आपल्याला बिफ खाऊ घातलं जातय?

बंदुकीच्या गोळीच्या काडतूसावर गाईची आणि डुकरांची चरबी लावल्याने इंग्रजांच्या  सैन्यातल्या  भारतीयांनी केलेला उठाव, आणि तो निस्तरण्या साठी इंग्रजांनी मोजावी लागलेली किंमत सगळ्यांनाच माहीती आहे- थॅंक्स टू अमीर खान – मंगल पांडे बनवल्याबद्दल!

पण जेंव्हा मला हे समजले, की आजही आपल्या देशात प्रत्येकाला त्याच्या नकळत गोमांस/ डुकराचे मांसजन्य पदार्थ वापरून तयार केलेल्या वस्तू   खाऊ घातल्या  जात आहेत, तेंव्हा बसलेला धक्का हे पोस्ट लिहायला घेतले तरीही ओसरलेला नाही . मला पुर्ण कल्पना आहे की हे खूप धाडसी विधान करतोय मी. पण हे अगदी शंभर टक्के सत्य आहे .

भारता मधे मांसाहारी हिंदू लोकांची संख्या भरपूर आहे. पण त्यांचा मांसाहार फक्त चिकन किंवा मटन पर्यंतच मर्यादित असतो- अगदी फारच झालं तर एखाद्या वेळेस ससा वगैरे पण खाल्ला जातो. सांस्कृतिक,धार्मिक, आणि सामाजिक बंधनांमुळे गोमांस खाणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. जर हिंदू मेजॉरीटी असलेल्या देशात जर सामान्य जनतेला त्यांच्या नकळत गोमांस खाऊ घालणे जात असेल तर ते कितपत योग्य वाटते?? मुसलमान लोकं पण पोर्क खात नाहीत, त्यांना पण हे त्यांच्या धर्मात टॅबो असलेले पोर्क एक्स्ट्रॅक्ट खाऊ घातले जाते.

हे कसं काय केलं जात? थोडक्यात लिहतो, कारण थोडा कामात बिझी असल्याने फार मोठं पोस्ट लिहायला वेळ नाही, पण ही गोष्ट   तुम्हा सगळ्यांशी शेअर करणे अतिशय आवश्यक वाटले म्हणून हे लहानसे पोस्ट टाकतोय.

नुकताच एका एक्स्पोर्ट ओरियंटेड ’कॅटलफिड फॅक्टरील” काही कामानिमित्त भेट दिली. तिथे गेल्यावर बऱ्याच नवीन गोष्टी नजरेस पडल्या, जसे “कॅटल फिड” मधे मांस असते, आणि ते बऱ्याच शाकाहारी प्राण्यांना पण खाऊ घातले जाते. तिथल्या मॅनेजरशी बोलतांना हे अयोग्य की अयोग्य -अशी चर्चा सुरु झाली. माझं बोलणं  ऐकून तो हसला आणि म्हणाला, की ’ प्राण्यांना नॉनव्हेज खाऊ घालण्यचं काय घेऊन बसलात साहेब, भारतामधे तुमच्या नकळत तुम्हा सगळ्यांना बिफ/पोर्क एक्स्ट्रॅक्ट्स खाऊ घातलं जातात, आणि ते पण बरेचदा सडक्या मासा पासून तयार केलेलं. आपण जी औषधांची कॅप्सूल्स घेतो, तिचे कव्हर  गाई आणि डुकराच्या चरबी मधे असलेल्या जिलेटीन मधून बनवलेले असते.

जिलेटीन हे गाईच्या/ डुकराच्या कातडीच्या खाली, आणि हाडामधे मुबलक प्रमाणात मिळते. कातडीला गरम पाण्यात बुडवून त्यातले फॅटचे प्रमाण कमी केले जाते. नंतर हाडांचा चूरा करून आणि कातडीचे तुकडे करून ते अर्धा तास २०० डिग्री पर्यंत इंडस्ट्रीयल ड्रायर मधे भाजले जातात. हा चूरा नंतर अल्कली, आणि काही इतर पदार्थ मिळवून पाच दिवस ठेवला जातो आणि नंतर मशीन्स मधे या पासून जिलेटीन एक्स्ट्रॅक्ट केले जाते.  संपुर्णपणे वेस्ट प्रॉडक्ट मधून बनवल्या जाणारे जिलेटीन खूप स्वस्त असते.

कॅप्सूल्स कव्हर्स दोन प्रकारचे असतात-  व्हेज आणि नॉन व्हेज. मग असं असताना नॉन व्हेज कॅप्सूल्स का वापरल्या जातात भारता  मधे? याचं उत्तर आहे किंमत.. व्हेज कॅप्सूल्स कव्हर्स ची किंमत ही नॉन व्हेज  पेक्षा निम्म्याने कमी असते .  व्हेज कॅप्सूल्स मधे जिलेटीन ऐवजी वनस्पतीजन्य जिलेटीन सदृष्य़  वापरला जातो.  अशा प्रकारे  चिंधी चोरी करून पैसे वाचवणाऱ्या औषध कंपन्या डॉक्टर्स लोकांना परदेश वारी, कॉन्फरन्सेस साठी पैसे पुरवताना अजिबात हात आखडता घेत नाहीत.

एखादी गोष्ट नॉन व्हेज असेल तर त्याच्या पॅकिंग वर लाल डॉट द्यावा असा संकेत आहे, तोच संकेत कॅप्सूल्स -गोळ्याच्या ही बाबतीत आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे एखादी वस्तू नॉनव्हेज आहे एवढेच सांगणे पुरेसे आहे का- की त्यामधे गोमांस वापरलेले नाही हे डिक्लीरेशन द्यायला हवे ? हा प्रश्न तर खूपच महत्त्वाचा आहे,पण  ज्या कडे सगळे नेते लोक पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.

केवळ बंदुकीच्या गोळीच्या काडतूसांना गोमांस चरबी लावली म्हणून इंग्रजांना ज्या प्रकारे जन रोषाचा सामना करावा लागला, तसा पुन्हा कॉंग्रेस सरकारला करावा लागेल का? की स्वातंत्र्यानंतर आलेलं आणि गेल्या काही वर्षात जोपासलेलं  मानसिक षंढत्व कुरवाळत जनता गप्प बसेल??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

108 Responses to आपल्याला बिफ खाऊ घातलं जातय?

 1. Gayatri says:

  Thank you very much for such useful piece of information

 2. बाप रे..धक्कादायक आहे हे एकदम… 😦
  पण हे असा आपल्याइथे होतय आणि कोणी काहीच कस नाही बोलल ह्याबद्दल.. आश्चर्य आहे..
  अजुन सविस्तर लिहा ना काका ह्यावर…

 3. Ashwini says:

  shocking…jellies sadrusya sweets mahit hite pan aushdhe sudhha…omg

 4. Shankar says:

  Thanks! kharach tumhi far mahatwachi post keli ahe

 5. Raj Jain says:

  बाप रे..धक्कादायक आहे हे एकदम…

 6. हे खुप धक्कादायक आहे…मला प्रश्न पडलाय एवढ सर्रास चालु असुनही याची प्रशासनाला माहिती कशी नाही??? की तिथे पण अर्थपुर्ण मौन आहे.

 7. Hemant Pandey says:

  महेंद्र काका!
  अगदी १०० टक्के बरोब्बर लिहिले आहे तुम्ही.
  याच गोष्टीवरून एक आठवलं. नुकतेच मी एका मित्राच्या ओळखीच्या व्यक्तीकडे असलेल्या, २४० जर्शी गायींच्या गोठ्याला भेट देवून आलो. अत्यंत आधुनिक पद्धतीने सर्व सोपस्कार केले जातात. दुध काढण्या पासून ते शेणसफाई पर्यंत अद्ययावत यांत्रिकी पद्धतीने केले जाते. कौतुकाने त्याच्याकडील नवीन पैदास पण दाखविली. सहज लक्षात आले म्हणून त्याला विचारले कि या नवीन वासरांमध्ये मला सगळ्या पाडी (Female ) दिसत आहेत गोऱ्हे (small bull) एकही नाही? त्यावर तो उत्तरला आम्ही ते हॉटेल वाल्यांना १००० ते १५०० रुपयांना विकतो, त्यांचा हा एजंट. तेंव्हा तू जर एखाद्या हॉटेल मध्ये मटण अथवा बिर्याणी मागव्लीस तर दचकू नकोस! मी त्या एजंटला मुद्दाम विचारले कि लोकांना खाताना चावी मुळे कळणार नाहीका कि आपण खातोय हे दहा नंबरी आहे? त्यावर त्याने दिलेल्या उत्तराने मी कमालीचा हैराण व अस्वस्थ झालो. तो म्हणाला कि शेळी मेंढी वासरू व लहान अर्भके एकाच चवीच्या टप्प्यात आहेत! जबतक खाने वाले है! तबतक खिलाने वाले है! एवढे बोलून त्याने माझा कायमचा बोल्ड घेतला.

  • हेमंत
   दावणीला बांधलेले म्हशीचे रेडकू नेहेमी दिसतात जोगेशवरीला. असं पिलू उन्हात बांधून त्याला खायला प्यायला काही देत नाही, मग ते पिलू दोन दिवसात मरते.. हे मी ऐकलं होतं. पण हॉटेलला विकतात ही एक नविन माहीती.
   या पुढे मटन खातांना विचारच करावा लागेल.
   माहीती साठी आभार.

 8. Kiran says:

  I guess you meant to say that veg covers are expensive than non-veg covers and hence companies use non-veg covers instead of veg covers. But I think what you have written about costs of these covers is not in tune with this intended meaning.

 9. भयंकर आहे. काही गोष्टीत अडाणी असलेलं बरं ते अश्यासाठीच.
  @मनमौजी – अर्थातच तिथे पण अर्थपुर्ण मौन आहे.

 10. हे खरंच खूप धक्कादायक आहे.
  ही सगळी माहिती पुरविण्यासाठी धन्यवाद…

 11. यामुळे फक्त आपल्या माहितीत भर पडेल. थोडे दिवस आश्चर्य वाटेल. action मात्र कुणीही घेणार नाही. आपण कॅप्सूल्स खाणेही सोडणार नाही आणि कंपनी प्रोडक्शन मध्ये बदलही करणार नाही.

  • विशाल, राजेश, सिध्दार्थ, नागेश
   प्रतीक्रियेसाठी आभार..
   थोडे दिवस ही गोष्ट हॉंटींग करत राहील आणि नंतर कदाचित आपण विसरून पण जाऊ . पण तरीही बॅक ऑफ द माइंड रजीस्टर होईल कुठेतरी.

 12. sudhir keskar says:

  हे जर खरच असेल तरधक्कादायक आहे, ह्या बाबताचा परदाफाश होण्यासाठी हा विषय आपण मेडीया कडे द्यावा,
  सरकार वर विश्वास नाही. [Food and Drug Department }

  • फुड अ‍ॅंड ड्रग डिपार्टमेंट चा काही आक्षेप नसावा.. मुस्लीम देशात हलाल जनावरांपासून तयार केलेले कॅप्सूल कव्हर चालते, किंवा सरळ व्हेज कव्हर वापरणे कम्पल्सरी आहे.

 13. Ninad says:

  chalata hai attitude mule aaj hi sthiti ahe. Mi Food processing madhe involved ahe. Tithe kay chalte he jar kalle tar pushkalsha goshti apan khanarach nahi

  • निनाद
   चलता है अटीट्य़ूड मुळेच प्रॉब्लेम आहे… नाहीतर कोणाची इतकी हिम्मत झालीच नसती.

   • uttara sumant says:

    hyawar kahi upay nahi ka?

    • उत्तरा
     ब्लॉग वर स्वागत.. आहे ना , उपाय आहे, कॅप्सूल मधलं औषध काढून पाण्यात मिक्स करून घ्यायचं..

    • उत्तरा
     ब्लॉग वर स्वागत.. आहे ना , उपाय आहे, कॅप्सूल मधलं औषध काढून पाण्यात मिक्स करून घ्यायचं.. वरच< कव्हर फेकुन द्यायचं

    • उत्तरा
     ब्लॉग वर स्वागत.. आहे ना , उपाय आहे, कॅप्सूल मधलं औषध काढून पाण्यात मिक्स करून घ्यायचं.. वरच< कव्हर फेकुन द्यायचं

 14. स्नेहल says:

  बाप रे काका 😦 हे काय होतेय?????? आता पासून औषधे पूर्णपणे वर्ज्य……… GO GREEN

  • औषध सोडून कसे चालेल? आपण हे असे बिफ जनरेटेड प्रॉडक्ट्स औषधामधे वापरू नये म्हणून प्रयत्न करायला हवा..

 15. sahajach says:

  भयानक आहे हे सगळं…. सर्वथा: विश्वासघात शिकायचा असेल तर या लोकांकडून शिकवण्या घेतल्या पाहिजेत… कसलाही आणि कुठलाही नियम पाळायचाच नाहीये कोणालाच… भयंकर…..

 16. Harshal says:

  Are baap re!! Ghya Ho Kahitari Action!!!

 17. Nachiket says:

  औषधांवरही लाल गोल असतो.

  शिवाय महेंद्रजी, तुम्ही वर्णन केलेला प्रकार “बीफ खाऊ घालणे” यात मोडतो असे वाटत नाही. कॅप्सुलच्या कव्हरपर्यंतच तुम्ही विचार करता आहात. प्रत्यक्ष औषधांमधे प्राण्यांच्या ग्रंथींपासून काढलेली एन्झाईम्स, रक्ताच्या साक्यापासून (प्लाझ्मा) काढलेले व्हॅक्सिन, हाडांपासून मिळालेले कॅल्शियम आणि असे अनंत काहीकाही असते. ते सर्व केमिकल प्रोसेसने आयसोलेट करुन काढलेले असते. आणि जीवनावश्यक असते.

  ..गोमांस खायला घातले असा अर्थ नव्हे.

  होमीओपॅथीत तर प्राण्यांचा पू, सडके मांस, त्यावरील बुरशी, विष्ठा इ इ सुद्धा मूळ टिंक्चर बनवताना वापरतात. त्याला काय म्हणाल? घेतोच ना गोड गोड गोळ्या ? 🙂

  इतर मांस चालते तर गोमांस का नको हा भावनिक प्रश्न झाला आणि त्यामुळे तो वैयक्तिक बनतो. तो न काढणे रास्त आहे.

  • नचिकेत
   औषधांमधे गाईच्या किंवा डुकराच्या चरबीपासून वापरलेले कव्हर्स नसावे अशी रास्त अपेक्षा आहे. मुस्लीम देशात फक्त व्हेज कव्हर्स असलेल्या कॅप्सुल्स वापरतात ( तिथे पण हलाल कॅप्सुल्स बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत)

   तसं म्हंटलं, तर आपण व्हेजन नाही, त्यामुळे गाईचे दूध, तूप वगैरे खातोच . तो प्रश्न निराळा. पण डायरेक्ट स्किन पासून आणि हाडांपासून तयार झालेला पदार्थ खाणे बुद्धीला पटत नाही- कदाचित हे संस्कारामुळे असेल , पण तसे आहे.

   एन्झाइम्स , व्हॅक्सिन्स आणि कॅप्सूल्स ह्या दोन्ही गोष्टींकडे निरनिराळ्या नजरेने पहावे लागेल. पूर्वी जॆंव्हा इंग्रजांनी बिफ/पोर्क फॅट लावलेले काडतूस वापरले होते, तेंव्हा त्यांना पण ऑप्शन अव्हेलेबल होताच, पण हे स्वस्त पडायचे म्हणून वापरले जायचे. इथे जर मनात आणले तर व्हेज कॅप्सुल्स वापराचा कायदा केला जाऊ शकतो. किमती मधे फक्त १५ ते १८ पैसे फरक पडेल.

   • thanthanpal says:

    काका .१५ पैसे म्हटलं तरी भारताच्या लोकसंख्येच्या मानाने ही रक्कम प्रचंड होते. एक कॅप्सूल माणशी धरली तरी रोज
    १५ कोटी X ३६५ दीवस बरोबर वर्षाला आपण ५४७५ कोटी रुपयांना लुबाडले जात आहोत. कारण या कंपन्या कांही साधू संत नाहीत की त्या .१५ पैसे कमी खर्च आला म्हणून तुमच्या गोळीची तेव्हढी किमत कमी ठेवतील. आणि आज साधू सुद्धा रावणाला लाज वाटेल असे वागू लागले आहेत. त्याने कमीतकमी सीतेला तीच्या मर्जी विरुद्ध हात तर लावला नाही. पण आजच्या सीता या संन्याश्यांच्या वासनेला बळी पडत आहेत. थोडे विषयांतर झाले पण राहवले नाही म्हणून लिहिले. प्रसिद्ध करण्याचा नाकारण्याचा आपणास अधिकार आहे.

  • आल्हाद alias Alhad says:

   “इतर मांस चालते तर गोमांस का नको हा भावनिक प्रश्न झाला आणि त्यामुळे तो वैयक्तिक बनतो. तो न काढणे रास्त आहे

   🙂

   Nachiket,
   You said what I was thinking but did not know how to put in words…

  • greenmang0 says:

   “…..पण डायरेक्ट स्किन पासून आणि हाडांपासून तयार झालेला पदार्थ खाणे बुद्धीला पटत नाही- कदाचित हे संस्कारामुळे असेल , पण तसे आहे…… ”

   मला वाटते तुम्ही इथे चुकीचा शब्दप्रयोग केला आहे. बुद्धी या शब्दाऐवजी “मन” हा शब्द वापरावयास हवा.

  • greenmang0 says:

   प्रतिसाद आवडला.

  • greenmang0 says:

   ्@ नचिकेत – प्रतिसाद आवडला.

 18. thanthanpal says:

  आपण अश्या देशात राहतो जेथे नागरिकांच्या जीवाशी,भावनांशी कंपन्या नव्हेच तर शासन सुद्धा राजरोस खेळते. जागतिककरणाच्या आणि महासत्ता बनण्याच्या हव्यासापोटी कोणतेही कायदेकानून न पाळता जनतेच्या आयुष्याला धोका निर्माण करणारे प्रचंड प्रकल्प सत्तेच्या जोरावर जनतेचा आवाज दडपून, त्यांनाच देशद्रोही ठरवून रेटले जात आहेत .वीज टंचाई चे जाणूनबुजून निर्माण केलेलं भूत आहे. भारता पेक्षा पाशिमात्यांचा परकीय देशाला फायदेशीर असे करार केले जात आहे. आदीवासींच्या जमिनी हडप करून आपल्या पापावर पांघरून टाकण्या साठी सेन सारख्यानाच तुरुंगात डांबून जनतेचा आवाज दडपण्यात येत आहे. READ MORE
  http://www.thanthanpal.blogspot.com

 19. Vinay says:

  ही खरंच धक्कादायक गोष्ट आहे. पण ह्या बद्दल सरकारचे काही निकष आहेत का? आणि असतील तर ते पाळले जात नाहीयेत.

 20. खरच धक्कादायक माहिती आहे ही….

 21. अभिजित says:

  >>व्हेज कॅप्सूल्स कव्हर्स ची किंमत ही नॉन व्हेज पेक्षा निम्म्याने कमी असते .
  वाक्य उलटे झाले का?
  माहिती बद्दल आभारी आहे पण नचिकेत च्या मताशी सहमत.

 22. अजय. says:

  एक छान विचार करायला लावणारी पोस्ट.
  आपण फक्त निषेध करत बसण्यापेक्षा अधिक काही करायला हवे.
  कॅप्सुलला अशी कव्हर वापरणार्‍या कंपन्यां विरुद्ध आपण काही मोहिम आखु शकतो का ? कि हा आजचा चघळायचा मुद्दा आहे ?

 23. Pingback: आपल्याला बिफ खाऊ घातलं जातय? | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 24. हे अतिशय धक्कादायक आहे हे खरंच.. पण तरीही नचिकेतशी काही प्रमाणात सहमत..

  • हेरंब
   जर एखाद्याला खायचं असेल तर अवश्य खाऊ द्यावं, पण एखाद्याच्या नकळत ते नसावं असं वाटतं..

 25. महेश says:

  माहिती दिल्याबद्दल आभारी ,छानच माहिती आहे, धक्कादायकच आहे, व सरकारने योग्य तो विचार करावा

 26. हे पोस्ट लिहिण्याचा मुळ उद्देश हा की भारतामधे बहूसंख्य हिंदू रहातात आणि आजही ते गोमांसावर प्रक्रिया करून बनवलेले पदार्थ खाणे निशिध्द समजतात.
  जर लाइफ सेव्हिंग ड्रग मधे गोमांस वापरले तर ते एकवेळ समजू शकतो, पण सरसकट सगळ्याच औषधांच्या कॅप्सूल्स मधे गोमांस प्रक्रिया करून वापरणे, ( आणि ते पण, जेंव्हा की ते टाळणॆ सहज शक्य आहे ) हे मला खटकले.
  मुस्लीम देशात अजूनही हलाल च्या कॅप्सुल्स वापरतात, ते इतके कट्टर आहेत, पण आम्ही खूप सहजतेने घेतो प्रत्येक गोष्ट म्हणुन असेल की औषध कंपन्या पण सरळ दुर्लक्ष करतात तुमच्या आमच्या कडे.

  गोहत्या प्रतिबंधक कायद्या बद्दल न बोलणेच योग्य. वरची हेमंत पांडेची कॉमेंट वाचली , आणि खूप वाईट वाटलं. या पुढे कुठल्याही हॉटेलात मटन खाण्याची इच्छा होणार नाही हे नक्की.

  एखद्या हिंदूला हेतूपुरस्सर बिफ पासून तयार केलेला पदार्थ खाऊ घालणे मला तरी योग्य वाटत नाही. यावर अर्थात कोणी काही अ‍ॅक्शन घेणार नाही, कारण “अर्थकारण”…
  असो..

 27. अश्विन जाधव says:

  काका,
  पोस्ट खूपच चांगली आहे पण एवढा विचार करण्या सारखी नाही हि गोष्ट असे मला तरी वाटते ,
  कारण यामध्ये गोमांस वापरले गेले आहे म्हणूनच आपल्याला राग आला आहे!!!!! हे निश्चित मला तरी वाटते .यामध्ये कोंबडीचे मांस किंवा बकरीचे मांस वापरले असते तर आपल्या प्रतिक्रिया याच स्वरूपाच्या असत्या का? हाच प्रश्न मला इथे मांडायचा आहे.
  आपण अजूनही किती धर्माला चिकटून आहोत यावरून हे स्पष्ट होतेच आहे.
  औषधे तयार करताना अशा बर्याच प्रक्रिया मधून जावे लागते.vaccine निर्माण प्रक्रिया मध्ये आपण तर असंख्य असे bacteria /viruses स्वतःच्या शरीरामध्ये घेत असतो. आणि याच मूळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.
  तेव्हा अशा बारीक सारीक गोष्टींचा बाउ करण्यात काही अर्थ नाही आहे.
  आपल्याकडे सध्या घोटाळे,भ्रष्टाचार हे विषय गाजत असताना या गोष्टीचा विचार शक्यतो टाळावा.
  आणि १८५७ चा उठाव हा या चरबी प्रकरणामुळे झालेला नाही आहे याची सुद्धा दाखल वाचकांनी येथे घ्यावी.

  • अश्विन
   ब्लॉग वर स्वागत.
   जर कोंबडीचे आणि बोकडाचे मांस वापरले असते, तर इतका राग आला नसता ही सत्यस्थिती आहे, कारण आपल्याकडे इतर प्रकारचे मांस हे खाद्य म्हणुन वापरले जाते.
   धर्माला चिकटून असणे यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही.
   मुसलमान लोकांना पोर्क खाऊ घालू शकाल का? ते जितके कट्टर आहेत तितके आपण नाही हे नक्की.
   आपण फारच लिबरल आहोत, उद्या आपल्या घरात गाईचे मांस पण शिजू शकेल, जर आपण इतकं कॅज्युअली घेत गेलो तर.

   इथे गोमांस वापरणे टाळता येऊ शकते. व्हेज कॅप्सुल्स वापरल्या जाऊ शकतात. असे असतांना सगळ्या हिंदूना गोमांसातून तयार केलेल्या कॅप्सूल्सच खाऊ घालण्याचा अट्टाहास मला समजलेला नाही. जसे अरब देशात कोशर, हलाल कॅप्सूल किंवा फक्गत व्हेज कॅप्सूल्स वापरतात, तसे भारतात का नको?? आपल्या धर्माची जर आपल्यालाच चाड नसेल तर इतरांना तरी का असावी??

   एखाद्या लाईफ सेव्हींग ड्रग मधे जर गोमांस वापरणे अनिवार्य असेल तर त्याला आक्षेप नाही, पण गरज नसतांना मुद्दाम वापरायचा असे का??

  • thanthanpal says:

   तेव्हा अशा बारीक सारीक गोष्टींचा बाउ करण्यात काही अर्थ नाही आहे. हे म्हणणे साफ चूक आहे. आपण अश्या बारीक सारीक गोष्टीं कडे दुर्लक्ष्य करतो म्हणूनच घोटाळे,भ्रष्टाचार , बेईमानी, भूखंड ,शिक्षण माफिया भारतात निर्माण झालेत. आणि आता तर ते स्वार्था साठी शासनालाच ब्लकमेल करत आहेत हे लवासा, स्पेक्ट्रम आदर्श, डॉक्टरांची कट प्रक्टिस या घोटाळ्या वरून दिसून येईल

 28. प्रज्ञा says:

  हं! जिलेटिनचा सोर्स नॉनव्हेज असतो याची कल्पना होती. पण ते गाईपासून मिळवलं जातं हे मात्र माहित नव्हतं हं!

  मला असाच धक्का काही वर्षांपूर्वी बसला होता. आपण जे चीज खातो ना, ते बनवितांना पूर्वी काय वापरत असत माहितेय? काफ रेनिन. म्हणजे गाईच्या वासराच्या पचनसंस्थेतील एक विकर. अर्थात ते मिळविण्यासाठी वासरांची हत्या करावी लागे. हे अभ्यासल्यानंतर मी खूप त्रास करून घेतला होता स्वत:ला. कारण मी तेंव्हा मी वजन वाढविण्यासाठी नियमित चीज खात असे.

  सध्या मायक्रोब्सपासून मिळवितात म्हणे रेनिन.

  • बापरे! हे काय नवीनच समजतंय.. मला वाटतं की अशा बऱ्याच गोष्टी असाव्यात ज्याबद्दल आपल्याला माहीती नसते.
   आता शोध घेतो नेट वर चीझ मॅन्युफॅक्चरींग प्रोसेस..

 29. atul avinash ranade says:

  Myself Atul Ranade & I’m a diploma Engineer in Electronics & communication. & working for an Indian MNC.

  I have been reading your posts for some time. but this the first time I am giving a comment.

  Thanks for giving this useful information I was working with one pharmacuitical company previously. But I was not aware of this thing.

  Now we need to follow our own ayurvedic preparations (KADHA,CHURNA ETC)

  Thanks for this valuable information.

  as this is my comment pls bare with me for any mistakes I have made.

  • अतूल
   ब्लॉग वर स्व्वागत.. आणि प्रतीक्रियेसाठी आभार. गेले दोन दिवस थोडा बिझी असल्याने उत्तराला वेळ झालाय . क्षमस्व!

 30. Mandar Karanjkar says:

  बीफ खाणे न खाणे हा व्यक्तिगत निर्णय आहे. त्यामुळे, नकळत खाऊ घालणे हि गोष्ट अतिशय चुकीची आहे. कोणी स्व-खुशीने खाणे वेगळे आणि कोणाला नकळत खाऊ घालून श्रद्धेला तडा देणे वेगळे. नकळत बीफ काहु घालणे कदापि समर्थनीय नाही…

  • मंदार
   माझं पण नेमकं हेच म्हणणं आहे.. धन्यवाद.

  • greenmang0 says:

   पण जर एखादा माणूस मृत्युपंथाला लागला असेल आणि गाईच्या जिलेटीन पासून बनणारी गोळी त्याचे प्राण वाचवणार असेल तर? इथे तुमची श्रद्धा आडवी येईल का?

   • अभिषेक
    ब्लॉग वर स्वागत.
    मी वर कुठेतरी प्रतिक्रियेमधे लिहिले आहे, की जर एखादा लाइफ सेव्हिंग ड्रग मधे हे वापरणे अनिवार्य असेल तर त्याला कोणीच आक्षेप घेणार नाही.मी पण नाही. पण केवळ पैसे कमी पडतात म्हणुन लोकांना त्यांच्या नकळत हे खाऊ घालणं काही पटत नाही मला.
    प्रतिक्रियेसाठी आभार..

 31. Rajeev says:

  Lipstick is also made from some insects i suoppse !!!!!

 32. Smita says:

  I tend to agree with Heramb ( this is not exactly beef/ pork- because it’s not in meat form) but I agree with you that this should be made explicit.

  • स्मिता
   स्किन खाली असलेल्या फॅट मधून मिळवलं जातं , तेंव्हा त्याला बिफ जरी म्हणता येत नसलं टेक्निकली), तरीही मी स्वतः नॉनव्हेज खात असलो , तरी इच्छा होणार नाही. कदाचित जूने संस्कार असतील म्हणून असेल.

 33. Amit says:

  एवढचं काय! मी पण शाकाहारी आहे. गेल्या वर्षी आम्ही डेल्टा एअरलाईन ने जात असताना त्यांनी न्याहरीसाठी दिलेल्या दह्यामधील पॅकींगवर असलेल्या ingredients वर लक्ष गेलं त्यात जिलेटीन दिसल्यावर ही गोष्ट विमानातील मेन क्रू च्या निदर्शनास आणून दिली त्याला ही बाब हिंदू आणि जैन धर्मींयासाठी किती गंभीर आहे आणि त्याच्या परिणामांची जाणीव करून दिली. त्यावर असे कळाले की ब-याच अंतरराष्ट्र्रीय विमानसेवा(पाश्चिमात्य विमानसेवा कंपनीज), विमानात जेवणासाठी/न्याहरीसाठी जे पॅकींग असलेले दही देतात त्या बहुतांशी ब्रॅंडच्या दह्यामध्ये जिलेटीन असते . पण दुस-या वेळेस (गेल्यावर्षीच) त्यांनी तो पुर्वीचा दह्याचा ब्रॅन्ड बदललेला दिसला. आज-काल ते भारतीय ब्रॅंडचे दही देताना दिसले. त्यामधे जिलेटीन नव्हतं.

  The average person accidentally eats 430 bugs each year of their life
  (Source: http://listverse.com/2007/12/19/top-20-amazing-science-facts/)

  • अमीत
   आपल्याइथे मला वाटत नाही ते शक्य्होईल म्हणून.. पण म्हणून काही प्रयत्न करणे सोडू शकत नही आपण ..

 34. Smita says:

  @Pradnya: additional information: renin is found only in an unweaned calf- so it si really really a young one that gets killed. I could not help getting disturbed. Of course now thye use things liek guar gum and other plant based agents to amke cheese..

  Mahendrajee, ‘pratuttar’ disat nahiye naveen design zalyapasun

  • स्मिता
   दोन दिवस खूप कामात होतो, म्हणून वेळ झाला नाही. उद्यापासून नागपूरला आहे तिन दिवस. म्हणजे पुन्हा नसेन ऑन लाईन.. 😦

   • Smita says:

    Mahendrajee, mee tumchya utaarabaddal nahee tar ‘pratuttar’ ya ‘local’ link/ button baddal mhaNat hote, Pradnyala uttar dyayacha hota aNee kuThe disat navatee link, aaj sapadalee. of course I relaize, you cannot always reply instantly due to work and travel related to work!

    • ओह… माझ्या लक्षात आलं नव्हतं ते.. 🙂
     पण एक आहे,बहूतेक रात्री थोडा वेळ तरी नेट वर येऊन सगळ्या प्रतिक्रिया वाचून जातो.

 35. प्रज्ञा says:

  I agree with you Smita. It is miserable.

  पाश्चात्य देशांमध्ये गाई व त्यांची वासरं हा कच्चा माल असतो. पण आपली संस्कृती ‘वृक्ष वल्लींना’ सोयरे समजते तर गाईला देव. आपले संस्कार व आपली भावनिक जडणघडण वेगळ्याच मुशीतून होत असते. म्हणून आपल्यासाठी हा चर्चेचा विषय होतो.

  (आमचे माळीबुवा तर बागेतील तण म्हणून उगवलेले तुळशीचं रोप सुध्दा काढू देत नाहीत.)

  तरी सुध्दा एका आईचं अंगावर पिणारं अर्भक मारायचं. त्याच्या पोटातील विकर मिळवायचं. त्या विकरानं चीज बनवायचं. ते आपण खायचं. आपलं वजन वाढवायला. यामुळे मला फार अपराध्यासारखं वाटलं तेंव्हा.

  • Smita says:

   right. Pradnya, mala vaTata ya blog cha karaN hee sanskar hech ahe aNee var Mahendrajeenee mhanalyapramane, maheet nasatana apalyakadun he khalla jatay hee goshta kunalach avadaNar nahee.

   parat vichar kelyavar vatala: We are a desensitized society. systematically desensitized to easily give up our rights, values… kahee lok ya blog writers sarakhe ahet mhaNun apUn nidan jagaruk taree hoto, naheetar aja kal swata: , spouse, mazee mula, maza weekend ya palikade jayala kahee will naheech ahe!:-(

 36. greenmang0 says:

  मी तुम्हाला “हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ” या “भालचंद्र नेमाडे” यांच्या पुस्तकातील एक परिच्छेद सांगतो

  “…. तरी माझ्यावर रोज संध्याकाळी म्हशीचं रेडकू पाजायचं काम आलं. एवढा धडधाकट टोणगा, तो मला सारखा ओढून आपल्या निसर्गदत्त हक्काच्या आईच्या आचळाकडे ओढून न्यायचा. रेड्यांना नुस्तं ताक पाजत पाजत शेवटी मारून टाकायचं, हा कृषिसंस्कृतीतला अलिखित अहिंसक कायदा. म्हैस विल्यापासून पहिले तीन दिवस पिलासाठी दांडगाई करणाऱ्या आईला अडसण लाऊन तिचा सगळा चीक खरवसासाठी पिळून घ्यायचा. रेडकू बाजूला पडलेलं ठेवायचं. म्हशीने फक्त त्याला चाटायचं. नंतर चिंधीच्या बोळ्याने पाणचट ताक पिऊन पिऊन तो मेल्यावर थोट्या चांभाराकडून त्याच्या कातड्याचं पोतं करून घेतलं, तिच्या समोर उभं करून ठेवलं, की त्याच्याकडे पाहत म्हैस पाह्ना सोडत राहते. अशा क्रूर मार्गांनी कुणबी संस्कृती गेली दहा हजार वर्षं मानवी समाजाला अहिंसेचं मृगजळ पाजत आली आहे. आणि सगळेजण म्हणतात, टोणगे वाचतच नसतात हो. बिनागरजेचे टोणगे. हेच हक्काचे सड त्याच्या तोंडाला लागू नये अशी ही व्यवस्था. राम कृष्ण हरी…..”

  थोडक्यात आपण वासरांच्या हक्काचं दूध पितो. त्याचप्रमाणे आजकाल यंत्राने दूध काढतात. यंत्र गाईच्या आचळाला लावलं की गाईला “लुचलं”जाण्याच्या संवेदना होतात आणि ती दूध देते. मग हे दूध पिणं आपण सोडून देणार का?

  पंचामृतातील एक “मध”. हा मध काढताना मधमाश्यांची अंडी त्यास मिसळली जातात. म्हणून मध वापरणे आपण त्याज्य ठरवणार का?

  बंदूकीच्या गोळ्यांची काडतूसे आणि औषधाच्या गोळ्यांची आवरणे यात फरक आहे. काडतूसे दाताने काढल्याने माणसाचा जीव जात नाही पण औषधाची गोळी न घेतल्याने नक्कीच जाउ शकतो.

  कोंबड्यांचे मांस रुचकर लागावे म्हणून जिवंत असताना त्यांना विविध प्रकारची औषधे दिली जातात. आणि पदार्थ खाऊ घातले जातात. हे पदार्थ आणि औषधे सुद्धा इतर प्राण्यांच्या अवयवापासून बनवलेली असतात. तरी चिकन तंदूरी आपण चवीने खातोच ना?

  अशा कितीतरी गोष्टींपासून आपण अजूनही अनभिज्ञ आहोत.

  आणि गोमांस खाल्ल्यामुळे भ्रष्ट होण्याइतका हिंदू धर्म तकलादू असता तर इतकी हजार वर्षे मुळीच टिकला नसता.

  • Smita says:

   Impressed with the clarity of this narration.

   I think : The point is about making an informed decision regarding whether or not we want to accept the practice . Not informing people about contents of a medicine is wrong in any case. They wouldn’t dare do this in any other country .

  • मला व्हेज व्हर्सेस नॉन व्हेजचा मुद्दा इथे अपेक्षित नव्हता. जगातले जवळपास ९७ टक्के लोकं नॉन व्हेजीटेरीअन आहेत.
   म्हशीचा पान्हा सोडण्यासाठी मेलेल्या रेडकाचे डोके कापून तिच्या पान्ह्याला लावण्याची पण पद्धत गुजरात मधे पाहीलेली आहे.

   स्मिताजींनी वर लिहिल्या प्रमाणे फक्त कंटेंट्स काय आहेत ते ओपनली सांगावे, म्हणजे ज्याला घ्यायचे तो घेईल नाही तर दुसरा त्यातली औषधी पावडर वेगळी करून घेईल. लोकांना फसवून खाऊ घालू नये एवढंच सांगायचंय.. 🙂
   धर्म भ्रष्ट वगैरे संकल्पना इथे मांडलेली नाही आणि मला अपेक्षित पण नाही. पण धर्माचे असलेले इनहरंट संस्कार आपल्याला बऱ्याच गोष्टी करू देत नाहीत, आणि बिफ न खाणे ही पण त्यातलीच एक!!

 37. मी थोडंफ़ार ऐकून आहे त्यामुळे धक्कादायक वाटलं नाही.
  आयुर्वेदातही प्राण्यांचे शरीराचे अवशेष वापरले जातात.

  आणि गाय व बैल हे जनावर/प्राण्यातच मोडतात. त्यासाठी गायीला वेगळा दर्जा/वर्गीकरन केले तरच हे टळू शकेल.

  • गंगाधरजी ,
   गोवंश बंदीचा कायदा आहेच.. अजून किती कायदे करणार- हा पण एक प्रश्न आहेच..

 38. Ek Number! Atishay changali chaprak dili aahe tumhi tumachya likhanatun Sarkarla!!

 39. Nachiket says:

  @Smita.

  Quoting:
  “Not informing people about contents of a medicine is wrong in any case”

  .. जिलेटिन, साखर, मीठ, इन्सुलिन, रेनिन अशी घटकांची नावं पॅकिंगवर दिली जाऊ शकतात आणि दिली जातातही.

  कंटेंट्स या शब्दाची तुमच्या मते डेप्थ काय? प्रत्येक इन्ग्रेडिएन्टचे मूळ कच्च्या मालापर्यंतचे सर्व उपपदार्थ, प्रक्रिया आणि बाय प्रॉडक्टस छापायची का?

  म्हणजे
  -> इन्सुलिन्-एक्स रसायनापासून-

  -> ते एक्स रसायन = वाय + झेड मिसळून आणि उकळून-

  -> ते झेड हे रसायन बनवताना वापरलेले घटक, अमुक या प्राण्याचे स्वादुपिंड+ पाणी+ अल्कोहोल..

  —> अल्कोहोल बनवायला उसाची मळी

  इ इ.

  हे असे मालाडचा म्हातारा टाईप गाणे लिहणे प्रॅक्टिकली शक्य आहे का ? आणि आवश्यकही?

 40. Nachiket says:

  स्मिताजींच्या प्रतिक्रियेवर अजून पुढे:

  औषधांच्या आवरणात किंवा अन्य घटकांत थेट बीफ असेल तर तसा उल्लेख असावा.

  औषधांचे आवरण किंवा अन्य घटक बनवताना प्रोसेसमधे कच्चा माल म्हणून कुठे बीफ असेल तर तसा उल्लेख असावा. (लाल ठिपका) हिदूंसाठी.

  बीफ नसेल आणि इतर सामान्य खाद्य प्राण्याचे (बकरा, मेंढी इ) मांस, यकृत वगैरे असेल तर तसा उल्लेख असावा (तपकिरी ठिपका)

  पण त्यात डुक्कर असेल तर तसा उल्लेख असावा (काळा ठिपका) मुस्लिमांसाठी.

  मग हलाल किंवा हराम यापैकी ज्या पद्धतीने प्राणी मारला त्याचा उल्लेख असावा (मुस्लिम, ज्यू वगैरेंसाठी)

  यातील काही नसेल तर मग व्हेज घटक आहेत असे धरु.

  व्हेज वेष्टनांवर हिरवा ठिपका असावा.

  पण त्या व्हेज प्रक्रियेत कुठे लसूण, कांदा किंवा जमिनीखालील कोणताही ट्यूबर, रूट ( बटाटा इन्क्लूडेड) असेल तर त्यावर अजून एक तसा उल्लेख करावा (जैनांसाठी) हिरव्या गोलात “जे” आद्याक्षर.

  🙂 भावनांसाठी काय काय करणार ? ही औषधं आहेत.

  असो.. गंमत म्हणून इम्प्रॅक्टिकलनेस दाखवण्यासाठी लिहिलं.

  ज्यांना हवं त्यांच्यासाठी औषध कंपन्यांनी वेगळी गाईड उपलब्ध करावीत ज्यात लूक अप करून ज्याला हवे तो ती माहिती पाहू शकेल. वेष्टनावर सर्व देणे याला लिमिटच राहणार नाही.

  • greenmang0 says:

   “……ज्यांना हवं त्यांच्यासाठी औषध कंपन्यांनी वेगळी गाईड उपलब्ध करावीत ज्यात लूक अप करून ज्याला हवे तो ती माहिती पाहू शकेल. वेष्टनावर सर्व देणे याला लिमिटच राहणार नाही……”

   पटले. 🙂

  • Smita says:

   wrapper var sagaLa deNa shakya nahee he manya ahe, puN tumhee mhanata tasa ‘look up’ karayachee taree vyavastha kinva at least ‘will’ ahe ka sadhya?

   aNee rangeet thipake kasale detay??:-) atishayokteela kahee limit???!!!!!:-):-)

   contents chee depth evadheech ka atomic number, weight , periodic table cha row, column puN devuyat mug:-) Kayvatelte challay!!!:-)

 41. Nachiket says:

  @ Smitaaji.

  hehehe 🙂 🙂

 42. Nachiket says:

  @ Mahendraji.

  Please Template change karaa ho.

  2-3 vegavegaLyaa PC / laptop var try karunahee majakoor ekikaDe, chitre ekidade. kaahee pratikriyaa post majakuravarch overlap. Uttar dyaa chaa option ch naahee asale kaay vatel te chaaloo aahe ho. ekdam unreadable.

  poorveecheech chaangale hote.

 43. Sneha says:

  Mahendra kaka,me Tumche sarva blog 5 diwasa madhye sampurna vachun kadhale.aata kuthe bar vatatey.kharach me tar tumchya blogchi fan jhali aahe.vachun jhyavar asa vatate aahe ki me tumhala khup diwasanpasun olakhat aahe.actually Tumche blog vachatana me ekatich khup hasat asate.Karan aamache he Tamil ani me marathi tyamule mala tyala sapurna translate karun sangava lagta.anyways hats off.keep doing the good work.vaat Pahat aahey tumchya navin post chi.jhara khanya baddal aani intercast love marriage var ekhadi post houn jau det navin varshat.thank you.makar sankrantichya Hardik shubbhecha.sneha

  • स्नेहा
   ब्लॉग वर स्वागत. सगळे लेख वाचल्याबद्दल आणि इथे आवर्जुन सांगितल्याबद्दल मनःपुर्वक आभार. स्वतःशी प्रामाणीक राहून अगदी जे काही वाटेल ते लिहित गेलोय.

   आज सहज लक्षात आलं की अजून चार दिवसांनी ब्लॉग ला दोन वर्ष पुर्ण होणार आहेत. अजूनही उत्साह आहेच, विषय पण बरेच आहेत पण मध्यंतरी या ब्लॉगिंग मधे खूप इन्व्ह~ऒल्व झाल्याने बराच वेळ जायचा म्हणुन हल्ली थोडं कमी केलं आहे. पण आठवड्यात एक तरी पोस्ट असेलच हे नक्की.

   सध्या मी स्ट्रिक्ट डायट वर आहे. अगं, वजन झालंय १०६ किलो. मोठ्या मुश्किलने एक महिन्यात सहा किलो कमी झालंय , आता पुन्हा खाणे सुरु केले तर जे कमी केले आहे ते दुपटीने वा्ढेल, म्हणून थोडे दिवस खाण्याकडे लक्ष कमी देतोय.गेले चार दिवस मी नागपूरला आहे त्यामुळे आई तर खूप आग्रह करून खायला घालते आहेच.. अरे राजा, कित्ती रोड झालस रे म्हणते.. 🙂 मी आणि बारीक??? 😦 असो.. लिहिन लवकरच.

   • Sneha says:

    Mag aamhala pan Tumcha sampurna diet plan aani vyayam sangava.karan majhe vajan suddha vadhale aahe.Saha kilo mhanaje Barach kami kela eka mahinyat.thank you for replying

    • स्नेहा,
     तस विशेषकाही केलं नाही. फक्त साखर बंद केली . दिवसभरात १५ एक कप चहा म्हणजे २० चमचे साखर घेतली जायची ती बंद झाली. तसेच भात, बटाटा सोडला. आणि थोड्ं हेल्दी खाणं वाढवलं.
     एक गोष्ट सहज जाणवली, की जे पोटाला आवडते, ते जिभेला आवडत नाही, आणि जे जिभेला आवडते ते पोटाला नाही- ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवली आहे. कुठलीही गोष्ट आवडली, की कमी खायची हा सोपा उपाय सुरु केलाय. 🙂

 44. प्रज्ञा says:

  अर्रर्रर्र! तुमच्या गुळपोळी खाण्यावर संक्रांतच आली म्हणायची!!
  असो.

 45. मालोजीराव says:

  माझा भाऊ फार्मा कंपनीत असल्याने धक्का बसला नाही,आता इथे जर भावना न दुखावता गोळ्या औषधे बनवायची असतील तर दहापट जास्त खर्च आहे,आपला ठीक आहे पण गरिबांना हे सोसणारे नाही,२५ पैशाची गोळी १ रुपयाला घेणं त्यांना परवडणारे नाही.जोपर्यंत इतका स्वस्त पर्याय उपलब्ध होणार नाही तोपर्यंत असाच चालणार.दहा वर्षांपूर्वी १००% टूथ पेस्ट या उंट,डुक्कर यांच्या calcium मिश्रित होत्या,काका तुम्हाला कदाचित याची कल्पना असेल.
  पण औषधांवर कंटेंट नमूद करावेत…या मताशी मी सहमत आहे !

 46. Sharda Morya says:

  Thanks for information.
  khup lokanna ajun he maahit nahi.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s