परवाच टाऊन साईडला कामानिमित्त गेलो होतो. दुपारी ३ वाजे पर्यंत कामाच्या रगाड्यात काही वेळ मिळाला नाही जेवायला! कडकडून भूक लागली होती. “महेश लंच होमला’ जाऊ या का रे??” बरोबर असलेल्या मित्राला विचारले, पण त्याला मात्र त्याच्या अमेरिकन मित्राने रेकमंड केलेले ’तृष्णा’ ट्राय करायचे होते . हे तृष्णा म्हणजे नगीनदास मास्तर मार्गाच्या आणि ह्रिदम हाऊसच्या मधल्या भागात असलेले रेस्टॉरंट. दोन वेळा टाइम्सचं बेस्ट फुड अवॉर्ड मिळवलेले आणि लंडन मधे शाखा असलेले…. इतकी वर्ष झाली मी त्या भागात जात असतो, पण ह्या हॉटेल मधे कधीच गेलो नव्हतो .
’तृष्णा’ कडे मोर्चा वळवला. ऍज युजवल पार्किंगची बोंब आहे या भागात. फाउंटन वर कार पार्क करून चरफडत चालत चालत आलो पुन्हा हॉटेल पर्यंत! अंतर फार नव्हतं पण पोहोचे पर्यंत पार घामाघूम झालो होतो.सध्या मुंबईचे चांगले दिवस (थंडीचे) संपले आहेत. दुपारी बाहेर पडलं की होणारी नुसती घामाने होणारी कचकच.
हॉटेलचे मुख्य दार पाहिल्यावर आत मधे इतके चांगले हॉटेल असेल असे अजिबात वाटत नाही. दाराजवळ गेल्याबरोबर दरबानने दार उघडून धरले आणि आम्ही आत शिरलो. एसीचा आतला थंडावा एकदम हाडापर्यंत शिरला. ह्या दरबानला बाहेर निघतांना त्याने तुमच्या साठी दार उघडले म्हणून, आणि थॅंक्यु सर म्हणून मान झुकवली म्हणून त्याला किती टीप द्यायची – हा प्रश्न नेहेमीच पडतो मला. 🙂 असो.
हॉटेल मधे शिरल्यावर आधी पहिला फिल येतो की आपण ’ऑड मॅन आऊट’ आहोत इथे. कारण सगळे फिरंगी लोकंच दिसतात इकडे बसलेले. मला वाटतं की आमच्या शिवाय फक्त चार पाच भारतीय लोकं असतील.
हॉटेल मधे शिरल्या बरोबर काय दिसलं असेल ? तर जवळपास मनगटा एवढा जाड आणि चांगला १२ इंच लांबीचा असलेला लॉब्स्टर घेऊन वेटर एका टेबल वर सर्व्ह करत होता. इथला क्रॅब आणि प्रॉन्स फेमस आहे . पण काय कोण जाणे, खाण्याची मात्र इच्छा होत नव्हती. तसाही शेलफिश ला मी ऍलर्जिक आहेच.
वेटरने येऊन काय आणू म्हणून विचारल्यावर, मी आणि माझा मित्र दोघंही एकदम म्हणालो.. ’किंगफिशर’!!!!! बिअर चे घोट घेत मेन्यूकार्ड चाळणे सुरु केले. मेन्यू कार्ड बघतांना कार्डाच्या डाव्या बाजू सोबतच उजव्या बाजूला पण लक्षं द्यावं लागते. प्रत्येक डिश साधारण ५५० ते ६०० रू. प्लेट आहे. स्पेशल डीशचे भाव तर विचारूच नका. 😦
आम्ही फिश टिक्का ( हैद्राबादी रावस) , चिकन टिक्का मसाला, आणि पांप्लेट चायनीज स्टाइल मागवलं. सोबतीला अर्थातच नीर दोसा! वेटर म्हणाला की नीर दोसा चायनीज फिश सोबत चांगला लागणार नाही, म्हणून ’पाप्लेट इन ग्रिन सॉ”(?????)घ्या. फारसा विचार न करता म्ह’ट्लं, की चला, आपल्याला माहीती नाही, आणि तो सांगतोय तर घेऊ या “फिश इन ग्रीन सॉस!”
पंधरा मिनिटातच टेबलवर जेवण आणून लावलं त्या वेटरने. स्टार्टर म्हणून मागवलेले रावस हैद्राबादी सर्व्ह केलं ,आणि एक घास घेतला नसेल तर लगेच मेन कोर्स एकदमच आणून ठेवलं समोर. ’रावस टीक्का’ पूर्णपणे थंड झालेला होता, पण चवीला छान होता. फिशचे पिसेस पण चांगलेच मोठे होते. एका प्लेट मधे सहा पोर्शन्स होते. ’पाप्लेट इन ग्रीन सॉस’ म्हणजे पालकात शिजवलेले पापलेट ( जर हे माहीत असतं तर मी ऑर्डर केलंच नसतं कधी). तसंही मला फारसं पाप्लेट आवड्त नाही आणि ते पण पालकात शिजवलेले?? मसाले वगैरे एकदम कमी, मिठ , तिखट कसलीच फारशी चव नसलेले ते पाप्लेट अजिबात आवडले नाही. ’चिकन तृष्णा’ आणि ’नीर दोसा’ मात्र खूपच छान होता.असं म्हणतात इथे गार्लिक बटर क्रॅब/ प्रॉन्स चांगला मिळतो पण ट्राय केले नाही.
फिश जर फ्रेश असेल तर फिशचा अजिबात वास येत नाही. पण थोडी जरी ( म्हणजे चार तासापेक्षा जास्त) शिळी असली की फिशला एक वेगळाच दर्प येतो.इथे फिश एकदम ताजी होती हे नक्की. 🙂
एकंदरीत हॉटेलचे नुसतेच नाव मोठे आहे, जेवण पण फारसे आवडले नाही. जरी चिकन करी चांगली असली तरीही तिचे भाव पहाता खूप ओव्हरप्राइस्ड वाटते. इथे बहुतेक परदेशी नागरिक जेवायला येतात, त्यामुळे सगळं काही चवीला एकदम माइल्ड असं असतं. वेटर्सची सर्व्हीस पण काही फारशी चांगली नव्हती.एकंदरीत इथला अनुभव काही फारसा चांगला नव्हता.
जेंव्हा बिलं हातात आलं, तेंव्हा दोन किंगफिशर,एक फिश टीक्का,एक फिश इन ग्रिन सॉस, आणि चिकन तृष्णा यांचं बिल होतं- ३१७०/ रुपये. यामधे १० टक्के म्हणजे अंदाजे ३०० रु.सर्व्हीस टॅक्स इन्क्लुडेड आहे. थोडक्यात माझ्या मते इथली प्रत्येक डीश ही ओव्हरप्राइस्ड आहे, अर्थात त्यांचा एक्स्पेक्टेड कस्टमर हा तुमच्या माझ्यासारखा नाही, तर परदेशी पर्यटक आहेत- तेंव्हा इथे न गेलेलेच बरे असे मला वाटते.. थोडक्यात काय- तर नाम बडे और दर्शन खोटे..
या हॉटेल पेक्षा मला महेश लंच होम जास्त आवडतं . काही दिवसापूर्वी महेशला गेलो होतो, आम्ही तीन मित्र. तर दोन बिअर आणि फिशकरी राइस, फिश टिक्का , आणि नीर डोसा यांचं बिल फक्त १६०० रुपये झाले. तिथली फिश करी अगदी ऑथेंटीक कारवार मंगलोर स्टाइलची असते. सीफुड साठी माझं रेकमंडेशन महेश लंच होम-आजकाल जरी पुर्वीपेक्षा भाव खूप वाढवलेले असले तरीही.. !म्हणून टाऊन साईडला कधी गेलात तर महेश लंच होम ला थम्स अप!!
खिशात खूप पैसे खुळखुळत आहेत? आणि एखाद्या खूप फेमस हॉटेल मधे जाऊन काहीतरी खायची इच्छा आहे टाऊन साईडला? तर मासे खाण्यासाठी म्हणून तर मग तृष्णा ठीक आहे-
पण माझा प्रिफरन्स महेश लंच होम.. पण माझं सगळ्यात फेवरेट सीफूड चं हॉटेल कुठलं ते विचाराल, तर त्याबद्दल पुढच्या पोस्ट मधे. अतीशय स्वस्त आणि चांगले सीफूड मिळण्याचे ठिकाण म्हणजे “फ्रेश कॅच” आणि कोंकण्याचे गोमंतक..पण त्याबद्दल नंतर कधी तरी लिहीन….
वा, छान खाद्य अनुभव घरि बसल्या दिलात! मि शाकाहारी असून आवडला!
अरुणा
धन्यवाद. अहो मी पण मूळचा शाकाहारी, पण हळू हळू कट्टर मासांहारी बनलोय. 🙂
मनःपुर्वक आभार..
ह्म्म…… आता आम्ही किती निषेध व्यक्त करायचा ते सांग 🙂
बाकी मांसाहाराबद्दल अगदी डीट्टो 🙂
तिथे शाकाहारी पण मिळतं बरं कां.. 🙂
अरे मी पण पक्की मांसाहारी बनलीये 😉
नेक्स्ट ट्रिप ला नक्की भेट दे.. 🙂
woww….महेश लंच होम माझे पणऑल टाईम फेवरेट…मला फीश ज्याम आवडते सो मुंबई्च्या वारीत महेश कडे जाणे होतेच…..आता ह्या मंथ एंड ला येतेच आहे तेंव्हा सुहासने सांगितल्याप्रमाणे रस्सा ला पण भेट देणार आहे…तृष्णा पण बघुन येउ…
वेल..थोडासा का असेना णिशेध द्यायचा मौका दिलात अगदी बरे वाटले…हुश्य्य्य्य्य…… 😛
महेश चांगलं आहेच, पण माहीमचं फ्रेश कॅच एकदम अफलातून आहे. तिथे रेट्स पण खूप कमी आहेत महेश च्या कम्पॅरीझन मधे. 🙂 माहीम स्टेशनला उतरल्यावर कोणीही सांगेल कुठे आहे ते..
रस्सा आहेच माऊ ताई, पण आमच्या बिल्डिंग खाली असलेले कोकण किनारा पण ट्रायकर, तिथे आता जेवण मस्त मिळतय, बहुतेक शेफ बदलला वाटत 🙂
सुहास,अरे फोन नंबर त्याच दिवशी फिड करुन घेतलाय….आता फक्त १५ दिवस राहिले आहेत रे…बस्स..मग मज्जाच !!
माऊताई तुमच्या डायटिंग चे काय मग?
वाह…मस्तच 🙂
हल्ली नॉनवेज शिवाय बाहेर जेवण होतच नाही…तृष्णाबद्दल मित्राकडून ऐकून होतो…महेश लंच होम मस्तच दिसतय. टाउन साइडलामुद्दाम एकदिवस खादाडी करायला जावच लागणार… 🙂
महेश ला गेला नाहीस अजून? खरंच चांगलं आहे. पूर्वी इथे १००-१५० रुपयात चांगलं जेवण व्हायचं, पण आजकाल सगळीकडेच तर महागाई वाढलेली आहे .. तशीच इथे पण 😦
hmmm apala pranta nahee ha – fish vagaire. mahesh lunch home puNyathee ahe, -quite popular in fact, puN mala tikhat vatala farach- mhaNaje cashew curry ka kaheetaree veg ghetalela te. TrishNa puN hota bund garden road var puN banda padala te, bahutek tumhee mhaNata tya karaNanech asel- overpriced, ekda office party la gelo hoto- exactly tumhee varaNan kelay tase te crabs aNun dakhvun cook karun det hote, puN thankfully veg menu was equally diverse. aNee bil hee pahava lagala nahee:-) host was someone else.
हे तृष्णा सगळ्या परदेशी पर्यटकांचे आवडते आहे. “बिल पहावे लागले नाही” 🙂 🙂 आम्हाला पण कधीच पहावे लागत नाही बरोबर कोणी कस्टमर असला की 🙂
पोस्ट खूपच आवडली महेंद्रजी.या परिसरात बरीच वर्षं घालवली आहेत म्हणून परिसराबद्द्ल प्रेम आहे.मी बर्याच वेळा अग्निशमन दलाच्या इमारतीसमोर गल्लीतलं गोमंतक आहे तिथे गेलोय.स्वस्त आणि मस्त.खूप विस्तृत लिहिलंय.छायाचित्रांसकट तोंडाला पाणी सुटलं हे मात्रं खरं! मस्तंच!
गोमंतक तर ऑल टाईम फेवरेट मधे मोडतं. पण गुरुवारी बंद असतं ते. बांद्ऱ्याला असलेली ब्रांच माझीआवडीची. ओ एन जी सी मधे काही कामासाठी गेलो , की जेवायला तिकडेच जातो अजूनही. 🙂
ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.. एक बाकी खरं, टाऊन साईडची मजा काही औरच.. 🙂
tumhee lok “townside” nakkee kashala mhaNata? fort and around? kharee -intended – mumbai tevadheech actually…
टाउन साईड म्हणजे फोर्ट, कुलाबा, चर्चगेट एरीया.
जसे खडकी, पिंपरीला रहाणारे लोकं , पुण्याला जाऊन येतो म्हणतात , तसेच आहे हे पण 🙂
महेश लंच होम ची पुण्यात कॅंपात पण शाखा आहे बहुतेक!!, कधी गेलो नाही वाचल्यासारखे वाटते आहे
गेला होतास की नाही कधी??
पोस्ट जबरी पण महागडी आहे 😉
असो, मुंबई भेटीत भेट द्यायच्या हॉटेल्सची संख्या वाढतेय. एक दोन महिन्यासाठी मुंबईमध्ये प्रोजेक्ट मिळतो का पाहायला हवे 😉
फ्रेश कॅच आणि गोमंतक वरच्या पोस्टची वाट पाहतोय.
फ्रेश कॅच वर खरंच एक स्पेशल पोस्ट व्हायलाच हवी, इतके चांगले हॉटेल आहे ते. वरची दोन्ही हॉटेल्स थोडी महागडी जरूर आहेत, आणि तृष्णा तर नक्कीच 😦 पुन्हा मी पण तिकडे कधी जाणार नाही हे पण पक्क!
अरेरे.. काय हे.. डायट चालू आहे असं काहीतरी ऐकलं होतं मी 😉
हेरंब
अरे डायटच आहे हे. दोन पिस तंदूरी फिश, एक पिस पाप्लेट, थोडा पालक आणि दोन पिस चिकनचे बस्स.. एवढंच रे. आणि कार्बोहायड्रेट्स म्हणशिल तर केवळ एक नीर दोसा घेतला. ( पूर्वी इतकं मला चकण्याला लागायचं – आता पूर्ण जेवण होतं एवढ्यात 🙂 )
ह्याला म्हणतात जिभेवर ताबा ठेवणे. संयमाची कमाल आहे.
😉 :-0 😉
सिध्दार्थ
नाईलाजाला इलाज नाही.
आज कोल्हापूरला आहे बघ, पण चक्क मेथीबेसन – भाकरी जेवतोय 🙂
मागे एकदा गेलो होतो तृष्णाला. पण मला नाही आवडले तिथले जेवण. एकतर अर्धवट गरम आणि चवीच्या नावाने शंख. त्यात पुन्हा जेव्हा बिल हातात आले तेव्हातर अजुनच उतरले मनातून. महेश मात्र नेहमीचा अड्डाच असायचा. महिन्यातून एकदा तरी चक्कर व्हायचीच तिथे. तिथे लेम फ़्राय म्हणून एक प्रकारचे फ़िश मिळायचे, अजुन मिळते का ठाऊक नाही. पण ती आमची आवडती डिश असायची. स्वस्त आणि क्वांटिटी भरपूर….. !! बाकी महेशला बिअर कधी प्यालो नाही. कारण त्यावेळी हार्डवरच दणका असायचा. लग्नानंतर आता सगळेच बंद झाले. ह्म्म्म गेले ते दिवस…………………. 😛
तॄष्णा मला पण फारसं आवडलं नाही. ओव्हर प्राइस्ड मेन्यु आणि टीपला हपापलेले वेटर्स. पण महेश अजूनही आवडतं. तिथे चांगला चॉइस आणि मेन्यु स्प्रेड असतो. .
Namaste kaka, bar vatale aaj khadadichi post vachun. Tumhi refineries madhye kaam karata ka? Karan majhe mister suddha oil n gas madhye aahet. Anyways as usual rocking post aahe. Thanks.
स्नेहा
नाही, आम्ही ऑफशोअर साठी बरीच मशिन्स विकलेली आहेत, म्हणून जावं लागतं बरेचदा.. 🙂
Majhe mister suddha offshore Lach asatat. Ek Mahina on aani ek Mahina off. NOV madhye aahe sadhya. Nyways pudhachi post lavkar yevu det. Thanks.
please try your non-veg lunch or dinner at SATKAR near Goregaon(east) railway station & then tell me thank you. but if u want to take dinner at 9.00 o’clock go before 1 hour.
गोरेगावचे सत्कार शेट्टीचे आहे की आपले म्हणजे मराठी माणसाचे आहे? नक्की जाऊन येईन एखाद्या वेळेस. 🙂
bakasuracha punrjnm………hahahaha…@ ..kha kha kha kha……
आयला, अरे तू पण का आता?? खूप कमी केलं आहे खाणं.. 🙂
अरे वा.. कोल्हापूर…! म्हणजे माझ्या गावाजवळ..!!
पोस्ट नेहमीप्रमाणेच एकदम मस्त…!!
काका….तुम्ही तर डाएट वर आहात अस ऐकल होत…..ती अफ़वा होती का ? 😉
अफवांवर विश्वास ठेऊ नये असे म्हणतात. आणि अफवा जास्त वेगाने पसरते, तेंव्हा खरं काय असेल ते बघ तूच.. 🙂
खूपच छान महेन्द्रभाउ पण कधी बोरीवलीला (प.) गेलात तर दक्षिण (वझीरा नाका) ट्राय करून बघा मस्त आहे आणि स्वस्त ही!!!
बोरीवली ला बरेचदा जातो . पण घरचे शुध्द शाकाहरी लोकं बरोबर असल्याने शक्यतो शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट्स मधेच जाता येते.. पण कधी जमलं तर नक्की जाईन. 🙂 धन्यवाद. आणि ब्लॉग वर स्वागत..
काका नमस्कार तुम्ही परत माझी आवडीची पोस्त लिहिलीत आभारी आहे पण ,,,,
इतक्या मोठ्या मुंबईत तुम्हाला शे पाचशे बिलापुरती चांगली खादाडी सापडत नाहीत का ? काका ,जरातरी गरीबाचा विचार करा ना राव !! काका ठाण्यात मासा कुठे खायचा ? बजेट सांगायची गरज नाही ……….
संतोष
नाही तसं काही नाही, केवळ अपघातानेच या जागी पोहोचलो. मित्राच्या एका अमेरिकेन मित्राने तारीफ केली म्हणून त्याला इथे जायचं होतं.. पण लवकरच फ्रेश कॅच वर टाकतो पोस्ट. ठाण्यातलं काही फारसं माहीती नाही मला >
पोस्ट जबरी पण महागडी आहे..+१११
ती अफवा मी सुद्धा ऐकली होती बहुतेक तुमच्या ब्लॉगवरच ,जाऊ द्या दुसरया कोणीतरी लिहल असेल ते …. 🙂
बर्याच दिवसांनी काय वाटेल ते वर आलो आणि पुढ्यात अस ताट वाढून ठेवलात म्हणून ….णी शे ढ ….!!!
हा हा हा.. अरे त्या अफवेनेच माझे वजन कमी होतंय बघ. काहीच करायची गरज नाही .
Dear Mahendra,
Me 2 divsapasun hya sitevarche likhan wachat aahe.khup chan watata.mala wachanachi khup aavad aahe.ha tumcha lekh wachlyanantar khup bhuk lagli mala ani jevayla gelyavar tiffin che jevan gelach nahi.ithe blog var likhan kase karta yete hybaddal jara guide karal ka?
Regards Seema
सीमा
दोन दिवस कामात बिझी होतो, म्हणून वेळ लागतोय उत्तर द्यायला.
http://www.blogwale.info/
या ब्लॉग वर ब्लॉगर्स वर ब्लॉग सुरु करण्याची बरीच माहीती दिलेली आहे. फक्त मराठी मधे टाइप करण्यासाठी एखादं फ्री सॉफ्ट वेअर शोधा नेट वर. पूर्वी बरहा फ्री होते, आता चार्जेबल झालेले आहे. पण कोणाकडे जुने व्हर्शन असेल तर ते तुम्ही वापरू शकता. आणखी काही माहिती लागल्यास अवश्य सांगा.
तृष्णा ऐकलेही नव्हते मी कधी… असो.. महेश लंच होम आपले पण फेवरेट… 🙂 खेकडा तंदूर खायला मी तिथेच जातो… 🙂 पण गोमंतकची चव वेगळीच… 🙂 आपण केलला डिनर आठवला… 🙂
अरे फिरंगी लोकांसाठी आहे ते. त्या पेक्षा माहीमचं फ्रेश कॅच मस्त आहे. ट्राय कर एकदा.. गोमंतक तर माझं फेवरेट!!
महेश मधे पण आता दर वाढले आहेत. स्वस्त आणि मस्त साठी ‘महेश’ जवळ असणारे लक्ष्मी बिल्डिंग मधिल ‘प्रदीप गोमांतक’ छान आहे.
छोटंसच आहे पण अजुनही चव तिकवुन आहे.
वेदांत
एक बाकी खरं की महेशची क्वॉलिटी अजूनही अप्रतीम आहे. त्यात त्यांनी अजिबात कॉम्प्रोमाइझ केलेले नाही.सध्या काही दिवसांसाठी नॉन व्हेज बंद केलेले आहे. नंतर पुन्हा सुरु केल्यावर मग बघू या..