बंबैय्या हिंदी..

महेंद्र कुलकर्णी,

बम्बईय्या हिंदी..

प्रत्येक भाषे मधे स्लॅंग वापरणे  का सुरु होते ?? मला वाटतं की दोन कारणं आहेत, एक म्हणजे  उच्चारायला कठीण असलेले शब्द हे व्यवस्थित  उच्चारता न आल्याने  , सोपे असलेले शब्द स्लॅंग म्हणून   ( अपभ्रंश म्हणता येणार नाही याला)  वापरले जातात.   किंवा दुसरे कारण म्हणजे, बरेचदा आपण काय बोलतोय हे इतरांना समजू नये  म्हणूनही असे काही शब्द बनवले जातात की जे फक्त एखाद्या गृप साठीच मर्यादित असतात.

आईवडीलांच्या समोर  फोन वर बोलायचं, तर त्यांना समजायला नको  की आपण काय बोलतोय ते, असं टीनएजर्सला वाटण साहजिक आहे,  म्हणून टिनेजर्सची स्वतःची डिक्शनरी असते-  काही खास  शब्द तयार केलेले असतात.  जरी तुम्हाला टिनेजर्सचे ते खास शब्द   माहीत असले ,तरीही तुम्ही तसे न दाखवणे श्रेयस्कर ठरते. 🙂

इंजिनिअरींग इंडस्ट्री मधे पण असेच काही खास शब्द जे फक्त त्या ट्रेडमधल्या लोकांनाच समजतील असे वापरले जातात.थोडक्यात काय, तर हे असे  शब्द   म्हणजे बरेचदा नेहेमीच्या कामातला विरंगुळा म्हणूनही वापरले जातात- जस्ट एक मजा म्हणून!   ही  अशी भाषा एक आवश्यकता आहे- तुम्हाला आवडो किंवा न आवडो तरीही!!

प्रत्येक शहराची आपली एक खास भाषा  असते. पुण्याची वेगळी, तर नागपूर कोल्हापूरची अजूनच वेगळी.  असं जरी असलं, तरी पण एक बाकी आहे, की  स्लॅंग म्हटल्यावर   आधी मुंबईची हिंदी आठवते. मुंबईला असलेल्या कॉस्मो कल्चर आणि  झोपडपट्टी मुळे ही भाषा एकदम वेगळीच झालेली आहे.

मुंबईच्या हिंदी ला मोठेपणा किंवा  ’समाज मान्यत” मिळवून दिली ते बॉलीवूडने ने. आय एस जोहर, केश्तो मुकर्जी, जॉनी वॉकर ह्यांनी ह्या मुंबईच्या खास भाषेचा वापर करून, राष्ट्रीय पातळीवर या भा्षे ची ओळख करून देऊन पाया रचला, आणि  अमिताभ बच्चन ( अमर अकबर ऍंथोनी ) संजय दत्त (मुन्नाभाई) हे त्याचा कळस झाले. मुंबईची   टपोरी भाषा ही सुरवातीला फक्त झोपडपट्टी ,  पर्यंतच मर्यादित होती.

काही गुंड मवाली लोकं ही भाषा वापरायचे,  मुख्य कारण , आपण काय बोलतोय ते इतरांना समजू नये हेच असावे. आता हेच बघा ना,  अगदी सगळ्यांसमोर उसको मै खर्चा पानी दूं क्या?? म्हणून कोणी विचारले तरी याचा अर्थ त्याला चांगला चोप देऊ का? हे  काही समान्य पणे लक्षात आले नसते.पण काही दिवसातच ही भाषा एकदम कॉमन झाली आणि मग कॉलेजेस, शाळांमधे सुरु झाली.  दक्षिण मुंबईच्या कॉलेज मधे अशी भाषा न वापरता हिंग्लिश वापरली जाते, पण सबर्ब मधे मात्र हमखास वापरली जाते ही भाषा.

प्रत्येक कॉलेजची खास भाषा असते. काही खास  शब्द, की जे फक्त   त्याच कॉलेज किंवा  एखाद्या गृप पुरते मर्यादित असतात.  पण  या खास शब्दांच्या  व्यतिरिक्त  पण बंबईय्या हिंदी बोलली जाते.  म्हणूनच तर   सगळ्यांनाच माहीत असलेल्या  या ’बंबईया हिंदीचा’ नखरा काही औरच असतो. अजूनही मुंबई मधे  खूप प्रेमाने आणि आत्मियतेने बोलली जाणारी ही भाषा आहे. स्वतःच्या मातृ भाषेपेक्षा इतकेच  या भाषेवर पण प्रेम करणारे लोकं  आहेत या मुंबईत  !

हिंदी सिनेमा जसे वास्तव, मुन्ना भाई वगैरे मधे रिऍलिटी दाखवण्याच्या नादात गुंडा कंपनी कडून वापरले जाणारे खास शब्द जसे घोडा म्हणजे बंदूक, ठोक डाला , खर्चा पानी दिया , खोका, पेटी वगैरे सगळे शब्द कसे अगदी नेहेमीच्या वापरातले असल्यासारखे झाले आहेत- कर्टसी बॉलीवुड.

एक साधं वाक्य, “अबे साले ढक्कन,  कट टू कट बात कर और , चल  कल्टी मार ले.  खाली फोकट्मे बक बक करके  अपुनके दिमागका  दही मत जमा. कट टू कट बात कर और चल फुट ले, कायको  टाइमकी खोटी कररैला है?? “विचित्र वाटत असेल, पण हे असे वाक्य नेहेमीच कानावर पडतात.

आता जेंव्हा मुंबईला रहायचं आहेच, तर ही भाषा   समजून घ्यायला काय हरकत आहे?? इथे खाली काही खास मुंबईकरांचे वापरातले शब्द टाकतोय.  ह्या शब्द संपदेमधे नवीन शब्द नेहेमीच ऍड होत असतात, जर काही नवीन शब्द  राहिलेले असतील, किंवा नवीन ऍड झाले असतील,  तर मुंबईकर  इथे कॉमेंट्स मधे लिहितीलच..

१)कौव्वा

बंदूक

२)अबे चिंधी
अतिशय चिपो  ( भिकारडी )वागणूक असलेला

३)हिल जायेगा यार
तुला आश्चर्य वाटेल

४)लोचा
प्रॉब्लेम आहे पण सहज दुरुस्त करता येईल असा

५)झोल
मोठा प्रॉब्लेम आहे – दुरुस्त करायला कठीण.

६)वांदा
काहीतरी उलट सुलट झालंय. अनपेक्षितपणे झालेला लोचा.

७)राडा
खूप मोठा प्रॉब्लेम, दुरुस्त न होऊ शकणारा.

८)कल्टी मारले भाई..
एखाद्या ठिकाणाहून निघून जातांना वापरला जाणारा शब्द

९)शेंडी लावणे
मूर्ख  बनवणे ( खरा मुंबईकरांचा शब्द आहे च्युतिया   बनवणे)

१०)ए शाण्या, चला हवा आने दे..
गेट आउट यु फुल…

११)अलिबागसे आयेला दिखताय क्या?
मी काय मूर्ख वाटतो का?

१२)गलत फॅमिली
याचा अर्थ पण सांगू??

१३)टल्ली, फुल टू होणे
दारू पिऊन नशेने टाईट होणे.

१४)सुमडी मे वटक ले
हळूच निघून जा इथून कोणाच्या नकळत

१५)पकाव मत भाय
जास्त बोअर करू नकोस.

१६)हटा सावन की घटा
आय डोन्ट केअर  सारखी अटीट्य़ूड.

१७)जगमग , ढिन्चॅक  ( जगमग कपडे, ढिनचॅक पिच्चर वगैरे)
एकदम विचित्र  किंवा एखादी खूप चांगली गोष्ट.

१८)झकास आयटम , रापचिक माल, छावी,
सुंदर मुलगी

१९)खोपचेमे लेके जा
कोपऱ्यात घे रे त्याला…

२०)खर्चापानी दूं क्या?
चांगला चोप देऊ क?

२१)अबे फट़्टू??
घाबरलास का?

२२)अबे, चल खलीवली
चल निघ इथून.. गेट लॉस्ट

२३)बहुत कीडा है तेरेमे?
काय रे उगीच वाकड्यात शिरतोस? पश्चात्ताप होईल ही हिंट आहे या एका शब्दात.

२४)दिमाग की नस मत खिंच
उगाच डोकं खराब करू नकोस

२५)वाट लग गई..
सगळे वांदे झाले आहेत माझे.

२६)अतरंगी
विअर्ड

२७)लालू
मुर्ख माणूस

२८)हूल दे रहा क्या?
घाबरवतोस मला?

२९)अबे लंगूर
मुर्खा

३०)खोपचेमे लूं क्या?
एक झापड मारू का?

३१)फट़्टू
घाबरट

३२)पिंगींग
टेक्स्ट मेसेज साठी शब्द

३३)फिज आऊट
चिल आउट

३४)लोड मत ले
जास्त टेन्शन घेऊ नकोस

३५)व्हयंगा
होईल.

३६)उसने सामनेसे फोन किया
त्याने आपणहून फोन केला

३७)सुट्टा

सिगरेट

३८) मामू

पोलीस

३९)थकेला

या व्यतिरिक्त कर रैला है, जा रैला है वगैरे शब्द तर आहेतच
जर काही शब्द राहिले असतील तर खाली लिहा कॉमेंट्स मधे.

तर मुंबईची ही हिंदी .. “लव्ह इट ऑर हेट ईट, बट यु कान्ट इग्नोर इट!”

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मराठी and tagged , , . Bookmark the permalink.

30 Responses to बंबैय्या हिंदी..

 1. राप्चीक – मस्त, झक्कास..
  फोटो मै भेज देना – मारून टाकणे..
  छावा – बॉयफ्रेंड
  छावी – गर्लफ्रेंड
  मांडवली बादशाह – तडजोड करून देणारा (भांडण मिटवणारा)
  कटिंग – चहा
  अलिबाग से आयां क्या – वेडा आहेस का?
  राग मत दे – धमकी देऊ नकोसं

  बस्स, सद्ध्या इतकेच आठवले…मस्त पोस्ट नेहमीप्रमाणे 🙂 🙂

 2. आज फुल्टू फॉर्म में हा काका…! सही है

 3. बोले तो राप्चिक आर्टिकल है..

  – पुणेरी भाई

 4. कोकणी स्टाइलमध्ये – पोस्ट एकदम आडस झाली आहे.

 5. Prabhanjan says:

  पाव्न पोस्ट येक्दम चाबुक झाल्या…

  -तात्यराव कोल्हापुरकर

 6. mau says:

  लई म्हणजी लई भारीच की वो…
  मस्त झाली आहे पोस्ट !!!!

 7. Nikhil says:

  Article is great! Slang is indeed a very important part of any language indeed.

  PS: (My apologies if I sound presumptuous) If you pursue this further, then it will be a sort of first step towards making a ‘Slang dictionary’ of Marathi. I have heard that a former Deccan college prof. had wanted to do it, but never went ahead with the project.

 8. sarika says:

  लई झ्याक…..!!

 9. Aparna says:

  सहीये काका..बोले तो एकदम रापचिक…
  “पोपट हो गया” एकदम फंडू वर्ड को आप तो भुलीच गये… 🙂

 10. Aparna says:

  आम्ही कालेजात असतान “अबे ढक्कन” पण जाम फेमस होत….या लेखावर मध्ये मध्ये अशा जाम प्रतिक्रिया देता येतील काका…..मजा आली वाचताना..इथे कुणी मुंबईच भेटल की सगळी उजळणी होते…

 11. महेश says:

  मस्त,झकास, मुंबईकराचे हिदी ,

 12. Smita says:

  mumbaichee slangwalee hindee kahee mahitee nahee farashee , puN ha lekh vachun mala ekdum mazya ajobanchya so-called hindi chee aThavaN zalee, tyanchya mate pratyek maraThee kriyapadala “enga” jodala” kee zala hindi!!:-)) mhaNAje agadee “oLakh Thevenga na gavako Jayenga tab?” :-);-) tool translation peksha bheeteedayak na??:-))
  list la contribute karta nahee ala, taree vachayala maja alee!

 13. क्या लिखेला है बॉस..बोले तो टेन्शन नय लेनेका ऐसेईच लीकते रेनेका…..

 14. bhaanasa says:

  एकदम फुल टू मुंबईची सैर करून आले बघ. सहीच बाप! 🙂

  ” बीएचएमबी आणि फटका बाप फटका ’ राहिलेच की रे. 😀

 15. bhaanasa says:

  आणि, ” आव टू गाले में फूल टू ’ = बकरा बनवण्यासाठी घे रे याला 🙂

  ‘ पोकळ बांबू के फटके दूं क्या? ‘ 😀 😀

 16. यतीन says:

  अगदी साधारण पोस्त आहे. काही विशेष वाटली नाही.

 17. ameet says:

  मी इन्गिनिरिंग कॉलेज मधु बाहेर पल्यावर टाटा स्टील मध्ये काम करत होतो त्यावेल्ची आमची एक कोड लैंग्वेज होती मुलींची (आइटम) कैटगरी करताना आम्ही टी भाषा वापरत होतो

  rusti pitted (चेहर्यावर मुरम असणारी)
  EN8 लवचिक
  SS304
  27 mm बुल्ल्ब्लोच्क जड़ी
  Bright Bar सर्वर्थानी योग्य
  तुम्ही पण इन्गिनिर आहात त्यामुले तुम्हाला माहित असेल की या सर्व स्टील च्या क़लिटी आहेत
  सहज आठवल म्हणून लिहिले

 18. s.k. says:

  lai bhaari post kaka 🙂

 19. या किंवा अशा तर्‍हेच्या बोलीभाषेला एक वेगळीच लय आणि गोडी असते.
  उच्चारतांना मस्त फ़िल येतो. 🙂

 20. अरुणा says:

  खूप प्रयत्न केला पण अजून वेगळा शब्द सुचलाच नाही. युमचा रीसर्च जबर्दस्त आहे. त्यात त मोबाईल्च्या स्लॆंग्ची भर घाला.मजा येईल.

 21. Rajeev says:

  आयटम नं. २३ म धील कीड्याचे नाव ” रेहमन” (कीडा) आहे ….
  रहाण्याचे ठीकाण सांगू ? का माहीत आहे ??????

  (“SLANG” हा प्रकार गुन्हेगार आणी ” जेल बर्ड्स” ह्यांनी तयार केला ( वापरला)
  वाचकांचे पाचक ( Readers Digest ) च्या ( circa 1965) एनसायक्लोपीडीयात हे प्रथम छापले गेले होते.

  स्वामी म्ह्णणतात की ही भाषा
  ” अरोगंसी ओफ़ मायनोरीटी” ह्या कारणे जन्माला आली आहे

 22. Rajeev says:

  अंटामटंची पंट्ण अंटेक भंटाषा अंटाहंटे !!!

 23. mazejag says:

  mi paan…..
  1) dimag ki batti jala=dok chalav jara
  2) dokyachi IZ karu nako=kalal aselch
  3) uncle/anti garden mein hein kya=manje bhar rastyat ramgamat chalelya stri kiwa purushayla sambodun
  4) sales walaycha sabda=Party Lag Gayi=deal fix
  5) Aaj baithe hein=oli party aahe aaj
  6) meter down=ajun tari nokri chalu aahe
  7) ek aflatun kawita gammat mhaun dete aahe=
  “Machi jal ki raani hein
  Sheila ki jawani hein
  Munni ki badnaami hein…”pudhach ekwal nahi mala…aaj kalchi karti ekdam bekkar zali aahet 🙂 …awara hyana

 24. bhushan says:

  Sahi he bappu

 25. लय भारी… 🙂

 26. raj jain says:

  झक्कास भिडू !!!

 27. Leena says:

  Khopadi ka screw dhilla /tight ………..
  bole to fandoo likhela hai………..

 28. SANDEEP says:

  ek nambar ahe …

 29. रोहन says:

  ह्यातले बरेचशे शब्द वापरताना कधी विचार नव्हता केला की हे इतके आहेत… शब्दकोशच जणू काही.. 🙂
  सही जा रे लाय भावा… 🙂 घेऊन टाक…. 🙂

 30. shreedhar telang says:

  Slang words are curse to any language because it is the only media to converse in between us. We must be gratefull to the makers of the particular language, we use. Because it is also connected to our relegious values and prayer to god. words are the only waves by which we spread our waves in this universe. if we spread it positively, things will return to us in same manner. otherwise slangfull waves will result in terms of illiteracy, unemployment, mental disease etc.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s