नंबर २८ – अशक्य
  ३, ४, ५, ६, ७, ८, १२, २३, ३४, ४३ आणि ५४ पाळतो आणि पाळेन…
  नंबर ३१ ची टाळाटाळ आहे म्हणून नंबर ४१ ऑफीसमध्ये कसोशीने बरेचदा पाळला जातो (५ मजले असले तरी). रूमवर लिफ्ट नाही मग २ जिने रोज २-३ वेळा चढ उतार होतात.

  बाकी (ख्रिस्ती) नववर्षाभिनंदन

  • अरे काय करणार? नॉन व्हेज बंद करणे तर शक्यच नाही.आणि मी म्हंटलंआहे ना, की मी ५६ नंबर फॉलो करणार म्हणून…

 33. s.k. says:

  kaka tumhala navin varshyacha haardik shubeccha.. hi ab tak 56 list khuuuupach mothi aahe.. pahili tar mi mulich palu shaknar nahi … 🙂

 34. Namaskar,

  Lai bhari….maja aali.
  bayakoche sankalp vajun jaam hasalo. Gharoghari matichya chuli.

  Rajan

 35. अविनाश् says:

  मन्नु भैया मस्त्..धमाल् लिहिले आहेस..लगे रहो

 36. अब तक ५६ बस !!
  २२ वर्षाच्या हिशोबाने कमीच वाटल्या.
  सुरुवात ५६ पासूनच केली असेल ह्यात मला काही शंका नाही.
  चुकून जर ५५ वर आलात तर मला नक्की कळवा.
  रिसोल्युशन्स कारण कोणी तुमचा कडून शिकवा.

 37. महेश says:

  मस्त, धमाल ,

 38. मोनिका says:

  महेंद्रजी,
  Post खूपच मस्त झाली आहे. त्यातून मला ३१, ३७, ३९, ४०, ४१ (जे की फ़ारच अवघड आहेत माझ्यासाठी :D) करायचे आहेत. ५३ मी मागच्या वर्षीच ठरवले होते, अजून तरी कायम आहे त्यावर. तुमच्या post नंतर बायकांनी कसे रिसोल्युशन्स घ्यावे ह्याचा विचार करु लागले आहे, जमले तर post करेन.

  • मोनिका
   अवश्य. वर एके ठिकाणी मी स्त्रियांसाठी कॉमेंट मधे दहा लिहिले आहेत.. ते पण ऍड करा तुमच्या लिस्ट मधे.. 🙂

 39. क्रमांक ३१ मी खरतर रोजच ठरवतो पण सकाळी कोण उठणार ? म्हणून दर वर्षी हे रिसोल्युशन करायचं आणि पहिले तेच मोडत कारण १ जानेवारीला सुट्टीच्या दिवशी उशिरा उठावाच 🙂

  • नियम केल्याशिवाय मोडण्यातली गम्मत कशी अनुभवता येईल?? म्हणून नियम हे करायलाच हवेत.. शुभेच्छा.. या वर्षीच्या नियमासाठी.

 40. anuya kulkarni says:

  sagale kulkarni etke kase sarekhe asu shakatat?

 41. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ,,,,४ वर्ष झाली पण तरीही आजचा च ब्लोग वाटतोय

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s