खाद्ययात्रा. उबाळू..

खाणे हा माझा आवडता पास-टाइम उद्योग आहे. काही करमत नसलं, की सौ.च्या ओरड्याकडे दुर्लक्ष करून स्वयंपाक घरातले खाऊचे डबे हुडकणे हा माझा आवडता छंद ! प्रत्येक ’चांगल्या’ गोष्टीला शेवट हा असतोच, म्हणूनच माझ्या आवडीच्या छंदाकडे आजकाल मला दुर्लक्ष करावे लागते आहे- कारण?? अर्थात वाढलेले वजन.

डायटींग सुरु करायचे तर  घराबाहेर पडल्यावर हॉटेल मधे काय खायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो-   गेला आठवडा  तर पुर्ण  बाहेरच होतो, त्या मूळे  सारखं हॉटेल मधेच खावं लागलं . हॉटेल मधे शिरल्यावर हल्ली माझी ऑर्डर ठरलेलीच आहे, मेनु कार्ड पहाण्याची तसदी पण घेत नाही मी ! अहो करायचं तरी काय मेन्यु कार्ड बघून? शेवटी आपलं  ठरलेलं दाल फ्राय, तंदूरी मधली एक नॉन व्हेज डीश, सॅलड आणि एक रोटी  इतकं मागवलं की झालं. स्पाइसी करी वगैरे एकदम बंद केलंय , कॅलरी कॉन्शस झाल्यामुळे.

ह्या सगळ्यामुळे  ऑर्डर करतांना, पदार्थांचे फार कमी   ऑप्शन्स उरतात.    करी खायची नाही, मग नॉन  व्हेज मधे  फक्त तंदूरीचा   चॉइस उरतो. आपल्याकडे कबाब पण चक्क डीप फ्राईड असतात ,  आणि रेड मीट खायचं नाही, तेंव्हा सेफ बेट म्हणजे    चिकन टीक्क्याचा आचारी, पुदीना, किंवा  एखाद्या प्रकारावरच  समाधान मानावे लागते. प्रत्येक हॉटेल मधे चिकन टीक्क्याचे व्हेरीय़ंट्स वेगवेगळ्या नावाने मिळतात , त्यामुळे ऑर्डर करतांना पण बरंच कन्फ्युज होतं. यावर उपाय म्हणजे वेटर ला बोलावून मेन्युकार्डातल्या पदार्थाची माहीती विचारणे – आणि मुख्य म्हणजे डीप फ्राईड है की तंदूरी हे विचारल्याशिवाय ऑर्डर करता येत नाही. एक लक्षात आलंय, की    खाण्यासाठी ’च’ जगणाऱ्याच्या किंवा खाण्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसाच्या  जर  खाण्यावर च  स्वयंघोषीत  बंधनं आली  तर त्याची खूप    मानसिक घालमेल  होते.

टूरला गेलो असतांना खिशात हजारो रुपये असतात, हॉटेल मधे गेल्यावरचे खर्च पण कंपनी एक्सेन्सेस अकाऊंट वरच कंपनीलाच , त्यामुळे ती पण काळजी नसते. पण  इतकं असलं  तरीही स्वतःच्या मनावर ताबा ठेऊन फक्त दाल फार आणि वर दिलेल्या इतर डिश  मागवून आपण त्यावरच  समाधान मानू शकतो हे लक्षात आलं -आणि जाणवलं की  वेळ आली की आपण स्वतः  पण एखाद्या संत महंताच्या पेक्षा कमी नाही- आणि मग “अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज  ब्ला ब्ला ब्ला श्री १००८  महेंद्र महाराज की जय म्हणून मनातल्या मनात  मोठी  आरोळी ठोकतो.विनोदाचा भाग जरी सोडला तरीही …..!

This slideshow requires JavaScript.

परवा मी मुंबईहून वलसाडला गेलो होतो. अंतर तसं फार जास्त नाही, फक्त ३ तास लागतात. रस्त्याने जातांना थोडी घाई होती, आणि नुकतेच रस्त्यावर फ्लायओव्हर्सचे काम सुरु असल्याने जागोजागी ट्रॅफिक जाम होता, म्हणुन  ट्रॅफिक जाम मधे वाया गेलेला वेळ रिकव्हर करायला म्हणून कुठेच न थांबता वलसाडला पोहोचलो.तिन तासाच्या ऐवजी चक्क ४-३० तास लागले. काम आटोपल्यावर परत येतांना रस्त्याच्या डाव्या बाजूला लहानशा झोपडी वजा मेकशिफ्ट अरेंजमेंट्स करून दुकानं उघडलेली दिसत होती. ही दुकानं माझी फेवरेट..  त्यावर “उबाळू” म्हणुन लावलेले फ्लेक्स बोर्ड लक्ष वेधून घेत होते.

खवय्यांसाठी हा उबाळू म्हणजे अप्रतीम मेजवानीचा प्रकार आहे. आजकालच्या स्वयंपाकात प्रत्येक गोष्टी मधे कांद लसून आलं पेस्ट घालून करण्याच्या  नवीन पद्धतीने स्वयंपाकाची ओरीजनल चव खूप बदलेली आहे. . जुन्या काळी आपली आई किंवा आजी वगैरे स्वयंपाक करायची तेंव्हा कसे प्रत्येक पदार्थाची- भाजीची  चव वेगळी असायची.   हल्ली प्रत्येकच डीशचा जवळपास सारखाच स्वाद लागतो –  सहाजीक आहे, अहो प्रत्येकच भाजी टोमॅटॊ   किंवा  आल लसूण कांदा घालून केली की मग काय होणार??आणि … जाऊ द्या.. तो विषय नाही आपला. पण या पार्श्व भुमीवर हे उबाळू म्हणजे निरनिराळ्या चवींचा एकत्रीत पणे केलेला एक मस्त पदार्थ! निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र शिजवून सुद्धा प्रत्येकाची वेगळी चव अ्नुभवता येते.

रस्त्यावर बाजूला पेटवलेली लाकडांची होळी आणि त्यामधे ठेवलेले एक मडके लक्षं वेधून घेत होतं. शेजारी बरीच फुटलेली मडकी पण ठेवलेली होती.    त्या मडक्या मधे पापडी शेंग, बटाटे, वाल शेंग, सुरण , आणि बऱ्याच वेगवेगळ्या भाज्या ज्यांची मला नांवं पण माहीत नाहीत अशा भरलेल्या असतात. त्या  भाज्यांमधे अगदी थोडा  गुजराथी मसाला घातलेला असतो. ह्या सगळ्या भाज्या एकत्र मिसळून नंतर एका मडक्यात भरल्या जातात. मसाला मिठ वगैरे घातल्यावर त्या मडक्याचे तोंड कुठल्यातरी पाला लावून   बंद करून ते मडके खाली तोंड केलेल्या अवस्थेत लाकडांच्या फुफाट्यात मस्त भाजले जाते.  स्वतः मधे असलेल्या पाण्यामुळे सगळ्या भाजा शिजून येतात.

मी जेंव्हा त्या उबाळूच्या दुकाना जवळ पोहोचलॊ तेंव्हा एक मडके बहूतेक पुर्ण शिजून तयार झालेले होते, आणि एक माणुस ते मडके बाजूला काढून त्यातले उबाळू बाहेर काढत होता. आधी त्या मडक्याच्या तोंडावर बांधलेल्या पालेभाज्या काढून बाजूला टाकून दिल्या आणि नंतर आतल्या सगळ्या भाज्या एका पराती मधे ओतल्या.

खमंग वासाने भूक चाळवलेली होतीच-पराती मधे काढलेल्या त्या भाज्यांचं नॅचरल स्वरूप पण मस्त दिसत होतं -आणि  ्तसंही जशी चुलीवरची भाकरी, पिठलं, कि्वा इतर पदार्थांना एक स्वतःची चव असते, तसेच फक्त स्वतःच्या वाफेवर शिजलेल्या भाज्या अतिशय चवदार लागतात.   आणि मुख्य  म्हणजे  कितीही खाल्लं तरीही डायटींगला पण धोका नाही, म्हणून अर्धा किलॊ उबाळू घेतला  ५० रुपयांचा -आणि खात खात  निघालो पुढे . हिवाळ्याचे दिवस, मस्त कोवळं उन्हं, आणि वाफाळलेला उबाळू.. और क्या चाहीये. नुसत्या स्वतःच्या अंगच्याच पाण्यात  वाफवलेल्या  गेलेल्या त्या भाज्या म्हणजे चवींचे अप्रतीम कॉम्बीनेशन! चुकवू नये असे काही. हा प्रकार फक्त हिवा्ळ्यातच मिळतो. हा उबाळू खाता खाता लहानपणच्या हुरडा पार्ट्या आठवल्या.

हिवाळ्यात मस्त पैकी कोवळं उन आणि हा वाफाळलेला उबाळू.. बस्स.. और क्या चाहीये?? हमींयस्तू हमींयस्तू म्हणावंसं वाटतं .

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , . Bookmark the permalink.

35 Responses to खाद्ययात्रा. उबाळू..

 1. वाह कमी कॅलरीची खमंग पोस्ट 🙂 हा प्रकार मी पहिल्यांदाच ऐकला..

  बाकी “अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज ब्ला ब्ला ब्ला श्री १००८ महेंद्र महाराज की जय” मनातल्या मनात नाही तर ओरडून म्हणेन 🙂
  मस्त पोस्ट..आवडेश 🙂

  • सुहास
   मनावर किती ताबा ठेवायचा माणसाने?? कालच माझ्या भाचीने ऋजुता दिवेकरचे एक पुस्तक दिले, डायटींग माईथस वर.. वाचतोय , त्यात दिलंय की एखाद्या वेळेस खायला हरकत नाही कुठलीही गोष्ट!, पण होतं काय , की एकदा खाणं सुरु केलं की मग माझा काही स्वतः वर ताबा रहात नाही.
   पुर्वी सिगरेट पण कमीकेली तेंव्हा काही फार दिवस कमी राहीली नाही,लवकरच पुन्हा पहिल्यासारखे जैसे थे झाले होते, पण पूर्ण सोडल्यावर मात्र आता २० वर्ष झाली सोडून, इच्छा पण होत नाही.

  • uttara sumant says:

   mahenramaharaj he ubalu punyachya jawal milel ashi kahi jadu kara.

 2. महेंद्र दादा…
  ही जरा उंधियो सारखा…पण कमी मसालेदार आवृत्ती आहे बहुतेक आपली.घरी करून बघतो पुढच्या विकेंडला..माझ्याकडे लाकडी चूल आहे येथे…आणि पापडी शेंग, बटाटे, वाल शेंग, सुरण या भाज्या येथे मिळतात…गुजराथी मसाला कुठून तरी पैदा करेनच..बघू निदान ५०% जमला तरी सांगेन 🙂

  येथे ऑस्ट्रेलिया मध्ये थोडासा पब मिल म्हणून जो ‘Steam Vegetables’ चा प्रकार मिळतो त्यामध्ये ब्रोकोली,डबल बीन्स,पार्सिली,मश्रूम्स आणि थोडे cottage cheese घालून steamer मध्ये ठेवतात आणि मग white pepper,ओरेगानो सीड्स टाकून सर्व्ह करतात….हे सुद्धा डायेट फूडच नाही का ?? 🙂
  हे फक्त गरम असतानाच चांगले लागते.. एक गो ष्ट इं ट रे स्टिंग आहे की अनेक ठिकाणच्या steamed vegetables मध्ये एक तरी कुठली शेंग भाजी असतेच… 🙂

  • सिद्धार्थ,
   हो थोडा फार उंधीयू सारखा आहे, प्ण अजीबात तेल , बेसन वगैरे नसलेला.
   अवश्य जमेल. मसाला काय आपल्याला आवडेल तो घालायचा.
   पब मिल मधे जर चिझ घालत असतील तर मग ते कसलं डायट फूड रहाणार?? 🙂 पण तसंही आपल्याइतकं हाय कॅलरीफूड नसेल ते हे नक्की.

   • महेंद्रदादा,

    यात फरक म्हणजे, येथील कॉ टे ज चीझ हे सोया मिल्क—थोडेसे टोफू सारखे.. किवा गाईच्या लो फॅट मिल्क पासून बनवलेले असते. (अहो,मी लंच मध्ये सॅलाद च्या नावाखाली हेच खातोय…पौष्टीक पौष्टिक म्हणत..माझे सुद्धा डायट चालू आहे.. !!)…तुम्ही ट्राय करून बघा..

    आपल्याकडची हॉटेल मध्ये मिळणारे बेक्ड वर्जन म्हणजे वेज ऑग्रेतिन ज्यामध्ये ‘अमूल’ चे चीझ आणि white sauce –उर्फ मैदा 🙂 इतके असते की आठवडा भरा चा कॅलरीज चा कोटा एका जेवणात पुरा होतो..

    • सिद्धार्थ,
     खरं आहे, आपल्याकडे मिळणारे बेक्ड व्हेज टेस्टी तर असते, पण मला आवडत नाही फारसे. तसेही मी कॉंटीनेंटल आवडणारा माणूस नाही. मला आपलं देशी आवडतं.. फार तर भारतीय चायनिज. 🙂

 3. Raj Jain says:

  वाह ! मस्तच !
  नशिबाने एकदा हा प्रकार खाऊन पाहिला आहे आवडला होता 🙂

 4. mau says:

  झक्कास पोस्ट !!!माझा निषेध मी पाठी घेते…:) 😛

 5. sahajach says:

  महेंद्रजी खादाडी पोस्ट म्हणून अक्षरश: टाळत होते वाचायचे… 🙂 पण डाएट आहे ना असं म्हणत वाचली… 🙂

  भन्नाट दिसताहेत फोटो… आम्ही रोह्याला होतो तिथे हाच प्रकार ’पोपटी’ या नावाने मिळायचा पण त्यात भाज्या बहुतेक ईतक्या नसाव्या… पण चव खरपुस, खमंग थोडक्यात अप्रतिम!!

  मस्त पोस्ट….

 6. Smita says:

  hmm naveen kahee khaNyabaddal lihitana tumhee ekdam- in your element asata. ardha kg ubaLu sampavata yeto???

  tumhee je ginger- garlic- tomato paste baddal lihilay te 100% khara ahe. mazee aai, ajee jo swayampak kanda lasuN aNee itar hajar prakar na ghalata karayachya tyachya javaLpas hee maza swayampak jaat nahee shambhar ingredients hatashee asun.. tee chav yeNyasathee pahije jateeche…
  chaan post ahe, diet rakhun lihilyabaddal abhinandan:-)

  • स्मिता
   अर्धा किलॊ जरी घेतलं तरी त्यामधे बरीचशी सालं पण गेली ना शेंगांची.. :)म्हणजे सगळं मिळून फारतर २०० ग्राम खाल्लं असेल. खूप टेस्टी पदार्थ आहे हा.
   खरं सांगतो, ते आई आणि आजीच्या हातचा स्वयंपाक अजूनही मिस करतो बरेचदा..

   • Smita says:

    barobar, sala gelee he mee count nahee kela:-) Theek ahe mug 200 gm mhaNaje tasa optimum ahe I guess…:-) mazee ek maitreeN tichya gharee baget undhiyo karayachee , puN te jara jastach heavy asata, ha prakar diet- friendly vaTatoy, should try some time.

    • हो नां.. अर्धा किलो भाजी खाणं.. शक्यच नाही. फक्त हिवाळ्यात मिळतो. कालच मुंबईला एक खाद्ययात्रा सुरु आहे बांद्र्याला , तिथे जाऊन आलो. मुद्दाम स्वतःवर कंट्रोल ठेवायला म्हणून फक्त एक हुरड्याचं थालीपिठ खाऊन परत आलो. इतर काही खाल्लं नाही. मडक्यावर भाजलेले मांडे पण होते, तरीही खाल्ले नाहीत. बरं वाटतं स्वतःवर कंट्रोल ठेवला की. पण जमायला हवं अजून काही महीने तरी..

 7. santosh Deshmukh says:

  राम राम खाखा
  आली कि नई गाडी रुळावर ? काका तुम्ही तर अस्सल खादाडखाऊ तुम्ही डायाटिंग फायटिंग चा नाद करू नका !!
  जे खरच खाण्यावर प्रेम करतात, त्यांनी बिनघोर रहायच असत हे वजन कमी करायचा खूळ कुणी तुमच्या डोक्यात घातलं ? kaka भरपूर खायचं नी भरपूर चालायचं
  आपला आभारी आहे कारण अपेक्षापूर्ती केली एक नवीन डिश खाऊ घातली…………………. जातो नि खातो

  • संतोष
   शेवटी वयाला शरण जावंच लागतं कधी ना कधी तरी.. माझ्या बाबतीत ती थोडी लवकर आली वेळ. तसंही नुकतंच ऋजुता दिवेकरांचं पुस्तक वाचायला घेतलंय, आणि थोडा फरक करतोय अजून. उपाशी तर रहात नाही, पण शक्यतो हेल्दी फुड खातोय.. चालायचं शक्य होत नाही, कारण वाढलेल्या वजनामुले गुडघे दुखतात. डॉक्टरांनी सांगितलंय की वजन ९० च्या आसपास आलं की चालणं सुरु करा म्हणून. सध्या ९५ आलंय. 🙂

 8. मनोहर says:

  याचा मसाला काटलुं बत्रीसुं या नावाने मुंबईत काही ठिकाणी मिळतो. उँधियुंच्या कच्छी प्रकारात फक्त फळभाज्या वापरल्या जातात.

 9. mazejag says:

  humn..interesting….bhajlelya bhajichi matkyachi chav sahi asnar prashanch nahi….bahutek udya nightoy Govyala…adhi to Pinto shodhaicha aahe…:)

 10. >> चुलीवरची भाकरी, पिठलं, कि्वा इतर पदार्थांना एक स्वतःची चव असते.
  चुलीवरची मातीच्या भांड्यात शिजवलेली चिंगळ (Prawns) आणि खेकडे / कुर्ल्या पण अप्रतिम होतात. ती चव कुठल्याही हॉटेलात मिळणे नाही.

  बाकी उबाळू नाव जरा विचित्र असलं तरी पोस्ट टेस्टी आहे.

  • सिद्धार्थ
   काल इथे मुंबईला बांद्र्याला गेलो होतो एका खाद्य यात्रेला. मस्त आहे तिथे खादाडी. अगदी शिंप्याची कडी ते फ्राय फिश- कोंबडी वडे आणि मटन भाकरी वगैरे. बायको सोबत होती, फक्त व्हेज खाल्लं काल ., सगळ्या बझकरांना सांगितलंय जायला.

 11. Pingback: खाद्ययात्रा. उबाळू.. | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 12. laxmi says:

  hello kaka,
  mastch ahe tumch khane ani diat karne…….
  pan khar sangte aaplyala je hav te khane ani mast rahne, mala tar asach avadat. tumhi pan jast vichar n karne ani halke-fulke khane suru kara bar ka?
  Roj aplya mumbaichi local pakdane ha kay kamicha vyayam ahe ka?
  by tc

  • लक्ष्मी
   लोकल पकडायचा व्यायाम होतोच. पण तरीही वाजन वाढतच होते. तसंही सगळं खाणं सुरु आहेच, फक्त तळलेले, साखर आणि भात बंद केलाय. नुकतंच ऋजुतादिवेकर वाचलं, त्यावर पण एक पोस्ट लिहायचंय.. मस्त आहे पुस्तक. वाचलं आहे का?? लुझ युवर वेट, नोट योर माईंड..नाव आहे.

   • laxmi says:

    kaka mi pustak vachen pan…..
    vajan vadhavayche ahe kami karayche nahi. karan kahi kelya maz vajan vadhat nahi. aaj kal tar mazi tai maz vajan vadhavaychya mage lagli ahe. ani tyat mi gharat ektich veg. khanari. mazya mage hat dhuvun lagliye nonveg kha mhanun ………..
    by tc

    • नॉन व्हेज खाल्ल्याने वजन वाढते असे नाही . ते पुस्तक अवश्य वाचा. त्यातूनच हिंट्स मिळतील वजन वाढवायच्या. फक्त १९० रुपयांचे आहे ते.
     वजन वाढणे – कमी होणे हे सगळे खाण्याच्या पद्धतींवर अवलंबुनअसते. पुस्तक न मिळाल्यास मी देऊ शकेन. माझा नंबर आहेच फेस बुक प्रोफाईल वर.. 🙂

 13. Nisha says:

  Are wah tondala pani sute – sahich …!

Leave a Reply to uttara sumant Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s