प्रजासत्ताक दिन झाला काल. प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय? प्रजेवर नेत्यांनी सत्ता गाजवायचा दिवस? की प्रजेने नेत्यांवर ?? असे अनेक प्रश्न मनात येतात. सरकारी संस्थानं ( हा शब्द विचार करून वापरतोय मी) आणि सरकारी मालमत्ता आपली तिर्थरुपांची वंशपरंपरागत देणगी असल्या प्रमाणे वागणारे त्यांचे अनभिषिक्त राजे ! असो.. पण यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू नका. कारण उत्तर सापडणार नाही पण मनःस्ताप मात्र होईल.
२६ जानेवारीला मला मुंबई सेंट्रल स्टेशनला काही कामानिमित्य जावे लागले. भारतीय रेल्वे !भारता मधे सगळ्यात जास्त (२० लक्ष लोकांपेक्षा जास्त)लोकांना रोजगार देणारे सरकारी संस्था(न) आहे. वर्कर वेल्फेअर अंतर्गत कर्टसी म्हणून,रेल्वे मधे काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला दर वर्षी ठराविक वेळा (४-५ वेळा)सहकुटुंब प्रवास करण्यासाठी फुकट प्रवासाचे पासेस देण्याची प्रथा आहे. आता पर्यंत कोण कुठल्या पदावर आहे, किंवा कोणाचे किती बेसीक आहे यावर कुठल्या क्लासचे पासेस द्यायचे हे अवलंबून होते. साधारण पणे ऑफिसर केडरला एसी किंवा फर्स्ट क्लास मधे प्रवास अलाऊ केला जायचा, आणि इतर कामगार वर्गाला स्लिपरक्लास ! अशीच प्रथा एअरलाइन्स, बस वगैरे मधे पण आहे, पण इथे फक्त रेल्वे बद्दल लिहितोय मी.
डीआरएम ऑफिस समोर एक बोर्ड लावलेला होता त्यावर कोणा एका युनीयन लिडरचे आभार मानलेले होते. त्या कामगार नेत्याच्या पुढाकारामुळे , या पुढे सरसकट सगळ्याच कामगारांना (क्लास ३, किंवा क्लास ४ सुद्धा) एसी मधे प्रवास करण्यासाठी फ्री पासेस देण्यात येतील असे रेल्वेने जाहीर केले म्हणून त्या नेत्याचे कौतूक केलेले होते. या पुढे अगदी स्विपर पासून तर पोर्टर पर्यंत सगळ्यांनाच सहकुटुंब एसी चे फ्री पास देण्याचे रेल्वेने मान्य केले आहे.अशा तऱ्हेने फ्री पासेस द्यावे की नाही हा मुद्दा तर फारच महत्बाचा वाटला म्हणून हे पोस्ट.
रेल्वे मधे जवळपास २० लाख कर्मचारी आहेत. रेल्वे दर वर्षी प्रत्येकाला ३ पुर्ण पणे फ्री पास ( कुटुंबासाठी) आणि काही अर्ध तिकीट पासेस ( म्हणजे निम्मे पैसे देऊन तिकीट मिळणार त्यांना ), आणि अजून काही तरी प्रकारचे पासेस देतात. ( माझे सासरे पण रेल्वे मधे होते म्हणून इतकी माहिती आहे मला ) २० लाख कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी चार कुटुंबाचे मेंबर्स धरले, आणि प्रत्येकाने एकदा जरी प्रवास केला तरीही दर वर्षी कमीत कमी ८० लाख तिकीटं फुकट वाटण्यात येणार आहेत. जर प्रत्येक माणुस वर्षातून दोन किंवा ३ दा गेला तर ही संख्या होणार आहे दोन ते अडीच कोटी. अडीच कोटी जर फ्री पास वाले असतील, तर एसी कोचेस मधे सामान्यांसाठी जागा शिल्लक रहातील का? हा एक मोठा प्रश्न आहे. इतरांनी स्लिपर क्लासने प्रवास करायचा हा संदेश देतंय सरकार.
फ्री पासेस चं लोण हे इथेच समजत नाही प्रत्येक मंत्री, एमएलए, एमपी,पद्म विभुषित, खेळाडू आणि फ्रीडम फायटर्स( खरे आणि खोटे – अर्थात खऱ्या लोकांना दिल्यास आमची हरकत नाही, पण एका पटवाऱ्याच्या प्रमाणपत्रावर पण लोकं फ्रीडम फायटर्स ठरतात) आणि वर दिलेल्या कॅटगरी व्यतीरिक्त अजूनही असंख्य लोकांना फ्री प्रवासाचे पासेस वाटले जातात- ज्या बद्दल मला माहीती नाही.
इतकी फ्री तिकीट्स वाटल्यावर रेल्वे मधे तुम्हा आम्हाला (तिकीटं काढून जाणाऱ्यांना) रिझर्वेशन मिळण्याचे चान्सेस किती रहातील? सध्या मध्यमवर्गीय एसी ३ ने प्रवास करतो, इतके फ्री तिकीटं वाटल्यावर त्याला तिकीटे मिळणार का? हा एक मोठा प्रश्न आहेच. रेल्वे मधे अजुन एक फंडा आहे – व्हिआयपी कोटा! या मधे एखाद्या नेत्याची चिठ्ठी आणली की तुम्हाला शेवटल्या क्षणी तिकीट मिळू शकतं- आधीच्या सगळ्या रांगेत असलेल्यांना ( वेटींगच्या) बाजूला सारून. या विभागांना संस्थान म्हणतोय ते म्हणूनच. स्वतःची जहांगीर असल्याप्रमाणे मंत्री लोकं मतांच्या लालचेने असे सवंग निर्णय घेत असतात.
एम्प्लॉई वेलफेअर असायलाच हवे नाही असे माझे म्हणणे नाही , पण प्रत्येक गोष्टीला कुठे तरी धरबंद किंवा सीमा असायलाच हवी . या सगळ्या फुकट पासेस मुळे रेल्वेचे होणारे नुकसान भरून कसे निघत असेल?? अहो तुमच्या आमच्या सारखे लोकं आहेत नां, तिकीट करून प्रवास करणारे!
बरेच निर्णय असे का घेतले जातात हे काही माझ्या लक्षात येत नाही. प्रत्येकाला एलटीसी चे पैसे द्यावे, आणि त्याला हवे तिथे , आणि हव्या त्या साधनाने जाण्याची परवानगी द्यावी – हे जास्त योग्य ठरेल – आणि ही खरी एम्प्लॉइ वेल्फेअर मुव्ह ठरेल असे वाटते.
जय हो!
फ्री पासेस असले तरी ते कधीही येऊन बसू शकत नाहीत रेल्वे मध्ये..आधी आपल्या सारखं त्यांनाही रीझेर्वेशन कराव लागतं आणि फक्त फुकट पासेस मिळाले म्हणून एवढी सगळी लोकं त्याचा फायदा घेतीलच असं ही नाही कारण प्रवास जरी फुकट असला तरी इतरही अनेक गोष्टी असतात ज्यांना पैसे लागतात ……. तसाही रेल्वेत कित्तेक लोकं फुकटच प्रवास करत असतात (टी.सी. ला चिरी-मिरी देऊन ) हे निदान लिगली फुकट प्रवास करतील 🙂
मला वाटतं की दर वर्षी लोकं कुठे ना कुठे तरी ( कमीत कमी आपल्या गावी तरी ) जातीलच. इतकी तिकिटं फुकट वाटल्यावर इतर तिकिट काढून प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावाच लागेल. प्रत्येक गाडीला फक्त एक किंवा दोन एसी कंपार्टमेंट्स असतात.
आता ममता नविन गाड्या सुरु करते आहे दुरांतो नावाने, त्यांचा थोडा फार फायदा दूरवर प्रवास करणाऱ्यांवर नक्की मिळेल, तरी पण लिमिटेशन्स आहेतच.
अगदी अगदी.. आपण आपलं दर वेळी भल्यामोठ्या लायनीत उभं राहून महागडी ( आणि तीही वेटिंग) तिकिटं काढणार आणि हे फुक्कट प्रवास करतायत च्यायला..
मला कधीच तिकिट मिळत नाही. आता पर्यंत हे फ्री पासेस नव्हते, तरी पण महिनाभर जरी आधी ट्राय केला तरीही नागपूरचे तिकीट कन्फर्म नसते . फक्त एम्प्लॉइज नाहीत,तर इतरही लोकं आहेतच..
काय बोलू… 😦
जय हो …जय हो …
बरेच निर्णय असे का घेतले जातात हे काही माझ्या लक्षात येत नाही. प्रत्येकाला एलटीसी चे पैसे द्यावे, आणि त्याला हवे तिथे , आणि हव्या त्या साधनाने जाण्याची परवानगी द्यावी – हे जास्त योग्य ठरेल – आणि ही खरी एम्प्लॉइ वेल्फेअर मुव्ह ठरेल असे वाटते.
देश लुटणे हा एकमेव अजेंडा………..
मर्यादेच्या बाहेर गेलं आहे हे आजकाल. लोकं पण शहाणे झाले आहेत, सगळ्या फॅसिलीटीज घेतील, पण मतं देणार नाहीत..
एखादा कर्मचार्याचे संस्थेला किती महत्वाचे योगदान आहे, त्यावरुन त्याला मिळणारे बेनिफिट्स ठरवले जातात. त्या कर्मचार्या कडे संस्थेची किती रिस्की जवाबदारी आहे हे बेनिफिट्स ठरवताना लक्षात घेतले जाते. म्हणूनच CEO ला chartered plane ने प्रवास करायची परवानगी असते आणि जुनियर इंजिनियरला फार तर economy class. पण ममता बाईंनी सगळे accepted practices धाब्यावर बसवले आहेत. सोशलिझमचा जगभर बोजवारा उडाला असताना तो राबवण्यात काय धन्यता आहे? रेल्वे जर नुकसानीत जाऊन बंद पडली तर देशावर काय संकट कोसळणार, ह्याचा बड्या नेत्यांना भान तरी आहे का? तरी पण ही संस्था पिळवटून काढण्याची का आस धरतात, हेच कळत नाही.
विनय
सोशालिस्ट लोकांचा म्हणूनच राग येतो मला. एक वेळ राष्ट्रवादी कॉंग्रेस जवळ करीन मी.. पण समाजवादी?? अशक्य!
लवकरच नुकसान वाढले आहे म्हणून हे लोकं तिकीट दर, सामान वाहतूकीचे दर वाढवतील . सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्यावरच!! सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कापून खायची सवयच आहे या लोकांना.
“प्रत्येकाला एलटीसीचे पैसे द्यावे, आणि त्याला हवे तिथे, आणि हव्या त्या साधनाने जाण्याची परवानगी द्यावी” हे एकदम मान्य.
मला एक कळत नाही की ज्यांच्याकडे सत्ता, अधिकार आहेत ते लोकं सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून का विचार करीत नाहीत. हे जे कुणी कामगार नेते आहेत ते काही जन्माला आले तेंव्हा कामगार नेते नव्हते. रेल्वे मध्ये नोकरी लागेपर्यंत ते देखील रांगा लावूनच बुकिंग करीत असतील ना? आपले जुने दिवस ही लोकं विसरू कसे शकतात. आणि दरवर्षी ४-५ वेळा फुकट प्रवास म्हणजे अती आहे. बसमध्येसुद्धा आमदारांसाठी १-२ सीट राखीव असतात, त्यावर आमदार कधी बूड टेकत नाही पण त्याचा एखादा माजुर्डा चमचा मात्र त्या राखीव सीटवर बसून थुंकत प्रवास करतो.
नुकतेच वाचण्यात आले होते की एमपी, एमएलए लोकांना कितीही वेळ विमान प्रवास फुकट करण्याची अनूमती दिलेली आहे.इथे स्वतः काम करतो म्हणजे रेल्वे आपली संपत्ती झाली असा अर्थ काढलाय या लोकांनी.
एसटी मधल्या रिझर्व सिट्स बद्दल तर बोलायलाच नको. हल्ली कुठला मंत्री , आमदार बसने प्रवास करतो?? एकही नाही- सरळ कारने जातो तो..
“नेताजीकी डगर पे!
बच्चों चलना संभलके!
ये देश है हमारा!
खा जाओ इसको तलके!”
काका, नेताजी म्हणजे सध्याचे राजकारणी.खूपच जवळचे उदाहरण दिले आहेत तुम्ही या लेखात. आपण Tax भरायचा आणि आपल्या डोळ्या देखत आपल्याच मेहनतीच्या पैशावर हि फुकटातली बांडगुळे आपणच पोसत रहायची. माफ करा काका, थोडा वेगळा शब्द वापरलाय. परंतु आंब्याच्या झाडावर उगवलेले बांडगुळ आणि यांचे एकच ध्येय. एकदा अपघाताने जन्माला या! मग दुसर्याच्या मेहनतीवर मस्त जागा! आणि शेवटी स्वतः समवेत समाजाचे नभरून येणारे नुकसान करून, देवाघरी तिकडे छळायला जा! डोक्याला ताप झालाय नुसता!
भारत माता कि जय!
हेमंत..
सहमत आहे अगदी शंभरटक्के.. सुंदर शब्दबद्ध केली आहे कॉमेंट..
“काश, मेरा मराठी भी इतना अच्छा होता” 🙂
मी आपला आभारी आहे. सर! होय मी तुम्हाला सरच म्हणीन. तुमच्या सारखा एक जरी प्रोफेसर कॉलेजात लाभला असताना! तर आणखीन एक मंगल पांडे या भारताला मिळाला असता! या भ्रष्ट राजकारण्यांच्या विरोधात! शेवटी जमदग्नीच.
माज आलाय हल्ली सगळ्यांना…जमेल तेव्हढं फुकटात हवंय… x-(
सगळीकडे हाच प्रकार सुरु असतो. नॅशनल अंटार्टिक मधे काम करणाऱ्यांना लवकरच दक्षिण ध्रुवाची सफर फुकट.. हे जरी वाचायला मिळाले, तरीही मला आश्चर्य वाटणार नाही.
माज आलाय हल्ली सगळ्यांना…जमेल तेव्हढं फुकटात हवंय… x-(+1
उतरवणारे कोणीच नाही. लवकरच सगळ्या सरकारी विभागात पण हेच लोण पोहोचेल..
Samja Aarogya Khatyat aala tar…jase fuktat AIDS chi test, Nasbandi, kiwa Daru sodnyavarchi aushadhe vagaire…he sagal natevaikansathi teva hech fukte lok amhala kutumb nahi kiwa natewaik nahi nahitar he asle coupons kiwa passes nakot asach sangtil..barobar ki nahi
@ कस्तुरी,
आणि जर ती फुकट ची टीकेत हस्तांतार्नीय असली तर लोक ती विकून सुध्धा आपला तोटा करू शकतात
Pingback: प्रजासत्ताक दिन | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.
काका तुम्ही बोलताय या हिशोबानी सगळे रेल्वेचे लोक एकाच वेळी प्रवासाला निघतील
….मग रेल्वे चालेल कशी???आणि परिस्थिती मुख्या गर्दीच्या दिवसातीलच असते इतर वेळी फारसा प्रोब्लेम नसतो .माझा मुख्या प्रवास बसने होतो त्या मुळे रेल्वेची तशी कल्पना नाही पण असा नेहमीचा प्रोब्लेम असेल तर मग गाडी वाढवणे हाच पर्याय आहे .
एम्प्लॉई वेलफेअर असायलाच हवे असे माझे म्हणणे आहे .अशा गोष्टींचा फायदा सगळेच घेतात ;आता समजा माझे वडील बँकेत आहेत तर मी सुद्धा line मध्ये थांबणार नाही;आणि प्रवासी रेल्वे अशी पण तोट्यातच असते मालवाहतूकीमुळेच मुख्य फायदा असतो.
इतर वेळेसही प्रॉब्लेम आहेच. एसीची तिकिटं कधीच मिळत नाहीत. शंभर टक्के बुकींग असतं तिकिटांचं. प्रवासी रेल्वे अशा निर्णयांमुळेच तोट्यात असते, आणि दरवर्षी तिकिटांचे दर वाढवले जातात. ही वेल्फेअर ऍट द कॉस्ट ऑफ अस.. आहे हेच मला खटकतं.
रेल्वे मधे जवळपास २० लाख कर्मचारी आहेत. रेल्वे दर वर्षी प्रत्येकाला ३ पुर्ण पणे फ्री पास ( कुटुंबासाठी) आणि काही अर्ध तिकीट पासेस ( म्हणजे निम्मे पैसे देऊन तिकीट मिळणार त्यांना ), आणि अजून काही तरी प्रकारचे पासेस देतात. २० लाख कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी चार कुटुंबाचे मेंबर्स धरले, आणि प्रत्येकाने एकदा जरी प्रवास केला तरीही दर वर्षी कमीत कमी ८० लाख तिकीटं फुकट वाटण्यात येणार आहेत. जर प्रत्येक माणुस वर्षातून दोन किंवा ३ दा गेला तर ही संख्या होणार आहे दोन ते अडीच कोटी. अडीच कोटी जर फ्री पास वाले असतील, तर एसी कोचेस मधे सामान्यांसाठी जागा शिल्लक रहातील का
आता रेल्वेची क्षमता काय आहे यांवर हे सगळे आहे .
बरेच निर्णय असे का घेतले जातात हे काही माझ्या लक्षात येत नाही. प्रत्येकाला एलटीसी चे पैसे द्यावे, आणि त्याला हवे तिथे , आणि हव्या त्या साधनाने जाण्याची परवानगी द्यावी –हे तर अजिबात मान्य नाही
यां लोकांनी समजा रेल्वेचेच परत तिकीट काढले तर मग मधला वेळ आणि तिकीट क्लार्कचे पगाराचे पैसे वागीरे आहेच कि .आणि दुसरे साधन वापरले तर रेल्वे स्वताचा नफा कमी करते आहे (ग्राहक) असेच होईल ना??स्वताचा नफा कमी करून दुसर्याला फायदा (मंजे समजा बस-ला किंवा विमान कंपनीला असे)मंजे हे तर जास्त महागात जाईल .
प्रत्येक माणूस हा एसी ने प्रवास करेल असे नाही. दुसरी गोष्ट स्वतःच्याच लोकांना रेल्वेने फुकट नेण्यापेक्षा इतरांना नेल्यास रेल्वे नक्कीच फायदा कमावेल. सध्या पण एसी मधले बर्थ कन्फर्म होणं फार अवघड असतं, यावरून हे लक्षात येईल की रेल्वेची क्षमता मुळ रिक्वायरमेंट पेक्षा फार कमी आहे.
तिकिट क्लार्कचे पैसे वगैरे तर तसेही खर्च होतीलच, कारण त्यांना पण रिझर्वेशन लागेलच. या पेक्षा एलटीसीचे पैसे देणे कधीही योग्य ठरेल. आजच्या तारखेला एकही गाडी रिकामी जात नाही. प्रत्येकच गाडी मधे वेटींग १२ महीने असतेच. म्हणजेच काय- तर डीमांड आहे भरपूर, आणि सप्लाय कमी आहे.
एखाद्या सिगरेट्कंपनीने सिगरेट, किंवा दारूच्या कंपनीने आपल्या कामगारांना फुकट दारू द्यायची का? नाही नां.. तसेच आहे हे पण. मी नासा मधे काम करत असेल तर मला एक चक्कर स्पेशशिप मधून मारून आणा म्हणणे पण योग्य होणार नाहीच..
एखाद्या सिगरेट्कंपनीने सिगरेट, किंवा दारूच्या कंपनीने आपल्या कामगारांना फुकट दारू द्यायची का? नाही नां.. तसेच आहे हे पण. मी नासा मधे काम करत असेल तर मला एक चक्कर स्पेशशिप मधून मारून आणा म्हणणे पण योग्य होणार नाहीच..
हे ठीक आहे ;पण जर का तूमची पेनाची कंपनी आहे आणि तुमच्या क्लार्कला सरळ पेन द्याल का त्यासाठी पैसे???
तर डीमांड आहे भरपूर, आणि सप्लाय कमी आहे.हे कारण बरोबर आहे पण कर्मचार्याना पैसा असा गेला काय आणि तसा गेला काय जाणार तर आहेच ना ???एखाद्याचा पगार २ हजारांनी वाढवा किंवा त्याला पेपर ;पेट्रोल ; अशा स्वरुपात द्या सारखेच आहे .
या गोष्टी बहुदा tax चुकवण्यासाठी वरच्या लेवलला करतात आणि खालचे लोक साहेबाला मिळते मग आम्हाला का नाही असे बोंबलतात ……
मंदार
पैसा सारखाच जाईल हे जरी खरे असले, तरीही फक्त फुकट मिळतोय पास म्हणून प्रवास करा असे तो कर्मचारी करणार नाही , अगदीच आवश्यक असेल तेंव्हाच प्रवास करेल- आणि त्या मुळे ज्या गरजवंताला तिकिट घेऊन प्रवास करायचा असेल त्याला तिकिट मिळण्याचे चान्सेस तो माणूस.
फ्रिंज बेनिफिट्सचा आजकाल काही फारसा फायदा उरलेला नाही, पूर्वी कंपन्या फ्रिंज बेनिफिट टॅक्स भरायच्या, त्या आजकाल आम्ही भरतो- शेवटी काय सरकारला पैसा मिळतोच.
पटले ;बरोबर बोललात
धन्यवाद मंदार..
ग. दि. माडगुळकर यांची माफी मागून …..
हे राष्ट्र माफियांचे हे राष्ट्र भ्रष्ट्राचाऱ्यांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य नौकर, नेतेशाहीचे
जेथे माफियांचा सन्मान नित्य आहे
जन लोकशाहीचा पायाच असत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत बेईमनिचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र भष्ट्राचाराचे
धन्यवाद.. 🙂
रेल्वे मधे जवळपास …………….. तर एसी कोचेस मधे सामान्यांसाठी जागा शिल्लक रहातील का?
>>>
We can have the only solution that the direct reservation allocation / higher priority should be canceled so that they can get the tickets but they have to either have to wait till gets the reservation in the queue of FCFS (First come first serve) or they have to reserve too early…….
Rohit Chaudhari, Jalgaon
रोहन
आजकाल रेल्वेने प्रवास करायचा तर कमीत कमी तिन महीने आधी बुकींग करावे लागते- आणि तेंव्हा पण ते मिळेलच याची शाश्वती नसते. आता नविन गाड्या सुरु केलेल्या आहेत, पण त्यातही जागा मिळत नाहीच..डायरेक्ट रिझर्वेश अॅलोकेशन हे तर सुरु आहेच ऑन लाइन . तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते समजलं नाही.
railway ne pravas hee shakyata suddha paTkan manat kamee yete aajkal karaN tickets kadhee miLatach nahit, ha option apalyasThee naheech asheech paristhitee nirmaN zaliye. may be henforth only politicians and railway employees will get to travel by train.
रेल्वेने दूरचा प्रवास करून कित्येक वर्ष झाले आहेत. पर्सनल प्रवासासाठी पण तिकिट मिळाले नाही की विमानानेच जावे लागते. तरी एक बरं झालं आहे, की सध्या विमानाची डिस्काउंटेड तिकिटं कमी झालेली आहेत( जवळपास सेकंड एसीच्या दिडपट) त्यामुळे चालतंय,
या पुढे फक्त पॉलिटेशिअन्स आणि फ्री तिकिट वालेच प्रवास करतिल..
काका,
रेल्वे कार्माचाराला तिकीट विकायची परवानगी मिळावी सर्व प्राब्लेम सुटून जाईल कुणाला जर काही मिळाले तर आपण ही आनंद साजरा करूया !!!!!!!!!!!
संतोष
मस्त आयडीया आहे.. मग तर बहूतेक सगळेच विकायला काढतील
सर्वाच्या मनातलआपण बोललात भष्ट्राचार,महागाई,व इतर अनेक गोष्टीआहेत तसेच सरकाने व प्रसाशानाने (मोफत)या गोष्टी बंद कराव्या म्हणजे अशा गोष्टीना आला बसेल, रेल्वे कर्मचाऱ्यांना(किवा इतर कोणालाही ) मोफत प्रवास करू देऊ नये म्हणजे त्यांना लोकाचे हाल किती असतात ते कळेल,त्यांना इतर (सवलती) द्याव्यात,(मिळतात की)