आज संध्याकाळी सहज तारखेकडे लक्ष गेलं – १७ जानेवारी २०११, आणि आठवलं की बरोबर दोन वर्षापूर्वी म्हणजेच १७ जानेवारी २००९ रोजी हा ब्लॉग सुरु केला होता. सुरुवातीला उत्साह तर खूप होता, पण काय लिहावे हे मात्र लक्षात येत नव्हते. ब्लॉग जरी १७ तारखेला सुरु केला तरीही लिहिण्याचे प्रयत्न मात्र १२ जानेवारी पासूनच सुरु होते. पहिले पोस्ट शेवटी १८ तारखेला लिहू शकलो. .
ब्लॉग सुरु तर केला, पण लिहायचं तरी काय इथे? आणि लिहीलेलं वाचणार तरी कोण हा पण प्रश्न होताच. पण तरीही लिहिणे सुरु केले. एकदा श्रीकृष्ण सामंतांच्या ब्लॉग वर मराठी ब्लॉग विश्व चे विजेट पाहिले, आणि त्यावर क्लिक केले असता त्याचे महत्व समजले आणि तिथे ब्लॉग रजिस्टर केला. त्यानंतर मात्र बरेच लोकं ब्लॉग वाचायला येऊ लागले. म्हणजे आजपर्यंत च्या वाटचाली मधे मराठी ब्लॉग विश्वचा खूप मोठा वाटा आहे.
एकच ठरवलं होतं- जे काही लिहायचं, ते स्वतःशी प्रामाणिक राहून लिहायचं. कदाचित आपले विचार लोकांना आवडणार नाहीत ह्याची पण पुर्ण कल्पना होती, तरीही स्वतःशी प्रतारणा करून लिहायचे नाही हा विचार पक्का केला होता आणि आज जेंव्हा मागे वळून पहातो तेंव्हा आपण ठरवल्या प्रमाणे लिखाण केले याचा आनंद वाटतो . सुरुवातीला राजकारणावर बरंच लिहित होतो, पण नंतर हळू हळू राजकारणावरून ललित लेखनाकडे कसा वळलो ते माझे मलाही समजले नाही. कदाचित राजकारणावर लिहितांना लेख एकांगी होतो असे वाटल्याने ते टाळले गेले असावे असे वाटते.
आज दोन वर्ष पुर्ण झाल्यावर मागे वळून पहातांना एक प्रकर्षाने जाणवले की माझ्या सुरुवातीच्या लिखाणात इंग्रजी शब्द खूप वापरले जायचे, त्यांचं प्रमाण आजकाल नगण्य झालेले आहे. इथे ब्लॉग वर येऊन आवर्जून कॉमेंट्स लिहिणारे माझे मित्र मैत्रिणी- सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. जर लिहिलेल्या लेखावर कोणी कॉमेंट्सच दिल्या नसत्या, तर कदाचित इतका उत्साह टिकुन राहिला नसता, आणि ब्लॉग वर लिहिणं मी कधीच बंद केलं असतं. ब्लॉग वर लिहिता लिहिता बऱ्याच लोकांशी पर्सनली भेट झाली आणि ओळख पण झाली.व्हर्चुअल जगातले मित्र खऱ्या जगातले मित्र होऊन कधी मनाच्या कोपऱ्यात विराजमान झाले ते समजेलेच नाही. एखादा मित्र बरेच दिवस नेट वर दिसला नाही, की फोन करून ” काय रे बाबा, सगळं ’आलबेल आहे नां? ” म्हणून विचारलं जातं! आधी पण बरेचदा लिहिलं आहे, पण आता पुन्हा एकदा लिहितो, इथे ब्लॉगिंग करतांना कुठलाही स्वार्थ नसलेले बरेच नवीन मित्र मिळाले आहेत मला. आणि मला वाटतं की हाच सगळ्यात मोठा फायदा झालाय ब्लॉग वर लिहिण्याचा.
पहिल्या वर्षी जेंव्हा ब्लॉग लिहिणं सुरु केलं होतं, तेंव्हा ठरवलं होतं की पहिल्या वर्षी दररोज एक असे ३६५ पोस्ट्स टाकायचे. आणि एक वर्ष न चुकता अॅव्हरेज दिवसाला एक पोस्ट टाकू शकलो. वर्षाच्या शेवटल्या दिवशी ३६५ पोस्ट्स आणि एक लक्ष व्हिजिटर्सचा आकडा होता. सुरुवातीचे काही चांगले पोस्ट्स पण फारसे वाचल्या गेले नाहीत म्हणून त्यांचे एक इ बुक काढायची इच्छा आहे. पण माझ्याकडे ओपन ऑफिस नसल्याने ते अजून तरी शक्य होत नाही. पण या वर्षी मात्र कसंही करून काही लेख एकत्र करून एक ई बुक प्रसिद्ध करावे अशी मनापासून इच्छा आहे. अजुनपर्यंत जमलेले नाही ते कधी जमते ते बघायचे. 🙂
कथा वगैरे लिहिणे माझा प्रांत नाही, पण तरीही काही कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आणि नंतर बऱ्याच लोकांनी त्या आवडल्या म्हणून सांगितल्याने खूप बरं वाटलं. कथा पण शक्यतो ज्या प्रकारच्या कथा सगळे लोकं लिहितात तशा नसाव्या ही एक इच्छा मनात धरून लिहिल्या होत्या , पण नंतर लक्षात आलं की तो आपला प्रांत नाही, म्हणून सोडून दिलं. एक सुंदर कथा बिज सापडलं होतं पण तिन चार भाग लिहिल्यावर लिहिण्याचा कंटाळा आला म्हणून चक्क कथा “आवरली” आणि त्याच क्षणी ठरवलं की या पुढे कथा लेखन बंद- आणि जो पर्यंत कथा पुर्ण लिहून होत नाही तो पर्यंत ब्लॉग वर टाकायची नाही . या पुढे पण रोमॅंटीक कथा लिहिणार नाहीच असे नाही.. 🙂 पण खरंच खूप मनापासून वाटल्यावर..
दुसरया वर्षी मात्र दररोज एक हा संकल्प ठेवला नाही. कारण दररोज एक लेख लिहायचा म्हटलं, तर ब्लॉग वर बराच वेळ जायचा- पोस्ट लिहिणे, प्रतिक्रिया देणे, उत्तरं लिहिणे, इतरांचे ब्लॉग वाचणे वगैरे वगैरे… आणि या सगळ्या गोष्टींमधे प्रमाणापेक्षा जास्त गुंतल्याने , प्रसंगी इतर महत्वाच्या गोष्टींकडे पण दुर्लक्ष होत आहे असे जाणवले, म्हणून मग दररोज एक ऐवजी आठवड्यात एक किंवा दोन पोस्ट्स टाकायचे हे ठरवले.
दुसऱ्या वर्षाच्या शेवटी म्हणजे आजच्या तारखेला ब्लॉग ची स्थिती अशी आहे :-५२६ पोस्ट्स,१३०४१ कॉमेंट्स त्यापैकी अर्ध्या जरी माझी दिलेली उत्तरं समजले, तरीही इतरांच्या ६५२० कॉमेंट्स, इ मेल मधे ब्लॉग वरच्या लेखांची माहीती मिळण्यासाठी सब्स्क्राइब केलेले मित्रगण- २६८ आणि आजपर्यंतचा व्हिजिटर्स चा आकडा आहे ३,९७०१८.
या पुढे अजून किती दिवस लिहिण्याचा उत्साह शिल्लक रहातो हे बघायचं आता..
इथे ब्लॉगिंग करतांना कुठलाही स्वार्थ नसलेले मित्र मिळाले आहेत मला. आणि मला वाटतं की तोच सगळ्यात मोठा फायदा झालाय ब्लॉग वर लिहिण्याचा.
>>> लाख पते की बात.. 🙂
ब्लॉगच्या द्वितीय वाढदिवसानिमित्त अभिनंदन.. 🙂 या दरम्यान एक यशस्वी ब्लॉगर मेळावा देखील तू करून दाखवलास हे विसरू नकोस… 🙂 तिसऱ्या वर्षी वर्षाला ५२ (आठवड्याला १) पोस्ट पडल्या तरी पुरे होईल… 🙂 मी तर पहिल्या वर्षीपासून तेच करायचा प्रयत्न केला आहे… 🙂
रोहन,
आज पर्यंत कायम कामातच गुंतलेलो असायचो, त्यामुळे जे कोणी मित्र मिळाले ते कामाच्याच संदर्भातले होते. एकतर त्यांचे तरी काहीतरी काम असायचे माझ्याकडे किंवा माझे त्यांच्याकडे. पण इथे ब्लॉगिंग सुरु केल्यावर मात्र बऱ्याच नविन ओळखी झाल्यात. सगळ्याच फिल्ड मधले लोकं ओळखीचे झालेत- कुठलाही आणि कोणाचाही स्वार्थ नसलेले.
ब्लॉगर्स मिट साठी माझ्या पेक्षा तू आणि कांचननेच जास्त काम केले होते 🙂 नाही का??
Mahendra kaka,tumchya blogla 2 varsha purna jhalya baddal Hardik shubbhecha. Tumhi asech chan chan blog liha tyabaddal best luck. Jar kadhi ikde Singapore la yenar asal tar nakki kalava,aaplyala bhetayala mala nakkich chan vatel. Thank you.
स्नेहा
अगत्यपुर्वक आमंत्रणाबद्दल आभार. पण सध्या तरी मुलींच्या कॉलेजेस मुळे कुठेच बाहेर निघू शकत नाही . सुट्यांमधे क्लासेस असतात.. तेंव्हा सध्या तरी शक्य नाही. पण पुढेमागे कदाचित एखादी व्हिजिट होऊ शकते. किंवा तू मुंबईला /भारतात आलीस की भेटू या.. 🙂
अभिनंदन श्रीमंत!
असेच लिहिते राहा!
प्रमोदजी
मनःपुर्वक आभार.. अहो वेडंवाकडं लिहिलेलं वाचून तुम्हीकौतूक करता म्हणूनच तर उत्साह टिकून आहे.. पुन्हा एकदा आभार. 🙂
ब्लॉग ला दोन वर्षपूर्ण झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
कस्तुरी
मनःपुर्वक आभार… 🙂
Mahendraji..
Great…
Khoop khoop anand ani shubhechcha..
नचिकेत
धन्यवाद..
अभिनंदन महेंद्रजी. रोहनशी १००% सहमत.
अपर्णा
मला ते प्रकर्षाने जाणवले की इथे झालेल्या व्हर्च्युअल ओळखी खऱ्या ओळखीत कशा कन्व्हर्ट झाल्या ते समजलंही नाही..
काका, दुसऱ्या वाढदिवसाबद्दल अभिनंदन! या पुढे अजून किती दिवस लिहिण्याचा उत्साह शिल्लक रहातो हे बघायचं नाही, लिहावच लागेल तुम्हाला! तुमच्या वाचकांना हक्क आहे तुम्हाला हे सांगण्याचा!
अभिलाष
अवश्य! लिहीणे सुरु ठेवणार आहेच. कमीत कमी एक तरी पोस्ट असेलच आठवड्यातून. सध्या दोन चा रतीब सुरू ठेवला आहे. शुभेच्छांबद्दल आभार.
नमस्कार महेंद्रजी,
ब्लॉगच्या द्वितीय वाढदिवसानिमित्त अभिनंदन.
“प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे”
आपला,
श्रीकृष्ण सामंत
श्रीकॄष्ण काका,
अतीशय सुंदर कवीता. खरं तर तुमचे कौतूक करायला हवे , गेली कित्येक वर्ष सातत्याने ब्लॉगिंग करीत आहात..
शुभेच्छांबद्दल आभार.
mahendraji abhinandan!!
kwachit kadhitari mee marathi blogs vachato. aajakal baal-saloni lihine agadich kami zale aahe. parantu jevha kadhi vachato tevha tumacha blog sahasa vachato.
shubheccha.
पराग
धन्यवाद.. सलोनी आता पावणे दोन वर्षाची झाली असावी नाही का?? नविन फोटॊ टाका ना ब्लॉग वर
प्रतिक्रियेसाठी, आणि शुभेच्छांसाठी आभार.
अभिनंदन, ब्लॉगला दोन वर्षे झाल्याबद्दल आणि “चांगले” लिहीण्यात सातत्य राखल्या बद्दलही. सातत्याने लिहीणे व वाचकांना परत वाचायला यावे असे वाटत रहावे असे लिहील्याबद्दल परत एकदा अभिनंदन.
मी खरतर मागील जवळपास एका वर्षापासुन आपला ब्लॉग नियमीत वाचत आलोय. यात आपण विविध विषयांवर जे लिखाण केले ते खरोखरच वाचण्यासारखे आहे. वाचण्यासारख्या त्या प्रत्येक लेखाचा उल्लेख मी टाळतोय कारण अभिप्राय फार मोठा होण्याचा त्यात धोका आहे.
पुन्हा एकदा अभिनण्दन व असेच चांगले वाचायला मिळो ही कामना.
अजय.
अजय
काय उत्तर द्यावं प्रतिक्रियेला हेच समजत नाही. तुमच्या सगळ्यांच्या वेळोवेळी केल्यागेलेल्या कौतूकामुळेच टीकुन राहीलो इथे.
धन्यवाद..
many congrats and in a way its really a great achievement.
काका तुम्ही मराठी ब्लॉगर्ससाठी एक आदर्श प्रेरणास्त्रोत आहात.
प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मार्गदर्शक आहात.
वेगवेगळया विषयांवर आपली प्रामाणिक मते मांडण्याचा तुमचा हा प्रयत्न खरंच खूप स्तुत्य आहे.
तुम्ही घेतलेल्या, लिहिलेल्या विषयाबद्दल आम्ही कधी फारसा विचारही केला नसता परंतू तुमच्यामुळे आम्ही त्यावर विचार करू शकलो. आमची मते मांडू शकलो रादर मते बनवू शकलो…..काही काही विषयाबद्दल आपल्यालाही काही वाटते आपलीही काही मते आहेत हे तुमचा ब्लॉग वाचल्यावरच लक्षात आले…व ज्याचा तुम्ही नेहमी आदर केलात.
प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर दिले जाईल हे ही तुम्ही कटाक्षाने पाहिले…आपल्या वाचकाला नेहमी आपल्याबरोबर कनेक्टेड ठेवण्याचा तुमचा हा प्रयत्न तुमच्याबद्दल खरचं खूप काही सांगून जातो…
असो आवरतो आता…नाहीतर इथेच एक पोस्ट तयार होयची आणि इतरांना जे लिहायचे होते ते मीच लिह्ल्याने त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचायच्या नाहीत 🙂
पुन्हा एकदा “काय वाटेल ते” च्या या ७३० दिवसांच्या व ५२६ पोस्ट्सच्या वाटचालीबद्दल मनपूर्वक अभिनंदन!!!
रणजीत
आता मात्र अगदी लाजल्यासारखं होतंय. काय वाटेल ते लिहीण्याचा पायंडा जरूर घातला . हे ब्लॉगिंग म्हणजे मन मोकळं करण्याचा एक मार्ग हे लक्षात आल्यावर मात्र मग इथुन पाय काढता घेऊच शकलो नाही.
शुभेच्छांबद्दल आभार.
वाह… अभिनंदन काका.
तुमच्यामुळेच तर प्रेरणा घेऊन किती तरी जणांनी आपले ब्लॉग सुरू केलेत. मी एक त्यातलाच 🙂
बाकी काय म्हणू तुस्सी ग्रेट हो, असेच काय वाट्टेल ते लिहीत रहा.. 🙂
खूप खूप शुभेच्छा
सुहास
अरे मी फक्त कारण झालो, तुम्ही सगळे लिहू शकत होता, म्हणूनच ब्लॉग सुरु केलात तुम्ही. मला श्रेय देतो आहेस हा तूझा मोठेपणा.. 🙂
KayvaTelte la vaDhadivasachya shubhechcha aaNee tumche manapasun abhinandan . Swachcha , spashta vichar aNee susanskrit abhivyaktee ya saThee tucha lekhan mala nehamee avadata. Shivay itar bloggers na ekatra bandhun Thevanara asa ha ek duva ahe asa puN vaTata.( on a lighter note: sarva bloggers swata: naveen kahee lihila ke e tumchya blog var yeun te comment takatat aNee visible hotat, muG tyanchya blog var puN visit kela jata:-) kidding of course , te eravee hee ithe niyameet yetat he mala mahit ahe, no offense meant! and apologie sin advance)
Hope the ebook and a real book shapes up some time soon!
स्मिता
धन्यवाद..
खरं सांगू का? खूप मोकळं वाटतं मनात आलेलं लिहून टाकलं की- आजकाल तर ब्लॉग वर लिहिले नाही तर मानसिक कुचंबणा झाल्यासारखं वाटतं. अजूनही , खरं तर तिन चार पोस्ट्स लिहायच्या आहेत, पण सध्या थोडा कामात व्यस्त असल्याने शक्य होत नाही.
मराठी ब्लॉगर्स मिट झाली होती मुंबईल, तेंव्हा ६० च्या वर ब्लॉगर्स आले होते. बरेच कॉमेंट्स देणारे तेंव्हा भेटले. नंतर काही ब्लॉगर्स , परदेशात रहाणारे, भारतात आल्यावर आवर्जून घरी येऊन गेले. खूप छान वाटायचं कोणी भेटलं की.
शुभेच्छांसाठी आभार. 🙂
>>>>इथे ब्लॉगिंग करतांना कुठलाही स्वार्थ नसलेले मित्र मिळाले आहेत मला. आणि मला वाटतं की तोच सगळ्यात मोठा फायदा झालाय ब्लॉग वर लिहिण्याचा.
+१००
महेंद्रजी लिहीत रहा…. आम्ही नुसते वाचत नाही आहोत तर दरवेळेस तुमची पुढची पोस्ट कधी अशी वाटही पहात आहोत 🙂
मन:पुर्वक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा 🙂
तन्वी
धन्यवाद.. 🙂
काका सर्वप्रथम तुमच्या ह्या उपक्रमा बद्दल हार्दिक अभिनंदन! आत्तापर्यंत तुम्ही जी माहिती आम्हाला एवढी निस्वर्थाने दिली त्या बद्दल तुमचे मानावे तितके आभार कमीच ठरतील. राहाताराहीला प्रश्न येथून पुढे लिखाण करण्याचा तो आणखीन वाढणार आहे हे मीच काय परंतु आम्ही सर्व खात्रीने संगु शकतो. दोन पाचजण वगळता तुम्ही आम्हाला प्रत्यक्षात कधीच पाहिलेले नाही परंतु आत्ता पर्यंतच्या आपल्या वैचारिक देवाण-घेवाणीतून एक सुंदर भावनिक नाते निर्माण झाले आहे! तेंव्हा आता तुम्ही लेखन बंदच करू शकणार नाही हे नक्की. पुढच्या पोस्टची आवर्जून वाट पाहत आहोत.
हेमंत
सुंदर प्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार.
लिहीणे सुरु ठेवणार आहे हे नक्की.. आणि ते पण नियमीत पणे.
भेटत राहू इथेच.. किंवा लवकरच पुन्हा ब्लॉगर्स मिट केली तर तेंव्हा.. 🙂
>> इथे ब्लॉगिंग करतांना कुठलाही स्वार्थ नसलेले मित्र मिळाले आहेत मला.
खरं आहे काका. “निस्वार्थ” प्रचंड दुर्मिळ असून मराठी ब्लॉग जगतावर मात्र अनुभवायला मिळतो.
दुसर्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन आणि ‘काय वाटेल ते’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
सिद्धार्थ
धन्यवाद… 🙂
काका ,पहिल्यांदा अभिनंदन
एक विचारू , सर्व कामधंदे करून तुम्हाला हे जमत कस काय ? न्यानदान करता तुम्ही नी तुमचे वाचून आम्हीही चार उपदेश सांगतो लोकांना…… खरोखरीच पुण्यवान आहात
संतोष
काय वाटेल ते लिहायला फार तर एक तास भर लागतो, आणि तेवढा सहज काढता येतो दिवस भरात. 🙂 आभार.
अभिनंदन काका…. 🙂
ज्योती
धन्यवाद.. अरे तू सिडी न्यायला येणार होतीस ना? मी उद्या आहे ऑफिसमधे- आलीस तरीही हरकत नाही उद्या.
Dwitiya warshachya hardic shubhecha . I can only pray’ Lihinaryane lihit jave vachakane vachat jave asech aapale nate sadaiw rahave hich saddicha’.
कपिला
सुंदर ओळी आहेत.. मनःपुर्वक आभार..
खूप खूप अभिनंदन!!! दोन वर्षांपासून ब्लॉगिंग करणे साधी गोष्ट नक्कीच नाही. कामाचा व्याप, रोजची दगदग सांभाळून करतांना जीव हैराण होतो. मला विचारलं तर, तुमच्या नोंदी नेहमीच मार्गदर्शक ठरलेल्या आहेत. तुमची राजकीय मते, किंवा अनेक विषयावरील तुमची चर्चा मलातरी कधी एकांगी वाटलेली नाहीत. अगदी माझ्या मनातलं बोलता. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे तुमचा स्वभाव. थोडक्यात सांगायचे झाले, तर तुम्ही या ब्लॉग विश्वाचे ‘राजे’ आहात. मराठी ब्लॉगमध्ये जे खूप चांगले ब्लॉग मानले जातात त्यातील एक तुम्ही आहात. दोन वर्षचे भविष्यात वीस आणि पाचशे सव्हीस नोंदींचे पाच हजार पेक्षा अधिक नोंदी होवो. आणि आम्हाला नेहमीच तुम्ही असेच ‘दीपस्तंभ’ म्हणून सदा तळपत राहो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना!!!
Hemant+1 🙂
हेमंत
अरे बाप रे. ओशाळल्यासारखं वाटतंय तूझी कॉमेंट वाचल्यावर..
मनःपुर्वक आभार..
आपल्या ब्लोगला २ रया वर्षानिमित शुभेच्छा,आपल्रे लेख खरोखर चांगले असतात, असतेच आपण लिखाण चालू ठेवावे,व आम्हा सर्वाना चांगले वाचण्याची संधी दिली,व देत राहा ,परत आपले व ब्लॉगचे अभिनंदन
,महेश
अभिप्रायासाठी आभार.
धन्यवाद..
Congrats…
अभिनंदन काका !!!!!
गौरव , सतीश
शुभेच्छांची आवश्यकता आहेच. मनःपुर्वक आभार.
Heartiest Congrats, tumchya sarkh 1% jari lihita aal tari baas….khar tar hya blognech prerna milali aahe
अश्विनी
धन्यवाद.. पण बरेच ब्लॉग सुरु झाल्यावर नियमीत अपडेट होत नाहीत 🙂 कोणाला उद्देशून बोलतोय मी हे…??
अभिप्रायाबद्दल आभार..
kalale…point noted
congrats……
keep writing..jeva jitke jase jamel tevdhe……
Aajkal mala masike wachnyapeksha blog wachne awadte….mostly anumhavatun alele likhan aste ani wegli thikane goshti mahit hotat….
Madhuri
माधुरी
शुभेच्छांसाठी मनःपुर्वक आभार.. 🙂
नमस्कार ,
काका आपले अभिनंदन…….खरा आहे “सातत्य “ मग ते कुठल्याही ठिकाणी असो अनेकांना नाही साधला जात..पण तरी आपण ते साधलाय ….. शब्दांच्या या विश्वात आपला प्रवास असाच सुरु राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना ….गुगल काकान वर काहीतरी शोधताना अचानकच आपला ब्लोग काही दिवसांपूर्वी दृष्टीपथात आला …खरा तर तेव्हा ब्लोग काय असता हे देखील माहित नव्हता …..पण आपला ब्लोग वाचता वाचता कळाला हळूहळू आणि अनेक विषयांबाबत माहितीही मिळाली “सखी” ,”नवस” ,”चिरंजीव बाबाना”,”प्रेमात पडणाऱ्यांची लक्षणं” (खरा तर याबाबत काहीही माहित नव्हते इथे वाचून बराच काही कळाला ) अशा किती तरी पोस्ट आहेत (यादी दिली तर माझी प्रतिक्रिया लांबेल म्हणून थांबते )….ज्यामुळे अनेक नवीन माहिती मिळाली …धन्यवाद …!!
काश्मिरा
ब्लॉग वर स्वागत. आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल पण आभार. तुमच्या सारखे सुऱ्ह्द आहेत म्हणूनच लिहिणे सुरु आहे.
पुन्हा एकदा आभार..
काका खूप खूप अभिनंदन…या ब्लॉगचं कौतुक मी काय करणार…सगळे नंबर्स अव्वलच आहेत..
ब्लॉगच्या विश्वातून प्रत्यक्ष भेटलेल्यापैकी तुम्ही आहात त्यामुळे आता ते नातं ब्लॉगर-वाचकाच्या पलिकडे पोहोचलंय…नेहमी प्रतिक्रिया आल्या नाहीत तरी खंत नसते त्यामुळे…
माझा पहिला फ़ॉलोअर तुम्ही आहात म्हणून थोडंफ़ार खरडायची हिम्मत आली….असे माझ्यासारखे बरेच असतील…
मराठी ब्लॉग विश्वचा खूप मोठा वाटा आहे, हेही अगदी शंभराच्या जास्त टक्के खरंय…
अपर्णा
प्रत्येकामधेच एक लिहिण्याचा स्पार्क असतो, फक्त लोकं तो ओळखु शकत नाहीत. माझं तर मत आहे कीप्रत्येकानेच काही तरी लिहित राहाणे आवश्यक आहे. हळू हळू सवय होते, आणि मग विषय पण सुचत जातात.
एकच सांगायचंय.. तू पण लिहित रहा… 🙂
काका…सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन….तुम्हाला एक गंमत सांगु का…माझ्या अग्निकोल्ह्यात कायमस्वरुपी म्हणुन दोन साइटस सेव आहेत एक गुगल अन दुसरी “काय वाट्टेल ते….”…दिवसाची सुरुवातच ही तुमच्या ब्लॉगवरुन होतो…खुपदा अस होत पोस्ट वाचली जाते पण कमेंट करायच राहुन जात….कितीही कामात असो तुमची पोस्ट आली की धावती का होइना वाचतोच.
मला तुमचा ब्लॉग हा खर तर गुगल बाबांच्या कृपेने सापडला…अन त्यानंतर मला मराठी ब्लॉग नेट सापडल 🙂
तुमच्या लिखाणात एक वेगळेपण ते म्हणजे तुम्ही जे काही लिहता ते म्हणजे अगदी साध सरळ अगदी तुम्ही आ्मच्याशी गप्पा मारताय असच वाटत.
बझ येण्यापुर्वी तुमची पोस्ट यायला थोडा उशीर झाला की विचार पडायचा का बर लिहल नसेल??? काय अडचण असेल?? कशामुळे लिहल नसेल?? (हे तुम्हाला थोड विनोदी वाटेल पण हे अगदी खर आहे…माझ्या बाबतीत नेहमीच घडायच) पण आता बझ अन फ़ेबु मुळे अपडेट मिळुन जातो त्यामुळे तसा विचार कमी झालाय. 🙂
असो खुप मोठी कमेंट झाली….अशेच लिहीत रहा अन आम्हाला आनंद देत रहा. 🙂
योगेश
तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांमुळेच इथपर्यंत येऊ शकलो. रेग्युलर लिहिणं शक्य होतं, पण नंतर इतर काही करायला लक्षंच लागत नाही- म्हणून थोडं रिस्टिक्ट केलंय लिहिणं.तरीही आठवड्यात एक दोन तरी पोस्ट असतीलच..
येत रहा.
अभिनंदन !
आम्ही जरा तुमच्या ब्लॉगचा वाढदिवस लेट साजरा करत आहोत 😉
तुमच्या सारखं लेखन मला कधी जमणार व माझा ब्लॉग कधी असा भरभरून वाहणार ते देवच जाणे ( दोन्ही देव 😉 )
राजे,
काय राव, चेष्टा करता काय?
शुभेच्छांसाठी आभार..
अभिनंदन 🙂
देवदत्त
आभार!
काका, अभिनंदन.
पुढील वाटचाली साठी खुप खूप शुभेच्छा
असेच लिहीत रहा ……
सचिन
🙂 आभार
जगात (ईतक्या) लोकांना ईतकी फ़ूरसत आहे हे उमगल्या मूळे बरे वाटले..
(मी मलाच मोकाट समजत होतो !!)
बाकी अभिनंदन…बक अप.. वा! वा!… लीहीत रहा
मोकाट सुटलेले बरेच आहेत .. तू पण सुटलेला आहेसच, तेंव्हा ब्ल~ऒग का सुरु करत नाहीस?
अभिनंदन ,
आजची पोस्ट वाचून खूपच आनंद झाला . तुमची नियमितता , चिकाटी, सर्वाना तुम्ही ज्या पद्धतीने उत्तरे देता ती आपुलकी , तुमचा अनुभव , सर्वांशी शेअर करण्याचा कमालीचा उत्साह , हे सारे सारे अत्यंत अभिनंदनीय , कौस्तुकास्पद आणि शिकण्याजोगे आहे .
तुमच्या इ बुक साठी खूप खूप शुभेच्छा , आम्हाला ते लवकरात लवकर वाचायला मिळो .
सुमेधा
इ बुक चं मला काही अजून निटसं समजलेलं नाही, पण लवकरच काहीतरी करणार आहे त्याचं.. शुभेच्छांची तर आयुष्यात खूप गरज असते, टॉनिक प्रमाणे काम करतात शुभेच्छा.मनःपुर्वक आभार.
महेंद्र, करावे तितके कौतुक कमीच आहे. सातत्याने व प्रामाणिक राहून तू लिहीत असतोस. आम्ही नुसते वाचत नाही तर दरवेळेस तुझी पुढची पोस्ट कधी अशी वाटही पहात असतो.
इथे ब्लॉगिंग करतांना कुठलाही स्वार्थ नसलेले मित्र मिळाले आहेत मला. आणि मला वाटतं की तोच सगळ्यात मोठा फायदा झालाय ब्लॉग वर लिहिण्याचा.
+१००
मन:पुर्वक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा 🙂
भाग्यश्री
सातत्य राखता आलं, ते नियमीत पणे लोकं वाचत होते म्हणून. 🙂 नाहीतर कधीच गुंडळला गेला असता ब्लॉग.
शुभेच्छांसाठी आभार.
आणि चार लाखाचा आकडा ओलांडलास, पुन्हा एकवार अभिनंदन! लवकरच ’इ बुक ’ ही निघेल, मला खात्री आहे. 🙂
धन्यवाद..
काल मलाअ वाटत नव्हत होतील म्हणून. पण झालेत 🙂
खरंच एक माइल स्टॊन पार केल्यासारखं वाटतंय.
2 varsh ani 4 lakh visit donhiche abhinandan kaka 🙂
ata party kadhi 😉
पार्टी लवकरच.. कधी येणार मुंबईला सांग..? किंवा मी कधी फलटणला आलो तर..
धन्यवाद..
mi wordpress var navin member aahe,mi blog create kela aahe pan mala marathi font madhye type karta yet naahi mazi madat karaal ka? marathi madhye mi blog kasa lihu shakto?
Suraj
http://baraha.com
या साईट वर फ्री सॉफ्ट वेअर आहे, ते डाउन लोड करून तुम्ही टाईप करू शकता मराठीमधे.
दुसर्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन, काका! वरच्या सगळ्या प्रतिक्रिया बघितल्यावर आता अजून नवं सांगण्यासारखं काही उरलं नाहीये … त्यामुळे एवढंच म्हणते की हा ब्लॉग आणि त्याच्या माध्यमातून जमलेलं मैत्र असंच वाढत राहू देत!
गौरी
खरंच किती लोकं निरनिराळ्या विश्वातले, निरनिराळ्या नोकरीतले आपण एकमेकाला ओळखायला लागलो नाही का?
गम्मत वाटते मला तरी. 🙂
श्या.. एवढ्या महत्वाच्या पोस्टला एवढ्या उशिरा प्रतिक्रिया देतोय मी.. काय करणार. घरातला एकेक जण नंबर लावून आजारी पडत होता.. त्यामुळे नेट वर खूपच कमी होतो गेले ४-५ दिवस. असो.
वर सगळ्यांनी लिहिलंच आहे पण पुन्हा सांगतो. काका तुमचा ब्लॉग म्हणजे समस्त ब्लॉगर्ससाठी एक ध्रुव तार्याप्रमाणे आहे. आदर्श ब्लॉग (आणि ब्लॉगर) कसा असावा याची दिशा दाखवणारा.. !!
ब्लॉगविश्वातले निदान निम्मे ब्लॉग्ज तुमच्या ब्लॉगच्या प्रेरणेने सुरु झाले असावेत नक्की !!
असेच लिहीत राहा आम्ही वाचतोय.. आणि हो इ-बुक आणि पेपरबॅक दोन्ही येऊद्या लवकर 😀
>> ब्लॉगविश्वातले निदान निम्मे ब्लॉग्ज तुमच्या ब्लॉगच्या प्रेरणेने सुरु झाले असावेत नक्की !! +१ 🙂
हेरंब
अरे मी पण इतक्यात थोडा कमीच होतो ब्लॉग वर. आता कशी आहे तब्येत वगैरे? काळजी घ्या रे बाबांनो..
इ बुकचं खरच काढायचंय. 🙂 या वर्षी तरी नक्की.
अरे तुझी ्कॉमेंट सुहासच्या खाली पोस्ट झालेली दिसते..
महेंद्रजी! वाचून आनंद झाला. ब्लोगला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! Its really successful blog. Keep it up.
रविंद्रजी
शुभेच्छांसाठी मनःपुर्वक आभार.
नमस्कार काका, अनुदिनीच्या दुसर्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या !!
तुम्ही असेच लिहित जा.
अक्षय
शुभेच्छांसाठी आभार..
काका अभिनंदन ……………….आपल्या नेहमी असेच लिहीत राहा हीच आमची शुभेच्छा ..!!
माझ्यासाठीही आपण प्रेरणा स्थान आहात………!! तुमची सहज-सरळ आणि स्पष्ट लिखान शैली मला भावते खूप ..!!
जान्हवी
ब्लॉग सुरु केला की नाही?
मनःपुर्वक आभार..
ब्लोग वर एक पोस्ट टाकली होती …नंतर माझ्या कडे नेट problem झालेला …आता आधी ब्लोग ची मांडणी नीट करून घ्यावी मग च पोस्ट टाकावी असा विचार आहे बघू किती जमतंय ..आपली मदत राहिलाच …..आणि हो blogspot कि wordpress उत्तम राहील ते आधी सांगा मला …….!!
मला ब्लॉगर चा अनूभव नाही, म्हणून वर्डप्रेसच आवडतो.
अभिनंदन !!!
हर्षल
धन्यवाद..
ब्लॉगला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आपलं लिखाण मला नेहेमीच मार्गदर्शक ठरलं आहे, ही वाटचाल अविरत अशीच चालत राहो ही शुभेछ्छा.
सदानंद
तुमच्या सदिच्छांच्याच बळावर इथे टिकुन आहे. मनःपुर्वक आभार.
काका, अभिनंदन!!!!
गेले कित्येक दिवस मी आपले लेख वाचतोय. खुपच छान लेख आहेत तुमचे.
ते वाचण्यात गुंतल्याने कमेंट टाकता आली नही
७३० दिवस ५२६ पोस्ट्स..
अबब…
जवळपास १.३८ दिवसाला १ लेख….
तेही अप्रतीम…….
रोहीत
पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलीस.. आभार..
ब्लॉगच्या द्वितीय वाढदिवसानिमित्त अभिनंदन!!!
मनःपुर्वक आभार.. 🙂
😛
😀
ब्लॉगच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन!!!
सुप्रिया
मनःपुर्वक आभार. मध्यंतर बरेच दिवस नेट वर नसल्याने उत्तरास उशीर होतोय.