सांचीचा स्तूप

पाच रुपयांच्या नोटेवर एक चित्र नेहमी असायचं, ते पाहिलं की त्या बद्दल एक वेगळंच आकर्षण वाटायचं,  ते चित्र होतं ’सांची स्तूप’. बौद्ध धर्मीयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले हे ठिकाण आज वर्ल्ड हेरीटेजच्या नकाश्यावर अग्रस्थानी आहे. कित्येक वर्ष ’सांची’ ही जागा  कुठेतरी बिहारात आहे असे वाटायचे मला.

कामानिमित्त भोपाळ हून विदीशा मार्गे बीनाला जायला निघालो. जातांना अल्पोपाहारासाठी म्हणून विदीशाला थांबलो. विदीशाला प्रसिद्ध असलेली कचोरी आणि जिलबीचा नाश्ता करून पुढे निघणार, तेवढ्यात एक प्रवासी गट समोरून आला, आणि नुकतेच पाहून आलेल्या स्तूपाच्या जवळ साधे पाणी पण मिळू शकले नाही म्हणून त्यातले लोक वैताग व्यक्त करीत होते. त्यांचं बोलणं ऐकून उत्सुकता चाळवली आणि ते कुठल्या स्तूपाबद्दल बोलताहेत आणि तो कुठे आहे याची चौकशी केली, तर समजलं की फक्त ९ किमी अंतरावर हे सांचीचे स्तूप आहे.जातांना थोडी वाकडी वाट करून स्तूप पाहून मग पुढे बीनाला जायचे ठरवले.

आम्ही जेव्हा त्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा तिथे मप्रचा कडक उन्हाळा सुरू होता. कारच्या वातानुकुलीत सौख्यामधून बाहेर आल्यावर उन्हाचे चटके बसत होते अंगाला.पायातल्या बुटांच्या तळव्याखाली पण उष्णता जाणवत होती.   या स्तूपाशेजारी खूप सुंदर बाग केलेली आहे. आम्ही जवळपास कुठे गाईड वगैरे दिसतो का म्हणून चौकशी केली, पण अर्थात तिथे कोणीच नव्हते. फक्त काकडी विकणारा एक माणूस मात्र झाडाखाली बसला होता, तो म्हणाला कोणी व्हिआयपी येणार असेल तर काही साहेब लोकं येतात इथे.

तसं म्हटलं तर ’सांचीचा’ संबंध कधीच  गौतम बुद्धाशी आला नाही. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्याला एक जागा हवी होती की जी शहरापासून फार दूर पण असू नये आणि फार जवळ पण असू नये – जेणेकरून बौद्ध भिक्खूंना भिक्षा मागण्यासाठी फार दूर जावे लागू नये . याच उद्देशाने विदिशापासून साधारण ८-९ किमी वर असलेली ही सांचीच्या स्तूपाची जागा निवडण्यात आली होती

. या स्तूपाचे पौराणिक वास्तू संशोधनाच्या दृष्टीने म्हणून महत्त्व खूप जास्त आहे याचे पहिले कारण म्हणजे ह्या स्तूपाच्या निर्मितीचे काम सम्राट अशोकाने इ.स. पूर्व २७३ साली सुरू केले होते .  ख्रिस्त पूर्व काळात निर्मिलेल्या फार कमी वास्तू आज अस्तित्वात आहेत  , त्या पैकी ही एक! या दोन्ही कारणांमुळे या स्तूपाचे महत्त्व खूप वाढते.

स्तूपाचे काम जरी इ.स. पूर्व २७३ साली सुरू झाले असले, तरीही त्या नंतरच्या ५०० वर्षाच्या काळात मुख्य स्तूपाच्या आसपास अशा अनेक स्तूपाचे आणि मठांचे काम १२व्या शतकापर्यंत सुरू राहिले. या मठांमध्ये बौद्ध भिक्खू राहून अर्चना करीत, आणि भिक्षा मागण्यासाठी जवळपासच्या गावात जात असत . ही जागा इतकी अद्वितीय आहे, की त्या काळात ( म्हणजे इस पूर्व) जगात कुठेही अशा प्रकारचे बांधकाम तयार झालेले नाही. इतके असून सुध्दा   ह्या  स्तूपाची जागा म्हणजे एक असेच दुर्लक्षित वर्ल्ड हेरीटेज ठिकाण आहे . भारतीय लोकं भोपाळला गेल्यावर सरळ पचमढीला निघून जातात, पण केवळ ६८ किमी वर असलेल्या ह्या जागेला कोणीच फारशी भेट देत नाहीत.

या स्तूपांनी बौद्ध धर्माचा सुवर्णकाळ पाहिलेला आहे. १८१८ पर्यंत ह्या स्तूपाचे अवशेष पुर्णपणे दुर्लक्षित होते, म्हणजे या स्तूपाचे अस्तित्व किंवा मह्त्व पण कोणालाच माहीत नव्हते. पण १८८१ मध्ये काही ब्रिटिश अधिकार्‍यांच्या नजरेत हा स्तूप आल्यावर मात्र या जागेवर बरंच उत्खनन करण्यात आले , आणि बाहेर निघालेल्या या स्तूपाची दुरुस्ती पण करण्यात आली. हे दुरुस्तीचे काम १९१२ ते १९१५ या काळात झाले .

स्तूप म्हणजे काय?? तर, गौतम बुद्धाच्या परीनिर्वाणाची खूण म्हणजे स्तूप असे म्हटले जाते.

मुख्य स्तूपाच्या समोर असलेले ते सुंदर कोरीव काम असलेले चारही  दिशांना असलेले द्वार पाहिले, आणि नकळतच मनातल्या मनात त्या कारागिरांना हात जोडले गेले. या कमानींवर  अतिशय सुंदर असे कोरीव काम केलेले आहे. त्या कोरीव कामामध्ये बौद्ध धर्माच्या काही प्रतीकांचा वापर  करण्यात आलेला आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी चार दारं (कमानी) आहेत, एका कमानीवर जातक कथा, तर दुसर्‍या एका कमानीवर गौतम बुद्धाच्या चरित्रातले काही प्रसंग पण कोरून दाखवण्यात आलेले आहेत. त्यावरची सगळी चित्र काही वाचता आली नाहीत, आणि त्यामुळे गाईडची कमतरता प्रकर्षाने जाणवली.

इसवीसन पुर्वीचे इतके सुंदर कोरीव काम ्जगात कुठेच नसावे .

या स्तूपामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घुमटाचा आकार..घुमटाचा आकार बनवणे हे इंजिनीअरिंगच्या दृष्ट्या फार कठीण समजले जाते. पूर्वीच्या काळी केवळ दगड व्यवस्थितपणे चौरस आकारात कापून आणि माती वापरून एकत्र बसवून बनवलेला घुमटाचा आकार केला आहे तो शंभर टक्के अचूक आहे. त्यात तसूभरही चूक नाही! . ख्रिस्त पूर्व काळात , कुठलीही औजारं नसताना इतकी सुंदर कलाकृती कशी काय निर्माण केली गेली असावी ? हा प्रश्न राहून राहून मनात येत  होत

या स्तूपाचा अक्ष पण पृथ्वीच्या अक्षाशी समांतर आहे. पूर्वीच्या काळी हे साध्य करायला काय केले असावे? हा प्रश्न मनात उठत होता. या मुख्य स्तूपाच्या शेजारीच अर्धवट तुटलेले वगैरे असे दुसर्‍या स्तूपाचे नुतनीकरण केले गेले आहे, पण हा मुख्य स्तूप म्हणजे कलाकारीचा अप्रतिम नमुना समजला जातो .

स्तूपाच्या वरून एक प्रदक्षिणा घालण्याची सोय केलेली आहे, चारही दिशांना सातपुड्याच्या रांगा , आणि उन्हामुळे वैराण झालेली जमीन दिसत होती. समोर बनवलेली बाग मात्र अगदी व्यवस्थितपणे राखली असल्याने डोळ्याला आल्हाददायक वाटत होते. एक उत्कृष्ट आणि महत्त्वाची पौराणिक वास्तु म्हणून अवश्य भेट द्यायला हवी.

बौद्ध धर्मीयांच्या मते देखील गौतम बुद्धाशी संबंधित नसल्याने ह्या वास्तुला फारसे धार्मिक महत्त्व दिले जात नसावे, आणि म्हणूनच फारशी वर्दळ पण इथे नसते .तरीही एकदा आवर्जून भेट द्यावी असे हे एक ठिकाण आहे.

पूर्व प्रकाशित ’शब्दगारवा’

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , . Bookmark the permalink.

16 Responses to सांचीचा स्तूप

 1. Sneha says:

  Mahendra kaka, far chan mahiti dili aahe tumhi. Aani photo madhye tya kamani varachi kalamusar tar ekdam sahi aahe. As usual tumcha ha post khup chan aahe. Khup vaat pahat hote tumchya post chi. Aata vachalyavar bar vatatey.Thank you.

  • इतकी सुंदर वास्तू पण आपल्याला अजिबात कौतूक नाही. मी जेंव्हा तिथे गेलो होतो, तेंव्हा कोणीही नव्हतं तिथे. इसवीसन पुर्व काळातले हे बांधकाम खरंच अवर्णनीय सुंदर आहे. तिथे गेल्यावर मिळणारी शांतता शब्दातीत आहे .

   • thanthanpal says:

    महेंद्रजी सांचीचा स्तूप म्हणजे काय हुमायून ची कबर किंवा शेकडो बायांचा जनानखाना बाळगणाऱ्या तरीपण प्रिय मुमताज चा ताज आहे का? जो आमच्या सर्वधर्म समभाव या तत्वात बसून जगाला कौतूकाने दाखवता येईल. या तत्वात बसत नसेल तर त्याची आम्ही का काळजी करावी.
    http://thanthanpal.blogspot.com/2011/01/blog-post_21.html read more.

    • खरं आहे. आपल्याकडे अफजल खानाचा संत होऊ शकतो.. पण इतके महत्व्चाचे ठिकाण दुर्लक्षित राहू शकते. लोकं भोपाळला जातात, पचमढीला जाण्यासाठी. एक दिवस एक्स्ट्रॉ हातात ठेऊन हा स्तुप पहायला पण जाऊ शकतात. वर्ल्ड हेरीटॆज आहे ही जागा. 🙂

 2. Smita says:

  chaan off beat jagechee mahitee dilit, nice post.

  • स्मिता
   मी पण तिथे नशिबानेच पोहोचलो. ठरवून मी पण तिथे कधी गेलो नसतोच.. खूप सुंदर आहे हा स्तुप.. अप्रतीम..

 3. Pingback: सांचीचा स्तूप | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 4. Raj Jain says:

  सांची स्तूपाला २००० च्या आसपास दिलेली भेट आठवली.
  फोटो पाहून तर नक्कीच चांगले बदल झालेले दिसत आहेत.
  सांची स्तूपाचा इतिहास व पृष्टभुमी जर नीट माहिती असेल तर हे स्थळ पाहताना अवर्णनीय आनंद होतो.

 5. mau says:

  चांगली माहिती दिलीत…फोटो पाहुन नक्किच बघायला जावेसे वाटते आहे.

  • इसवीसना पुर्वीचे बांधकाम आणि कोरीव काम तर अतीशय अप्रतीम आहे. मला स्वतःला आर्किओलॉजिकल महत्वाच्या वास्तू बघायला खूप आवडतात. कधीगेलात भोपाळला तर अवश्य जाऊशकता. रेल्वेने गेल्यास फार तर एक तास लागतो.

 6. Prasad Tharwal says:

  aapan bhartiya… Paris la jaaun Eiffel Tower baghu.. pan aaplya deshatil he asle “Architectural Marvels” nahi pahnar…!!! Jar aaplyala swatalach aaplya sanskruticha ani Pauranik Vastuncha abhiman nasel tar aapan itarankadun ka apeksha karavi..??

  • अशीच दुर्लक्षित एक जागा अजुन आहे. पावागड जवळ. वर्ल्ड हेरीटेज च्या संरक्षणात असलेली ही साईट पण अशीच दुर्लक्षीत आहे. त्यावर पण लिहीणार होतो, पण सगळे एकसारखेच पोस्ट होतील म्हणून थांबलोय..

 7. siddhesh says:

  stup means buddhachya parinirvanachi khun.
  kaka pari-nirvan mhanje kay?

  • परीनिर्वाण म्हणजे मृत्यु.. पण बुद्धाच्या बाबतीत परीनिर्वाण हा शब्द वापरला जातो.

 8. Arun Bandi says:

  Halli ek anandaci ani samadhanachi goshta mhanaje hindu muslim ladies madhle vaichariK,ani manasik ani vartunukitil pharakache uchhatan viala lagle ahe.
  Me prtyaksha drushya parinamabaddal boltoy!
  Aajkal muslim striyapramane baki sarva dharmachya striyamadhye ang ani chehra zakanyachi sammati vadhate ahe,infact tya asha crazy pan hot chalalya ahet.
  Ani changed time pramane hallichya muleena aapla chehra dakhvinyapeksha body part dakhvine jast soyiskar vatte ahe.
  Hee manasikata ka vadhatey yache khare karan kunitari pragati fast vachanari ani angikarnari streech lihu kinwa sangu shakel.

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s