चोर

परवा रात्री म्हणजे नागपूर हून परत आलो. नेहेमी प्रमाणेच रात्री विमान जवळपास दीड तास मुंबईवर घिरट्या घालून खाली उतरले. आधीच उशिरा असलेली फ्लाईट  रात्री चक्क १२.३०  वाजता मुंबईला उतरली.   रिक्षा घेऊन घरी निघालो तर घर  साधारण पणे अर्धा किमी  असताना   रिक्षा बंद पडली. थोडा वेळ वाट पाहिली की रिक्षा सुरु होईल म्हणून, पण  ती सुरु होत नाही हे लक्षात आल्यावर , रिक्षावाल्याला तिथेच पैसे देऊन आपली लॅपटॉपची बॅग पाठकुळीला अडकवून आणि कपड्यांची हातात धरून घराच्या दिशेने पायीच चालू लागलो.

साधारण पाच एक मिनिटानी घरी पोहोचेल इतक्या अंतरावर पोहोचल्यावर २५ एक वर्षाचा एक तरुण पुढे आला , आणि हात समोर करून  “दोन रुपये देना साब” असं   म्हणाला.  त्याच्याकडे लक्ष गेलं, आणि लक्षात आलं, की जर या धिप्पाड माणसाने अगदी चार इंची चाकू जरी समोर धरला, तरी पण मी जवळ जे काही असेल ते त्याला काढून दिलं असतं. शेवटी जीवापेक्षा पैसा महत्वाचा नसतोच कधी.जवळचे पाच रुपयाचे नाणे काढून दिले, आणि  ते घेऊन  तो समोरून निघून गेला.

मी पण घरी पोहोचलो, तो भिकारी निघुन गेला,  पण मला मात्र त्या भिकाऱ्याला  “कुछ लेते क्युं नही?” च्या तालावर विचारावसं वाटत होतं की “चोरी क्युं नहीं करते भाई? भिक क्यों मांगते हो?” कदाचित माझे हे विचार तुम्हाला मूर्खपणाचे वाटत असतील , पण प्रामाणिकपणे सांगतो, त्या क्षणी आणि तेंव्हापासून मला तसंच  वाटतंय. एखाद्या धडधाकट भिकाऱ्याला पाहिले की “कुछ  काम करो, भिक क्युं   मांगते हो?   म्हणणारे बरेच लोकं असतात , पण मला मात्र  इतकी धिप्पाड शरीरयष्टी असतांना पण मला दोन रुपये मागायचा करंटेपणा करणाऱ्या त्या भिकाऱ्याची मला किव आली. त्या भिकाऱ्याने मला भिक  मागण्यापेक्षा   मला धमकी दिली असती, तर त्याला माझ्या दोन अंगठ्या अंदाजे ६० हजार रुपये आणि चेन ३० हजार रुपये अशी लाखभर रुपयांची मालमत्ता मिळाली असती.   असो. तेंव्हापासून माझ्या मनात हा प्रश्न सारखा उसळ्या मारतोय. की का बरं???????????????

तर चोर! चोर कोण असतो हो?? मला तर वाटतं की,  प्रत्येकच माणुस हा  चोर असतो. आता हे वाक्य वाचल्यावर  प्रत्येकालाच आपण कधीतरी केलेली चोरी आठवेल. कधीतरी घरचे आईच्या पर्समधले पैसे (चोरून) घेऊन न सांगता खाल्लेली भेळ पुरी  , किंवा लहानपणी मारुतीच्या देवळात शनिवारी समोर कोणीतरी नारळ फोडून  प्रसाद म्हणून ठेवला की  इकडे तिकडे पहात कोणी पहात नाही याची खात्री करून उचलून तोंडात टाकलेला  तो नारळाचा तुकडा, ही  लहानपणीची  आठवण  किंवा अशा असंख्य आठवणी येतील तुमच्या मनात  पण ! आईने भाजी आणायला सांगितली की घरी आल्यावर पाच रुपये पाव आणलेली वांगी घरी येईपर्यंत आठ रुपये करून वरचे तीन रुपये कंची मारणे  म्हणजे चोरी का??  ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी ना कधी तरी केलेल्या असतातच ,अर्थात काही अपवादात्मक लोकं असतील न करणारे, पण मी मात्र खरंच केल्या आहेत अशा गोष्टी.

शाळेत असतांना वर्गात एक मुलगा होता त्याचे वडील लायब्ररीयन होते, आमच्या लहानपणी कव्हर लावायला वर्तमान पत्र वापरले जायचे . ब्राऊन पेपर विकत आणून लावणे वगैरे नव्हते. तर त्या मित्राचे वडील लायब्ररीयन असल्याने, त्याच्या वह्यांना मस्तपैकी गुळगुळीत इम्पोर्टेड मासिकाच्या कागदांची कव्हर्स असायची, आणि त्यामुळे त्या मित्राबद्दल कायम एक असूया वाटायची. एका मित्राचे वडील तहसील कार्यालयात क्लर्क होते , त्याची रफ वही म्हणजे एकीकडून लिहिलेली तहसील ऑफिसची कागदं- आणि तसे कागद आपल्याकडे नाहीत म्हणून वाटणारी असूया-  किंवा काय असेल तो भाव की ज्याला काय म्हणावं हे मला समजत नाही! एका मित्राच्या घरी  स्टेपलर, आणि परफोरेटर ( भोक यंत्र, किंवा पंचींग मशीन )  पण त्याच्या वडलांनी ऑफिसमधून घरी आणून ठेवलेलं होतं. पेन्सिली, पेन वगैरे ऑफिसमधून आणलंय माझ्या वडलांनी म्हणून  अभिमानाने सांगणारी लहानपणीची मित्रमंडळी अजूनही लक्षात आहे- आणि आपले बाबा असं का करत नाहीत याची खंत पण होतीच मनात. इथे जे शाळेतलं लिहितोय, तो काळ म्हणजे साधारण १९६६ – १९७७ पर्यंतचा आहे हे लक्षात घ्या , म्हणजे जे काही लिहीलंय ते आऊट ऑफ  प्लेस वाटणार नाही.

मला लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती, ती अजूनही आहेच. खूप काही पुस्तकं वाचली आहेत मी.  पण हल्ली डॊळ्य़ांना दुर्बिणीच्या काचांप्रमाणे +३ चा चष्मा लागल्यापासून मात्र वाचनाचा जाम कंटाळा येतो. लहानपणी जे शब्द वाचले ते सगळे मनात नाचत असतात. मला वाटतं मी इथे जे काही लिहीतो, ते माझं लिखाण नाहीच. किंबहुना    शब्द पण माझे नाहीत, वाक्य पण नाहीत, काहीच माझे नाही. मी फक्त जे शब्द लहानपणापासून शिकलो, वाचले आहेत तेच पुन्हा मागे पुढे करून  त्यांची वाक्य बनवून माझे मनातले विचार मांडण्यासाठी इथे लिहीत आसतो .

जन्म झाला तेंव्हा मला फक्त एक भाषा येत होती- ती म्हणजे रडण्याची. आईने शिकवलेले शब्द- आई, बाबा, काका ,मामा शिकता शिकता ते शब्द मी माझा मालकी हक्क नसतांना “माझे” समजू लागलो.नंतर शाळे मध्ये गेल्यावर शिकलेले नवीन शब्द, नवीन भाषा, चौथीत असतांना मित्रां कडुन शिकलेले ते अश्लिल शब्द स्त्रीपुरूषांच्या  गुप्तांगाची  नावं, आणि नंतर ती नावं आपण का शिकलो म्हणून वाटणारा ओशाळलेला पणा हे पण मला आज आठवतंय. पहिल्यांदा ते शब्द जेंव्हा समजले, तेंव्हा घरी आल्यावर खूप गिल्टी वाटत होतं . आपण काहीतरी वाईट शिकलोय याची जाणीव होती, पण त्याच सोबत ’ते शब्द’ माझे नाहीत, म्हणून वाटणारा एक प्रकारचा मानसिक संतोष पण होता.   अशा अनंत गोष्टी आहेत ज्या ’माझ्या’ नाहीत पण ’मी’ वापरतोय.   म्हणून म्हणतोय, इथे जे काही लिहीलंय ते शब्द जरी मी लिहित असलो तरी ते माझे नाहीत – पण मी वापरतोय तर मग  त्याचा अर्थ मी शब्द चोरलेले आहेत असा अर्थ होतो  – नाही का?

मला एक सांगावसं वाटतं, की सगळे शब्द जे आहेत ते आपले नाहीत, शब्द हे शब्द आहेत , अगदी कोणाच्याही मालकीचे नसलेले, आपण फक्त इथे त्यांची फक्त रचनाबदलतो.

तर त्या रात्री भेटलेल्या भिकाऱ्याने माझ्याकडून पैसे का चोरले नाहीत, किंवा मला धमकावून माझ्याजवळ असलेले  पाकीट, सोनं वगैरे का हिसकावून घेतलं नाही? हा प्रश्न मला अजूनही छळतोय.

चोरी म्हणजे नेमकं काय? जे आपलं नाही, ते त्या गोष्टीच्या मालकाला न विचारता आपण वापरणं म्हणजे  चोरी ही व्याख्या जर बरोबर असेल ,तर आपण सगळेच चोर आहोत असा होत नाही का? मग हे शब्द पण तर आपल्या मालकीचे नाहीत , तरी पण आपण वापरतोच ना??

असो.. संपवतो इथेच. माझ्या मनातलं द्वंद्व इथे लिहून तुमच्या मनात विचार श्रुंखला सुरु झाली असेलच.. तेंव्हा फक्त एकदा या होळीच्या दिवशी -ब्लॉग वरचे साहित्य चोरणाऱ्यांच्या बैलाला होSSSSSSSSSSSSSS   म्हणून एक बेंबीच्या देठापासून बोंब मारून , आणि होळीच्या शुभेच्छा देऊन  हा  लेख संपवतो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

47 Responses to चोर

 1. “त्या रात्री भेटलेल्या भिकाऱ्याने माझ्याकडून पैसे का चोरले नाहीत, किंवा मला धमकावून माझ्याजवळ असलेले पाकीट, सोनं वगैरे का हिसकावून घेतलं नाही? हा प्रश्न मला अजूनही छळतोय.”

  इतकी मेहनत देखील करायची लोकांची मानसिकता राहिलेली नाही, सगळं आयतं हवं असतं.

  “तो काळ म्हणजे साधारण १९६६ – १९७७ पर्यंतचा आहे हे लक्षात घ्या , म्हणजे जे काही लिहीलंय ते आऊट ऑफ प्लेस वाटणार नाही.”

  माझ्या वडीलांना, एकदा त्यांच्या कार्यालयात, त्यांच्या पदोन्नतीनंतर, दिवाळीनिमित्ते, एका ग्राहकाकडून, मिठाईचे दोन पुडे मिळाले होते. दोन वेगळ्या रंगाचे मावा पेढे त्यात होते. त्यांनी काय करावं ? घरातल्यांकरता माणशी एक असे दोन्ही पु्ड्यातले पेढे वगळून बाकी सगळे तिथल्या तिथे वाटून टाकले. विकत आणून खायची मानसिकता नव्हती आणि फुकट मिळालेले घ्यायचीही. आईसकट आम्ही सगळे त्यांच्यावर खूप चिडलो होतो त्यावेळी. आजचे घोटाळे पहाता मात्र… असे दिवस राहिले नसल्याची खंत वाटते. आणि त्या वेळी वडील जे काही वागले असतील त्याचा आता अभिमान वाटतो.

  • श्रेया
   खरं आहे, त्यावेळच्या आपल्या आईवडीलांची आहे त्यात समाधान मानुन रहाण्याची वृत्ती आपल्यामधे का आली नाही याचं बरेचदा वैषम्य वाटते. लहानसे प्रसंग, पण त्यातून आपल्यावर केले गेलेले संस्कार खरंच बरेचदा आपण का विसरलो ? याचं वाईट वाटतं.. धन्यवाद.

 2. खूपच छान झालाय लेख.. अगदी विचार करायला लावणारा !!

  • हेरंब
   आभार.. 🙂
   गेले दोन दिवस हा विषय सारखा डोक्यात घोळतोय. म्हणून काल शेवटी लिहून टाकलं यावर!

 3. s.k. says:

  A very different topic you have chosen kaka to write about… chor and chori…
  te chorache pic chaan vatle.. cartoon type chor 🙂

 4. vikram says:

  ब्लॉग वरचे साहित्य चोरणाऱ्यांच्या बैलाला होSSSSSSSSSSSSSS

  😉 😛 🙂

 5. आनंद पत्रे says:

  खरंच… थोड्यावेळाकरीता तसं मला वाटलंही..
  पण चोरीत श्रम आणि रिस्क भरपुर आहे.. त्यामानाने भिक मागण्यात केवळ निर्लज्जपणा आणला की झालं.. खुप मोठा व्यवसाय आहे तो…

  • आनंद
   भिकाऱ्याला नाही म्हणून आपण सरळ धुडकावून लावतो, पण चोराला नाही लाऊ शकत. चोरी मधे श्रम आणि रिस्क तर आहेच. पण जास्त रिस्क , जास्त फायदा 🙂

 6. प्रश्न विचार करायला लावणारा नक्कीच आहे. पण चोरी असो वा कुठलेही काम, सगळ्यासाठी काहीतरी कलागुण अंगी असावे लागतात. हल्ली सगळ्यांना शॉर्टकट हवा. मला बंगलोरला बरेचदा काही कुटुंब (नवरा, बायको, १-२ मुले) आम्ही हरवलो आहोत आणि घरी जायला पैसे नाहीत असे सांगताना भेटली. आधी खरंच वाटायचे पण अशी लोकं नेहमी नेहमी भेटतात तेंव्हा मग सटकली. ह्या अश्या लोकांमुळे एखाद्या वेळी खरच कुणाला मदतीची गरज असेल तर त्याला मदत मिळणार नाही.

  >> ब्लॉग वरचे साहित्य चोरणाऱ्यांच्या बैलाला होSSSSSSSSSSSSSS 😉

  होळीच्या शुभेच्छा!!!

  • सिद्धार्थ,
   वारीला जायला पैसे हवेत म्हणून पैसे मागणारा एक नविन ग्रुप मालाडला फिरतोय हल्ली. गेले दोन् दिवसापासून दिसताहेत.
   पण असे लोकं नेहेमीच दिसायला लागले, की ज्याला खरंच गरज आहे त्याच्याकडे पण दुर्लक्ष केलं जाऊ शकतं!

 7. s.k. says:

  @VIKRAM:

  ब्लॉग वरचे साहित्य चोरणाऱ्यांच्या बैलाला होSSSSSSSSSSSSSS +1
  🙂 🙂

  nice sentence!!!

 8. हा खरंच..
  एकदम विचार करायला लावणारा प्रश्न….

  • सुहास
   आभार.. तुझ्याशी काल बोलतांना पासूनच या विषयावर लिहिण्याचे मनात घोळत होते!

 9. mau says:

  mastttttt…

 10. Tanvi says:

  महेंद्रजी विचारात टाकलत… पण वरच्या कमेंट्समधे मंडळी म्हणताहेत तसे, चोरी करायलाही श्रम लागतात त्याउलट भिक मागायला फक्त कोडगेपणा अंगी आला की जमले…..

  बाकि ते कोणाकडे स्टॅपलर असणे, कोणाकडे पंचिंग मशीन चे वाक्य पटले…. आमच्या बाबांनी मला स्टेशनरीच्या दुकानातून ते दोन्ही आणून दिले होते, ऑफिसमधून काहिही कधिही आणायचे नाही हे त्यांचे वाक्यं कायम 🙂

  >>>ब्लॉग वरचे साहित्य चोरणाऱ्यांच्या बैलाला होSSSSSSSSSSSSSS 🙂

  होळीच्या शुभेच्छा 🙂

  • तन्वी
   मनातले विचार जसेच्या तसे कागदावर उतरवले आहेत. कुठलीही भेसळ न करता. पण मला वाटतं की त्या भिकाऱ्याने अपॉर्च्युनिटी मिस केली! संधी मिळूनही उपयोग न करून घेणारा तो…..

 11. स्नेहल says:

  काका खरच सांगा पुढल्यावेळी जर अपरात्री आलात तर मला फोन करा मी नक्की तुम्हाला लुटायला येईल [:P]
  खरच विचार करण्या सारखा विचार आहे… पण मला गंमत वाटतेय अजूनही तो २५ वर्ष्याचा मुलगा एका दिवसात ( रात्रीत ) किती लॉसला गेला
  असो जोक सोडला तर मी हि विचार केला तर अजूनही मैत्रिणीचे चोकलेट मी चोरातेच [:)]

  • करेन तुला फोन ! अग पण रात्री अपरात्री मला लुटायला येतांना जर तुलाच कोणी अडवलं तर?? 🙂

 12. गौरी says:

  निष्क्रीय राहण्यापेक्षा चोरी करा, पण काहीतरी करा … असं काहीसं विवेकानंदांचं वाक्य आहे ते आठवलं 🙂

 13. Smita says:

  aaj ekdam blog choranchya bailala ho??:-))
  choreechee definition thodee enhance karata yeil ka? shabda apuN jaree vikade tikade vachun aparat asalo taree tyamuLe kuNala dukhakha kinva ija pohochat nahee, whereas blog varacha lekh jasachya tasa swata:cha mhaNun vaparala kuNee tar original lekhakala dukhakha hoil credit hiravun ghetalyacha. so, a theft necessarily causes unhappiness. if it does not, it need not be called theft. right?

  • तुमचं म्हणणं खरं आहे, कोणाला दुःख दिलं जात असेल तर ते नक्कीच अयोग्य आहे

   . बरेच लोकं तर मी इथे लिहिलंय, तुम्ही हवं असेल तर ते कॉपी करा , काही करा असे म्हणतात. पण माझ्यासारख्या लोकांना मात्र आपण जे लिहिलं आहे ते ’आपल” आहे अशी भावना असतेच. म्हणूनच आपले नाव न देता ते कुठे प्रसिद्ध केले तर वाईट वाटतेच!

   थोडक्यात बहूतेक सगळ्याच लोकांना वाईट वाटतंच कॉपी केल्या गेली की..

   • Smita says:

    ho barobar ahe, apaN possesive asato apalya likhaNabaddal. puN mee shabdanbaddal tumhee je lihilay te refer karat hote -“shabdahee apalya malkeeche naheet” taree apaN te vaparato- yala uddeshun mhanayacha hota mala kee- shabda malkiche nastana vaparale taree kuNala dukhavayacha prashna yet nahee- tase te kuNachyach malkeeche nastaat, puN jasechya tase lekh uchalale tar vait vatelach. plus shabdda vaparun tumhee jee rachana karata tee tumchya shramanmuLe zalelee asate, tyamuLe tee ownership asatech lekhavar apalee, whereas sute shabda he ‘public domain material’ asataat.

    aso. btw: ashee choree zalee hotee ka blog varchya lekhanchee kadhee? ?

    • oh… misunderstanding झाले होते. ओनरशीप तर नक्कीच असतेच यात शंका नाही. कारण जो सिक्वेन्स मी वापरतोय शब्दांचा, तर त्याची मालकी हक्क माझ्याकडे येईलच. इथे ब्लॉग वर मी लिहितांना एक्स्ट्रीम विचार म्हणून लिहिले होते तसे..

     ब्लॉग वर पूर्वी पण चोऱ्या वगैरे व्हायच्या. इथे एक लिंक आहे पहा..http://wp.me/pq3x8-1Vm ह्या माणसाने माझे सगळॆ लेख जसेच्या तसे आपल्या ब्लॉग वर टाकले होते – स्वतःचे म्हणून.. पर्सिस्टंट मधे सॉफ्ट्वेर इंजिनिअर आहे हा . मुद्दाम एक मराठी माणूस म्हणून तिकडे कम्प्लेंट दिली नाही, उगाच कशाला एखाद्याच्या नोकरीवर गदा आणायची म्हणून.

 14. Sandy says:

  khup chaan blog aahe khup aavadla lahanpanachi aathavan jhali.

  Ti mitrachi pensil & pen ghene

 15. Kanchan says:

  बिचारया त्या चोराने थोड़े डोके वापरले असते तर तो एक रात्रीत मालामाल ज़्हाला असता….. 😛 😀 पण खरच काही न करण्यापेक्षा चोरी करने योग्य आहे का हा एक प्रश्नच आहे……

  • कांचन,
   तो चोर नव्हता म्हणूनच भिकारी राहीला, जर तो चोर असता तर कधीच मालामाल झाला असता!

 16. महेंद्रजी! लेख एकदम आवडला.विचारात टाकलंत बुवा! काय बरोबर आणि काय चुकीचं यात संभ्रम निर्माण केलात! लेख खूपच आवडला! 🙂

 17. विनायकजी
  माझ्या मनातला संभ्रम इथे मांडलाय . मी स्वतः पण गेले दोन तिन दिवस याच गोष्टीचा विचार करीत होतो , की असं का म्हणून?? अर्थात उत्तर सापडलं नाही अजुन!

 18. Bhalchandra Murari says:

  Masst lekh.
  Aapalyat jitke chor ahet..tya peksha jast Bhikari bharalet. Kahi tar Bhikari cum Chor ahet…..For ex.
  1) traffic hawaldar
  2) railway madhala TC
  3) Mat maganare Rajkarani lok.
  4) School/college madhe admission ghetana donetion maganare…..Shikshan Samrat
  5) new Light connection ghetana lach magnare MSEB wale
  6) sutte paise nahi mhanun 1-2 Rs na denara ST/Bus conductor
  7) Mitranchya paishawar aish karnare..fukte mitr
  8) dusaryanchi pest,saban & bharpur goshti waparnare hostel wasi
  9) Hunda magnare navardev & Mandali etc
  pls list puri karayala help kara…..

  • भालचंद्र
   मनःपुर्वक आभार. थोडा कामात व्यस्त असल्याने उत्तराला उशिर होतोय.. क्षमस्व! तुम्ही जे भिकारी रेफर करताय, त्यावर एक लेख लिहिला होता पुर्वी एकदा. शोधावा लागेल 🙂

 19. गुरुनाथ says:

  भारी विचार आहेत राव, तुमच्या विचारांवरुन एक उक्ति मात्र पटली
  “वा~याहुन वेगवान ते मानवाचे विचार”!!!!!, चोरी!!!! सेन्सेटीव्ह मॅटर आहे बॉस, भाजीपाल्यात कमिशन वगैरे ठीक आहे पण बॉंड च्या व्हॉलेट वर डल्ला!!!!, विचारकरुनच घाम फ़ुटतो बावा!!!!!, माझं पार कांडात निघालं असतं असं काही केले असते तर, पण बापुस प्रेमळ पण आहेत आमचे, कधी कश्यालाच नाही म्हणत नाहीत ,सो गरज ही नव्हती म्हणा चोरीची!!!!

  • अरे चोरी केल्याशिवाय अंगी लागत नसते.. पतंगाचा मांजा आणायला तर नेहेमीच पैसे चोरावे लागायचे मला. 🙂
   पतंग उडवणे एक खास शौक.. मग काही पतंगा कटल्या की मांजा पण जायचा, नविन आणायला पैसे मिळायचे नाहीत सारखे सारखे.. असो…

 20. Santosh says:

  Hahahahahahaha… Majja ali kaka 🙂

 21. mejwani says:

  lekh manapasun avadala ,chhan 🙂

 22. धन्यवाद.. मनातलं कागदावर ( म्हणजे डायरेक्ट ब्लॉग वर ) डायरेक्ट दिलसे लिहिलंय! आभार..

 23. Rajeev says:

  आपले नाही ते बळजबरीने घेणे हे भीकार्यांच्या “मागा म्हणजे मीळेल” ह्या नीतीमत्तेत बसत नाही !!! ते तूमच्या भीडे वर जगतात.
  चोर हे ” न मागता मीळवा” ह्या तर डाकू हे ” दम देउन मागा म्हणजे मीळेलच “ह्या तंत्रानी चालतात !!!
  राहता रहीले ते “अपेक्शा” वाले… ते तुम्हाला शब्द शीकवतात ते मागण्या साठी कींवा दम देउन मागण्या साठी (चोर शब्द न वापरता काम करतात हे नक्की)…………

 24. सगळ्यांनाच चोर बनवून वर ते योग्य शब्दात पटवून पण दिलत… ग्रेट…!!!
  विचार केल्यावर लहानपणीच्या बर्याच छोट्या मोठ्या चोऱ्यांची आठवण झाली ….
  बाकी एखादा चोर जर तुमचा ब्लॉग वाचक असेल तर त्याला तुम्ही खुल आव्हान दिल आहे हो….. 🙂

 25. रोहन says:

  चोर जसा स्वैरपणे कुठेही चोरी करतो (त्याच्या एरियात) तसा थोडा स्वैर झालाय हा भाग.. पण मनमोकळा आहे नेहमीप्रमाणे… 🙂 आवडला…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s