मुंडक्यांच्या माळा…

होर्डींग, hoarding,
लहान असताना सकाळी  ’ बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात’   हे गाणं जवळपास दररोज सकाळी  रेडीओवर लागायचं . नागपुरची थंडी, डोक्यावरून घेतलेलं पांघरूण आणि त्यातुन झिरपत कानातून मेंदूपर्यंत पोहोचणारे शब्द-  त्या बाल वयात जरी समजत नसले, आवडत नसले  तरीही मनाच्या गाभाऱ्यात कुठे तरी कोरल्या गेलेले. हेच कारण असेल की गाणं गुणगुणतांना हे गाणं माझ्या तोंडी नेहेमीच येतं. परवाचिच गोष्टं! एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या चेहेऱ्यांच्या फोटोचे होर्डींग एका बसस्टॉप वर लावलेले पाहिले, एकाचलांबच लांब पट़्टीवर बरेच चेहेरे एका रांगेत छापलेले पाहिले  आणि  तेंव्हा पण नेमकं  हेच गाणं आठवलं- थोडं विडंबनाच्या स्वरूपात. चाल तिच होती, फक्त एक शब्द वेगळा होता. कळत नकळत, गुणगुणणं सुरु केलं ” “मुंडक्यांची माळ फुले अजूनी अंबरात” .

तसेच    एकदा एक  होर्डींग पाहिले होते, त्या मधे मुख्य नेत्याचा फोटो ( गल्लीतलाच कोणीतरी होता), आणि त्याच्या गळ्यात सगळे मुंडके माळांसारखे लावलेले होते.  ते पाहिले  आणि  हसू आवरत नव्हतं, फोटो पण काढला होता, पण आता सापडत नाही. कदाचित त्या नेत्याच्या गळ्यातले ताईत आहेत सगळे असे दाखवायचे असेल त्यांना,  पण ते पा्हुन  एक  गाणे आठवले आणि  नकळत गुणगुणणे सुरु केले ’ तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफु मुंडक्यांच्या माळा” बऱ्याच गोष्टी मुद्दाम कराव्या लागत नाहीत, त्या आपोआप होतात- त्यातली ही एक.

hoarding,होर्डींग
पुर्वी होर्डींग म्हणजे फक्त सिनेमाची किंवा जाहीरातींची असायची. हल्ली होर्डींग कसली लावावी याचा काहीच ताळतंत्र राहिलेला नाही. लोकं अगदी कुठल्याही फुसक्या कारणासाठी होर्डींग लावतात . दहा एक वर्षापुर्वी  होर्डींग म्हणजे  फक्त हाताने पेंट केलेले असायचे,त्यामुळे एक होर्डींग बनवायला पेंटरला खूप वेळ लागायचा, कमीत कमी महिनाभर किंवा त्याहुनही जास्तं – म्हणूनच त्याची किम्मत पण खूप असायची. सिनेमाच्या रिल्स सोबत  एक मोठे होर्डींग गावोगावी पाठवले जायचे गावोगावी. त्या होर्डींग वरची सही जगदाळे  असायची बहूतेक वेळा.

हल्ली फ्लेक्स होर्डींग  कॉंप्युटर वर बनवले जातात आणि त्या मुळॆ हे काम  फक्त दहा मिनिटात होते, आणि फक्त तिनशे ते पाचशे रुपयात. हेच कारण आहे की कुठलाही  सोम्यागोम्या आपल्या फोटोचे हे असे होर्डींग बनवून  नाक्यावरच्या खांबावर किंवा कोपऱ्यावर लावून आपली औट घटकेची   प्रसिद्ध होण्याची हौस भागवून घेतो.

होर्डींग, sonia gandhi hoarding

सोनिया गांधी दुर्गेच्या रुपात. आवरा .. कॅटॅगरीचे होर्डींग आहे हे

मला वाटतं की चमचेगिरीची परीसीमा म्हणहे हे होर्डींग झालेले आहेत.एखाद्या गल्लीतल्या नेत्याचे होर्डींग बनवून त्याला शुभेच्छा द्यायच्या, म्हणजे आपले आणि त्या नेत्याचे संबंध किती जवळचे आहेत हे इतरांना दाखवायचे हे मुख्य कारण ! एखाद्याचे पाय किती चाटायचे ह्याला पण काही लिमिट असते. भाजपाच्या विजयाराजेंचा देवीच्या रुपातला फोटो काय किंवा सोनिया गांधीचा दुर्गेच्या अवतारातला फोटो याचे ज्वलंत उदाहरण.नेहेमी हिंदूंच्या विरोधात काम करणारा करूणानिधी यांचा कृष्णाच्या रुपातला फोटो हे ह्याचे ज्वलंत उदाहरण. काही दिवसांनी हे लावलेले फ्लेक्स बॅनर्स झोपडपट़टी झोपडपट्टीवासियांना पावसाळ्यात झोपड्यांवर टाकायला उपयोगी पडतात तेवढाच काय तो उपयोग या होर्डींगचा. बरेचदा तर  रस्त्यावर कचराकुंडी मधे धूळ खात पडलेले  नेत्यांचे फोटो दिसले की मला खूनशी  आनंद होतो- त्यांना त्यांची योग्य जागा मिळाली म्हणून.

रमेश वांजळे होर्डींग, ramesh wanjale, MNS, MLA

रमेश वांजळे मनसेचे एमएलए यांचे मॉडेलिंग..

कोण्या एका पक्षाला नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. सरसकट  सगळ्याच   पक्षाचे कार्यकर्ते असेच वागताना दिसतात.आपला नेता म्हणजे कोणीतरी एक जगावेगळा माणुस आहे ,किंवा खूप ग्रेट आहे असे त्यांना खरंच मनापासून  वाटते  असे नाही. पण होर्डींग लावले नाही, तर आपली लॉयल्टी कशी समजणार नेत्याला?? असेच काहीसे कारण असावे.

ही मुंडकी कोणाची असतात? हा एक संशोधनाचा विषय ठरेल. एका होर्डींग वर चौकातल्या पानवाला, मोची, सॅंडविचची गाडी वाला, जुस वाला , वडापावची गाडी वाला आणि हातगाडी वर केळं विकणारा माणुसयांचा फोटो पण लागलेले दिसले . ही सगळी मंडळी नेहेमीच्या पाहण्यातली असल्याने मला ते समजले.   गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, तसेच कुठलाही सण- मग तो दसरा असो की पोंगल  असो, कुठालाही  सण  म्हणजे   शुभेच्छांचे बोर्ड्स लावण्याची परवणीच. गल्लीतल्या एखाद्या नगरसेवकापासून ते दिल्लीतल्या पुढाऱ्यापर्यंत सगळ्य़ांचे वाढदिवस  होर्डींग लावून सार्वजनीक साजरे करण्याची परंपरा सुरु झालेली आहे.

या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालणे आवश्यक आहे असे वाटत नाही का तुम्हाला? चक्क फोटो शॉप करून वाघावर बसवलंय एखाद्या स्त्री सारखे.

नुकताच कुर्ल्याचे राष्ट्रवादीचे नेते मिलिंद कांबळे यांच्या होर्डिंग्जने तर उच्छाद मांडलाय. कुर्ला स्टेशन पासून सुरु होणारी होर्डिंग्ज धारावी सायन पर्यंत प्रत्येक ठिकाणी लावलेली आहेत. मला बरेचदा तर असेही वाटते की हे नेते स्वतःचे होर्डिंग बनवून लावत असतील का? आपण किती मोठे आहोत हे दाखवायला. ह्या कांबळे साहेबांना  यांच्या चमच्यांनी चक्क वाघावर बसवलंय -स्कुटरवर एका बाजूला पाय घेऊन साडी नेसलेल्या बायका बसतात तसे 🙂 अतिशय पॅथेटीक दिसतं होतं ते होर्डींग. कांबळे साहेब आहेत तर हॅंडसम, पण त्या होर्डींग वर खूपच केविलवाणे दिसत होते.

शरद पवार, राज, उद्धव, बाळासाहेबांच्या वाढदिवसाला तर अक्षरशः उत येतो अशा होर्डींगचा. मनसेचे एक नेते रमेश वांजाळे यांचा फोटो एका सोन्याचा दुकानदाराने मस्त वापरून घेतला होता. पुण्याहून नाशिक मार्गे जाताना एका सराफाने बऱ्याच ठिकाणी होर्डींग बनवून लावले होते.नेहेमी नेते लोकांना वापरतात, पण या वेळी मात्र नेत्याला एका बनियाने वापरलेले दिसले.  एखाद्या नेत्याचा असाही वापर बघून गम्मत वाटली होती” गोल्ड मॅन च्या हस्ते, मंगळसूत्र, ब्रेसलेट वगैरे चे प्रदर्शन”. आवरा..

या विषयावर कितीही लिहीले तरी पुरेसे वाटत नाही. अजूनही खूप काही लिहीलं जाऊ शकतं, पण जाता जाता एक मस्त  होर्डिंग्ज फोटो मेल मधे आला, तो इथे देतोय.. तरूणी ह्रदय सम्राट……..:)  या पुढे

हे सगळं पाहिल्यावर वाटतं की सांगावं, आता आवरा… बस झाले हे प्रकार.. एखाद्या नेत्याची चाटुगिरी करायची असेल तर अवश्य करा,  पण आपल्या घरात. रस्त्यावर आपल्या नेत्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी होर्डींग्ज लाऊन शहर विदृप करायची पण गरज नाही.  सामान्य माणसांना तुमच्या आणि तुमच्या नेत्यांच्या  होर्डिंग्ज मधे अजिबात इंटरेस्ट नाही. आणि नेत्यांनी पण आता या अती उत्साही कार्यकरत्यांना आवरायची वेळ आलेली आहे असे वाटते, नाही तर.. मला दिवसभर तेच गाणं गुणगुणंत बसावं लागेल.. मुंडक्यांची माळ फुले अजूनी अंबरात…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged . Bookmark the permalink.

65 Responses to मुंडक्यांच्या माळा…

 1. vikram says:

  yana Akkal yeyil ase vatat nahi 😦

  Sagle Ekacha Maleche Mani 😛

  • अक्कल यायलाच हवी. इथे उद्धव, शरदराव, राजच्या नावाने स्वतःचे उखळ पांढरे करून घ्यायचे ही पद्धत आता बंद व्हायलाच हवी. होर्डींग लावल्याने नेता मोठा होत नसतो, तर तो आपल्या कामामुळे.
   नुकताच राजच्या मनसेचे होर्डींग पाहिलेत, इकडे लक्ष द्या म्हणून रेल्वेच्या परिक्षांबद्दल. त्यामधे राजचा फोटॊ नव्हता, हे बघून आश्चर्य आणि आनंद झाला. होर्डींग लावायचे असेल तर ते समाजोपयोगी कामासाठी लावा.
   नाहीतर आपले कार्यसम्राट एक्स वाय झेड ह्यांच्या प्रयत्नामुळे फुटपाथवर पेव्हर ब्लॉक बसवले जाणार आहेत होSSSSSSSSSSSSSS…. असे होर्डींग नेहेमीच पहावे लागते.

 2. काका…हे सगळं दिवसेंदिवस ‘आवरा’ होत चाललेलं आहे! :-/

  • विद्याधर
   अगदी खरं आहे. थातुरमातुर फोटो शॉप शिकलेले लोकं आपल्याला असे काहीतरी उद्योग करतात आणि होर्डींग तयार करतात.

 3. आवरा या होर्डिंगना…..
  तो वाघावर बसलेला निव्वळ कहर…
  आणि “युके रीटर्न”????????
  या हातात फुकाचा पैसा आलेल्या आणि जमिनी विकून गबरू बनलेल्या गुंठामंत्र्यांनी माजवलेलं हे स्तोम आहे. इथेच फक्त रूबाब बघून घ्या. विकासाच्या नावाने बोंब आणि फ्लेक्स वर नावे व फोटो टाकायची अहमिहीका !!!!!!!!!

  • बरोबर आहे अगदी.. जवळपास प्रत्येकालाच ह्या होर्डींग्ज चा विट आलेला आहे- फक्त उत्साही कार्यकर्ते सोडून. मला तर त्या नेत्याचा सोडून एकाचाही चेहेरा आठवत नाही होर्डींगवरचा. शिवसेनेच्या होर्डींग मधे तर ठाकरे खानदानाचे सगळे घेतलेले असतात. उध्दव, आदित्य, आणि श्री बाळासाहेब… सगळे.. या होर्डींग लावण्याच्या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे.

 4. Sneha says:

  Kaka, ya sarvan kadun paise ghyayala havet sarkarne. Pan Kay karnar sagle ithun tithun ekach. Mala bua shevatacha farach aavadala lai bhari. Taruni hriday samrat aani uk return. Saglech photo comedy aahet.Topic aavadala. Thank you. Sneha

 5. काय बोलू..आवरा प्रकार आहे हा.
  मला एक काळत नाही ह्या साठी जो निधी खर्च होतो तो कोण देत… मागे पूर्ण लिंक रोड वर राजीव गांधी जयंती निमित्त पोस्टर्स लागली होती प्रत्येक एलेक्ट्रिक पोलवर…

  • अरे निधी असा कितीसा लागतो? ५०० रुपये फार तर. जरी दहा मुंडकी जमा झाली तरी ५० रुपये प्रत्येकी खर्च आहे, की जो अगदी पानाची गादीवाला पण देऊ शकतो.

 6. समीर says:

  पूर्वी एकदा आम्ही पंढरपूरला गेलो होतो. त्यावेळी हे होर्डिंगचे फॅड नुकतेच सुरु झाले होते. त्यावेळी असेच एक मुन्डक्यांचे होर्डिंग पाहून माझ्या आईला वाटले कि पोलिसांनीच चोरांचे फोटो लावले आहेत (wanted type ). अर्थात हा समज सत्यापासून फार लांब नाही आहे.

 7. खरंच त्या वाघ्याचा फोटू म्हणजे आवरागिरी आहे एकदम.

  बाबा, त्याला ‘पासष्टी’ लिहून पाठव बघू लवकर 😉

  • हेरंब +१
   मी गाडी थांबवून फोटो काढत होतो, तर ते लोकं माझ्या कार कडे आले, मी सरळ पळ काढला न थांबता.

 8. thanthanpal says:

  हे घडेल का महाराष्ट्रात? (नरेंद्र मोदींवरील लेख: माणिक मुंढे यांकडून साभार)
  झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते, थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापूर्वी भरून राहिलेलं एक निशब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायचं असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजूनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्रकन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डींग्ज नाहीत की सकाळी सकाळी त्यांच्या मुंडक्यांचे फोटो पाहावे लागतील. मोदींचेही कुठे होर्डींग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.
  http://thanthanpal.blogspot.com/2011/02/blog-post_04.html हे महाराष्ट्रात का होवू शकत नही.

  • हे चुकीचे आहे. गुजरात मधे पण हा रोग आहेच पसरलेला.. मी आणि फोटो पुढल्या वेळेस.. तिथे पण असे होर्डींग लावलेले दिसतातच.. अहमदाबादला जरी कमी असले, तरीही बडोदा, सुरतेला बरेच आहेत.

 9. Mandar says:

  बरेचदा तर रस्त्यावर कचराकुंडी मधे धूळ खात पडलेले नेत्यांचे फोटो दिसले की मला खूनशी आनंद होतो- त्यांना त्यांची योग्य जागा मिळाली म्हणून…………..
  100% -मला पण !!!!!!!!!!!!!!

 10. हे म्हणजे फारच भारी विडंबन झाले…आता तुम्ही एवढे लिहिले तर यांच्या ‘मुंडक्याच्या’ आत एक मेंदू नामक अवयव असतो तेथे प्रकाश पडो म्हणजे झाले…पहिला फोटो…तो म्हणजे रावणा चाच फोटो वाटतो….सोनियाबाई दुर्गाच्या स्वरुपात म्हणजे अगदीच ‘आवरा; ……
  आणि हा तरूणी ह्रदय सम्राट चा फोटो मी आधी पहिला होता…त्यावरून माझे मित्र माझी चेष्टा करतात ”’सिध्या, तुझा सुद्धा असा युरोप,युसए रिटर्न म्हणून चांदणी चौकात होर्डिंग लावणार म्हणून”
  …त्या धास्तीने मी ६ महिने टूर वर गेलो नव्हतो… 🙂 :)…आता परत आलो की माझा फोटो बघा चांदणी चौकात…. sorry मुंडके…
  लय भारी ….धरून हाणला आहे तुम्ही महेंद्र्दादा….!! आता फक्त ही मुंडकी तुमच्या दारात उभी ठाकायला नको.. 🙂

  • सिध्दार्थ
   मी कल्पना करतोय की तुमचा फोटो झाडावर.. अमेरिका रिटर्न, आयटी उद्योगातल्या खास कामगीरी प्रित्यर्थ…….. हसून हसून पुरेवाट झाली.

   त्या मुंडक्यांमध्ये मेंदू??
   बापरे.. कैच्याकै अपेक्षा कशी करता?

   • एकच दुरुस्ती…’तुमचा’ म्हणण्याऐवजी ‘तुझा’ म्हणावे ही विनंती…थोडक्यात अहो जाहो नको… 🙂
    मग फोटो उर्फ मुंडके बघायला कधी येताय चांदणी चौकात माझा??? मी १६ फेब्रुवारी ला येतोय पुण्यात १० दिवसाकरिता!! 🙂

    • सिध्दार्थ
     🙂 या पुढे लक्षात ठेवीन.
     पुण्याला बरेचदा चक्कर असते, पण सकाळी येऊन रात्री परत मुंबईला येतो. बहूतेक २१ -२२ ला पुण्याला असेन. बायकोला काम आहे, म्हणजे बहूतेक कॅन्सल होणार नाहीच. माझा नंबर फेस बुक वर आहेच. बोलू या मग.. 🙂

     • Spasht mat says:

      Me tar mhanen, xxxxx sarakya lokanche kay karave? uthun-suthun blog var ‘mi foreign la asato’ yavarach bar asato. khar tar yachi kahich garaj nasate.
      Ethech navhe, pratek thikani ashi barich manase tumhala disatil.

      hi pratikriya tya mentality la aahe. So, there is no any aim to offence to any one.

 11. bhaanasa says:

  शी शी… बघवत नाहीत रे ही स्वत:ची टिमकी निर्लज्जासारखी मिरवणारी होर्डिंग्ज. दुर्गेच्या रूपातली सोनिया गांधी म्हणजे अगदी कहर. जागोजागी वाढदिवसानिमित्त हे मोठे मोठे कट ऒट्स कसे काय लावू शकतात हेच समजत नाही.

  बरेचदा तर रस्त्यावर कचराकुंडी मधे धूळ खात पडलेले नेत्यांचे फोटो दिसले की मला खूनशी आनंद होतो- त्यांना त्यांची योग्य जागा मिळाली म्हणून…………..
  100% -मला पण !!!!!!!!!!!!!!

  मुंडक्यांची माळ फुले अजूनी नाक्यानाक्यावर…. 😦

  पोस्ट एकदम मस्तच. भापो + सहमत.

  • नुसती सोनियाच नाही, तर विजयाराजे पण अशाच निरनिराळ्या देवीच्या स्वरुपात आहे . फोटो पण आहे माझ्या कडे पण जागा कमी पडली फोटोला म्हणून टाकला नव्हता.

 12. महेश says:

  लेख सुंदरच ,सर्व प्रकारच्या नेत्यांनी या लेखाची नोद घेतलेली फार गरजेचे आहे, काहींनी त्याची नोद घेतली आहे व आचरणात पण आणले आहे, ,पण ही असे काही महाभाग आहे की आपणच विभागाचे राजे (मक्तेदारी) आहोत असे ते वावरत असतात.व शहरात मी किती लोकप्रिय आहे , नेत्याच्या किती जवळ आहे हे दाखवणे एवढाच त्या मागे उद्देश (त्याचा गैसमज) ,आपल्या मताशी सर्वच लोक सहमत आहे,मस्त.व आपण चांगल्या विषयावर प्रकाश टाकला, (मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत सर्व पक्षान हे पथ्थ पाळावे व शहराची शान वाढवावी) धन्यवाद, ,

  • महापालीकेच्या वेळेस तर ’कार्यसम्राट’ लोकांचा सुळसुळाट होईल. मुख्य नेत्यांनीच यावर काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी. प्रत्येक होर्डींग हे अप्रूव्ह करून घ्यावे आधी नेत्यांकडून असा नियम बनवल तरी पण बराच ताबा राहील यावर.

   नाहीतर.. श्री बाळासाहेब :- वाघावर बसलेले,
   राज ठाकरे :- इंजिनवर बसलेले
   उद्धव :- कल्पनाच करवत नाही कसा असेल
   शरदराव:- क्रिकेटची बॅट हातात घेऊन
   असे होर्डींग पहायला मिळतील.

 13. Nachiket says:

  tya Vanjale ya vyakti che soneri amdar vagaire title ne anek kilo sone ghatalele photo punyaat paahile. Asaach thakk jhaalo hoto.

  Kaay he pradarshan? Kaay impression hot asel samaany naagarikaache?

  Ki tyaannaahi asech avadate?

  Kaay maahit..

  • नचिकेत
   जे काही ऐकलंय त्यावरून , रमेश वांजळे अतिशय हुशार आहेत. तुकाराम महाराजांच्यावर गाथेवर याचा गाढा अभ्यास आहे. खूप छान वक्ता पण आहे. ह्या अशा माणसाला इतक्या सोन्याची गरज का वाटते?? हा प्रश्न आहे महत्वाचा!

 14. प्रसाद says:

  मस्तच……..

 15. तो वाघावरचा अशक्य भारी आहे…..

  काका…हे वाचताना एक विचार सहज मनात आला….फ़्लेक्स प्रिटींगच्या माध्यमातुन किती लोकांना रोजगार उपलब्ध झाला असेल??? नाही म्हणल तरी संपुर्ण देशात या उद्योगाची प्रचंड उलाढाल आहे.या गोष्टीचा अतिरेक निश्चीतच वाईट आहे पण अशे पण काही लोक असतील की ज्यांचा संसार या उद्योगामुळे उभा राहिला असेल….म्हणजे मी तरी याबाबतीत कन्फ़्युज आहे.

  तुम्हाला माझ्या मित्राबद्दल सांगतो…त्याने कलाशिक्षकाचा अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नोकरीसाठी वणवण भटकला पण प्रत्येक ठिकाणी नोकरीसाठी किमान चार ते पाच लाख मागितले गेले…अन ती पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर… यानंतर फ़्रस्ट्रेट होऊन त्याने नंबर प्लेट,बोर्ड,मंदीरातील चित्र रंगवणे अशे उद्योग सुरु केले पण त्यातुन त्याला म्हणावी अशी कमाइ होत नव्हती.

  मग थोड्या दिवसाने त्याने बॅंकेकडुन कर्ज घेउन फ़्लेक्स प्रिंटींगचा व्यवसाय सुरु केला…यानंतर मात्र त्याचे दिवस बदलले …आज आमच्या परीसरात एक नावाजलेला फ़्लेक्स प्रिंटर म्हणुन तो प्रसिद्ध आहे…एवढच नाही तर त्याच्याकडे आज चार पाच लोक कामाला पण आहेत…त्या लोकां्चाही उदरनिर्वाह हा यावरच चालतो आहे.

  मी राजकीय पक्षांनी चालवलेल्या फ़लकबाजीच समर्थन करत नाही पण कधी कधी विचार येतो जाउ दे या निमित्ताने का होईना त्यांचे पैसे बाहेर तरी येतात की ज्यावर काही लोकांचा संसार चालतो.

  • ते ही खरंच म्हणा..
   पण पैसे बाहेर येतात ते कोणाचे? सामान्य कार्यकर्त्यांचे. कशासाठी खर्च करतात? एखाद्या मंडळावर वर्णी लागावी म्हणून, आपण नेत्याच्या किती जवळ आहोत हे दाखवायला म्हणून…

 16. Prasad Tharwal says:

  laay bhari kaka… Mastach…!!!!!! Jabardasta vishay nehmi pramanech…………..!!
  Lawkarach palikechya nivadnuka yetayt… Aslya Flexchi ajun mejawani milnar evdha nakkie..! BTW yaatle kahi snaps TOI chya campaign madhe taaknyasarkhe aahet.. 😉

  • अरे हो. यातले काही स्नॅप्स तिकडे देऊ शकतो. आज करतो अपलोड. या पुढे माझी इच्छा आहे कीएक ब्लॉग खास होर्डींग साठी सुरु करावा. त्यामधे प्रत्येक मजेदार होर्डींग लावायचे.. 🙂

 17. Seema V Ghate says:

  khup chan post, agdi manatal lihile aahe tumhi. kharach ya hoarding bahadaarana aaala ghalayala hawa aahe, ya hoardings mule khup vele rastyavarche signal hi disat nahit.

  • सिग्नलच्या खांबावर लावलेले होर्डींग पण पाहिलेले आहेत मी. सिग्नल झाकुन टाकणारे तर नेहेमीच असतात..

 18. mejwani says:

  खरच ह्या अश्या मुंडक्याच्या माळा सुंदर शहरालाही कुरूप बनवीत आहेत .फोटोसहित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

  • प्रतिक्रियेसाठी आभार. अहो आपणच सगळ्यांनी या विरुद्ध आवाज उठवायला हवा. तरच हे लोकं थांबतील. मला वाटतं की ह्या नेत्यांना पण हे आवडत असावं. स्वतःचं पूजन करून घ्यायला.

 19. Mrunal says:

  Kharach ekdam sahi post.

  • मृणाल
   नेहेमीच नजरेला बोचत रहातात हे होर्डींग . स्मिताने विषय दिला होर्डींग वर लिहा म्हणून हे पोस्ट!

 20. Hemant Pandey says:

  सर, मस्त फोडणी टाकली आहे! थोडा वेळ घेतोय तुमचा, पण आवर्जून पुढे वाचा. मला बरं वाटेल.
  ब्रम्ह देवाने सृष्टी निर्माण करून सर्व प्रकारची झाडे व प्राणी त्यात ठेवले. आणि सर्वांना ठणकावून सांगितले कि कोणत्याही वेळेस, पृथ्वीवर सगळ्या प्रकारचे प्राणी त्याच प्रमाणात, ऑलवेज सेम रहातील, कमी नाही वा जास्त नाही, आणि देव त्याच्या घरी गेला. डार्विनच्या सिद्धांत नुंसार “सर्वायवल ऑफ द फिटेस्ट” माणसांची संख्या वाढली वा प्राण्यांची संख्या घटली. नारदांनी ब्रम्हदेवांना रिपोर्ट दिला कि ” आपल्या सृष्टीत मानवाने सोलिड राडा घातला आहे. कोल्हे, हरीण, हत्ती, गेंडे, गाढवे, डुक्करे, वाघ सिंह सर्वांची संख्या जगातून कमी झाली आहे. भारताची लोक संख्या दिवसोन-दिवस वाढतच आहे. हे कसे काय देवा? आपण म्हणाला होता कि संख्या ऑलवेज कॉन्स्तांत राहील, कृपया रायटिंग मध्ये खुलासा करावा” तेंव्हा ब्रम्हदेव हसून म्हणाला ” हे अडाणी gitarist नारदा! जरा नीट डोळे उघडून पहा. भारताची एकूण प्राणी संख्या तेवढीच आहे. गायब झालेले लांडगे, कोल्हे, डुक्करे,गेंडे, कुत्री, गोचीड, रक्तपिपासू प्राणी आता राजकारण्यांच्या रुपात गल्लीबोळातून होर्डिंग वर पाहायला मिळतील. पुण्यात जा म्हणजे तुझी खात्री होईल.”

  • “गायब झालेले लांडगे, कोल्हे, डुक्करे,गेंडे, कुत्री, गोचीड, रक्तपिपासू प्राणी आता राजकारण्यांच्या रुपात गल्लीबोळातून होर्डिंग वर पाहायला मिळतील.”
   +१ मस्त लिहिलंय.

 21. दिपक says:

  कैच्या कै करतात राव हे लोकं!

  … काही करुनच दाखवायचं असेल – पक्षाबद्दल – नेत्याबद्दल तर मी म्हणतो
  १. एखादा रस्ता बनवा – मग भलेही त्या रस्त्याला तुमच्या भिकार नेत्याचं नाव द्या
  २. शाळेत अशा भिकार नेत्याच्या नावानं वह्या – पुस्तकं वाटा.
  ३. पैसे गोळा करुन एखाद्या शेतकर्‍याचं कर्ज फेडा.

  ही असली वासना नाय होणार या ह.खोंची… हे साले, सगळं शहर – रस्ते या टुकार नेत्यांची पोस्टर लावुन खराब करतील..

  • दिपक
   +१
   पुर्णपणे सहमत आहे . कामं करायला नको, नुसता पैसा खायचा असतो. कसंही करून एकदा नगर सेवक झाले की बस! थोडा पैसा पार्टी फंडाला दिला की उरलेला खिशात घालतात स्वतःचा.

   कसंही करून नेत्यांच्या नजरेत यायचं, हा मुळ उद्देश असतो यांचा.

 22. खरच आहे हे. कुठेही जा असे होर्डिंग दिसतात. आपल्याकडे रस्त्याच्या बाजूला झाडे नसतील पण होर्डिंग नक्की दिसतात विजेच्या खांबाना लटकवलेली. Airport च्या बाहेर पडल कि ह्यांच दर्शन पहिले होत. वाढदिवसाच्यावेळी तर खरच उत येतो ह्यांना. त्यात ह्यांची तर चढाओढ लागलेली असते.

  • हर्षल
   आपल्या सगळ्यांच्याच नजरेला ते खुपतात. पण ज्यांचे फोटो आहेत त्यांना वाटतं की आपण फार प्रसिद्ध होतोय. पक्षाच्या नेत्यांनीच याला आळा घातला पाहिजे! एकदा पक्षनेत्यांनी नको म्हंटल्यावर कुठल्या कार्यकर्त्याची हिम्मत होणार आहे?
   एकदा मालाडला मी शरदरावांच्या फोटोला हार घातलेला पण पाहिला आहे.. आता बोला?

 23. सुधारणार नाहीत. आपली गू-घाण थोबाडं दाखवून दुनियेचा दिवस बरबाद करतील.

  आणि होर्डिंग छापून रोजगार निर्माण झाला हे ठीक आहे पण विकास कामाची होर्डिंग लावा ना? साला आपण पैसे काढून ह्यांची मुंडकी रस्त्यातल्या खड्ड्यात आणि तुंबलेल्या गटारात पडलेली दाखवणारी होर्डिंग लावली पाहिजेत.

  • सिद्धार्थ
   विकास कामाची जाहीरात कशाला हवी? ते तर त्यांचे कामच आहे , त्यांनी केले.. बस्स! पण कार्य सम्राट नगरसेवक आपल्यावर उपकार केल्याच्या भाषेत होर्डींग लावत सुटतात सगळीकडे. असो…

 24. mazejag says:

  Kaka…sarwat pahili hording Thanyatli aahe watat…Jitendra Avhad distahet….he ashe flex mhanje jaam traas ho….konihi lunge sunge kala pandhra vesh karun ubhe rahtat aani jhal…hyach wadhdiwas, tuchya aai vadilancha wadhdiwas, poranche wadgdiwas, ata bhagha 10vi chya parikhashana all d best karayla pan suruwat hoil….uchhaaad aahe agdi

  • ती पहिली होर्डींग सायन ट्रॉम्बे रोड वर लावलेली आहे. स्वस्तिक जवळ!
   खरंय.. यांना आवरायलाच हवं. नाहीतर आहेच आपल्या नशिबी यांचे चेहेरे दिवसभर पहाणं..

 25. Smita says:

  tasach alikade to politicians cha tilguL!!! swatchya Nee shubhechchukanchya photosakat- lahan size madhalee mundakyanchee maL letter box madhye, darala adakavalelee asatech!!!

  • नगरसेवकाच्या बायकोचे हळदी कुंकु.. आणि त्याचे बोर्डस पण सगळीकडे लागलेले असतातच. हा निरोप, सगळ्या राजकीय पक्षांकडे पोहोचला, की काहीतरी होईल.. नाही तर आहेच!

 26. Rajeev says:

  अरे बाबा…. चेन्नइ आणी तामीळ नाडूच्या गल्लीत ली पोस्टर बघीतली की फ़ेफ़रे येणे बाकी रहाते.
  ते थील भित्तीचीत्रे अजून हातानी काढतात !!!

 27. sumedha says:

  पोस्ट भारी आहेच , त्यावरच्या प्रतिक्रिया पण जबरदस्त आहेत . आमच्या कडे मालवण ला अजून याची फार लागण झालेली नाही , पण हे फार काळ टिकणार नाही , आता इथेही बरेच दादा , भाई , बाबा, आबा , जन्माला आले आहेत . तसे गणपतीच्या वेळी बऱ्याच मुंडक्यांच्या माळा पाहायला मिळतात इथे .

  • सुमेधा
   मालवणला पण लवकरच सुरु होईल. सगळ्यात स्वस्त प्रसिद्धीचे तंत्र आहे हे.आजच पेपरला वाचले की हायकोर्टाने मुंबई महापालीकेला विचारले आहे की तुम्ही अशा फ्लेक्स बोर्डला प्रसिद्धी करण्यासाठी अनुमती देता का?? यावर महापालीकेने हो असे उत्तर देऊन ऍफेडेव्हिट सादर केलेले आहे. कोर्टाने खूप ताशेरे ओढले आहेत यावर, शहर विद्रुपीकरणास कशी काय परवानगी दिली जाते म्हणून.

   • Smita says:

    GaNapatee, Navaratrateel so called “toraN Mahotsav” ya velachya hoardings che vaishishtya mhanaje- deva-devatachee chitre koparyat kuThetaree lahan size madhye aNee he “FUDAREE” aNee Shubhechchukanchee mundakee he bhalya moThthya size madhye!!!! santapjanak ahe sagaLa! kharach high courtat gela asel issue tar changala ahe, baghu kasa thamtoy acharaTpana.

 28. लै भारी आणि खरं लिहील आहे

  पुण्यात या प्रकारातला कहर बघितला. जमल्यास फ़ोटो काढून इथे चिटकवतो.
  एका उड्डाण्पूलाच्या भिंतीवर हे लावलेल बघितल. मजकूर होता;

  कोणाच्या तरी स्मृतीप्रित्यर्थ, शिवजयंती कार्यक्रम

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s