उंदरावलोकन -(उत्तरार्ध)

एकदा वजन वाढणे सुरु झाले की  मानसिकता एकदम बदलून जाते. रस्त्यावरून चालत जाणारा एखादा बारीक माणूस दिसला की आपल्याला खूप  इन्फिरिअरीटी कॉम्प्लेक्स येतो, आणि  एखादा जाडा माणूस दिसला की मग आपण ‘त्याच्या इतके ‘ जाड आहोत की ‘त्याच्यापेक्षा कमी’ ह्याचा हिशोब मनातल्या मनात लावून स्वतः कसे दिसत असू याचा विचार सुरु होतो. सोबत बायको असेल तर, ” अगं मी त्याच्या इतका जाड आहे कां? म्हणून विचारलं जातंच..

मित्र पण ’काय रे, किती फुगला आहेस?”थोडं वजन कमी कर.. म्हणून सल्ला देतात. हे सल्ला प्रकरण पण खूप मजेशीर असतं. आता  असे सल्ले मला दिले तर माझी  काही हरकत नाही- हवे तेवढे द्या, पण सल्ला दिला जातो माझ्या बायकोला,  तिने बनवलेली मस्तपैकी कांदा भजी खात, ” वहिनी, याला  तळलेलं अजिबात देऊ नका! किती जाड झालाय हा, याला वजन  कमी करण्यासाठी तळवलकरांकडे का पाठवत नाही तुम्ही??  आणि अजून वर पुन्हा “अहो , वहिनी, सांगतो, माझा एक जवळचा मित्र नुकताच हार्ट अटॅक ने गेला. फक्त ४५ चा होता..” हे असं काही ऐकलं की मग झालं!! मला  एकदम समोर  दुधी, शेपू वगैरे समोर दिसणं सुरु होतं,  सकाळी बेड टी ऐवजी दुधी चा किंवा कारल्याचा रस….बायकोने एकदा   मनावर घेतले की  मग काही खरं नाही ..

इतके सांगून थांबेल तर तो मित्र कसा??   बायकोला सांगतो , की त्याच्याकडे जेन फोंडाची, बाबा रामदेव ,  शिल्पा शेट्टीची  योगा, ऍरॊबिक्सची सिडी आहे ती देतो,  आणि वर पुन्हा एक सल्ला पण…. ही सिडी   बघून  जरा व्यायाम करवून घ्या याच्या कडून. हे सगळं करत असतांना स्वतः ओव्हर वेट असल्याचे सोयिस्कर पणे विसरतो तो. (  ती सिडी अशीच कोणीतरी त्याच्या बायकोला दिलेली असते 🙂  – म्हणजे आता मला पण कोणी तरी बकरा बघायला हवा की ज्याच्या गळ्यात ही सिडी मारता येईल मला).

वजन कमी करण्याचा हमखास उपाय म्हणजे ,   रोज सकाळी तास भर ब्रिस्क वॉक करून ये  हा सल्ला तर हमखास सगळेच जण देतात.  आता तुम्हीच सांगा,  मस्त पैकी हिवाळ्यात   सकाळी अंथरूणात पांघरूण घेऊन पडून रहायचं की सकाळी  उठून  फिरायला जायचं??  लोकांना काय सांगणं सोपं असतं, पण खरंच फॉलो करणं इतकं का   सोपं असतं का ते?

शेपू हे गवत नसून भाजी आहे याचा शोध लावणाऱ्याचा निषेध...

एका मित्राने सांगितले की ,  याचं  खाणं कमी करा हो, किती खातो हा माणूस. याचा ब्लॉग वाचता का तुम्ही? त्यावर बघा काय काय लिहित असतो ते, आणि टुरवर असतांना काय  काय खात असतो ते. माझं तर नुसतं वाचून वजन वाढतं. (आयला, बोंबला, मी मनातल्या मनात त्याचा उद्धार करतो ) ब्लॉग बद्दल काही सांगितलं ह्याने , आणि तिने खाद्ययात्रा बघीतले तर?? कैच्याकै.. अंगावर काटा येतो माझ्या .

एका मित्राने तो जगप्रसिद्ध जनरल मोटर्स चा डायट प्लान पण इ मेल ने पाठवला.  त्यामधे कितीही प्रोटीन्स खाल्लेले चालतात, पण फक्त कार्बोहायड्रेट्स म्हणजे चपाती, भात वगैरे खायचे   नाही असा प्लान आहे तो.  पहिल्या दिवशी कितीही फळं खा, दुसऱ्या दिवशी भाज्या, नंतर तिसऱ्या दिवशी भाज्या आणि फळं , नंतर वंडर सुप डिझान्ड बाय जीएम, नंतर चिकन  ……….वगैरे वगैरे.. प्लान आहे तो. तर दुसऱ्या एकाने काही मित्र स्वतःचे   “सेल्फ डिझाइन्ड”   डायट प्लान्स  – म्हणजे स्प्राऊट्स खा, हवे तितके  वगैरे वगैरे.

स्वामी राजरत्नानंदांनी तर चक्क एक रेसीपी पण पाठवली आहे माझ्या फेसबुक वर इथे खाली पोस्ट करतोय. नवीन डाएट चीकन रेसीपी १ KG चीकन + २/३ लहान कांदे मोठ्या फ़ोडी + ५/६ लसूण पाकळ्या ठेचून + ४-४ लवंग,वेलची + 5/ 6 मीरे ठेचून +१ चमचा हळद +2 चमचे tomato saus + चवी पुरते मीठ + १/४ ली. पाणी……सर्व कूकर मधे टाकून १ शिट्टी .

कूकर उतरवून चिकन  वेगळे खाणे.”ईतर पाणी मिक्सर मधून काढून १/२ चमचा बटर टाकून “मुलांना” त्यात Noodles करून देणे .” आता  ही रेसीपी वाचल्यावर मनात आलं की त्याला विचारावं, की  शुद्ध शाकाहारी  घरी जर चिकन आणलं तर  बायको राहील का घरात?? या वयात दुसरी बायको कुठून आणू रे बाबा?कधी मासे खाऊन  घरी गेलो आणि चुकून सांगितलं, तर चक्क दोन दिवस तिला वास येत रहातो  माशाचा..

दुधी.. झाडावरच कित्ती छान दिसतो नाही का? कशाला उगीच तोडायचं त्याला??

मी सध्या दुधी पालक, काकडी ,मेथी, कच्ची कोबी,  गाजर या सगळ्या भाज्या – त्यातल्या बऱ्याचशा कच्च्या- सारख्या खात असतो  , त्यामुळे मला बरेचदा आपण बोलायला तोंड उघडलं की तोंडातून बें बें…बें..बें.. असा बोकडासारखा आवाज येईल का याची शंका येते.  असं होऊ नये म्हणून बाहेर तंदूरी चिकन फिश वगैरे खाणं सुरु ठेवलंय.

फेसबुक वर कुठलं तरी डीस्कशन सुरु होतं, तेंव्हा  सात्त्विक संतापाने  एका मित्राला म्हंटलं आता वजन कमी करतोय म्हणून. तर म्हणे “त्यात काय मोठं?  कोणीही कमी करेल.” म्हंटलं, “तू   शेपू  दुधी वगैरे   भा्जी दररोज  खाल्ल्या आहेस का  कधी??”तर म्हणे “ह्या तर माझ्या आवडत्या भाजी रोज खातो मी!” काय  बोलणार? विनोद म्हणून ठिक आहे, पण खरंच खायची वेळ आली की समजते !

बरं जास्त खाल्लं की वजन वाढतं, मग यावर पण  एका मित्राने उपाय सांगितला आहे, म्हणतो की
बिरबलाच्या ( वाघ आणि शेळी च्या ) गोष्टी प्रमाणे हॉटेल मधे जेवता~ना वाटीला टेकून बायकोचा फ़ोटो ठेव, मग ..गोवा, बडोदा..मासे ,चीकन,प्राठा बीर..कश्या कश्याचा परिणाम होणार ना ही !!!!!  🙂  काय म्हणू यावर?

जास्त वजनामुळे होणारे  प्रॉब्लेम्स  तर खूप आहेत. शेअर   रिक्षा मधे बसताना, तुम्ही आत शिरलात की आत बसलेले दोघं जण एकदम अंग चोरून घेतात, तुम्हाला मागच्या सीटवर पाठ टेकवून बसता येत नाही, कायम समोर सरकून बसावे लागते ( गुडघे समोरच्या पार्टीशनला लागून रिक्षा खड्ड्यातून गेली की खूप दुखतात 😦  ).  बरं हे तर ठिक आहे, पण सगळ्यात  जास्त इनसल्टींग  -जर एखादी स्त्री शेजारी असेल , आणि जर ती अजून जास्त अंग चोरून बसली की तर तुम्हाला अगदी थोबाडीत मारल्यासारखं होतं.  थोडं जास्त चालणं झालं की दम लागणे किंवा पाय दुखणे हे तर नेहेमीचेच होऊन बसते, कितीही कमी अंतर असलं तरीही रिक्षा किंवा बसने जावेसे वाटते. एकटं असलं की ते सहज शक्य होतं, पण कोणी सोबत असला की लगेच.. अरे इथेच तर आहे, जाऊ  या चालत म्हटलं की  जाम वैताग येतो.

हे सगळं काही मान्य, पण पुर्वी बायको बरोबर एकदा लग्नाला गेलो असतांना “ही तुमची मोठी मुलगी का?” म्हणून पण एकाने विचारले होते.  हा प्रश्न ऐकला आणि माझे एकदम सार्वजनिक वस्त्रहरण झाल्याप्रमाणे अवस्था झाली.    वर्षापुर्वी   तिला  लोकल मधे एका आजींनी  तुझे बाबा काय करतात? माझा मुलगा लग्नाचा आहे म्हणून चौकशी करते आहे असं म्हणाल्या होत्या. हे असं व्हायला लागल्यावर वजन कमी करायलाच हवे  हा विचार हळू हळू पक्का होत गेला मनामधे.(फक्त विचारच बरं कां, त्यावर काहीच ऍक्शन घेतली नव्हती ) … पण आता मात्र नक्की ठरवलंय की वजन कमी करायचेच , अगदी काहीही- डायटींग जरी  करावे लागले तरी बेहत्तर!

माझ्यासारख्या माणसाला मात्र कमी खाणं हे शक्य होत नाही, आणि नुसतं भाज्या फळं खाऊनही राहणं सुद्धा  शक्य होणार नाही हे माहीती असतं,   आणि आता वजन कमी करणे खरंच आवश्यक आहे हे लक्षात आलेलं असतं, म्हणून स्वतःचा  डायट प्लान  करून  सुरु करायचं  ठरवतो  . हे सगळं काही ,एक तारखे पासून नवीन वर्षाचे रिसोल्युशन म्हणून सुरु करावे हे सगळे असं वाटत होतं, पण मग जर करायचे आहेच, तर मग एक तारखेची तरी कशाला वाट पहायची ?? म्हणून सरळ त्याच दिवसा पासून हे सगळं सुरु केलं.  ती तारीख होती १५ डिसेंबर.

धुळ झटकली बरं कां...

पलंगा्खाली पडलेले डंबेल्स , बुलवर्कर, आणि क्रंचेस हेल्पिंग स्प्रिंग काढली.  त्यावरचे सगळे जाळे स्वच्छ केले, मला वाटतं की सगळ्यांच्याच घरी ही व्यायामाची उपकरणं अशीच कधी तरी बाहेर निघत असावीत. माझ्या बहीणी कडे एक सायकल आहे व्यायामाची, तिचा उपयोग फक्त कपडे वाळत घालायलाच होतो ,एका मित्राकडे ट्रेड मिल आहे, तिचा उपयोग पण फक्त टॉवेल वाळत घालायलाच होतो. 🙂 जर वाचत असशील हे पोस्ट तर काढ बाहेर लवकर सगळं.

दुसऱ्या दिवशी पासून  सकाळी उठून योगा अर्धा तास, थोडं फार वेट्स आणि बुलवर्कर करणे  सुरु केले. तसेच जर वजन कमी करायचं  म्हणजे  जिभेवर ताबा ठेवायलाच हवा,  म्हणून साखर , भात आणि बटाटा पुर्ण पणे बंद केले . सकाळचा चहा पण बिना साखरेचा ! 😦  स्प्राउट्स सॅलड्स, आणि बॉइल्ड एग व्हाईट हे  मुख्य जेवण झाले. समोसा, बटाटेवडा  भजी ,पाणीपुरी , आणि  तर्री मारलेली मिसळ एकदम बंद!!!  😦  हुश्श किती हा ताबा ठेवायचा.

१५ डीसेंबरचा ब्रेकफास्ट... अंड्यातलं पिवळं बलक गेलं.. 😦

हे सांभाळणं घरी असतांना सहज शक्य होते. पण माझा जॉब फिरतीचा, तेंव्हा एकदा टु्र ला गेलं की मग कसं करायचं?? हा एक मोठा प्रश्न समोर होताच.  यावर पण एक उपाय  शोधून काढलाच. सकाळी ब्रेकफास्ट एग व्हाईट , दोन टोस्ट , आणि फ्रेश फ्रुट्स.. लंच मधे दाल , चिकन क्लिअर सुप, आणि एक किंवा दिड रोटी.  अर्थात प्रत्येक जेवणात सॅलड तर मुख्य भाग असतोच पण जेवल्याचे समाधान काही होत नाही. अहो भात खायचा नाही म्हटलं की जेवण झाल्यासारखे वाटतच नाही- शेवटचा दहीभात खायचा नाही म्हणजे काय चेष्टा आहे काय?? पण करतोय बिचारा ’मी’ मॅनेज सगळं!  संध्याकाळी जर भूक लागलीच तर    दोन तिन  मारी बिस्किटे आणि बिना साखरेचा चहा. ..

–आणि कळवण्यास आनंद वाटतो की हे सगळं केल्यावर मात्र वजन कमी होतंय. पॅंट्स कंबरेवर थोड्या लुझ होणे सुरु झाले आहे…. Still miles to go…

अपर्णा म्हणते की या पोस्ट चे नांव दरावलोकन हवे होते उंदरावलोकना ऐवजी.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , . Bookmark the permalink.

42 Responses to उंदरावलोकन -(उत्तरार्ध)

 1. Hemant Pandey says:

  महेंद्र काका!
  पुन्हा एकदा झकास लेख.
  बिरबलाच्या ( वाघ आणि शेळी च्या ) गोष्टी प्रमाणे हॉटेल मधे जेवता~ना वाटीला टेकून बायकोचा फ़ोटो ठेव, मग ..गोवा, बडोदा..मासे ,चीकन,प्राठा बीर..कश्या कश्याचा परिणाम होणार ना ही !!!!! 🙂
  एक नंबर सल्ला! आपल्या गळ्यात (स्वत:च्याच) बायकोच्या प्रतिमेचे एखादं लॉकेट अजून जास्त परिणाम अथवा चमत्कार करेल.

  • हेमंत,
   गळ्यात लॉकेट?? 🙂
   आयडीया मस्त आहे .. : पण पुरुष मुक्ती संघटना वाले ऑब्जेक्शन घेतील, आणि स्त्री मुक्ती वाले सत्कार करतील.. हरकत नाय.!!!

 2. RAJEEV says:

  lai khaas………………….

 3. RAJEEV says:

  अपर्णा म्हणते की या पोस्ट चे नांव उदरावलोकन हवे होते उंदरावलोकना ऐवजी. …. laich khhas

  • 🙂 उदरावलोकन.. फक्त चार महीने थांब.. फक्त प्रॉब्लेम हा बाहेर गावी टूरला गेल्यावर येतो व्यायामाचा. फक्त सकाळचं फिरणं आणि योगा इतकंच करू शकतो. एनी वे.. बेटर दॅन नथिंग.. 🙂

 4. आल्हाद alias Alhad says:

  उदरावलोकन!
  व्वा!
  बाकी आत्ता मला माझ्या बारीक असण्याचं रहस्य कळलं, शेपू आवडती भाजी! 🙂

  • राजे,
   लग्न होऊ द्या.. मग पहा काय होतं तुमचं ते.. नाही दोन वर्षात पोटाचा माठ झाला, तर नाव बदलीन माझ.. 🙂

 5. निनाद होंबळकर says:

  काका… हे काही बरोबर नाही… आधी सांगितले असते तर मी पण आधीच सुरु केले असते.. तरी अजून वेळ झालेला नाही.. आणि तुमच्या ideas आहेतच मदतीला.. लेख नेहमीप्रमाणेच मस्त..

 6. हाहाहा काका लगे राहो.. वजन आणि कंबरेचा घेर कमी करण्यासाठी आगाऊ शुभेच्छा..

  • धन्यवाद.. सुरु झालंय कमी होणं. सुरुवातीला चांगला रिझल्ट मिळतो, एका ठरावीक सिमेनंतर मात्र भरपूर मेहेनत करावी लागते..

 7. Aparna says:

  अभि आणि नंदन…खरंच उदरावलोकन होतंय यासाठी…
  बाकी तो वस्त्रहरणाचा प्रसंग खराच आहे का?? 🙂

  • अपर्णा,
   तू भारतात आली होतीस तेंव्हा घरी आली होती नां? तू तर स्वतःच पाहिलं आहे,.. अगदी खरा प्रसंग आहे तो 😦 स्माईली उलटा की सरळ हे लक्षात येत नाही म्हणून 🙂 दोन्ही…

 8. Rohan says:

  दादा… अरे काय.. ट्रेकनंतरच सुरवात करणार होतास ना.. 🙂 आता जरा खादाडी कमी ना.. 🙂 लगे रहो…

  • अरे तेंव्हा फक्त फिरणं सुरु केलं होतं.. पण काही फारसा फरक पडला नव्हता, म्हणून आता सोबत डायट पण कंट्रोल करतोय!

   • रोहन says:

    आणि फक्त शेपुच नाही… तर तांदूळ, गहू. ज्वारी, बाजरी हे सर्वच प्रकार शास्त्रीयदृष्ट्या गवत ह्या प्रकारात मोडतात… 😀
    म्हणजे आपण जास्तीत जास्त गवतच खातो… 😀

 9. Smita says:

  Masta post ahe ajachee:-) atyanta pratinidheek vagaire swarupachee:-) tumhee sangtay tasa prasang ( hee mothee mulgee ka? vala) thodya faar farakane hoto karaN bayaka jasta kalajee ghetat swatachee generally anee kahee arthat naturally young distaat kayam- mazee aai disayachee tashee kayam mazee baHeen asalyasarakhee…

  shepoo chee ek chavdaar nahee puN tolerable, low cal recipe maheet ahe, deu ka?tumhee already sallyanne grasalele distay tyamuLe na vicharata dilee nahee:-)

  • स्त्रियांचं खाण्याकडे फार कमी लक्ष असतं. चिमणीसारखं थोडंसं खातात, 🙂 त्यामुळे वजन फारसं वाढत नाही. जात्याच स्वतःची काळजी घेण्याची टेंडन्सी असते , म्हणुन असेल कदाचित- हे म्हणणं एकदम योग्य आहे. मला वाटतं, काही गोष्टी जन्मतःच प्रत्येक स्त्री मधे असतात, त्यातली एक. साधी गोष्ट पहा, एखादं आइस्क्रिम खाऊन आमचं समाधान होत नाही. श्रीखंड वगैरे असेल तर कमीत कमी दोन तिन वाट्या लागतंच, आणि हेच ते कारण असावं वजन वाढण्याचं..

   शेपू आणि दुधी हे दोन्ही पण प्रतिकात्मक घेतलंय, लिहितांना.. 🙂

 10. nilesh joglekar says:

  Mahendraji,

  Lekhache naav kharokharach Udaravalokan asa pahije.
  3 ek varsha purvi mazi awastha agadi ashich hoti. Pan khanya madhe yogya badal wa niyamit vyayam kelya mule maza 26kg weight kami zale 2 warsha madhe. Barech diwas mi wardrobe hi change kela navhata karan watat hote parat jaad honar. Pan tase zale nahiye.

  Lekh faar sundar ahe ani observations faar nemki ani correct ahet

  Cheers
  Nilesh Joglekar

  • निलेश
   प्रतिक्रिया वाचून खूप बरं वाटलं. एखादी सक्सेस स्टोरी समोर असली की खूप बरं वाटतं.
   माझा स्वभाव तसा जिद्दी आहे, त्यामुळे एखादी गोष्ट ठरवली की ती केल्याशिवाय रहात नाही त्यामुळे वजन कमी करण्यात नक्कीच यश मिळेल असे वाटते.

 11. Raj Jain says:

  झकास लेख.

 12. महेश says:

  बारीक होण्याचे सल्ले आवडले .

 13. siddhesh says:

  aparna kon?

 14. माझी कमेंट दिसत नाहीये.. 😦 .. चांगली मोठी टाकली होती.. आता आठवत नाही नीट.. त्यामुळे आता झटपटच टाकतो..

  खरंय.. हे उदरावलोकनच वाटतं आहे.. बाकी तुम्ही ठरवून वर्षांत ३६५ पोस्ट्स लिहिल्यात तेव्हा हे डायट प्रकरण तर तुम्हाला आरामात जमेल.. शुभेच्छा !! (मला कधी जमणार असं जिद्दीने वागायला? 😦 )

  • आता प्रयत्न तर सुरु केलाय. थोडा व्यवस्थितपणा आणलाय जेवणाच्या सवयींमध्ये.. बघु या काय होतं ते..:)

 15. Raj Jain says:

  अफाट, अफाट लिहले आहे.. गुरुदेव !!!

  • राज
   अती झालं म्हणून काहीतरी अ‍ॅक्शन घ्यावी लागली, नाही तर १०४ चे १५० व्हायला वेळ लागला नसता.. 🙂

 16. मलाही आता विचार करावा लागेल ,कारण माझे मित्र बोलायला लागले आहेत ढेरी वाढते आहे म्हणून…..बाकी गेल्या वर्षात तीन चार वेळा मी व्यायाम, धावण सुरु करून सोडलं…खाण्यावर मात्र कधीच कंट्रोल करता आल नाही …तो तीकोन्याचा ट्रेक केल्यानंतर एकाही ट्रेक केला नाही आणि माझा वजन ह्या अल्पश्या काळात तब्बल ४ किलोनी वाढल….व्यायामाची सायकल घेतली पण खरच तीच्यावर आज एखादा कापडाच सुकायला ठेवलेला असतो….खाली पाहिल्यावर डायरेक्ट पाय दिसण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा…

  • धन्यवाद..
   अरे एखाद्याची टेंडन्सी असते वजन अक्युमुलेट करायची. आपली तशी असली की मग मात्र थोडी जास्तच काळजी घ्यावी लागते..

 17. bhaanasa says:

  आपण फोनवर या उदरावलोकनावर बरेच मंथन केलेय. 😀 तेही एकीकडे हादडत हादडत. ( मान्य की निमुटपणे कोबीची भाजी गरीबासारखा खात होतास…. :)) ) पण हळूहळू कमी होतेय. म्हणजे घेतलेले मानसिक श्रम ( व्यायामासाठी शारिरीक पेक्षा मानसिक निभावच फार फार गरजेचा वाटतो मला तरी.. ) फळ देऊ लागलीत.

  लगे रहो भिडू, पुढच्यावेळी तिकोना च्या झेंड्याला तुझा हात लागलाच पाहिजे. 🙂

 18. नक्कीच.. आता कोबी, गाजर आणि टोमॅटॊ मला स्वप्नातही दिसत असतात.
  पुढल्या वेळेस तिकोना नक्की सर करणार 🙂

 19. swapna says:

  joke kartay na?? khar sanga…
  shakyach nahi ki tumhi “jibhevar” taba thevlay.. tumhi aani sakhar band?
  aika maza… asa ekdam kahi band karu naka.. nantar jeva parat khayla suru karal na.. duppat vajan vadhata.. (swanubhav!!!)
  mazya sathi tari best suitable upay mhanje suryanamskar.. aani limbu-pani, madh-pani..
  hi site paha: http://www.suryanamaskar.info/index.htm

  baki… best of luck!!

  — eka jadi kadun..eka jadyala..!! (gammat bar ka!)

  • खरंच.. अगदी खरं! थोडं जास्तच झालं होतं वजन . सेंच्युरी पार केली होती, आणि चालताना पण दम लागायचा म्हणुन वजन कमी करणे आवश्यक झाले होते. या पुर्वी पण बरेचदा वजन कमी केले होते , पण नंतर सगळं खाणं सुरु केल्यावर पुन्हा वाढले. दर वेळेस वजन कमी झाले की व्यायाम बंद करीत असे, या वेळॆस तसे करायचे नाही हे पक्कॆ ठरवले आहे.
   महिन्याभरात सहा किलो ( उपाशी न रहाता- फक्त गोड, तळलेले , भात सोडून) कमी केले आहे. सुरुवातीला फास्ट कमी झाले, पण नंतर मात्र जास्त मेहेनत करावी लागते. वेट्स, बुलवर्कर, वगैरे रोज करतोच. मला ८० पर्यंत आणायचं आहे.. सध्या आहे ९८ किलो.. 🙂 (१०५ होते एक महिन्या पुर्वी ) बघु या किती दिवस लागतात ते.. 🙂
   ती सुर्यनमस्काराची साईट छान आहे.. धन्यवाद एका जाडीला एका जाड्याकडून.. 🙂 😀

   • swapna says:

    tumhi vachlay ka te mahit nahi, pan “don’t loose your mind, loose your weight” he rujuta divekar cha pustak changla aahe. mala tari khup scientific vatla. nakki kay khaychanahi he kalayla madat hoil.
    baki ti tumhala mumbai madhya pan sapdel mhana tichya clinic madhye.. tichya website var jaun tiche treatmentche rates bagha..
    gham futun thoda vajan kami hoil!!!

    • नाही, अजून् तरी वाचलेले नाही. पण आज शोधतो नेट वर सापडलं की वाचतो.. ॠजुता दिवेकरचा संदर्भ एकदा निरजाच्या पण कुठल्यातरी पोस्ट मधे वाचला होता. शोधतो साईट>
     धन्यवाद.

 20. tejali says:

  काका, एकदम मस्त लिहिलय तुम्ही मुख्य म्हानजे व्यायमच्या मशीन्स बद्दल.माज़ा वॉकर
  पन असाच वापरतीये आई..आनी वाचताना पुं. ल. च्या “उपास” ची आठवन झाली.(mala konitari marathi nit lihita yenar software saanga. plz)

  • प्रत्येकाचा हाच अनुभव असतो. त्यात काही नवीन नाही. माझे अजून तरी नियमीत सुरु आहे सगळे रुटीन 🙂 मराठी निट लिहायला फ्री सॉफ्ट वेअर http://baraha.com या साईट वरून डाउन करून घे..

 21. tejali says:

  काका, एकदम मस्त लिहिलाय तुम्ही मुख्य म्हणजे व्यायामच्या मशीन्स बद्दल.मझा वॉकर
  पणा असाच वापरतीय आई..आणि वाचताना पुं. ल. च्या “उपास” ची आठवन झाली. आणि हो..तुमच वजन लवकाय आटोक्यात याव यासाठी शुभेच्छा..
  ता. क. एक छोटीशी टिप माझ्याकडून: सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून पीत जा….its good for every 1, n even if u add honey in it…may a tea spoon or more..u can substitute for tea..(add half lemon in a glass of water) ..:)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s