रन मुंबई रन..

हे काय नवीन? मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेल्या दोन गोष्टी- एक म्हणजे धावणे, आणि दुसरी म्हणजे रांगा लावणे. प्रत्येक ठिकाणी कोणी रांगा लावा म्हणून सांगणारे जरी नसले, तरीही आपणहून रांगा लावतात  मुंबईकर- मग ते शेअर रिक्षा करता असो किंवा तिकीटासाठी असो- शिस्तीत रांगेत उभा असलेला कोणी दिसला तर तो मुंबईकरच हे नक्की समजावे.  पूर्वी बेस्टच्या बसमधे चढतांना पण मुंबईकर रांग लावूनच चढायचा, हल्ली ते बाकी दिसत नाही . 

धावण्याच्या बाबतीत नवीन काय? मुंबईकर तर रोजच धावत असतो. सकाळी ८-०१ ची फास्ट पकडायला घरापासून तर शेअर रिक्षा किंवा बस पर्यंत रेल्वे ब्रिज वरून हव्या त्या प्लॅटफॉर्म  पर्यंत, रग्बी खेळल्या प्रमाणे  धावत धावत ती लोकल पकडली की तिथुन ऑफिस पर्यंत जायला पुन्हा शेअर रिक्षा ची रांग आहेच.भाजीवाले आपले भाजीचे टोपले घेऊन धावत पळत आपापल्या सामानाच्या डब्याकडे घुसुन जागा पकडायला धावत  असतात.

या सगळ्या गोंधळात  तुमच्या आमच्या डब्यांची सोय करणारे  मुंबईचे डबेवाले पण आपापल्या सायकली स्टॆशनला स्टॅंड वर लावून ३६ डबे पाटी मधे ठेऊन रेल्वे स्टेशनवर इकडे तिकडे धावत लोकांचे  शिव्या शाप पचवत  धावताना दिसतात. कॉलेजची पोरं पाठकुळीला  सॅक लावून गाडी पकडण्यासाठी धावत असतात.  कोळी लोकं डोक्यावर प्लास्टीकची हॅट आणि हाफ पॅंट टी शर्ट घातलेले , आपापल्या पाट्या डोक्यावर घेऊन ” हे. मच्छी पानी, मच्छी पानी म्हणत रेल्वे ब्रिज वरून धावत असतात.   मच्छी पानी हा शब्द ऐकला की कोणीही कितीही घाईत असला तरीही त्यांना आधी जागा देतो. कारण ते मच्छी पानी थोडं जरी कपड्यावर पडलं तर दिवस भर त्याचा वास काही जात नाही. रस्त्याच्या कडेवर सकाळी प्रातर्विधीला बसणारा एखादा माणूस  दूसऱ्या  एखाद्या ९० लाखाच्या फ्लट मधे रहाणाऱ्याच्या खांद्याला खांदा भिडवून द लोकलच्या ब्रिजवर नेहेमीच धावत असताना दिसतात. त्यात नवीन काय?

मग हे धावण्याचं आजच इतकं काय कौतूक?? दररोज जो मुंबईकर धावत असतो, या धावत्या आयुष्याशी स्पिड मॅच करण्याचा प्रयत्न करीत असतो तेंव्हा त्याच्याकडे कॅमेरा घेऊन पुढे पळणारे चॅनलचे प्रतिनिधी नसतात. अनिल अंबानी , जॉन अब्राहम, सारख्या सिलेब्रिटीज त्यांच्यासोबत रस्त्यावर आलेल्या नसतात. त्यांना धावपळ करण्यासाठी रस्ता मोकळा करून दिलेला नसतो, रस्त्यावरची वाहतूक बंद केलेली नसते. इतरांना धडका देत, धक्के मारत, कसंही करून जागा करून मुंबईकर आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायासाठी असलेल्या जागेवर वेळेत लेट मार्क टाळून पोहोचायला धावत असतो- घामाने थबथबलेला, बॅग सांभाळत  जगाचं ओझं अंगावर घेऊन धावत असतो- समोर मागे कॅमेरा घेऊन धावणारे चॅनल्सचे प्रतिनिधी   जरी नसले, तरीही त्याला धावतच रहायचं असतं- स्वतःचं पोट भरण्यासाठी.

स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक दर वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून  हा एक इव्हेंट न चुकता स्पॉन्सर करते. मुंबई मॅरेथॉन्चा! या मधे हजारो लोकं भाग घेतात. हौशे, नवशे, गवशे  वगैरे सगळ्या प्रकारचे लोकं इथे धावायला येतात.  सहा वर्षाच्या चिंटू पासून तर ८० वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्यांचाच उत्साह ओसंडून वहात असतो. अनिल अंबानी सारखे उद्योग पती  पण आपल्या चार पाच कमांडॊच्या संरक्षण कड्यात धावून  भाग घेतो.हाफ मॅरेथॉन म्हणजे सहा किमीची धावण्यासाठी पण बरेच लोक येतात.

रविवारचा दिवस तसं म्हटलं तर झोपा काढायचा ! इतकी मस्त थंडी पडते आहे सध्या, तरीपण ह्या गुलाबी  थंडीत ३०-४० हजार लोकं ह्या मॅरेथॉन मधे धावायला जातात. शे दोनशे एनजीओ चे प्रतिनिधी आपापल्या एनजीओ चे रंगीबेरंगी टिशर्टस घालून टीव्हीच्या कॅमेऱ्यापुढे आपले चेहेरे दिसावे म्हणून मर मर करत असतात. काही लोकं म्हणतात, की आम्ही आमच्या कॉज साठी धावतोय-  उदाहरणा्र्थ आता ’एड्स पेशंटला मदत करणे’ हे कॉज जरी समजले, तरीही १०० मिटर टिव्हीच्या कॅमेऱ्यापुढे धावून त्याला काय मदत होणार ??  काही म्हणतात वुई रन फॉर द नेशन… आता हा प्रकार मला  नवीनच वाटतो, हे  देशासाठी धावणं म्हणजे काय ?? काही गोष्टी मला अजूनही समजलेल्या नाहीत-आणि कदाचित समजणारही नाही. असो.  स्टार्स आणि  स्टारलेट्स  तर मुबलक प्रमाणात रस्त्यावर उतरलेले दिसत होते. पण मराठी चेहेरे मात्र त्यात नव्हते  .

या सगळ्या गोंधळात माझे लक्ष वेधले ते युध्दामधे जखमी झाल्याने व्हिल चेअरला जखडल्या गेलेले सैनिक! माकडहाडाला दुखापत झाल्यामुळे ह्या सैनिकांना उभंही रहाता येत नाही. असं असतांनाही अडीच किमी ची रेस त्या सहा सैनिकांनी व्हिल चेअर वर पुर्ण केली . त्यांची जिद्द बघून डोळे पाणावले आणि  कौतूकही वाटले. आणि शरीर जायबंदी झालं तरीही त्यांची आयुष्याला समोरा जाण्याची निधडी छाती बघून त्या  सहा वीर जवानांना मानवंदना देण्याची इच्छा झाली – म्हणून हे पोस्ट लिहितोय.  इतक्या वाईट तर्हेने शरीर जायबंदी झाले तरीही मन मात्र अजूनही उत्साही आहे त्यांचं! जास्त काय लिहू – मला काहीच सुचत नाही.जय हिंद!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

33 Responses to रन मुंबई रन..

 1. रोहन says:

  खरच रे… नेमक्या त्यांच्या काय भावना असतील ते ह्या बाकीच्या ‘धावणाऱ्या’ लोकांना कधी समजतील का? ऑपरेशन सद्भावना मध्ये जसे काश्मीर खोऱ्यामधल्या मुला-मुलींना आणि लोकांना शहरात आणले जाते तसे इथल्या लोकांना सुद्धा सीमेवर नेऊन आणले पाहिजे… प्रत्येकाने स्वतः:च्या आयुष्यात एकदा तरी सिमावर्ती भागाला भेट द्यायलाच हवी…

  पोस्ट काय आहे.. मी काय लिहितोय.. 🙂 थांबतो..

  • रोहन
   मला खरंच वाईट वाटत होतं. बहूतेक एनजीओ ची मंडळी जनरल पिकनिक मुड मधे तिथे टाइम पास आणि फ्री टीव्ही कव्हरेज साठी आलेले असावे असे मला तरी वाटत होते. पण त्या सैनिकांना मात्र खरंच मानवंदना द्यायची इच्छा झाली म्हणून हे पोस्ट लिहिलं. प्रत्येकाने एकदातरी सिमेवर जाऊन यायलाच हवं.. या गोष्टीशी मी पण सहमत आहे. स्विटझर्लंड मधे प्रत्येकाला सैनीकी प्रशिक्षण घ्यावं लागतं, तसं आपल्याकडे करायला हवं.

 2. ही मॅरॅथॉन जे नेहमी चार चाक्या पळवतात आणि चारचाक्यांमधुनच फिरतात अशांना थोडा व्यायाम मिळावा यासाठी असते. 🙂

  • याचा उद्देश मला पण निटसा समजला नाही. एक स्पोर्ट्स इव्हेंट म्हणून असेल तर ठीक आहे- पण खरंच काही लक्षात येत नाही.

   • Ketaki says:

    या मॅरॅथॉन साठी “Registration” करून पळणारे जे लोक असतात, त्यांनी भरलेल्या फी मधून जमा होणारे पैसे अश्या एडस च्या रुग्णांसाठी, किंवा अश्याच प्रकारच्या “charity” साठी वापरणे, हा उद्देश असावा मॅरॅथॉनचा. तसंच ज्यांना एरवी समाजसेवेसाठी वेगळा वेळ आणि पैसा देणे जमत नाही, त्यांना थोडंसं पुण्य मिळवून देणे हा ही उद्देश.

    • या पैशातून बक्षिस देण्यात येतं. पहिले बक्षिस इंटरनॅशनल लेव्हलचे ३१००० डॉलर्स, आणि भारतीयांना स्पेशल वेगळ्या कॅटॅगरी मधे २,२५० डॉलर्स.. हे पैसे जर एनजीओ ला दिले जाऊ शकतात ( पण ते योग्य कारणासाठी वापरले जातील याची खात्री नाही)

     यावर एक सुंदर लेख वाचला सीएनएन वरचा.. इथे आहे लिंक..
     http://www.cnngo.com/mumbai/play/mumbai-marathon-404966

 3. kapila says:

  100% khara aahe re baba fully agree……………

 4. निनाद होंबळकर says:

  काका… विचार करायला भाग पाडले या पोस्टने..

  • खरंच विचार करायलाच हवा. आपल्या सभोवताल जे काही घडतं, त्याकडे डोळे उघडे ठेऊन पहायलाच हवे आपण तरी. प्रत्येक बाबी बाबत स्वतःचे काही तरी व्ह्युज असायलाच हवे.

 5. Pramod Mama says:

  Mahendra kaka
  Salute to these brave Army Jawans….Jai Bharat

  Pramod Mama

 6. Smita says:

  chaan vishay ahe, puN aaj jara abrupt end kelat asa vaTala, (I could be wrong).

  about helping the cause: amachya ithe per partiicpating individual in an organization, kahee amount donate hote, so more the number of participants, more is the donation, shivay lok individually puN pledge karatat aNee organization donates an amount equal to your pledge.
  picnic mood baddal tumhee je mhanalay te patatay, sagalE NGOS ajun ek visibility drive ashach mod madhye distaat. ajun ek excitement apalya generally easily excitable society saThee what else??

  • स्मिता
   विषय खूप मोठा आहे. त्याची व्याप्ती पण खूप मोठी आहे. मी मॅरेथॉन ची गरज आहे की नाही? किंवा मॅरेथॉन ने काय साधले हे सगळे लिहिले असते, तर शेवटचा पॅरीग्राफ( ज्या मुले हा लेख लिहायला उद्युक्त झालो ) त्याचं म्हत्व कमी झालं असतं, म्हणून थोडा ऍब्रप्ट झाल्यासारखा वाटतो शेवट.. आभार.

   • एक गोष्ट लिहायची राहीली, ती म्हणजे आपल्या कडे असलेले ९० टक्के एनजीओ फक्त काळा पैसा पांढरा करायला वापरले जातात. खरे काम करणारे एनजीओ फार कमी आहेत. या वर पुर्वी एक पोस्ट लिहिले होते. लिंक सापडली की देईन.

 7. Hemant Pandey says:

  पुन्हा एक छान भावनिक लेख. आर्मीचा एक अलिखित रुलच आहे ” जो सही सलामत, वही सिकंदर”. युद्धात व सेवे दरम्यान शारीरिकदृष्ट्या जायबंदी झालेल्यांचे आयुष्य खूपच भयंकर असते.
  काका, त्या व्हील चेअर वरच्या चेहर्या वरची स्माईल पार काळजा पर्यंत जाते.
  थोडेसे आणखीन लिहितोय, थोडे पर्सनल आहे. मी व माझी सौ लग्नाच्या वाढदिवशी न चुकता सर्वप्रथम हुतात्मा स्मारकाला आठवणीने फुले वाहून येतो. मनाला खूप समाधान वाटते.

  • हेमंत
   मी स्वतः पण फ्रंट वर जाऊन आलेलो आहे. कामानिमित्य जवळपास तिन महिने तिकडे होतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्याबद्दल पुर्ण कल्पना आहे. तुमची हुतात्मा स्मारकाला जाण्याची कल्पना खुप आवडली.

 8. prasad says:

  aajcha navakaal vacha. same teech bhavna…… fakta fashion….. deshaasathi kaahi nako karayla hya status valya lokanna. hya marathon madhe dhavnaare saineek sodle tar bakee sagle murkha aahet.

 9. Umesh Dande says:

  nice start …. nice put up and nice end.
  The ways you write about a small thing, makes me read your blog.
  Again thanks … nice one 🙂

 10. Nachiket says:

  छान लेख.

  मुळात मॅरेथॉन ही कल्पनाच युद्ध जिंकल्याची बातमी आणि जखमींना मदतीसाठी निरोप पोचवण्यासाठी ४२ किलोमीटर धावलेल्या वीराची स्मृति जपण्यासाठी आहे.

  “मॅरेथॉन” या ठिकाणच्या युद्धात लढत असताना त्याला ग्रीकांच्या (स्वतःच्या देशाच्या) विजयाची बातमी अथेन्सपर्यंत पोचवायला धाडले होते. तो जखमी असूनही सलग एकदाही न थांबता हे अंतर धावत आला आणि दरबारात पोहोचून बातमी सांगून कोसळला आणि मरण पावला.

  अर्थात हे सर्वांना माहीत असेलच पण उल्लेख केला.

  तुमचा मुंबईकरांच्या लाईफविषयीचा विचार आवडला..

 11. thanthanpal says:

  कांहींच न करता समाजसेवेचा आव आणण्याचा एक तमाशा ( समस्त तमाम तमासगीरांची माफी मागून ) म्हणजे या धावण्याच्या स्पर्धा. देशा करता धावा,स्वातंत्र्य एकता बंधुत्वा करता धावा , शांतते साठी धावा. गल्ली पासून दिल्ही पर्यंतच्या फडतूस नेत्याच्या वाढदीवसा करता धावा. दहशदवाद्यांनी मुंबई देशावर हल्ला केला की आम्ही हिम्मत हरलो नाही मुंबई जिंकली म्हणून धावा (म्हणजे काय? हे कोणी समजून सांगितले तर मी त्याचा जन्म भर आभारी राहीन) त्यांच्या वर हल्ला करू नका बर! नाही तर महात्म्याच्या हृदया यातना होतील . जिवंत नागरिक यातना होवून मेले तर चालेल पण आमच्या सर्वधर्म समभाव या दुप्पटी धोरणाला धक्का बसता कामा नये. मेणबत्ती जाळत मोर्चा काढण्याचा प्रकार सुद्धा असाच आहे. या मूक मोर्च्याचा आणि धावण्या च्या कार्यक्रमाचा फक्त चमको नट नट्या कलमाडी सारखे राजकारणी अनिल सारखे धंदेवाईक आणि मिडीयाला च होतो. सामान्य माणसे फक्त प्रेक्षक असतात.

  • आजच्या बातम्यांमधे पाहिलं की कोणा एका नेत्याच्या वाढदिवसा निमित्य काल शंकरपट भरवला गेला ( कायद्याने जनावरांच्या शर्यती लावण्यास बंदी आहे) आता काही जनावरं नेते धावले तर आमची हरकत नाही.. 🙂

 12. मनोहर says:

  खेळ आणि खेळाडू यांच्या संबंधात समाजाचादेखील भाग असतो हे अधोरेखित करणे हा या संयोजनामागचा हेतू असावा. त्या दृष्टीने वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकाना प्रत्यक्ष सामावून घेणे योग्य वाटते. टीका करणाऱ्यांचा हेतू आपल्या स्पर्धेत न उतरण्याचे समर्थन करण्याचा असावा.

  • हे अधिरखीत करण्याची गरज अजून तरी पडली आहे असे मला वाटत नाही.

   आता राखी का स्वयंवर वर टीका करणारे, त्यात उतरता आलं नाही म्हणून टिका करतात असे नाही म्हणता येत नां.. 🙂

 13. sanjay says:

  दोन वर्षांपूर्वी, नोंदणी केलेल्या लोकांना निविया चे गिफ्ट मिळाले होते.
  त्यामुळे त्यानंतर च्या वर्षी गिफ्ट साठी आमच्या ऑफिस मधील खूप लोकांनी नोंदणी केली होती

 14. बरं झालं तुम्ही हे लिहिलंत… मला कायमच मॅरेथॉन आणि त्याच्या अनुषंगाने चालणाऱ्या चमकोगिरीचा तिटकारा वाटत आलाय. आणि देशसेवा, समाजसेवा वगैरे वगैरे अनेक गोष्टी या अशा धावण्यातून कशा बरं साध्य होतात हेही एक न उलगडलेलं कोडं..

  पण शेवट मात्र खूप विदीर्ण करून गेला.. त्या जिद्दी बहाद्दरांना मानाचा मुजरा !!!!!

  • मला अजूनही बरंच काही लिहायचं होतं, पण खूप मोठी पोस्ट होत होती, आणि शवटच्या पॅराचा इम्पॅक्ट हवा होता, म्हणून जास्त लिहिणे टाळले.

 15. mau says:

  छान लेख !!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s