प्रिय अण्णा…

प्रिय अण्णा,

तुम्ही असं वेड्यासारखं वागाल अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. तुम्ही उ्पोषणाला बसलात-कशाला हो या वयात असे प्रकार करता? तुम्ही पण एक गोष्ट विसरलात, की  देवाला पण करप्ट लोकं  खूप आवडतात, म्हणूनच त्याने पण पहा भारतामधे दहा पैकी नऊ लोकं करप्ट तयार केलेले आहेत. स्वतः करप्ट किंवा करप्शनला हातभार लावणारे आमच्यासारखे!  साधी गोष्ट बघा, रेल्वे रिझर्वेशन, आरटीओ,कार्पोरेशन  , ऑक्र्ट्राय पोस्ट अशा अनंत जागा आहेत की जिथे करप्शन हे अगदी एखाद्या धर्मग्रंथा प्रमाणे पूजले जाते- पालन केले जाते. अहो अण्णा,  एकदा मी एमईएस ( मिल्ट्री इंजिनिअरींग सर्व्हिसेस ) मधे कामानिमित्त गेलो होतो, तर तिथे   एक ठेकेदार भेटला ,   म्हणाला, ये तो “मनी इटींग सर्व्हिसेस” है. सांगायचं तात्पर्य एवढंच की आज प्रत्येकच माणुस हा कुठे न  कुठे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यात आपला खारीचा वाटा उचलत असतो.

अहो  अण्णा- सगळे नंगे असलेल्या हमामात तुम्ही कपडे घालून उतरण्याचा  वेडेपणा कसा काय केलात?    हे सगळे नंगे  असलेले लोक प्रतिनिधी , तुमच्या अंगावरचे कपडे फाड्ण्याचा प्रयत्न करतील बघा आता! त्यांच्या हमामात एक नियम आहे, एकमेकांच्या  कंबरेखाली  बघायचं नाही, पण तुम्ही तिथे जाऊन  नियम मोडलात, आता तुम्ही तसं केल्यावर ते सगळे आता चवताळून  उठतील बघा.. ते गप्प बसणार नाहीत!.चोर चोर मौसेरे भाई. सगळे लोकं , सत्ताधारी आणि विरोधी लोकं पण एकत्र होतील तुमच्या विरुद्ध!

आजच्या दिवशी बघाल तर जवळपास ९० टक्के लोकप्रतिनिधी हे कुठल्या ना कुठल्या करप्शनच्या चार्जेस मधे  लिप्त आहेत, आणि जे  १० टक्के यात नाहीत ते पण काही स्वच्छ चारित्र्याचे आहेत असे नाही- पण जो पर्यंत सापडत नाही, तो पर्यंत त्यांना चोर म्हणायचे  नाही, हा  नियम  असल्याने तसे म्हणता येत नाही..

आम्ही सगळे फेसबुक कर, मायबोली कर, मिपा कर, मिम कर सगळ्या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा द्या  म्हणून वातावरण निर्मिती करत आहोत.फेसबुक वर तर बऱ्याच लोकांनी तुमचे फोटो पण लावले आहेत प्रोफाईल वर, तुम्हाला पाठिंबा म्हणून. काही ठिकाणी रस्त्यावर बरेच लोकं डोक्यावर गांधीटॊपी घालून ( त्यावर लिहलं आहे, मी अण्णा हजारे म्हणून) काही लोकांनी तर डॊकं भादरून त्यावर अण्णा हजारे कोरलं आहे. इतका पाठिंबा दिला जातोय अण्णा तुम्हाला. माझं तर मन भरून आलं हे सगळं पाहिल्यावर. कित्ती हो पाठिंबा दिला जातोय तुम्हाला!

आता तुम्हाला पाठिंबा द्यायचा म्हणजे काय करायचं हो अण्णा?? आम्हाला तुम्ही जे काही करताय त्याबद्दल नक्कीच अभिमान आहे ,  आमची पण काही तरी करायची इच्छा असते हो,   पण अण्णा, काय करावं हेच समजत नाही. मग आम्ही शेवटी  आमच्या पद्धतीनी तुम्हाला देतो पाठिंबा.

एक सांगतो अण्णा,  शेवटी रक्तात भिनलेला हा करप्शनचा रोग काही सहजासहजी बाहेर निघू शकत नाही  हो आमच्या अंगातून.  आता कालचीच गोष्ट , सिग्नल जंपिंग केल्यावर पोलिसाने पकडले असता, त्याला ५० रुपये देऊन मांडवली करून आम्ही पुढे निघालॊ. ( नाहीतर पुन्हा त्या कोर्टात जा, एक दिवस कॅज्युअल लिव्ह वाया घालवा, वगैरे वगैरे अनंत त्रास असतात हो )  बरं, नंतर रात्रीच्या ट्रेन मधे एक बर्थ हवा होता मित्राच्या बाबांना, तो पण आम्ही मॅनेज करून दिला त्यांना- आता काय करणार अण्णा, त्याच वय ८० , रिझर्वेशन शिवाय प्रवास कसा जमेल त्यांना, शेवटी दिले टीटीला पाचशे रुपये…..पण अण्णा,असे घाबरू नका हो  , आम्ही आहोत तुमच्याच बरोबर.. आमचा पाठिंबा आहे ना तुम्हाला!!! अगदी पूर्ण पाठिंबा!

बरेच लोकं तुमच्या समर्थनार्थ एक दिवस उपवास करणार आहेत तुमच्या समर्थनार्थ! पण या सगळ्या मुळे काय होईल अण्णा?? तुम्हाला काय वाटतं, की हे गेंड्याच्या कातडीचे लोकं तुमच्याकडे लक्ष देतील?? लोकपाल विधेयक सहजपणे परीत होईल? जी गोष्ट गेले कित्तेक वर्ष  (१९६९ पासून )होऊ शकली नाही ती आता होईल?? अजिबात नाही, तुमचा गैरसमज आहे हा- काही होणार नाही ही काळ्या दगडा वरची रेघ आहे हो. मग हे सगळं तुम्हाला कळत असतांना पण तुम्ही कशाला उपोषण करता हो??

आणि समजा तुमची जीत  झालीच,( जे असंभव आहे ) आणि लोकपाल विधेयक मंजूर झाले  आणि निवडून आलेला  लोकपाल भ्रष्ट निघाला तर? अहो कुठे अंत आहे या गोष्टीला? आज इतके सह्याजी राव आहेत, (स्पेशल एक्झिक्युटीव्ह मॅजिस्ट्रेट्स, ) जे आपल्या सुमो वर पितळेची पाटी लावून फिरतात ते गुंठा मंत्री म्हणतोय मी त्यांच्या प्रमाणे अजिबात महत्व नसलेले पद, किंवा मुंबईचा शेरीफ वगैरे अ्शा अनेक पदांप्रमाणे   किंवा राष्ट्रपती प्रमाणे फक्त समारंभात उभे राहून पद्मश्री , वगैरे देण्यापलीकडे कुठलेही  काम  नसलेल्या पदा प्रमाणेच आपले ’लोकपाल’ पण केवळ रबरस्टॅंप बनून राहणार नाही हे कशावरून ?

यावरून आठवलं, आचार्य अत्र्यांना जेंव्हा हे जेपी ( याचा लॉंग फॉर्म काय होता ते कोणीतरी सांगा माहीत असेल तर ) पद दिलं गेलं होतं,  आणि जेंव्हा त्यांनी आपलं नांव गाव गुंडांच्या सोबत पाहिलं तेंव्हा त्यांनी जाहीर सभा बोलावली होती शिवाजी पार्कात आणि गटरचं मेन होल उघडून त्यात ते सर्टीफिेकेट टाकलं होतं. तशी वेळ येऊ नये इतकीच इच्छा आहे आमची.

आजच्याच पेपर मधे शिवसेनेचा एक कोणी जैन आहे, त्याने म्हंटलं आहे की तुम्हाला असे उपोषण करण्याचा अधिकार नाही, कारण तुमच्या पण ट्रस्ट वर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्या जैनाला   तुम्ही कुठलीही पब्लिक पोस्ट, अधिकाराचे पद, मंत्री पद , आमदारकी वगैरे घेतलेली नाही हे कसं काय लक्षात येत नाही? की देवाने जीभ दिलेली आहे नां, मग उचलली  जीभ की लावली टाळ्याला- असं काही तरी बोलायचं, की पेपरवाले पण त्याला प्रसिद्धी देतातच!आपण एखाद्या राजकीय पक्षाचे असलो, की आपणच सगळ्यात जास्त अक्कलवान आहोत आणि   काहीही बोलण्याचा अधिकार आहे असं वाटतं काही लोकांना.

असं जरी असलं तरी आमचा पाठिंबा आहे ना तुम्हाला. अण्णा, अहो पाठिंबा देणं सगळ्यात सोपं असतं करायचं काहीच नसतं, फक्त तोंडाची वाफ दवडली की झालं ! सारखं, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे हो  म्हणून म्हणत रहायचं, फेसबुकावर, माबो , मिपा, मिम वर आपले पोस्ट टाकायचे, आपल्या ब्लॉग वर पण काय वाटेल ते लिहित रहायचं – आम्ही आहोत हो अण्णा, आमच्या पद्धतीनेच तुम्हाला पाठिंबा द्यायला.

अण्णा, अहो आता आयपीएल सुरु होणार आहे, मग कोणाला वेळ आहे तुमच्या कडे बघायला. इकडे खायला नसलं, तरी चालेल, पण भारतीय जनता मात्र क्रिकेट सुरु झालं की मरायला टेकायलेल्या बापाच्या तोंडात गंगाजल घालायची वेळ आली, तरीही म्हणतील- ” थांब, एवढी ओव्हर होऊ दे” . अशा परिस्थितीत तुमच्या आंदोलनाची हवा पूर्ण निघून जाणार आहे.

आज आम्ही सगळे जे बोंबलतोय, की तुम्हाला पाठिंबा द्या म्हणून, तेच आम्ही सगळे क्रिकेटवर गप्पा सुरु करू सगळ्या ठिकाणी. पण अण्णा, तुम्हाला आमचा पाठिंबा असेलच हो…

आज मला तो घासून गुळगुळीत झालेला डायलॉग ” शिवाजी ने जन्म घ्यावा, शेजारच्या घरी, जिजाऊ असावी, पण दुसऱ्याची आई” !आठवतोय. तुम्ही लढा हो  अण्णा, अगदी प्राणांतिक उपोषण करा, अगदी मनमोहन जरी आले तरी किंवा सोनिया जरी आल्या तरीही तुम्ही उपोषण सोडू नका बरं कां!!  आम्ही आहोत नां, तुम्हाला पाठिंबा देत मागे उभे, “तुम लढॊ अण्णा, हम है कपडे सम्भालनेकू”..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय... Bookmark the permalink.

82 Responses to प्रिय अण्णा…

 1. jyoti says:

  ह्म्म्मम्म …. 😦

  • ज्योती
   मी पण असाच हेल्पलेस झालोय. 😦

   • स्नेहल says:

    मी पण करपटेड आहे, कारण मी पण करप्शन ला पाठींबा दिलाय कुठल्याना कुठल्या वेळी ज्यावेळी आपलं काम लवकर करायचे असते तेव्हा, खूप चुकीचे वागतो आपण पण बरोबर वागायचे ठरवले
    तरी नाही वागता येत… काय करायचे? 😦

    • इतकी जाणीव झाली, आता त्याप्रमाणे शक्यतितक्या वेळेस करप्शन टाळता येईल का ते बघायचे..

 2. sajan rajput says:

  anna yashsvi howo agar na howo te tyanche kam kartahet, tumhi amhi kay kartoy “bolachach bhat ani………………………..”

  • मित्रा
   मला पण तेच म्हणायचंय. आपण काय करतोय हे महत्वाचे. त्यांच्या सपोर्ट साठी जर सगळ्या भारतीयांनी एक दिवस उपोषण केले – त्यांच्या सभोवताली बसून तर ते जास्त योग्य होईल . तो खरा सपोर्ट होईल की ज्याची नोंद घेतली जाईल मिडीयातर्फे पण.

 3. umesh says:

  jyoti correctly said hummmmm

 4. अण्णांच्या आंदोलनाला पुर्ण पाठींबा….

  काही तरी चांगलं घडायची काडीचीही शक्यता असेल, तरी त्याला पुर्ण समर्थन…. 🙂

  • सुहास
   अरे मला हेच म्हणायचंय, कसलं समर्थन करतोय आपण?? फेस बुक वर त्यांचे फोटो लावून काय होणार? आपण काही करूच शकत नाही ह्या भावनेमुळे वैफल्य आलंय..

 5. ajayshripad says:

  “आहो आण्णा काळजी नका करु, खरच आम्ही आहोत तुम्च्यासोबत..!” दादा फक्त वाईट वाटतय ते एकाच गोष्टिच, आपण सगळे कसा का होईना पाठिँबा देतोय पण खुप लोक असे आहेत ज्याँना ही चळवळ पुर्न होउच द्यायची नाहीये..!

  • अजय
   पाठींबा द्यायलाच हवा- पण कसा?? हे असे फेस बुक वर त्यांचे फोटो लावून? की त्यांच्या कार्यात त्यांना मदत करून? किती लोकं सध्या आहेत त्यांच्या शेजारी बसलेले?? हजार? दोन हजार? तिन हजार?? किती दिसले तुला टिव्ही वर??

 6. prashant says:

  Whatever Anna doing is right!! He is the only one person who is actually fighting against corruption, we do not have any right to talk like this about Anna, we are very busy with our work and we do not have time to do anything for our country, and if he is doing something we should support him… I AM SUPPORTING ANNA….!!!!

  • प्रशांत
   अण्णा चुकीचं करताहेत असं कोणीच म्हणत नाही. फक्त गाईड मधल्या देवानंद प्रमाणे त्यांची अवस्था होऊ नये एवढंच वाटतं. आपण त्यांच्याकडून कसली अपेक्षा करतोय?? ” आमरण उपोषणाची”? का म्हणून त्यांनी मरावं आपल्या सारख्या स्पाइन लेस गांडूळांसाठी?? का ?? कदाचित आवडणार नाही तुम्हाला, पण एक सांगतो आपण सगळे स्पाइनलेस क्रिचर्स आहोत- फक्त वळवळ करणारे…. अंगावर मिठ पडल्यासारखे अशी एखादी घटना घडली की आमची वळवळ वाढते -इतकंच! जर खरंच सपोर्ट करायचा, तर काय काय केलं जाऊ शकतं याचा विचार करायला हवा, इतकंच माझं म्हणणं आहे. आणि ते लोकांपर्यंत पोहोचवावे म्हणून हे पोस्ट लिहिलंय.

   • गांडुळाची उपमा एकदम चपखल!
    लेखही उत्तम लिहिलाय.
    भ्रष्टाचार हा सद्द्या शिष्टाचार झालाय..इतका तो लोकांच्या रक्तात भिनलाय.
    तरीही बहुसंख्यांकांचे म्हणणे हेच…मी काय तो स्वच्छ आणि बाकी सगळे भ्रष्ट!

    • प्रमोदजी,
     मी करतोय ते फार मोठं करप्शन नाहीच, खरे करप्ट लोकं तर राजकारणी आहेत असा विचार प्रत्येकच माणूस करतो.
     आणि म्हणूनच इतरांवर आरोप करतांना फार त्वेश असतो मनात .
     आभार..

 7. Anna is great.What small peoplecan say about him? But about onething I am sure. The fight against corruption is not against a government body, bu against the tendency of the people not to move from their corrupt practices,Why negtiate wih the govt. for election of lokpal. etc.?

 8. महेंद्रजी! आम्हा पाठिंबा, पाठिंबा करणार्‍यांची कातडी चांगली सोलवटलीत हो तुम्ही! अगदी पटलं! १०१++++++++१%

  • विनायकजी
   अहो तसं नाही, आपण काय करू शकतो याचा विचार करायला हवा, आणि नेमकं हेच सगळ्यांसाठी पोहोचवायला ही अशी भाषा वापरावी लागली.किती लोकांनी मंत्र्यांच्या , आमदारांचा निषेध केला? एकातरी?? अजूनही आपण सगळे अण्णांना पाठिंबा आहे म्हणतो आणि सोबतच त्या नेत्यांच्या विरुद्ध एक शब्द ऐकायला तयार नसतो.
   ज्या नेत्यांनी पाठिंबा दिलाय त्यांनी आपली संपत्ती कशी वाढली गेल्या दहा वर्षात याचा हिशोब मागितलाय कोणी?? तो त्यांनी द्यावा, आणि मग नंतरच पाठिंबा घोषित करावा..

 9. samidha says:

  Very correct. We love anna but what do we expext from him? Hunger strike till death? He should not become dev anand in guide. What way can we support him? You made me think abut this issue. Great post.

 10. Gurunath says:

  स्तब्ध, निःशब्द, नंब, येडा…… अंतर्मुख इत्यादी सगळे झालो आहे रावसाहेब, काय बोलणार, प्रशासनात (मेहनतीने मौका मिळवुन दिलाच तर) गेलो तर किती ऊर फ़ोडुन गटारे उपसायची आहेत हे कळते आहे आजकाल तरी ही आमचा “दुर्दम्य आशावाद” काही हारत नाहीए!!!!!, कुठेतरी जिद्द आहे अण्णांसहीत सामान्य माणसाला आपला वाटेल असा सनदी अधिकारी व्हायची जिद्द आहे!!!!!

  • गुरु
   अरे थोडा विचार करायला हवा आपण. नाही तर कळपातल्या मेंढरा प्रमाणे सगळे म्हणतात पाठिंभा द्या, म्हणून पाठिंबा दिला असं म्हणत फिरायचं यात काही अर्थ आहे का?? अजिबात नाही.
   बरंच करता येऊ शकतं..
   १) सगळ्या मंत्र्यांनी, आय ए एस अधिकाऱ्यांनी आपली संपत्ती किती आहे आणि कुठुन आली हे सांगावं.
   २) सगळ्यांनी अण्णांना पाठिंबा म्हणून कूठेतरी हजारोंच्या संख्येने साखळी उपोषण करावं.
   अशा अनेक कल्पना पुढे येऊ शकतात. काय करावं? हे मला सांगता येणार नाही, पण काहीतरी करायला ह्वं एवढं नक्की… काय ते – ह्याचं ब्रेन्स्ट्रॉरिमिंग व्हावं म्हणून हा सगळा उपद्व्याप!

 11. अवि्नाश says:

  दादा निराश नको होवुस..
  या रात्रीच्या गर्भात उद्याचा उषकाल आहे..

 12. Hemant Pandey says:

  अगोदरच डोकं भण-भणतय! त्यात आपली नाकर्तेपणाची भूमिका. यासगळ्या गदारोळात अन्नान्च्चे उपोषण, त्यातच हि पोस्ट. काका तुमचे हे पोस्ट वाचून, माझी, मलाच लाज वाटायला लागली आहे. एवढं शिकून सावरून शेवटी भ्रष्टाचाराशी दोन हात देखील आपल्यात ताकद आसुनये? आर्मीचे ट्रेनिंग व कमिशन दोन्ही वाया गेले. काहीतरी मार्ग नक्कीच शोधावा लागेल.

  • हेमंत
   धन्यवाद.. इतकी जाणीव झाली हे पण खूप आहे.. 🙂 एकदा जाणिव झाली की मेंदु मधे विचारचक्र सुरु होतात, आणि काहीतरी मार्ग सापडतोच..

 13. आनंद पत्रे says:

  काहीही बदलो अथवा न बदलो… त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे… नाहीतर गेंड्यांची कातडी हाडापेक्षा कठीण होईल.. सध्या परिस्थीती खराब आहे, म्हणून काय अजुन जास्त खराब होऊ द्यायची?
  काहीही असलं तरी राजकिय पक्षांना अण्णांच्या मागे किती लोकं आहेत याची जाणीव तरी व्हायला हवी.. नाहीतर आपण भ्रष्टाचार स्विकारलेलाच आहे… मग थोडा सपोर्ट केला तर काय बिघडते.. काहीही नाही झालं तर आपण आपल्या रुटीनला मोकळे ना.. 😦

  • आनंद
   सपोर्ट करायचा म्हणजे नेमकं काय हाच मुद्दा आहे…
   याचं उत्तर मिळालं, की अण्णांच्या लढ्याला आपली साथ दिली जाऊ शकेल.

 14. bhari jamla aaahe lekh kaka… bhidla aaplyaale!!!

  • वैभव..
   ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार..

   • अहो काका, तुमच्या ब्लॉगवर प्रतिक्रीया लिहतो आहे, ती माझ्या साठी मोठी बाब आहे, आभार कसले मानता त्यात.
    मी पण ह्यावरच माझे विचार मांडले आहे. वाचून जरूर बघा.

 15. अजय. says:

  काय बोलू ?

 16. raj jain says:

  काहीही बदलो अथवा न बदलो… त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे…

  • मान्य!
   सगळ्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवणे, राष्ट्रपती, मुख्यमंत्री सगळ्यांना पत्र पाठवणॆ, ऑन लाइन पिटीशन तयार करणे, वगैरे वगैरे अजून बरंच काही करता येईल का?

 17. मला आजपर्यंत काहीच होऊ शकत नाही असे वाटायचे पण गेले २ दिवस काहीतरी वेगळं वाटतंय. इतकी वर्षे गांधीवादाला शिव्या घालत आलोय पण त्याची ताकद आज पहातोय. प्रत्येक शहरात केंद्र उघडली पाहिजेत. सगळीकडे लोकं उपोषणाला बसली पाहिजेत. मला स्वता:ला मनापासून सहभागी व्हावं वाटतं य. सगळं असह्य झालं आहे. आजवर घराघरात ठिणग्या पेटून विझत होत्या. आज पहिल्यांदा ठिणग्या एकत्र येऊन धूर दिसतोय. वणवा पेटायलाच हवा.

 18. Tanvi says:

  महेंद्रजी शब्द न शब्द पटला तुमच्या पोस्टमधला….

  तरिही सिद्धार्थचेही मत पुर्णपणे पटतेय… आज निदान एक जण उभे रहायची हिंमत करतोय… त्याला पाठिंबा द्यायलाच हवाय ना… म्हणजे निदान पुढच्या वेळेस दुसराही कोणी उभा राहिल आणि कदाचित तो तुम्हा आम्हापैकीच एक असेल….

  पोस्ट मात्र पुर्णत: पटली….

  • तन्वी
   उभे आपण सगळ्यांनीच रहायला हवे. एकट्याचे काम नाही हे. नाहीतर काहीतरी तोंडाला पाने पुसल्याप्रमाणे काहीतरी करून प्रकरण संपवले जाईल

 19. मनोहर says:

  पोलिसांच्या धाकामुळे गुन्हेगारांवर वचक वसतो असे मानणे स्वप्नरंजन नव्हे तर तो बावळटपणा आहे.

 20. परवा बझवर म्हणालो होतो तेच लिहितो. अण्णा करतायत ते अतिशय योग्य आहे आणि त्याला पाठींबाही दिला पाहिजेच. पण ब्लॉग्ज/फेबुमधे वगैरे जे एक वातावरण आहे की इजिप्त झालं, ट्युनिशिया झालं आता भारत !! तर तसं काही होईलसं वाटत नाही. बदल आवश्यक आहेच पण तो असा चुटकीसरशी चमत्कार झाल्याप्रमाणे होईल अशी वेडी *आशा* बाळगायला नको. *अपेक्षा* बाळगण्यास हरकत नाही..

  • अपेक्षा तर प्रत्येकाच्याच मनात आहे. स्वतः काही करायचं नाही, कोणीतरी काहीतरी करेल आणि सिस्टीम सुधारेल असे वाटते लोकांना. इतकं पण स्वप्नरंजन करण्यापेक्षा आपला सहभाग किती असू शकतो ? हे पहाणे महत्वाचे. वातावरणातला ताण एकदम निवळलाय आता. सगळे लोकं विसरले आहेत. एकदा लोकपाल बिल येणार, इतकं सरकारने सांगितलं आणि त्या बरोवर सगळे शांत झाले.

 21. इथल्या कॉमेंट वाचल्या. पण कोणीच असं का म्हणत नाहीये, की यानंतर मी भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार नाही. आता खतपाणी याचा अर्थ, आजपासून मी कोणालाही लाच देणार नाही. लाच घेणारे जितके दुबळे असतात, तितकेच लाच देणारे देखील. बरेचदा आपल्याला लाच द्यायची नसते, पण सिस्टीमची मागणी म्हणून लाच दिली जाते. तेव्हा अश्या ठिकाणी काम व्हायला कितीही वेळ लागला तरी लाच देणार नाही असे आपण का म्हणत नाही. त्याने भ्रष्टाचार विरोधी लढ्यात खूप जास्त मदत होणार आहे असे नाही का तुम्हाला वाटत ?

  • ganesh says:

   u r right..? mala hi tech manhayache aahe ki, aaj paun sagalyani tharvahala have ki konalahi lach denar nahi. tarach corruption virudhacha ladha yashasvi hoil. start from self.

  • नारायणी,
   आभार.. ते कधीच शक्य होणार नाही, जो पर्यंत सामान्य माणूस यात सहभागी होत नाही तो पर्यंत..
   सिस्टीमची मागणी जर कोणीच मान्य केली नाही, तर मग आपोआपच मागणी कमी होईल. पण आज मी देत नाही म्हंटलं, तर इतर दहा लोकं मागे पैसे घेऊन उभे असतात. कसा काय यावर निर्बंध घालता येईल??

  • सुशिला
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
   “अश्या ठिकाणी काम व्हायला कितीही वेळ लागला तरी लाच देणार नाही असे आपण का म्हणत नाही. त्याने भ्रष्टाचार विरोधी लढ्यात खूप जास्त मदत होणार आहे” पुर्ण पणे सहमत आहे..

 22. सुशीला पनवेलकर says:

  तुमच्या सारखं छान लिहिता येत नाही… पण अगदी माझ्या मनातले विचार मांडलेत तुम्ही… बातम्या बघून, फेसबुक वर पोस्ट बघून हाच विचार येत होता कि खरंच काही बदल होणार आहे का…?!! फार छान लिहिले आहे तुम्ही…. धन्यवाद…

 23. Smita says:

  Indian express pahilat ka? celebreties, page 3 sagaLe zadun photo opp saThee hajar!! aNee editorial tar as usual psuedo intellectual…Times style zalay.

  I agree with Heramb, Siddharth above though. pahilyanda apaN “support” sarakha kahitaree evadhya mothya pramanavar pahatoy. kee ha puN small fractionach ahe? evadhya lokasankhyechya deshat facebook var kitee percent asateel ho? puN actually rastyavarhee utarale kahee lok taree, tya meNbattyavalyancha nehameeevaha raag nahe eala yaveLee evadha khara.

  • हो, पाहिला टाइम्स… आणि ते सिलेब्रिटीज पण.
   इतका सपोर्ट ( व्हर्च्युअल का होईना) आपण पहिल्यांदाच पहातोय हे पण खरं. जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे या करप्शनला.
   मला इंदिरा गांधींच्या आणिबाणीच्या वेळेसचा पिरियड आठवतोय. तेंव्हा जरा वचक होता लोकांवर, आणि करप्शन पण नव्हतं इतकं जास्त प्रमाणात.
   मेणबत्त्यांच्या राग नाही आला या वेळेस.. 🙂 मला पण!!

 24. Prasad Tharwal says:

  काका.. अण्णा आता जिंकले जरी असले.. आणि हे विधायक समजा पास जरी झाला… तरी निवडून येणारा लोकपाल हा हाडा – मासाचा माणूसच असेल न.. ‘By Hook or By Crook’ हे भ्रष्ट राजकारणी त्यालाही आपल्याच पंगतीती नेऊन बसवतीलच! मग सांगा काय उप्ल्योग या उपोषणाचा आणि विधायाकाचा…???

  • प्रसाद
   हाच प्रश्न मला पण छळतोय, आज पहा, की सुप्रिम कोर्टाच्या जज वर कोणी आरोप करू शकत नाही. ते सर्वोच्च पदावर आहेत आज – राष्ट्रपतीच्या तोडीचे पद!
   लोकपाल पण असाच एक असेल , समांतर व्यवस्था सुप्रिम कोर्टाला.
   आधी आपल्याकडे पण ज्युरी पद्धत होती. ती कालांतराने बंद करण्यात आली- कारण माहीत नाही, पण वाटतं की ती पद्धत पण चांगली होतीच.

 25. Poorva Kulkarni says:

  konitari pavul pudhe takle pahijech. saglyani nischay kela tar nakkich deshachi pragati hoiel. young generation cha aadarsh kon asnar ?

 26. अरुणा says:

  अगदी खरं लिहिलत तुम्ही. पण या वेळी नव्या तरुण पिढीला पण अण्णांना पठिंबा द्यावासा वाटला, ही चांगली गोष्ट झाली. यातून काही चंगले घडेल अशी आशा करु या,

 27. thanthanpal says:

  आज महाराष्ट्र सोडला तर बाकी भारताच्या आण्णा बद्दल काय भावना आहेत हेपाहणे. आपण ठराविक विषयाच्या भावनेच्या बाहेर विचार करू शकत नाही
  आज अन्ना जी के सच्ची देश्भक्ती की मेहनत रंग लायी|उनके अटल निश्चय के आगे और भारतियों की एकजुटता के आगे इस भ्रष्ट्र सरकार को झुकना पडा|
  मगर इन सबके बीच इस पुरे आयोजन में जहां हम सब मिलकर अपने देश के लिये पर वहां किसी का अहंकार इस पर हावी हो गया|ग्लैमर के आगे हमारी सन्स्कृति हार गयी|किसी के ‘ मै ‘ ने ‘ हम ‘ की भावना को पीछे धकेल दिया|किसी के अहंकार ने एकता को हरा दिया|किसी भी कार्य का आयोजन संगठीत होकर सभी के विचार लेकर करना चाहिये इससे ही आप लंबे समय तक अपने कार्यक्रम को चला सकते हो|
  ये बिल्कुल इतिहास का दोहराव हुआ जब आज़ादी का वक़्त था तब हमारे देश के किसानो,मजदूरों और आम नागरीकों ने बढ-चढकर भाग लिया और जब आज़ादी मिली तो इन नेताओं ने कहा अब तुम जाओ तुम्हारा काम हो गया अब देश को हम सम्हालेन्गे|
  और जब मोमबत्ती रैली के बाद समापन का समय आया तो जब मैने बताना चाहा कि हमारा राष्ट्र्गान देश को गाली है|सही वन्दना वन्दे मातरम है पर लोग यहां सच जानना ही नही चाहते उन्हें ग्लैमर से ही फुर्सत नहीं|खैर मेरा कहना यही है कि अगर आप नींव की ईंट हो तो कन्गुरे कलश बनने का सपना मत देखिये पुरा महल भरभरा के गीर जायेगा|अपना मुल्यांकन स्व़ंयं कीजिये,दुसरों की तारीफ के मोह्ताज मत रहीये|
  जय हिंद जय भारत

  09 April 16:15
  For the first time in our history, a major government law will be drafted by ‘outsiders’………THE PEOPLE !!

  • उत्कॄष्ट कॉमेंट.. अगर आप नींव की ईंट हो तो कन्गुरे कलश बनने का सपना मत देखिये पुरा महल भरभरा के गीर जायेगा|अपना मुल्यांकन स्व़ंयं कीजिये,दुसरों की तारीफ के मोह्ताज मत रही!
   सहमत आहे.

 28. महेश says:

  लेख उत्तम आहे,सर्वाचा (जनतेचा )तरुण मंडळी,पाठीशी आहे,अण्णांनी ह्या वयात कराव लागल त्याला आपले सर्व राजकीय लोकच जबाबदार आहे, ,जनतेचा अंकुश पाहिजेच

  • अण्णांनीच हे सगळं करावं अशी अपेक्षा का करतोय आपण??
   आपण का बरं रोजच्या जिवनातला करप्शन म्हणजे अनव्हॉयडेबल आहे असे समजून चालतो?
   अस्वस्थ करणारा प्रश्न आहे!

 29. लेखाशी सहमत.
  लढायचे आणि भ्रष्टाचार हद्दपार करायचा असेल तर सामान्यजनांना बरेच काही करावे लागेल.
  नाहीतर ,
  कुछ नही होनेवाला…!

  • सामान्य जन कुंपणावर उभे राहून सरड्याप्रमाणे रंग बदलतात. अहो कोणी विचारायची हिम्मत करतो का, भाजपा , कॉंग्रेस, मनसे, शिवसेना वगैरे नेत्यांकडे इतका पैसा कसा आला?
   त्या जयललिता कडे सापडलेल्या साड्य़ा आणि चप्पलवर इतका गदारोळ झाला, पण शेवटी सगळं काही लोकं विसरले आणि तिला पुन्हा निवडूण दिलं.
   येणाऱ्या इलेक्शन मधे फुकट लॅपटॉप देणार म्हणे..
   काय होणार या देशाचं कोण जाणे..

 30. श्रीकांत says:

  खर सांगू दादा आज खरेच आपल्या सर्वांच्या मनातील असंतोष उफाळून बाहेर येत आहे. काळ पर्यंत अगदी असहाय असल्यासारखे वाटत होते. पण आज अचनक अंधार वाट प्रकाशाने उजळली असे वाटते आहे. रात्र वैऱ्याची आहे.उजाडायला वेळ आहे. एक एक पणती पेटवून अंधाराचा नाश करायचा आहे. खारीचा वाट उचलून भ्रष्टाचाराचा नायनाट करून नवी गुढी उभारायची आहे. भारत मातेच्या ऋणातून मुक्त व्हायची हीच तर वेळ आहे

 31. पण आज अण्णा हजारेंना तथाकथित पाठींबा जाहीर कर
  हे सारे तितक्याच छाती ठोक पणे आपल्या सदविवेक बुद्धीला जागून सांगतील काय कि
  आम्ही कधीही आयुष्यात भ्रष्टाचार केला नाही ,,,,,,,
  आणि हे कुणाला मान्य करता येत नसेल तर त्यांनी
  अण्णा हजारेंच्या उपोषणाला ,जनलोक पाल विधेयकाला
  कृपया पाठींबा देवून आणि एका नवा भ्रष्टाचार करू नये हीच विनंती.
  http://raamprahar.blogspot.com/2011/04/blog-post_10.html

 32. plz chek the link below
  त्याचं नेतृत्व नसताना हि औरंग्या महाराष्ट्र ताब्यात घेवू शकला नाही ,,,,,,
  म्हणूनच आज जर हि भ्रष्टाचाराची कीड नाहीशी करायची
  असेल तुम्हाला त्याची गरज वाटत असेल तर ती प्रथम
  स्वतः पासून सुरवात करा
  ठरवा मी आज पासून कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही ,
  त्याला खत पाणी घातलं जाईल अस वर्तन करणार नाही ,
  बस्स या साठी कुठला हि मोठ आंदोलन करायची गरज नाही आणि
  हजारेन सारख्या निस्पृह व्यक्तीना वेठीस धरायची गरज उरणार नाही,
  कुणी तरी आपल्यासाठी लढलं पाहिजे हि
  ह्या डिप्लोमसीतून आता आपणच बाहेर आल पाहिजे,,,,,,
  http://raamprahar.blogspot.com/2011/04/blog-post_09.html

 33. plz chek the link below
  ठीक मी समजू शकतो आपण सारे अण्णा हजारेन बरोबर
  उपोषणाला दिल्लीला नाही जावू शकत पण,,,,,,,,,
  त्यांच्या वतीन येथे मुंबईत ,कुणी पुण्यात,
  वाईत सातार्यात, कोकणात,मालवणात ,गोव्यात
  जिथे राहत असू तिथे तर उपोषणाला तर बसू शकतो,,,,,,,,,,?
  पण नाही आम्ही पुन्हा एकवार सिध्द केल
  शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्याच्या घरात ,,,
  आपल्या घरात हि ब्याद नको,,,,,,
  हि आपली डिप्लोमसी,,,,,,,
  http://raamprahar.blogspot.com/2011/04/3.html

  • सुनिल
   प्रतिक्रिया वाचली.
   आज पर्यंत भ्रष्टाचार केला नाही असा एकही माणूस भारतात सापडणार नाही. कुठे ना कुठे कधी ना कधीतरी भ्र्ष्टाचार हा केलेलाच असतो.
   लोकपाल विधेयक म्हणजे अजून एक नवीन न्याय व्यवस्था. अर्थात आज सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधिशांवर पण झालेले आरोप पाहिले की असंही वाटतं की जर उद्या……….
   असो.. कमित कमी चांगला विचार तरी करायलाच हवा..

  • सुनिल
   प्रतिक्रिया वाचली.
   आज पर्यंत भ्रष्टाचार केला नाही असा एकही माणूस भारतात सापडणार नाही. कुठे ना कुठे कधी ना कधीतरी भ्र्ष्टाचार हा केलेलाच असतो.
   लोकपाल विधेयक म्हणजे अजून एक नवीन न्याय व्यवस्था. अर्थात आज सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधिशांवर पण झालेले आरोप पाहिले की असंही वाटतं की जर उद्या……….
   असो.. कमित कमी चांगला विचार तरी करायलाच हवा..अ

 34. गलिच्छ राजकारणावरचा उपाय स्वच्छ राजकारण करणे हा आहे. कुठलाही राजकारणी चांगला असूच शकत नाही, या भूमिकेचा शेवट हुकुमशाही किंवा अराजकाकडे जातो.

  लोकशाहीत राहण्याची किंमत मोजावी लागते:
  (१) सर्व कर भरणे – १०० प्रकारचे असले तरी, दर अन्याय्य वाटत असले तरी
  (२) मतदान करणे – एकही उमेदवार चांगला नसेल तरी.
  (३) जागरूक राहणे – आपला कराचा पैसा कसा खर्च होतो यावर लक्ष ठेवणे, आपले प्रतिनिधी कसे वागतात यावर लक्ष ठेवणे, अन्याय किंवा गैर प्रकार दिसल्यास आवाज उठवणे,
  (४) चर्चेला तयार असणे – ज्या लोकांचे मत आपल्याला पटत नाही त्यांच्यावर तेवढ्यामुळे राष्ट्राद्रोहाचे (किंवा भांडवलदारांचे बगलबच्चे असल्याचे किंवा …..) आरोप न ठेवता, त्यांनाही आपले म्हणणे मांडायचा आणि त्याचा प्रचार करण्याचा हक्क आहे, याचे भान ठेवणे

  जर आपण अशा पध्दतीने लोकशाहीला सुदृढ करणार नसलो, तर लोकशाहीने आपल्याला अपेक्षित राज्य कारभाराची हमी कशी काय द्यायची?

  तुमची सगळ्यांची मते वाचायला आवडेल.

  • अतुल
   तुमचे मतदानाबद्दलचे विचार पटले. मी बरेचदा हेच विचार मांडत असतो. आजकाल मतदानाचा दिवस म्हणजे सुटीचा दिवस समजून सिनेमा, प्रवास वगैरे प्लान केले जातात. मतदान करायचे तर कोणाला? सगळेच चोर आहेत असा दाखला दिला जातो..दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज केवळ ४० ते ५० टक्के जनता ही लोकप्रतिनिधी निवडून देते. निवडून येण्यासाठी मंगळसूत्र, टीव्ही, कम्प्युटर फ्री देणं हा प्रकार तर नवीनच सुरु झालेला आहे. यावर एकच उपाय, सगळ्यांनी मतदान करा आणि मग पहा ह्या पैसे खर्च करून निवडून येणाऱ्यांचे काय होते ते.

  • मिहीर says:

   अतुल पाटणकर बरोबर म्हणताय..
   त्यातील ” (२) मतदान करणे – एकही उमेदवार चांगला नसेल तरी.” <– या मुद्द्या ला पूरक माहिती म्हणून खालील…
   ..
   मतदान आपला हक्क आहे, आणि तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे.
   जास्तीत जास्त लोकांचा मतदान न करण्याचा कारण असतं कि.. "सगळे उमेदवार फालतू आहेत.. पैसे खाऊ आहेत, काय उपयोग मतदान करून"
   त्यांच्या करता महत्वाची माहिती… :-

   रूल सेक्शन ४९- ओ :
   '४९- ओ' हा त्या मतदाराचा अधिकार आहे, ज्याला असा वाटत कि उमेदवारांपैकी कुठलाच योग्य (सक्षम) नाही. पण तरीही त्याची आपली मतदानात नोंद व्हावी व आपल्या मताचा गैरवापर होऊ नाही अशी इच्छा आहे.
   हा मतदार म्हणून प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि याचा वरील परिस्थितीत उपयोग करणे फार आवश्यक आहे.
   उगाच मतदान करायचा म्हणून, कुणालाही मत देणं बरोबर नाही.
   '४९-ओ" अधिकाराने मतदान केल्यास तुमचा मत, मतदानात मोजण्यात येत.

   अधिक माहिती साठी इथे भेट द्या.
   http://en.wikipedia.org/wiki/49-o
   http://www.voteindia.in/news.php

   • मिहीर
    अतीशय उपयुक्त माहीती.. धन्यवाद..

   • ४९-ओ” अधिकाराने मतदान केल्यास तुमच्याकडून एका अर्जावर सही घेतली जाते, आणि नंतर तुमच्या नावावर कोणाला (बोगस) मत देता येत नाही. हा, आणि एवढाच ४९ओ चा उपयोग आहे असं मला वाटत.

    कारण १००० पैकी ९९९ लोकांनी जरी ४९ओ वापरला, तरी हजाराव्वा मतदार ज्याला मत देईल तो निवडणूक जिंकतो. त्यामुळे राजकीय पक्षांना या ४९ओ चा काहीच धाक वाटणार नाही. त्यांना भाषा कळते ती विरोधी पक्षाला मते देवू शकणाऱ्यांची. एखाद्या तीव्र स्थानिक प्रश्नापाई खेड्यांनी मतदानावर १००% बहिष्कार घातल्याच्या बातम्या दर वर्षी येतात, पण त्यातून ते प्रश्न सुटत नाहीतच.

    जर आपण राजकारण्यांना सांगू शकलो, की आता धर्म, जात, जिल्हा, भाषा वगैरे कारणांनी मत मिळणार नाहीत, फक्त चांगला कारभार करणाऱ्यांना मिळतील, तर? मला वाटत, यांची सत्तापिपासा इतकी जबरदस्त आहे, की माता मिळवण्यासाठी हे आपल्याला चांगला राज्य कारभारही देतील.

 35. Bhalchandra Murari says:

  Sir,
  lekh awadala..tumachya jya bhawana ahet tyach mazyahi ahet.
  Attaparyant Koni Idol sapadat navhata/pudhe yet nawhata…corruption baddal ladhanaya…desh-patalivar..jyala Janata support karel…Jar hach ladha BJP or Opposite party ne suru kela asata..tar kiti lokani support kela asata..???
  Annanchya rupane apanala aata ek Idol milala ahe..tar apan tyana support karuya…!!!
  System badalayachi Takat apalyatach aahe…Election madhe more than 90 % voting kara…JAr aana ni kahi Umedwar Aapanas Idol mhanun dile tar khup changle hoyeel…Jar Kahi Chagle Umedwar asatil tar..tyachi Party vagaire na pahata..tyala Vote karuya..tenvach khute ek changli suruwat hoyeel….Jo paryant Election sathi Jat/Dharm/Language/Money he matter aapan vicharat ghenar nahi ani fakt changla Umedwar Niwadoon denar nahi to paryant..hi system ashich rahil… Chandra Surya aseparyant….kinva Raktpat howun Kranti Hoyeeparyant…!!!
  AAj ek Pratidnya karto ki Mi Swataha Konala Lach denar nahi…Mala tyacha Tras zala tari mi to sahan karen!!!!
  Jay-Hind

  • भालचंद्र
   तुमच्याच मुद्द्याला वर पण उत्तर लिहिलंय. ९० टक्के लोकांनीजर मतदान केलं तर कदाचित चित्र वेगळं दिसेल.
   आज एका शाळामास्तर असलेल्या प्रमोद महाजनांकडे, किंवा शरद पवार, किंवा गडकरी कडे किंवा ठाकरेंकडे इतका पैसा आला तरी कुठून हे विचारतं का कोणी?? असो.. मुद्दा फार अवघड आहे हा उत्तर लिहायला.

 36. Madhura Sane says:

  अत्त्युत्त्कृष्ट लेख आहे.. फार फार छान असतात नेहमीच तुमचे लेख..
  खरच आता आपण सगळ्यांनी मिळून काही तरी करायची वेळ आली आहे.. बघ्याची भूमिका आता सोडायला हवी आणि खरच सुरुवात स्वतःपासूनच झाली पाहिजे..
  अगदी पूर्णपणे सहमत आहे मी तुमच्या विचारांशी..

 37. unsuidojo says:

  लोकसत्तातील ह्याच विषयावर आलेल्या अग्रलेखावर http://t.co/hFULciC प्रसिद्ध झालेले माझे मत इथे नोंदवू इच्छितो
  **************
  लोकसत्ताकरांच्या मागील ३ वर्षातील नेहरू-गांधी-काँग्रेस धार्जिण्या संपादकीयांना मी परोपरीने विरोध केला आहे (आणी त्यामुळे बहुतेक वेळा माझी मते ह्या सदरात प्रकाशित झाली नाहीत), पण आजच्या अग्रलेखात मांडलेले विचार अत्यंत संतुलित आहेत या बाबत दुमत नसावे. आज सर्वत्र हाच विषय चवीने चघळला जात आहे, आणी अण्णांच्या आंदोलनाचे दूरगामी परिणाम किती घातक ठरू शकतात हे सांगणारे लोक अल्पमतात आहे हे दुर्दैव. समाजाला भावनेच्या भरात वाहून जाण्याची सवय असते आणी त्याचा फायदा, नेते, प्रसारमाध्यमे इ. पुरेपूर घेतात.

  आज देशभरातील जनता जी भारावल्यासारखी भ्रष्टाचार समूळ उपटून टाकायच्या गप्पा करू लागली आहे अण्णांच्या पाठीशी सर्वशक्तीनिशी उभे राहण्याच्या वार्ता करते आहे, तीच जनता जर मागील महिन्यात क्रिकेट ज्वर जोरात असताना जर हे उपोषण सुरु असते तर इतक्याच प्रमाणात समरस झाली असती का? दुर्दैवाने उत्तर नकारार्थी आहे, अण्णांचे उपोषण हे विहिरीत पडलेल्या “प्रिन्स” सारखा चवीने चघळायचा व ३-४ दिवस जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे , आय पी एल चे पुढील पर्व सुरु झाले कि मुंबई इंडियन्स, पुणे वारीअर्स, रॉयल चालेन्जार्स हे जीवनातील सगळ्यात महत्वाचे प्रश्न होतील.

  वरील टीकेचा अर्थ हा नाही कि भ्रष्ट नेते, नोकरशाही यांच्यावर कुणाचाच वचक असू नये. तो वचक असलाच पाहिजे, त्या साठी लोकशाही ची सध्याची चौकट अधिक सक्षमतेने आणी सजगतेने अमलात आणण्याचा प्रश्न आहे.

  भ्रष्टाचार रहित शासन/कायदे व्यवस्था हे जर नागरिकांचे अधिकार आहेत तर त्याबरोबर त्यांचे प्रामाणिक पणे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दुर्दैवाने जबाबदरयांचे पालन करताना आपण नागरिक कमी पडतो म्हणून हि परिस्थिती उद्भवली आहे हे वास्तव आहे.

  शेवटी राजकीय नेते, अधिकारी, पोलीस, न्यायधीश, माध्यमे हि काही परदेशातून आयात केलेली नाहीत, त्या व्यवस्थेत असलेले सर्व लोक हे आपल्यातीलच आहेत. जिथे रांगेने बसमध्ये चढणे, सार्वजनिक स्वच्छता बाळगणे, जाती,लिंग,वंश, भाषा या वरून भेदभाव न करणे या सारख्या सुसंस्कृत वर्तनात जिथे आपण कमी पडतो तिथे आपल्या नेत्यांकडून, सरकारी अधिकारयांकडून सद्वर्तनाची अपेक्षा करणे हा विरोधाभास नव्हे का?

  महात्मा गांधी, सुभाषबाबू, भगत सिंग आदींसमोर ब्रिटीश शासन झुकले कारण ह्यांच्या ठिकाणी असलेले नैतिक अधिष्ठान. आपल्या पैकी किती जणांमध्ये हे नैतिक अधिष्ठान आहे?
  खरोखरच स्वातंत्र्याची दुसरी लढाई जर लढायची असेल तर सर्वसामान्य जनतेला स्वत:पासून सुरवात करावी लागेल, त्यासाठी आपण तयार आहोत का? “charity begins at home” हे वचन सर्वांना ठावूक आहे, पण त्याचे आचरण किती जण करतात हा प्रश्न आहे.

  भावनेच्या लाटेवर आरूढ होवून फ्रेंच जनतेने राजेशाही घालवली, पण सुजाण नेतृत्वाच्या अभावामुळे , आधी अराजक आणी नंतर नेपोलिअन च्या रूपाने पुन:राजेशाही माथी आली हा इतिहास आहे आणी त्याची पुनरावृत्ती भारतीय स्वातंत्र्य लढया पासून ते हल्ली हल्लीच्या इजिप्त, रशियन राज्यक्रांतीत देखील झाली आहे. तेव्हा घटनेच्या असलेल्या चौकटीच्या नियमांची परिणामकारकता वाढवणे हा पहिला उपाय आहे, आणी तो उपाय परिणामकारक होण्या साठी व्यक्तिगत, सामाजिक, व्यावसायिक नितीमत्ता वाढीस लागणे हि पहिली पायरी आहे, पहिली पायरी ओलांडायशिवाय झटपट प्रगती व बदलाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

  राहता राहिला अण्णांचा विषय, अण्णा महनीय आहेत, “मी व माझे” ह्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजाचा विचार केला, गांधीजींच्या “ग्रामस्वराज्य” ह्या कल्पनेला राळेगण सिद्धी वास्तव रूप दिले (जे करण्याची इच्छ्शक्ती गांधीजींच्या नावाने राजकारण करणार्या नेहरू-गांधी-काँग्रेस-भाजपा इ. कोणत्याच पक्षाला मागील ६०-७० वर्षे झाली नाही ) हे निश्चितच स्पृहणीय आहे, पण शासनकर्त्यांन विरोधात चालवलेल्या प्रत्येक चळवळीचे पर्यावसन हे दुसर्या पक्षांनी अण्णांचे बाहुले बनवण्यात झाला हे वास्तव आहे. अण्णांचे हे आंदोलन असेच कुणीतरी अपहृत करणार हे नक्की.

  • “व्यक्तिगत, सामाजिक, व्यावसायिक नीतिमत्ता वाढीस लागणे हि पहिली पायरी आहे,”
   हाच मुद्दा मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतो. प्रत्येक गोष्टी मधे भ्रष्टाचार केल्याशिवाय काहीच होत नाही. आपल्या कडे सध्या उपलब्ध असलेले रिसोर्सेस फार कमी आहेत, आणि मागणी जास्त – म्हणूनच ज्यांना कसंही करून एखादी गोष्ट मिळवायची आहे, त्या साठी ते काहीही करायला तयार असतात. रेल्वे तिकिटंही हे एक असेच उदाहरण. आभार..

 38. रोहन says:

  विषय थोडा वेगळा होता पण वेनस्डे चित्रपट आठवला… आपला नसरुद्दिन शाह झालाय…

 39. geetapawar says:

  aho kaka….
  caner sarkhe aajar hya rajykarncya dokyat gusly,,, te sapna mahnje… na chya barabar aahe…………aani he aaple aana khulyache sowng ghetat.. kara upshon kara andoln pan… halli jag purna badly gandhicha kaal nahi he kon aatun denar tyana….

  • खरं आहे. त्या कॅन्सरचा इलाज करायलाच हवा नाही का??
   पहिल्या वेळेस तर त्यांना खूप सपोर्ट दिला गेला, पण नंतर मात्र सोयीस्कर पणे दुर्लक्ष केले जात आहे, त्यांच्या सध्याच्या उपोषणाकडे..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s