आई शपथ!!

लहान असतांना ” खोटी शप्पत घेऊ नकोस, नाही तर आई मरते ”  अशी भिती घालून शपथ या गोष्टी बद्दल एक अकारण उत्सुकता, भिती मनात घातली जात असे. कितीही निगरगट्ट मुलगा असला, तरी पण आईची शपथ  घेतांना थोडा काळजीपूर्वकच घ्यायचा. पण एकदा का कोणी  आईची शपथ  घेतली की त्यावर सगळे जण अगदी डोळॆ बंद करून विश्वास ठेवायचे.

खालच्या पोर्च मधे दोन मुलं खेळत होती, आणि मां की कसम ले, फिर मानूंगा असं काहीतरी बोलणं सुरु होतं. ते ऐकलं, आणि जाणवलं, की आपल्या लहानपणीच्या व्हॅल्युज अजूनही तशाच आहेत.  इतक्या वर्षानंतर सुद्धा या कम्प्युटरच्या युगात पण आईच्या शपथेचं तितकंच मह्त्त्व आहे हे बघून गम्मत वाटली.  लहानपणी खोटं बोलायचं असेल तर ’आई शपथ’   टाळून इतर कुणाची तरी म्हणजे ” देवाची शप्पत” घेउन वेळ मारून न्यायचो आम्ही. देवाची शपथ ही आईच्या शपथे इतकी पॉवरबाज मानली जात नसे.

मला आठवतं, आमच्या लहानपणी पण घरचे चिल्लर  पैसे कधी दिसेनासे झाले, की आई ” तू घेतले नाहीस ना? मग घे माझी शपथ”, म्हणून शपथ घ्यायला लावायची . त्यातले जर पतंगी साठी पाच पैसे जरी घेतले असले, तरीही खोटी शपथ कधी घेऊ शकलो नाही  . आपल्याला शिक्षा होणार हे माहीती असून सुद्धा मान्य करायचो की मीच घेतले पैसे म्हणून -. कदाचित म्हणूनच असेल की आता मोठं झाल्यावर पण   खोटी शपथ घेतल्याने   काही होत नाही हे समजल्यावर सुद्धा,   आईची खोटी शपथ घेण्याची अजिबात इच्छा / हिम्मत होत नाही.

लग्न झाल्यावर  बायको जेंव्हा आईच्या जागी असते, आणि घरून भांडून बाहेर गेल्यावर ” डबा  संपव रे, माझी शपथ आहे तुला, असं म्हणते,आणि जो पर्यंत हो म्हणत नाही तो पर्यंत फोन ठेवत नाही तेंव्हा या एका शब्दाच्या मधल्या शक्तीची जाणीव होते. केवळ एक शब्द , ’तिची शपथ’ तुम्ही घेतली की ती निश्चिंत होते, की आता हा नक्की डबा संपवणार म्हणून. दुपारच्या लंच टाइम मधे   बायकोचा चेहेरा डॊळ्यासमोर येतो आणि म्हणतो, माझी शपथ आहे तूला, तेंव्हा आपसूकच डबा उघडून खाणं सुरु केलं जातं.

लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी जातांना पण डोळ्यात पाणी आणून, मी लग्गेच परत येते रे, तुझी शप्पत, असं म्हणत,  जेंव्हा ती निघते, तेंव्हा रोज न चुकता दिवसातून चार दा फोन करीन म्हणून शपथ घ्यायला  लावते, तेंव्हाच तिचा तो चेहेरा आणि भरलेले डॊळॆ आयुष्यभर  लक्षात रहातात,शपथ मोडता येत नाही हा म्हणजे   एक मनाचा खेळ आहे झालं!

जर एखाद्याची शपथ मोडल्याने त्या व्यक्तीचा मृत्यु होत असेल तर मग, मी कसाबची खोटी शपथ घेतली असती ! सहज विचार केला की जर अजुन कोणी कोणाची शपथ घेतली असती बरं???

काही लोकांनी आपल्या बॉसची ,

मनमोहनने  जनरल कयानीची,

शरदपवारांनी अण्णा हजारेंची ,

तेलगी ने शरद पवारांची ,

विलासरावांनी पृथ्वीराजांची.

जया बच्चन ने रेखाची,

शाहीद कपूर ने करीनाची,

उद्धव ने राजची,

सलमानने तर  अगदी ऐश्वर्या पासून विवेक , ते कतरिना, ते रणवीर वगैरे वगैरे.. शपथा घेतल्या असत्या.भुजबळांनी, राणेंनी , आणि मुंडेंनी कोणाची घेतली असती ते तुम्हीच ठरवा. अर्थातच, ही यादी खूप मोठी होऊ शकते.   पण खोटी शपथ घेतल्याने कोणी मरत नाही म्हणून बऱ्याच लोकांचा जीव वाचला असे  म्हणावं लागेल.

जगात तुम्ही कुठल्याही भागात गेलात तरी, ह्या शपथेचे महत्त्व अगदी सारखे आहे अगदी अमेरिकेपासून तर टीम्बक्टू पर्यंत!  शपथ, वचन, आणि पाप पुण्य ह्या कल्पना मला नेहेमीच गोंधळात टाकतात.

शपथेवर माझा अजिबात विश्वास नाही, पण आमचं न्यायालय मात्र अगदी डोळे झाकून विश्वास ठेवते. कोणीही असो, अगदी तो कसाब जरी असला, आणि त्याने शपथेवर  कुराणावर हात ठेवून खोटं सांगितलं की तो हल्ला करणारा मी नव्हेच.. तरी पण आपली न्याय व्यवस्था  तो खोटं बोलला हे माहीत असूनही त्याला काही करणार नाही, उलट त्याच्यावर केस लढवत बसते वर्षानुवर्ष- कारण कायद्यामधे तशी तरतूद नाही.

शपथ घेऊन खोटं बोललं तरी  न्यायदेवतेसमोर चालतं. तिथे बोलतांना   खोटी का होईन ती गीतेवर, कुराणावर हात ठेवून  समोर शपथ घ्यायची , की झालं. शपथे सारखी  एखादी गोष्ट अस्तित्वात नसतांना पण त्यावर न्यायालय विश्वास  का बरं ठेवते? हा प्रश्न नेहेमीच पडतो. किती मजेशीर आहे ही गोष्ट नाही??

लग्नामधे पण होम सुरु असतांना ’ नाती चरामी अहं” अशी शपथ घ्यावी लागतेच- किती लोकं ती पाळतात हा प्रश्न आहेच म्हणा!   सचीन तेंडूलकर पण सारखा आईशपथ म्हणतच असतो. हे राजकीय नेते जेंव्हा एखाद्या पदाची शपथ घेतात तेंव्हा त्यांना गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते.  अशी शपथ घेतली की मग “आदर्श” सारखी कामं केली जाऊ शकतात. कोणाला काही सांगायची गरज नाही- कारण शपथ घेतली आहे ना गोपनीयतेची!

शपथ म्हणजे एक खेळ आहे, असा खेळ जो ’खेळ’ तुमच्या भावनांशी खेळतो आणि तुमच्या मनावर तुमच्या नकळत राज्य करतो!! गाडी खाली चालणारा कुत्र्याला असे वाटते, की गाडी आपणच खेचतोय.. तसंच तुम्हाला वाटत असतं की हा खेळ आपण खेळतोय, पण प्रत्यक्षात तो खेळच तुमच्या मनाशी खेळत असतो…….!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

48 Responses to आई शपथ!!

 1. शपथ म्हणजे एक खेळ आहे, असा खेळ जो ’खेळ’ तुमच्या भावनांशी खेळतो +१

  आई शप्पथ सांगतो, पोस्टमध्ये लिहिलेला एक न एक शब्द खरा आहे, अनुभवलेला आहे … एकदम मस्त विषय 🙂 🙂

  • सुहास
   अरे पोस्ट करतांना विचार करत होतो की फार बालिश झालं की काय म्हणून! 🙂 पण केलं पोस्ट! तुझी कॉमेंट पाहीली आणि थोडा धीर आला, नाही तर सरळ डीलीट करणार होतो..

 2. कोकणात अशी एक आख्यायिका सांगितली जाते की सरडा सापाला जाऊन चुगल्या लावतो वैगरे. थोडक्यात सरडा हा सापाचा खबरी. मग लहान मुले सरड्याला दगड मारल्यावर जर सरडा मेला नाही की दगड मारणारे सरड्याला शपथ घालायचे “सरड्या, सरड्या सापाला माझे नाव सांगू नकोस, नाव सांगितलेस तर तुला शपथ आहे, तू पिचक्या दगडाखाली चिरडून मरशील.” कैच्याकै

  तुमची पोस्ट वाचून हे आठवले. माझे मलाच हसू आले.

  • हे वाचून मला मुंगुसाची गोष्ट आठवली. असं म्हणतात की मुंगसाला रामाची शपथ घातली तरच ते तोंड दाखवतं. मोठ्यांनं म्हणायचं “मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शपथ!” की ते मुंगूस वळतं आणि तुमच्याकडे बघतं. लहानपणी मी करून बघितलं आणि चक्क मुंगसानं माझ्याकडे बघितलं !! तेव्हा प्रचंड गंमत वाटली.

   कालांतरानं लक्षात आलं. बऱ्यापैकी मोठा आवाज केला की निवांत चाललेला कोणताही प्राणी थांबून क्षणभर तुमच्याकडे बघतो. चक्क माणूस सुद्धा!

   • नॅकोबा
    ते सहाजीकच आहे .. मुंगुस मुळातच भित्रा प्राणि, म्हणून तो इकडे तिकडे न पहाता पळायचा प्रयत्न करतो..
    अवांतर.. हल्ली मुंगुस दिसत नाहीकुठे.. लवकरच एंडेजेंडर्ड स्पेसिज मधे पहावे लागेल का त्या प्राण्याला??

  • सिद्धार्थ
   लहानपणच्या दिवसांची एक वेगळी जागा असते मनात 🙂 जूने दिवस आठवले की मस्त वाटतं 🙂

 3. हेरंब says:

  >> पण आमचं न्यायालय मात्र अगदी डोळे झाकून विश्वास ठेवते.

  हाहा.. अगदी अगदी… हेच माझ्याही डोक्यात यायचं पूर्वी… म्हणजे कोर्टाच्या ऑफिशियल बाबतीत बोलताना त्याने शपथेवर अमुक अमुक सांगितलं असा उल्लेख वाचून पूर्वी हसायलाच यायचं मला. कारण शपथ म्हणजे फक्त लहानपाणीचा खेळ असतो.. पण हे एवढं साधं सोपं गणित महान महान न्यायालयाला कळेल तर ‘शपथ’ 😉

  • हेरंब
   खोटी शपथ घेतली तरी काही कारवाई का केली जात नाही हेच मला समजत नाही. जनतेचा पैसा वाया गेल्याच्या कारणाने खोट्या शपथे साठी मोठी शिक्षा ठेवायला हवी!

 4. महेश कुलकर्णी says:

  शपथेचा अर्थ कोणाच माहित नाही, केवल एक फार्स असतो,

  • एक्झॅक्टली.. मला तेच म्हणायचंय, जर शपथेचा अर्थ नसतो, तरी त्यावर न्यायालय विश्वास कसं ठेवतं? राजकीय नेत्यांच्या शपतेचा फार्स कशाला केला जातो??

 5. गुरुनाथ says:

  सही है हो बोहोत सही है, बरेच वेळी बारकी पोरे उच्चारात घपले करुन “खरे सांगतो बे आई “शपल” “शपठ” “शपत” वगैरे ऍनग्रॅमिंग करत असत पण शपथ असे कोणीच बोलत नसे!!!!, मग जाब विचारणारा आय.पी.एस अधिका~याच्या तो~यात “नीट शपथ म्हण ” असे फ़र्मान सोडायचा ज्याच्यामुळे गुनाहे अजिम पकडल्या जायचा!!!!!, भारी आहे हे शपथ प्रकरण

 6. Smita says:

  very true, puN mee nantar khoTya shapatha ghetalele kahee nidar nirlajja lok pahile aNee khatree zalee kee ha kheL lahanpaNeech sincerely khelala jato… bahutek. depends on the individual of course.

  • स्मिता
   मला वाटतं इमोशनल अटॅचमेंट असली की खोटी शपथ घेणे सहज ( रिपीट सहज ) शक्य होत नाही. म्हणूनच म्हणतो.. लहानपणचा खेळ अजूनही तेवढ्याच आत्मियतेने नवरा बायको मधे खेळला जात असतो.

   • Smita says:

    yes barobar ahe, navara bayako mee exempt kele hote mazya comment madhun:-). mhaNaje in fact , manatahee nahee ala kee tya natyat khotya shapatha gheta yeteel asa. arthat te nata jasa asayala hava tasach asel tenva. naheetar apuN kiteetaree cheating chya cases pahatach asato jagojagee.. navaro bayakomadhye sudhdha. those persons don’t qualify as really “married” to each other anymore i guess…karaN tyanchyatalee shared emotions sampalee (may be unilaterally many times) tarach asa khoTepaNa suchat asel. .

    • स्मिता
     ते एक नातं सोडलं, तर ह्या शपथ प्रकरणाला काहीच अर्थ राहीलेला नाही असे मला पण वाटतं.
     शेअर्ड इमोशन्स.. अगदी योग्यशब्द!! 🙂

 7. vikram says:

  Aai shapath ek number post .. lahanpanichya aathvani jagya jhalya 🙂

 8. Snehal says:

  खुपच छान लेख आहे, लहानपण आठवले सगळे …

 9. काका नेहेमीप्रमाणे मस्त खुसखुशीत पोस्ट! इतक्या छोट्या छोट्या गोष्टी इतक्या मस्त खुलवून सांगता तुम्ही! आईशप्पत… मला असं लिहिता यायला हवं होतं हो!

 10. mazejag says:

  Mastach post kaka…Shapaath ha khel aajhi amhi khelat asto…Hemu nehmi pakdla jato…mi punyahun parat aale tevha pahil bhandi kundi vayvsthit..pan maze kacheche 3 glass khali hote…mi vicharla “party dankyat zali watat”….tar mhanto kasa “Parti kasli mi wachatach hoto don diwas…”maz hukumi astra “ghe mazi shppath”….”tula mahit aahe mi shappath ghet nasto”…asa chor pakdla…hehehehe 🙂

 11. Madhura Sane says:

  काय भारी लिहिली आहे हो post .. एकदम खास..
  दरवेळी नवीन विशेषण काय लावू हेच कळत नाहीये आता..
  पण एकदम झक्कास..
  शपथ घेताना अजूनही थबकतो आपण, कदाचित आपल्या अजूनही संवेदनशील असणाऱ्या मनाचे लक्षण आहे हे..

 12. Poorva Kulkarni says:

  Mast, Mast, Mast … jata jata ek message pan dilat.. हा खेळ आपण खेळतोय, पण प्रत्यक्षात तो खेळच तुमच्या मनाशी खेळत असतो……

  • पूर्वा
   आभार.. हे खेळ खेळण्यातला आनंद गमावला, की जिवनातला आनंद गमावल्यासार्खा होतो. म्ह्णणून असे लहान लहान आनंदाचे क्षण टीपून ठेवायचे असतात.

 13. गुरुनाथ says:

  “लग्न झाल्यावर जेव्हा आईच्या जागी बायको असते!!!!”……. Now this is Improvised Explosive Device (IED)…. विस्फ़ोटक …… ह्याचीच तर भिती आहे भाई!!!!, आम्ही म्हणुन घाबरे होतो!!!

 14. Vishram says:

  What about “swearing in ” ceremony of the ministers?

  • Vishram
   Those characters are swaring on each other all the time..
   बाय द वे, ते पण लिहीलंय की वर. आदर्शचं उदाहरण घेऊन.. 🙂 ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.

 15. रमेश म्हात्रे says:

  रमेश म्हात्रे

  क्या बात है काका,
  चारी पोस्ट एकदम वाचल्या…..
  एकच शब्द अप्रतिम….!!!!!

  • रमेश
   धन्यवाद.. तुम्हा लोकांच्या अशा प्रतिक्रियांमुळेच तर ब्लॉगिंग सुरु आहे. एकदा प्रतिक्रिया कमीझाल्या की ब्लॉगिंग बंद करायला मोकळा~!~ 🙂

 16. Nisha says:

  farach chan aahe post

 17. Smita says:

  ajun ek atyanta serious shapath mazya swat:chya circle madhye ghetalee jayachee -arthat lahanpaNeech tee mhanaje “Vidyechee shappath” ( Knowledge):-) ata tisaree- chotheetalee jee kahee vidya amachee asel tevaDhee paNala lavun gambheer cheheryane sangeetala kee urlele sagaLe gappa vayache, kharach asaNar mhaNun!!!aNee teehee kadhee khoTee ghetalee jayachee naheech!

  aNee tee navara bayakonmadhalee shapaTh tumhee mhanalat tyavarunmala ajun ek aThavaN : ‘natasamraT’ naTak aThavala ( shapath vaha, shapath vaha….:-)) nice .

  • अरे हो, ते तर विसरलोच होतो. विद्येची शप्पत पण कोणी घेत नसे तेंव्हा. बऱ्याच गोष्टी विसरायला झाल्या आहेत हल्ली.

 18. अरुणा says:

  लहानपणी कोणी शप्पत घातली कि त्याला आपण शप्पत सोडली म्हणायचा आग्रह करायचो.आणि नाई सूडली तर घाबरायला व्हायचं! मनाचेच खेळ नाही का सगळे?तुमच्या पिढीचा यावर अजून विश्वास आहे. आजच्या अगदी लहान मुलांचा असेल?

  • अरे हो.. शप्पत सुटली म्हण , म्हणायला लावायचं- ते विसरलोच होतो. आजच्या पिढीचा यावर विश्वास बसेल असे वाटत नाही.

 19. रोहन says:

  आईशपथ काय पोस्ट आहे… एका शब्दावरून पोस्ट.. 🙂 मस्त.. मी तर ‘आई शपथ’ किंवा ‘देवा शपथ’ ऐवजी तुझीच शपथ असे बोलायचो… मग समोरचा उत्तरायचा.. हा म्हणजे मलाच मार… 😀

  • :)पुन्हा एकदा लहानपण देगा देवा म्हणून जगायची इच्छा होते की नाही?? शप्पथ सुटली म्हण.. म्हणून मागे लागणे.. हा पण एक भाग होताच . मजा यायची पण..

 20. स्नेहल says:

  हो काका………
  मी आज हि आई ची शपथ घेताना कचरते, भले मी खोट नसेल बोलत पण हा जर कुणी मला आईची शपथ घ्यायला सांगितली तर शक्यतो मी नाहीच घेत
  लहानपणी मला एकदा ताईने आई ची शपथ घेऊन सगळा सत्य उगाळले होते तेच आईच्या शपथे खातर मला माहित असताना मार खाला होता 😦
  भले आपण कितीही मोठे होऊ, आईशी मनाविरुद्ध झाले म्हणून भांडू पण तिची शपथ घेणे मला वाटते जडच जाईल.

  बाकी देवाची शपथ खरच वेळ मारून नेण्यासाठीच आहे आसे मला लहान पानापासून वाटते 😛

  खरच जर कुणी मरत असते ना असे तर बर झाले असते 🙂 🙂 🙂

  • स्नेहल,
   🙂 मनाचे खेळ आहेत सगळे, पण मानवाचा मेंदु इतका प्रगत झाला, तरी पण असे खेळ त्याला आवडतात खेळायला.

 21. Tanuja says:

  ह्या शपथेप्रमाणे डोक्यावर हात ठेवणे पण आहे…
  खर बोलातीयेस ना मग माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग
  खरच बोलतो तेव्हा…
  नाहीतर म्हणून जातो नाही ठेवणार डोक्यावर हात

  • तनुजा
   कुठेतरी एक अनामिक भिती असते, की आपल्या वागण्यामुळे जर काही झालं तर?? आणि केवळ या भिती मुळेच मन खोटी शपथ घ्यायला कचरतं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s