काळजी ते निवृत्ती..

भारतीय लोकांची मनःस्थिती अशी असते की , आपण नेहेमी वर्तमान काळात न जगता नेहेमीच  भूतकाळात रममाण होतो,  किंवा  भविष्याचा  विचार करत आजच्या दिवसातला आनंद घालवतो.कदाचित ह्या गोष्टीला कोणी बरेच लोकं आक्षेप घेतील,की नाही आम्ही असे नाही-  पण मी स्वतः मान्य करतो की , माझी तरी तशीच मनःस्थिती झालेली आहे . वेळ मिळेll तेंव्हा गतकाळच्या आठवणींना कुरवाळत बसायला मला आवडतं,  पुढे भविष्याबद्दल विचार करत बसायला ( दिवा स्वप्नं??)  विचार काही माझ्या मनातून जात नाहीत- आवडत नसले तरीही ! बरेचदा तर आजच्या दिवसातला आनंदी क्षण पण मी गमावून बसतो हे असे विचारात गुंतून  ………असो..

आज जर १० हजार रुपये हातात असतील तर त्यातले ८ हजार कसे बचत करता येतील या कडे जास्त लक्ष देतो आपण.इतर सगळ्या आवडीच्या गोष्टींना फाटा देऊन पैसे साठवण्या कडे कल असतो आपला.आज सहज पणे उपलब्ध असलेलं सुख आपण दुर्लक्षित करून नंतर पुढे कधी तरी याचा आस्वाद घ्यायला आपण साठवण करतो. आज मी दाताने सोलून ऊस खाऊ शकतो, पण पुढे काही वर्षांनी ते शक्य होईल कां? अर्थातच नाही- म्हणजे ऊस हा आजच खायला हवा, ऊसासाठी पैसा साठवून ठेवण्यात काही अर्थ नाही! पण याचा अर्थ सेव्हींग करण्यात काही  वाईट आहे असे मला म्हणायचे नाही- पण जी गोष्ट आज करायची ती आजच करायला हवी. सेव्हिंग करणे  आपली ही एक  मानसिक अवस्था ( की मानसिक रोग??)आहे, ज्या मधून आपण सगळेच जण नेहेमीच जात असतो. .

कॉलेज मधे शिकतांना – कधी एकदाचं  शिक्षण पुर्ण होतं  आणि नोकरीला  लागतो ह्याची काळजी, नंतर एक  नोकरी लागल्यावर  पुढे  दुसरी  या पेक्षा चांगली  जास्त पगाराची नोकरी कधी मिळेल याची काळजी! नंतर स्वतःचं  घर हवं ,  कार हवी  , नंतर लगेच काही दिवसांनी पुन्हा  मोठ्ठी कार हवी म्हणून  काळजी. पुढे मागे आपलं लग्न होईल मग बायको कशी मिळेल म्हणून काळजी, बायको मिळाली की नंतर मुलगा होईल की मुलगी होईल याची काळजी,  एकदा मुलं झाल्यावर मुलांना चांगल्या शाळात ऍडमिशन मिळेल की नाही  ही काळजी  .

तर  थोडक्यात सांगायचं तर  आपण सगळे  कायम कुठल्या ना कुठल्या काळजी मधे बुडालेले असतो. सुखाने जगणे, आजचा दिवस गोड मानणे वगैरे आपण पार विसरून गेलो आहे.  . नुसती काळजी करून काही होणार नाही हे माहीत असले तरीही आपण  काळजी करणं काही सोडत नाही.

अजुन सगळ्यात मोठी काळजी- ( माझ्या वयाच्या लोकांची ) म्हणजे   निवृत्ती. मला अजूनही १० वर्ष आहेत निवृत्तीसाठी,   हा विषय खरं म्हणजे व्यक्ती सापेक्ष झालेला आहे. जी व्यक्ती निवृत्त  होते, तिच्याशिवाय इतरांचा त्याच्याशी काहीच संबंध नसतो. तरी पण कारे तुझी अजुन किती वर्ष शिल्लक आहेत रे? असं कोणी विचारलं की जाम वैताग येतो. 🙂

निवृत्तीचे पण दोन प्रकार आहेत.व्हॉलंटरी रिटायरमेंट, आणि कम्पल्सरी रिटायरमेंट!प्रायव्हेट कंपन्यांमधे काम करणाऱ्यांना ह्या दोन्ही टर्म्स म्हणजे व्हीआरस, आणि सीआरएस चांगल्याच माहीती असतात. सीआरएस म्हणजे ’पिंक स्लिप’ साठी वापरलेला कोडवर्ड आहे. एक दिवस आकस्मित पणे एक सर्क्युलर येतं, की अमुक अमुक माणसाने नोकरी सोडली आहे, की मग त्यावर डिस्कशन्स सुरु होतात.. ” तो गेला, की त्याला जायला सांगितलं?” ’व्हीआरएस’ मधे स्वतःच्या मर्जीने नोकरी सोडलेली असते, त्यामुळे त्रास कमी होतो, पण ’सीआरएस’   नंतर मात्र   खूप मानसिक त्रास होतो.वय ६० झाले म्हणून घेतलेली निवृत्ती पण सीआरएस मधेच मोडते.  हे असं  का घडत असावं म्हणून विचार केला तर …… खूप गोष्टी मनात आल्या.  .

४५व्या वर्षी निवृत्ती घेतलेले काही लोकं पण मी पाहिलेले आहेत. घरची परिस्थिती चांगली आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, मग काय हरकत आहे व्हीआरएस घ्यायला? पण इतर लोकं – म्हणजे आमच्या सारखे, जे वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त होणार ते. आपल्या निवृत्तीकडे एक बागुलबुवा म्हणून बघणारे-अहो आयुष्यभर काम केल्यावर मग रिटायर झाल्यावर काय करायचे हा यक्ष प्रश्न असतोच समोर. कामच करायचं नाही तर मग   करायचं तरी काय? परिश्रम म्हणजे माणसाचं जिवन असतं, परिश्रम  करणे संपले ,किंवा जमेनासे झाले की , की आपला ’श्वास’ संपत आलाय की काय? याची भिती वाटू लागते.

दुपारच्या वेळेस सूर्याची गती जाणवत नाही. तो स्थिर आहे असे वाटते, पण संध्याकाळी  पश्चिमेच्या क्षितिजावरचा मावळतीचा   सुर्य  कसा झर्रकन खाली जातो नाही?? मावळणाऱ्या सूर्याची गती खूप जास्त असते.  पंचेचाळीस नंतर  वार्धक्य, किंवा निवृत्तीचे वय पण तसेच एकदम  वेगाने येते – कानामागच्या ’एका’ पांढऱ्या केसाच्या जागी पांढऱ्या केसांचा पुंजका कधी होतो ते कसं लक्षात येत नाही- तसंच आहे हे पण!!

आयुष्यभर नोकरी केल्यावर पण निवृत्तीची भिती ही प्रत्येकाला बागुलबुवा सारखी वाटत असते. खरं तर निवृत्ती म्हणजे एकप्रकारे सगळ्या बंधनातून मुक्तता, मनाप्रमाणे ’काय वाटेल ते’ करण्याचा आयुष्यातला काळ! कधी उमेदीच्या काळात  गाणं शिकायची, चित्र काढणं शिकायची, टेनिस खेळायची  इच्छा असते , पण ती इतर प्रायोरिटीज मुळे शक्य होऊ शकत  नाही  ,  अशा इच्छा  पुर्ण करण्याचा काळ असतो हा. आयुष्य भर आपण सेव्हींग याच तर काळासाठी करून ठेवले असते.

पण साधारण पणे तसे होत नाही- नोकरी संपली, की अधिकाराची खुर्ची गेली, आणि खुर्ची गेल्यावर मला कोण विचारणार? असे विचार पण येतात मनामधे. लोकं हे विसरतात, की त्या खुर्चीशिवाय पण त्यांचं एक स्वतःचं अस्तित्व आहे!! चोखून टाकलेल्या आंब्याच्या कोयी कडे जसे लोकं निरिच्छ पणे पहातात, तशी आपली अवस्था होईल का? तसं होऊ नये असं वाटत असेल तर थोडा रस शिल्लक ठेवायला हवा कोयीला.  भयंकर बेचैनी, मानसिक स्थित्यंतरं  आणतो हा निवृत्तीचा विचार. निवृत्ती जवळ आली की दिवस मोजणारे लोकं पण पाहिलेले आहेत मी. कधी एकदाचं या कामाच्या रगाड्यातून सुटका करून घेतो अशी अवस्था असते त्यांची.

एखादी गोष्ट जर तुमच्यावर लादली गेली तर ती नकोशी वाटते. जसे लहानपणी वडलांनी आईला सांगून ठेवले होते की , की  मी सकाळी उठल्यावर जो पर्यंत स्नान, संध्या , अथर्वशीर्ष आणि रामरक्षा म्हणत नाही तो पर्यंत दूध, किंवा काही खायला द्यायचे नाही.  तेंव्हा वाटणारी  बंधनं, आज जेंव्हा आपण होऊन स्वतःवर   उपवास, वगैरे    करतो तेंव्हा त्याचा त्रास होत नाही. कुठलीही गोष्ट तुमच्यावर लादली गेली की ती न करण्याकडे कल असतो माणसाचा- नाही लक्षात येत?

एखाद्या दिवशी रस्त्याने जातांना तुमच्या मागे एखादा कुत्रा लागला, आणि तुम्ही धावत सुटला, थोडं समोर गेल्यावर कुत्र्याने तुमचा नाद सोडला. थोडक्यात काय तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध धावायला लावले कुत्र्याने- या गोष्टीचा तुम्हाला खूप त्रास, चिड , संताप होईल-   पण  तुम्ही जेंव्हा हजार रुपये भरून जिम मधे धावायला जाता, तेंव्हा तुम्हाला आनंद वाटतो.  तेंव्हा तुम्हाला काही त्रास होत नाही,कारण तेंव्हा, तुम्ही जे  धावता   ते शिक्षा म्हणून नाही. तसंच आहे हे पण निवृत्तीचं! लादलेली , आणि आपणहून घेतलेली. एखादी गोष्ट आपणहून घेतली की तिचा त्रास कमी होतो, म्हणूनच व्हीआरएस घेतलेले लोकं आनंदी दिसतात, कारण त्यांनी घेतलेली निवृत्ती ही पुर्ण विचारांती घेतलेली असते. लोकांना  जो पर्यंत हवे हवेसे वाटत आहोत तो पर्यंत रहाणे कधीही चांगले..

वयोमाना प्रमाणे आपल्या समाजात बरीच बंधनं लादली जातात, काही लोकं ती  स्विकारतात, तर माझ्या सारखे काही ती चक्क धुडकावून लावतात. बायको  बरोबर बाहेर फिरायला निघालो, आणि तिचा हात जरी धरला, किंवा खांद्यावर जरी हात ठेवला, तरी हे काय.. रस्त्यावर आहोत ना आपण… असं जेंव्हा म्हणते, किंवा आता वयाला साजेसं वागा- हे काय २० वर्षाचं असल्यासारखं वागता, तेंव्हा नेमकं कसं वागणं अपेक्षित असतं? हे मला तरी अजुन समजलेलं नाही. पन्नाशीला पोहोचला, आता चालती लोकल पकडणं बंद कर, खाण्या पिण्यावर बंधनं ठेव, अरबट चरबट खाणं सोडून दे, वात्रट सारखं बोलणं सोडून दे, फालतू पिजे मारणं बंद कर, मुली मोठ्या झाल्यात, असे जोक्स मारू नकोस  अशा अनेक बंधनांना सामोरं जावं लागतं.अर्थात मी काही बंधनं पाळतो, तर काही सोडून देतो. कुठली सोडून देतो ते तुम्हाला पण चांगलंच माहीती आहे.

पैशांची गरज तर प्रत्येकालाच असते. अहो आज वर्षाला कितीही पगार मिळाला, तरीही तो कमीच पडतो. आपले खर्च पण त्याच प्रमाणात वाढतात, स्टॅंडर्ड ऑफ लिव्हींग वाढवत नेतो आपण,  आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मग पैसा कमी पडतो. हे सगळं का आठवलं?? काल एक फोन आला इन्शुरन्स एजंटचा, म्हणत होता, एक पॉलिसी घ्या , म्हणजे रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळेल तुम्हाला. प्रायव्हेट कंपन्यांमधे नोकरी करणाऱ्यांना पेन्शन नसते, आणि म्हणून तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून छळणारे  इन्शुरन्स एजंट्स असतातच. हे असे फोन आले की मला जाम संताप येतो .

जे काही मनात येत गेलं, तसं तसं लिहिलय.. कदाचित थोडं असंबद्ध वाटेल, पण हे माझे स्वतःचे मनातले अगदी खरे खरे विचार, ज्या क्रमाने आले, त्याच क्रमाने इथे लिहले  आहेत. निवृत्ती हा एक प्रत्येकाच्याच जीवनात येणारा एक पडाव असतो, कोणाच्या जीवनात अजुन दहा पंधरा वर्षांनी तर कोणाच्या अजुन काही जास्त वर्षांनी. निवृत्ती ही न टाळता येणारी गोष्ट आहे. त्या गोष्टीला ग्रेसफुली समोर जाता यावं एवढीच मनापासून इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने मानसिक तयारी पण करून ठेवायला हवी हे आज जाणवलं. म्हणून हे पोस्ट!

शेवटी एकच मागणे आहे, ” मरण यावं, ते पाठीवर नाही, तर पायावर उभे असतांना” जो पर्यंत स्वतःच्या पायावर उभा आहे, तो पर्यंत निवृत्त होणं शक्यच नाही मी… !! 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

61 Responses to काळजी ते निवृत्ती..

 1. पुन्हा एकदा गतायुष्याचं अवलोकन? चांगली पोस्ट आहे. कालपरवा असेच विचार माझ्या मनात येत होते. मावळतीचा सूर्य झरकन खाली जातो, खरं आहे. मला वाटतं एका ठराविक वयानंतर काही गोष्टींकडे निरिच्छपणे पहाण्याची वृत्ती मनुष्यात आपोआपच येत असावी. “संध्याछाया भिवविती हृदया” सारखी वाटली तुमची पोस्ट.

  • भोपाळ ते जबलपूर सहा तासाचा रेल्वेचा प्रवास- एकटेपणा- आणि मनातल्या विचारांचा गोंधळ आहे हा.. धन्यवाद..

 2. निवृत्तीबद्दल बोललात म्हणून ज्ञानेश्वरांचा पत्ता ८वावासा वाटला….

 3. “मरण यावं, ते पाठीवर नाही, तर पायावर उभे असतांना”

  लाख मोलाची बात. आम्ही तर आता कुठे ह्या स्पर्धेत उतरलोय आणि आता ही स्पर्धा अगदी जीवघेणी होत जातेय दिवसेंदिवस… मला तर आताच कंटाळा येत जातोय ह्या सगळ्या गोष्टींचा, काय माहित पुढे काय होणार ते. आपण कितीही आशावाद दाखवला, तरी परिस्थिती आपल्याला झुकवतेच 😦 😦 😦

  • सुहास
   अरे तुला काय झालं इतक्या लवकर?? पिच्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त!!! चिल … मॅन!!

 4. स्नेहल says:

  खूप छान आहे पोस्ट, पण सिरीयस टॉपिक आहे म्हणून विचार करावासा वाटत नाही, वाढत जाणारी चढओढीचा खरच खूप कंटाळा आलाय पण जर वाहत्या पाण्याच्या गती ने नाही वाहिलो तर माहित नाही कुठे जाऊ त्यामुळे परिस्थितीला स्वीकारावे लागेलच 😦 भविष्याचा विचार न केलेलाच बरा

  निवृत्तीबद्दल बोललात म्हणून ज्ञानेश्वरांचा पत्ता ८वावासा वाटला….+1

  “मरण यावं, ते पाठीवर नाही, तर पायावर उभे असतांना”

  • स्नेहल
   सिरियस झाली खरी पोस्ट, पण माणसाच्या मनावर त्याचा स्वतःचाच ताबा नसतो. कधी कुठले विचार येतील आणि तुम्हाला घेऊन जातील याचा नेम नाही.

 5. २ वर्ष झालीत कामाला लागून मला…निवृत्तीशी सध्या तरी काहीच संबंध नाही माझा…हा, माझे वडील नक्कीच समजू शकतील ह्या भावनांना.
  पण तुमच्या पहिल्या अनुच्छेदात तुम्ही जे लिहिलंत
  >> “भारतीय लोकांची मनःस्थिती अशी असते की , आपण नेहेमी वर्तमान काळात न जगता नेहेमीच भूतकाळात रममाण होतो, किंवा भविष्याचा विचार करत आजच्या दिवसातला आनंद घालवतो…..”
  अगदी ह्याच बद्दल विचार करत होतो बघा काका थोड्या वेळापूर्वी मी…लिहायचे पक्के केले होते मनात, आणि तुमचा लेख वाचला बघा…खरोखरच माणूस जर जुन्या आठवणी सहजासहजी विसरू शकला असता तर नुकताच जन्म झालेल्या बाळाप्रमाणे कोरा-करकरीत असता. नाही का?

  • वैभव
   मला वाटत बहुतेक प्रत्येकच माणसाच्या मनात असे काही तरी विचार येत असतील, पण मी फक्त इथे एकत्रित मांडले आहेत. आठवणींशी लपंडाव खेळत बसायला प्रत्येकालाच आवडतं , त्यातल्या ग्रे आठवणी पुन्हा पुन्हा डॊकं वर काढतात, मग त्यांना पुन्हा पाण्याखाली एखाद्याचं डोकं दाबावं तसं दाबून टाकायचं, आणि आपल्याला हव्या त्या आठवणींना जवळ करायचं.. हे सुरु असतं.

 6. गुरुनाथ says:

  “जो पर्यंत स्वतःच्या पायावर उभा आहे तोवर रीटायर होणे शक्यच नाही मी”
  जे बात मारे मन को लागेसी है ताऊ!!!!!, जो देखो मरी या बिनपैदा हुए भैंस की पुंछ फ़ाडने मे लगा है!!!!,
  “रंग दे बसंती” पिक्चर मधला एक डायलॉग (आपल्या आमीरच्या तोंडचा) आठवतो “ओये एक पैर पास्ट पे ते एक पैर फ़्युचर विच रखा है तभी तो हम आज पे मुत रहे है!!!!!”…….. मोठे काही तरी पकडण्याच्या नादात जवळ असलेलं छोटंसं काहीतरी हरवुन बसु ह्या भिती ने जगणे वैताग होऊन जाते अन म्हणुन तर म गाणी आवडतात तरी कुठली “सारी उम्र हम मरमर के जी लिये एकपल तो अब हमे जिने दो जिने दो”!!!!! “गिव्ह मी सम सनशाईन गिव्ह मी सम रेन गिव्ह मी अनदर चान्स आय वॉन्ना ग्रोअप वन्स अगेन!!!!”

  • सिनेमाचे डायलॉग्स पण आठवताहेत?? ग्रेट!! पण तू जे लिहिलंय ते काही खोटं नाही.

   ““सारी उम्र हम मरमर के जी लिये एकपल तो अब हमे जिने दो जिने दो”!!!!! “गिव्ह मी सम सनशाईन गिव्ह मी सम रेन गिव्ह मी अनदर चान्स आय वॉन्ना ग्रोअप वन्स अगेन!!!!”
   मस्त आहे हे जिंगल.. 🙂

   • गुरुनाथ says:

    जिंगल नाही गाणेच आहे थ्री ईडियट्स मधले!!!! फ़ार फ़ार भारी आहे गाणे!!!

 7. नेहमीप्रमाणेच वास्तववादी लेखन!मस्त!

  थोडंस अवांतर: व्हीआरएस आणि सीआरएस….ह्यामधला एस म्हणजे स्कीम…कंपनीने कर्मचार्‍याला निवृत्त होण्यासाठी आमिष म्हणून दाखवलेलं गाजर….असं असलं की निवृत्त होणार्‍याला काही विशेष फायदा असतो.
  पण अशा स्कीम्स नेहमीच नसतात..त्यामुळे बर्‍याचदा लोक वैयक्तिक कारणांसाठी स्वत:हून किंवा कामाच्या ताणाने किंवा तिथल्या परिस्थितीने गांजून निवृत्ती स्वीकारतात…ज्यात कंपनी त्यांना कोणताही फायदा(स्कीम) देत नसते….त्याला फक्त व्हीआर(व्हॉलंटरी रिटायरमेंट) म्हणतात.
  तसेच कामगार कपात किंवा टाळेबंदी इत्यादि अशा काही कारणांमुळे काहीजणांना सक्तीची निवृत्ती घ्यावी लागते तिला सीआर(कंपल्सरी रिटायरमेंट) म्हणतात….ह्या दोन्हीत कोणताही विशेष फायदा नसतो.

  • प्रमोदजी
   कामाचा ताण किंवा अंतर्गत कलह हे दोन विषय तर प्रत्येकाच्याच पाचवीला पुजलेलेच असतात. त्यांना सामोरा जाण्यासाठीच पगार दिला जातो का? असेही वाटते बरेचदा.
   व्हीआर बद्द्ल माहीत नव्हतं..

 8. अनिकेत says:

  1. ऊस हा आजच खायला हवा, ऊसासाठी पैसा साठवून ठेवण्यात काही अर्थ नाही
  2. जी गोष्ट आज करायची ती आजच करायला हवी

  मनापासून पटले. कदाचित हे माहित असते पण ते कोणी समोरून सांगितल्याशिवाय वळत नाही. तुमच्या ह्या लेखाचा आणि विशेषतः ह्या दोन ओळींचा येणाऱ्या काही दिवसात मला फार मोठा फायदा करून देईल. अतिशय धन्यवाद.

  • अनिकेत
   ही गोष्ट मला स्वतःला पण सांगाविशी वाटली.
   स्वतःच्या बऱ्याच आवडी आपण शेल्फ करून ठेवतो .. त्यांचा विचार हा करायलाच हवा. धन्यवाद.

 9. अनघा says:

  “मरण यावं, ते पाठीवर नाही, तर पायावर उभे असतांना”…पटलं..

  • अनघा,
   जो पर्यंत पायावर उभे आहोत, तो पर्यंत आपण निवृत्त होऊच शकत नाही ही खात्री आहे , म्हणूनच थोडं सुसह्य होतं आयुष्य. संध्याछाया भिवविते मजला अशी परिस्थिती कितीही नाही म्हंटलं तरी होतेच.

 10. अप्रतिम विचारसाखळी… खूप आवडला लेख..

  पण काका खरं सांगू? या असल्या निवृत्तीच्या पोस्ट्स ‘काय वाटेल ते’वर शोभत नाहीत. तुम्ही नेहमीप्रमाणे एकदम बिनधास्त टाईप पोस्ट्स लिहीत रहा.. 🙂

  • हेरंब
   आधी लॅपटॉप सुरु केला, आणि जे काही मनात येईल ते टाइप करत गेलो. एकटा बसलो होतो, काही काम नव्हतं, मग मी नेहेमी म्हणतो त्याप्रमाणे, ” माणसाचं मन म्हणजे, आधीच मर्कट, त्यात मद्य प्यायला, आणि त्याला विंचवाने चावलेला”
   आणि काय वाटेल ते मधे काहीही चालतं.. 🙂

 11. महेश कुलकर्णी says:

  सही,छान, उत्तम ,अवलोकन आवडले,पण आपण वेगळा विषय हाताळा,

  • महेश
   कधीच ठरवून लिहीत नाही मी.. हे पण तसंच लिहिलं आहे, जे काही मनात येईल ते.. 🙂 इतकं सिरियस लिहीण्याची खरं तर सवय नाही, पण लिहिल्या गेलं या वेळेस.. !

 12. Pramod Mama says:

  Dear Mahendra Kaka,
  Mee sadhya 58 yrs cha ahe, magil varshi mala VRS + CRS la samore jayla lagale, tumhi sangitlele sarv mala bhogayala lagale. Budhila + Sharirala sarv patle pan , Mazya Manala & Mazya Kutumbala mee retirement ghyave he ajibat manya nahi. Tya mule ajoon 2 varshe nokari karoon 60 yrs zalaya nantar natural retirement ghenar. Hya 2 varshat pending chand atmsat karnar ahe, thanks for suggestions.

  Pramod Mama

  • प्रमोदमामा
   मनातले विचार लिहिल्याचा काही तरी फायदा झालेला बघून बरं वाटलं. हे पोस्ट लिहिल्यावर मित्राला पाठवलं , की पब्लीश करु की नको म्हणून, मला थोड जास्त पर्सनलाइझ्ड झाल्यासारखं वाटलं होतं.
   असो, आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.

 13. राजे says:

  म्हणून म्हणतो , फकिरासारखं जगणं लै भारी.. उगाच आजचे काय व उद्याचे काय याची चिंता नाय.. काय म्हणता 😉

  • राजे,
   अहो जीव जायची भिती वाटते, म्हणून युद्धातून पळ काढायचा, हे काही बरं नाही…. 🙂 युद्ध हे लढलंच पाहीजे , मग त्याचा निकाला काहीही लागो.. काय म्हणता बोला??

 14. Smita says:

  ata tumhee swat:ch jasa var Suhas la sangitalay tasach tumhala sangayachee veL aliye- so Chill man!!:-))

  • स्मिता
   मनातलं कागदावर आलं की किती वेगळं वाटतं नाही?
   मी पण आता पुन्हा वाचली पोस्ट, आणि समजलं की आपलं कुठे चुकतंय ते..
   असो,प्रतिक्रियेसाठी आभार..

 15. vikram says:

  Vichar karayla lavnari post

  Apratim 🙂

 16. Hemant Pandey says:

  कानामागच्या ’एका’ पांढऱ्या केसाच्या जागी पांढऱ्या केसांचा पुंजका कधी होतो ते कसं लक्षात येत नाही-काका फारच सुरेख शब्दालंकार! खूपच छान अनुभवाचे बोल आहेत.
  मला वाटते, आयुष्य म्हणजे वाहत्या पाण्या प्रमाणे आहे. आपण कोणीही त्याच पाण्याला दुसर्यांदा स्पर्श करूच शकत नाही. तेंव्हा, आजची मजा आजच, आत्ताच! उद्या नवीन काहीतरी, वेगळे. उसाचे पण खूप छान आणि जवळचे उदाहरण दिले आहे.
  ता. क. :- काका, आठवण करून देतोय, “वाट्टेल ते!” ब्लॉगच्या पुस्तकाची- फोटो सहित.

  • हेमंत
   पुस्तक वगैरे नाही , कारण छापणे सोपं आहे, पण विकत कोण घेईल ते? इतके मोठमोठे प्रथितयश लेखक बसले असतांना हे असे पुस्तक कोणी घेईल का विकत?? आपलं लिखाण ब्लॉग पुरतंच !!
   मनात येईल ते डायरेक्ट “काय वाटेल ते” वर.. माझ्या लिमीटेशन्स मला माहीती आहेत, भाषेवर प्रभुत्व नाही माझं , आणि पुस्तकं ही छान अलंकारिक भाषेतली बरी वाटतात.. 🙂

   खरं तर आता ब्लॉग वर पण ५५० च्या वर लेख आहेत, त्यांचं वर्गीकरण करणं पण जमत नाही मला.एखादा जुना लेख शोधावा म्हंटलं, तर मलाच सापडत नाही, बहुतेक प्रोफेशनल मदत घ्यावी लागणार असे दिसते 🙂

 17. Tanvi says:

  महेंद्रजी लेख आवडला… पटला…..

  काही वाक्यं तर अप्रतिम उतरलीयेत 🙂

  बाकि हेरंब + १ …. आम्हाला जरा जरी उदास वाटलं की तुम्हाला मेल टाकतो आम्ही…. आणि आम्हाला मस्त आशावादी उत्तर मिळतं 🙂 … तेव्हा पोस्ट टाकलीत, विचार मांडलेत हे ठीक आहे…..आता एक ’काय वाटेल ते’ वरची पोस्ट येउ देत!! 🙂

  • तन्वी
   मनापासून लिहिलाय हा लेख. अजिबात विचार न करता.. आणि उदास वगैरे काही नाही, उगाच, थोडं अनिझी वाटत होतं परवा.. 🙂 लिहितो एक कायवाटेलते 🙂

  • तन्वी
   मनापासून लिहिलाय हा लेख. अजिबात विचार न करता.. आणि उदास वगैरे काही नाही, उगाच, थोडं अनिझी वाटत होतं परवा.. 🙂 लिहितो एक काय वाटेल ते 🙂

 18. Ravindra says:

  Majhya vadilanchya kalat (jenvah lok ekach companitun retire hot hotey), tey mhanache ki jya divshi tumhala appointment letter milte tyavarch tumchya retirement chi date lihileli aste. So, you should plan from that day itself.

  Aso, lekh, nehemi pramane, khup chhan zhala ahe 🙂

 19. D D says:

  कामातून निवृत्ती घेतली, म्हणजे त्या माणसाचे महत्त्व संपले असे नव्हे. खरे तर निवृत्त होणे हे माणसाच्या विचारांवर अवलंबून असते. काही माणसे निवृत्त झाल्यावरही इतर नवीन कामात स्वतःला गुंतवून घेतात.

  माझ्या आजोबांचा सर्वात मोठा मुलगा ते नोकरी करत असतानांच वारला होता. आजोबा निवृत्त झाले तेव्हा माझे वडील शिकत होते, घरात इतर कोणी कमावणारे नव्हते. त्यावेळी माझ्या आजोबांनी निवृत्तीनंतर हातात आलेले फंडाचे पैसे वापरून शाळा स्थापन केली, आणि घरांचे प्लॉट विकून त्यातून मिळणार्‍या कमिशनमधून घर चालवले; सर्व मुलांचे शिक्षण पूर्ण केले व ते सगळे त्यांच्या पायावर उभे राहिले. त्यानंतरही माझ्या आजोबांनी संस्थापक म्हणून शाळेच्या कामात लक्ष घातले.

  वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांनी ग्रामीण भागात स्वतःच्या संस्थेची दुसरी शाळा उघडली. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांना आलेल्या हार्ट प्रॉब्लेम मुळे माझ्या वडीलांनीच त्यांचे शाळेत जाणे बंद केले. घरीही आजोबा स्वस्थ बसायचे नाहीत, जवळच्या रद्दीच्या दुकानातून चांगली पुस्तके शोधून विकत आणणे, त्या पुस्तकांना व्यवस्थित कव्हर घालून ती पुस्तके कधी आणली याची त्यांच्या कव्हरवर तारखेसकट नोंद करून, त्यांचे नाव लिहून ठेवणे हा त्यांचा आवडता छंद होता. त्याशिवाय वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या व माहितीची कात्रणे कापून त्यांची तारखेसकट नोंद करून ती जपून ठेवणे, शाळेचे संस्थापक म्हणून वेगवेगळ्या सरकारी खात्यात पत्रव्यवहार करणे, हिंदू महासभा किंवा शैक्षणिक संस्थांचे काम घेऊन आलेल्या लोकांना शक्य तेवढी मदत करणे ही त्यांची कामेही सतत चालू असायची.

  वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षापर्यंतचे शेवटचे तीनचार दिवस सोडले तर तोपर्यंत माझे आजोबा व्यवस्थित हिंडतफ़िरत होते. शेवटपर्यंत स्वतःची सर्व कामे ते स्वतः करायचे. त्यांच्याबद्दल असे वाटते, की ते कधी निवृत्त झालेच नाहीत.

  ज्यांची प्रवृत्ती निवृत्तीकडे आहे, असेच लोक निवृत्त होतात. बाकीचे लोक कामातून निवृत्त झाल्यानंतरही स्वतःला नवीन छंदात किंवा कामात गुंतवून घेतात, त्यांच्यासाठी निवृत्ती म्हणजे नवे जीवनच असते. ह्यातले आपण काय निवडायचे आहे, हे ज्याचे त्याने ठरवायचे.

  • खूप एनकरेजिंग कॉमेंट आहे.. माझे वडील पण आता वयाच्या ८५ व्या वर्षी समाजसेवेत बिझी असतात. सोशल वर्क मधे स्वतःला गुंतवून घेतलं की फार सोपं होतं जीवन. फरक इतकाच आहे, की आपल्या पूर्वीच्या पिढीला पेन्शन वगैरे भरपूर मिळायची.. आता खर्च इतके वाढले आहेत की आहे तो पैसा पुरेल की नाही ही काळजी असते सतत..

  • bhanudas suryawanshi says:

   ekdam barobar aahe. manus kadhi nivrata hot nasto. kamat badal hich sutti. ashya padhatine nivratinantarcha kaalcha vichar kelyas pudhil jeevan khup sukhache hoel.
   Bhanudas Suryawanshi
   Pune

 20. Aparna says:

  त्यादिवशीच आई बरोबर अगदी याच विषयावर बोललो आणि आईच पण हेच…थोडक्यात चणे आहेत पण दात नाहीत आणि दात आहेत पण चणे नाहीत अस आमचं झालय असं आईपण म्हणत होती….

  • अपर्णा
   बरेचदा आपण एखादं पोस्ट लिहिल्यावर जेंव्हा स्वतः वाचतो, तेंव्हा ते आपल्यालाच खूप आवडते. हे पोस्ट माझे एक आवडते पोस्ट आहे. जे काही लिहिलंय ते एकदम दिलसे…:) वेळ निघुन गेली की मग हातात फक्त पश्चाताप करण्याव्यतीरिक्त दुसरं काहीच रहात नाही. आणि आधीच ही गोष्ट केली असती तर????
   गात्रं थकल्यावर फिरायला जाणं कसं शक्य आहे? पैसा असेल,पण ताकत तर असायला हवी?

 21. MADHURI GAWDE says:

  nivruttinantar jaanavnarti bhiti mhanjech maaze rajya sample, mahatva sample hi bhavna. jar rikama vel ghalvaycha tar samaajsevechi aavad havi kinwa phirayla angaat shakti havi. mhanunach maazi zakkas idea. konala aaple man mokle karayche asel tar ektari sakhi assavi ki aaplyala pratyek divas sunder vaatava, tarun vaatava. So don’t worry mahendraji, now onwards i am your best friend.

  • माधूरी
   धन्यवाद.. इतक्या तरूणांमधे असतो दिवसभर की आपलं वय काय ते विसरायला होतं मला. खरंच कोणी तरी हवंच असतं मनातलं बोलायला. बरेचदा इतकं काही साचून रहातं मनात की डिप्रेशन येईल का अशी भिती वाटत असते मला!
   –पण मी आहेच तसा.. बायकोच्या मते थॊडा विक्षिप्त!

 22. Nitin says:

  दुपारच्या वेळेस सूर्याची गती जाणवत नाही. तो स्थिर आहे असे वाटते, पण संध्याकाळी पश्चिमेच्या क्षितिजावरचा मावळतीचा सुर्य कसा झर्रकन खाली जातो नाही?? मावळणाऱ्या सूर्याची गती खूप जास्त असते. पंचेचाळीस नंतर वार्धक्य, किंवा निवृत्तीचे वय पण तसेच एकदम वेगाने येते – कानामागच्या ’एका’ पांढऱ्या केसाच्या जागी पांढऱ्या केसांचा पुंजका कधी होतो ते कसं लक्षात येत नाही- तसंच आहे हे पण!!

  खूप छान उदाहरण दिलेत 🙂

 23. अरुणा says:

  आपण म्हण्जे भारतीय मूलतः दैववादी असतो. कर्म करणे आपल्या हातत, म्हणून सगळे स्वीकरतो आणि आपण प्रयत्नाने परिस्थिती बदलू शकतो असा विचार पण करत नाही.अगदी सगळी परिस्थिती नही बदलू शकलो, तरि थोडा बदल आपण अवश्य आणू शकतो. हाच दैववाद आपल्याला बर्याचदा आयुष्याचा निखळ आनंद उपभोगाला आड येतो.तुम्ही लिहिलिली दोन वाक्ये फ़ार महत्वाची आहेत—
  १.’ऊस हा आजच खायला हवा, ऊसासाठी पैसा साठवून ठेवण्यात काही अर्थ नाही
  2. जी गोष्ट आज करायची ती आजच करायला हवी
  आजच्या fast life च्या जमान्यात आपली खूप शक्ति खर्ची पडत असते आणि रिटायर्मेम्ट पर्यंत करायच्या राहून गेलेल्या गोष्टी करायची ताकत, ईच्छा वगैरे कमी होते.तेंव्हा it is better to enjoy life to the fullest when you can. of course u have to take take care of your future but not to the exclusion of enjoying what life has to offer. that is another trait of Indian mentality, the feeling of sacrifice!
  and who says, you cannot enjoy even after retirement? if you have a right mindset, you can do a lot.go to all the cultural dos, watch movies, attend lectures and form groups of likeminded people to just enjoy just about anything.and then blogs have opened a new world for the curious mind! so don;t worry my friend, for a creative mind like yours, life will be interesting for ever!

  • अरुणा
   कधीतरी उगाच डोकं खराब झालं की असं काहीतरी लिहिलं जातं.. 🙂
   जे आज करायचं, ते आजच करायला हवे, हीच गोष्ट महत्त्वाची असते. पूर्वी पैसे नव्हते , वेळ होता- आता पैसे आहेत तर वेळ नाही.. हे नेहेमीच असं होत असतं!! रिटायर्मेंट नंतर मी काय करेन ते मलाच माहीत नाही, कदाचीत पुन्हा काहीतरी काम करत राहीन..?? बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत म्हणा… बघु या काय होतं ते!

 24. unsuidojo says:

  बरोब्बर आहे आपला समाजच आहे मुळी “काळजी वाहू” . मस्त मजेत काळजी फ्राय खावी, तर साला कोलेस्ट्रोल ची काळजी…
  नेहमीच आपण सांगतो जगाला “निष्काम कर्मयोग” आमच्या संस्कृतीने शिकवला, न जाणो आपणच तो हरवून बसलोय.
  उगीच काळजीच्या सावटाखाली जगणारयाना हिंदी चित्रपटांनी काही प्रमाणात तोच संदेश कित्येक गीतांमधून दिला आहे.
  पण आपण आपल्या मानेवरील “मध्यमवर्गीय पद्धतीचे – लोक काय म्हणतील” हे जोखड टाकू तेव्हा बरीचशी काळजी दूर होईल
  दुसर्यांच्या “approval” /मान्यतेचे जोखड हे बरयाच काळज्यांचे मूळ आहे
  असो जाता जाता –

 25. रोहन says:

  दुपारच्या वेळेस सूर्याची गती जाणवत नाही. तो स्थिर आहे असे वाटते, पण संध्याकाळी पश्चिमेच्या क्षितिजावरचा मावळतीचा सुर्य कसा झर्रकन खाली जातो नाही??

  … वा.. ह्यातच सर्वकाही जमून गेलंय… 🙂 मलापण ४५ च्या आत निवांत व्हायचं… 🙂 मग फक्त भटकायचे पुन्हा… 😀

  • खरंच .. ४५ अगदी योग्य वय आहे निवृत्ती साठी- जर फायनान्शिअल स्टेबल असेल तर..

 26. tejaswini joshi says:

  serious asala tari blog manapasun aavadala. tumachyakadun apeksha navhati kharatar asha lekhachi .bharatiy manasachi manasikata agadi barobbar tipali aahe.
  aapan kahi vela (majhya babatit tari ) ekhada aanandacha prasang aanubhavat asalo ki to sampuch nayech ase vatate ,pan kal kunasathi thambat nasato .tyamule samorache anandi kshan muthit ghatt pakadun thevave vatatat pan te kshan matra valusarakhe aapalyala pattahi lagu n deta nisatun jatat .
  aanakhi ek-aapalyala sthityantar nako asatat.aani adhikarachya jagahi badalalelya nako asatat.tyamule aajakal don pidhyanmadhe kahi veles visanwad ghadatana disato.
  pharach lambal nahi?
  sorry for that.

  • तेजस्विनी
   तू लिहू शकतेस.. एखादा ब्लॉग का सुरु करत नाहीस? काही मदत लागली तर मी आहेच… 🙂 छान लिहितेस तू!

 27. poonam says:

  kaka, maze baba dekhil 2 varsha purvi retire zale te dekhil tumchya sarkhe ekdam bindhast aahet.Pratek shabd janu kahi tyanchach vatat aahe.Pan shevtchya 2 olini dolyat panich aanale.Amhi tumchya kadunch jagnyachi navi aasha ghet aasto punha aase kahihi aani kadhich lihaych nahi.Aatachya jivanacha aanad ghevuya.

  • पूनम
   धन्यवाद. प्रतिक्रियेला उत्तर् द्यायला उशीर होतोय. कसे ते माहीत नाही, पण ही कॉमेंट पाहण्यात आलीच नव्हती.
   ते शेवटचं वाक्य केवळ एका व्यक्ती कडे पाहून लिहिलं आहे. कोणालाच आपल्यामुळे त्रास होऊ नये एवढीच इच्छा. दवाखान्यात खंगुन खंगुन मरण्यापेक्षा एकदम एका झटक्यात मरण यावसं वाटतं मला !

 28. DB says:

  wachtana bare watnare vichar ahet pan pratyakshat aanayala kathin ahet. bhavishyachi kalji n karta jagnari kahi manse aanandat jagali astilhi pan sagalech tase jagu shaktil and tatkalin aanandat ramun bhavishya poorna visarane kayam barobar tharel ase nahi. ya sarva goshtimadhye ek samanway gathata yayala hawa. bhutkalache oze pathivar thakun bhavishyakade najar lawoon basu naye he aaple ekdam khare ahe. pan bhutkalapasun shikave and bhavishyasathi kiman sawadh asawe ase watate. balance, understanding, vivek, tartamya ya goshti mahatwachya ahet jyana niyamit ayushya jagayache ahe. kalandar jivanchi gostach vegalie.mala mazya jivanacha atta aani attach purna ananda ghyacha ahe hi mazi ek iccha zali pan mala aai wadil, bhau, bahini, bayako mule ahet ke nahit aani me tyancha vichar karayacha ki nahi hehi tharvave lagel. tyahipudhe anand mhanje kay hehi tapasayala have. vvegveglya patlyawarcha, prakarcha anand asato. paishachya babtit wyawahari asane changlech ahe. bhavishachi neat soy nahi lawali tar utartya kalat far wait jagane padri padu shakate. tewha apli kasalich takad shillak nasate. pan tasach manus asel tar hehi to kontyahi awasthet sahan karu shakato. jyane tyane apapli takad olkhavi.

  insurance agent je sangat hota ti paddhat bari nasel, tyacha uddesh tyacha fayada karane ha asel pan to mudda chuk nahi. bhataji bara nahi mhanun dev wait nahi ki puna wait nahi. majemajet bhavishyachi kalji gheta yete. shiknyasarkhi gosth hi ki kalji gheto ahe he na mantach ghetli geli pahije. sehawagla khelayala shram padtat kaho? aplyala awadte ti gosht karayala tras padto kaho? tasach ahe pan jara samjun ghyala hawa.

 29. shradha says:

  post far aavdali….
  kharch tumhi mazya manatale vichar mandale ahet….mi pan ashich vichar karat aste….udya kay…ajun age itka jast nahi pan ugach vichar yetat…..mag maza navara mala nehami hech sangat asto…kashala udyachya vichar karun aajacha ananad dur kartes………

  • श्रद्धा,
   मनावर कोणाचाच ताबा नसतो, जसे म्हणतात ना, मंकी स्टंग विथ स्कॉर्पीओ, तसा प्रकार असतो मनाचा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s