जय ब्लॉगिंग !

राजाभाऊ आज सकाळी लवकर उठले. रविवारचा दिवस आणि राजाभाऊ सकाळी इतक्या लवकर उठलेले पाहून सीमा वहिनी मात्र खरंच आश्चर्यचकित झाल्या. साहजिकच आहे, सकाळी दहा वाजून गेले तरीही अंगावरची चादर ओढून काढेपर्यंत काही महाशय उठत नसंत रविवारी- मग हे आज काय झालं?
त्यांना उठलेले पाहून, हातातला टाइम्स वाचताना पाहून त्यांनी चहा ठेवला गॅसवर. आज काय झालं असेल बरं इतक्या लवकर उठायला? पेपरचं, रवंथ करत चाललेलं वाचन बघून सीमाताईंना संताप आला. आम्ही मेलं, सकाळी उठून इतकं मर मर मरायचं, आणि हे मात्र बस्स.. चहाचा कप आणि पेपर घेऊन बसतील, कमीत कमी तीन तास.स्वतःशी पुटपुटणं सुरू केलं, मी म्हणते, केली थोडी मदत तर काय होईल? पण नाही. आता पेपर ठेवला की लॅपटॉप सुरू करतील, मनातल्या मनात करवादल्या… आणि पेपर ठेवला की कुठले कुठले ब्लॉग वाचत बसतील.
पण आज मात्र राजाभाऊंनी मनावर घेतलं. आपण इतके दिवस ब्लॉग वाचतोय, मग आपला पण एक ब्लॉग का असू नये? आजपर्यंत स्वतःचा ब्लॉग सुरू न करता केवळ इतरांचे ब्लॉग वाचन करतो आपण. स्वतःशीच हसले राजाभाऊ. आणि ब्लॉग सुरू करायचा तर काय आणि कसा करायचा? ह्यावर विचार करू लागले. समोरच पॅड आणि पेन पडला होता. पेन उचलला आणि त्यांनी यादी सुरू केली नवीन ब्लॉग सुरू करण्यासाठी काय करावे लागेल याची!
१) लॅपटॉप
२) बायको! बायको कशाला? तर अधून मधून चहा, भजी वगैरे करून द्यायला! लिहायचं म्हणजे काय चेष्टा आहे का? किती विचार करावा लागतो लिहायला. मग अधून मधून चहाचा कप तर हवाच! आणि सिगारेट्सची दोन पाकिटं! (सिगरेट ओढणं शिकायला लागेल आपल्याला –  हे स्वगत बरं कां)
३)चार पाच इ मेल आयडी. एखादा अतिशहाणा जर ब्लॉगवर आलाच, तर त्याला झापायला म्हणून कमीत कमी चार-पाच निरनिराळ्या इ-मेल आयडी असायलाच हव्या.
४) तीन चार डमी नावाने सुरू केलेले ब्लॉग्ज. ह्या ब्लॉग वर काही लिहिण्याची गरज नाही, हे म्हणजे जर एखाद्याने आपल्याला काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याच्या ब्लॉग वर जाऊन कॉमेंट्स टाकायला हे असे डमी ब्लॉग हवेत.
अहो आजकाल ब्लॉगर्स वर किंवा काही वर्डप्रेस ब्लॉग वर पण लॉग इन केल्याशिवाय कॉमेंट्स टाकता येऊ नये अशीही सोय केलेली असते , तेव्हा हे असे ब्लॉग उपयोगी पडतील.
५)चार पाच मित्र – जे तुम्हाला कोणी अडचणीत पकडले तर मदतीला धावून येतील असे.
६) एक गुरु :- ब्लॉगिंग म्हणजे काय याची ओळख करून देणारा. तसा कांचनचा एक ब्लॉग आहे ’ब्लॉग वाले.’ तो पण गुरु म्हणून चालू शकेल, पण एखादा फिजिकल(???) गुरु असला तर जास्त बरे असे उगीच वाटले राजाभाऊंना.
७) काही खास ब्लॉगच्या लिंक्स माहिती असायला हव्या. म्हणजे तिकडून कॉपी केले की इकडे म्हणजे आपल्या ब्लॉगवर पोस्ट करायचे झाले. एक दोनदा असे केले की ज्याचे ते पोस्ट आहे तो चवताळून येतोच आपल्या ब्लॉगवर आणि कॉमेंट टाकतो. तो आपल्या मित्रांना पण आणतो ब्लॉग वर, सांगायला की हे पाहा या माणसाने माझी पोस्ट चोरली. स्वतः काही लिहिण्यापेक्षा इतरांनी लिहिलेले,तसेच्या तसे इकडे चिकटवले तर जास्त सोपे होऊ शकेल आणि समजतं तरी कोणाला की तुम्ही कॉपी केली आहे म्हणून.
८) सक्सेसफुल ब्लॉग सुरू करण्यासाठी काही तरी कॉंट्रोव्हर्सीयल लिहायचे, की मग त्यावर आपोआपच लोकं कॉमेंट्स टाकतात आणि ब्लॉग ला प्रसिद्धी पण मिळते. कुठलाही वंदनीय नेता ( जो हयात नाही ) त्याच्या बद्दल गरळ ओकायची की झालं. एखाद्या मोठ्या लेखकाच्या नावाने स्वतःच काहीतरी लिहायचे आणि त्याचे दाखले द्यायचे. एवढं केलं की झालोच आपण यशस्वी ब्लॉगर.
९) अग्रिम जामीन! कारण जर समजा काही कारणाने एखाद्याने तुम्हाला नोटीस पाठवली तर मग त्याचे उत्तर देण्यासाठी म्हणून .
१०) एकादा पोलीस अधिकारी मित्र म्हणून- जर कधी आत जावं लागलं ( ऍट्रोसिटीच्या केस मध्ये , तर……..असावा हाताशी म्हणून.
११) प्रस्थापितांच्या विरुद्ध काय वाटेल ते लिहायचे, जागोजागी बामणी कावा, मराठा अस्मिता, बहुजन समाज, असे शब्द पेरायचे. बरेचदा आपल्या मनात जे काही आहे ते लिहायचे, पण लिहिताना हे दुसर्‍य़ा एका कोणा मोठ्या लेखकांनी , किंवा नेत्याने असे म्हटले आहे म्हणून सांगायचे, म्हणजे कोणी वाकड्यात जायचे धाडस करीत नाही.
१२) सगळ्यात शेवटी एक मस्त पैकी स्कॉचची बाटली.अहो सिलेब्रेशनच्या वेळेस लागेल नां- वेळोवेळी. अशा बर्‍याच संधी येतील. पन्नासावी पोस्ट, पहिले हजार वाचक, पहिले पाच हजार वाचक, पहिला मासिक वाढदिवस , पहिल्या पन्नास कॉमेंट्स वगैरे वगैरे…
१३) मराठी टायपिंग सॉफ्ट वेअर. जो पर्यंत फ्री वर्शन मिळत नाही, तो पर्यंत कॉपी पेस्ट ब्लॉगिंग करू शकतो आपण, म्हणजे त्याची फारशी काळजी नाही .
१४)शिव्यांचा कोश असलेला जास्त बरा. आपण काही लिहिल्यावर लोकांनी शिव्या दिल्या तर, वर दिलेल्या काही खोट्या आयडी वापरून तुम्ही त्या माणसाला शिव्या देऊन स्वतःचे मन हलके करून घेऊ शकता.
१५) राजकीय नेत्यांवर लिहायचे असेल तर रिव्हॉल्वरचे लायसन्स नक्की घ्यावे लागेल. त्या नेत्याचे खास चमचे तुमचे आयुष्य कठीण करू शकतात. जो पर्यंत रिव्हॉल्व्हर चे लायसन्स मिळत नाही तो पर्यंत एक रामपुरी चाकू.
१६) शिवाजी महाराज हे आपली जहांगीर आहेत,आपल्याशिवाय शिवाजी महाराजांवर कोणी प्रेम करूच शकत नाही आणि इतर जातीतले लोकं म्हणजे शिवाजी महाराजांचे दुश्मन होते हे ठासून लिहिले की ब्लॉगला खूप छान हिट्स मिळतील.बर्‍याच लोकांनी अजमावलेला हातखंडा आहे हा. पण त्यासाठी आधी इतिहासाची म्हणजे श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तकं वाचायला विकत घ्यावी लागतील.
१७) जेम्स लेन नावाचा कोणी लेखक होता म्हणे– त्याचं पुस्तक वाचायला हवं( म्हणजे ब्लॉग वर परीक्षण लिहिता येईल)
राजाभाऊंनी सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला, आपल्याकडे काय काय आहे ? काय नाही? ज्या गोष्टी नाहीत, त्या कधी आणि कुठून मिळवायच्या? वगैरे विचार केला, आणि एकदाचा ब्लॉग सुरू केला . त्यांच्या ब्लॉग साठी त्यांनी पहिले पोस्ट पण तयार केले , उडनतश्तरी नावाच्या हिंदी ब्लॉग वरून- तेच इथे पोस्ट करतोय मी ( कॉपी पेस्ट करून 🙂 )  जय ब्लॉगिंग!
(पूर्व प्रकाशित:- हास्यगारवा.)
डिस्क्लेमर:-हा लेख पुर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी याचा संबंध नाही, जर तो कोणाला आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मराठी. Bookmark the permalink.

57 Responses to जय ब्लॉगिंग !

 1. raj jain says:

  हा हा हा हा !!!!

 2. सकाळी सकाळी हे वाचायला मिळालं. दिवस चांगला जाईल. नंबर १६ शी १०१% सहमत.

  • कांचन
   आभार .. होळी झाली तेंव्हा होळी विशेषांका साठी लिहिलं होतं हे..:) होली है यारो , बुरा मत मानो लिहायचं राहून गेलं.

 3. mau says:

  हा हा हा…..महेंद्रजी,खरचं तुम्ही ग्रेट आहात..जे लिहाल ते मस्तच….

  • उमा
   ग्रेट वगैरे काही नाही हो… काय वाटेल ते लिहिलंय झालं! होळी स्पेशल आहे.. हलके घेणे.

 4. महेंद्रजी,
  चिमटे काढून एक तरी जागा सोडायचीत !!! 😉

  मलाही १६ नंबर जाम आवडला बुआ. . .

  आपला,
  (एके काळचा राजाभाऊ) विशुभाऊ

 5. vishubhau says:

  महेंद्रजी,
  अहो चिमटा काढायला एकतरी जागा सोडायचीत !!!!!!!!

  मला पण १६ नंबर जाम आवडला . . .

  आपला,
  (एके काळचा राजाभाऊ) विशुभाऊ

 6. आनंद पत्रे says:

  जबरदस्त आहे…

 7. Smita says:

  ha jara bloggers special lekh ahe tyamuLe cannot quite relate to it, puN # 16 – a resounding yes!!:-)

  • स्मिता
   कदाचित तुम्ही मी जे ब्लॉग रेफर केले आहेत ते वाचलेले नसावे. पण मध्यंतरी बरंच पिक आलं हों या प्रकारच्या लेखांचं! चोरी तर अगदी कॉमन झाली होती! सगळ्या गोष्टी एकत्र केल्या आहे इथे.

   • Smita says:

    Vachale te lekh mee, kharach mothach blog choree prakaraN zalela distay, puN tumhee sagaLyannee miLun agadee systematically nab kelat tya maNasala:-) good going.

    actually ha prakar apalyala rojachya ayushyatahee anubhavas yeto. office madhye ekhadee idea kuNala sahaj bolun dakhavavee tar toch moThyamoThyane tyabadaal bolayala lagun credit gheto, asha muLe healthy exchange thambun jato .after a certain point you think it’s best to keep things to yourself. careful rahava lagata kahee lokanpasun.

    blogs chee strength aNee weakness mhanaje ‘openness’ asalyane jastach vulnerable ahe ha prakar.

 8. महेन्द्रजी नमस्कार,
  लेख सुंदर आणि खुसखुशीत झाला आहे.

 9. Vinay says:

  “राजाभाऊंनी सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला, आपल्याकडे काय काय आहे ? काय नाही?”
  काही नाही कसं? बायको आहे ना, मधे-मधे चहा द्यायला!! 😛
  लेख छानच आहे!! खासकरून ब्लॉगचे विषय कुठले घ्यायचे ह्या बद्दल.

  • प्रज्ञा
   प्रतिक्रियेसाठी आभार. वरेच दिवसात काही विनोदी वगैरे लिहिण्य़ाचे जमत नव्हते, म्हणून केलेला हा एक प्रयत्न!

 10. हा हा हा हा …. मस्तच पोस्ट 🙂

 11. गौरी says:

  मस्त! जय ब्लॉगिंग! 🙂

 12. Nachiket says:

  Great… jhakas… aavadale ekadum… 🙂

 13. Nilesh says:

  Chan aahe pan shivarajancha aasa kuni gairvapar kela tar nahi chalnar

  • निलेश
   खरं आहे, पण सध्या तर तेच नेमकं केलं जातंय. त्यावर लिहायचं होतं, पण राहून जातंय..

 14. umesh says:

  ११) प्रस्थापितांच्या विरुद्ध काय वाटेल ते लिहायचे, जागोजागी बामणी कावा, मराठा अस्मिता, बहुजन समाज, असे शब्द पेरायचे. बरेचदा आपल्या मनात जे काही आहे ते लिहायचे, पण लिहिताना हे दुसर्‍य़ा एका कोणा मोठ्या लेखकांनी , किंवा नेत्याने असे म्हटले आहे म्हणून सांगायचे, म्हणजे कोणी वाकड्यात जायचे धाडस करीत नाही
  Very nice … real shame is, these blogs are winner of few contest.

  • उमेश
   बाळासाहेबांच्या वडीलांच्या नावाने काही लेख सध्या फिरताहेत नेट वर . ते वाचून लिहिलंय हे वाक्य. पण हे असं किती दिवस चालणार ?

 15. s.k. says:

  liked 3rd and 16th… very humorous post 🙂

 16. kanchangund says:

  शिवाजी महाराजांचा विजय असो………. 😀 मस्त आहे लेख…… खूप छान

 17. हेमंत आठल्ये says:

  खुपच छान.. नेहमीप्रमाणे!

 18. Rajeev says:

  16 number is number 1 !!!!!

 19. जबराच काका!!!
  सॉलीड फटकेबाजी एकदम! 🙂

  • विनोदी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि हे झालं. थोडक्यात करायला गेलो गणपती, झाला मारूती – हे अगदी खरं खरं लिहितोय बरं 🙂 धन्यवाद..

 20. हा हा हा हा …. मस्तच पोस्ट 🙂

  • गंगाधरजी
   तुम्हाला त्या दिवशी मी मराठीच्या कार्यक्रमात भेटून खूप आनंद झाला. पुन्हा कधी आलात तर नक्की फोन करा. 🙂

 21. जबराट.. काका, आणि ११ आणि १६ चा अजून एक फायदा म्हणजे [असल्या *काही* ब्लॉग्जना (सुदैवाने सगळ्या नाही)]’ब्लॉगतुझा’ ची बक्षिसंही लाटता येतात. !!!

 22. सुदर्शन says:

  mastach…
  11 ani 16 top class…

 23. मधुकर says:

  नमस्कार साहेब,
  लेख मस्त जमलाय.

  १०) एकादा पोलीस अधिकारी मित्र म्हणून- जर कधी आत जावं लागलं ( ऍट्रोसिटीच्या केस मध्ये , तर……..असावा हाताशी म्हणून.>> ??????????????

  हेरंबा,
  तुझ्या मताशी सहमत आहे.

  टिप: महेंद्रसाहेब, तुमचा ब्लॉग मी रोज वाचतो. फक्त आपण दोन वेगवेगळया गटातील पडतो म्हणुन प्रतिक्रिया देत नाही.
  पण तुमची प्रत्येक पोस्ट प्रतिक्रिया दयावी अशी असते.

  • मधुकर
   अहो तसं काही नाही. होळीच्या निमित्याने हा लेख लिहीला होता, म्हणून थॊडा सैल सोडला की बोर्ड! नाहीतर मी पण शक्यतो कॉंट्रोव्हर्सीयल लिहीणे टाळतोच.
   तुमचे पण प्रत्येकच लेख मी वाचले आहेत. अजूनही वाचतोच. पण मला स्वतःला वाद विवाद वगैरे आवडत नाही, म्हणून कॉमेंट्स टाळल्या. तुमचे भामरागडचे लेख तर अप्रतीम आहेत. प्रतिक्रियेसाठी आभार…:)

 24. रमेश म्हात्रे says:

  नमस्कार काका,

  नेहमीप्रमाणे एकदम चाबूक………….

 25. काका, मस्त झालाय शिमगा.
  नुसती वाजवली आहे…

  • सिद्धार्थ
   शिमगा स्पेशल अंकच काढ्ला होता देवकाकांनी 🙂 तेंव्हा थोड्या बोंबा तर हव्यातच!!

 26. रोहन says:

  आईशप्पथ…. खरच काय वाटेल ते!!! पण पटेल ते… 🙂

 27. Ashpak says:

  Very Good
  Pahila Pryana Kru ka

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s