मराठी ब्लॉगर्स मेळावा -२०११

मुंबईला ’दादर सार्वजनीक वाचनालयात’ दिनांक ५ जून रोजी  मराठी ब्लॉगर मेळावा घेण्यात येणार आहे.  मागच्या वर्षी झालेला ब्लॉगर्स मेळावा, आणि त्याच्या आठवणींची  चव अजूनही मनात  रेंगाळत असतांनाच , या वर्षी पण   ’ब्लॉगर्स मेळावा ” करायचा का म्हणून जेंव्हा विशालने   फेसबुक वर सुतोवाच  केले, तेंव्हाच मागच्या मेळाव्याला एक वर्ष होऊन गेल्याची  जाणीव  झाली.  वेळ किती लवकर जातो नाही??

हा मेळावा का?? या  विषयावरचे मागच्या वर्षी एक पोस्ट लिहले होते, ते इथे आहे..

विशालच्या  फेसबुक वरच्या पोस्ट वर,   सुहास आणि कांचनच्या प्रतिक्रिया- आणि नंतर फोन! एक वेगळाच उत्साह संचारला होता.  आणि मग  सुरु झाली  ह्या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप कसे द्यायचे म्हणून   आखणी.  नंतर सगळं काही मेल आणि फोन वर होणं शक्य नाही, म्हणून बैठक. कांचनच्या घरी आम्ही सगळॆ जमलो  आणि या वर्षीच्या  “कार्यक्रमाची रुपरेषा” ठरवली.

मागच्या वर्षी जेंव्हा ब्लॉगर्स मेळावा घेतला होता, तेंव्हा फार कमी लोकं एकमेकांना ओळखत होते- जरी प्रत्यक्ष भेट झालेली नसली, तरीही नेहेमीच कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ब्लॉग पोस्ट वर कॉमेंट्सच्या रुपात संवाद व्हायचाच! त्यामुळे जेंव्हा प्रत्यक्ष भेट झाली, तेंव्हा  अगदी जुनी ऒळख असल्यासारख्या गप्पा मारणे सुरु झाले  होते . या वर्षी तसे नसेल. बरेच ब्लॉगर्स  एकमेकाला चांगले ओळखतात, बरोबर केलेल ट्रेक्स, खाद्यकट्टे अशा अनेक कारणाने कधी ना कधी तरी भेट होत असतेच.

जेंव्हा आपण एखादा ब्लॉग वाचतो, तेंव्हा त्या लेखकाची आपल्या  मनात एक प्रतिमा तयार होत असते. ती प्रतिमा केवळ त्या  लेखकाच्या लिखाणा वरून    ठरते.  बरेच लोकं जे टोपणनावाने लिहीतात, त्यांच्याबद्दल   सारखं वाटत असतं , की हा माणुस स्वतःचा चेहेरा का लपवून ठेवतो??  त्यामुळे ब्लॉगर्स मधे अशा लोकांबद्दल थोडा   अविश्वास असतोच.  कालांतराने तो  अविश्वास जरी कमी  झाला, तरी पूर्णपणे नाहिसा होत नाही हे मात्र नक्की!

मागच्या वर्षी जेंव्हा ब्लॉगर्स मेळावा घेतला होता, तेंव्हा या मेळाव्यात  बरेच ब्लॉगर्स एकमेकांना पहिल्यांदाच भेटले.  यात सगळ्यात जास्त आश्चर्य कोणाला पाहून वाटलं असेल-  तर ते  मैथिली  प्रधान आणि आल्हाद महाबळ या दोघांना. जेंव्हा १६ वर्षाची मैथिली ब्लॉगर म्हणून समोर उभी राहिली, तेंव्हा विश्वासच बसत नव्हता.दोघांच्याही लिखाणावरून त्यांच्या वया बद्दलची   कल्पना पूर्णपणे चुकीची ठरली !  काही लोकांचा  उत्साह तर इतका दांडगा होता, की  हैदराबादहून आनंद पत्रे , नाशिकहून रविंद्र कोष्टी , पुण्याहून सागर बाहेगांवकर वगैरे मंडळी केवळ या मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी आली होती.

या वर्षीच्या ब्लॉगर्स मेळाव्या साठी श्री प्रधान काका, सारखे फोन करून अपडेट्स विचारत होते. आता ८० च्या  वर वय   पण उत्साह मात्र तरूणांना पण लाजवणारा. पहिले पोस्ट टाकले, मेळाव्या घ्यायचे जाहीर  केले. मेळावा ठरला, मागच्या वर्षीचा उत्साह पहाता या वर्षी पण तसाच प्रतिसाद मिळेल याची खात्री होती, आणि सांगायला आनंद वाटतो की आता  रजिस्ट्रेशन जवळपास ९० टक्के पुर्ण झाले आहे.

मागच्या वर्षी मेळावा झाल्यावर बरेच लोकं म्हणाले, की त्यांना या बद्दल आधी समजले नाही, म्हणून ते येऊ शकले नाही. तशीच परिस्थिती या वर्षी पण होऊ नये म्हणून, आणि सगळ्यांना  समजावे  म्हणून कांचन विशाल आणि सुहासने या मराठी ब्लॉगर्स मेळाव्याचे  पोस्ट टाकले होते, त्याच श्रुंखलेमधले  हे शेवटचे पोस्ट

दादर सार्वजनिक वाचनालयाची कॅपॅसिटी लक्षात घेता, या कार्यक्रमाला येणाऱ्यांची नांव नोंदणी ठरावीक संख्या झाली की बंद करण्यात येणार आहे, तेंव्हा जर  तुम्ही ब्लॉगर असाल, वाचक असाल, आणि आपला   ब्लॉग सुरु करायची इच्छा असेल ,तर लवकर रजिस्ट्रेशन   करावे ही विनंती. रजिस्ट्रेशन फॉर्म साठी इथे क्लिक करा.

या मेळाव्याच्या संदर्भात  “सकाळ” मधे आले्ली बातमी.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

16 Responses to मराठी ब्लॉगर्स मेळावा -२०११

 1. Smita says:

  best wishes for the bloggers meet! dar divashee kahee kshaN fakta visit karaNyat aNee comments deNyat ghalavalet, taree barech bloggers lok ata mahiteeche zalyasarakhe vaTataat he khara! Mazyasarakhe ‘reactive’ lok he nehameech tumchya sagaLyanchya ‘proactive’ pravrutteebaddal adar baLgun asataat. kuNeetaree kahee vichar mandalyavar apala maat deNa sopa ahe, puN muLat original vichar mandaNyache kashTa aNee dhaDas hee goshTa moThee ahe. may your tribe grow!

  • स्मिता
   इतकं काही कठीण नाही. एकदम सोपं आहे, की बोर्ड उघडायचा आणि जे काही मनात येईल ते टाइप करायचं.. शुभेच्छांसाठी मनःपुर्वक आभार.
   दुसरी गोष्ट म्हणजे, जर कोणी वाचलंच नाही, तर लिहीणार तरी कोणासाठी?? तेंव्हा वाचक तर हवेतच- तरच काहीतरी लिहीण्याची उर्मी येईल..

 2. मेळाव्याच्या सगळ्या घोषणा वाचून आणि त्याबदलचा उत्साह बघून खूप छान वाटतंय. पण त्याचवेळी आपण ह्या सगळ्यात सहभागी होऊ शकणार नाही ही जाणीव फार त्रास देतेय 😦

  ब्लॉगर्सच्या ह्या मेळाव्याला मनापासून शुभेच्छा !!

 3. Aparna says:

  काका मागच्या मेळाव्याच्या निमित्ताने भेटी झाल्या त्याचा आनंद आहे पण यावर्षी येत येणार नाही त्याची खंतही…अर्थात इतक्या लांब आहे मी की प्रत्येक मेळाव्याला यायला नाहीच जमणार पण मला या गोष्टीचा आनंद वाटतो आहे की यावर्षीही सगळी जण भेटताहेत आणि मागच्यापेक्षा जास्त धमाल असेल यात शंका नाही…..
  वृतांत फोटो इ.इ. मेळावा झाल्यावर लवकर लवकर येऊ देत…..शुभेच्छा..

  • अपर्णा,
   मागच्या वर्षी एक इंटरनॅशनल पार्टीसिपंट होतीस. 🙂 या वर्षी भाग्यश्री नुकतीच परत गेली, नाहीतर ती पण राहिली असती. तन्वी येणार म्हणते आहे आता या वेळेस. म्हणजे एक इंटरनॅशनल पार्टीसिपंट आहेच.. अनूजाचं फिसकटलं शेवटल्या क्षणी..

 4. राजे says:

  वृतांत फोटो इ.इ. मेळावा झाल्यावर लवकर लवकर येऊ देत… असेच म्हणतो..
  खूप खूप शुभेच्छा… मी पण येतो आहे म्हणून मला पण खूप खूप शुभेच्छा 😉

  • राजे,
   तुमच्या शिवाय कसं काय पूर्ण होणार हा कार्यक्रम.. तुम्ही तर यायचं आहेच… 🙂

 5. mazejag says:

  Thanks to shamu…

 6. सुरेश पेठे says:

  महेंद्रजी, नमस्कार व कौतुक,
  तुम्ही मुंबईकरांनी एक वर्षाची आठवण काढीत न बसता लगेच दुसरा मेळावा तडीस नेण्याचा त्याच उत्साहात घाट ही घातलात ह्याचे मनापासून कौतुक व शुभेच्छा सुध्दा !

  आम्ही पुणेकर आरंभशूर ! पहिलाच मेळावा थाटामाटात साजरा केला व नंतर गाढ, पुन्हा त्याची आठवणही नको !

  मागिल वेळी ही यायचे होते…ह्याही वेळी जमेलसे दिसत नाही, तरीही एखादी शीट …कोपर्‍यातलीही चालेल राखून ठेवा, मनात तर आहे जमले तर देवाची मर्जी, असो.

  तुम्ही, कांचन, सुहास असल्यावर कार्यक्रम उत्तम होणार ह्यात शंका नाहीच. बघुया नाहीतर नंतर त्याचा वृत्तांत चघळू , मग काय करणार ?

  • सुरेशजी
   अहो जमवा कसं ही करून. एक दिवसाचा तर प्रश्न आहे.. सकाळी आलात तरी दुसऱ्या दिवशी परत जाता येईल.

 7. अरुणा says:

  मुंबईला येणे जमणार नाही.तुमच्या मेळाव्याला शुभेच्छा. सविस्तर व्रुत्तांत पहायला मिळेल ना?

 8. रोहन says:

  यंदा हुकणार असे दिसतंय… बघुया पोचतोय का परत तोपर्यंत… आलोच तर घुसू शकणार का??? हेहे… गतवर्षीच्या आयोजकांसाठी काही राखीव जागा वगैरे… हेहेहे.. सकाळ मधली बातमी मस्त आहे…

Leave a Reply to सुरेश पेठे Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s