अशा लोकांच काय करावं?

लोकलने दादरहून परत येत असताना दाराच्या जवळ उभा होतो. शेजारी उभा असलेला माणूस   कुठलं तरी गाणं गुणगुणत होता – गुणगुणणं पण कसं, तर शब्द नाहीत फक्त हुम्म्म असं हमिंग करत होता. दोनच मिनिटात मला इरीटेट होणं सुरु झालं, पण तो मात्र आपल्याच नादात व्यस्त होता, त्याला ह्याची जाणीव पण नव्हती की त्याच्या अशा हमींग मुळे इतरांना त्रास पण होऊ शकतो.  बाजूला बसलेला एक गृप कुठले तरी   स्तोत्र ( बहूतेक )  मोठमोठ्याने आळवत होते. 

एखादा माणूस सेल फोन वर बराच वेळ बोलत राहिला की त्याचे एका बाजूचे बोलणे ऐकणे म्हणजे एक मनःस्ताप असतो. एकीकडचे पुर्ण बोलणे ऐकु येत असते, पण दुसरीकडून काय रिस्पॉन्स आहे ते  काही समजत नाही, उगीच किरकिरी होते . काल नेमक्या दोन्ही तिन्ही  गोष्टी एकावेळेस झाल्याने खूप चिडचिड होत होती.

पार्कींग करतांना आपण गाडी लावल्यामुळे इतरांचा रस्ता तर अड्वल्या जात नाही ना? ह्या गोष्टीचा पण विचार करतांना लोकं दिसत नाही. तुमची गाडी मागे अडकली की मग वेळेपरी वेळ जातो आणि मनःस्ताप वेगळाच. आपण समाजात रहातो, आणि त्यामुळे समाजाची आपल्यामूले कोणाला त्रास होऊ नये याची काळजी आपण घ्यायलाच हवी- पण नेमका हा विचार करतांना कोणी दिसत नाही.

एकदा लोकल मधे  कॉलेजच्या गृप मधला एक मुलगा कोणाशी तरी बोलत होता, आणि”  तर तू आवाजावरून गे वाटतोस.. कधी भेटणार ते सांग?” म्हणून गळ घालत होता. इतर सगळी मुलं ख्या ख्या करून हसत होती. नंतर समजलं की तो टेलीमार्केटींग वाला होता कोणीतरी! अशाच प्रकारे एखाद्या टेलीमार्केटींग वाल्या मुलीला पण  छळलं जाऊ शकतं. शेवटी त्ये टेलीमार्केटींग वाले  पण काय आपलं कामंच करत असतात! त्यांना तरी उगाच त्रास कशाला द्यायचा?

एका शासकीय ऑफिस मधे गेलो असताना एका अधिकाऱ्याला भेटायला गेलो. लंच टाइम नुकताच झालेला होता. त्याच्या केबीन मधे सिगारेटचा घमघमाट सुटला होता , तोंडात पानाचा तोबरा, आणि तो करंगळीच्या नखाने दात कोरत बसला होता. बराच वेळ बसलो, बोलणं वगैरे झालं आणि मी निघतांना  त्याने हात मिळवायला म्हणून हात समोर केला – मला तो हात हातात धरतांना अक्षरशः किळस आली.नंतर आधी वॉश रुम मधे जाऊन हात धुतले साबणाने.

लोकं असे मुद्दाम दुसऱ्याला इरीटेट होईल असेका वागतात ?  की मला तसा उगीच संशय येतो? काही लोकं असे वागताना   अगदी सहजपणे करतोय असे दाखवतात, मुद्दाम करतोय असा संशय येऊ नये याची काळजी घेतात  असे मला वाटते.  एखाद्याला किती प्रकारे इरीटेट केले जाऊ शकते  ?सहज मनात आलं की  अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्यामुळे मी   इरीटेट होत असतो? बऱ्याच आहेत, पण  त्यातलेच काही खाली देतोय !

१) सिनेमा पहातांना मोठा पॉपकॉर्नचा टब किंवा वेफर्सचे मोठे पाकीट घेऊन बसणारे लोकं. एक एक पॉप कॉर्न/वेफर्स तोंडात घातल्यावर तोंड उघडे ठेउन दाताखाली कचा कचा चावतात, त्यामूळे होणारा आवाज जरी लहान असला तरीही  सतत होणारा तोंडाचा आवाज शेजारी बसलेल्याला मला  इरीटेट करतो.

२)सिनेमामधले हिरोने म्हंटलेले   एखादे वाक्य   उगीच  तसे  रिपीट करणारे लोकं. मै तुझे जानसे मार डालुंगा. असे हिरोने म्हंटले की त्याच्यापाठोपाठ   जानसे मारडालूंगा असे  मोठ्याने म्हणतात बरेच लोकं! .

३) एखादे इंग्रजी वाक्य आले की त्याचा अर्थ हिंदी मधे किंवा मराठी मधे उगीच मोठ्याने म्हणणार रनिंग कॉमेंट्री  करणारे, प्रत्येक सिन शेजारच्याला समजावून सांगणारे.

४)शेजारच्या खुर्चिच्या आणि तुमच्या मधल्या हॅंडल वर आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करणारे. असे बसतात की शेजारच्या माणसाला मधल्या हॅंडलवर हात ठेवता येऊ नये. विमानात चुकुन मधली सिट मिळाल्यावर पण बरेच लोकं  असेच वागतात.

५) एखादा माणूस भेटायला आल्यावर समोरच्या टेबलवर पेन ने उगीच ठक ठक आवाज करणारे लोकं.

६)चिकन करी मधले बोन पीस तोंडाने चोखून पुन्हा डीश मधे ठेवणारे.मला  हमखास इरीटॆट करतात. चिकन खातांना चिकन जॉइंट्स दाताने  तोडून खातांना उगाच अचकट विचकट आवाज करणारे लोकं.

७) व्हेज खाणारे शेवग्याची शेंग पण अशीच चोखून पुन्हा सांबार मधे टाकली की मला कसंसंच होतं.

८) कुत्र्याचे नांवा ’कुत्रा’ ठेवणारे. आणि बगीचामधे त्याला फिरायला नेल्यावर ” अरे ए कुत्र्या” , म्हणून मोठ्याने बोलवणारे   !

९)एखादा मित्र  तुम्ही काही सांगायचा प्रयत्न केला की   की ” एक्जॅक्टली, द सेम.. अरे मला पण तेच म्हणायचय ” किंवा मी पण तेच म्हणतोय,  असे म्हणतो तव्हा!

१०) लायब्ररी मधुन सस्पेन्स असलेले पुस्तक आणल्यावर,  त्यातला शेवट काय आहे ते अगदी पहिल्या विस एक  पानांच्या नंतर लिहून ठेवणारे. जसे होली ग्रेल कोण आहे हे  दा विन्सी कोड  मधे दहाव्या पानावर लिहून ठेवणारे 😦

११) होस्टेल मधे रहात असतांना रुममधे कपड्याच्या कपाटात खाण्याच्या वस्तू लपवून ठेवणारा मित्र  . अशा वस्तू मधे चिझ वगरे काही असेल, आणि जर तो विसरला तर खूप घाण वास सुटतो काही दिवसानंतर.

१२) सगळ्यांसोबत टिव्ही पहात बसले असतांना शेवटली पाच सात मिनिटे असतांना कोणी चॅनल बदलला की.

१३)एखादा प्रश्न विचारला असता, तो समोरच्याने जसाच्या तसा रिपिट केला?  – फक्त वेगळ्या म्हणजे उत्तराच्या अपेक्षेच्या टोन मधे म्हणजे..

१४)एखादा  मित्र गप्पा मारताना, ” तुला माहीती आहे का?? ” म्हणतो. मी   काय म्हणून विचारतो की… जाऊ दे.. आता झाली ती गोष्ट.  त्याचं काय आता? असं म्हणून दुर्लक्ष करतो  . आणि नेहेमीच असे वागतो तो मित्र!

१५)लोकल मधे प्रवास करतांना शेजाऱ्याच्या पेपरमधे डोकावून उगीच पुटपुटत वाचन करणा्रे शेजारी .

१६)जोरात शिंक आल्यावर समोर हात धरणारे, पण थोडा दूर..  😦

१७)जेवायला बसल्यावर,   आधी मुद्दाम हात भरवून , मग नंतर बोटं चाटत जेवणारे.

१८)एखाद्याशी बोलतांना, ” आय अ‍ॅम सॉरी टू से बट… असे म्हणून वाटेल ते बोलणारे” हे वाक्य सारखे वापरणारे लोकं.

१९)एखाद्याच्या ऑफिस मधे   फोन केला, आणि ज्याच्याशी बोलायचे आहे तो नसेल, तर त्याच्यासाठी निरोप लिहून घे्णारा जेंव्हा  ’मिस्टर’ की ’मिस’ ते विचारतो तेंव्हा.(आवाजावरून समजतं मी मिस्टर की मिस आहे ते)

२०)दिवाळी संपल्यावर पण आकाशकंदील पुढचे सहा महीने  न काढणारे  आणि न चुकता अधुन मधुन लावणारे लोकं.

२१)खातांना तॊंडाचा मचक मचक आवाज करणारे . मला स्वतःला असं कोणी समोर बसुन जेवलं की जाम इरीटेट होतं.

२२) कढी वगैरे जेवणात असेल तर जोरात फुर्र्र्र्र्र्र्र्र करून हातानेच कढी खाणारे .( सन्मानीय वृद्ध लोकं सोडून)

२३) तुम्ही काही बोलत असताना ,    कानात बोटं घालून किंवा कानावर हात ठेऊन झालं! संपलं! मला ऐकायचं नाही -मी बोअर झालोय – हे कन्व्हे करणारे मित्र.

२४)इ मेल लिहितांना, अप्पर केस मधे किंवा फक्त लोअर केस मधे  लिहीणारे . मधे पंक्चुएशन मार्कस न देणारे .पॅरीग्राफ न करता एकच एक मोठं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स लिहीणारे लोकं.

२५)लोकल मधे एखादी सिनेमाची थिम – जेम्स बॉड किंवा एखाद्या टिव्ही सिरियलची थिम सॉंग पुन्हा पुन्हा गुणगुणत रहाणारे अनोळखी लोकं. एकदा म्हणून झाली  की ” अरे मी चुकलो वाटतं” म्हणून पुन्हा पुन्हा  रिपीट करणारे.

२६)एखाद्याशी बोलत असतांना समोरच्या टेबलवर तबल्याचा ताल धरणारे.

२७)  पेपर्स ला एकत्र करून   ते मध्यभागी स्टेपल करून पाठवणारे.

२८) पत्र पाठवतांना त्याला सेलो टेपने सिक्युअर करून वर स्टेपल्स मारणारे. स्टेपल्स या मधल्या पत्रावर पण मारणारे.

२९) बोलतांना अजीबात नजरेला नजर न मिळवता किंवा नजर चुकवत बोलणारे .

३०) समोरच्या व्यक्तीशी बोलतांना रोखून पहात बोलणारे. आय कॉंटॅक्ट   तुटु न देणारे .

३१) समोरच्या व्यक्तीशी बोलतांना तिच्या डोक्याच्या उजव्या बाजूला चार इंच दुर पहात बोलणारे.

३२)समोर कोणी येऊन बसला, की उगीच जोरात श्वास घेऊन , आज तू डिओ वापरलं नाहीस? असे विचारणारे.

३३) कोणी काहीही  सांगितले की खूप मजेदार जोक ऐकल्याप्रमाणे  ख्या ख्या करून हसणारे  लोकं.. अगदी हास्य क्लब प्रमाणे.

३४) तुमच्याशी बोलताना नाकातले केस उपटाणारे किंवा नाक कोरत बसणारे लोकं.

३५)एखादी नको असलेली गोष्ट कोणी सांगायला लागलं , की बहीरे झाल्यासारखे वागणारे लोकं . से इट अगेन.. असं म्हणून एकच गोष्ट अनेकदा रिपिट करायला लावणारे .

३६)इतक्या हळू आवाजात बोलतात, की कितीही लक्ष दिलं तरीही ऐकू येत नाही, आणि पुन्हा पुन्हा  काय म्हणणं आहे ते ,त्यांना विचारावं लागतं असे लोकं.

३७) एखादा शब्द ’तकीया कलाम’ म्हणून सारखा वापरणारे.

३८)कोक, पेप्सी प्यायल्या नंतर मोठ्याने ढेकर देणारे !

३९)समोरचा माणूस काही तरी सांगत असताना उगीच तोंडातल्या तोंडात पुट्पुटणारे .

४०)रस्त्याने जातांना कानामधे ब्लु टुथ डिव्हाइस अडकवलेले, रस्त्याने जातांना स्वतःशीच बोलत असल्याप्रमाणे वेडसर  दिसणारे लोकं.

४१) कधीतरी  खूप पूर्वी भेटलेले पण एखाद्या लग्नात पुन्हा भेटले की  ” मी कोण आहे ते ओळख बरं?” असं म्हणणारे लोकं.

४२) फोन करुन मी कोण ते ओळख म्हणणारे …

४३)काही लोकांना काहीही सांगितलं की प्रुव्ह इट म्हणायची वाईट खोड असते. असे लोकं..

४४)अपॉइंटमेंट देऊन त्यांना भेटायला गेल्यावर रिसेप्शन मधे बसायला लावणारे.

४५) एखाद्या पार्टी मधे आपली डीश न घेता, इतरांच्या डीशमधून एक एक घास घेऊन खाणारे लोकं.

४६) स्वतःच्या उष्ट्या चमच्याने तुमच्या डीशमधली स्विट डीशची चव घेणारे !

४७)विनाकारण  कपड्यांवर कॉमेंट करणारे. ( टीपीकल बायकी लोकं)

४८) हॉटेलच्या वॉश बेसीन मधे शिंकरणारे, केस विंचरणारे!

४९)जेवणाच्या टेबल वर जोरात खाकरणारे.

५०)  तुम्हाला समोर बसवून फोन वर दुसऱ्याशी बोलत रहाणारे  लोकं.

५१) कार चालवतांना मधेच दार उघडून खाली पान , गुटका थुंकणारे.

५२) एखादी नवीन गोष्ट सांगितली की माहीत नसेल तरीही ’आय नो’ म्हणणारे.

५३) सर्दी झालेली असतांना कफ खाकरून   न थुंकता ,   पुन्हा गिळणारे लोकं.

५४) खिशात नाही आणा, आणि मला बाजीराव म्हणा टाईपचे लोकं.

५५) जातीयवादी विषय काढून त्यावर उगीच भांडण करत सामाजिक  समरसतेची वाट लावणारे.

५६) कुठल्यातरी सिलेब्रिटी बद्दल उगीच काहीतरी गॉसिप करणारे.

५७) जागोजागी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे  बोर्ड लावणारे.

बस्स झालं, थांबतो आता. माफ करा थोडं मोठं झालंय पोस्ट!

बरेच लोकं कव्हर केलेत मला इरीटेट करणारे, आता या मधे जर कोणी सुटले असतील तर तुम्ही लिहा खाली कॉमेंट मधे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

103 Responses to अशा लोकांच काय करावं?

 1. हे हे हे …अजुन भरपूर गोष्टी आहेत.
  ५७. लोकलमध्ये स्पीकर फोनवर गाणी वाजवणारे.
  ५८. रुळ ओलांडून हात ठेवून प्लॅटफॉर्मवर चढणारे…
  ५९. ट्रेनमध्ये दगड हातात धरून वाजवून गाणी म्हणणारे…
  ६०. ट्रेनचा सेल्समॅन.. तेल, पर्फ्यूम, बुक्स, टाइमटेबल विकणारे…

  अजुन लिहायचे आहेत..खूप आहेत. लिहतो वेळ काढून… 🙂

  • सुहास
   अजुन बऱ्याच गोष्टी मनात होत्या पण किती लिहायचं? म्हणून इथेच थांबलो. डोक्याला चमेलीचे तेल लावून येणारे महाभाग हे लिहायचं राहूनच गेलं.

  • harshadsamant says:

   chaan!

 2. Sagar says:

  ६१) मी कम्प्युटर वर जर काही प्रोब सोल्व करत असेल तर उगाच हे करून बघ ते करून बघ अस मला फुकटचा सल्ला देणारे

  ६२) जास्त ओळख नसताना सुद्धा मी तुझा जिगरी दोस्त आहे म्हणून गळ्यात पडणारे

 3. मान्यवर, सर्वप्रथम अशी मोठी यादी प्रकाशित केल्याबद्दल गरीब कष्टकरी जनतेतर्फे धन्यवाद.
  दणदणीत माळच लावून दिली की तुम्ही. यातल्या बहुतांशी गोष्टींनी मी अशक्य इरीटेट होतो. पण काही वाक्ये वाचताना ती ती पात्रे आठवून ज्याम हसू येतं होतं. जसे –
  व्हेज खाणारे शेवग्याची शेंग पण अशीच चोखून पुन्हा सांबार मधे टाकली की मला कसंसंच होतं.
  एखादा प्रश्न विचारला असता, तो समोरच्याने जसाच्या तसा रिपिट केला? – फक्त वेगळ्या म्हणजे उत्तराच्या अपेक्षेच्या टोन मधे म्हणजे..

  इ मेल लिहितांना, अप्पर केस मधे किंवा फक्त लोअर केस मधे लिहीणारे . मधे पंक्चुएशन मार्कस न देणारे .पॅरीग्राफ न करता एकच एक मोठं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स लिहीणारे लोकं.

  फोन करुन मी कोण ते ओळख म्हणणारे …
  आम्ही यादी करायची म्हणजे परत एक नवीन ब्लॉगपोस्ट व्हायची. (विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडणारे विवेकानंद कुठे आणि या विश्वातल्या प्रत्येक दुसर्‍या वा तिसर्‍या माणसाच्या वाईट खोडींनी इरीटेट होणारे मान्यवर विक्रांत देशमुख कुठे…च्यक च्यक च्यक) तरीदेखील आपल्या यज्ञात आमची पण थोडीशी समिधा घालावी म्हणतो. मला भयंकर वैताग ज्यांच्यामुळे येतो असे नमुने व त्यांच्या तितक्याच फालतू गोष्टी पुढीलप्रमाणे वानगीदाखल :
  ६३) बोलताना दर दोन वाक्यानंतर अंगाला हात लावणारे
  ६४)एखादी कसलीही आणि कुठलीही स्वयंघोषित कोटी केल्यावर शिसारी येईल एवढे तोंडाकडे पाहणारे
  ६५) हात किंवा इंडीकेटर न दाखवता वळणारे
  ६६) बॅंकेत किंवा तत्सम सरकारी हापिसातील कर्मचारी
  ६७) पुण्यातील रिक्षावाले
  (टीप – क्र. ४ व ५ साठी कसल्याही अधी स्पष्टीकरणाची गरज मान्यवरांना वाटत नाही. )
  ६८) पेपर वाचताना सगळी पाने सुटी करून वाचणारे (आणि नंतर पाने तशीच टाकून देणारे)
  ६९) गाण्याचे शब्द माहीत नसताना गाणारे + शब्द धादांत चुकीचे अथवा सर्रास बदलून गाणारे + मूळ गाण्यापेक्षा कैक योजने दूर अश्या चालीमध्ये गाणारे (हे सगळं यांनी एकांतात केलेलं क्षम्य आहे. पण असे सर्व अपराध सार्वजनिक जागी, दुसर्‍याच्या कानांना पीडा देत करणारे)
  ७०) खरेदी करायला दुकानात गेल्यावर प्रत्येक गोष्टीमध्ये “जरा अजून व्हरायटी दाखवा” म्हणणारे
  ७१) वेळ न पाळणारे
  ७२) काही ठराविक लोकांनी फेसबुकवर काहीही टाकले की त्यावर कॉमेंट करणारे अथवा लाईक करणारे – (“त्या” व्यक्तीने “गोचिड” किंवा “पतंगांचा मांजा” किंवा “गाडीचा धूर” यासारख्या तद्दत अतिसामान्य कॅटेगरीचे फोटो टाकले तरी “ह्या” व्यक्ती त्यावर “Awesome”, “so cute….”, “ncie work, Keep it up”, “what a creativity” वगैरे डोक्यात जाणार्‍या कॉमेंट देतात.
  असो. माझी प्रतिक्रीया खुप लांबली. कदाचित त्यामुळे मी कोणाच्या तरी यादीमध्ये “दुसर्‍याच्या ब्लॉगपोस्टवर स्वतःचा लेख असल्यासारखे लिहीणारे” अश्या सदराखाली येवू शकेन 😛

  • Rajeev says:

   तूम्चा ६३ नंबर म्ह्ण्जे फ़ार फ़ार ………………भयानक !!!!!!!!!!!!!!!!!

  • प्रतिक्रिया काही फार लांब वगैरे झालेली नाही. बरेच सुटलेले मुद्दे यात कव्हर झालेले आहेत. ७२ नंबर एकदम भारी आहे. 🙂 यावर तर एक पुर्ण पोस्ट लिहीलं जाऊ शकतं. 🙂

  • aruna says:

   आता कोमेन्ट लिहावी कि नाहि असा प्रश्न पडला होता, पण म्हटल जाउद्या, नाहितरि इतके वैतगले आहेतच तर थोडे आणखी!
   पण खरच काही लोक मुद्दम तसे वागत्त्त, आणि आपण त्य घावचेच नाही असे दाखवतात
   तेव्हा फ़ार त्रास होतो.

  • aruna says:

   गावचे—-घावचे नाही. क्षमस्व.

  • Rajan Mahajan says:

   72) number ekdam jordar.
   atishay kandam status (Morning every1, What’s Next, Pissed Off, Strange feelings in mind) var lok pratikriya detat. Ugachah !!

   1. Mala FB var olakh na palakh asalelya lokankadun Friend Request aali ki tras hoto.
   2. Mothyane bolanare lok jaam dokyat jatat.
   3. News Anchors (Nikhil Wagale sarakhe.) je satat oradat asatat ani dusaryana kahi boluch det nahit tyancha tras hoto.
   4. Lift kiva Bus sathi ranget ubhe na rahata….apanach pratham aaloy asha thatat aat janare lok, jaam irritate karatat.

   • राजन
    लिफट मधून बाहेर निघाल्यावर मागच्या माणसाला लागेल याची काळजी न करता दार सोडून देणारे लोकं. हे विसरलो होतो मी. कालच हा प्रसंग झाला आमच्या बिल्डींगच्या लिफ्ट मधे, एका लहान मुलाला खूप लागलं.:(
    प्रतिक्रियेसाठी आभार.

 4. सगळे अगदी अगदी समोर दिसले. किळसवाणी लोकं.
  माझ्या डोक्यात जाणारे म्हणजे एखादी गोष्ट निगेटीव्ह घडली की हमखास “मी तुला म्हटले नव्हते” किंवा “तरी मी सांगितले होते, पण माझं ऐकला/ली नाही”
  ऑफीसच्या मेल आयडिमध्ये रंगीबेरंगी भडक अशी ईमेल सिग्नेचर वापरणारे.
  कॉलेजला असताना मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगला आहे म्हणून मला टीव्ही, रेडिओ आणि तत्सम उपकरणे दुरुस्त करता येतात आणि माझ्याकडून ती फुकटात दुरुस्त करून मिळतील अशी अपेक्षा ठेवणारे. तसेच हल्ली कंप्यूटर बिघडला तर माझे नाव पुढे येते. बरं मी असली दुरुस्ती करीत नाही म्हटलं तर हा इंजिनियर असून फुकट आहे असा इरसाल कोकणी भाव चेहर्‍यावर असतो.

  • इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअर आहे म्हणून रेडीओ, टीव्ही दुरुस्त करून मागणारे.. हा हा हा…. 🙂

 5. Pingback: Tweets that mention अशा लोकांच काय करावं? | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 6. Sneha says:

  Kaka, aksharshah sarva manase dolyapudhe aali eka kshanat , khup kilas aali vachatana. Aani ha kay ghanerada prakar hat milavanyasathi. Anyways tumache vishay ekadam bhannat asatat. Thank you. Sneha

 7. prasad says:

  ७३). अनोळखी असूनही फोन करून स्वतःच कोण बोलतेय ? असे विचारणारे लोक
  ७४). जेवायच्या पानामध्येच हात धुणारे लोक.
  ७५). अन्न तसेच्या तसे कचरा पेटी मध्ये टाकणारे लोक. (किमान प्लास्टिक पिशवी मध्ये घालून तरी टाकावे)
  ७६).फेसबुक मध्ये अनोळखी असूनही request पाठवणारे लोक ( without message/ reference)
  ७७). सकाळी दात घासताना किळसवाणे आवाज आणि ओकारया काढणारे लोक.

  • प्रसाद
   मोबाईल वर फोन करून कोण बोलतंय विचारणारे..
   आणि शेवटचा सकाळी उठुन आवाज करणारे हे मला पण इरीटॆट करतात.
   आभार.

 8. Mandar says:

  ७८) मला फार जास्त समजत अशा अविर्भावात वागणारे लोक;
  ७९) खातरनाक रंगाचे नेल पोलिश लावणाऱ्या मुली;भयानक रंग एकन्दरीतच डोके हलवतात.
  ८०) अजून काय करू कसे करू असे विचारणारे (परिक्षेच्या आधी)किती अभ्यास झाला? मग या वेळी काय top करणार वागीरे बोलणारे
  ८१)अंग्लाळलेल्या गोशी काही कारण नसताना करणारे आणि त्या वर कौतुकाने सांगणारे .
  ८२) बोलण्यात विसंगती असताना आपलाच मुद्दा कसा बरोबर हे तेच तेच बोलून सांगणारे आणि विषय बदलून तुला काही समजत नाही म्हणनारे;

  हे लोक सगळीकडेच असतात .आणि यांच्याकडे बघितल किवा चुकून नजर गेली तरी संपल!!!! नजर परत परत तिथेच जाते आणि हे लोक परत परत डोक्यात!!

 9. santosh Deshmukh says:

  काका नमस्कार ,
  खूप काही लिहिलंय पण जर खरच आपण या पैकी काही करत नसाल तर अवघड आहे कारण हे तर सर्वसामान्याचे वागणे आहे हे कोणी काही ठरवून करत नाही पण इतके ओब्झार्वेशन जर आपण करू लागलो तर आपल्याला आपणात ही खूप दोष दिसू लागतील, जाऊदे काका रुजुताताईचे पुस्तक विकत घेतले बराचस डोक्यावरून जातंय कारण घालवतोय काका मलाही शेजारी उभे राहून दात घासणारे लोक आवडत नाहीत

  • संतोष
   सर्व सामान्य लोकं जर समाजात वागतांना आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याकडे लक्ष देतील तर समाजात रहाणं खूप सहज सुंदर होईल.
   ऋजुता दिवेकरांचे पुस्तक तसे सोपे आहे समजायला. वाचून पहा समजेल. 🙂

 10. संतोष च्या लेखनाला सहमती….
  मला वाटते कि लोकांच्या त्या सवयी असतात. ते मुद्दाम करत नसतील. त्यांना उमजले तर ते करणारच नाहीत पण ते चुकीचे वागतात हे त्यांना कुणीही सांगत नाही. आणि एकही वाईट सवय नसेल असा व्यक्ती लाखात एखादाच असेल. (तीही शक्यता कमीच).

  • राजेंद्र
   बरेचदा सांगूनही न ऐकणारे लोकं पाहिले की जाम वैताग येतो. प्रत्तेकालाच काहीतरी सवय असतेच, पण जर लक्षात आलं, की ही सवय वाईट आहे,तर ती सोडायला काय हरकत आहे? त्या सवयीला चिकटून रहाण्यात काय फायदा??
   तुमचे हे म्हणणे, की त्यांना माहीत नसेल ते चुकीचे वागतात म्हणून.. हा मुद्दा पण योग्य आहे . कदाचित तसेही असेल, आणि दुखवायचं कशाला कोणाला?? म्हणून इतरही लोकं काही बोलत नाहीत.

 11. Rajeev says:

  अरे, आमच्या घराच्या १५ फ़ूट अंतरा वर औरंगाबाद मधील एक नामवंत सल्लागार (नीवासी वसाहतीत)एक व्यावसाईक ईमारत बांधत आहे. त्यात तो ग्रानाईट कापण्याचे काम (४ महीन्यांपासून @ 110 DB !!!)चालू आहे.त्याला सांगीतले तर तो म्ह्णणतो की एव्हढातेव्हढा त्रास सहन करावाच लागतो !! आणी गंम्मत की त्याला २/३ SMS केले तर त्याचे वाक्य …”मला SMS करून तूम्ही फ़ार मनस्ताप देता आहात, तूमचा स्वभाव फ़ारच तक्रार खोर वाट्त आहे”

  • तक्रारखोर? अरे मग त्याला दाखवून दे तक्रारखोरी म्हणजे काय ते! महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या नियमाप्रमाणे जास्तित जास्त आवाज ७५ डेसीबल्स अलाऊड आहे. पोलीस कम्प्लेंट कर. डिबी मिटर हवे असेल तर मला सांग, व्यवस्था करतो औरंगाबादमधे .. 🙂

 12. vikram says:

  I agree to all but two –

  २०)दिवाळी संपल्यावर पण आकाशकंदील पुढचे सहा महीने न काढणारे आणि न चुकता अधुन मधुन लावणारे लोकं. — well that is their personal choice – but still you hv right to get irritated ! 🙂

  ४०)रस्त्याने जातांना कानामधे ब्लु टुथ डिव्हाइस अडकवलेले, रस्त्याने जातांना स्वतःशीच बोलत असल्याप्रमाणे वेडसर दिसणारे लोकं. – I am one of them but If I do that while in the car not on the road and it is part of my time mgmt …i drive atleast 3 hrs everyday to work!!

  I hope I have not irritated you with this comment.

  Baki ekdum mast !!

  • विक्रम
   ब्लॉग वर स्वागत. कार मधे ब्लु टुथ वापरणे एक वेळ समजू शकते, पण रस्त्याने जातांना स्वतःशीच बोलत जाणाऱया प्रमाणे बोलत जाणारे, आणि अजाणतेपणी हातवारे करणारे लोकं पाहिले की वाटतं, जर याच्या हातात फोन असता कानाला लावलेला तर इतकं विचित्र वाटलं नसतं त्याचं हातवारे करत बोलणं.

   प्रतिक्रियेसाठी आभार.. 🙂

 13. kedar says:

  वा महेंद्रजी. झक्कास लिहिलय. अस्सल महेंद्रजी स्पेशल. मजा आली वाचून. माझ्या काही त्रासदायक भिडुंची छोटीशी यादी इथे लिहीत आहे.

  ८३). स्वतःच्या फुटकळ वक्यावर किंवा विनोदावर आपल्याकडून ताळीची अपेक्षा करणारे लोक
  ८४). पुणेरी पाट्या लिहिणारे स्वताहाला अती हुशार समजतात. ते सारे लोक.
  ८५). कुठल्याही टुकार पाटीचा फोटो काढून तो पुणेरी पाटीचा आहे असे समजून ईमेल मधे पाठवणारे लोक.
  ८६). “अगदी परवाची गोष्ट” असं म्हणून सगळ्या गोष्टी खपवनारे लोक. पु. ल. सुद्धा या लोकांना त्रसले होते.
  ८७). सकाळी उठल्यावर ब्रश न करता गुटखा खाऊन वास घालवणारे लोक. हो असे लोक माझ्या माहितीत आहेत.
  ८८). तंबाखु खाऊन त्याचा खकाणा समोरच्याचा नाकात घालवण्यासाठी प्रयत्नशील असणारे लोक.
  ८९). सार्वजनिक स्थळी नाकात तपकीर् घालणारे लोक.
  ९०). आपल्या बंगल्यांची नावे कोणालाही सहजा सहजी कळणार नाहीत अशी ठेवणारे लोक. या लोकांना बहुदा स्वत:च्या भाषेचे लोकांनी कौतुक करावे अशी इच्छा असते.

 14. ९१)स्वत: मतदान केलेलं नसताना “आपल्या” सरकार वर टिका करणारे लोक सुद्धा डोक्यात जातात.

  तुमची उरलेली यादी तर जवळ-जवळ सर्व डोक्यात जाणारे कवर करते. तरी पण लोकल मधील सेल्समनचा मला तिटकारा येत नाही. ते बिचारे आपला माल विकायचा प्रयत्न करीत असतात. आणि अनेक वेळा त्यांचा माल मोजलेल्या किंमतीच्या मानाने दर्जेदार असतो.

 15. मनोहर says:

  मनस्ताप आपण स्बतःला करून घेत असतो. दुसरा मला मनस्ताप देऊ शकतो हे आपले ग़ृहीत चुकीचे आहे.

 16. mau says:

  हे हे हे..वेरी मायन्युट ओब्झरवेशन…खरच काही लोक डोक्यात जातात…
  काही वर्षांपुर्वी मी औरंगाबादला होते..आमचे शेजारी सकाळी बरोबर ४-४.३० ला उठुन गळा सांफ करायचे…त्यांचे गळा सांफ करणे म्हणजे इतकी भयानक गोष्ट असायची की काही विचारु नका..निरनिराळे आवाज निघायचे..पुर्ण पोट बाहेर येउन पडतय की काय अशी किती वेळा शंका यायची..आपण आपल्या गुलाबी पहाटेच्या सुंदर स्वप्नांमध्ये धुंद..आणि हा प्राणी रोज झोपमोड करायचा ..शेवटी घर बदलावे लागले..एनीवेझ..खुप्प मस्त झाली आहे पोस्ट..
  तुम्ही दिलेल्या अर्ध्याहुन अधिक गोष्टींसाठी सहमत !!!

  • गेले दोन तिन दिवस हे असे नमुने सारखे काही ना काही निमित्याने भेटत होते, म्हणून हे पोस्ट झाले.

   – खरं म्हणजे मला तर व्हॅलंटाइन डे वर लिहायचं होतं ! 🙂

 17. OBEE says:

  Boss ,

  just forget bad things in this world & try to ignore irritating events , yes it is difficult to forget & ignore, but U can not change the world so change your self & enjoy the good world.

  OBEE

  • ब्लॉग वर स्वागत!
   U can not change the world so change your self & enjoy the good world. हे बाकी नाही पटलं.
   अहो जगातले सगळॆच लोकं असे नसतात. एकाने चूक केली म्हणून सगळ्यांनीच ती कशाला करायची? तुमचे हे वाक्य वाचून एक म्हण आठवली ” If rape is unavoidable ,lie down and enjoy it!”

 18. आम्ही आपल्या यादीच्या ८ नं मधे मोडतो. शक्यतो आम्ही ए भुभ्या! ए भुभारड्या असे म्हणतो.
  आमच्या बिनतारी विभागच्या होस्टेल मधे बिअर पिताना मधल्या काळात लघुशंका निरसना साठी गेलो कि एक मित्र माझ्या माझ्या ग्लासातली बिअर पिउन टाकायचा. मी एकदा आयडिया केली सगळ्यांसमोर बिअरचा घोट घेउन तो परत ग्लासात टाकला व मग लघुशंकानिरसनाला गेलो. आल्यावर पाह्तो तर आख्खा ग्लास रिकामा! पुर्वी निदान थोडी तरी शिल्लक ठेवायचा. आता त्याने मला शिक्षा केली होती. हॆहॆहॆ तुला काय वाटल तुझा ग्लास सेफ झाला काय? रामाने शबरीची उष्टी बोर खाल्ली होती तशी त्याने माझी उष्टी बिअर प्याली होती. त्यातही मित्रप्रेमच होत.
  समाजात एखाद्याला इरिटेट करणारी गोष्ट दुसर्‍याला उद्दिपित करणारी असते. समाजात रोटी बेटी व्यवहार न होण्याचे कारण केवळ उच्चनिचता हे नव्हत . एकासाठी स्वास्थ्य असणारी जीवन शैली दुसर्‍यासाठी अस्वास्थ्य निर्माण करणारी असते. बोंबलाच्या वासाने आमच्याकडे एकाला भुक लागुन लाळ गळायची तर माझी असलेली भुक मरायची.
  असो अजुन खुप काही पण आता इरिटेट करत नाही. 😀

  • प्रकाशजी
   बिअरची गोष्ट वाचून विश्वासच बसत नव्हता.
   समाजात एखाद्याला इरिटेट करणारी गोष्ट दुसर्‍याला उद्दिपित करणारी असते.
   हे पटलं ती गोष्ट वाचून..

 19. विनायक सामंत says:

  काका पोस्ट छान आहे. मला एक नेहमी प्रश्न पडतो. मी DND registered ग्राहक आहे. मला होलीडे शेअरिंग , save the children साथी charity असे अनेक फोन येतात. आपण कामत असतो. आणि आपल्याला फोन येतो. मी फोन करणार्या मुलीवर रागवत असे, मज़ा एक मित्र म्हणाला ती पण पोटा साथी काम करते तू तिच्या वर का रागावतोस? मला प्रश्न पडतो की मी काय करावे. माज्या समोर कही पर्याय आहेत एक donation मागायला येनार्याला बोलवावे आणि नातर “I have changed my Plan ” असे सांगावे. मला प्रश्न पडतो हे बंद होंय साठी की मी काय करावे ते काळात नाही,
  एक दोनदा वोडाफोन कड़े तकरार केलि पण अजुन सुद्धा माला फोन येतात.

  • विनायक
   ब्लॉग वर स्वागत..
   आता मार्च एक पासून नवीन स्किम सुरु होत आहे डीएनडी त्यामुळे हे प्रकार बंद होतील असे वाटते. पुर्वी मी पण असाच चिडायचो, आजकाल सभ्यपणे इंटरेस्ट नाही असे सांगून फोन बंद करतो. काही फोन तर दररोज येतात- एकाच बॅंकेकडून- लोन हवे आहे का? म्हणून विचारणारे, महिंद्रा हॉलीडेज वगैरे… व्होडाफोन या मधे काही करू शकणार नाही हे पण नक्की.
   दररोज एकाच संस्थेकडून जरी फोन येत असले, तरी फोन करणारे वेगवेगळे असतात. नविन डिएनडी नियमा मुळे हे प्रकार बंद होतील असे वाटते.

 20. samir gokhale says:

  chaan

  • धन्यवाद समीर..
   आणि ब्लॉग वर स्वागत..

   • Seema V Ghate says:

    Sir,
    Sunder post. Lok jari dusryala tras denyasathi tase wagat nastat tari bajula wawarnaryana tyacha tras hotoch, bhawana vyakta kelya ki thoda manawarch tan kami hoto. Tumchya list madye thodishi bhar!
    1. Rasta advun mirvanuka kadhnare lok sarvat jyast iritet karta.
    2. Rastyat gadi ubhi karun gappa marat ubhe rahun rahdarila adthala karnare
    2.Gadi chalavnari vyakti stri aahe mhanun side na denare
    wahan chalak
    3. Phone var tasech rastyat anawashyak motya aawjat bolnare lok

 21. प्रवीण says:

  आणखी काही
  फेसबुक वर सलमान कतरिना इ. इ .चे pofile pic लावणारे ,
  मराठी english मध्ये लिहणारे (वाचताना किती त्रास होतो )
  ………………….
  बाकी पोस्ट अगदी मस्त झाली आहे

 22. Smita says:

  bang on target! Phew!!! Mala waTayacha kee meech hypersensitive ahe kee kay??? aaj kaal tar offices sudhdha cubicle culture muLe -shared space aslyane ya bateet khoop jagruk asayla hava , puN ultach disun yeta. mazya ajubajuche lok itake moThyane bolayache , kee mee shevatee individually pratyekala mail karun haLu avajat bolayachee vinantee kelee, kahee badhale, puN kahee majkhoer ajun chaluch thevataat. mug shatapaNe tyanchya desk pashee jaun tyanna khuNa karun volum kamee karayala lavate. This would of course put me on their list of irritators!:-)

  yatalya kiteetaree savayeenbaddla mhaNata yeil kee ya goshtee kharatar kahee moThya shikavayachee avashyakata nahee , do they grow up like this? 2 ft peksha kamee antar asala taree gharee itkya moThyane ThaNaNa karat boltaat ka he lok ?? aNee te khaNyachya savayeebaddal tar na bolalelach bara

  nice post! Valentine day chya nimittanehee jar lokanna swata:la jasta approachable, amicable , likeable banavayacha asel tar yateel don’ts upyogee ahetach:-) so quite timely in fact!

  • आमच्याकडे पण तसाच मोठ्या आवाजात बोलणारा एक महाभाग आहे. गम्मत म्हणजे तो इतर सगळे मोठ्या आवाजात बोलतात म्हणून कम्प्लेंट करतो.स्पेशली जेंव्हा तो एखाद्या सबॉर्डीनेटशी बोलतो तेंव्हा त्याचा आवाज खूप वाढतो..
   मला वाटतं की असे लोकं प्रत्येकच ऑफिस मधे असतात.
   स्वतःच्या घरी असे ठणाणा करत बोलणे शक्यच नसेल बहुतेक. बायकोपुढे आवाजच फुटत नसेल म्हणून ऑफिसमधे हवे ते बोलून घेत असावेत बहुतेक.

   • Smita says:

    ” gharee avaj phutat nasel mhaNun??” he navata dokyat ala…
    :-))

    apuN kaheetaree kayam mahatvacha “discuss” kartoy he dakhavanyasathee swatachya kamabaddal mothyamothyane char choughat bolaNaree hee tumchya list madhye fit hotat. kharatar normally tumchya closely related co-workers shivay kuNalahee tya kamacha kahee sandarbha nasato, mug evadhya mothyane bomba-bomb kashala karayachee koN jaNe…

    • आपण जे काम करतो, ते केवळ आपल्या बरोबरच्या लोकांना किंवा आपल्याच फिल्डमधल्या लोकांना समजतं- इतरांना नाही! मोठमोठ्याने बोंबाबो्ब करण्याने लोकांना आपण किती महत्वाचे काम करतोय हे समजेल असे त्यांना वाटत असावे. इतरांच्या दृष्टीने हे सगळं ग्रिक ऍंड लॅटीन असतं – नुसतं बोअरींग!!

     इरीटेटींग बिहेविअर चे जवळपास १०० पॉइंट्स झाले पुर्ण.. 🙂

 23. greenmang0 says:

  * समोरचा माणूस बोलत असताना अचानक दुसराच विषय सुरु करणारे
  * समोरच्या माणसाचं बोलणं पुर्ण ऐकून न घेता आपलंच घोडं पुढे दामटवणारे
  * माकड म्हणतो आपलीच ___ लाल या म्हणीची सार्थता पटवून देणारे
  * आपल्याला न आवडणारा पदार्थ दुसरा खात असताना “शी… तू हे खातो?” असं म्हणणारे
  * चहा भुरकून पिणारे
  * सतत नखं खाणारे

 24. rohit says:

  kaka
  kharach kilas aali vachun…
  aankhi thodi bhar ghalto………
  rastyane jatana aaplyach pudhe tunknare
  swatahach ghar saaf karun kachra rastyavar taknare
  panachya gadivar /bhel,panipurichya gadivar, kachra dabyat na takta kahi inch kinva kahi foot lamb taknare
  yadi karach khup lambat jayeel

  • रोहीत
   आभार. यादी खूप मोठी आहे, आणि मला वाटतं की मारूतीच्या शेपटीसारखी न संपणारी आहे. आपल्या कडून आपण या गोष्टी टाळल्या तरीही पुरेसं आहे. 🙂

 25. mejwani says:

  बाप रे !!!!!! केवढी मोठी यादी तयार झाली आहे अश्या लोकांची !म्हणून मी यांत अजून भर घालत नाही .अश्या लोकांचा त्रास तर होतोच पण रोजच ह्या गोष्टी घडत असल्या तरी त्यांची सवय होत नाही आणि त्या इरीटेटच करत राहतात पण काही गोष्टीना नाईलाज असतो काय करणार ?

  • बरोबर आहे. आपण काही करू शकत नाही, पण स्वतः जरी या गोष्टी टाळल्या तरीही बरीच सुधारणा होऊ शकते.

 26. ही पोस्ट आणि कमेंट्स याची प्रिंटआउट घेऊन माझ्या डेस्कवर लावणार आहे मी. 🙂

 27. एकाच ऑफिसात बाजू बाजूच्या क्युबिकल मध्ये बसून एकमेकांशी इमेल इमेल खेळणारे लोक
  कितीही क्षुल्लक कारणांसाठी कमीत कमी ३० मिनिटांची मीटिंग बोलावणारे बॉस लोक
  इकडे बार्ट ट्रेन मध्ये अपंग आणि वयस्करांसाठी राखीव सीट्स वर बसणारे आणि कोणी वयस्कर आले तरीही न उठणारे महाभाग.
  वेंडिंग मशीन मध्ये १$ च्या जागी ५ रुपयाचे नाणे टाकून कोल्ड ड्रिंक घ्यायचा प्रयत्न करणारे माझ्या जुन्या ऑफिसातले लोक
  international client समोरही तेलुगूत बडबडणारे आणि आठवण करून देऊन इंग्रजीत सुरु झालेले पण परत पाचव्या मिनिटाला तेलुगूत उतरणारे माझे काही कलीग्स
  एखादा फोरेनर पाहून हसला तर परत हसणारे पण एखादा देसी पाहून हसला तर मान दुसरीकडे फिरवणारे अमेरिकेतले देसी लोक

 28. SANDEEP says:

  kharach lai bhari post ahe.

 29. मोनिका says:

  ३३) कोणी काहीही सांगितले की खूप मजेदार जोक ऐकल्याप्रमाणे ख्या ख्या करून हसणारे लोकं.. अगदी हास्य क्लब प्रमाणे.
  ४३)काही लोकांना काहीही सांगितलं की प्रुव्ह इट म्हणायची वाईट खोड असते.

  ह्या दोन्ही गोष्टी खूप irritate करणार्‍या आहेत. असे केल्याने बोलणार्‍याची काही किंमत राहत नाही. असे कोणी वागल्यावर खूप अपमान झाल्यासारखे वाटते.

 30. Pingback: अशा लोकांच काय करावं? | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 31. madhuri gawde says:

  gossiping karnaarya mahila baghitlyaa ki laaz waatle

 32. sahajach says:

  >>>>ही पोस्ट आणि कमेंट्स याची प्रिंटआउट घेऊन माझ्या डेस्कवर लावणार आहे मी. 🙂

  हेरंब 🙂

  महेंद्रजी किती वेळा वाचली ही पोस्ट… किती बारकावे मांडलेत तुम्ही आणि मग बाकिच्या कमेंट्समधे सगळ्यांनी….

  आधि तपासले आपल्यामूळे कोणाला त्रास होतोय का, एखादा मुद्दा आपल्याला लागू होतोय का ?? 🙂 … आणि मग आपल्याला ज्या मुद्द्यांचा वैताग वाटतो असे मुद्दे पहाणारे आणि छळले जाणारे आपण एकटेच नाही याचे समाधान वाटले 🙂

  नेहेमीप्रमाणे मस्त पोस्ट!!

 33. Yaman says:

  Dear Mahendra,

  Post and comments, as usual both looks great.

  I am reading your blog since a long but giving feedback for the first time. Also, please advice me on how to write in Marathi.

  Thanks,
  Yaman

 34. s.k. says:

  experienced such things kaka.. mi pan irritate hote jeva lok vel palat naahi.

  • खरं आहे. प्रत्येकाला कुठली ना कुठली गोष्ट अशी असते, की ती डोक्यात जाते नेहेमी..

 35. dhanashri says:

  khup chhan post ahe pratekana vachava ani dusryala irretate hotil asha goshti na karnyache kinwa ya goshti aplya kadun ghadnar nahit yache kalji ghyavi. ani mala pan ajun khup goshti yat add karavya vat tayet.
  Tyatlya kahi goshti mhanje 1)last stop astana sudha bus madhun utarnya sathi ekmekana dhakka marnare. 2) bus madhe ubha rahila jaga astana sudha khetun ubha rahanare. 3)mahilanchya seatvar basun parat ulat bhandnare.

  • धनश्री
   सोशल अवेअरनेस थोडा कमी आहे आपल्याकडे. स्त्रियांच्या जागेवर बसून भांडणारे महाभाग हे नेहेमीचेच झाले आहेत. मराठी लोकंच जास्त असे वागतांना दिसतात दुर्दैवाने.

 36. bhaanasa says:

  महेंद्र, तुझी पोस्ट व त्यात सगळ्यांनी घातलेली भर पुन्हा: पुन्हा वाचली. सहमत, सहमत… खरेच लोकं किती प्रकारे डोक्यात जात असतात. आणि काहींना ते कळत असते, किंबहुना ते त्यासाठीच तसे वागत असतात. 😦

  सगळे मुद्दे काळजीपूर्वक वाचले, हो न जाणो एखादी चूक आपल्या हातून घडत असेल. 😀
  हुश्श… नाय बा, त्या बोटीत आपण नाय.

 37. Rohi says:

  वेटर ला ‘शुक शुक ‘ वैगरे करून बोलावणारे

 38. radhika says:

  Kaka, kharach khup chan post ahe. I liked it so much.
  Asech chan chan post lihit ja. khup avdatat……………..
  thanks,
  replay……………….

 39. सुलक्षणा शशिकांत कोचरेकर says:

  वाचून खूप हसायला आल. खूपच सुंदर पोस्ट आहे. छान लिहिता तुमी मी आजच पहिली तुमची हि web-site पण मझ्झा आली

 40. Sharda Morya says:

  Khoopach Chaan………
  List khoop mothi jhali aahe…..

  • अहो मी थांबलो, अजून बरीच अशी मंडळी आहेत.. 🙂 पण लिहायचं तरी किती???? हा प्रश्न आहेच ना…

 41. खूप छान झाली आहे ही पोस्ट , प्रत्येकच पोस्ट मध्ये काहीतरी नवीन आणि छान छान वाचायला मिळतं , निरीक्षणही अचूक असतात आणि अगदी सहजतेने मांडलेले असतात ..JUsss Hatz of to u sir 🙂
  अजून थोडीशी भर अशी कि
  काही लोकांना उगाच काही झाला कि चक आवाज काढण्याची सवय असते
  काही PDA (Permanant Dukhi Aatma) उगाच कारण नसताना कायम रडणारे
  अशा लोकांचा पण काय करावा काही कळत नाही ;-P 😛

 42. Tumhi je bolat te ter real life madhe khadat aste ani tasa anubhav pun yet asto pun kahi navin ghoshti pun samajalya tyachya sathi thanks! ani mala irrated karanari ghosht mhanze nahi mhatle teri mage laganari manse mug te premat aso kinva bazarat!

  • 😀 अगदी खरं आहे. बरेच लोकं भेटतात असे. 🙂 आवर्जू दिलेल्या अभिप्रायासाठी मनःपूर्वक आभार.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s