तो भारताचा…..

सकाळी उठला, आणि बायकोने समोर केलेला चहाचा कप हातात घेतला. घड्याळाकडे पाहिलं.. सकाळचे ४ वाजले होते. आपल्याला ४ वाजता चहाचा कप हाती देते म्हणजे ती नक्कीच साडे तिनला उठली असेल. त्याला उगाच कसंतरी झालं. इतके नोकर घरी असतांना तिने उठायची गरज काय?

चहाचा कप हातातून घेतला आणि पंधरा मिनटात तयार होऊन जिम कडे पाय वळले. कमीतकमी दिड तास तरी वर्क आऊट करावं लागेल. लहानपणी बरं होतं, दिवसभर खेळणं असायचं, आणि त्यामुळे व्यायाम हा आपोआप  व्हायचा. पण हल्ली फिजिओ च्या देखरेखी खाली व्यायाम करावा लागतो. लहानपणापासूनचं आपलं आयुष्य क्षणात त्याच्या नजरे समोरुन सर्रकन गेलं.

त्या ग्राउंड मधे प्रॅक्टीस केल्यावर विन्या सोबत समोरच्या अन्ना कडे खाल्लेला वडा पाव. अन्नाचं पण बरं होतं, चांगला खेळलो, असं त्याला समजलं की वडापाव फ्री द्यायचा तो! अजूनही वडा पाव तर आवडतोच आपल्याला. अरे हाडाचा मुंबईकर आहे – त्याला स्वतःचंच हासू आलं.. की ” आपल्याला  वडा पाव आवडतो” ही पण बातमीच आहे नां. त्या अन्ना कडे अजूनही लोकं माझ्या आवडीचा वडापाव वाला म्हणून ओळखतात. गम्मतच आहे !

आपलं शहर म्हणून या शहरावर खूप प्रेम केलंय. कोणी पुरावा मागेल, की तुझं प्रेम आहेमुंबईवर  याचा पुरावा दे, तर ते मात्र शक्य होणार नाही. माझं या शहरावर अगदी मनापासून प्रेम आहे- पण जेंव्हा मी मुंबई माझी- मुंबई सगळ्या भारतीयांची- तेंव्हा मात्र काही लोकांचा उठलेला पोटशूळ , आणि त्यांनी केलेल्या कॉमेंट्स यांनी मात्र खूप मनस्ताप झाला होता. अर्थात त्या बद्दल काही कम्पेंट नाही माझी. एकच सांगावंसं वाटतंय, अरे बाबांनॊ, तुम्ही माझ्यावर किंवा मुंबई वर जितकं प्रेम करता, तितकंच किंबहुना  त्यापेक्षा कंकणभर जास्तच प्रेम करतो मी  मुंबईवर आणि तुमच्यावर.

फिजिओ थेरेपिस्ट व्यायाम करवून घेत होता. मनगट, कोपर सगळ्या जॉंईंट्सचे व्यायाम करवून घेत होता. कोपरावरच्या टेनिस एल्बो च्या ऑपरेशनच्या जखमेची खूण दिसली आणि त्याला एकदम उदास वाटू लागलं. अरे आयुष्यभर केलं काय आपण? तर क्रिकेट खेळलो, तो पण कधीही कुठलाही , कोणाशीही कॉम्प्रोमाइझ न करता.  इतक्या खेळाडूंची मॅचफिक्सिंग मधे नांवं आली , पण आपण मात्र त्यापासून कटाक्षाने दूर राहिलो. शेवटी आईबाबांचे संस्कार आपण महत्वाचे समजलो- पैशा पेक्षा पण!

बाबा गेले होते चार वर्षापूर्वी, तेंव्हा ती इंग्लंडला मारलेली सेंच्युरी, आणि तेंव्हा जेंव्हा बॅट वर करून बाबांना अभिवादन केले होते, तो क्षण पुन्हा एकदा अनुभवायचा आहे. वडिलांची नुसती आठवण जरी आली, तरी एक प्रकारचं मानसिक बळ मिळतं. आपण बरेचदा  ५०/१०० रन्स  झाले की वर आभाळाकडे पाहून अभिवादन करतो – ते का ? हे लोकांच्या लक्षात येत असेल का??

इतकी वर्ष आपण खेळतोय, काही लोकं म्हणतील की बिसीसीआय च्या संघासाठी खेळतो, किंवा पैशांसाठी खेळतो. पण माझ्या मनात मात्र मी जेंव्हा मैदानावर उतरतो तेंव्हा आपल्या  देशासाठी खेळतोय ही भावना असते.  पैशाचा काही लोभ नाही फारसा मला , आज हे सांगावंसं वाटतंय कारण आज खूप मानसिक दडपण आहे माझ्यावर. पैसा खूप कमावला जाहीरातीं मधून, वन डे, आणि इतर बऱ्याच मॅचेस पासून. जाहीराती करतांना पण गुटखा, सिगरेट आणि दारूच्या जाहीराती केल्या नाहीत कधी.  कारण पुन्हा संस्कार.. जे माझ्या मुलांनी करू नये असे वाटते ते मी इतरांना पण करा म्हणून सांगणार नाही – असं जेंव्हा त्या दारूच्या कंपनीवाल्याला सांगितलं, तेंव्हा ते पण पुन्हा बातमी मधे आलं. पर्सनल लाईफ काही आहे की नाही?

बरेचदा अस्वस्थ होतं, की आपण जे काही करतो ते स्वतः पुररतं राहू का शकत नाही? मुंबईचा जुना खेळाडू अहमदाबादच्या हॉस्पिटल मधे होता, त्याला काही पैशाची गरज होती. मित्र म्हणून त्याला भेटायला गेलो, तेंव्हा तिथे पण मिडीया होताच . स्वतःचं पर्सनल लाइफ काही शिल्लक राहिलेलं  नाही आपलं! उगाच उदास वाटलं त्याला.

व्यायाम पुर्ण झाला, आज परिक्षेची घडी. त्याला तो काही वर्षा पुर्वीचा प्रसंग आठवला  – वानखेडे स्टेडीयम वरचा. तेंव्हा टेनिस एल्बो ने हात दुखायचा खूप. पण तशाही परीस्थिती मधे खेळायचो आपण. त्या मॅच मधे आऊट झाल्यावर स्टॆडीयम मधल्या प्रेक्षकांनी उडवलेली हुर्यो, तेंव्हा खरंच खूप वाईट वाटलं होतं. वानखेडे चं माझं ग्राउंड आहे, आणि त्याच ठिकाणी माझ्याच प्रेक्षकांनी माझी अशी टिंगल केलेली   जिव्हारी लागली . काही लोकांना तर वाटलं की हा संपला आता. याची कारकिर्द संपली! पण  त्या लोकांनी केलेल्या टिंगलीचा   एक फायदा  झाला, काही दिवसासाठी क्रिकेट पासून दूर राहून इंग्लंडला जाऊन   टेनिस एल्बोच्या ऑपरेशन  केले होते , आणि त्या नंतर मात्र एकदम फिट झालोय आपण.

अब तन ९९ ! आज पर्यंत ९९ सेंच्युरी झाल्या आहेत. हात पण चांगला झालाय, मनःस्थिती पण चांगली आहेच. लोकांच्या शुभेच्छांचं पाठबळ पण आहेच- आता शंभरावी सेंच्युरी कधी आणि कुठे होते हे पहायचं.

इथे आज दुपारची मॅच आहे त्या मधे सेंच्युरी व्हावी  अशी सगळ्या देशाची इच्छा आहे. वर आभाळाकडे बघावं म्हणून मान वर उचलली, तर वर जिम चं छत होतं.. दुप्पट जोमाने तो ट्रेडमिल वर चालत होता, एखादा शिपाई जसा युद्धाची तयारी करतांना आपली शस्त्र चेक करतो, त्याप्रमाणे  स्वतःला मानसिक आणि शारीरिक रीत्या तयार करत होता तो.. कसंही करून आज मात्र …………………………….

( त्याची मनःस्थिती काय असेल आज? ह्याचा विचार मनात आला आणि हा लेख लिहिलाय. अजुन मॅच सुरु व्हायची आहे- तो सध्या कुठल्या मानसिक द्वंद्वातून जात असेल याची कल्पनाच करू शकत नाही आपण. तेंव्हा मित्रांनो, काहीही झालं, तरी त्याला साथ द्या.. कारण तो आहे भारताचा, आणि भारत पण त्याचा..   तो आहे “आपला”………………. )
जय हो..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ. Bookmark the permalink.

36 Responses to तो भारताचा…..

 1. Smita says:

  chaan zalay lekh! very timely too…

  kityek lok aaj tyana kashe century marleech pahj he boltayat tavatavene, tumhee jara vegaLa perspective mandalat.

  • माझ्या मनात सकाळपासून येतंय की त्याला काय वाटत असेल? चांगलं खेळायची इच्छा तर नेहेमीच असते, त्याच्या मनावर किती दडपण असेल हे समजूच शकत नाही आपण. १०० झालेतरीठिक, नाही तरी ठिक.. 🙂

 2. sarika says:

  आपल्याला आवडलं हे…तुमच्या मनातून त्याच्या मनातलं…..जय हो…!!

  • सारीका
   मनःपुर्वक आभार.. 🙂 शेवटी तो पण एक माणूसच आहे.. त्याला पण भावना असतिलचं की !

 3. Gurunath says:

  काटा आला हो अंगावर!!!.

 4. वाह..अगदी अगदी असेच विचार आता त्या सचिनच्या मनात येत असतील…. खुप छान लिहिलंय काका. अग बाई अरेच्चामधली मनातलं कळण्याची शक्ती तुम्हाला मिळाली की काय..? 😀 😀

 5. हेरंब says:

  >> कारण तो आहे भारताचा, आणि भारत पण त्याचा.. तो आहे “आपला”………………. )

  + १११११११

  यातच सारं आलं !

 6. kanchangund says:

  tyane aaj 100 karo kiva na karo…. We love him always…. Right….???? So don’t worry, be relax………. Aajcha batmyat bolle na he is not only SUPERHERO, He is God of Cricket….. Pan ekach apeksha ahe…. Aaj ya Herosathi sagalyani milun ha world cup jinkala pahije………..

 7. Aparna says:

  मस्त पोस्ट काका…अगदी (त्याच्या) मनातले….

 8. Nikhil Bellarykar says:

  Best post indeed! He sarv kahi ata satkarani lagla!!! Apan WC 2011 Jinkalo! No offense intended, pan sarkha sarkha WC 1983 aikun vaitaglo hoto. Aj WC 2011 jinkalo, ani anand aganit zala!!

 9. Tanvi says:

  महेंद्रजी सचिनचे १०० भलेही झाले नाहीत पण विश्वचषक जिंकल्यानंतर तो ज्या पद्धतीने मैदानात आला, आणि सगळ्यांनी त्याला उचलून घेतले…. अश्रू न आवरलेल्या युवराजकडे तो सगळ्या गर्दीतून वाट काढत गेला आणि त्याला घट्ट मिठीत घेऊन पाठीवर थोपटले… आहाहा…. मोठा भाऊ जसा तो संघाचा….

  त्याचा मोठेपणा या न त्या रूपात सतत सामोरा येतोच!!

  पोस्ट आवडली!! 🙂

  • सचिनच्या मोठेपणाला तोड नाही. कितीही झालं तरी या विजयाचा शिल्पकार तो व्हायला हवा, असे प्रत्येकालाच वाटत होते, पण इश्वरेच्छा बलीयसी!!

 10. RaniSarkar says:

  agdi tyachya manat utrun lihilay ………………aplya kade fakt gharchech apeksha karatat tari kadhi kadhi prachanda dadpan yeta manavar ……..tyachyakade tar sampurna jagachya apeksha ..ahet mhatlyava
  …khara ahe jam pressure asel tyachyahi manavar …….!!
  masst lihilay kaka.]
  abhinanadan …apan world cup jinklyabaddal.!!……

 11. केतकी says:

  खूपच हळवा झालाय लेख. मनाला हात घालून गेला..
  आता आपण जिंकलोय, आणि वर्ल्ड कप आपला झालाय.
  तो कप हातात घेतानाचा सचिनचा चेहेरा पाहून आजही डोळ्यात अश्रू येतायत..आनंदाश्रू..

 12. umesh says:

  Nice MK, you rock

 13. >> कारण तो आहे भारताचा, आणि भारत पण त्याचा.. तो आहे “आपला”… +1

  समाधानाचे आणि १००% तृप्तीचे क्षण क्वचित अनुभवायला मिळतात. सचिनच्या हाती विश्वकप पाहिला तो क्षण असाच दुर्मिळ. संपूर्ण समाधान आणि तृप्तीचा. तुम्ही अंतिम सामन्याआधी हा लेख लिहिलात. त्याच्या ही भावना त्यावेळी काहीश्या अश्याच असतील.

  • अगदी खरं सिद्धार्थ, पण मला सचिनच्य बॅटमधुन फायनल शॉट आवडला असता पहायला.. मला तर त्याचं दुर्दैव वाटतं की तो लवकर आऊट झाला. सेमिफायनल जर तो खेळला नसता , तर मग इथे पोहोचलोच नसतो. पण …. मॅन सपोझेस, गॉड डिस्पोझेस… म्हणतात ते खरंच..

 14. आपल्याला आवडलं हे…तुमच्या मनातून त्याच्या मनातलं…..जय हो…!!+११११११११११

 15. निषाद भिड़े says:

  महेंद्र जीना दंडवत नमस्कार,

  किती तरी दिवसां पासून तुमचे लेख वाचत आहे..
  किती वेळेला लेख सुरेख झाला आहे असे कल्वायचे होते … पण स्वतहाच्या मानत तरी काय आहे ते लिहिणे माला कमीच वाटायचे
  तरी आज हा लेख वाचून मनाला वाटले की तुम्ही दुसराच्या मनाचा उल्लेख किती साधे पणाने केला आहे त्याला दाद मिलायलाच हवी ..

  • निषाद
   ब्लॉग वर स्वागत.. प्रतिक्रिया वाचून उत्साह नक्कीच वाढतो लिहिण्याचा. मनःपुर्वक आभार.

 16. Vishal Dhadge says:

  मनातील इच्छा करतो देव नेहमीच पूर्ण..
  त्याच्या शिवाय जगात आहे सर्वच अपूर्ण !!

  • खरं आहे विशाल..

   • विशाल धाडगे (सचिन वेडा) says:

    धन्यवाद, महेंद्र सर ………….
    सचिन देवानेच आपली वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा पूर्ण केली आहे..
    आणि त्याच्याशिवाय क्रिकेट जगात सर्वच अपूर्ण आहे ना !!!
    आज पुन्हा ब्लॉग वाचला ,म्हणून अभिप्राय नोंदवला ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

 17. geetapawar says:

  me pan mumbaikar,,,,,,, aani aamchi mumbai local!!!!!! mhanlya bar watte, tas mumbai aakhya bhartachi. ho jinklo aapan pan master blaster out jhale hyacha thoda khant jhal. karach …… kaka tumche lekh wachun divas bharacha thakva majha gul karte aani study karych man hote thanku kaka….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s