स्वभाव..

शरीराच्या असंख्य अवयवा बरोबरच आपला इतर कोणाला कधीच  न दिसणारा  एक अवयव पण असतो- आणि तो पण सगळ्यात जास्त महत्त्वाचा .  पती- पत्नीच्या नात्यांमधे   पण त्याची ओळख पटायला कित्येक वर्ष जावी लागतात-  तो म्हणजे स्वभाव. या स्वभावाच्या पण गमती आहेत, म्हणतात  ना ,की एखाद्याचा स्वभाव खूप छान – किंवा वाईट आहे- म्हणजे नेमकं काय असतं?  हा स्वभाव   कधी बदलत नाही असे म्हणतात- ते खरं आहे का?.

चांगला किंवा वाईट स्वभाव म्हणजे कसा ते मला कधीच समजलेले नाही.जर एखादा घरातला माणुस खूप समाज सेवा किंवा काहीतरी सोशल काम करत असेल तर त्याला बाहेरचे लोकं नक्कीच खूप छान स्वभावाचा आहे म्हणत असतील, पण त्याचे घरचे लोकं मात्र , आता पुरे झालं  “घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणं “-असं म्हणत असतीलच !

खऱ्या स्वभावाचे दर्शन कधी कसे होईल ते सांगता येत नाही. एखाद्या मुलीचे लग्न झाल्यावर जर या मुलीचा नवरा तिच्या म्हणजे मुलीच्या आई वडिलाकडे जास्त ओढला गेला, तर तिच्या आईवडीलांच्या   दृष्टीने तो चांगल्या स्वभावाचा- पण त्याच्या स्वतःच्या आईवडीलांच्या दृष्टीने?? त्यांना तर वाटतच असेल की “आमच्या बाब्याचा स्वभाव असा कधीच  नव्हता,  कित्ती कित्ती प्रेम करायचा आपल्या आईवर? पण लग्न झालं आणि तेंव्हापासून मात्र पुर्ण बदलला”,  अगदी ’त्यांच्या ’ ( म्हणजे त्याच्या सासुरवाडीच्या) कह्यात गेलाय .  इथे “स्वभावाकडे ” पहाण्याची ’नजर’ बदलली की स्वभाव वेगळा दिसू लागतो.

स्वभावाबद्दल  जेंव्हा बोलतो तेंव्हा गणित हे खूप महत्वाचे. स्वभावाच्या जडणघडणीत या गणिताचा खूप मोठा भाग असतो. हे गणित   मुलाच्या आणि आईवडीलांच्या  नाते संबंध मधे पण बरेचदा वरचढ ठरतं .मुलाने काही केलं नाही, किंवा एखादी गोष्ट मना विरुद्ध केली ( जसे लग्नासाठी घरी न सांगता मुलगी पसंत करणे , वेगळे रहायला जाणे, घरच्यांची म्हणजे आई वडिलांची परवानगी न घेता   बायकोला तिच्या माहेरी  पाठवणे  वगैरे वगैरे काहीही कारण जरी असले तरी ) की  लगेच त्याच्या आई वडिलांचे  त्या मुलाच्या लहानपणा पासून तर आज पर्यंत चे मनातले हिशोब लगेच  समोर येतात ,  अरे तू जेंव्हा आजारी होतास तेंव्हा तुझ्या आईने २१ चतुर्थ्या केल्या मिठाच्या मोदकाच्या- तुला चांगल्या कॉलेजात घालायचं, त्याची फी भरता यावी  म्हणून मी चार वर्ष तेच ते जुने बूट शिवून वापरले, आणि तू आज आम्हाला असं वाळीत टाकलंस ? इतका  मोठा झालास की सगळे निर्णय आपले आपणच घेतलेस?

ही अशी वाक्य वडील मुलांच्या भांडणात आली की मग त्या नाते संबंधातला “हिशोब”  दिसायला लागतो, आणि प्रश्न मनात येतो की इतक्या नाजूक नात्या मधे पण हा असा “गणिताचा” टोकदार कंगोरा  असू शकतो? आई वडिलांनाही मुलाचा स्वभाव बिघडल्याचं जाणवतं , आणि मुलाला पण तसंच वाटत असतं. हे असे हिशोब  लक्षात ठेवले जातात आणि मग त्यानुसार स्वभावात बदल होत असतो.

स्वभावा कडें  पहाण्याचा पण एक गणितीय दृष्टी कोन असतो. जेंव्हा एखाद्याच्या   स्वभावाचे मूल्यमापन केले जाते, तेंव्हा त्या मागे ’पूर्वानुभव”, किंवा एक    कॅल्क्युलेशन्स असतात. कशा ते सांगतो . मागच्याच आठवड्यातील गोष्ट आहे.कामानिमित्त नागपुरला गेलो असतांना, बाजारात गेलो असता आकस्मित पणे एक खूप जुना मित्र भेटला.

माझ्याकडे पाहिल्या  बरोबर कुचेष्टेने हसून म्हणाला- ’ तुम्ही काय आता मोठी माणसं झालात, आमच्या सारख्या लहान माणसांकडे तुमचे लक्ष कसे राहील आता?” मला एक क्षणभर हा असे काय बोलतोय ते समजलेच नाही.विचारले , “की काय झाले रे बाबा”? तर म्हणतो,परवाचीच गोष्ट, ” मी तुला चार वेळा फोन केला होता, पण तू तर माझा  फोन  पण उचलला नाहीस .बरं आणि नंतर  मला फोन सुद्धा  केला नाहीस- ते वेगळंच.

माझा मोबाइल हरवल्या मुळे सगळे नंबर्स गेले हे जरी त्याला सांगितलं, तरी त्याला ते खरं वाटत नव्हतं. फोन न उचलण्याच्या मागचं कारण म्हणजे,  एखाद्या मिटींग मधे असलो, की फोन सायलेंट वर असतो, आणि मी तेंव्हा फोन उचलत नाही.   मिटींग नंतर    माहिती असलेल्या ’मिस्ड” कॉल्स ला   कॉल बॅक करतो. पण याचा नंबर मात्र सेव्ह केलेला नसल्याने नाव आले नव्हते,  म्हणून मी फोन केला नव्हता.

इथे त्याच्या मनात कुठेतरी हे गणित पक्कं बसलं होतं, की त्याने चारदा फोन करूनही मी फोन केला नाही.  जर त्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी मला फोन केला असता, तर मला पण तो फोन घेतल्यावर तो नंबर त्याचा  आहे असे लक्षात आले असते आणि मी तो सेव्ह केला असता. पण………..दुसऱ्या दिवशी  पुन्हा फोन करण्या ऐवजी, त्याने  गणित केले – आणि माझ्याबद्दल एक मत तयार केले स्वतःचे आणि  मनात आकस धरला. म्हणून म्हणतो की ’स्वभाव” हा  केलेल्या कॅलक्युलेशन्स वर आधारित  असतो- गणितावर आधारित असतो.  भावना बाजूला ठेवून भावनेपेक्षाही वरचढ  असलेली कॅलक्युलेशन्स तुमचा स्वभाव नियंत्रित करतात !

वरची गोष्ट ऍनॅलाइझ केली तर लक्षात येईल, की त्या मित्राच्या मते त्याने मला फोन केला तेंव्हा,माझा स्वभाव खूप चांगला होता म्हणूनच त्याला माझ्याशी बोलावेसे वाटत होते, पण मी फोन न उचलल्यामुळे त्याला माझा स्वभाव एकदम  गर्विष्ठ वाटायला लागला, इतका वाईट, की माझ्याशी बोलतांना पण त्याच्या आवाजातला तुसडे पणा मला जाणवत होता. एका क्षणात चांगल्या स्वभावाचा वाईट किंवा वाईटाचा चांगला होऊ शकतो 🙂

माझी मुलगी लहान असताना तिला एका मैत्रिणीच्या वाढदिवसाला जायचं होतं, तिच्यासाठी गिफ्ट आणायला म्हणून दुकानात गेलो. तिथे गेल्यावर माझ्या मुलीची पहिली कॉमेंट होती, ” बाबा, फारसं महाग नको, तिने मला फक्त कलर  क्रेऑन्स दिले होते , आपणही काहीतरी तसंच घेऊ “. मैत्रिणीला पण गिफ्ट देतांना तिने काय दिले होते याचा हिशोब मनातल्या मनात करायला   १२ वर्षाच्या मुलीला कोणी शिकवलं ?? मला एकदम आश्चर्य वाटलं- आणि जाणवलं की, प्रत्येकामध्ये हा गुण अवगुण जो काही असेल तो, अगदी जन्मजातच असतो- बाय डिफॉल्ट!. मुद्दाम शिकवावं लागत नाही.

लग्नामध्ये दिले जाणारे प्रेझेट्स हा पण एक या गणित प्रेमी  लोकांचा एक आवडीचा विषय. माझ्या लहानपणी लग्नामध्ये  नवऱ्या मुला मुलीच्या मागे स्टेज वर    वही पेन घेऊन मागे दोन तिन माणसं बसायची ( एक लिहायला, दुसरा सामान रचून ठेवायला,  आणि तिसरा  -तो  पहिल्या दोघांनी  कॅशची आलेली पाकिटं खिशात घालू नये म्हणून लक्ष ठेवणारा असेल का ?? 🙂 ).  त्या वही  मधे जे काही प्रेझेंट मिळेल ते देणाऱ्याच्या नावा पुढे   त्याने  काय प्रेझेंट दिले ते लिहून ठेवण्याची पद्धत होती. नंतर पुढे मागे  त्या प्रेझेंट देणाऱ्या कडे  काही कार्य असले, की ती वही उघडून त्याने आपल्या घरच्या कार्यात काय प्रेझेंट  दिले होते ते पाहूनच मग किती किमतीचे  प्रेझेंट द्यायचे हे ठरवले जायचे. काही घरी ही पद्धत तर अजूनही अस्तित्वात आहे .

अगदी छातीवर हात ठेवून  विचार करा आणि स्वतःलाच  खरं काय ते सांगा, तुम्हाला एखादं प्रेझेंट मिळालं की तुम्ही काय करता? मस्त पैकी एखादा गिफ्ट रॅप केलेलं प्रेझेंट असतं, ते कव्हर उघडून आधी त्या वस्तूवर काही किमतीचे लेबल लावले आहे का ते पहाता ! 🙂

१)किंमत आहे का? की ती खोडलेली आहे?

२)जर खोडलेली असेल तर  खूप स्वस्त असेल का हे प्रेझेंट??

३)आणि जर जास्त  किमतीचे लेबल तसेच असेल तर , देतांना लेबल काढून  का दिले नाही? म्हणजे   नक्कीच भरपूर डीस्काउंट मिळाला असेल का?

४)महागाच गिफ्ट दिलंय असं वाटावं म्हणून लेबल काढलेलं नसावं- असं तर नाही नां?

हे असे   संशय मनात येणार.   प्रेझेंट घेतल्यावर त्या मागची भावना न पहाता, त्याची किंमत काय असेल ह्याचं कॅलक्युलेशन्स सुरु होतात- हा मानवी स्वभावच आहे. म्हणूनच म्हणतात, की माणसाचं मन हे” आधीच मर्कट त्यात मद्य प्यायलेला, आणि त्यावर पुन्हा विंचू चावलेला” असं असतं!  मिळालेलं गिफ्ट हे ग्रेसफुली आणि  रिस्पेक्टफुली  देणाऱ्याच्या भावनांचा आदर ठेवून स्विकारताना    लागणारा मनाचा मोठेपणा   स्वभावात आणणे कधी शिकणार आहोत आपण?

जर तुम्हाला तुमचे गणित कसे आहे हे मी विचारले तर  ??  आपल्या सामाजिक जीवनात  एकमेकांशी   जे संबंध आहेत ते केवळ गणितावर अवलंबून आहेत असं म्हटलं तर?? अहो हे गणित मला कायम वेडं करतं.माझी एकच इच्छा आहे. मला या अशा गणिता मधे नापास व्हायचंय.. खूप   कच्चे रहायचंय, सगळे हिशोब विसरायचे आहेत. नेहेमीसाठी……….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

55 Responses to स्वभाव..

 1. दिपक says:

  हो, रिटर्न गिफ्ट देतानाही आपल्याला काय मिळालं होतं याचा विचार नक्कीच केलेला असतो!
  कसलं सॉलिड ओब्झरवेशन म्हणावं लागेल!!

  माणसाचं मन हे” आधीच मर्कट त्यात मद्य प्यायलेला, आणि त्यावर पुन्हा विंचू चावलेला” असं असतं!

  १०१% खरं!

  • दिपक
   धन्यवाद.. रिटर्न गिफ्ट पण मोठा प्रश्नच असतो. माझ्या मैत्रीणीने १० रुपये वाली कॅडबरी वाटली क्लास मधे, मग मी मेलोडी का वाटू? असे प्रश्न नेहेमीच असतात मुलांच्या मनात. मग जवळपास हजार रुपयांची कॅडबरी तरी वाटावी लागते.याच वेळेस मुलांना समजावतांना होणारी दमछाक अजूनही आठवते 🙂

 2. kanchangund says:

  kharach khup chan ahe blog…….ha manavi swabhavach ahe….. nahi bolle tari apan sagale he ganit lakshat thevunach pudhe kay karave asa vichar karto…….. yat kacche rahun pan chalat nahi ho….. nahi tar apan visarlo tar kahi lok te bolun dakhavatat…. me yala he kele hote pan yani amhala kay kele?????? Mag nantar guilty nako vatayala mhnun lakshat thevave lagate….. 🙂

  • कांचन
   धन्यवाद.कच्चं राहून चालत नाही- का? कशाला इतकी काळजी करायची कोणाची? आपल्या ऐपती प्रमाणे जितकं जास्तितजास्त करता येईल तेवढं करायचं. 🙂 म्हणजे अजिबात मानसिक त्रास होत नाही.

 3. sarika says:

  माणसाचं मन हे” आधीच मर्कट त्यात मद्य प्यायलेला, आणि त्यावर पुन्हा विंचू चावलेला” असं असतं! एकदम सही…

  माझा मुलगाही कुणाच्या वाढदिवसाला जाताना ही असली काहीतरी गणितं माडंत असतो…

  • सारिका
   मनःपुर्वक आभार… 🙂 लहान मुलांचं विश्वंच वेगळं असतं. त्यांचे आपले वेगळेच कॅलक्युलेशन्स, गणीतं असतात..

 4. Pramod says:

  Mahendra Kaka

  Ha manusha swabhav ahe..muddam koni ase karat nahi pan ha chala gariba pasoon shreemanta madhe bharpoor disto. Mhanoon gift ghene ani dene band karave. Ekdam mokale mokale vatate. Bagha try karoon. Thanks

  Pramod

  • मुद्दाम कोणी असं करत नसतो हे मान्य. पण हा एक स्वभाव आहे. स्वभाव असा होण्याचे कारण म्हणजे वेळीअवेळी केली जाणारी गणितं.. आणि त्यानुसार घेतलेले निर्णय..

 5. pallavikelkar says:

  मस्त… फार सुंदर विषय मांडलात. नाती टिकविणे, जोपासणे ही खरंच अवघड बाब आहे. परंतु हे माणसाचं हिशोब ठेवणे हा अटळ प्रकार आहे, आपण बोलूनही तो चालू रहाणारच.. तेव्हा आपण स्वत: असा विचार न करणे, माणसाला माणूसकीच्या तराजूने तोलणे एवढेच करू शकतो.
  कशी गंमत असते ना, आता एखाद्याने फोन उचलला नाही म्हणजे कामात तो असेल असा विचार आपल्याला फोन करण्यार्‍याने करावा असे वाटते पण हेच आपल्याबरोबर झाले तर अनेकदा, “काय उपयोग त्याच्या फोनचा?” असाच विचार करतो. (जर तो फोन प्रोफेशनल कॅटेगरीत मोडत नसेल तर)
  आणि जे सगळे सोपस्कार आपण प्रोफेशनली पाळतो त्याच बाबतीत जवळच्या लोकांना गृहीत धरतो. म्हणजे, आपल्याला मीटींगला जायला उशीर होणार असेल तर त्यांना कळवतो, पण मित्राला भेटायचे असेल आणि उशीर झाला तर त्याचा फोन येईपर्यंत आपण स्वत:हून काही सांगायचे कष्ट घेत नाही. (अपवाद वगळून!) मानवी स्वभाव.. दुसरं काय?

  • पल्लवी
   प्रतिक्रियेसाठी आभार. जवळच्या लोकांना आपण खरंच गृहीत धरतो ही गोष्ट अगदी शंभर टक्के खरी. मानवी स्वभावाला औषध नाही हेच खरं!

 6. mau says:

  काय लिहु???किती मनातले लिहीलेत हो….प्रत्येक शब्द खरच मनाला पटला…आपण केवढी मोठ्ठी चुक करतो नाही का??
  माणसाचं मन हे” आधीच मर्कट त्यात मद्य प्यायलेला, आणि त्यावर पुन्हा विंचू चावलेला” असं असतं!हे अगदी अगदी पटलं…
  बाकी लग्नसमारंभात नेहमीचे दिसणारे दृश्य खुप हुबेहुब्ब मांडलेत…
  मिळालेलं गिफ्ट हे ग्रेसफुली आणि रिस्पेक्टफुली देणाऱ्याच्या भावनांचा आदर ठेवून स्विकारताना लागणारा मनाचा मोठेपणा स्वभावात आणणे कधी शिकणार आहोत आपण?हेच तर आपल्यामध्ये नसल्यामुळे आणि शिकायची इच्छाही नसल्यामुळे कितीतरी घरं आजही ताणतणावात जगत आहेत..

  • उमा
   माझ्यास्वतः मधे पण तसे ड्रॉ बॅक्स आहेतच.. मला त्याची जाणिव पण होत असते वेळोवेळी.. प्रयत्न करतो आपल्याकडून अशी कोष्टकं न मांडण्याचा 🙂
   मिळालेले गिफ्ट ग्रेसफुली न स्विकारण्यामुळे होणारा मनःस्ताप हा ज्याला गिफ्ट मिळालंय त्यालाच होतो. जर आवडलं नाही, तर कोणाला तरी देऊन टाकता येतं नां.. उगाच स्वतःच मानसिक स्वास्थ्य खराब करून घेण्यात काय अर्थ आहे??

 7. Poorva Kulkarni says:

  Kharach agdi barobar, lekh aavdla..

  Kadhi kadhi tar asa vichar kartat ki ya vastucha (gift( mala kay upyog ? khar tar chotishi vastu asel athva mothi tya magchi bhavna lakshat ghyavi.

  Poorva

  • पूर्वा
   ब्लॉग वर स्वागत..
   किमती पेक्षा भावना जास्त महत्वाची. एखाद्याने तुम्हाला गिफ्ट वगैरे दिले, आणि तुम्ही ते त्याच्या समोर उघडले की त्याची अपेक्षा असते की तुमच्या चेहेऱ्यावर एक स्मित रेषा असावी, अशी, पण त्या ऐवजी त्याला आठ्या दिसल्या की मग त्याला खरंच किती वाईट वाटत असेल याचा विचार आपण करत नाही. दूर कशाला, एकदा बायकोसाठी साडी आणली होती, त्यावर तिने रंग आवडला नाही म्हणून सांगितल्यावर मला पण कशाला झक मारायला तिन हजार खर्च केले असे झाले होते.. असो. सहज आठवलं म्हणून लिहिलं.

 8. >> माझ्या लहानपणी लग्नामध्ये नवऱ्या मुला मुलीच्या मागे स्टेज वर वहीपेन घेऊन मागे दोन तिन माणसं बसायची.

  ती दोन तिन माणसं अजूनही असतात. नशीब २१ रु, ५१ रु अश्या प्रेझेंट च्या किंमती नुसार वेगळ्या रांगा नसतात.

  >> “तुम्ही काय आता मोठी माणसं झालात, आमच्यासारख्या लहान माणसांकडे तुमचे लक्ष कसे राहील आता?”

  असं कुणी बोललं की खरंच डोक्यात जाते ती व्यक्ती.

  • सिद्धार्थ
   आमच्या गावाकडे तर चक्क लाऊड्स्पिकर वरून ओरडून सांगतात जे काही गिफ्ट मिळालं असेल ते! हल्ली हा प्रकार कमी झालेला दिसतो मुंबईला वगैरे..

 9. Gurunath says:

  भारी लेख आहे दादा, आत्मपरिक्षण (मराठीत इंट्रोस्पेक्शन!!!) करायला लावणारा, सगळेच बदलतात?
  मी पण बदलणार? आई ला काय वाटते, बायकोला काय वाटते… सहीच कधी विचारच केला नव्हता!!!!

  • गुरु,
   बदल हा इनएव्हीटेबल आहे.. तू काहीच टाळू शकणार नाहीस. प्रत्येकालाच या चरकातून जावे लागते – मग त्याला तू कसा काय अपवाद रहाशिल?

 10. rajendra says:

  काका…नेहमी प्रमाणे लेख झकास झालाय.
  आपला स्वभाव हा समोरच्यांकडे बघूनच बदलावा लागतो. गिफ्ट च्या बाबतीत म्हणाल तर तसे करणे योग्यच आहे असे वाटते, आपल्याला सायकल गिफ्ट देणार्याला जर मारुती गिफ्ट दिली तर कसे चालेल ? म्हणून हिशोब ठेवणेच योग्य ! स्वभावात बदल करायची इच्छा असली तरी तो बदल करता येणार नाही. एखादा कटकट (व्यर्थ बडबड) करणारा व्यक्ती दिवसातून ४ वेळा फोन करत असेल तर त्याला सगळेच टाळतात. बाकी लग्नाचे उदाहरण आणि स्वभावाचे विश्लेषण आवडले. धन्यवाद !!!

  • राजेंद्र
   धन्यवाद… काल थोडा जास्त कामात असल्याने उत्तर देता आले नाही.
   पण मला वाटतं की जर आपण मारूती गिफ्ट देऊ शकत असू , आणि तितके जवळचे संबंध असतिल तर काय हरकत आहे?? असो.. वादाचा मुद्दा आहे हा. उलट मी स्वतः तर इतरांना त्यांच्या अपेक्षेपेक्षाच जास्त देत असतो.. 🙂

 11. वाह काका,
  उत्तम मुद्द्याला हात घातलात. खुप सारे प्रसंग तर मी स्वत: अनुभवलेले आहेत. स्वभावाला औषध नसते हे पण पटले 🙂

 12. aruna says:

  ्माणसाचे मन आणी त्याचा स्वभाव, हे एक अनाकलनीय गूढ आहे. पण तुन्ही म्हणता तशी गणितं नकी बनवलेली असतात. लहान मुले मोठ्यांचे पाहून पाहून-पाहूनच शिकतात. मुलान्चे निरीक्षण किती सूक्ष्म असते,याची आपल्याला कल्पना येत नाही.
  तुमच्या मित्राच्या प्रतिक्रियेतकदाचित तो दुखवला गेला असण्याची पण शक्यता आहे.
  कधि कधि माणूस परिस्थितीमुळे पण विचित्र वागतो तर कधि कधि एखादि तत्कालिक प्रतिक्रिया असते. काय सांगावे!

  • माणुस जेंव्हा परिस्थितीमुळे विचित्र वागतो, तेंव्हा ते एक वेळ क्षम्य आहे. पण इतर वेळेस जर कोणी असं विचित्र वागलं तर??
   हा प्रश्न आहेच. आपलं मन फार नाजूक असतं, कुठे थोडं काही कमी जास्त झालं, किंवा आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं, की लगेच मनाला लावून घेतो आपण..

 13. sangeeta says:

  nehmipramane khup sunder lihile, agdi sarvanchya manatale, saggle jan asach vichar kartat

 14. अगदी मार्मिक निरीक्षण आहे महेंद्रजी आणि तुम्ही ते मांडलंय ही अप्रतिम! ठळक अक्षरातला शेवटचा परिच्छेद सगळ्यात जास्त आवडला!:)

  • विनायकजी
   आभार. खरंच सगळं काही विसरायची इच्छा आहे.. गणितं तर नक्कीच.. कुठलंही गणित न मांडता, आपल्या कडुन जितकं जास्त होऊ शकेल तितकं करायचं! झालं..

 15. उत्तम लेख.. शेवटचा परिच्छेद आवडला..

  थोडक्यात काय की म्हंटलं तर स्वभाव म्हंटलं तर दृष्टीकोन !!

  • एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा तयार होतो पूर्वीच्या गणितावरच. सगळे हिशोब करून मगच मन निर्णय घेत असतं. धन्यवाद हेरंब.

 16. RaniSarkar says:

  अचूक लिहिलंय सगळाच …….मनोविशेशज्ञ व्हायला हवा होता काका तुम्ही ….बाकी Observation Strong आहे …..अनेकांचा असता पण इतका परफेक्ट खचितच कुणाला जमत शब्दात पकडना ……..शेवतच्या ओळी भावल्या ….!!
  keep it up..!!

  • अरे बापरे.. नको.. मी आपला साधा सरळ इंजिनिअरच बरा. काय वाटेल ते लिहिलं की झालं.. धन्यवाद

 17. vishal kamble says:

  khupach chan….. swabhavaa aushad nahi…
  pun kaka jar tumchya mitrane tumhala char vela cal kela hota, tar tumhi cal back karayla hawa hota (jari tumchya kade no. save nhavta taripu…)
  🙂

  • विशाल,
   तिन चार तास फोन बंद असला, की कमित कमी ५० एक तरी मिस्ड कॉल्स असतात, सगळ्यांनाच कॉल बॅक करणे शक्य होत नाही. मग जे माहितीतले आहेत त्यांना फोन केला जातो.. 🙂

 18. Smita says:

  khoopach complex vishay nivaDalat aaj, khara tar kuThalyach gaNeetanmadhye na basaNara, tyamuLe no comments:-) puN hishob visarana he sagaLyat masta strategy ahe, apalyala vaTala tar moThee gift deun takavee jaree gaNeetat basat nasalee taree . chaan vaTata kadhe kadhee swatasaThee asa vagala kee.

  • स्मिता
   अगदी माझ्या मनातलं वाक्य लिहिलंय, मी न लिहिलेले, पण मला जे लिहायचं होतं ते!
   आपल्याकडुन जितकं जास्तित जास्त होत असेल तेवढं करायचं बस्स!!!
   नेहेमीपेक्षा वेगळं वागलं की छान तर वाटतंच..:) धन्यवाद..

 19. Ashwini says:

  Swabhav kharch far mahhtwacha asto nahi, swabhav badlat nahi pan update matra hot asto…jam bhayanak astat hya phases…ata hech paha..lagna adhi ani nantar, pudhe mul zalyawar, mag ti mothi hotana wagaire wagaire…

  • अश्विनी
   आसपास घडणाऱ्या घटनांचा स्वभावावर निश्चितच परिणाम होत असतो. माझ्या मित्राचा अनुभव हा एक त्याचेच उदाहरण आहे. स्वभाव बदलत नाही असे नाही– नक्कीच बदलत असतो ,सिच्युएशन प्रमाणे स्वभावात बदल हे होतच असतात असे वाटते मला तरी. एखादी सासू सुनेच्या आईसमोर सुनेशी कित्ती प्रेमाने वागते नाही का? हे त्याचेच उदाहरण:)

 20. मान अपमान व अपेक्षाभंगाचे हिशोब तर अजुन वेगळेच असतात. काही माणस स्वत:लाही माफ करु शकत नाहीत. आठवा “मास्तर स्वत:लाही सोडल नाही”
  बुंदसे गयी वो हौदसे नही आती । हाही एक हिशोबच आहे. जोपर्यंत तुमच्या कडे उपयुक्तता मूल्य वा उपद्रव मुल्य आहे तोपर्यंतच तुम्हाला किंमत आहे वा तुम्ही दखलपात्र आहात ती नसेल तर तुम्हाला कुत्रही विचारणार नाही.
  एका मैत्रिणीला फोन करत होतो तर कट व्हायचा मला वाटायचे कि तांत्रिक कारणामुळे कट होतो आहे. शेवटी तिला मला अप्रत्यक्ष रित्या सांगायला लागल कि मला तुझ्याशी बोलायचे नाही. मी पोलिस बिनतारी विभागाच्या लाईन कम्युनिकेश विभागात काम करत असूनही मला ही बाब समजली नाही याच दु:ख अधिक झाल. नंतर एकदा ती भेटली तेव्हा अर्थात मी स्वत:हुन बोललोच नाही. पण ती जणु काही झालच नाही असे समजून बोलायला आली मी घुश्यातच. स्वत:ला व इतरांना माफ करता आल पाहिजे अस मात्र तिने आवर्जुन सांगितल.
  जालावर तर हिशोब चुकते करणे हे सर्व परिचित आहे. कुठले कुठले मागचे हिशेब नोंद करुन ठेवलेले असतात.
  महेंद्र जी मला ही या गणितात नापास व्हायचय पण आमच्यातला चिकित्सक तसे करु देत नाही ही माझी मलाच मोठी शोकांतिका वाटते

 21. अप्रतीम ! खरंच इतकं छान वर्णन केलंयत तुम्ही आणि गणित सुधा छान मांडलंयत! Good! Very Good and thoughtful.
  Apurva
  http://ajstates.blogspot.com

 22. Hemant Pandey says:

  हा! हा! हा! काका, एक दम खल्लास विषय जमलाय. स्वभाव हा सापेक्षच. निव्वळ पाहणार्याच्या नजरेतूनच. अत्यंत सुबक पद्धतीने, क्रमवार विषय रंगवलाय. रम घेतल्यावर डोक्याला गार वारे लागून, हळुवार किक बसावी अगदी तसेच. मजा आली.
  काका, एक सजेशन, ब्लोग्गिंगच्या या विषयं वर एखादं पुस्तक रिलीज केले तर? अगदी कुठलेही पण उघडा आणि वाचा, ( वपुर्जा!). कोणीतरी ब्लोग्गर आज उद्या करेलच. मग तुम्ही पहिला नंबर पटकावण्याचा मान घ्यावा असे मनो मन वाटते. हा लेख वाचून मजा आली.!

 23. स्नेहल says:

  या बाबतीत खरच लिहिलात काका बरच झाले ह्या विषयी मला खूप दा असे मनात येते आपण आपल्या जिव्हाळ्याच्या नात्यान मध्ये पण इतके प्रक्टिकल का होतो? बरयाच लोकां मध्ये पण मी हा प्रकार कि सांगताना एखाद्या गोष्टीही किमत सांगून मिरवतात किवा, कुठली आहे म्हणजे इम्पोर्टेड आहे वगैरे बोलून बोलतात
  नक्की त्यातून काय प्रदर्शित करायचे असते तेच नाही कळत
  एकदा एका लग्नाला मला पाठी राखीन बनवल आणि चक्क सांगितले कि या पाकीटावरील नाव लिही, मला खूप अवघडल्या सारखे वाटत राहिले पूर्ण वेळ, मग एकीला बकरा बनवून मी मी कल्टी मारली

  • स्नेहल

   प्रॅक्टीकल फार जास्त होतो असे मला पण वाटते. कदाचित ती काळाची गरज पण असेल.
   यावर एकच उपाय, आपल्याकडून जेवढं जास्तित जास्त शक्य होईल तेवढं करणॆ बस..

 24. mejwani says:

  tumache lekh nehamich vichar karayala lavnare asatat ,lekh aggadi manapasun avadala 🙂

 25. मान गये आपकी पारखी नजर और ये लेख दोनोको…. 🙂

 26. रोहन says:

  खरंय तुझ… ह्या विचारातूनच मी माझ्या लग्नाला वही ठेवलीच नाही… 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s