आठवणीतले काही..

सकाळी साडे आठचा सुमार असेल. “हाये का धार लावाची- चाकू सुरी कात्रीले धार लावाची ” म्हणून सायकलच्या चाकाने ते ग्राईंडर फिरवून सुरी कात्री ला धार लावणाऱ्या  व्यंक्या चा आवाज ऐकला … किंवा   “ये कल्लाय SSSSSSSS… “म्हणून जोरात ओरडत जाणारा तो कल्हई वाला मुल्ला ,  त्याचा आवाज ऐकला की आम्ही जिथे कुठे असू तिथुन धावत यायचॊ  .

अंगणात समोर घरातले पितळी टॊप , भांडी, डबे वगैरे कल्हई करायला  आणून दिले की कोळसा पेटवून आणि ते हाताने फिरवायचं कोळशाला हवा घालायचं  ब्लोअर सेट करून  भांडी त्या लालबुंद निखाऱ्यावर   गरम करायचा. एकदा भांडं गरम झालं की मग क्लहईचा रॉड त्या कसल्यातरी पावडरमधे बुडवून  भांड्यांना आतून ला्वून कापडाने सगळीकडे पसरवायचा. एका क्षणात त्या कळकट पातेल्याचं नवीन  चकाककणारंस्वरूप पाहिलं की मस्त वाटायचं. कल्हई झाली की ते भांड मग एका बादलीतल्या पाण्यात बुडवले की चुर्र आवाज ऐकतांना पण एक मजा यायची- आम्ही तर त्या आवाजाची  वाटच पहायचो.  कल्हईवाला आला की कमीत कमी तास भर तरी आम्ही त्याच्या समोर तो काय करतो ते

पाथरवट येऊन पाट्याला टाकवून द्यायचा.

पहात उभे रहात असू.

कल्हई करण्यासाठी आलेला  तो बलूतेदार असो काय किंवा “हाये का जाते टाकवाचे( टाकवायचे)? म्हणून ओरडत जाणारा तो मुल्ला आला की त्याच्या समोर पण बराच वेळ बसवून जातं टाकवतांना पहायला आवडायचं.  जातं वापरलं की त्याचा दगड गुळगुळीत होतो, मग एक छीन्नी आणि हातोडी घेऊन पाथरवट त्या जात्याच्या दोन्ही बाजूंना ’ छिन्नी ने घाव घालून रफ’ बनवायचा, त्याचा लयबद्ध आवाज ऐकतांना छान वाटायचं. जातं टाकवून झालं की आई त्या वर थोडे तांदूळ दळून बघायची. अर्थात जात्यावर दळण हे फार कमी वेळेस केले जायचे, पण काही ठरावीक गोष्टी म्हणजे महालक्ष्मीची आंबील ,वगैरे घरीच बनवली जायची.

कापूस पिंजून देणारा. हा फोटो बाहेरचा आहे आपल्याकडे थोडा वेगळं धनुष्य असतं पिंजायला

दुपारी चारच्या सुमारास “हाय का  गादी कापूस गादी  पिंजनार” -असे म्हणून हाता मधे एखाद्या म्युझिकल इन्स्ट्रूमेंट प्रमाणॆ  असलेले ते धनुष्य  ऐटीत घेऊन येणारी  रंगीत घागरा, मळलेली काळी ओढणी आणि दंडापर्यंत पांढऱ्या बांगड्या भरलेली यसु बाय आणि तिचा नवरा , आले की मुलं त्यांच्या मागे फिरायचे. ह्या लोकांना काम करतांना पहाणं हा पण एक  करमणूकच असायची . लहान मुल घरात झालं की गादी सू ने ओली होतेच, मग काही दिवसांनी मुल मोठं झालं की गादीमधला कापूस काढून स्वच्छ करून पिंजून पुन्हा गादी भरणे हा कार्यक्रम बहूतेक सगळ्याच घरी व्हायचा.  तंबोऱ्याच्या तारेप्रमाणे त्या  धनु्ष्याच्या वादीला टंकारून कापूस पिंजतांना पहाणे हा एक फुल टू टाइमपास असायचा.

सकाळी बरोबर साडे आठ ते  नऊ च्या दरम्यान येणारी दहीवाली पिसा बाई,दारामधे डोक्यावरची  अ‍ॅल्युमिनियमची हंडी उतरवून  टेकायची.   दही द्यायला  घरातल्या गृहीणी  आली की सोबत घरातलं लहान मुल पण एक रिकामी वाटी घेऊन तिच्या समोर दही घ्यायला उभा रहायचं.मापटं भर दही त्या बाईला दिल्यावर त्या लहान मुलाच्या वाटीमधे  मधे पण दह्याचा एक खवला न चुकता टाकणारी पिसाबाई , आणि त्या मुलाचा त्या दह्यात साखर घालून चमच्याने खात बसणे हा टीपी…

उखळावर कांडतांना

सतरंजी रफू करणारे कारागीर काश्मिरी असायचे. हिंदी भाषीक असलेले ते लोकं जुनी सतरंजी रफू करण्यात अतिशय वाकबार असत. शक्यतो त्याच रंगाचे दोरे वापरून मग त्या सतरंजीला पडलेले छिद्र वगैरे इतक्या बेमालूम बुजवायचे की बस्स! आणि वेळ पण किती कमी लागायचा त्यांना हे करायला. सतरंजी सोबतच जुन्या फाटलेल्या कपड्यांना रफू करण्याची पण पद्धत होती. त्याच कपड्याचा दोरा काढून त्याने रफू केले जायचे. आजकाल आपण जसे थोडा खोचा जरी पडला तरी कपडा टाकून देतो तशी परिस्थिती नव्हती. कपडा शिवून घालण्यातही कधीच कोणाला कमीपणा वाटत नसे. ह्या  सगळ्या गोष्टी ज्या वर लिहील्या आहेत त्या माझ्या लहानपणीच्या आहेत. म्हणजे साधारण ३५-४० वर्षापुर्वीच्या.

जात्या ऐवजी हल्ली घरघंटी म्हणून एक यंत्र मिळतं. त्यामधे पण गहू दळला जातो . मी एकदा ते घ्यायला गेलो तर लक्षात आलं की त्यामधे चक्क कटर्स आहेत ज्या मधे  गव्हाचा दाणा कापला जातो – दळल्या जात नाही, आणि म्हणून मग न घेता परत आलो . पूर्वी मिक्सरचा वगैरे शोध लागलेला नव्हता तेंव्हा. डाळ बारीक करायला हाताने फिरवायचे ग्राईंडर नुकतेच मार्केटला आले होते. इथे पोस्ट करायला त्याचा फोटो शोधला  नेट वर, पण  आता त्याचा साधा फोटो पण कुठे दिसत नाही. एका स्टूलच्या कडेला स्कृ करून पक्के केले की मग त्यामधे भिजलेली डाळ टाकून हंडल फिरवले की डाळ बारीक व्हायची.  हे काही फारसं पॉप्युलर झाले नाही , फारच कमी लोकांकडे असायचे हे ग्राईंडर.

शेगडी

हातसडीचे तांदूळ ऋषीपंचमीला लागायचे  म्हणून घरीच उखळात धान  घालून त्याचं साल काढली जायची. तसेच डाळी वगैरे साठी पण उखळ वापरात असायचे शेतकऱ्यांच्या घरात. बहूतेक पुढल्या पिढीला उखळ, जातं, खलबत्ता  म्हणजे काय हे  कदाचित समजणार पण नाही. मुंबईत  लहानाची मोठी झालेली माझी मुलगी, शेगडी म्हंटलं, तर म्हणजे काय असे प्रश्न विचारते! चूल माहीत आहे, पण शेगडी नाही. शेगडी मधे पण भुशाची शेगडी असायची पुर्वी. त्यामधे लाकडा ऐवजी भुसा वापरला जायचा.

नुकताच घरी नागपूरला जाऊन आलो. सासूबाईंनी खलबत्त्यामधे कुटलेले तिळगुळाचे लाडू  बनवले होते ( बहुतेक जावयाला आवडतात म्हणून असावेत 🙂 )  मिक्सर मधे बारीक केलेले तिळगुळ आणि खलबत्त्यामधे कुटलेले तिळगुळ- या दोन्हींच्या चविमधे अगदी जमीन अस्मानचं अंतर असतं. मिक्सर मधे तिळ कापले जातात- कुटले जात नाहीत, त्यामुळे  खरी तिळगुळाची चव काही त्याला येत नाही.    आता हेच बघा ना, पाव भाजी ची भाजी घरी करतांना शॉर्टकट म्हणून भाजी शिजत आली की त्यामधून बॉस्चा ( हॅंड मिक्सर)  फिरवला जातो, म्हणूनच त्या पावभाजीवाल्या कडल्या तव्यावर दाबून दाबून एकत्र शिजवलेल्या भाजीची चव    घरच्या पावभाजीला   येत नाही.

खल बत्ता.

मला स्वतःला पण शेंगदाण्याची चटणी सोलापूरी स्टाइलमधे खलबत्त्या मधे कुटुन केलेली जास्त आवडते. मिक्सरमधे केलेली चटणी म्हणजे त्या मधे  दाणे चिरले जातात म्हणून काही फारशी  चांगली लागत नाही- लसूण हिरवी मिरची चटणी (खरडा) पण पाट्यवरवंट्यावर वाटलेलीच जास्त  चवदार होते. कारण वाटतांना सगळ निघालेले सगळे रस एकत्र मिक्स होतात आणि छान चव येते . पण म्हणतात नां, ’ वेळेला केळं, आणि उपासाला सिताफळं” तसं आहे ते, म्हणून नहेमीच्या उपयोगाचा म्हणून मिक्सरच बरा असं बायका म्हणतात.. आमच्या  घरी  अजूनही खलबत्ता वापरात आहेच-स्पेशली दाण्याच्या चटणीसाठी वापरला जातोच. लहानपणी पुरण वाटण्यासाठी पाटा वरवंटा वापरात होता. लसूण मिरची ची  चटणी   पण नेहेमीच पाट्यावर वाटली जायची. एक सांगतो वाटुन केलेली मिरची लसूण चटणी (   खरडा  ) तिची चवच काही वेगळी लागते

पाटा वरवंटा, वरवंटा

पाटा वरवंटा

आज घरी केलेले तिळगुळाचे लाडू खाल्यावर वर लिहिलेल्या सगळ्या गोष्टी आठवल्या. वाटलेल्या पुरणाची पोळी खाऊन किती वर्ष झाली हे पण आठवलं, आणि सोबतच बऱ्याच गोष्टी आठवल्या तशा इथे लिहित गेलोय. कदाचित पोस्ट जरा असंयुक्तिक किंवा अ‍ॅब्सर्ड वाटेल पण तरीही पोस्ट करतोय. विलास करंदीकर हे आपल्या जुन्या खेळ भांड्य़ांचे म्हणजे भातुकलीच्या खेळाचे प्रदर्शन भरवतात. त्यांच्या प्रदर्शनात खूप जुन्या काळच्या वस्तू अजूनही त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत. त्यांचे काही फोटॊ मिपा वर सापडले ते पोस्ट कर

समाजाचा भाग असलेले ते बलूतेदार हल्ली कुठे  आणि कसे आपल्या जिवनातुन निघून गेले ते समजलंच नाही. आमच्या पिढीने खूप स्थित्यंतरं बघितली आहेत, बऱ्याच गोष्टी नेट वर पण उपलब्ध नाहीत. काही फोटॊ शोधायचा प्रयत्न केला तर ते पण सापडत नाहीत. कुठेतरी ही सगळी माहिती जतन करुन ठेवली जावी   म्ह्णजे आपली मराठी रहाणी आणि संस्कृती कशी होती हे पु्ढल्या पिढीला पण समजेल .

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे ते तिळगुळाचे लाडू..

कल्हई वाल्याचा फोटो सापडला नाही नेट वर म्हणून हे गाणं..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

45 Responses to आठवणीतले काही..

 1. Nikhil says:

  Mastch ahe post…..
  Amcha ithe pan purvi he sagle lok yayche ani tyanche kam baght timepass karnyat maza kahi ourch hoti….

  Pan ata konich yet nahi….arthat tyancha kadun kam karun ghyaylach kahi urle nahi…

  Kallahi wala kadhi kadhi disto ajunhi… pan kalahi kartana nasun bhik magtana…khup wait watat… 😦

  • निखिल
   अजूनही बरेच लोकं यायचे. जसे दररोज सकाळी सायकल वर टिनाचा डबा लावून ऐ …… डबलरोटी,बटर खारी बिस्किट……. म्हणून ओरडत येणारा तो मुसलमान. ब्रेड ला तो हमखास डबलरोटी म्हणायचा..
   नंदी बैल घेऊन येणारा तो पण आजकाल दिसत नाही.

 2. ajayshripad says:

  छान…. खुप आठवणी जाग्या झाल्या…!

 3. mazejag says:

  कल्हईवाला मी पण पहिला आहे. लहानपणी आम्ही कळव्याला राहत असू तेव्हा पहिला होता. एक बाइस्कोप वाला पण यायचा त्याची ती नाचणारी बाहुली असे. आणि हो आजही आई पात्यावर वाटलेल्या मसाल्याच चिकन बनवते. सोलिड असत एकदम.

  • पाट्य़ावरच्या वाटणाला पर्यायच नाही. आमच्याकडे फार कमी वापरला जातो पाटा. पण ठेवलाय घरात.:)

 4. Hemant Pandey says:

  काका मकरसंक्रांतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. बर्याच दिवसांनंतर पोस्ट आली आहे. मी मात्र दररोज आशाळभूतपणे तुमची पोस्ट येईल याची वाट पाहत असतो.असो. कालीवाल्यावरून आपल्याकडे खूप गोष्टींचा रेफरन्स येतो. उदा. केसांना कलई करणे – केस रंगवणे. तोंडाला कलई करणे – मेकअप करणे. कापूस पिंजारी, त्याचा धनुष्य – बाहुली. एकूण मस्तच पोस्ट आहे. तुमच्या या टाईम मशीन पोस्टने सरळ तीस वर्ष भूतकाळात जाऊन आलो.

  • हेमंत
   हल्ली फक्त शनीवार रविवारीच एखादं पोस्ट टाकतो. थोडा कामाचा व्याप वाढलाय .

 5. Rajeev says:

  khaaaaassss

  • राजीव
   धन्यवाद.. अरे तूला तो अंबादास न्हावी आठवतो कारे? धोपटी घेऊन यायचा बघ आपल्या घरी अमरावतीला.. तुझी कॉमेंट पाहिली आणि एकदम आठवला बघ तो..

 6. Pingback: आठवणीतले काही.. | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 7. निनाद होंबळकर says:

  मस्त झालेय पोस्ट.. आणि मुख्य म्हणजे शेगडी काय असते ते समजले.. मला तर आपला gas म्हणजेच शेगडी वाटायची.. कारण सर्रास दुकानांच्या पाट्यांवर वाचायचो कि शेगडी दुरुस्त करून मिळेल.. आणि तेथे आपला gas दुरुस्त करून दिला जायचा..

  • निनाद
   शेगडी म्हणजे चुल पेटली की त्यातले निखारे काढुन वेगळे एका शेगडीत टाकले जायचे, किंवा कधी तरी कोळसा पण वापरला जायचा. मंद आचेवर शिजवलेल्या पदार्थांची मजाच काही और होती.. 🙂 तुमच्या पिढीने हे सगळं मिस केलंय बघ.

   • निनाद होंबळकर says:

    मिस तर केलेय… पण आता मी तरी काय करणार.. तुमच्याकडूनच समजून घ्यायचे.. निदान संदर्भ तरी लक्षात राहतील.. कराल ना मदत..??

 8. रविन्द्र जाधव says:

  जुन्या आठवणी जाग्या केल्याबध्दल धन्यवाद. पोस्ट छान जमले आहे

 9. Aparna says:

  खूप छान पोस्ट…माझी मामी जात्यावर दळायची तेव्हा मी बरीच लहान होते. आता ते जातं मामाकडे एका कोपर्‍यात असावं..

  करंदीकरांची एक पोस्ट इथे पण आहे….. 🙂

  http://majhiyamana.blogspot.com/2009/04/blog-post_4267.html

  • हो, ती पोस्ट वाचली होती. बरीच खेळणी आहेत त्यांची सगळे फोटो आहेत माझ्याकडे . एकदानाशिकला गेलो असतांना संस्कृती म्हणून हॉटेल आहे त्र्यंबक रोड वर तिथे भरलं होतं प्रदर्शन..
   जात्यावरच्या ओव्या माझ्या आईला येतात. एकदा विचारून त्यावर एक पोस्ट लिहायचंय.

 10. bhaanasa says:

  अजूनही कल्हईवाले आहेत. मी इथून कल्हई लावायला दरवेळी मायदेशी पितळेच्या लंगड्या घेऊन येते. आणि चक्क यावेळच्या नाशिक मुक्कामात सुर्‍या-कात्र्यांना धार लावणारा मुल्लाही पाहिला. 🙂 पाटा वरंवट्यावर वाटणे हा माझा बालपणीचा टीपी होता. वाटून झाले की थोडेसे पाणी पाट्यावर शिंपडून उरलेसुरलेही वाटणाच्या थाळीत काढताना मस्त वाटे. ( आईच्या भाषेत अश्या छोट्या छोट्या गोष्टीही उपयोगाच्या असतात. 🙂 ) शेगडीवर धुरी घेणे प्रकार जोरदार झालेत. 😦

  महेंद्र, पोस्ट खूप छान. कितीतरी जुन्या आठवणी,खास करून दोन्ही आज्यांच्या जाग्या झाल्या.

  मकर संक्रांतिच्या अनेक शुभेच्छा! 🙂

  • हा हा हा.. आता चला, तूला ’धुरी ’ आठवली.. 🙂 त्याचा वास काय मस्त यायचा नां? त्यात काहीतरी टाकायचे बाळंतीणीच्या खाटेखाली ठेवतांना.. विसरलो बघ.
   मस्त ..मी विसरलोच होतो त्याबद्दल. धन्यवाद.

   • bhaanasa says:

    न्हाणे झाले की केसांना उदीची धुरी देत. तान्ह्या बाळाला, ओवा, शोपा, लसणाची सालं यांची धुरी करून बा्ळाला अगदी वर ( खूप लांब धरून ) धरून दोन मिनिटेच देत. लगेच सर्दी गायब आणि बाळं गुडूप होत. 🙂

    आमच्याकडे नं चाळीत धूपवाला मुल्ला रोज तिन्हीसांजेला येई. १० पैसे दिले की तो हातातल्या धूपदाणीतील पेटलेल्या निखार्‍यावर उदाचा मारा करी आणि संपूर्ण घरात ती धूपदाणी फिरवी. खूपच मस्त सुवास घरभर दरवळत राही.

 11. महेश says:

  संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा लहानपणीच्या आठवणी जागृत केल्या त्याबद्दल धन्यवाद आपल्या अनुभवाचे बोल असेच आम्हाला देत जा, ,

 12. प्रिय महेंद्र,
  मी गेला अनेक महिने पुण्यात कल्हई वाला शोधतोय 🙂 दुर्मिळ झालेली असामी आहे ही…माझे वडील वैतागून घरातली पितळी भांडी मोडीत घालायची म्हणतात…कल्हई लावताना बघणे हा माझा आणि माझ्यासारख्या अनेक जणांचा फेवरीट पास्ट टाईम होता..मजा वाटायची..
  दुसरा म्हणजे कापूस पिंजणारा…आज काल कर्ल ऑन च्या जमान्यात गादीची दुकाने दिसतात पण हे back office ची कामे करणारे एकदम हरवले आहेत.. आणि तुम्ही दिलेला ‘सू’ चा संदर्भ तर १००% पटला!!.
  पूर्ण लेखच छान…एकदम नोस्ताल्जीक झालो..!!

  • प्रिय सिद्धार्थ
   प्रतिक्रियेकरता आभार. बरेचसे महत्वाचे शोध माझ्या पिढीला पहायला मिळाले. आज जे कोणाला माहीतही नाहीत असे गॅजेट्स म्हणजे टेलेक्स वगैरे आम्ही नेहेमी वापरायचो. फॅक्सचा शोध तर अगदी एवढ्यातलाच. पहील्यांदा फॅक्स मशीन पाहीली ती एका प्रदर्शनात. त्यावर आपल्या हाताचा पंजाचा फॅक्स दुसऱ्या मशीनवर पाठवून पाहीला होता. १९८९चा सुमार असेल तो.
   आमच्या वेळेस असं होतं म्हंटलं की मुली म्हणतात बाबा म्हाताऱ्या सारखं बोलतात हल्ली.. तो कल्हईवाला तर मी पण पाहीलेला नाही कित्येक दिवसात.

 13. santosh Deshmukh says:

  काका , राम राम !!!!
  काका कधी शिसोळे गोळा केलेत का ? शीसोले म्हणजे कलई भांड्यावर केल्यावर त्यातून बाहेर पडणारे शिशाचे लहानसे गोळे !!!! लहानपणी मज्जाच असते न!!!!!!!! गोड गोड बोला !!!!! गोड गोड लिहा !!!!!!!!

  • संतोष
   ते तर नेहेमीच गोळा करायचो. पण तो कल्हई वाला असे गोळे खाली पडले की हातातली ती शिशाची कांडी गरम करून सगळे गोळा करायचा. पण तरीही काही गोळॆ मिळायचेच.. 🙂

 14. mau says:

  mast jhaliye post…..

 15. Pramod Mama says:

  Siddartha,
  Pune madhe kasba pethemadhe Nagzari Poola jawal Pawar Kaka navache Kalhiwale Kaka Ahet , Dhanakwadi madhe thyanche ghar , workshop pan ahe.

  Mahendra Kaka,
  Pune madhe 40 years ago Mala Pandhare Meeth viknara Sindhi Pheriwala , Mhamai Paplet, Surmai, Wam etc Vividh Mase Pitali Paratit Viknari Ganga Mavshi athwate,
  Mazya Shale Jawal Chinch, Kairee, Chanya Manya , Ambat Pandav , Vilaychee Chinch , Futane Shengdane Viknare Pheriwale athwatat. 50 years chya athwani tumhi jagya kelya. Dhanywad Boss

  Pramod Mama Pune

 16. prasad says:

  बालपणीच्या आठवणी जाग्या केल्यात. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता ह्या टीवी च्या नादी लागुन जवळ जवळ सर्व मुले आणि अखे घर बरबाद होत चालले आहे. तुमची पोस्ट वाचताना नकळतपणे बालपण माझे सापडले. आणि डोळे कधी भरले. नाही समझले. मनापासून धन्यवाद ….

 17. Umesh Dande says:

  Excellent …..
  I still remember all these things.
  gadi pinjnara, kalahi wala, these things, let increase your capabilities of observation.

  These were skilled jobs.
  Few days back i have changed the number plate of my vehicle, within five minute he has done the work. I was amazed, the painter who was there said “sahab ab wo din kaha (like previously he use to create the plates with painting), machine pe 2 min me pati banjati hai”. I can see the hate for these machines on his face.

  As the production system are coming the skill is getting buried.
  Nice one … thank you 🙂

 18. sahajach says:

  महेंद्रजी परवाच वाचली होती ही पोस्ट… पण ती वाचून कमेंटण्याआधिच आठवणींच्या राज्यात पोहोचले मी 🙂 मस्त झालीये पोस्ट…. कदाचित लहानपणच्या सहज भेटणाऱ्या या अनेक माणसांबद्दलच्या आठवणी सारख्याच असल्यामुळे असेल पण पोस्ट खूप भावलं….

  कल्हईवाल्यांसारखेच मधे एक आणि खूळ आले होते…. घरचे Germanium ची भांडी देऊन त्यातून नटराज किंवा वादक-नर्तकी वगैरे मुर्त्या घडवणारे लोक…. कुरमुरे विकणारे…. ’डोंगराची काळी मैना’ म्हणत जोरात ओरडत येणारा करवंदेवाला…. अनेक अनेक लोक आठवणींमधेच उरलेले….

 19. Smita says:

  chaanach post ahe. ekdum down the memory lane…mala yatala kalhaiwala aThavatoy nakkee, bakiche evadhe pahilyasarakhe vaTat naheet.

  ek digression: tumchee post haLuch khadadeechya vaLaNavar ( nehameepreamaNe) jata jata rahilee:-)) Nagpurla jaun khalabattyata kuTun kelele ladu khalle mhaNaje diet slip zala!! ok kidding. ..:-)

  • स्मीता
   खादाडी हा माझा आवडीच विषय, कितीही टाळतो म्हंटलं तरीही टाळल्या जात नाही..
   तसे अनेक् स्पेशल पदार्थ आहेत नागपूरचे.. मस्त जागा आहेत – पण या वेळेस कुठेच गेलो नाही. सरळ घरी कोबीची भाजी पोळी< मेथीची भाजी पोळी जेवलॊ शहाण्या मुलासारखे.. 🙂

 20. मस्त झालीये पोस्ट.. खूप जुन्या आठवणी जागवणारी..

 21. sandip says:

  khup chan post ahe. kaka tumhala dhanyawad

 22. Shraddha says:

  Khupch chan post ahe 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s