सुकेळी

महालक्ष्मी सरस नावचे एक प्रदर्शन भरले आहे सध्या मुंबईला लिलावती हॉस्पिटलच्या समोरच्या प्रांगणात. घरगुती उद्योजकांना लोकांपर्यंत   पोहोचता यावे ( मधे कोणी एजंट न ठेवता) म्हणून सहकारी संस्थांनी एकत्रित येऊन हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. इथे महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या सहकारी संस्थांचे स्टॉल्स लागलेले आहेत. हरेक्रिश्नजींचा फोन आला होता, म्हणाले की ह्या प्रदर्शनात श्रीरामपुरच्या स्टॉल वर हुरड्याचे थालीपीठ खूपच छान आहे, तेंव्हा नक्की जाऊन या . हुरड्याचे थालीपीठ खाऊन किती वर्ष झाली ते आठवले, आणि तिथे जायचेच हे नक्की केले मनामध्ये – आणि थालीपीठ खाल्या वर रात्रीचे जेवण टाळायचे हे मनात ठरवून (डायट कंट्रोल बॉस…!)

प्रदर्शनात गेल्यावर काही गोष्टी नजरेस पडल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की आपल्या बऱ्याच जुन्या गोष्टी आता नजरेआड होत चालल्या आहेत.आपण जे काही पाहिलंय ते कदाचित पुढची पिढी पाहू पण शकणार नाही. स्वतःचाच अनुभव सांगतो, काही गोष्टी ज्याबद्दल मी स्वतः    लहानपणी   फक्त वाचलं होतं आणि जे कधीच पाहिलं पण  नव्हतं- ते इथे पहायला मिळालं. मांडे म्हणजे फक्त एक म्हणीत वापरलेला शब्द-  “कोंड्याचा मांडा करणे” इतकीच माहीत होती- पण मांडा म्हणजे नेमकं काय ते इथे पहायला मिळालं . ज्या गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्या पैकी तीन गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटल्या . आपल्या पिढीला कमीत कमी पहायला किंवा चाखायला तरी मिळाल्या असतील, पण कदाचित पुढल्या पिढीला हे प्रकार म्हणजे नेमकं काय ? हे समजणार पण नाही.

चुलीवर पालथं ठेवलेले मडके, आणि त्यावर मांडे शेकतांना

या पैकी पहिली गोष्ट म्हणजे मांडे ( हा प्रकार मी पुर्वी मनसेच्या खाद्योत्सवात पहिल्यांदा खाल्ला होता) . मैद्या मधे पुरण भरून त्याची पोळी लाटली जाते, आणि नंतर ती हातावर ताणून मोठी केल्यावर खापराच्या मडक्यावर चुलीवर भाजली जाते. मडक्यावर भाजल्याने त्याला एक वेगळीच खरपूस चव आणि स्वाद येतो- अशी खमंग पुरण भरलेली पोळी, त्यावर तुपाची धार . हा पदार्थ खरं सांगायचं तर मला फारसा अपील झाला नाही. ना धड गोड, ना धड फिक्का असा हा पदार्थ , पण एक पूर्वापार चालत आलेला पदार्थ म्हणून महत्त्वाचा. पुर्वी मनसे उत्सवात साधे मांडे- पुरण न भरलेले आणि आणि भरीत खाल्लं होतं. ते कॉम्बो या पुरण भरलेल्या पेक्षा जास्त आवडले होते. सध्या डायट सुरु आहे, त्यामुळे पुरणाच्या मांडे या प्रकाराला हात लावलाच नाही मी, आणि एक मांडा मात्र सौ. आणि मुलींसाठी घेतला. जवळपास दोन फुट व्यासाचा असलेला तो एकच मांडा तिघींना पुरेसा झाला.

दुसरी गोष्ट म्हणजे बाजरीची खिचडी! बाजरीची खिचडी म्हणजे फक्त बाजरी आणि मुगाची डाळ कुकर मधे शिजवायचे असे नाही, कारण तसे केले तर खातांना तोंडामधे बाजरीची साल येते. हा प्रकार मी लहान असतांना माझी आई पण घरी करायची. बाजरी उखळात कांडून त्याचे सालं काढायची, आणि मग नंतर खिचडी प्रमाणे मुगाच्या डाळी सोबत शिजवून वांग्याच्या भरीत, दही आणि दाण्याच्या चटणी बरोबर वाढायची. जळगांवकरांच्या स्टॉल वर बाजरीच्या खिचडीचा बोर्ड पाहिला, आणि आधी तिथे धाव घेतली. कदाचित घरी बाजरी सोलून त्याची साल काढणे शक्य होत नसल्याने, हा पदार्थ येणाऱ्या काळात नामशेष होण्याचे चान्सेस जास्त दिसतात .

सुकेळी, सोनकेळी, सुकवलेली केळी, वसईची केळी,

वसईच्या काउंटरवर सुकेळी विकायला ठेवलेली होती. चॉकलेट प्रमाणे केळीच्याच सुकलेल्या पानात पॅक केलेली ही सुकेळी !

सुकेळी हे तर बरेचदा ऐकले होते, आणि सुकेळी पण . कित्येक दिवस तर मला मुंबईला मिळणारी ’वेलची केळी’ म्हणजेच ’सुकेळी’ असे वाटायचे. एका मुंबईकर मित्राने तर ’राजेळी’ केळी म्हणजेच ’सुकेळी’ असे ठासून सांगितले 🙂 पण मला एवढं बाकी नक्की माहीती होतं की ’सुकेळी’ फक्त वसईलाच तयार होतात,राजेळी केळी तर फक्त चिप्स साठीच वापरतात, तेंव्हा ती सुकेळी असूच शकत नाही हे पक्कं ठाऊक होतं- त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण या ’सुकेळी’   म्हणजे नेमकं काय ह्याचं मात्र नेहेमीच कुतूहल वाटत  होतं.

सध्या खादाडी जवळपास बंदच आहे, पण थॅंक्स टू ऋजुता दिवेकर – तिच्यावर एक वेगळं पोस्ट लिहीणार आहे . प्रदर्शना मधे एक चक्कर मारली. जवळपास ५०% स्टॉल्स ला भेट दिली. एक वसईच्या महीला उद्योगाचा स्टॉल होता. त्या स्टॉल वर केळीच्या सालात काहीतरी गुंडाळून चॉकलेट प्रमाणे फक्त ९ इंच लांबीचे ठेवलेले दिसत होते. माझ्या बाजूला उभ्या असलेल्या एका स्त्री ने “सुकेळी काय भाव दिलीत?” म्हणून विचारले.. आणि काउंटरवरच्या बाईंनी समोर ठेवलेली एक केळ्यांच्या पानांची सुबकपणे बांधलेली पुरचुंडी उचलून समोर धरली, आणि म्हणाल्या ” फक्त ८० रुपये”! आपसूकच कान टवकारले गेले, आणि मी पण हात समोर केला. 🙂

सुकेळी, सोनकेळी,sukeli, sonkeli
सुकेळी बांधलेलं पॅकिंग उघडल्यावर

चांगली पिकलेली केळी घेऊन बांबूच्या जाळीवर उभ्या ठेवून उन्हात सुकत घातल्या जातात . दिवसभर सुकतांना त्यामधून त्यातून जे पाणी खाली गळते ते गोळा करून त्या गोड पाण्यामध्ये रात्री त्या केळी पुन्हा बुडवून दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उन्हात सुकत घालतात. ते पाणी म्हणे अगदी मधासारखे असते. हीच प्रक्रीया केळी पुर्णपणे केळाचं सुकेळ होई पर्यंत रिपीट केली जाते  .  बराच वेळ खाणारा प्रकार आहे हा. केळामधून सुकतांना जो गोड ज्युस खाली गळतो त्याच ज्युस मधे भिजवल्याने आणि उन्हात सुकवल्याने केळाला मधात घोळवल्या सारखी मस्त चव येते. मला तर सुकेळी खातांना बरेचदा सुक्या अंजीराची -आणि मधाची पण आठवण करून देणारी चव वाटली . एक सुकामेवा किंवा त्यापेक्षाही अधिक चांगला प्रकार वाटला मला .

फ्रिज शिवाय बाहेर रहाणारा हा पदार्थ तयार करणे फार त्रासाचे काम आहे. आणि हल्ली मागणी पण कमी झाल्यामुळे इतर या सुकेळींचे मॅन्युफॅक्चरींग बंद झाले आहे. याचं वाईट वाटतं की लवकरच ही सोनकेळी फक्त पुस्तकातच वाचायला मिळतील असे वाटते. मी ऑफि समधल्या जन्माने मुंबईकर असलेल्या काही मित्रांना विचारले, पण त्यांनीही हा प्रकार फक्त ऐकून माहीती आहे असे म्हणाले.

येणाऱ्या दिवसात असे बरेच प्रकार नामशेष होणार आहेत , अर्थात नवीन काही तरी सुरु हॊईलच.. पण या गोष्टींना मात्र नक्की मिस करणार आहे मी..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , , . Bookmark the permalink.

44 Responses to सुकेळी

 1. मांडे हा प्रकार ज्ञानेश्वरांच्या चित्रपटात पाहून माहित झाला होता. प्रत्यक्ष खाल्ला कधीच नाही. पण फोटोत बघून रूमाली रोटी सारखा असावा असे वाटले. बाजरीची खिचडी तर माहितही नाही. सुकेळी फार लहानपणी एकदाच खाण्याचा योग आला होता. पण वस्तू थोडी आणि खाणारी तोंडे बरीच त्यामुळे पोटात कुठल्याकुठे गेलं आठवतही नाही. पण चव मात्र आठवते.

  • श्रेया
   मला पण माहीती नव्हते हे प्रकार. इथेच समजले. अजूनही आहे काही दिवस प्रदर्शन, इथे ते हुरड्याचे थालीपीठ खायला नक्की जाऊन या.. 🙂

  • mejwani says:

   सुकेळीबद्दल पहिल्यांदाच ऐकले ,माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद !
   आणी मांड्यांवर बोलायचे झाले तर ते आम्ही जवळपास सर्वच सणांना खातो त्याला आम्ही खापराच्या पुरणपोळी म्हणतो आणि मला आंब्याच्या रसासोबत पुरणपोळी खूपच आवडते .

   • ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
    पण खापरावर बाजरीच्या पिठात थोडा गुळ , तिळ , मिठ घालून केलेली भाकरी आमच्याकडे केली जाते. खापराचा तवा अजूनही आहे आमच्याकडे. पण त्यावरची पुरण पोळी ऐकली नव्हती.
    हे मांडे म्हणजे आधी पुरणपोळी पोळपाटावर लाटुन ८-९ इंच व्यासाची करायची, आणि मग तिला दोन्ही हातावर ताणून दोन फुट व्यासाची करायची. खूप कौशल्याचं काम वाटलं मला ते. मांडे आणि पुरण पोळी एकदम भारी कॉम्बो दिसतंय, एकदा ट्राय करायलाच हवे. आमच्याकडे बासुंदी आणि पुरणपोळी आवडते सगळ्यांना. 🙂
    खूप गोष्टी जुन्या आता संपल्या आहेत- जसे पुर्वी आई भाकरी करतांना पोळपाट कधीच वापरत नव्हती, दोन्ही हातात गोळा धरून चांगली मोठी गोल भाकरी बनवायची- आजकाल पोळपाटाशिवाय कोणाला जमत नाही. असो..

    • Amol says:

     mande tar ajun hi miltat kolhapurat kahi thikani,specially bhavani swimming pool chya lokancha ha sunday menu hota!
     aani I cant imagine ki bhakri polpat vaprun tayar karata yete. kahdi baghitalach nahi.
     Tumhi Masale bhaat aani aamras ekatra try kelat ka kadhi?? 😉

     • अमोल,
      आजकाल येत नाहीत हो नवीन मुलींना हातावरच्या भाकरी.. 😦 मसाले भात नेहेमीच केला जातो आमच्याकडे.

 2. kedar kale says:

  khup chan ahe………

 3. rohit says:

  ek ek naav aikun bakichya baryach gosti aathavlya………aani tondala paani sutal…………:)

 4. Prasad Tharwal says:

  Kaka thnx for enlightment, mi hi ata paryanta Sukeli mhanje.. velchi kelich samjat hoto!
  Mande haa prakar hi fakta aaikiwat hota.. pan to nakkie kay asto he mahiti navhate.. aajichya tondun.. goshtit aaiklele ki Muktabaaieni, santa dnyaneshwaranchya pathiwar mande bhajle hote mhanun..! pan haa Mande mhanje purnpolichach motha bhau aslyache aaj kalale..! Kharach amchy generation ne khup kahi miss kela… 😦

  • आपले असे काहीतरी कन्सेप्ट असतात. त्याला कारण काहीच नसते. मी स्वतः पण आता म्हणजे वयाच्या पन्नाशीला आल्यावर मांडे पाहीले आणि खाल्ले. 🙂

 5. santosh Deshmukh says:

  काका
  ऋजुताताईने असे काय लिहीले आहे की तुम्ही इतके बदललात …मलाही सांगा ना !!!!!!! बाकी केळी एकदम मस्त ,काका मी ग्रामीण भागात खूप फिरतो मलाही असले बरेच प्रकार माहीत आहेत

  • संतोष
   ऋजुता दिवेकर म्हणजे करीना कपूरच्या आणि अनिल अंबानीच्या डायटेशियन. त्यांचे एक पुस्तक आहे.. Do not Lose your mind, Lose your weight नावाचे. खूप छान आहे ते पुस्तक. त्यावर एक पोस्ट टाकायची आहे अवश्य वाच नसेल वाचले तर. किंमत १९० रुपये.

   • Smita says:

    kharach chaan pustak ahe aNee it makes sense. for example apUn kadheech ha vichar kelela nasato kee apalya poTacha akaar kay aNee apan eka veLee tyat kay kay bharatee karat asato, ! when she says kee don mutheen evadhach anna kharatar eka veLee ghena yogya ahe, it make sone wonder – apUn kadheetaree ha rule palato ka? if we can do just that each time we eat, it will take us a long way! in term sof right eating.

    ANee Mahendra, “loose” nahee “lose” pahije asa vaTatya, loos emhaNaje sail kapade madhala aNee lose mhaNaje don’t lose your mind madhala ( ghalavaNe, gamavaNe ya broad arthane) hope you don’t mind the correction. tumchya posts sarva drishtine perfect asvyat mhanaje largely asataatach, puN notic ekela mhaNun sangeetala>

    • स्मिता
     धन्यवाद.. टायपो दुरुस्त करतोय.. एका वेळेस थोडं खायचं, आणि दर दोन तासांनी पण काहीतरी थोडं खायचं .एका वेळेस पोटाला ’तडस’ लागे पर्यंत जेवायचं नाही.ऋजुता दिवेकरांच्या म्हणण्याप्रमाणे सुरु केलंय सध्या , त्यामुळे थकवा पण येत नाही, आणि चिडचीड पण होत नाही. ते पुस्तक खूप छान आहे. संग्रही ठेवण्यासारखे.

     गोंदवलेकर महाराज,सांगायचे की जेवण इतकंच असावं, की एकदा जेवल्यावर पुन्हा तेवढंच जेवता यावं. लक्षात येतं, पण पाळत नव्हतो या गोष्टी. प्रत्येक वेळेस अगदी मनसोक्त जेवल्याशिवाय व्हायचं नाही माझं. जो पर्यंत वय ३०-४० होतं तो पर्यंत वजन वगैरे ताब्यात होतं- कारण दररोज व्यायाम पण करायचो. एकदा सुटलं सगळं आणि सोबतच पोट पण सुटायला लागलं. आता पुन्हा कंट्रोल करायची वेळ आलेली आहे. 🙂

 6. मी आजवर मनातच मांडे खाल्लेत 😛
  सुकेळी एकदा खाल्लेली पूर्वी… मस्त असतात!

  • मनातले? आजकाल बहूतेक खाद्य जत्रेमधे मिळतात( मुंबईच्या) सुकेळी खरंच खूप मस्त लागतात चवीला.

 7. mazejag says:

  अजून आहे का प्रदर्शन

 8. Nikhil says:

  Mande mi khallet, Dharwad madhye miltat ajun sarras…Malmaddi area madhe, jithe G A Kulkarni yanche rahate ghar ajun ahe…

  post zakas zaliye baki!

  • निखिल
   प्रतिक्रियेसाठी आभार.. खूप अवघड वाटला तो प्रकार करतांना पाहून. काही भागात तरी सहज अव्हेलेबल आहे हे ऐकुन बरं वाटलं.

  • Smita says:

   yes boss , lagna samarambhat tar adalya divashee mhaNeje seemanta pujanachya divashee tya bhagat mandyancha jevaN asata. 🙂

 9. मांडे, सुकेळी हे दोन्ही प्रकार फक्त ऐकीव माझ्यासाठी. कधीच बघितले नाहीयेत.. खाणं तर दूरच. 🙂

  • मला पण फक्त ऐकीव म्हणून माहीत होतं. इथे पहिल्यांदाच खाण्याचा चान्स मिळाला. सुकेळी चवीला मस्त असतात – थोडी किसमिस, किंवा अंजीर आणि मध वगैरेची कम्बाइन्ड आठवण येते खातांना.

 10. निनाद होंबळकर says:

  काका… खरच खूप नशीबवान आहात.. मुंबईला राहता म्हणून असे अनुभव मिळतात… इकडे तसे काहीच पहायला मिळत नाही… संधी मिळाली तर नक्कीच सुकेळी ची चव घेईन.. मस्त पोस्त झाले आहे…

  • निनाद,
   इथे मुंबईला राहून पण लोकांचं जाणं होत नाही . इथे बऱ्याच मुंबईकरांनी वाचले असेल हे, पण किती लोकं आपापली कामं सांभाळून जाऊ शकतील ते सांगता येत नाही.

 11. bhaanasa says:

  तू गेल्यावर्षीही असेच आम्हाला जळवले होतेस. 😦 इकडे थंडीने जीव चाललाय वर इतके छान छान खाऊन, भरल्यापोटी ढेकर देत देत ते रसभरीत वर्णन करून पोस्टायचे म्हणजे… निषेध!

  मांडे तरी कधीतरी मायदेशी दर्शन देतात पण सुकेळी आणि हुरड्याची भाकरी मात्र नाहीच मिळत. खरेच हळूह्ळू हे प्रकार लयाला चाललेत.

  ऋजुता दिवेकर च्या पुस्तकाबद्दल बरेच ऐकतेय. चाळायला हवे मिळालेच तर.

  बाकी तुझ्या डाएटचा जोर आहे ना तितकाच टिकून??

  • हो. डायटींग सुरु ठेवलंय, पण ऋजुता च्या पद्धतीचे.. 🙂 सगळं खा, पण एका वेळेस किती , आणि काय ते छान सांगितलंय त्या पुस्तकात. तेच फॉलो करतोय. आणि सकाळचा व्ययाम पण सुरु आहेच. फायदा होतोय . But miles to go………….!

 12. sahajach says:

  मांडे खाल्लेत मी बरेचदा महेंद्रजी, पण तुमच्यासारखेच मतं की ना धड गोड ना अगोड अशी त्याची चव मला फारशी आवडत नाही… त्यापेक्षा पुरणपोळीच प्रचंड आवडणारी….

  हुरड्याची भाकरी , नाव वाचूनच खावी वाटतेय…. मी सध्या हुरडा, हरभऱ्याचे कोवळे दाणे मिस करतच होते त्यात आता ही पोस्ट…. संक्रांतीच सुगडं वगैरे मुलांना फोटोत दाखवावे लागणार आहेत आता….

  ’राजेळी’ म्हणजेच ’सुकेळी’ हा गैरसमज माझाही होता 🙂 ….

  ऋजूता दिवेकरांच पुस्तकं वाचायला हवयं एकदा…

  पोस्टमधल्या खादाडीचा अल्प निषेध कारण बऱ्याच दिवसानी तूम्ही खादाडी पोस्ट टाकलीत 🙂

  • Smita says:

   actually puranpoLeesarakhach tyancha chura kartaat, tyavar toop aNee sweetened milk- kesharee doodh vaDhataat, tyamuLe “dhad na goad na agoad” asa vaTat nahee – if you eat it the way it is meant to be eaten, jaude- diet chalu ahe te chalu rahudet sagaLyancha:-)

   • तन्वीला अजून बराच स्कोप आहे वजन वाढू देण्याचा 🙂
    मला स्वतःला बासुंदी आणि पुरण पोळीचं कॉम्बो आवडतं. ( माझ्या तब्येतीचं रहस्य 🙂 )
    @तन्वी,
    ऋजुता दिवेकरांचं पुस्तक वाचायची काही गरज नाही अजुन तरी- तुला आणि अमीतला पण . सध्या तोंडावर नियंत्रण असल्याने काही जास्त लिहिलं पण जात नाही खादाडीवर.. 🙂

 13. Ninad says:

  Sukeli che Introduction mala pahilyanda Shashank Nabarani kele. Kay mast chav aste. Amhi khup plan kelet How to Market it on commercial basis, pan plan pudhe gela nahi. Tumhi ata parat aathvan karun dilit

  • निनाद,
   अजूनही पहा, ब्लॉग वर दिसतंय की किती डिमांड आहे ते. एकदा तुम्ही मार्केटींग सुरु केलं की बरेच लोकं घेतील. शशांक तर आता कदाचित इंट्रेस्टेड नसेल, पण तुम्ही सध्या असलेल्या प्रॉड्क्ट्स बरोब्रर हे पण मार्केटींग करू शकता.

 14. amit says:

  mahendraji,
  I am new reader in kayvatelte. All your posts are very nice & meaningful. I like your post sepcialy in khadadi.
  Keep posting.

 15. मांडे पुर्वी एकदा खाल्ले आहे…पण सुकेळी फ़क्त ऐकुनच आहे…टेस्ट करायला हवी.

 16. devarshi says:

  mazyakade “khandeshi mandyachi” ek chhan video clip aahe . Ti tumhala kashi pathavavi te kripaya kalavave.
  Dhanyavad.

  • देवश्री
   ब्लॉग वर स्वागत.. तुम्ही जर ती क्लिप यु ट्य़ुब वर अपलोड केली आणि इथे त्याची लिंक दिलीत तरीही चालेल. किंवा kbmahendra@gmail.com या पत्त्यावर इ मेल पण करू शकता. धन्यवाद.

 17. Aparna says:

  हम्म सुकेळी…आईचं एक ठरलेलं दुकान होतं तिथे सुकेळी लटकत असायची..काहीवेळा आतून किडलेलं निघालं तर तो बदलून पण द्यायचा…काळ लोटला खाऊन असं ही पोस्ट वाचताना जाणवतंय…
  आईला सांगायला हवं…:)
  माझ्या माहितीत ते राजेळंच वापरतात सुकेळ्यासाठी..पण जे काही असो..एकदम अल्टिमेट लागतात..आणि महाग झाली हो..मी शेवटची खाल्ली तेव्हाही १५-२० रु. असावीत…दहाएक वर्षात चार पटीने वाढली म्हणजे..

 18. रोहन says:

  वसईला आत्या राहते माझी. लहानपणी जेंव्हा जायचो तेंव्हा सुकेळी मिळायची.. अगदी घरी सुद्धा यायची… पण आता मिळायचे जवळ जवळ बंदच झाले आहे… त्या स्टॉलचा काही पत्ता? आत्याकडे सुद्धा जाणे झालेले नाही बरेच महिने … 😦

  • रोहन
   अरे नेट वर सापडेल.गुगल वर सुकेळी सर्च करा असं त्या वहीनी म्हणाल्या होत्या.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s