ऑन द टिकिंग टाइम बॉंब .. २

जपान मधल्या पॉवर प्लांट क्रायसेस बद्दल दररोज टीव्ही वर काही ना काही तरी दाखवत आहेत. एका अणू भट्टीचा झालेला स्फोट, दुसऱ्या अणू भट्टी चा होऊ घातलेला……………….! या मुळे होणारे नुकसान किती असेल याचा अंदाज पण करणे कठीण आहे. दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या बॉंम्ब पेक्षा पण जास्त रेडीयेशन पसरणार आहे असे काही एक्सपर्ट्स बीबीसी वर म्हणाले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी एक पोस्ट लिहले होते-  ते इथे आहे. . जितके जास्त पॉवर प्लांट्स ,  तितके जास्त  धोके.  पॉवर प्लांट मधली अणू भट्टी ही कॉंक्रीटमधे बंदिस्त असते,पण  जर त्यामधले प्रेशर काही कारणाने वाढू लागले तर त्यावर कंट्रोल करण्याची शंभर टक्के फेल प्रुफ व्यवस्था अजूनही  तयार झालेली नाही हे जपानच्या प्रॉब्लेमचे  सिद्ध केले आहे.

क्ल्स्टर बॉंम्ब जर युद्धाच्या वेळी वापरला गेला, तर अणू भट्टी ला पण छिद्र पाडू शकतो हे नुकतेच अमेरिकेने सांगितले आहे. या पुढे युद्ध सुरु झाले , की फक्त अणू भट्टी वर हल्ला केला की झाले. जास्त काही करायची गरज नाही अशी परिस्थिती होणार आहे.

या वर जास्त काही लिहित नाही, पण फक्त परिस्थितीचे गांभीर्य  लक्षात यावे म्हणून  या विषयावर लिहिलेल्या जुन्या  पोस्टची पुन्हा एकदा इथे लिंक देतोय. रशिया मधला चर्निबलचा प्रॉब्लेम  (१९७५)मला तरी फारसा आठवत नाही, कारण तेंव्हा मी फार लहान होतो, पण  तेंव्हा पण  झालेले नुकसान खूप जास्त होते.

सध्या जो प्रॉब्लेम झालेला आहे, तो फक्त एकाच पॉवर प्लॅंट चा आहे. पण असे अनेक भुकंप ग्रस्त भागात   पॉवर  प्लॅंट्स  आहेत,  त्यांचं काय झालं? हा पण एक प्रश्नच आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर कोंकणात आणि भारतामधे  होणारे अणू उर्जा विद्युत प्रकल्प होऊ द्यायचे की नाही? आणि जर होऊ द्यायचा असतील तर तो कुठे? हे ठरवतांना थोडा   विवेक पुर्ण  निर्णय  घ्यायला हवा. आजच्या परिस्थितीत अणू उर्जेला पर्याय दिसत नाही, पण हा पर्याय वापरताना जे घोके आहेत त्यांना सामोरा जायची व्य्वस्था प्ण करून ठेवायला ह्वी. . जरी धोका हा फक्त  ०.००१% असला तरी  तो धोका आहेच हे विसरून चालता येणार नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक, Uncategorized and tagged , , , . Bookmark the permalink.

42 Responses to ऑन द टिकिंग टाइम बॉंब .. २

 1. Smita says:

  mazya nt aaj exactly jaitapur cha prakalpach gholat hota, kiteehee m]kamee percentage asala taree severity faar jasta ahe ya problem chee. a very timely article indeed. locations of the plants have to be necessarily deliberated. may be India china border.
  attach dusara explosion zala tihe by the way…

  • Smita says:

   india china border lighter vein madhye/ vaitagun mhanalay, please ignore.

  • जपान मधे जेंव्हा न्युक्लिअर पॉवर प्लांट्स सुरु झाले , तेंव्हा तिथल्या जनतेने खूप विरोध केला होता, पण त्याने काही फारसा फरक पडणार नाही, असे म्हणून सरकारने पॉवर प्लांट्स सुरु केले. जपानची मेन लॅंड जवळपास ८ फुट सरकली आहे, त्यामुळे इतर पॉवर प्लांट्सचे किती नुकसान झाले असेल, त्याबद्दल अजूनही काही समजले नाही.
   सगळ्यात जास्त पॉवर ्वापरली जाते ती युरोप मधे. सगळ्यात जास्त पॉवर प्लांट्स आहेत युरोप मधे.. तिथे जर काही झालं, तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही.
   प्लॅंट हे लोकवस्तीपासुन दूर लावल्यासकोणी आक्षेप घेणार नाही, पण जर इतरत्र म्हणजे एखाद्या गावाजवळ लावले तर नक्कीच विरोध केला जाईल.
   मी स्वतः कैगा पॉवर प्लांटच्या इन्स्टॉलेशनच्या वेळेस तिथे जात होतो. ज्या पध्दतीने रिऍक्टर बांधले जाते, ते पाहिल्यावर सेफ्टीची खूप काळजी घेतली जाते हे लक्षात येतं. पण आता तयार झालेले कॉंक्रिट फोडून आत शिरल्यावर ब्लास्ट होणारे वॉरहेड्स असतांना काळजी वाढली आहे हे नक्की!
   फ्रेडरीक फोर्सथचं.. एक पुस्तक वाचलं होतं, नाव आठवत नाही आता.. !

 2. परिस्थिती खुपच बिकट आहे…. काय माहित काय होणार 😦

  • सुहास
   विद्युत वापरावर नियंत्रण हा एकच उपाय दिसतोय मला तरी. आणि तो आपल्या घरच्या नाही तर इतर ठोक स्वरूपात विज वापरणाऱ्यांसाठी>
   जसे स्टील रीरोलिंग मिल्स, मल्टीप्लेक्स, डेनाईट मॅचेस वगैरे ठिकाणी जर या लोकांना स्वय़ंनिर्मित( जनरेटर वापरून ) विज वापरायला लावली,तर ताबडतोब वापर कमी होईल. डिझल वर निर्मित झालेली विज ही जवळपास १३ रुपये युनिट पडते.

 3. santosh says:

  काका नमस्कार,
  सर्वांनी विरोध करायला हवा….. काका आमच्याकड लोड शेडींग चालू झालाय मला फार बरे वाटते कारण तीन तास वीज जाऊन ही १५०० रु बील येतंय अनादारातच बर आहे आपले
  !!!!

  • प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा, इतर इंधन वापरून प्लॅंट्स सुरु करणे जास्त योग्य ठरेल. दुसरी गोष्ट म्हणजे विजेचा गैरवापर टाळण्यासाठी काहीतरी उपाय केलेच पाहिजे.

 4. Nachiket says:

  सेन्सेटिव्ह विषयाला हात घातलात. हो. खरं आहे तुमचं एकदम. धोका समजा अगदी ०.००१ % असला तरी जेव्हा तो सत्यात येईल तेव्हाचे नुकसान १००% असू शकते हे लक्षात घेऊन आपल्या सरकारने हे रिस्क बेनिफिट अनालिसिस करायला हवे.

  • नचिकेत
   जगदलपूरपासून जवळपास ५० किमी अंतरावर , थेट जंगलात एक प्रोजेक्ट होता डीआरडीओ चा. तिथे नेहेमी जावे लागायचे. आता तो प्रोजेक्ट संपलाय, म्हणून त्याबद्दल इथे लिहीलंय . अशा दुर्गम जागी जर प्लॅंट्स उभारले तर किंवा वर स्मिताने म्हंटल्याप्रमाणे चायना बॉर्डर वगैरे ठिकाणी प्लॅंट्स उभे केले तर जास्त योग्य ठरेल.

 5. कठीण आहे सगळं. जपानसारखा देश, नाही म्हटलं तरी भारतापेक्षा प्रगत आणि प्रबळ पण नैसर्गिक आपत्तीसमोर कुणाचेच काही चालत नाही. आजवर अणुबॉम्बचा धोका केवळ परकीय हल्ल्यामुळेच होऊ शकतो अशी माझी धारणा होती पण सध्याची जपानमधील परिस्थिती पहाता होऊ घातलेला जैतापुर मधला प्रकल्पच नव्हे तर जगभरातील सुरू असलेले इतर प्रकल्प म्हणजे गवताच्या झोपडी ठेवलेले धगधगते निखारेच आहेत,कधी ठिणगी पडेल आणि झोपडी पेट घेईल काही सांगता येत नाही.

  • सिद्धार्थ
   पॉवर प्लॅंटला नाही, तर ज्या रॉ मटेरिअल वापरून विज तयार केली जाणार आहे, त्याला विरोध केला जायला हवा. ( खरं तर ते पण शक्य नाही, कारण आज सगळ्यात स्वस्त विज निर्मिती फक ऍटोमिक पॉवरनेच हॊऊ शकते) जर न्युक्लिअर पॉवर प्लॅंट सुरूच करायचा असेल तर तो कमीत कमी लोकवस्ती पासून दूर कुठेतरी सुरु केला तर जास्त योग्य ठरेल.

   “जगभरातील सुरू असलेले इतर प्रकल्प म्हणजे गवताच्या झोपडी ठेवलेले धगधगते निखारेच आहेत,कधी ठिणगी पडेल आणि झोपडी पेट घेईल काही सांगता येत नाही.” हीच गोष्ट मला पण गेले बरेच दिवस छळते आहे.

   या प्रगत देशातला न्युक्लिअर कचरा कुठे फेकला जातो ? ह्या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायला तयार नाही. 😦

 6. Hemant Pandey says:

  महेंद्र काका,
  “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” या म्हणी प्रमाणे जपान व रशिया चीर्नोबील यांच्या बाबतीत ज्या चुका झाल्या त्या आपल्या येथे होणारच नाहीत, या बाबत आपल्या देशातील, या पुढे होऊ घातलेल्या आण्विक कार्यक्रमामध्ये “प्रामाणिकपणे” (आदर्श नव्हे!)काम केले पाहिजे. हीच संधी आहे जपानला जाऊन दुर्दैवाने झालेल्या चुकांमध्ये डोकावून, त्यात सुधारणा करून जैतापूर प्रोजेक्ट्स केले तर जगभरात जैतापूर patern तयार होईल. असाविचार करून काम करायला पाहिजे असे मला मनोमन वाटते. जपानी time बॉम्ब हा अत्यंत महत्वाचा current – affair चा विषय आज घेतल्या बद्दल तुमचे आभार.

  • हेमंत
   ऍटोमिक प्लॅंटला विरोध कितीही इच्छा असली तरी केला जाऊच शकत नाही, फक्त प्लॅंट कुठे असावा? आणि सेफ्टी मेझर्स काय असावे? हा मुद्दा महत्वाचा वाटतो.
   आणि जरी .०००१ टक्के जरी धोका असला, तरी …….. जर तसं काही झालं तर त्याचे आफटर इफेक्ट्स काय असतील? जर थर्मल प्लांट असेल, आणि जर एका क्षणात जरी बॉयलर ब्लास्ट झाला तरी फारतर एक किमी एरीयावर परीणाम होईल. पण जर ऍटोमिक रिऍक्टर ब्लास्ट झाला तर?? हा मुद्दा महत्वाचा वाटतो.

 7. >>जरी धोका हा फक्त ०.००१% असला तरी तो धोका आहेच हे विसरून चालता येणार नाही

  अगदी सहमत आहे…सध्या जपानची परिस्थिती खुपच अवघड आहे

 8. Seema says:

  Dear Mahendra,
  Kiti dhakka denari batmi aahe na hi,friday la jevha sakali bhukampachi news aali tevha mala vishesh nahi watla pan nantar tychi bhayanakta kalali…kasa asta na eka moment madhye kiti lokanche life change zale.khar tar khup insecure watayla lagla.aapan pudhchi kiti dream pahileli astat na.jyachya nashibi he aale tychi pan astil,kasa watle asel na tyna tya veli,agdi pahilyanda keleli jagnyachi dhadpad..nantar nisrgapudhe padlele apure parytn ani nanatar asaytene aalela mrutue(Death)..kay vichar aala asel tya shevtchya moment la?konachi aathvan aali asel ka?adhuri swpna aali astil ka?

  Regards Seema

  • ती बातमी जेंव्हा समजली तेंव्हा मी पण आवाक झालो होतो. माझ्या मनात हा प्रश्न गेले बरेच दिवस येतोय , की असं काही झालं तर काय होईल? सगळ्यात लहान देश आहेत युरोप मधले, पण सगळ्यात जास्त परमाणु उर्जा तेच वापरतात. आधिच्या लेखातला नकाशा पहा लक्षात येईल. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे रशिया आणि चायना मधे तसेच आफ्रिकेत खूप कमी ऍटोमिक पॉवर जनरेटर्स आहेत.
   मग आपणच आपल्याकडे असावे आणि ते टाळता येणार नाहीत असे का म्हणतो?

 9. Gurunath says:

  रशिया चा चेर्नोबिल ऍक्सिडेंट बहुदा ८४-८५ मधला असावा दादा ,नीटसे आठवत नाही, दुसरे म्हणजे तुमची भिती एक विषेशज्ञ म्हणुन अतिशय रास्त आहे, पण तरीही, मला अदर्वाईज वाटते, भुकंप होऊन प्लॅंट ला धोका पोहोचायचा असेलच तर कोणीच काहीच करु शकणार नाही ही बाब मान्य, पण जोवर नॉन कन्व्हेन्शनल पॉवर चे सोर्स अजुन प्रगत होत नाहीत तोवर आपल्याला न्युक्लियर वरच रिलाय करावे लागेल हे ही तितकेच सत्य आहे, इतक्यातच सोलर सेल्स ची किंमत कमी (फ़ोटोव्होल्टाईक्स चे) दर कमी करणारे संशोधन जोरात चालु आहे, त्यात भारत ही अग्रणी आहे, त्याच्याशिवाय विंड पॉवर पण भारतात बरीच फ़िजिबल आहे, वेव्ह एनर्जी वर पण ईनोव्हेट केले पाहीजे, सगळे खरे पण जसे की यु.एन सांगते प्रगती चे एक मानक म्हणजे पर कॅपिटा पॉवर युसेज त्यात परत भारत आता कुठे धावण्याला सुरुवात करायच्या मार्गा वर म्हणजे we cannot afford to miss the train पण तुमचा लोकवस्ती चा मुद्दा अतिशय रास्त आहे, न्युक्लिअर प्लांट सोडाच साधी “युनियन कार्बाईड” काय करुन गेली लोकवस्तीत हे अधिक सांगणे नलगे

  • चेर्निबल चा ऍक्सिडेंट नक्की १९७६ चा आहे. मला आठवतंय. न्युक्लिअर पॉवर प्लॅंट्स ऐवजी जर नॅप्था बेस्ड प्लॅंट्स, किंवा कोळशांच्या खाणीजवळ थर्मल प्लांट सुरु करणे जास्त योग्य होईल असे वाटते.

   एका प्लांट मुळे जवळपासच्या लोकांचा विकास होईल असे म्हंटले जाते, पण तो खरंच विकास असतो का??

 10. thanthanpal says:

  काका जनतेचा विरोध विकासाला नाही तर विकासाच्या नावाखाली राजकारणी नेत्यांच्या भ्रष्ट्राचार करून जनतेच्या जीवाशी खेळण्याच्या आणि जबरदस्तीने विकासा च्या नावा खाली उजाड करण्याच्या कुप्रव्रतीला आहे..आपल्या नेत्यांचा स्वभाव जनतेला भोपाळ सारख्या प्रकरणात चांगलाच माहित झाला आहे. प्रकल्पाच्या आणि कामगारांच्या त्याच बरोबर जनतेच्या जीवाच्या सुरक्षिततेशी खेळण्यात आपले नेते आणि नौकारशाही तरबेज आहे. त्याच बरोबर अश्या नैसर्गिक आपत्तींचा उपयोग स्वार्था साठी. भ्रष्ट्राचारा साठी कसा करावा ह्या यांच्या प्रवृतीची जाणीव लातूरच्या भुकंपा नंतर जनतेला चांगलीच माहित झाली आहे. कोकणचा कालीफोर्निया करण्याचे गाजर कोकणी जनतेला गेल्या २५ वर्षात दाखवत या नेत्यांनी आता कोकणचे वाळवंट करण्याचा चंगच बांधला. . आणि आपण उद्योग जगतात नेहमी वावरत असतात. तेंव्हा कामगारांच्या तसेच उत्पादन प्रक्रिया सुरक्षिततेची कैसी ऐसी की तैसी केली जाते हे आपणास चांगलेच माहित आहे.

  • मला पण तेच वाटतं . विकास सगळ्यांनाच हवा आहे. आज जतपुर प्रकल्पाला कोणी विरोध केला तर तो म्हणजे विकासाला केलेला विरोध आहे असे चित्र उभे केले जात आहे.

   त्या भागातली जमीन विकत घेतली असेल कोंकणच्या भाई लोकांनी- माफ करा नेते म्हणायचं होतं मला. आता तिकडे हा प्लांट सुरु झाला की येती काही वर्ष भरपूर रोजगार मिळॆल असे गाजर पण दाखवलं जातंय. खरा फायदा कोणाचा होणार ते सगळ्यांनाच माहीती आहे..

   • Smita says:

    KonkaNatalee jameen tithalya bhai lokanee tar ghetalee aselach, puN barech shetty lok tyat ahet he maheet ahe ka? te jenva jameen gheun resort vagaire suru kartat tenva ekan ek maNus tyanchya ithun anatat, local janatela nokarya det naheet, ha kasala vikas? inclusive nasel tar? he jara beside the main point ahe, puN rahavala nahee.

    • एका वेगळ्या फोरमवर झालेल्या डीस्कशन मधले माझे काही मुद्दे इथे देतोय.
     ९६८ हेक्टर्स ची जमीन सरकारला हवी आहे. आणि त्यामधे कोणीही रहात नाही असे म्हणणे आहे, पण ९६८ हेक्टर म्हणजे फक्त ९.६८ स्क्वेअर किमी हे किती लोकांना माहीती आहे? केवळ मोठा आकडा फेकला की लोकं दचकतात, म्हणून हे असे आकडे फेकायची सवय आहे नेत्यांना.

     एखाद्या पॉवर प्लांट लावल्याने किरणोत्सर्ग होतो असे कोणीच म्हणत नाही. किरणॊत्सर्ग हा जेंव्हा एखादी दुर्घटना होते तेंव्हाच होतो. नेमकं< त्या बद्दलच न बोलता, सगळ्या सेफ्टी बद्दल, किंवा पॉवरप्लांट धोका नाही हे सांगण्याकडेच सगळ्यांचा कल असतो.

     दहा स्क्वेअर किमी च्या भागातला जतपूर प्रकल्प, पण जर काही कारणाने ऍक्सिडेंट झाला तर सगळं कोंकण रिकाम करावं लागेल… कमीत कमी ५० स्क्वेअर किमी चा भाग तरी नक्कीच..

     भोपाळला पण गावात असलेल्या युनियन कार्बाईड च्या कारखान्याकडून काही धोका नव्हताच,सगळ्या सेफ्टी मेझर्स पण होत्याच, तरी पण जेंव्हा गॅस लिक झाला, तेंव्हा मात्र सगळं शहरच शिकार झालं!

     प्रकल्पाच्या बाजूने आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावणारे एकमेव काँग्रेसनेते नारायण राणे आहेत (source मटा)
     😀 यावर आमच्या -नो कॉमेंट्स.. इतकी प्रतिष्ठा पणाला लावायचे कारण सगळ्यांनाच माहीत आहे.

     संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला एकरी १० लाख रु. असा विक्रमी दर देण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्तांतील कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी. नसेलतर पाच लाख रु. परित्यक्ता आणि घरदार नसलेल्यांना ५०० रु.चे पेन्शन. आरोग्यकेंद, शाळा, आयटीआय, विद्यार्थ्यांचा दहावी आणि बारावीच्या शिक्षणाचा खर्च, महिलांना स्वयंरोजगारासाठी साह्य, मच्छिमारांच्या पुनर्वसनासाठी जेटी, शीतगृह, मच्छिमारी नौका, जाळी, मुसा काझी जेटीतील गाळ काढण्यासाठी आथिर्क मदत, शिवाय, विजेच्या विक्रीतून होणाऱ्या फायद्यातील दोन टक्के रक्कम त्या परिसरातील विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. असे पुनर्वसनाचे अभूतपूर्व पॅकेज आहे.

     वरचा पॅरा वाचल्यावर मला म्हणायचंय की:-हे सगळं आहे सरकारी तिजोरीतून. एकदा अशी अव्वाच्या सव्वा किंमत सरकारने नक्की केली की मग इतर गैरसरकारी जमीनीची किम्मत ( कोणाच्या मालकीची आहे ती ?? ) पण त्याच प्रमाणात वाढेल.. ’
     जर असे झाले तर, सरकारी पैशाचा स्वतःसाठी करून घेतलेला उपयोगाचे मस्त उदाहरण म्हणून लक्षात राहील हे…

     तुटवडा का आलाय?? हे जर पाहिले तर लक्षात येईल की बऱ्याच मोठ्या व्यवस्थापनांना विज अतिशय नाममात्र दरात पुरवल्या जाते. आजही छ्त्तीस गढ मधल्या सगळ्या स्टील रीरोलिंग मिल्सला फक्त २ ते २-२० पैसे दराने विज पुरवठा केला जातो. इतर ठिकाणि मात्र

     स्वतःचे ट्रान्स्फार्मर आणि विजेच्या पोलचा खर्च केला की कधीही खंडीत न होणारा एच टी विज पुरवठा पण दिला जातो. पैसे वाल्यांसाठी विजेची कमतरता नाही भारतामधे.

     मोठ मोठे माल्स, मल्टीप्लेक्सेस, या सगळ्यांना पण खूप जास्त प्रमाणात विजपुरवठा केला जातो. शहरांना विज द्यायला म्हणून गावातला विज पुरवठा कमी केला जातो . १२-१२ तास विज खंडीत केली जाते.

     अंबानीच्याच घराला कितीतरी लाख युनिटचे विज दिले जाते. हीच परिस्थिती इतर सिलेब्रिटीज च्या बाबतीत पण होतच असते.

     हायडल प्रोजेक्ट्स सुरु केले जाऊ शकतात. सध्या ८००० मेगा वॉट चा तुटवडा भरून काढायला , चंद्रपूर , नागपूर, कोरबा या ठिकाणी जरी ५०० ते १००० मेगावॉट्चे थर्मल पॉवर प्लांट्स सुरु केले ( कॊळसा, पाणी आहेच तिकडे) तरीही बराच भार कमी होईल.
     चिनाब नदीवर हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट सुरु झालाय. त्याच धर्तीवर इतरही नद्यांवर हायडल प्रोजेक्ट्स सुरु केले जाऊ शकतात.
     तुटवडा कमी करायचा असेल तर फक्त या धेंडांना स्वतःचे जनरेटर्स लावायला सांगितले तरी पुरेसे आहे. प्रती घर फक्त ३ किलोवॉटचे कनेक्शन द्यावे ,त्यापेक्षा जास्त नाही.

     असलेली ऍम्युनिटी ही सगळ्या समाजाला समप्रमाणात मिळायला हवी< फक्त पैसेवाल्यांनाच नाही ( हे कदाचित कम्युनिस्ट विचार वाटतील पण…. ) असो.

     आणि ऍटोमिक पॉवर प्लांट जर सुरु करायचा असेल तर त्याला पण हरकत नाही, फक्त कुठे ???? हा प्रश्न कोणा राजकीय नेत्याच्या दबावाखाली निर्णय घेतला जाऊ नये. आणि शक्यतो आपल्या राहत्या लोकवस्तीपासून दूर असावा इतकेच!!
     हा दहा स्क्वेअर किमीचा पटटा अगदी चारही बाजूंनी लोकवस्तिने घेरला आहे.

     थोडं तुटक वाटेल पण एका दुसऱ्या फोरमवरचं हे डिस्कशन आहे, इथे फक्त माझे मुद्दे लिहितोय.

     • Smita says:

      ekhada shahar relocate aNee reconstruct karayachee kimmat kay asel? cost of relocating and replacing a major city is way beyond what the insurance can cover. for example, Vienna convention currently limits liability to not less than 360 million euro. not adequate. right?
      comprehensive insurance for a nuclear plant with unlimited liability against meltdown will be prohibitive. Essentially asa cover dyayacha tar nuclear power hee economically viable option rahaNar nahee. tyamuLe he sagaLa afat achat aNee ashakya vaTatay, attaparyant vichar hee kela navata, puN japan forced this thinking, and your article too. thanks.

 11. अरुणा says:

  the rediation threat is always going to be there.
  with the volatile earth, why take the risk?
  we should utilize other natural resourses for generating electricity.
  it will be better for once at least, the powers that may be stop thinking about their own and of their party’s benifits and start thinking about their own country, motherland and people!

  • इतरही बरेच प्रकार आहेत, विंड एनर्जी, टायडल एनर्जी, वगैरे वगैरे.. आणि जर ऍटोमिक एनर्जी वापरायचीच असेल तर मग एखादं जवळपास असणारं बेट वगैरे पण पहायला हरकत नाही असे वाटते.मुंबई जवळ पण बरीच बेटं आहेत.
   याच बरोबर रशिया आणि चायनाने या प्रकारचे प्लांट्स जास्त का उभे केले नाहीत हे पण समजून घ्यायला हवे.

 12. mazejag says:

  pan kaka…mala ek sangaycha aahe…lahanani bhugulat shikwale hote ki japan, china sarkhya deshant bhukampvirodhi ghar, imarati bandhli jatat…mag nuclear reators kashi ashi bandli…us nantarch pragat rashtra aahe he…jithe kaisen, kiwa mag microsoft la apla akkha progrmme change karawa lagto evdhi jar khshamata aahe ithe tar….ashi kahi vippaati yevu shakel hyach disaster mangementne tharwal navhat ka…ani ek…Govyala samudrachi ek vishitat halchal ji mi anuhavli hoti na…ti hich……aaj hi jaal teva naaki paha….mase eka vishista layit pohat astat ashya veli……thanks to National Geographic

  • डिसॅस्टर मॅनेजमेंट होतं म्हणून तर फारशी वाईट परिस्थिती नाही. जर हे भारतात झालं असतं, ( तारापूर ला) तर मुंबईचे काय झाले असते ही फक्त कल्पनाच करून पहा. यावर नुकताच एका अमेरिकन पेपरमधला लेख वाचला होता त्यांचंही म्हणणं होतं की रेग्युलर ड्रिल्स वगैरे केल्यानेच भुकंपाने होणारे नुकसान कमी झाले आहे जपानचे. जे नुकसान झालंय, ते सुनामी मुळे.

   इथे पण तो प्लांट बंद पडला नाही, तर बंद केला गेला.पण नंतर फ्युजन चि प्रोसेस पुर्ण बंद झाल्यावर पण उष्णता निर्मिती सुरु असते, आणि त्यासाठी कुलींग सिस्टीम सुरु रहायला हवी, ती बंद पडल्याने हा प्रॉब्लेम झालाय.

   आज पर्यंत जितके काही फेल्युअर्स , किंवा ऍक्सिडेंट्स ( २० च्या वर) झालेले आहेत ते सगळे फक्त कुलींग सिस्टीम फेल्युअर मुळेच झालेले आहेत !

   • mazejag says:

    Hyawar barach googling kelay gelya athwadabharat…aaple media wale kharach binbok aahet hyawar dumat nahich…je dakhawaych nahi tech dakhawatat kahi 2004 madhli footages pan….

 13. mazejag says:

  corrections:mala bhugolat mhanayche aahe….

 14. Seema V Ghate says:

  Sarkar kharach ya prakalpala virodh ka hotoy ya goshticha vichar karel ka? Prashnacha sangopang vichar karne aapalya deshat tari durmil aahe. Dev sattadharyana sadbuddhi devo!!

  • सीमा
   प्रकल्पाला विरोधम्हणजे पॉवर प्लांटला विरॊध नाही.
   पॉवर प्लांट एका ठरावीक गावाशेजारी ( ज्या ठिकाणी बहूतेक नेत्यांनी आधीपासूनच जमीन विकत घेऊन ठेवली आहे – एकदा प्रोजेक्ट सुरु झाला की मग, जमिनिचे पुढे वाढणारे भाव लक्षात घेऊन.) तिथे सुरु करण्याला विरोध आहे लोकांचा.

 15. मनोहर says:

  जपानमध्ये प्रत्यक्ष रेडिएशन झालेले नाही आणि ते होईल असेही वाटत नाही. तेथील अणुवीजकेंद्रात झालेला स्फोट अणुवीजकेंद्राच्या परिसरात घडला आणि त्याचे कारण मानवी चूक हे असणे अधिक शक्य वाटते. मद्रासच्या किनारपट्टीवर त्सुनामी आदळली पण त्यामुळे कल्पक्कम वीजकेंद्राची काही हानी झाली नव्हती.

  • मनोहर
   रेडीएशन सुरु झाले आहेच. आणि त्याभागातल्या सगळ्या लोकांना पण हलवले गेले आहे. ३० किमी व्यासाचा परीसर मोकळा केलाय ( सोअर्स BBC)
   मद्रासला जी सुनामीची लाट पोहोचली ती इतकी सौ़म्य होती ,की त्यामुळे काहीच नुकसान झालं नाही फारसं. जर थोडी जास्त वेगात लाट असती तर काय झालं असतं ते सांगता येत नाही.

   • Smita says:

    For all hard facts:
    http://mitnse.com/

    • स्मिता
     धन्यवाद. खूप चांगली लिंक आहे. ह्या सगळ्या हार्ड फॅक्ट्स डायजेस्ट करणं कठीण आहे सरकारला.
     दिवसभर साईटला असल्याने आता लॉग इन केले आणि कॉमेंट पाहीली .

 16. Dayanand says:

  Very Nice Blog

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s