माय मराठी..

जवळपास प्रत्येकालाच आपल्या मातृ भाषेबद्दल ओढ असतेच. मग कुठलीही जात असो, कुठलाही धर्म असो, किंवा कुठलाही देश असो आपल्या मातृ भाषेवर प्रत्येकच माणुस प्रेम करतो. ठेच लागल्यावर ’ ओह शिट’ न आठवता तुम्हाला जर ’ आई गं.. ” होत असेल तर अजूनही तुमची नाळ तुमच्या मातृ भाषेशी जुळून आहे असे समजा.

माझी मातृभाषा मराठी. तेंव्हा इथे मी मराठी प्रेमी आहे म्हंटल्यावर मराठी साठी मी काय करू शकतो असा प्रश्न येतोच मनात. प्रत्येकाला काही करणे शक्य नसते, पण जर कोणी करत असेल तर त्याला सक्रिय पाठिंबा देणे सहज शक्य आहे. असं कोणी काही करतांना दिसलं की त्यांचं कौतुक करणे आणि  त्या उपक्रमात सहभागी होणे इतके तर आपण निश्चितच करू शकतो.

वर मी मातृभाषा -म्हणजे बोली भाषा म्हणतोय. जर जळगांवहून  आले असाल, आणि घरी अहीराणी बोलत असाल तर  ती, किंवा विदर्भ, मराठवाड्यातून आले असाल तर तिथल्या बोली भाषा-ती तुमची मातृभाषा,  त्या  बद्दल बोलतोय. मातृ भाषेवर प्रेम करायला तुम्ही   भाषा पंडित असावं लागतं असं नाही, तर तुम्हाला फक्त मातृ भाषा आवडायला हवी, आणि तुम्हाला मातृभाषेत बोलतांना लाज वाटू नये इतकंच! इतकं जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आहात मराठी प्रेमी.  किती  लहानशी गोष्ट आहे नाही??

ब्लॉग विश्व सुरु झालं, तसेच इतर सोशल साईट्स- अगदी ऑर्कुट, फेसबुकच्या तोडीस तोड सोशल फोरम्स सुरु झाले. मायबोली जेंव्हा बंद होणार होती, तेंव्हा तिच्या सभासदांनी दिड लाख गोळा करून ती साईट जिवंत ठेवली, ही सक्सेस स्टॊरी अजूनही सांगितली जाते. आजही इतक्या वर्षानंतर एक सन्माननीय साईट म्हणून तिचे ( मायबोली ) नांव घेतले जाऊ शकते. उपक्रम, मिसळपाव वगैरे  अशा अनेक सोशल साईट्स आहेत मराठी मधे गप्पा मारायला .

या साईट्स वर प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या   जाहिराती दिसत नाहीत.   या साईट्स कोणीतरी मराठी माणूसच ( त्या त्या साईट्सचे मालक) पदरचे पैसे खर्च करून चालवतात.  स्वतःसाठी एकही  पैसा वगैरे मिळवण्याचा उद्देश नसताना पण    पण पदरचे पैसे खर्च करून केवळ ’मराठीवर प्रेम’ म्हणून साईट चालवणाऱ्या लोकांचे खरंच कौतुक वाटते. असंख्य अनोळखी लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम ह्या साईट्स करतात. दररोजच्या  ज्वलंत विषयावरच्या गप्पा, डिस्कशन्स, आणि अजुन ही बरंच काही इथे सुरु असतं.

लोकांमधले सुप्तावस्थेत असलेले लिखाणाचे गुण अशाच साईट्स मुळे बाहेर पडतात. बरेच  ब्लॉग लेखक , वृत्तपत्रांमधे लिहिणारे नियमित लिहिणारे लेखक पण इथूनच तयार झालेले आहेत. सुरवातीला इथे लिहीलं की त्यावर तत्काळ मिळणारी उत्स्फूर्त प्रतिक्रिया वाचली की  लेखकाचा   उत्साह द्विगुणित होतो , आणि पुन्हा लिहिण्यासाठी प्रोत्साहित होतो तो. पण इथे प्रत्येकच वेळेस तुमच्या लेखाचे कौतुक होईल असे नाही,  जर एखाद्या लेखात तुम्ही  चूक केली की टांग खेचणे हा प्रकार पण चालतो.

बहुसंख्य लोकांनी  टोपण नांवं घेतलेली असल्याने कोणाचा  मान अपमान होईल असे नसते . कोणाचं काय वय आहे , काय व्यवसाय आहे हे सगळं विसरून सगळे लोकं एकाच लेव्हलला  ( मानसिक ) येऊन  ज्या हिरिरीने ज्वलंत विषयांवर चर्चा करतांना  त्याच  उत्साहाने विनोदी लेख, कविता ,किंवा इतर साहित्यावर पण चर्चा करताना दिसतात- तेंव्हा बाकी खरंच लोकांच्या सृजनशीलतेचे कौतुक वाटते.

नुसतीच साईट सुरु केली की झाले असे नाही. साईट वर नेहेमी काहीतरी  हलता फळा ठेवावा लागतो. नुकतीच सुरु झालेली मराठी कॉर्नर नावाची साईट, या साईट वर पण अद्वैत कुलकर्णी आपला खारीचा वाटा उचलतो आहेच.

थोडक्यात म्हणजे, “घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे” अशी या साईट्सच्या मालकांची मानसिकता दिसते. असाच एक वेडा पीर म्हणजे राज जैन.  “मी मराठी” या संकेत स्थळ चालवतो.  नेहेमीच काहीतरी करत राहुन संकेत स्थळाच्या सभासदांना काहीतरी लिहिण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत असतो.

मागच्याच महिन्यात   एक लेखन  स्पर्धा घेतल्या गेली . प्रचंड प्रतिसाद मिळाला या स्पर्धेला!   विजेत्यांचा बक्षिसं समारंभाचा कार्यक्रम पण झाला ठाण्यात. हजारो रुपयांची बक्षिसं वाटली गेली विजेत्यांना. मी पण त्या सोहळ्याला हजर होतो. केवळ बक्षिसं समारंभासाठी बंगलोरहून इथे येणाऱ्या राज ची, किंवा वर्ध्याहून रात्रभर प्रवास करून येणाऱ्या गंगाधर मुटे यांची कमिटमेंट पाहिली आणि जाणवलं, की अजुन बरेच लोकं आहेत असे मराठी साठी पदरचे वेळ पैसा खर्च करण्याची तयारी असलेले.   आणि  खात्री पटली की,  मराठीला खूप चांगले दिवस  आहेत पुढे.

फक्त लेखकालाच का म्हणून चान्स?? आम्ही काय केलं आहे? असा प्रश्न अर्थातच काही कवींनी विचारला, आणि म्हणून लगेच   कवींसाठी एक  स्पर्धा  “मी मराठी” या संकेत स्थळावर   सुरु करण्यात आलेली आहे. प्रत्येकच जण आयुष्यात कधी ना कधी तरी प्रेम करत असतोच ( एकेरी  म्हणजे वनसाईडॆड  किंवा दुहेरी  🙂 ) आणि त्या काळात  विरहाच्या किंवा प्रेमाच्या कविता वगैरे करत असतोच. कालांतराने व्यवसायाच्या धबडग्यात   मनातल्या  “त्या” कवीचे थडगे बांधले जाते.( दाल आटे का भाव मालूम पडता है बॉस!)

तर  त्या तुमच्यातल्या कवीला पुन्हा एकदा जागे करायला म्हणून ही स्पर्धा ! उठा ,उचला पेन ,आणि उतरवा आपल्या मनातल्या कविता कागदावर! किंवा जुन्या वह्यांमधल्या कधी तरी करून ठेवलेल्या  कविता असतील तर त्या पण  या स्पर्धे मधे पोस्ट करा.   स्पर्धेबद्दल सगळी माहीती इथे दिलेली आहे. कुठल्याही विषयावर, ’मुक्त छंदातली’ किंवा ’छंद बद्ध’ कविता  पोस्ट  केली तरीही चालेल.  स्पर्धे साठी काही प्रवेश फी वगैरे काही नाही.

कोणीतरी काहीतरी करतंय मातृ भाषेसाठी, तेंव्हा आपणही त्यात सहभागी व्हायला काय हरकत आहे?? बरेच लोकं म्हणतील की आमची कविता वहीत लिहिलेली आहे, ती पुन्हा डीटीपी करायची वगैरे वगैरे कोण करेल हे सगळं?? तर त्याची पण काळजी करू नका, “मी मराठी ” वर आपण मराठी मधे टाइप करू शकता- काही कठीण नाही  ते इतकं. आणि इतकं करूनही जर  टाईप करण्यात वगैरे काही प्रॉब्लेम आलाच तर  राज जैन बरोबर  rj.jain@gmail.com  या पत्यावर  इ मेल करुन संपर्क साधू शकता.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मराठी and tagged , , , . Bookmark the permalink.

30 Responses to माय मराठी..

 1. छान लेख दादा !
  मुळात कविता स्पर्धेच्या आवाहनाला जी प्रस्तावना तुम्ही मांडली आहे ना ती खुप आवडली ! धन्यवाद 🙂

  • विशाल
   प्रस्तावनेतले जे काही आहे, ते अगदी खरे आहे. मी पण माझं लिखाण आधी केवळ ऑर्कुटवरच प्रसिद्ध करायचो, नंतर म्हणजे ऑर्कुट बंद केल्यावर इथे लिहणं सुरु झालं. काही ्दिवसात पहा, अजुन बरेच मराठी ब्लॉग सुरु होतील..:)

 2. या संधीचा फायदा घेऊन आम्ही चालवीत असलेला मराठीच्या प्रेमापोटीचा उपक्रम देत आहे. टेक्निकल गोष्टी मराठीतून सांगण्याचा आम्हा टेक्निकल क्षेत्रातील काही वेड्या लोकांचा उपक्रम, जरूर पहा आणि प्रोत्साहन द्या. http://techmarathi.com/
  याविषयी अधिक माहिती: http://techmarathi.com/about

  • पल्लवी
   खूप छान उपक्रम आहे. मराठी मधे तशीही टेक्निकल माहीती देणारे फार कमी ब्लॉग आहेत. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

  • पल्लवी,

   उत्कृष्ट काम करता आहात बघा तुम्ही. तंत्रज्ञान बोली भाषेत शिकवायचा हा उपक्रम मला फार आवडला. सध्या माझ्या जवळ लॅपटॉप नाही. जसाच घेईल, तसाच माझ्या कडून जसा होईल तसा हातभार नक्की लावेल मी.

 3. पल्लवी, खुप छान उपक्रम आहे हा. शुभेच्छा !!

 4. bolmj says:

  महेंद्र सर या स्पर्धेबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!

  • अवश्य भाग घ्या. चांगला उपक्रम आहे. मला कविता करता येत नाहीत म्हणून… नाहीतर मी पण भाग घेतलाच असता.

 5. mazejag says:

  Mazi kavita aahe tithe…

 6. गुरुनाथ says:

  बेडा गर्क, मायवाल्या बोलीत काही शुद्द भासेत सांगतेत तशी काई “टवाळ” ल्याची नाई काय़ राजेहो स्पर्धा? माया भेजा त कविता नाई लित गळेहो, आमाले इच्चक लियाले सांगा कटायसान इतलोग लितो म्या त!!!!!

 7. खूपच छान महेंद्रजी! अगदी पटलं! अशा महाभागांना वंदन!

  • विनायकजी
   या लोकांना एक वेगळीच किक मिळते बहूतेक अशा काहीतरी आगळ्यावेगळ्या कामातून.. 🙂 प्रतिक्रियेसाठी आभार.

 8. Rajeev says:

  ठेच लागली की आम्ही ” तीच्या मारी ” असे ओरडतो…
  आणी मरतानां “अग आई !”
  जो वर वीचार आणी तोंडातल्या शीव्या मराठी आहेत …
  भल्या मोठ्या गाडीतून ” कूठे शीकलारे भाड्या” ही भाषा आहे……
  म रा ठी आहे… आणी असेलच

 9. अगदी खरे आहे. सर्वांनी आवर्जून भाग घ्यायलाच हवा.
  जिंकण्यासाठी वगैरे नव्हे तर कवितेला अधिक चांगले दिवस येण्यासाठी अशा स्पर्धा यशस्वी होणे आवश्यक आहे.
  प्रत्येकालाच बक्षिस मिळणे शक्य नसतेच. मग बक्षिस मिळाले नाही याचा अर्थ ती कविता कमी दर्जाची होती, असे थोडेच आहे? प्रत्येक कलाकृती चांगलीच असते. तिला स्वत:ची अशी स्वतंत्र्य ओळख असते. खरे तर एका कलाकृतीची दुसर्‍या कलाकृतीशी तुलना होऊ शकत नाही.
  पण उत्साह वाढविण्यासाठी/प्रोत्साहन देण्यासासाठी बक्षिस वगैरे आवश्यक असते, एवढेच.

  • गंगाधरजी
   अहो कविता बहुतेक सगळेच जण करतात, त्यामुळे सहभागी होणं पण सोपं आहेच.. बक्षीस मिळणं महत्त्वाचे नाही, तर सहभाग महत्त्वाचा आहे.

 10. राजे says:

  धन्यवाद साहेबा !!

 11. विषय आणि लेख नेहमीप्रमाणे मस्त.
  खरचं मराठीसाठी झटणारी ही लोकं आणि त्यांचे काम अभिनंदनीय आहे. आपल्या ब्लॉगवरच्या ग्रूप मध्ये कुणाला प्रत्यक्ष भेटलो असेंन तर तो आहे राज जैन. ‘एक वेडा पीर’ अगदी बरोबर उपमा दिलीत. मस्त माणूस आहे तो.

  • तुम्हा आयटी वाल्या बंगलोरच्या लोकांत फक्त राज भेटला? दुसरे लोकं म्हणजे शतपावली वाली अल, वगैरे कधी भेटले नाहीत का? माझी पण नुकतीच भेट झाली बक्षिससमारंभाच्या कार्यक्रमात. आता ब्लॉगर्स मिट ठेवली आहे ५ जुनला , तेंव्हा भेट होईलच बहुतेक. दादरला दासाव मधे सगळे जण भेटणार आहोत आम्ही. तुझं कसं काय जमतं येण्याचं??बंगलोर फार दूर पडतं.. पण तरीही विचारतोय 🙂

 12. Smita says:

  sarva spardhakanna shubhechcha!

  • स्मिता
   मा़झ्या तर्फे पण शुभेच्छा..खरंच हे लोकं कसं काय हे सगळं करु शकतात मला समजत नाही. वर्षाला पदरचे ३०-४० हजार रुपये खर्च करायचे ते पण निःस्वार्थीपणे!! कौतुकास्पदच आहे.

 13. रोहन says:

  कविता ह्या विषयाशी आपला काहीही संबंध नाय… (वाचण्याशिवाय) तेंव्हा आपण लांबच राहिलेले बरे… 😀

 14. अनिल शामराव कोळी says:

  मना कढतेन पण शुभेच्छा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s