उंदरावलोकन..२०१० -(पुर्वार्ध)

मागच्या खूप मोठ्या काळाचा आढावा घेतला की  त्याला सिंहावलोकन म्हणतात- पण हा फक्त मागच्या एका वर्षाचा घेतलेला आढावा, म्हणून  या लेखाला मी ’सिंहावलोकन” ऐवजी ’उंदरावलोक” म्हणून पोस्ट करतोय.  हे पोस्ट राजकारणावर नाही-या मधे शिवाजी महाराज, संभाजी ब्रिगेड,    शरद पवार, कलमाडी तसेच आरार आबा, उद्धव, राज   वगैरे नेहेमीचे लोकं नाहीत- कारण खूप लोकांनी लिहिलंय हो त्यांच्यावर, अजून मी कशाला पुन्हा लिहू?? सर्व प्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन हे पोस्ट सुरु करतो.

२०११ सुरु होणार उद्यापासून. पलंगाखाली सरकवलेल्या त्या  वजनाच्या काट्याकडे पाहिले एक हलकीशी कळ आली   , आणि  क्षणात  पुर्ण २०१० हे वर्ष नजरेसमोरून गेलं  !  जाता जाता या २०१० ने मला काय दिले ह्याचा हिशोब लावायचा प्रयत्न केला, तर माझ्या लक्षात आलं की  बाकी काही नाही, तरी जवळपास २० किलो वजन दिलंय या वर्षाने मला. नेमकं काय चुकलं किंवा काय झालं तेच कळत नाही  , पण वजन मात्र खूप वाढलंय- हे असं म्हणणं म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे   .  अचानक वजन वाढणे सुरु झाले की   त्याचे कारण काय हे   सांगायला कोणी ज्योतिषी लागत नाही, स्वतःलाच पुर्ण माहीत असतं खरं कारण! पण मानवी स्वभाव असा आहे की आपण ते कारण (खादाडी) मान्य करायला तयार नसतो. 

सहज पायाकडे बघायला गेलो, तर चक्क पोट मधे आलं. उन्हाळ्यात खाल्लेले ते   हापूस आंबे मला शर्टच्या आडून सुटलेल्या पोटाच्या स्वरूपात वेडावून दाखवत  होते- म्हणत होते की  सध्या आम्ही नसलो, तरीही इथे आपली आठवण ठेऊन जातोय तुझ्या साठी  – सुटलेल्या वजनाच्या स्वरूपात 🙂 कित्येक कोंबड्या , बोकड ज्यांनी माझ्यासाठी स्वतःचा जीव दिलेला आहे, त्या पण माझ्याभोवती फेर धरून नाचत  होते. गोव्याला खाल्लेले   तळलेले मासे आणि इराण्याकडचा खीमा आठवला, की भर हिवाळ्यात पण बिअर पिण्याची इच्छा होते. जातीच्या खवय्या ला काहीही चालते. मग ते रस्त्यावरच्या पाणीपुरी, पावभाजीच्या गाडीवरचा पुलाव- पावभाजी असो किंवा चायनीज च्या गाडीवरचे ते लाल भडक रंगाचे चिकन मंचुरिअन असो , कशालाच नाही म्हणत नाही तो.

नुसतं मसालेदार आणि नॉनव्हेजच नाही ,तर जामनगरहून आणलेले व्यास च्या दुकानतले वेगवेगळ्या फळांच्या स्वादाची मिठाई, राजकोटचा पेढा, नागपूरची खवा जिलेबी , इंदौरची शिकंजी, सिहोर ची कचोरी, रबडी ह्या सगळ्या आवडीच्या गोष्टींनी सुध्दा आम्ही पण , आम्ही पण म्हणत नजरेसमोर फेर धरला होता. म्हंटलं, अरे हो … तुम्ही पण माझं वजन वाढायला मदत केलीत. पुर्णपणे मान्य !!  तेंव्हाच त्या नजरेसमोरून दूर झाल्या. एकदा हे मान्य केले की मग  घरातले  खाखरे, फरसाण , मिठाईचे डबे दिसले की  गिल्टी फिलिंग्ज यायला लागतं .

जातीच्या खवय्या ला काहीही चालते, नियम फक्त एकच असतो तो म्हणजे ” पदार्थ चवदार हवा” मग इतर गोष्टी जसे ऍम्बीयन्स वगैरे सगळे नगण्य असते. एखाद्या लहानशा टपरी मधे बसून मिसळ पाव चापताना पण खऱ्या खवय्या ला कोणी आपल्याला इथे बघेल का?? याची भिती कधीच वाटत नाही. जरी कोणी दिसले तरी पण त्याला, अरे ये.. मस्त असते इथली मिसळ म्हणून बोलवायला कमी करणार नाही तो.. आणि हो ” मी एक खवय्या आहे” !

वजन वाढलं हे कसं लक्षात येतं? सोप्पं आहे. सुरुवातीला पॅंटच बटन  पोट आत घेऊन ( म्हणजे श्वास रोखून ) लावावं लागतं.  बटन लावल्यावर श्वास सोडला की थोडं सुटलेलं पोट ओथंबल्या सारखं दिसलं की आरशापुढे तिरपं उभं राहून.. ” अजून इतकं काही वाढलेलं नाही, थोडं खाणं कमी करावं लागेल , की लगेच ताळ्यावर येईल ” असं मनातल्या मनात म्हणायचं.   बायकोला ऐकू जाणार नाही इतक्याच आवाजात पुटपुटण्या पलीकडे काहीच ऍक्शन घेतली जात नाही या क्षणी तरी.

खरा प्रॉब्लेम सुरु होतो, जेंव्हा पोट आत घेऊन पॅंटचं बटन लावल्यावर दिवसभर  एक विचित्र बेचैनी वाटत   असते.   संध्याकाळी घरी आल्यावर पॅंट काढून फेकली आणि घरची शॉर्ट घातली, की  पॅंटच्या पट्ट्याच्या जागेवर जाम खाज सुटते. यावर मग “मुंबईला कित्ती घाम येतो नां, म्हणून असेल कदाचित ” अशी स्वतःची समजूत काढून पुन्हा दुर्लक्ष केले जाते. शर्ट पण काही मागे नसतात, सगळे  शर्ट पोटाभोवती कवटाळून बसतात- जसे  एखाद्या तक्क्याला, किंवा लोडाला कव्हर लावावे तसे!  पोट सुटलंय हे मान्य करायला लावण्यात या शर्ट चा खूप मोठा हात असतो.तुम्ही खुर्चीवर बसलात की तसे दोन बटनच्या मधल्या भागातून ,पोटावर एखाद्या फुलाच्या पाकळ्या उमलाव्या,  आतलं बनीयन  बाहेर निघणे  सुरु होते. फुल उमलतांना छान दिसते पण पोट ?     ही परिस्थिती आली की उगीच चिडचीड होते, तिचा बिचारीचा काही दोष नसतांना  विनाकारण तिच्यावर वैतागल्या जातं.  आता ’ती’ कोण हे सांगायची गरज आहे असे वाटत नाही मला.

आता अगदीच असह्य झालं, म्हणजे पॅंटचं बटन लावल्यावर खूप  अस्वस्थ वाटायला लागलं, की मग पुढल्या साईज ची पॅंट घ्यायची हे ठरतं.   पॅंट चा साइझ ३८ च्या ऐवजी ४० झालाय , किंवा शर्ट ४२ च्या ऐवजी ४४ झालाय  हे मान्य करतांना होणाऱ्या मानसिक त्रासाची कल्पना  केवळ  जे लोकं गेलेले आहेत तेच करू शकतात!  दुकानात जाऊन नवीन शर्ट पॅंट्स विकत घेतले की मग मात्र आता खरंच डायट सुरु करायलाच हवं हे ठरवल्या जातं- हे डायटींग आणि वजन कमी करणे हा पण एक वेगळा प्रकार आहे.त्या बद्दल नंतर… दुसऱ्या भागात…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , . Bookmark the permalink.

48 Responses to उंदरावलोकन..२०१० -(पुर्वार्ध)

 1. प्रचंड…प्रचंड…प्रचंड भारी … 🙂

  मला आता समजल माझ वजन का वाढत नाही ते……कारण तुमच वजन काही कमी होत नाही 😉

  पृथ्वीचा बॅलन्स राहिला पाहिजे ना…. 🙂 🙂 🙂

 2. अरे हो हे राहिलच की…ब्लॉगच नवीन रुपड मस्त आहे…आवडेश.

  • धन्यवाद. इथे वर्ड प्रेस मधे फार कमी सिलेक्शन आहे. पण ह्याचे फॉंट्स मोठे आहेत म्हणून हा निवडलाय.

 3. २० किलो… पार ट्वेंटी ट्वेंटी खेळत असल्याप्रमाणे तुमचा रन रेट वाढतोय. बंगलोरला असून माझ्यादेखील पॅंटच्या पट्ट्याच्या जागेवर जाम खाज सुटते त्यामागे माझे यंदा वाढलेले ४ किलो वजन आहे हे आत्ता कळलं. तुम्ही जात्यातले तर आम्ही सुपातले. २०११ ला सेल लागला की मीदेखील ३२ ऐवजी ३४ ची पॅंट आणि ४२ चा शर्ट शोधतोय असे मला दिसतेय 😉

  • डाएट वैगरे काय तो करून घ्या. गावाला कैर्‍या लागायला सुरूवात झालीय. हापूस येईल लवकरच 🙂

   • अरे बाबा, हापूस म्हणजे माझा विक पॉइंट. कमीत कमी ५ पेट्या संपवतो. रात्री जेवल्यावर२- ३ आंबे तर एकटाच संपवतो मी. पण यंदा मात्र ………

  • अरे हो ना, लक्षातच आलं नाही इतकं वाढतोय आपला गोल म्हणून. पण आता मात्र सिरियसली मनावर घेतलंय. 🙂

 4. महेंद्र….अगदी अगदी !
  हे ज्याचं होतं त्यालाच कळतं….मनापासून पटलं 🙂

  बाकी ब्लॉगचं नवं रुप एकदम फ्रेश, प्रसन्न !!

  नव्या वर्षात तुझं वजन तुला जितकं कमी हवं…. तितकं होवो !! ( सेम पिंच म्हण बरं का 😉 )

  • तूला अजून इतकी गरज नाही.. म्हणून सेम पिंच नाही म्हणणार. मझं थोडं जास्तंच झालंय,

   🙂

   शुभेच्छांसाठी आभार..

 5. Ashwini says:

  Aaila new look ekdam saahi…Kaka mazhi kahis tasch aahe ho…all d best and happy new year…

 6. Rajeev says:

  तू उभा असताना पेक्षा झोपला की तूझी उंची जास्त होउ देउ नकोस !!!!!

 7. निनाद होंबळकर says:

  म्हणजे माझ्या नव्या वर्षाचा एक पण तुम्ही ओळखलात..

 8. हे हे प्रचंड भारी आणि सत्य पोस्ट..निदान माझ्यासाठी तरी 🙂
  करू करू दोघे वजन कमी करूनच दाखवूया… 🙂
  तुम्हाला खूप शुभेच्छा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि हे वर्ष खूप आनंदी क्षण घेऊन येऊ दे तुमच्या आयुष्यात. 🙂

  • अरे हो सांगायच राहील..हे ब्लॉगच नवीन रुपड मस्त आहे 🙂

  • अरे तुझं मस्त ट्रेकिंग वगैरे सुरु असते, इथे तर ्शरीराला काही व्यायामच नाही. आता मुद्दाम सुरु करतोय व्यायाम. कदाचित व्यायाम शाळा पण जॉइन करीन 🙂 नक्की नाही .. पण मे बी..

 9. bhaanasa says:

  हा हा… अरे जरा म्हणून तुझा ताबा नाही खादाडीवर. 😛 पोटाला फुलाच्या पाकळ्यांची उपमा देउन मस्त गोंजारलेस. भारीच!

  वीस किलोचा संकल्प लवकर पूर्ण होवो, भरभरून सदिच्छा!( डिशेश नाही बरं का रे.. ) 🙂

  ब्लॊग मस्त दिसतो आहे. आवडेश. आणि हो नववर्षाच्या मन:पूर्वक शभेच्छा!!!

  • ्प्रयत्नांती परमेश्वर. जे काही दिलंय २०१० ने ते २०११ ला व्याजासहीत परत करायचंय. 🙂

 10. s.k. says:

  regular exercise n yoga keeps a person slim n healthy kaka.. 🙂

 11. sahajach says:

  महेंद्रजी तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा 🙂

  तुमचे संकल्प पुर्ण होवोत…. वजनाचा काटा उतरो 🙂

  >>>>पॅंट चा साइझ ३८ च्या ऐवजी ४० झालाय , किंवा शर्ट ४२ च्या ऐवजी ४४ झालाय हे मान्य करतांना होणाऱ्या मानसिक त्रासाची कल्पना केवळ जे लोकं गेलेले आहेत तेच करू शकतात!

  यातले दु:ख शब्दश: पटलेय… 🙂

 12. महेन्द्र,
  नूतन वर्षाभिनंदन! हे वर्ष तुम्हाला हलके फुलके करो!!!

  अहो, ह्या वर्षाने ब्लॉग जगतात तुम्हाला चांगलेच वजनदार बनवले 🙂 . पण प्रत्यक्षात सुद्धा वजनदार बनलात? बापरे!

  ब्लॉगचे नवीन रूप आवडले.

 13. स्वामी राजरत्नानंद says:

  “औम बकासूरराय नम:”

  काही लोक कुत्रावलोकन करतात… पेक्षा ते त्यांचेच स्वपार्श्वभागावलोकन असते…
  किंबहूना ते स्वपार्श्वभागावघ्राणन व साफ़ सुफ़ीचा भाग असतो.
  पण हे कराय ला देखिल कंबर ( आणी मान ही ) बारीक(च) लागते !!!!!
  ग्रामकेसरी ही जात माझ्या मते योगाभ्यासात प्रवीण असते.. ..कीतीही मटन खाल्ले
  तरी जाडजूड झालेला श्वान कुठे दीसतो का ?जाड हो तात ते बैल, नंदी..पण ते काही सामीष खातात का ? म्ह्णणून वजन हे नशीबात असते..बीनधास्त रहा बीन धास्त खा …… “जै बकासूर महाराज की जै”…२१ वेळा माळ जपा…
  थांबवतो ..उरलेली बाट्ली मीत्रांनी पळवीण्याच्या आधी ( लीहीणे) संपवतो

  • Rajeev says:

   !!!!!!!!!!!!!!!!!!!! ???

  • स्वामीजी…

   इथे मान नावाचा प्रकार अस्तित्वात असतो, हे विसरलोय मी. मान नसलेल्या प्राण्याप्रमाणे ( डूक्कर हा प्राणी मान नसते म्हणूनच मुस्लीम लोकं खात नाहीत नं?) माझी अवस्था झालेली आहे. अरे रोजच्या पाट्या घालणाऱ्या सारख्या आमच्या बैलांचे वजन वाढणारच..
   तू हल्ली सगळं सोडलं आहेसच, तेंव्हा बाटली कसली?? दुधाची का??

 14. सुंदर, हे दु:ख बारीक माणसांना नाही समजणा.
  ब्लॉग चे नवीन रुपडे खूप छान आहे. प्रसन्न वाटते.

 15. Smita says:

  Are mala vaTala tumhee resolution karaNar navataat ya varshee ( ref: your earlier blog- 56 point ready reckoner:-)) anyway- you are truly a heavy weight in the blogger community and may that continue henceforth as well!! good luck with weight loss.

  • ्स्मीता
   हे या वर्षीचं रिसोल्युशन नाही, १५ डिसेंबर पासूनच सुरु केलंय. आता पर्यंत अडीच किलो कमी झालंय .. 🙂

 16. Mahesh says:

  नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
  २० किलो म्हणजे अतीच अति वजन वाढलंय महेंद्र.
  ब्लड चेक-अप लवकरात लवकर करून घ्या.

  cheers

  • महेश
   लिपिड प्रोफाइल तसा बरा आहे, कोलेस्ट्रॉल कमी (१८२) आहे- जो पुर्वी १५५ ते १६० च्या दरम्यान असायचा) आणि शुगर पण नाही… फक्त वजनामुळे गुडघे दुखणे सुरु झाले, म्हणून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतोय . मागच्या वर्षी खाल्लेलं रेड मिट फारच अंगी लागलंय.. 🙂

   • Mahesh says:

    गेल्या काही महिन्यात माझे वजन १2 lbs ने कमी केले.
    regular exercise तर होत नाही पण तोंडावर ताबा ठेवण्यात यशस्वी झालो. I simply try to eat less.
    मिठाई हा माझापण weak point आहे. एकावेळेला फक्त १ गुलाब जामून त्याचे १० तुकडे करून खातो. 😦
    Wish you all the best.

    महेश

 17. Aparna says:

  सहज पायाकडे बघायला गेलो, तर चक्क पोट मधे आलं…..:)
  माझे मागच्या महिन्यातले दिवस आठवले…हे हे…..
  पण काका on a very serious note, “काळजी घ्या” इतकच म्हणेन…या खादाडीमुळे फार लवकर पथ्यपाणी कराव लागल तर कसं वाटत यातून गेलेय म्हणून तुमच्यापेक्षा लहान असले तरी सांगते….त्यावर पण कधी लिहेन…

  • जबाबदारीची जाणीव झाली, की दोन मुली , बायको, आहे, आणि एक दिवस म्हणजे डिसेंबर १५ पासूनच माझं पथ्य सुरु केलं आहे. तसं नॉन व्हेज एकदम कमी केलं आहे, आणि खाल्लं तरीही फक्त तंदूरी.. मी निश्चयाच्या बाबतीत तसा पक्का आहे. जेंव्हा सिगरेट सोडू शकतो, तर वजनही नक्कीच कमी करू शकेन याची खात्री आहे. 🙂 धन्यवाद..

 18. ब्लॉगचं नवं रुपडं खुप आवडलं दादा !
  नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, येत्या वर्षात तुमचं वाढतं वजन (शारीरिक) कंट्रोलमध्ये राहो आणि वाढतं वजन (सामाजिक, बौद्धीक, मानसिक आणि अर्थातच आर्थिक) खुप खुप वाढो हेच सदिच्छा ! 🙂

  • विशाल
   या वर्षी पासून ब्लॉगिंग अजून कमी करण्याचे ठरवले आहे.. 🙂
   तुला पण हार्दिक शुभेच्छा..

 19. तुमची पोस्ट वाचून मलाही डाएटिंगची खुमखुमी आलीये.. मीही सुरु करतो.. बघू किती दिवस (तास) जमतं ते 😉

  • आल्हाद alias Alhad says:

   हेरंबा, विनोदाच्या डायटिंगवर नको रे जाऊस पण!

   • हा हा आल्हाद…. विनोदाचं डायट? कितीही प्रयत्न केला तरी ते जमणार नाही.. अर्थात प्रयत्न कोण करतोय म्हणा 😉

  • अजून काही तितकीशी वेळ आलेली दिसत नाही. आता पासून कशाला उगीच?? नंतर वेळ पडेल तेंव्हा पहा..

 20. Rajeev says:

  18 th Jan. 2009….to 18th Jan.2011….good going…
  PART-II when……………..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s