तुमच्या नजरेतुन…

टाइम्स ऑफ इंडीयामधली जाहीरात

भारत कसा आहे?? म्हणजे सुरज बडजात्याच्या सिनेमात दाखवतात तसा?? की करण जोहरच्या सिनेमात दाखवतात तसा चकचकीत?? की के च्या सिरियल्स मधे जसे दाखवतात तसा? नाही.. भारत तसा नाही . तुम्ही आम्ही जे जगतो ते सिरियल किंवा सिनेमातल्या सारखे नाही, आपलं आयुष्य फार वेगळं असतं. सकाळी उठून दूधवाला आला नाही, म्हणून दूध आणायला गेल्यावर कळत की आज दुधाच्या गाडीचे चाक पंक्चर झाले आहे म्हणून दूध लवकर मिळणार नाही, आणि तुम्हाला दूध न देताच  मुलांना शाळेत पाठवावे लागेल..  हे असे प्रॉब्लेम्स कधी पाहिलेले आहेत  का सिरियल मधे?

लोकल मधे चढतांना थोडी चपळाई कमी पडली तर विंडोसीट तर सोडाच , आत शिरणं पण मुश्कील होतं.   धडपडतो, कपडे खराब होतात, प्रसंगी फाटतात, खरचटतं, लोकल मधला साईडचा बार लागतो.   पत्ते खेळणं हा गुन्हा आहे हे माहीत असूनही लोकल मधे पत्ते खेळतात -बसकंडक्टर रिकामी असूनही  बस स्टॉप वर   न थांबवता  निघून जातो,  रिक्षाने चल, म्हटल्यावर  रिक्षावाला नकार देतो.

ऑफिसला जातांना, बाहेर फिरतांना नेहेमीच आपल्याला काहीतरी नेहेमीपेक्षा वेगळं दिसत असतं , आपण  त्याकडे हे काय- नेहेमीचेच म्हणून दुर्लक्ष करत असतो  . एखादा लांब केस असलेला साधू,  तुम्ही स्वतः एसी कार मधे जात असतांना सिग्नल वर उभे असतांना दिसणारे अनवाणी चालत जाणारे साधू-साध्वी, रस्त्यावर कचरा फेकणारे, कारचे दार उघडून भर ट्रॅफिक मधे थुंकणारे  लोकं. रस्त्याच्या कडेला  एखाद्या कार/बाइक वाल्याला रस्त्याच्या कडेला थांबवून  मांड्वली करणारा पोलीस!

मेक शिफ्ट अरेंजमेंट्स -थोडक्यात तुटलेल्या कारच्या दाराचे  लॉक दुरुस्त करण्याच्या ऐवजी तिथे कडी आणि कोयंडा लावणे असे प्रकार, किंवा पाण्याचा प्लास्टिक पाईप गॅस ला जोडून  त्यावर भजी तळणारा तो वडा पाव वाला पण रोज दिसतो.

कामावर असतांना झोपणारे कर्मचारी, भाज्या निवडणाऱ्या बायका- ह्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत आरबीआय मधे एकदा भावाला भेटायला गेलो असताना 🙂 बाजूच्या डस्ट बिन मध्ये पान गुटका थूंकणारा तो घाण सरकारी कर्मचारी,   तसेच काहीतरी विचित्र म्हणजे साईबाबाच्या फोटो मधून बाहेर पडणारा अंगारा, रस्त्याच्या कडेला  पोपट घेऊन बसलेला तो  जोशी, सापाचे खेळ करणारा गारूडी  पण दिसतो. गाईला पैसे देऊन चारा खाऊ घालणारे गुजराथी लोकं.कधी रस्त्याने जातांना दिसणारे ओव्हरलोडेड ट्रक्स, रेल्वेच्या टपावर बसून प्रवास करणारे लोकं, एका स्कुटरवर किंवा बाईक वर दोन पेक्षा जास्त लोकं  धोकादायक पणे प्रवास करताना दिसतात.तो करण जोहर चा  नाही -तर हे  सगळं रिअल लाइफ! हा खरा भारत.

सकाळचा टाइम्स ऑफ इंडिया उचलला आणि पहिल्या पानावर पुर्ण पान जाहिरात दिसली. आजकाल पहिल्या पानावर जाहिरात असणे यात काही नावीन्य नाही, कारण दररोजच पहिल्या पानावर काहीतरी असते, पण आजचे चित्र  अ डे इन द लाइफ ऑफ इंडिया नावाचे, आणि सगळे कार्टून्स असल्याने लक्षवेधक होते, आणि त्यामुळे साहजिकच त्या पानावर रेंगाळलो. त्याचा पानाचा स्क्रिन शॉट वर लावलेला आहे.

इ मेल मधे बरेचदा आलेले फॉर्वर्ड मधली चित्रं- जसे ’चाइल्ड बिअर’ वगैरे आणि मुन्नी की जवानीचे  फोटो, बिकिनीतली मुलगी आणि तिचं पोस्टर तर अगदी स्टॅंडींग आऊट होते.तसेच ’रजनीकांतचा ’ लार्जर दॅन लाइफ कटाउट पण लक्ष वेधून घेत होताच.  सगळ्यात मस्त म्हणजे रणगाडा, वगैरे सगळे एका परेड मधे जात आहेत, अर्धी परेड पुढे गेलेली आहे, मधेच एक मांजर आडवी जाते आणि परेड थांबलेली दिसतेय. .जवळपास २-३  मिनीटे त्या चित्राचे पुर्ण निरीक्षण केल्यानंतरच पहिले पान उलटले.  बरेचदा जाहिरात इंटरेस्टींग असली की तिचे महत्त्व जास्त वाटते मुख्य बातमी पेक्षा!

या पुढे तुम्हाला  एक काम करायचंय! तुमच्या नजरेतून दिसणारा भारताचे   फोटो काढायचे आहेत. कॅमेरा नसेल तर सरळ  सेलफोन काढून एक फोटो क्लिक करा, व्हिडिओ किंवा आवाज रेकॉर्ड करा. ’खऱा भारत’  जो तुम्हाला दिसतो तो इतरांना दाखवायला म्हणून   तुमच्या सेल फोन मधे   बंदिस्त करा.हे सगळं कशाला? आजच्या टाइम्स ऑफ इंडीया मधे एक जाहीरात आलेली आहे अगदी पहिल्या पानावर . त्यावर त्यांनी तुमच्या नजरेतल्या खऱ्या खुऱ्या भारताला रिप्रेझेंट करणारे जे काही   फोटो , व्हिडिओ असतील ते  त्यांच्या वेब साईट वर अपलोड करायला सांगितले आहेत.

विषय – तुमच्या नजरेतून भारत! तर उ्ठा आणि स्टार्ट क्लिकिंग! जर तुम्ही नशिबवान असाल, तर तुम्हाला दहा हजार ते पाच लाखापर्यंत कितीही बक्षीस मिळू शकेल. ज्या साईटवर रजिस्ट्रेशन करायचे आहे, त्या साईटची लिंक इथे दिलेली आहे. याच साईट वर फेसबुक आयडी वापरून पण लॉग इन करता येतं.

(TOI ची बातमी इथे आहे

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in जाहिरातिंचं विश्व and tagged , , . Bookmark the permalink.

23 Responses to तुमच्या नजरेतुन…

 1. mau says:

  mastttttttt !!!

  • वरच्या चित्रात जवळपास ५० एक तरी कार्टून्सअसतील. थोडा वेळ देऊन चित्र मोठं करून पहा. मस्त आहेत सगळे. त्यात्यल्या त्यात, एक डबा घेऊन प्रातर्विधीला निघालेला माणूस आणि मागे डूक्कर म्हणजे एकदम “आवरा”..

 2. छान लिहले आहे काका…
  लिंक साठी धन्यवाद..

  कोणताही देश परफेक्ट नसतो.
  भारत हा कदापि करण जोहर चा होऊ शकत नाही.
  खरा भारत आपल्या सारखा माणसालाच अनुभवता येतो.

  मी दक्षिण आफ्रिकेत आल्यापासून आपला देश किती वेगळा याचा अनुभव घेत आहे.
  भारतात आपण मनमोकळे फिरू शकतो मात्र इथे तसे नाही करता येत.

  आपल्या कडील “चलता है” या अ‍ॅटीटुड ची सवय आपल्याला झाली आहे, त्यामुळे मिडियातूनही हे छापून येतं. इथे ही चित्र फार वेगळं नाही.

  • नागेश
   देश पर्फेक्ट नसतो. पण ही देशाचे खरे खुरे रंग पकडण्याची आयडीया मला आवडली. या सगळ्यांमुळे त्यांची फोटो बॅंक किती वाढेल याचा अंदाज करताच येत नाही.

 3. मारिओ मिरांडा यांचं आहे का हो हे चित्र?

 4. अप्रतिम….टाइम्सचा अजुन एक चांगला उपक्रम 🙂

  • सकाळी पेपर पाहीला तेंव्हा लगेच लिहायला घेतला. पण अर्धा झाल्यावर उरलेला रात्री पुर्ण केला. खरंच एक चांगला उपक्रम. लोकांनी फक्त इथे स्वतःचे चित्र पाठवले म्हणजे मिळवली. नाहीतर नेट वरून डाऊन लोड करूनही पाठवतील काही लोकं

 5. I liked today’s Times Of India front page and the page 2 too!
  Please see my article on the great Pt. Bhimsen Joshi.

  • मी पहिले पान कधीच पहात नाही जाहीरातींचे असेल तर. म्हणून मला वाटले की बऱ्याच लोकांनी पण ते दुर्लक्षले असेल , म्हणून हे पोस्ट लिहिले.

 6. स्नेहल says:

  खर आहे काका, अगदी खर आहे हे म्हणजे मरीन ड्राइव म्हणजे खरी मुंबई नव्हे तर त्याच मुंबईचा एक भाग धारावी हि आहे अगदी तसे आहे

  • स्नेहल
   आपल्याकडले फोटो अपलोड कर लवकर .काय सांगावं, तुला पाच लाखाचं बक्षिस पण मिळून जाईल. 🙂

 7. आयडीयाची कल्पना आवडली….भारीच आहे.. 🙂

  तुम्ही कोण कोणते फ़ोटो टाकणार आहात??? आठवणीने शेअर करा .

  • मी पण टाकणार आहेच . बरेच फोटो आहेत संग्रही . दोन चार टाकीन म्हणतोय. पण पंक्या, अनिकेत असतांना आपला नंबर कसा काय लागणार ??

 8. Shankar Dhongade says:

  छान लिहले आहे
  धन्यवाद.!

 9. कार्टून मस्त आहेत. एका पानात खूप काही बसवलं आहे.
  TOIचा उपक्रम चांगला आहे फक्त ह्याच output काय असेल?

  • सिद्धार्थ
   याचं आउटपुट म्हणजे टाइम्स ऑफ इंडीयाला भरपूर फोटोग्राफ्स चं कलेक्शन मिळेल त्यांच्या पेपर मधे छापायला. 🙂

 10. s.k. says:

  ho kaka baghitli hoti ti jaahiraat.. lakhsvedhak hoti.. me ti Times Of India chi copy zapun thevleli pan aahe.. he he 🙂

 11. Mrunal says:

  sagalya gosti fath mulansatich astath ka?

  • मृणाल
   मला वाटत हा प्रतीसाद दुसऱ्या लेखावर द्यायचा होता तुम्हाला. पण मुलींसाठी पण काही आहे का ते शोधतोय. सापडलं की इथे लिहिनच त्यावर.

 12. SANDEEP says:

  आपला भारत कसाही असुदे पण त्यातच मजा आहे. पुढे मागे सुधारेल

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s