व्हर्च्युअल बायको?

तुमचे लग्न झालेले नाही. बॅचलर आहात- माफ करा मोस्ट एलीजिबल बॅचलर म्हणू या हवं तर- मग हे पोस्ट तुमच्याच साठी आहे. चांगली नोकरी, घर, गाडी  सगळं काही झालंय. कमतरता आहे तर ती फक्त एकाच गोष्टीची ती म्हणजे एका बायकोची. लग्नाबद्दल थोडं सुप्त आकर्षण, थोडी भिती, किंवा थोडा हवाहवासा वाटणारा सहवास, नको असलेली लायब्लीटी.. ती कशी असेल ही हुरहुर.  ह्या सगळ्या प्रश्नांच्या गराड्यात गुंतलो की सगळं सोडून द्यावं आणि सरळ संन्यास घ्यावा असे वाटते की नाही?? सगळं काही व्यवस्थित असतांना पण एक प्रकारचे भिती असतेच मनामधे. 

बायको कशी असावी? हाऊस वाईफ की नोकरी करणारी? बरं, आजकालच्या जगात एकाच्या नोकरीवर काय होणार? म्हणून नोकरी करणारी म्ह्टलं तरी कोणती नोकरी करणारी असावी? आपल्याच प्रोफेशनची की दुसऱ्या कुठल्या प्रोफेशनची?घरच्यांशी ती जुळवून घेईल की नाही?  असे हजारो प्रश्न असतात ना मनात? सहाजिक आहे-  पण काही काळजी करू नका.  सहज सर्फ करतांना मला एक साईट सापडलेली आहे. लग्न न करता पण लग्नाचा अनुभव घेण्याची सोय केलेली आहे त्या साईट वर. तसा वाईट अर्थ काढू नका- ’तसा’ अनुभव नाही, तर ’नॅगिंग वाइफच” अनुभव घेण्यासाठी म्हणतोय मी!

या मधे तुम्हाला चार निरनिराळ्या प्रकारच्या बायकोचा आस्वाद ( या शब्दावर कृपया आक्षेप घेऊ नये कोणी) घेता येऊ शकतो. त्यांच्या बद्दल थोडक्यात खाली दिलेले आहे.  व्हर्च्युअल बायको म्हणून जे चार प्रकार आहेत त्यातला   पहिला प्रकार म्हणजे रीता वय २१ एका एमएनसी मधे सेक्रेटरी. बॉलीवुड गॉसिप मधे इंटरेस्टेड. ऑफिस मधे खूप पॉप्युलर असलेली. लोकांना नको असतांना पण सारखे सल्ले देणारी अशी.खूप बडबड करणारी, फनी, बबली,  अशी मुलगी.. द गर्ल नेक्स्ट डॊअर..

दुसरी प्रकार २६ वर्षाची बॅंकेत नोकरी करणारी, एमबीए झालेली, गॅजेट्स बद्दल वगैरे एकदम अपटूडेट माहीती असलेली. ब्रॅंड कॉन्शस, रस्त्यावरची कुठलीही वस्तू विकत न घेणारी.इव्हन आपली भाजी पण ऑन लाइन विकत घेणारी अशी ही टेक सॅव्ही बायको आहे.एकदम अपटूडेट रहाणी असलेली- सगळ्यांना  बायको म्हणून हवी हवीशी वाटणारी. स्वतःचे विचार पुर्ण पणे डेव्हलप झालेले असलेली. पण जर अशी मुलगी बायको झाली तर काय होईल? याची थोडी टेस्ट इथे घेता येईल.

बरेचदा डॉमिनेटींग बॉसींग करणारी बायको हवी हवीशी वाटते काही लोकांना. स्पेशली बंगाली लोकांना. घरातली सगळी कामं स्वतः करते, आरडा ओरडा, आदळ आपट, पण थोडंसं प्रेमाने बोललं की विरघळून तुमच्या कुशीत शिरणारी! पण अशी बायको सांभाळणं म्हणजे काय चेष्टा नाही.  ही तिसऱ्या प्रकारची बायको आहे.

चौथा प्रकार म्हणजे एकदम सिनेमातली घरगुती बायको. नवरा हाच परब्रह्म समजून वागणारी. स्वयंपाक करणे, क्लासिक रोमॅंटीक नॉव्हेल्स वाचणे वगैरे हिचा खास पास टाइम. टिव्ही सिरियल्स मधे कायम गुंतलेली. सोसायटी गॉसिप मधे एकदम खूप इंटरेस्टॆड पण  डिव्होटेड बायको. नवऱ्याला सारखे   पॅंपरींग करणारी अशी.टिव्हीसिरियल्स, सिनेमा गॉसिप मधे खूप इंटरेस्टेड.

या साईटवर तुम्ही तुम्हाला हवी तशी मुलगी सिलेक्ट करून तुम्ही तुमचा सेल नंबर दिला की मग तुम्हाला ती  वेळोवेळी मेसेजेस पाठवत राहील. 🙂  मेसेजेस कसे असतील? ते अवलंबुन आहे तुम्ही कुठल्या प्रकारची बायको सिलेक्ट करता यावर. नाही लक्षात येत? ओके.. समजा तुम्हाला ऑफिस मधुन घरी यायला वेळ झाल, तर ” अरे लवकर ये, वाट बघते आहे रे तुझी” म्हणून प्रेमाने आळवणारी किंवा दुसरी  जी व्हर्चुअल वाइफ आहे ती जरा शार्प असलेली, ’ ऑफिस मधे जर अजून बसलास तर , थांब तुझे बेड ऑफिसमधे पाठवून देते” म्हणून धमकवणारी . हे फक्त एक सॅंपल आहे.सकाळी ब्रेक फास्ट पासून मेसेजेस सुरु होतील. 🙂

ही अशी  व्हर्च्युअल बायको असणे बरोबर की चुक ? हा मुद्दा घेऊन ही पोस्ट लिहिलेली नाही हे लक्षात घ्या.  एक गमतीशीर साईट, आणि तिची माहीती द्यायला हे पोस्ट आहे.  जाऊ दे, जास्त काही लिहित नाही, तुम्ही तुम्हाला जी हवी ती बायको निवडा  आणि ’विवाहा पुर्वी’ वैवाहीक जिवनाचा अनूभव घ्या.
व्हर्च्युअल बायकोचे आपले  इथे शेअर केले तरीही माझी  हरकत नाही..

इतकं सगळं सांगितलं, पण ती वेब साईट कुठली ते सांगितलंच नाही. तिची लिंक इथे दिलेली आहे बघा. 🙂

मुलीसाठी व्हर्च्युअल नवरा नाही … 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ and tagged , , , , , , , , , . Bookmark the permalink.

62 Responses to व्हर्च्युअल बायको?

 1. हा हा हा…मस्तच 🙂

 2. हाहा.. मस्तंच.. उशीर झाला आता आम्हाला साईन अप करायला 😉

  • आप
   बेटर लेट दॅन नेव्हर..?? पण नको. घरी जर सेल फोन पाहिला तर विनाकारण वांदे व्हायचे.

 3. हे..हे…हे….भारीच… 🙂 🙂

 4. स्नेहल says:

  हा हा हा
  काका व्होट योर राशी पाहून आलात का?

  • परवा लोकल मधून येतांना एका लोकलच्या मित्राने एसएमएस दाखवला, आणि ह्या साईट बद्दल समजले. तेंव्हा म्हंटलं की इथल्या लोकांसाठी शेअर करावी.

 5. Dhundiraj says:

  एकदम भारीच…… लोकांच्या डोक्यात काय काय कल्पना येतील, काही सांगता नाही येत….;)

  • खरं आहे.. ही त्या वेब साईटची जाहीरात आहे. भारत मॅट्रिमोनी डॉट कॉम या साईटची. किती दिवस सुरु राहिल ते सांगता येत नाही.

 6. mazejag says:

  काय हे काका

 7. Raj Jain says:

  अफलातून.

  साईटच्या ग्राफिक साठी १०० मार्क माझ्याकडून.
  कल्पना मस्तच आहे आवड्याश !!!

  • जाहीरातीचा हा प्रकार मस्त आहे . मला पण खूप आवडला. अविवाहीत तरूणांना आपल्या साईट वर खेचायचा चांगला उपक्रम आहे हा.

 8. shubhalaxmi says:

  hello kaka,
  mastch ahe pan………..
  he chukich ahe ha!!!!! mulansathi ahe pan muli kay karnar bicharya,
  amhasathi kuthli site ahe ka sanga;;;;;;;;;;;;;

  by tc

 9. हेमंत आठल्ये says:

  🙂 मस्त आहे

 10. व्हर्चुअल बायको आजपासूनच ट्राय करतो.. नंतर खरीखुरी बायको डोईजड व्हायला नको… हाहाहा..

 11. एक बायको आहे… तरीपण ट्राय मारता येईल का ?

  • अवश्य.. मारता येईल ट्राय. पण घरी बायकोने सेल फोन पाहिला, तर मात्र हा कोणाचा मेसेज ते समजावून सांगतांना नाकी नऊ येतील.

 12. vikram says:

  aayala lay bhari kaka 😉

 13. विशाल कुलकर्णी says:

  भन्नाट कल्पना आहे. 😉
  पण घरी गेल्यावर जर खर्या बायकोने मोबाईल चेक केला तर…………………….. 😉

 14. mau says:

  हा हा हा…काय काय लोकांच्या कल्पना !!!भन्नाट एकदम…मस्त झालीये पोस्ट..

 15. sonal says:

  chaanach..majja aali. ya goshtinch swapn suddha pahil navhat mi shala college madhe sataana. aata majhi mulagi mothi hoeeparyant kaay kaay hoeel ha wichar karun gammat waatte aani kutuhal suddha.

  • खरं आहे.. मला पण मजा वाटली.. म्हंटलं, आपले बरेच एकांडे शिलेदार आहेत, त्यांच्यासाठी हे पोस्ट लिहावं.पोस्ट शनिवारी लिहून ठेवलं पण प्रसिद्ध केलं नव्हतं.ते सोमवारी शेडूल करून ठेवलं म्हणून पब्लिश झालं. नाहीतर बऱ्याच अनपब्लिश पोस्ट प्रमाणे ड्राफ्ट मधेच राहिलं असतं.

 16. jyoti says:

  mast kaka …. 🙂 🙂

 17. tejali says:

  kaay he..no virtual nawara..sooo sad…:(..pan ashi kuthali site melali tar nakki kalawa ha!..:)

 18. हा हा हा हा काका.. भारी पोस्ट एकदम..

  >> हाहा.. मस्तंच.. उशीर झाला आता आम्हाला साईन अप करायला

  आनंदा, काळजी नको. बॅचलर लोकांना एकच साईनअप करता येते.. आपल्यासारख्यांना चारी प्रकार एकदम मिळतात. (बायकोच्या) मूडप्रमाणे.. 😉

 19. Chhan aahe ! Internet madhun Lok kay kay kalpana ladhavtil yacha kahi nem nahi ! Mast ahe site !

 20. sahajach says:

  🙂

  आनंदा, हेरंबचा अनूभवी सल्ला ऐक रे…. 🙂

  • आनंद ला अनुभव यायचा आहे अजून इतर रुपांचा.. सध्या फक्त चौथं (त्या साईट वरचं)रुप पहातोय तो बायकोचे.

 21. Smita says:

  eka typeche messages bore zale kee switch puN karata yeta ka? acharat ahet sagaLe 🙂 once again- kalay tasmai nam:

  • मेसेजेस एकदम हटके असतात. मी पाहिले आहेत एका मित्राच्या सेल फोन वर. जाहीरात करण्याचा एक नविन प्रकार म्हणून आवडली साईट. पी एस ३ वर सध्या व्हर्च्युअल वर्ल्ड बरंच रिऍलिटी शी साम्य असणारं आणलंय, पुढे काय होतं कोण जाणे.

 22. मस्तच आहे, practice साठी छान आहे. एका वेळी चार बायका … बापरे ! पण कल्पना छान आहे. [फक्त कल्पना (हे मुलीच नाव नाही)]. पण try करायला हरकत नाही 😉

 23. sachin patil says:

  काका..

  लय भारी सोय करून दिलीत बघा..आता गर्लफ्रेंड ला जेलस करायला पण मज्जा येइल.पण ते साईट्वाले मोबाईल नंबर invalid दाखवत आहेत.

 24. mejwani says:

  मुलीसाठी व्हर्च्युअल नवरा नाही …
  मुलींवरच असा अन्याय का बर?(just joking )
  छान गमतीशीर लेख आहे .

 25. गंमतच आहे.
  रिमाइंडर सर्विस विथ ए टॅंगी ट्विस्ट… इंट्रेश्टिंग…..

 26. Mugdha Shirvalkar says:

  Funny…kahihi hou shakta aajkal …Baki kaka, tumahaa hya asha interesting goshti saglyat aadhi kaltat:)

  • मुग्धा
   लोकल हा बऱ्याच नविन गोष्टी समजण्याचा स्त्रोत आहे. ही गोष्ट पण लोकल ने जातांना एका मित्राने सांगितले. ते एसएम एस पाहून मला तर आश्चर्यच वाटले होते. 🙂

 27. harshadsamant says:

  khupach chaan!

 28. SWAPNA says:

  me tar nahi vaparu shakat hi website pan mazya navryachya mage bhunbhun lavun deu tar shakte!!!
  kinva mag me swatahch tyala sms pathvin divas ratra…..!!!
  kya idea hai sirji ….

 29. bhaanasa says:

  धन्य आहेत. काय काय नवी नवी खुळं काढतील तेवढे थोडेच आहे. बाकी एकावेळी चार चार बायका सांभाळणे काय चीजआहे त्याची प्रचिती मिळेल. :D:D:D

  बायकांसाठी व्हर्च्युअल नवरा याची पॊप्युलॆरिटी वाढली की येईलच मागोमाग. फक्त ट्राय किती जणी करतील… ???
  लोकल म्हणजे हे असे वेडेचाळे पिकवण्याचं खास क्षेत्रच आहे. 🙂

  • चार बायका फजीती ऐका. तसाही बायकांचा स्वभाव संशयी असतोच. चार चार एकदम वागवणे म्हणजे कहर आहे. बायका पण करतील ट्राय , बऱ्याच पुढारल्या आहेत व्हर्च्युअल युगातल्या भारतीय स्त्रिया!

 30. रच्याक् आयडिया पण जल्ला जरा उशीर झाला.
  आमचे SMS सुरू होऊन येत्या १२ तारखेला वर्ष होईल 😉

 31. RAVINDRA says:

  🙂 🙂 🙂 🙂 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s