फॅशन

अ‍ॅंड्रेज .. फोटो इंटरनेट वरून साभार.

इथे हा फोटो बघून कदाचित आश्चर्य वाटलं असेल- की हा ’असा’ फोटो ब्लॉग वर का लावला म्हणून.  दोन तीन दिवसापूर्वी ह्या व्यक्तींचा  फोटॊ पेपरमधे दिसला , आणि म्हणून हे पोस्ट! ह्या फोटो ची एक मोठी कहाणी आहे,  ती सांगण्यापूर्वी थोडं इतर काही….

दुकानात गेल्यावर सौ. ने सिलेक्ट केलेला एखादा ड्रेस बघून  जेंव्हा , हा काही फारसा चांगला दिसत नाही असं म्हंटलं, की फॅशन मधलं तुम्हाला काही समजत नाही हो.. आणि जे  समजत नाही त्यावर तुम्ही उगीच कॉमेंट्स पास करू  नका.. हे वाक्य नेहेमीच ऐकावे लागते. एक बाकी आहे , की  तसंही माझं आणि फॅशनचं कधीच सख्य नव्हतं, आणि अजूनही नाही. कुठलाही शर्ट कुठल्याही रंगाच्या पॅंट बरोबर ’मॅच’ किंवा ’क्रॉस मॅच’ होतो हे माझे स्पष्ट मत आहे. आता साधारण पणे सगळ्या पॅंट्स या माझ्या काळ्या किंवा डार्क ग्रे रंगाच्या असल्यामुळे कुठल्याही रंगाचा शर्ट चालून जातो .  निळ्या जिन्स वर हिरवा शर्ट असला तरी पण चालतो मला- आणि  बिलिव्ह मी, कॉलेजला असताना, मी खरंच पोपटी हिरवा शर्ट वापरायचो जिन्स वर. :). माझ्याकडे असलेले बहुतेक शर्ट्स हे लाईट कलर चे आहेत.  ( दोन तीन शर्ट्स मुलींनी वाढदिवसाला घेऊन दिलेले लाल, निळ्या रंगाचे सोडून.)

फॅशन म्हणजे नेमकं काय? हे मला कधीच समजलेलं नाही. समजा एखादी   मराठमोळी स्त्री छान तयार होऊन – म्हणजे नऊ वारी काठाच,  टोपदार पदराचं पातळ नेसून, गळ्यात गोल सोन्याच्या मण्यांची बोरमाळ, मंगळसूत्र, नथ आणि कानात छान मोत्याच्या कुड्या घालून आणि कपाळावर चंद्रकोर लावून निघाली , तर तिला फॅशनेबल  म्हणता येईल का?

बरं किंवा एखादी पाच वार शिफॉनची साडी (करण जोहरच्या सिनेमातल्या नटी सारखी) नेसून स्लिव्हलेस ब्लाऊज घालून, लिप्स्टीक वगैरे पुर्ण मेकप करून जर एखादी स्त्री बाहेर निघाली तर तिला फॅशनेबल म्हणता येईल का??

की सुंदरसा पाच हजार रुपयांचा पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी फॅशनेबल समजली जाईल? की साधा जिन्स टी शर्ट घातलेली गर्ल नेक्स्ट डॊअर फॅशनेबल आहे असे म्हणता येईल??

—नाही लक्षात येत ना? माझं पण तसंच होतं.

फॅशन ही टर्म तशी व्यक्ती सापेक्ष आहे. जी गोष्ट एखाद्याला खूप जास्त फॅशनेबल वाटते तीच गोष्ट एखाद्याला अगदी सर्वमान्य वाटू शकते. अगदी गावातल्या मुलीला शहरातल्या मुलीचे रोजचे कपडे म्हणजे टीशर्ट -जिन्स पण फॅशनेबल वाटतील- म्हणूनच फॅशन ची व्याख्या करणे म्हणूनच मला तरी अवघड जाते. स्वतःला जे काही योग्य वाटते ती फॅशन असे माझे स्पष्ट मत आहे. शेवटी काय, अगदी सहा वर्षाच्या चिनू  पण आईचे मेकप चे सामान घेऊन, स्वतःचा मेकप करत बसते, किंवा   ७० वर्षाच्या आजी पण अंबाड्यात एक लहानसं फूल खोचल्या शिवाय बाहेर पडत नाहीत. प्रत्येकच जण आपापल्या परीने  नीटनेटके रहायचा प्रयत्न करत असतो – सॉरी फॅशनेबल रहाण्याचा.

काळानुरूप  समाजाची बदलत जाणारी आवड म्हणजे फॅशन अशी फॅशनची व्याख्या केली जाऊ शकेल कदाचित. पुर्वी कधी  डोक्यावरून न घसरणारा पदर   कधी हळू हळू खाली सरकत  घसरून खांद्यावर स्थिरावला  ते लक्षातही आले नाही- आणि हे समाजातही रुळले .   नुडल्स प्रमाणे पट्ट्या असलेले ब्लाऊज घालणारी मंदीरा बेदी जेंव्हा तसे कपडे घालून दिसायची तेंव्हा साहजिकच टीआरपी वाढायचा त्या कार्यक्रमाचा- पण ती फॅशन समाजात फारशी रुळली नाही. माझ्या लहानपणी  आमच्या खेड्य़ा कडे एखादी स्त्री डोक्यावरून पदर घेत नसेल तरी पण ते फॅशन या सदरात मोडायचं- लिप्स्टीक वगैरे तर दूरच राहिलं. केस कापलेली मुलगी पण फॅशनेबल म्हणून गणल्या जायची. आता अर्थात ते दिवस गेलेत – पण ही परिस्थिती होती काही वर्षांपूर्वी. आजकाल प्रत्येकच घरातलं कोणीतरी शहराकडे गेल्यावर हे सगळं कॉमन झालंय गावाकडे सुद्धा!

काही दिवसापूर्वी तो अक्षय कुमारच्या बायकोने  फॅशन शो मधे  त्याच्या जिन्सचे बटन उघडले होते. बातम्या मधे हीच क्लिप सारखी सारखी घोळवून दाखवली जात होती  -जसे काही ही एक अतिशय प्रेक्षणीय गोष्ट आहे अशा स्वरुपात.  एखाद्या सिनेमा नटाला पण प्रत्येक फॅशन शो मधे ’शो स्टॉपर” ( म्हणजे काय हो??) म्हणून घेण्याची पद्धत आहेच.तो अशा प्रकारे जर शो स्टॉप करत असेल तर कठिणच आहे. कुठल्या तरी प्लास्टीकच्या कपड्यांपासून बनवलेले ड्रेसेस जे कधी कोणी घालू शकणार नाही असे घातलेल्या  त्या मॉडेल्स स्टेज वर रॅम्प वॉक करतांना दिसल्या. बरेचदा तर हे फॅशन शो पहातांना मला तर कपडे हॅंगर वर अडकवल्यासारखं दिसणाऱ्या मॉडेल्स ची शरीर यष्टी पाहिली की त्यांची दया येते .

मला एक नेहेमी पडणारा प्रश्न आहे , की त्या फॅशन शो मधे  भारतात  मॉडेल्स  ला  जे कपडे घातलेले दाखवतात, तसे कपडे सर्वसामान्य माणसं घातलेले कधी दिसत नाही. मग हे फॅशन शो कशासाठी केले जात असावेत? वर खांद्यावर पट्ट्या नसलेल्या गाऊन्स वगैरे घातलेल्या स्त्रिया मी कधी कुठे पाहिलेल्या नाहीत आजपर्यंत माझ्या आयुष्यात. कदाचित मी फॅशनच्या दुनियेत  फार ’निम्न वर्गीय”किंवा ’बुर्झ्वा”अभिरुची असलेला असेल म्हणून माझ्या सामाजिक जीवनात अशा कपड्यांना अजूनही स्थान नाही.

अतिशय लो वेस्ट जिन्स आणि ते घातल्यावर वर घातले जाणारे तोकडे टॉप्स! थोडं वाकलं खाली, की अंतरवस्त्रं दिसायला हवे अशी ती फॅशन असो , किंवा प्लास्टीकच्या पट्ट्या वर दिसतील अशा तर्हेने टी शर्ट्स च्या आतून  घातलेले अंतरवस्त्रं असो – हे सगळे  योग्य की नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. जे झाकून ठेवायचं, ते लोकांना दाखवायचं ,आणि जे दाखवायचं ते झाकून ठेवायचं असं काही केलं की त्याला मग  फॅशन म्हणायचं असं असतं का?

चांगली  फॅशन  आणि वाईट  फॅशन असे काही नसते. माझ्या मते जे कपडे घालून मुलीला बापाबरोबर बाहेर फिरतांना, आईला मुला सोबत, नवऱ्याला बायकोसोबत फिरतांना  अनकम्फर्टेबल वाटत नाही  ती  ,  किंवा जी  आपल्या घरच्या लोकांनी केलेली आपल्याला आवडेल ती फॅशन योग्य!

ह्या पेक्षा पण जास्त प्रोव्होकेटिव्ह पोझ दिलेले फोटो आहेत या माणसाचे.. 🙂

बरं वर जो फोटो लावलेला आहे तो  जर एका मुलाचा आहे असे तुम्हाला सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही ना?  पण तो खरंच  एका मुलाचा फोटो आहे. पॅरिस फॅशन मार्केट मधली ’लेटेस्ट फाईंड’. हा मुलगा मुळचा ऑस्ट्रेलिया मधला आहे वय १९, उंची ६ फुट दोन इंच! एकदा याचे लांब केस आणि सुंदर चेहेरा  जेंव्हा एका फॅशन डिझायनरने पाहिला तेंव्हा याला घेऊन तो   पॅरिसला आला, आणि ह्याला सरळ मुलीचे कपडे घालून रॅंप वर उभे केले-सगळे स्त्रियांचे कपडे घालून मॉडेलिंग करण्यासाठी!

याला सगळ्यात जास्त पैसे मिळतात. मोस्ट हॉट मॉडेल समजले जाते या अ‍ॅंड्र्युज पेजिक ला.    काहीतरी जगावेगळं केलं  की लोकांना ते हवं असतं ………….. जाऊ द्या संपवतो आता इथेच!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in जाहिरातिंचं विश्व and tagged , , , , . Bookmark the permalink.

62 Responses to फॅशन

 1. satish says:

  मस्त लिहलय ,खुप कामाला येइल…धन्यवाद
  आनखि एक सागायच होत ,थोड जास्त लिहलात तर बर होइल……आता सवय पडले हो …..दररोज वाचु वाटत…..please..

  • सतीश
   धन्यवाद.. पण दररोज लिहायला वेळेचा प्रश्न येतो. तरी पण सुटीच्या दिवशी एक लेख लिहितोच. पण थोडं जास्त लिहीण्याचा प्रयत्न नक्की करीन. आभार.

 2. sahajach says:

  >>>> चांगली फॅशन आणि वाईट फॅशन असे काही नसते. माझ्या मते जे कपडे घालून मुलीला बापाबरोबर बाहेर फिरतांना, आईला मुला सोबत, नवऱ्याला बायकोसोबत फिरतांना अनकम्फर्टेबल वाटत नाही, ती फॅशन किंवा जी आपल्या घरच्या लोकांनी केलेली आपल्याला आवडेल ती योग्य!

  अगदी बरोबर 🙂

 3. बरेचदा तर हे फॅशन शो पहातांना मला तर कपडे हॅंगर वर अडकवल्यासारखं दिसणाऱ्या मॉडेल्स ची शरीर यष्टी पाहिली की त्यांची दया येते . खांद्यावर पट्ट्या नसलेल्या गाऊन्स वगैरे घातलेल्या स्त्रिया मी कधी कुठे पाहिलेल्या नाहीत आजपर्यंत माझ्या आयुष्यात. +१

  खरच कधी वाटत आपण खूप अडाणी आहोत फॅशनच्या बाबतीत..पण कधी वाटत आपण कपडे आपल्या कंफर्टसाठी घालतो, त्यामुळे ज्या कपड्यात आपण सुखी तीच आपली फॅशन 🙂

  मस्त लेख… 🙂

  • सुहास
   बारीक होण्याचं फॅड निघालेलं आहे हल्ली.त्यासाठी न खाणं, उपासमार करून घेणं वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत .कम्फर्ट सगळ्यात जास्त महत्वाचे, नुसते चांगले दिसण्यापेक्षा!

 4. rohit says:

  मस्त……….मस्त…………..मस्त…………..

 5. sarika says:

  >>>> चांगली फॅशन आणि वाईट फॅशन असे काही नसते. माझ्या मते जे कपडे घालून मुलीला बापाबरोबर बाहेर फिरतांना, आईला मुला सोबत, नवऱ्याला बायकोसोबत फिरतांना अनकम्फर्टेबल वाटत नाही, ती फॅशन किंवा जी आपल्या घरच्या लोकांनी केलेली आपल्याला आवडेल ती योग्य! +1

  छानच…मलाही फॅशनमधलं काही कळ्त नाही असं ब-याच जणाचं म्हणणं आहे…

  पण आता वाटतंय नाही कळत तेच बरं…

  • सारिका
   पण आता वाटतंय नाही कळत तेच बरं…
   खरं आहे. मी माझ्या मुलींना पण नेहेमीच सांगत असतो, की अजुन दहा वर्षानी तुम्ही आज काय कपडे घातले, तुम्ही कसे दिसता, हे कोणी लक्षात ठेवणार नाही. तुमची डिग्री, तुमचे यशस्वी होणे ( आयुष्यात ) हे सगळ्यात जास्त महत्वाच ठरेल.

   • “जे कपडे घालून मुलीला बापाबरोबर बाहेर फिरतांना, आईला मुला सोबत, नवऱ्याला बायकोसोबत फिरतांना अनकम्फर्टेबल वाटत नाही ती , किंवा जी आपल्या घरच्या लोकांनी केलेली आपल्याला आवडेल ती फॅशन योग्य!”
    हे माझे सुद्धा मत होते…पण ते भारतात ठीक होते…भारतात आपण आपल्या मुला मुलीबद्दल खूपच protective असतो.Nothing wrong in it!!
    परदेशात मी ज्या वेळेला बघतो की १५-२० वर्षाची मुलगी बापाबरोबर(एक तर हे सुद्धा फार दुर्मिळच दृश्य आहे…) अर्ध्या वीत कापडाची जीन्सची चड्डी (त्याला ट्राउझर म्हणणे म्हणजे आचरट अतिशयोक्ती होईल…कृपया महिला वाचकांची क्षमा!!) घालून फिरते आणि जर मध्ये बॉयफ्रेंड भेटला की हाय्य्य्य …करून त्याच्या गळ्यात पडते त्यावेळेला अनेक आईबाप ‘It is her personal life’ म्हणून बाजूला होताना मी स्वत: पहिले आहेत.येथे नवरा बायकोच दोघे हमामखान्यात असल्यासारखे असतात…कोणाला काय uncomfortable वाटणार..?
    येथे समर चालू झाला की मला माझ्या मुलीच्या डोळ्यावर पट्टी बान्धावीशी वाटते.असली दृश्ये दिसतात की भारतात पळून यावेसे वाटते……(बराक ओबामा मध्ये म्हणाले होते ना…देवा माझ्या मुलीचा स्कर्ट थोडा लांब कर…अगदी तश्याच sentiments माझ्याही आहेत…)पण येथे सगळेच ‘show stopper’ असतात 🙂 त्यामुळे low waist jeans आणि strapless top चे प्रस्थ तर पदोपदी…समोरून जाताना त्यांच्या तोकड्या वस्त्रातले काही खाली पडू नये म्हणून आपणच जास्त Conscious होतो..
    आणि आपल्या नट्या घालतात की “खांद्यावर पट्ट्या नसलेल्या गाऊन्स”…कुठल्याही अवार्ड फंक्शन ला जाऊन बघा…मी तर IIFA awards ला दरवर्षी याची देही याची डोळा amsterdam,yorkshire आणि colombo ला बघितले आहे…तेथे ऐश पासून लारा पर्यंत सर्व काकू fashionable होतात..जाऊन या एकदा तेथे.. 🙂
    पण शेवटी मलाही वाटते की fashion मधील मला काही कळत नाही हेच खरे..

    कालाय तस्मे: नम:

    • होय, अवॉर्ड फंक्शन्स मधे दिसतात तसे लोकं. मी जे लिहिले आहे ते सर्वसामान्य लोकांच्या बद्द्ल. पेज ३ किंवा तत्त्सम लोकं तर कसेही वागु शकतात. पण अशा परिस्थिती मधे मुलांना वाढवायचं म्हणजे खरंच त्रासदायक ( मानसिक त्रास म्हणतोय मी) होत असेल . आपल्या कडे पण मुंबई टाइम्स मधे असेच फोटो असतात सगळॆ.

     • Smita says:

      ya varachya comments jara jastach generalized aNee dambheek vaTataat. For example, not all husband-wives in the USA behave like they are in “hamamkhana”- some do behave gracefully, raise good kids like we do.. Depends on the crowd you get to see..
      ANee koNtyahee gavat kinva dusrya deshat jaun tithalya goshteenna blame karat rahayacha aNee bharatat paLun yavasa vaTatay mhanat rahayache hee puN ek behavioral fashinach ahe nahee ka??. yayach ahe tar what is stopping you? poorvee clerical kaam karaNaryanna jase “Karkoonada” mhaNun hiNavayache tasech americans hee majority of indians na manaat “computarda” vagaire equivalent mhanat asteel, , kahee farak nahee padanar tithun kunee parat ala tar.

      • aruna says:

       hello Smita,
       as you say ,the culture there is very much different. but one thing is surely not good. they are very impersonal. the parents do not interfere in the lives of their children after they become 16, and the children too would not like their parents to do that. the question is, do you really think that the children are really mature enough to take all their decisions themselves? i think the no. of drop-outs and single mothers etc. shows that they are not. and that is the reason why they have to depend upon scholars from developing countries. i don’t know if we are called omuterda, but they definitely envy
       our software engineers.
       about clothes, it’s entirely their problem. no one gives a damm. it’s the mind that decides what to think and how. so we should keep our wandering mind to ourselves!.

       • Smita says:

        apologies Aruna. I did no mean to undermine anybody’s abilities .

        • aruna says:

         hello Smita. I am sorry if i came across as offensive. my only point was that their family support and a feeling of security is is somewhat lacking. and them feeling envious about our IT kids, is a personal experience. even second generation Indian families have that kind of feeling sometimes as they and their children have adopted American way of life!
         this again might be limited, but i did feel it that way.
         our family system is the best. only we should realize it and preserve it.

 6. Mrunal says:

  Varchya potomadla mulga ahe. He sevti vachlyanantar mala kalle.

  • मृणाल,
   मला पण आधी खरं वाटलं नव्हतं. मुंबई मिरर मधे आतल्या पानावर एक लहानशी बातमी होती ही.

 7. अनघा says:

  🙂 फॅशनची दोन जगे असतात. एक सर्वसामान्यांसाठी व दुसरे पेज ३ मधील व्यक्तींसाठी. त्यात मिसळ नाही होऊ शकत. बाहेर, धावत जाऊन ट्रेन पकडायची असेल तर कपड्यांची गरज वेगळी आहे व बाहेर एखादी पार्टी अटेंड (त्यातही कोणत्या प्रकारची पार्टी आहे हा विचार करणे गरजेचे ठरते) करायची असेल तर तिथे कपड्यांची गरज वेगळी असेल.
  त्यामुळे ह्यात ‘हे बरोबर आणि हे चूक’ असा एक सरधोपट नियम लागू होऊ शकतो असे मला नाही वाटत. फक्त अश्या प्रकारात त्या त्या व्यक्तींनी इथले कपडे तिथे वापरले की दोन्हीकडे हसूच होऊ शकते. म्हणजे रोजच्या कार्यालयात अंग उघडे टाकणारे कपडे वापरणे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना त्रास. फक्त हे बऱ्याच वेळा जाणूनबुजून, लक्ष वेधून घेण्यासाठी देखील केले जाते.
  अर्थात हे माझे वैयक्तिक व जुजबी ज्ञान आणि मत आहे…
  🙂

  • अनघा
   अगदी व्यवस्थित ऍनॅलिसीस केले आहे.
   फॅशन हा व्यक्ती परत्वे बदलणारी असते. नेमकं हेच मला सांगायचं होतं. बरेचदा मुली असे प्रोव्होकेटीव्ह कपडे घालतात की तुम्हाला पण त्यांच्याकडे बघायची लाज वाटते.
   गरजेप्रमाणे कपडे घालणे हेच बरोबर.

 8. मला देखील फॅशन प्रकार कधी झेपला नाही. घरी बाबांच्या मते बाहेर जाताना नेहमी कडक इस्त्री वैगरे करून दाबात जायचे. मला ऑफीसमध्ये फॉर्मल आणि बाहेर जीन्स टी-शर्ट आवडतात. फॅशनच्या बाबतीत म्हणावे तर आपण घातलेले कपडे आपल्याला व्यवस्थित Carry करता आले म्हणजे झालं.

  बाकी अ‍ॅंड्र्युज पेजिक म्हणजे खरंच नवीन अविष्कार आहे.

  • अ‍ॅंड्र्युज पेजिक भल्या भल्यांना वेड लावेल असा सुंदर आहे. त्याचे काही फोटो तर खूपच मस्त आहेत. यु ट्युबवर व्हिडीओ पण आहेत त्याचे 🙂 बघीतले का?

 9. Sneha says:

  Mahendra Kaka , kadhi kadhi aapan gharchyan barobar tv Pahat asalo tar ase he picture madhale kapade pahun khup vulgar vatate. Majhe Pappa nehami ekach gosht vichartat, natala ang bharun kapade aani nati aardhi ugadhi ase ka? Aho India tach evade chote kapade ghalatat muli mag pardeshatalya Indian muli jya ithe shikayala aalele asatat vicharanare koni nasate, tyanche tar kapade bhayanak asatat. Me swataha pahila aahe. Kahi muli decent pan asatat.Anyways as usual ekadam rocking post hoto. Thanks.

  • जशी मागणी तसा पुरवठा. हल्ली सलमान खानला पण बरेचदा उघडे दाखवले जाते मुद्दाम. 🙂 दोन्ही प्रकार दाखवणे सुरु केलेले आहेत!
   शेवटी काय, तर प्रत्येकाचा स्वतःचा व्ह्यु असतो, त्याप्रमाणे लोकं वागतात !

 10. vikram says:

  फॅशन movie pahila ki फॅशन jagat kase aahe yachi kalpna yete 🙂

  post mast jhaliy 🙂

 11. mau says:

  >>>> चांगली फॅशन आणि वाईट फॅशन असे काही नसते. माझ्या मते जे कपडे घालून मुलीला बापाबरोबर बाहेर फिरतांना, आईला मुला सोबत, नवऱ्याला बायकोसोबत फिरतांना अनकम्फर्टेबल वाटत नाही, ती फॅशन किंवा जी आपल्या घरच्या लोकांनी केलेली आपल्याला आवडेल ती योग्य! +100 हे अगदी बरोबर लिहिलेत..
  माझी एक मैत्रीण आहे…साउथ इंडीयन आहे…प्रोफेशन ने कर्नाटकी सिंगर आहे…ती आजही बाहेर भाजी किंवा डॉक्टर कडे जाताना सुद्धा वर पासुन खाली पायापर्यंत नखशिखांत मढुन जाते..अगदी केसात हिर्‍याचे फुल ज्याला राखुडी म्हणतात…ते सुद्धा घालुन जाते..तीच्या परीने ती फॅशन असते…तीला बघुन खुपजणांची खुप मते आहेत..मला मात्र ती खुप gorgeous वाटते..कारण वेळात वेळ काढुनही एव्हडा खटाटोप करते…..सांगायचा मुद्दा हा की प्रत्येकाच्या फॅशनच्या कल्पना वेगवेगळ्या…बाकि पोस्ट नेहमीप्रमाणे मस्त !!!

  • स्वतः जास्त चांगलं दिसावं ही मूळ भावना असतेच. आणि स्त्रियांमध्ये थोडी जास्तच असते 🙂 म्हणून त्या थोड्या जास्त कॉशस असतात दिसण्याच्या बाबतीत.

 12. Smita says:

  te ramp walk che kapade : I don’t think they are intended to be really worn by people. Those seem like just exaggerated forms meant only for presentation- so that we remember the fabric , style etc. And then may be- some wearable practical forms of those clothes become available in the market. There was an episode on ‘I love Lucy’ once wherein they (Lucy and Ethel) literally wear sacks ( potee) and walk the ramp and make fools of themselves and sure enough, the next day that becomes hot fashion!!:-)

  bakee apalyala comfortable tee fashion hach niyam mee puN palate. it’s entirely personal I agree. Nice post.

  • स्मिता,
   ते कपडे असे असतात, की त्या कपड्यांकडे कोणाचे लक्ष जात असेल का ही शंका येते. जे झाकायचं, ते उघडे ठेवल्यावर कपड्यांकडे कोण बघेल? आणि मला वाटतं की जास्त प्रसिद्धी ही वार्ड रोब मालफंक्शनला किंवा इतर गोष्टींनाच जास्त मिळते. त्यांना नेमकी प्रसिद्धीच हवी असते, कपडे तर आपोआप विकले जातात.

   आय लव्ह लुसी.. छान आठवण करुन दिलीत. आता पुन्हा एकदा सगळे पहावे लागणार एपीसोड्स. नुकताच त्याचा टोरंट मिळालाय 🙂
   आभार..

 13. आनंद पत्रे says:

  माझ्या मनातलं सर्व.. लेख आवडला काका …

 14. Ninad says:

  Vishay Nighala mhanun ek incident sangto, 1 mahinya adhi, Lokhandwala Nature Basketla visit dewun baher alo ani ek jadishi mulagi low west Jeans and Tokda Top ghatleli, Taxi madhun Baher ali. El pawool pudhe takat nahi tar tichi Jeans poorna pane khali padli(unbeliveable pan aat innerware pan navte). Amhi sagle shock madhe(aaju bajuche taxiwale, bajune janarya bayka). Tine Jeans war keli ani kahi jhalech nahi ase dharun Shop madhe geli! Fashionche extreme prakar ahet!

 15. सुंदर लेख. तुम्हाला पडलेले प्रश्न मलाही पडतात कधी कधी. फॅशन म्हणजे माझ्या मते नेहमीच्याच कपड्यांमधे (स्वत:ला आवडणारे किंवा स्वत:च्या बुद्धीनुसार) केलेले काही आकर्षक बदल. फॅशन चांगली की वाईट हे अर्थातच पहाणार्‍याच्या नजरेवर अवलंबून असतं. एका फॅशन शोमधे मी टिश्श्यू पेपर्स पासून बनवलेला ड्रेस घातलेली एक मॉडेल पाहिली होती. असा पोशाख कुणी फॅशन म्हणून नेहमीच्या आयुष्यात घालेल का? पाण्याचे दोन-चार शिंतोडे अशा ड्रेसची नि मॉडेलचीही कशी वाट लावू शकतील असे विचार माझ्या मनात त्या वेळेस आले होते. त्यानंतर एका हिंदी चित्रपटात (बहुधा “शहजादे” हे नाव होतं त्या चित्रपटाचं) डिंपल कपाडियाला सेफ्टी पिन्सपासून बनवलेला ड्रेस घातलेलं पाहिलं होतं. तो ड्रेस तिच्या सख्ख्या लहान बहिणीने म्हणजे सिंपल कपाडियाने डिझाईन केला होता. मुख्य म्हणजे तो ड्रेस सेफ्टी पिन्सपासून बनवलेला आहे, हे जो पर्यंत मासिकात वाचलं नव्हतं तो पर्यंत लक्षातच आलं नव्हतं, इतका तो ड्रेस आकर्षक दिसत होता. सांगायचा मुद्दा हा की फॅशन कशाचीही, काहीही, कशीही बनू शकते पण ती जर सर्वांना आवडणारी असेल, तर प्रचलित होते.

  • टिश्यु पेपर वापरून बनवलेला ड्रेस, आणि त्यावर पाणी पडलं तर काय होईल?? नुसता विचार करूनच मेंदूचा भुगा होतोय.
   फॅशन कशाला म्हणायचं ? फॅशन कशाचीही, काहीही, कशीही बनू शकते पण ती जर सर्वांना आवडणारी असेल, तर प्रचलित होते.
   हे मान्य. फॅशन व्यक्तीपरत्वे त्याची व्याख्या बदलते. सर्व सामान्यांना जे कपडे घालता येण्यासारखे असतात, तेच पुढे प्रचलीत होतात. पक्षांची पिसं लावलेले कपडे , प्लास्टीक वापरलेले, विचित्र डिझाइन्सचे हे जनरली दाखवले जातात फॅशन शो मधे, आणि आपले नेहेमीचे कपडे दाखवले तर शो बघायला कोण येईल ? हा पण प्रश्न आहेच. लोकांना काहीतरी वेगळंच हवं असतं … म्हणून ते दाखवत असावेत असे काहीतरी..

   • aruna says:

    आणि मग चोकलेतचा ड्रेस असेल तर?

    • sonal says:

     pan jar fashion show madhlya kapadyancha kahi upyogch nasel mhanje te market madhe yenar nastil kinva te koni avdine ghalnya joge nastil tar kashala evdha kharch tya fashion show var

     baki chan post ahe avadle

     • सोनल
      ब्लॉग वर स्वागत.
      फॅशन शो म्हणजे फक्त एक इव्हेंट म्हणून आणि ब्रॅंड पॉप्युलर करायला म्हणून उपयोगी पडतो. ते फॅशन शो मधले कोणिच घालतांना दिसत् नाहीत. तरी पण त्याला जितकी प्रसिद्धी मिळते, तितक्या कुठल्याच जाहिरातीच्या प्रकाराला मिळत नाही, हे पण तितकंच खरं!

 16. आल्हाद alias Alhad says:

  ” एखाद्या सिनेमा नटाला पण प्रत्येक फॅशन शो मधे ’शो स्टॉपर” ( म्हणजे काय हो??) म्हणून घेण्याची पद्धत आहेच”
  शो स्टॉपर म्हणजे शेवटचा चालणारा/री
  नंतर शो संपतो म्हणजे तो/ती डिझायनर ला घेऊन येते… सगळे जण टाळ्याबिळ्या वाजवतात. म्हणून शो स्टॉपर…

 17. Seema V Ghate says:

  Lekh chaan aahe. Sarva samaanya mansala padnare prashna tumhi upasthit kele aahet. Mala tari ya var ekach oopaay disto aahe, (he sarva vyakti swatantrachya nawakhali chalnarach aahe) durlaksya karne, tras kami hoto!!!!

  • सीमा
   दुर्लक्ष करणे हा उपाय कसा म्हणता येईल? कारण ह्या सगळ्या दृष्यांचा परिणाम टिनेजर्स वर नक्कीच होतो.

 18. Aparna says:

  काका हे फ़ॅशन शोमधले कपडे कोणी घालेल का हा प्रश्न मलाही पडायचा…अमेरिकेत आल्यावर थोडंफ़ार त्याचं उत्तर मिळतं….इथे निदान मुली त्यांच्या प्रॉम आणि लग्नात वगैरे ते वर खांद्यावर पट्ट्या नसलेल्या गाऊन्स घातले जातात…माझ्या शेजारी ख्रिसमसच्या पार्टीत असे कपडे घालुनच सगळ्या असायच्या आणि तसं ते कुटुंब इथल्या तुलनेत काही हाय क्लास नाही….अर्थात इथेही कार्यालयात घालुन यायच्या कपड्याची मर्यादा वेगळी आहे पण नपेक्षा..
  आता प्रश्न आहे आपल्या देशात अशा पद्धतीचे कपडे फ़ॅशन शो मध्ये का सादर करतात याचं उत्तर कदाचित अगदी हाय क्लास पार्टीजमध्ये घालतही असतील पण अंधानुकरण आणि काय???
  असो…back to post….शेवट एकदम झकास…

  • अपर्णा
   सिनेमात तर बरेचदा दिसतात प्रॉम ला वगैरे घालून जातांना.
   फॅशनच्या नावाखाली अजून काय काय पहाणं नशिबात आहे ते देव जाणे.. 🙂

 19. आका says:

  मी कपड्यांच्या बाबतीत तर दुधखुळा आहे हे बझर लोकांन कळलच असेल…
  बायकोलाच सांगतो तुच चल आणि घे.. वर्ष्याला ४ शर्ट आणि २ पॅंन्ट्स पुरायला मला.. लग्नानंतर खुप बदल आहे आता…
  फॅशन बद्दल तुमचे माझे विचार सेम..

  • हा हा हा.. असं ओपनली सांगू नये, लोकं जोरूका गुलाम वगैरे म्हणतात मग!!:)
   माझं पण ठरलेलं असतं, काळ्या पॅंट्स आणि लाईट कलर चे शर्ट्स. मग त्यामधे काही फारसा चॉइस नसतोच, खरेदी पटकन होऊन जाते दुकानात गेल्यावर, फार तर अर्धा तास.. 🙂

 20. मी कपड्यांच्या आवडीनिवडीबाबतीत खूप चुझी आहे. प्लेन शर्ट/ कॉलर्ड टीशर्टस/ लुज जीन्स वगैरे वगैरे असे बरेच फंडे पक्के आहेत मनात. आणि तीच माझ्या दृष्टीने माझी फॅशन आहे. 🙂

  लेखातलं एकूण एक वाक्य पटलं.. सुपरलाईक !!

  तो मुलगा आहे हे ऐकून तर धक्काच बसला मला.. कमाल आहे !!!

 21. aapan sagaLech styayugaapaasoon aapalyaawar jhaalele samskaar visarat chaalalo aahot.kuNee kitee nahee mhatale taree kamee kapade ghaatalelyaa streeche phoTo sarvach purushaamna baghaawese waaTatat. phoTo baghaNyaapuratech he maryadit asate tar kaahee vishesh bighadat naahee. paN man tyaacyaa pudhech dhaawat asate.lokaaMchee hee awad lakShaat ghetaa ashaach deejhain jaasta yenaar naahee kaa?mag dejhayanaralaa kashaalaa doSh dyaayachaa?

 22. maya says:

  raju… arey nustech kapde nahi tar kesanchi aani bhuwayanchihi bhayanak fashion aste…
  muli sunder disnya aiwaji kurup distat…hich fashion asawi bahuda….
  aani ughde aang thevun comfortable watat asel yabaddal shankach aahe….
  anyway… sunder lekh… likhte raho

  • माया
   खूप बरं वाटतं कोणी राजू म्हणून ओळखणारे भेटले की. 🙂 ्मला वाटतं की ब्लॉग वर आलेली तू पहीली आहेस लहानपणीची मैत्रिण.. 🙂
   केस… मस्त आयडीया आहे. या लेखाचा सिक्वेल लिहितो उद्या केसांवर.तसंही उद्या सुटीच आहे म्हणा.
   बाकी काय म्हणतेस? फोन करतो लवकरच !

 23. santosh Deshmukh says:

  काका नमस्कार
  थोडासा खिचडी विषय आहे पण जास्त चर्चा करण्यासारखा नाही काका त्या मुली चालून कपड्याची जाहिरात कशी हो ते अजून कळले नाही असो

 24. aruna says:

  फ़ॆशन सारखी बदलत असते. तुमच्या आईचे तरुण्पणीचे फोटो पाहिलेत तर आत पुन्हा तसेच काहीसे कपडे नवीन नावाने दिसतात. आम्ही लहान्पणी परकर पोलके घालत होत. आता त्याल लोंग स्कर्ट म्हणतात.
  काही खास प्रकार्चे कपडेदे फ़क्त अती-श्रीमन्त लोकांसाठीच असतात. त्यांनी काही घातले (किंवा न घातले) तरी चालते.they have a different ethics and different rules.they can afford to sped lacs of rupees on a single dress never to be worn again.
  one should wear what one feels comfortable in. why bother what others think or wear if it makes u uncomfortable?

 25. joshi l.g. says:

  Samaja aaplyala je yogya (Aapalya babtit ) watate tyalach fashion mhataletar?

 26. तो मुलगा आहे हे लेखाच्या शेवटीच कळले….भारी आहे प्रकरण …
  जे कपडे मला कम्फर्ट देतात तीच माझ्यासाठी फॅशन असते … लेख नेहमीप्रमाणे छानच …!

  • फॅशन म्हणजे केवळ कपड्य़ांचीच का ?
   केसांचा कोंबडा काढलेले देवानंद स्टाइलचे केस खूप वर्ष होते फॅशन मधे… आणि ती फुंकर मारून केस उडवायची स्टाइल कोणाची होती बरं?? कसं विसरू शकाल तुम्ही??

 27. रोहन says:

  फॅशन म्हणजे काय रे भाऊ???

 28. vishal says:

  khupach chan lihile ahe agadi mazya manatale

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s