कोचींग क्लासेस- राजाभाऊंचे!

इतकी वर्ष लग्नाला झाली, पण तुला अजूनही हे इतकं लहानसं काम करता येत नाही?? अरे हे तर एखादी पाचवीतली मुलगी ( लक्ष द्या मुलगी पण .. इथे पण मुलगा म्हणत नाही बायका कधी-  अशा जेंडर डिस्क्रिएशन चा निषेध व्हायला हवा खरं तर) करू शकेल.. हे असे डायलॉग्ज सगळ्यांनाच कधी ना कधी तर ऐकावेच  लागतात.  पण हे असं किती वर्ष चालणार हो ?? आमचे बाबा बघा, किंवा दादा बघा,  हे करायचे, ते करायचे ,अस्सं करायचे , तस्सं करायचे.. अरे हो.. मान्य आहे, आणि तुझे बाबा , दादा आहेतच ग्रेट!(हे वाक्य म्हणताना मनातल्या मनात कांहीतरी पुटपुटणं होतंच)!! पण म्हणून  आपण काय आयुष्यभर हे असं काहीतरी ऐकत रहायचं का? अरे आम्हालाही काही वाटतं की नाही??

राजाभाऊ टूरवर   गेले होते, आणि  लॅपटॉप वर एक मेल वाचत बसले होते,  तेवढ्यात त्यांना  एकदम बायकोची  आठवण झाली,  आणि  ते पट्कन उठले आणि  टॉयलेट मधे जाऊन फ्लश करून आले. 🙂 ( या वाक्याचा संदर्भ पुढे येईलच)

राजाभाऊंच्या  डोक्यात एक कल्पना आली … ( अरेरे !!!! एवढी चांगली बायको असतांना , ही ’कल्पना’ कशी काय येऊ शकते ?? हे असे पाणचट विचार मनात आले असतील तर ते दूर सारा आणि पुढे वाचा) की सगळ्या    पुरुषांसाठी  म्हणून आपण क्लासेस काढायचे. त्या क्लासेस मधे हे असे नेहेमीचे   विषय असतात , त्यांना सामोरा कसे जायचे हे शिकवायचे. झालं!बसले राजाभाऊ समोर पडलेली वही घेऊन, आणि सुरु केलं खरडणं ! कर्म धर्म संयोगाने, तो कागद आमच्या हाती लागला, आणि तुम्हा सगळ्यांसाठी मी तो खाली जसाच्या तसा कॉपी करतोय.

या वर्षी एलटीसी मधे बायको माहेरी गेल्यावर काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल नां? मग ’राजा भाऊंचे’ क्लासेस हेच त्याला एकमेव उत्तर! सुखी संसारी जीवनासाठी- राजाभाऊ क्लासेस ला नांव नोंदवा.क्लासेस मधे पुढील गोष्टी शिकवल्या जातील, आणि १५ दिवसात तुम्हाला एकदम आयडियल नवरा  बनवून सोडू आम्ही. कोर्स हा दोन आठवड्यांचा असेल

कोर्स म्हंटलं, की  सिलॅबस आलाच,  खरं तर हा विषय इतका गहन आहे की त्यावर कमीत कमी दोन महिने  क्लासेस केले तरी कमीच पडतील, पण  तो  सगळा कोर्स एका आठवड्यासाठी कन्डेन्स्ड केलाय. थोडक्यात रुपरेषा खाली दिलेली आहे .  .

१) बर्फाचे ट्रे पाणी न सांडता कसे भरायचे, आणि एकदा भरून झाल्यावर पुन्हा बॅलन्स करत फ्रीझ मधे कसे ठेवायचे या विषयावर  साधक बाधक चर्चा.  राजाभाऊंनी तयार केलेले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पण दाखवण्यात येईल.   याचे प्रॅक्टीकल पण करून घेण्यात येईल.

२)  ’सु’ करतांना एका हाताने  टॉयलेट सीट उचलून धरून  इकडे तिकडे जमिनीवर ’सु’ न उडू  देता करणे शक्य आहे का? आणि असेल तर त्याचे  टेक्निक कसे काय आत्मसात कराल? या विषयावर गृप प्रॅक्टीस…. ( या विषयावर पार्टीसिपंट्स ती टॉयलेट सीट काढून का टाकायची नाही – हा मुद्दा उचलू शकतात, त्याचे समर्पक उत्तर तयार ठेवणॆ = राजाभाऊंची तळटीप)

३) धुवायला टाकायचे कपडे टाकण्याची बास्केट आणि जमिनी    मधला फरक. स्लाईड शो सह (फोटो मागवायचे अनिकेत , पंक्या कडून , स्वतःच्याच घरातला आपण बाहेरून आल्यावर कपडे काढून फेकले की बायकोने पुन्हा आवरण्या पूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवणे- राजाभाऊंची तळटीप)

४) जेवण झाल्यावर डीशेस सिंक मधे आपोआप जातात का? यावर एक  व्हिडीओ, स्लाईड्स.. आणि मग त्यावर चर्चा.. जेवल्यावर उरलेलं अन्न  आत नेऊन फ्रिज मधे ठेवण्याकरता एक कार्य शाळा.

५) हवी असलेली वस्तू कुठे आणि कशी शोधायची .. ) ’अगं ए…….. माझी कारची चावी कुठे आहे गं”. म्हणून ओरडणे हा उपाय न करता,  ’योग्य ठिकाणी’  कसा काय शोध घ्यायचा, आणि  ते पण सगळं घर विस्कटून न टाकता -यावर  प्रेझेंटेशन.

योग्य ठिकाणी म्हणजे कुठे हा प्रश्न आहेच, तर थोडक्यात, सोफ्या खाली, पुस्तकांच्या खाली, पेपर च्या गठ्ठ्या मधे, काल काढून टाकलेल्या पॅंटच्या खिशात , ऑफिस बॅग मधे , सोफ्यावरच्या उशी च्या मागे, बेडरुम मधे पलंगावर , ड्रेसिंग टेबल वर, डायनिंग टेबलच्या खुर्ची वर, टीव्ही वर ,  अशा योग्य जागी   कशी शोधायची??   चावी टांगून ठेवायचा  बोर्ड  वर ही योग्य जागा नसते-ह्यावर एक व्हिडीओ. पार्टीसिपंट्स ला स्वतःचे अनुभव सांगण्यासाठी उद्युक्त करणे . या विषयावर एक चर्चा सत्र.

या चर्चा सत्रा  मधे ’महेंद्र कुलकर्णीला’  बोलवण्यात येईल, एक ’स्पॉइल्ट केस’ म्हणून स्टडी साठी. त्या स्टडी मधे महेंद्र कुलकर्णीला हे काम अजूनही का जमत नाही? यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.  यावर एक दोन हजार शब्दांचा निबंध लिहीणे अनिवार्य असेल.

६) हेल्थ टिप्स. प्रत्येकाला चांगली तब्येत असावी असे वाटते. त्या साठी काही सोपे उपाय- जसे,बायको साठी कधी तरी फुलं वगैरे आणल्याने काही नुकसान होत नाही, आणि आपली तब्येत पण छान रहाते. रात्रीच्या जेवणात स्विट डीश म्हणून शिरा मिळण्याचे चान्सेस वाढतात, तुम्ही तुपाची धार जरी  थोडा जास्त वेळ जरी भातावर धरली तरी बायको काही म्हणत नाही..  दहा रुपयांच्या ’गजऱ्यावर’ बायकोला कसे खूश ठेवायचे? याचे ग्राफिक्स, (भुंगा, दिपक शिंदे कडून मागवणॆ –   .  राजाभाऊंची तळटीप)

७)काही पिडीत पुरुष आपले प्रश्न विचारतील, सगळे पार्टीसिपंट्स त्यावर चर्चा करून मार्ग सुचवतील. काही सक्सेस -, ऑडीओ, व्हिडीओ फाइल्स दाखवणे,  हेल्प गृप तयार करणे , आणि या ग्रुपच्या मिटींग दर रविवारी कुठल्यातरी चांगल्या हॉटेलात ठेवणे . मिटींगच्या चेअर मधे राजाभाऊ रहातील, त्यांना हॉटेल च्या बिलात कॉंट्रीब्युट करण्यापासून सूट असेल.( हे सगळं योग्य शब्दात लिहीणे – राजाभाऊंची तळटीप)

८)राजाभाऊ टॉयलेट मधुन बाहेर आले, आणि फ्लश करायचं विसरले, म्हणून काय.. “मी तुमची आई नाही, जा पाणी टाकून या” हे असं ऐकायला लागतं. आता प्रत्येकाचीच आई लहानपणी त्याच्याकडे लक्ष देते, लंगोट बदलते, म्हणून काय असं म्हणायचं असतं की काय??? मग राजाभाऊंचा युक्ती वाद अगं मी फक्त ’सू’ च तर करून आलो.वगैरे वगैरे पुटपुटले.

“बायको आणि आई मधला फरक” –  या विषयावरच्या एक्स्पर्ट चा शोध घेणे आणि गेस्ट फॅकल्टी म्हणून बोलावणे. कोणी वाचक तयार असतील तर कृपया संपर्क साधा.

९)बायको बरोबर शॉपींग ला जातांना आपला तोल कसा ढळू द्यायचा नाही, कसे काय वागायचे, तिने पन्नास साड्या बघून एकही न घेता दुकानातून बाहेर निघाली, तर अशा वेळेस त्या दुकानदाराची नजर चुकवून बायकोच्या मागे  मागे कसे  बाहेर पडायचे , गिल्टी न वाटू देणे ,  वगैरे वगैरे… यावर एक व्हिडीओ फिल्म  (आणि काही ग्राफिक्स अर्थात भुंगा कडून मागवणे)

१०) विस्मृती चा इलाज, बायकोचा, तिच्या आईचा, बाबांचा, भावाचा, वाढदिवस  आणि लग्नाचा वाढदिवस, तसेच तिला तुम्ही पहिल्यांदा बाहेर भेटला होता तो दिवस, तिने तुम्हाला पहिल्यांदा__________________ (रिकामी जागा भरा तुम्हाला वाटेल त्या  ” महत्वाच्या ” शब्दाने) तो दिवस, आणि असे असंख्य  ’मह्त्वाचे’ दिवस कसे काय लक्षात ठेवायचे? त्या साठी मोबाइल रिमाईंडरचा वापर  आणि अजून काही इतर टेक्निक्स यावर एक प्रेझेंटेशन.

११)गॅस सुरु करणे, बंद करणे, चहा करणॆ,  हॉकिन्स कुकरचे झाकण लावणे ( लग्न झाल्यावर पुरुषांना हे काम का शिकू शकत नाहीत?_, त्यातले वरण न सांडता भांडं वाकडं न होऊ देता,चिमट्याने धरून   न सांडता बाहेर काढणे, या आणि अशा अनेक विषयांवर प्रात्यक्षिक- आणि प्रॅक्टीस सेशन

१२) निरनिराळॆ रंग आणि त्यांची नावं . चटणी कलर म्हणजे गूळ-आमसूलाची काळी चटणी ,खोबऱ्याची पांढरी चटणी की  हिरवी चटणी ?? असे मह्त्त्वाची प्रश्न आणि त्यावर चर्चा. कोकाकोला रंग , आमसूली रंग म्हणे कुठला? आमसूलाचा की त्याच्या सोलकढीचा? (प्रात्यक्षिकासाठी चटण्या वगैरे लागतील  त्या करून द्यायला वैदेहीला ( चकली ) सांगायचं का??रजाभाऊंची तळटीप)

१३)मॅचिंग या विषयावर पण एक दिवस भर चर्चा होऊ शकेल काय? आणि जर ठरलं तर काय मटेरीयल लागेल?

१४) बायकोने साडी विकत आणली की – सांगा बरं कितीची असेल ते?? असं म्हणून  तिची किम्मत ओळखणे हा खेळ सगळ्यांनाच खेळावा लागतो. कमी सांगितली तर तिची वाकडी भुवई पहावी लागते, अशी चूक होऊ नये म्हणून निरनिराळ्या साड्यांचे प्रकार आणि त्याचे फोटो पॉवर  पॉइंट प्रेझेंटेशन.

हा सगळा कोर्स पंधरा दिवसात पुर्ण केला जाईल. जर कोणी कोर्स पुर्ण केलाच तर त्याला सर्टीफिकेट पण देण्यात येईल..

तर मंडळी, हे होतं राजाभाऊंचं लिखाण. तुमच्या माहीती साठी इथे पोस्ट करतोय , जर इच्छा असेल तर अवश्य जॉइन करा क्लास. राजाभाऊना एक इ मेल  आला होता, त्यावरून सुचलंय हे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी and tagged , , , , . Bookmark the permalink.

51 Responses to कोचींग क्लासेस- राजाभाऊंचे!

 1. हा हा हा …हसून हसून लोळतोय मी !! अफलातून कंसेप्ट !!

  राजाभाऊ तर ग्रेट आहेतच त्यात वाद नाहीच. त्यांनी आखून दिलेला सिलॅबस तर अति उत्तम. स्पॉइल्ट केस स्टडी फेम कुलकर्णी साहेबांना भेटायला हवंच 🙂

  बाकी ह्या कोर्ससाठी नाव नोंदणी कुठे सुरु आहे? लगेच रजिस्ट्रेशन करून टाकतो 😀

  • सुहास
   अरे एक जोक आला होता मेल मधे तो वाचला आणि एकदम हे सुचलं लिहायचं. रजिस्ट्रेशन याच ब्लॉग वर केलं तरी राजाभाऊंपर्यंत पोहोचेल.

 2. गुरुनाथ says:

  सगळेच गुळचट झाले तर आयुष्यात स्पाईस असा तो काय उरणार राजाभाऊ? त्या परीस एक मागणे मागतो आहे, मंजुर करा, ते कोण ते केस स्टडीचे कुलकर्णी आहेत त्यांना व्होटींग राईट्स द्या सभेच्या कोरम मधे सामील करा व शहाणा नवरा व नोटोरीयस नवरा ह्याच्यातला ब्यालंस म्हणुन त्यांना गेस्ट फ़्याक्लटी ठेवा कसे!!!!!, मजा असते आपली एक एक….. अन हो राजाभाऊ,
  आम्ही अजुन बिगारीत नाहीत अन तुम्ही खुशाल पी.एच.ड्या कर म्हणुन सल्ले दिले, प्रॅक्टीकल साठी बायको हवी तिच अजुन मुद्दलात नाही, मला एक शोधुन द्या, काही सोय करुन द्या मी उजव्या पायाच्या अंगठ्यावर आहे तयार क्लास साठी.

  महेंद्रदादा := इसकु धोका बोलते मिया, अभितलक बेगम नही मिले हमकु अन तुमले हमकु बडे क्लास मे भेज दिये, क्या की उस्ताद सुने थे तुम पहीले पोट्ट्या पटाने की क्लासा शुरु कर रहे थे ना मिया उने जरा जलदी मे शुरु करो अन हल्लु मे आके मेरेकु बोलो मै तुम्हारा कलास पैले लगाता न यारो

  तुम्हाराईच (ईस्माईल हैद्राबादी) गुरु

  • mazejag says:

   ma kasam ekdam zakkas….:)

  • पोट्टी पटानेकु कायकु क्लास लगता हय मियां? वो तो वैसेईच पटती हय..
   मस्त कॉमेंट..
   जब तक कोई पोट्टी पटती नै, तबतक इस किलास मे जाओ मिय़ां.. पडाई कब्बी बेकार नै होती.

 3. Ravindra says:

  Fantastic….. Simply superb…. Rajabhau cha field experience jabardast distoy 🙂

  • रविंद्र
   ब्लॉग वर स्वागत.. अहो, राजाभाऊंची आता सिल्व्हर ज्युबीली होईल दोन तिन वर्षात.. 🙂

 4. Avani says:

  hehehehehehe.. jam bharee.. 🙂

  Sakali uthalya uthalya paper wachat basawa ka ya wishayawar pan charcha hou shakate.. 😛

  • अवनी
   अरे नुसता पेपर घेऊन काय बसला आह्से? मला पण वेळ होतोय ऑफिसला, थोडी भाजी चिरून देतोस का?? …… असं काहीसं ऐकु आलं तुमची कॉमेंट वाचल्यावर.. 🙂
   ब्लॉग वर स्वागत !

 5. vikram says:

  काका आजच्या काळाची गरज आहे हि 😉
  या उन्हाळ्यात हा क्लास पूर्ण करूनच टाकावाच म्हणतोय 😛

  • विक्रम
   प्रत्येकानेच करायला हवा असा आहे हा क्लास. 🙂 खरं तर सिलॅबस मधे अजुन बरेच मुद्दे घ्यायचे होते, जसे बुट काढून ठेवल्यावर त्यातले सॉक्स आपोआप धुवून कपाटात जाता का?? वगैरे वगैरे.. पण बरंच मोठं होत होतं, म्हणून थांबवलं.

 6. Smita says:

  seemavahinina puN classes kaDhayala sangaNe ha ekach antidote distoy…:-)

 7. SADANAND BENDRE says:

  दादा नमस्कार !
  फेसबुक वर तुमचं एक पोस्ट वाचलं होतं. उसी वक्त शेर के मुह खून लग गया था . आता तुमच्या ब्लॉगवर पडीक असतो . राजाभौंच्या वर्गात बऱ्याच अतिमहत्वाच्या गोष्टी शिकायला मिळतील याबाबत काही शंका नाही. फी ऐवजी त्यांना आमच्याकडून ” गोष्टी चार युक्तीच्या” मिळाल्या तर त्यांना चालतील का हे कळवावे . उ. दुधाच्या पिशव्या धुवून जेवणाच्या डब्याचे झाकण घट्ट बसवण्यासाठी कशा वापरायच्या , धुतलेले मोजे इकडेतिकडे जावू नयेत म्हणून एकमेकांना गाठ मारून कसे ठेवावेत इ.
  असो , असेच लिहित रहा. आम्ही वाचत राहू.
  सदानंद

  • सदानंद
   ब्लॉग वर स्वागत.. आवर्जून प्रतिक्रिया नोंदवल्या मुळे खरंच छान वाटलं. क्लास फुकट आहे हो, काही फिस नाही, पण जर अशा सुंदर सुंदर गृहोपयोगी आयडीय देत असाल तर अवश्य चालतील!!्धन्यवाद..

 8. sangeeta says:

  hallooo, khup khup sunder lihile ahe, saglyanchya life madhil nehmiche kisse khup bhari sangitale ahet, mast course ahe., tyamadhe ajun 1 pahije newspaper vachun zalyavarti tyachi nit ghadi ghalun thevayacha te!!!!!!!!!! mast vatle bhari ekdam zakkassssssssssssssss

  • संगीता
   ब्लॉग वर स्वागत. अहो तो न्युजपेपरचा मुद्दा पूर्वी एका पोस्ट मधे घेतला होता. त्या पोस्टचं नांव आहे रेसिपी. म्हणून इथे पुन्हा घेतला नाही. 🙂

 9. योगेश says:

  लोळागोळा….जबर्‍या….अभ्यासक्रमातला दुसरा मुद्दा अशक्य भारी

  >>महेंद्र कुलकर्णीला बोलवण्यात येईल, एक ’स्पॉइल्ट केस’ म्हणून स्टडी साठी

  ह्या केसची स्पेशल भेट घ्यायलाच हवी 😉

  • योगेश
   तिकोन्या नंतर भेटलोच नाही आपण नाही का?? एकदा करू या गेट टुगेदर.. असं कर नां, नाहीतर ५ जूनला येऊन जा 🙂

 10. वा वा. उपयुक्त कोर्स. ५ जूनला एक झलक होऊन जाऊ दे 🙂
  आम्ही सध्या नवविवाहित (फक्त ११ महिने) असल्याने वर नमूद केलेले बरेचसे प्रसंग अनुभवायचे आहेत पण क्रमांक १३ ने हैराण केले आहे. कुठेही जायचे झाले की आधी बायकोचे, तिचे झाल्यावर माझे आणि बाहेर पडल्यावर समस्त जनतेचे मॅचिंग पहावे लागते. पुर्वीसारखे हाताला येतील ते कपडे घालता येत नाहीत.

  गुरूनाथची हैद्राबादी कमेंट अफलातून.

  • सिद्धार्थ
   अरे एक गम्मत सांगतो, एकदा आम्ही सगळे संध्याकाळी बाहेर निघालो, अगदी लिफ्ट मधे शिरल्यावर मुलीच्या लक्षात आलं, की माझ्या शर्टचा रंग , बायकोच्या साडीचा, आणि मुलीच्या टॉपचा रंग एकच आहे, सगळ्यांना घरी परत घेऊन गेली आणि मला शर्ट बदलायला लावला, आणि तिने पण टॉप बदलला.
   मॅचिंग प्रकार फार डेंजरस असतो. थोडी पण चूक चालत नाही.नवीन साडी घेतली की कपाटात असलेल्या शंभर ब्लाउज पैकी एकही कसं त्या नवीन साडीबरोबर मॅच होत नाही? हा मला न सुटलेला प्रश्न आहे. येईल लवकरच सगळं लक्षात.. 🙂

   • Piyu says:

    माझ्या ओळखीत एक जोडपं आहे… त्यांच्या लग्नाला ३ वर्ष झाली.. ते रोज (अगदी रोज) म्याचींग कपडे घालतात… म्हणजे बायकोने केशरी ड्रेस घातला तर नवरा केशरी शर्ट घालतो इतके म्याचींग.. आणि चक्क शेड सुद्धा सेम.. (म्हणजे चटणी कलरच्या ड्रेस ला चटणी कलरचाच शर्ट इतके परफेक्ट)त्यांना आम्ही खूप चिडवतो.. की इतकी शेड परफेक्ट येण्यासाठी बायकोने एक साडी घेतली कि नवरा एक पांढरा शर्ट विकत घेतो आणि साडीसोबत धुवायला टाकतो. आहे किनई गम्मत ?? 🙂

    पण ते म्हणतात हे असे म्याचींग घालण्यात खूप मजा असते.. आता आमच्या लग्नाला फक्त ३ महिने झाल्याने अजून तरी ती काय मजा ते आम्हास अद्यापि कळले नाहीये.. पण अशी खरंच अजून पण जोडपी असतात… नवरा-बायको सारख्याच रंगाचे कपडे घालणारे…

    • हा असाच प्रकार रायपूरच्या एका जोड्प्याने सुरुकेला आहे. जवळपास १४ वर्षापासून एकसारखे कपडे वापरतात दोघंही.. 🙂

 11. UMesh says:

  this is mk touch. Super like. Register my name for this class.

  Faithful reader of kvt.

 12. mazejag says:

  Nahi karach suru…Share Marketcha course aahe changla mhanun Hemula pathwen mi….kadhi form nightahet

  • अ्श्विनी
   चालेल, कधीही पाठव.. पण कोर्स सोडून अर्ध्यातून जाता येणार नाही बरं का! 🙂

 13. Aparna says:

  हा हा हा..काका लोळागोळा झालाय एकदम…..एक थोडी कमी स्पॉइलवाली केस स्टडीसाठी हवी असल्यास भेटा किंवा लिहा….:)

 14. अरुणा says:

  विचार चांगला आहे.पण ते जित्याची खोड का काय म्हणतात ना, तसे आहे. असा कोर्स करुन काही उपयोग होईल असे वाटत नाही. लेकिन दिल बहलानेके लिये खयाल अच्छा है!

 15. swati says:

  khup chhan

 16. आका says:

  काही सिलॅबस राहिलेले ते असे..
  १५) बाजारात बायकोसोबत खरेदी करताना जर फटाकड्या समोरून जात असतील तर बायकोला न कळता कसे तिच्याकडे बघायचे आणि बायकोला न दुखवता त्या रुपाची तारीफ कशी करायची यावरील क्लुप्त्यांवर ४ तासांच ग्रुप डिस्कशन होईल…

  १६) घरी काही कामे रेंगाळली असताना मित्रवर्य जर बाहेर जाणार असतील तर बायकोला कसं पटवायचं यावर एक चित्रफीत दाखवण्यात येईल.. चित्रफीत पाहिल्यानंतर जो विद्यार्थी अजुन चांगल्या क्लुप्त्या सांगेल त्याला त्यादिवशी एक खंबा देण्यात येईल..
  🙂 🙂

  • आका
   मस्त.. आता लिस्ट पुर्ण होते आहे. असाच जर अजून सिलॅबस वाढवत बसलो तर नक्कीच तिन वर्षाचा डिग्री कोर्स होऊ शकेल 🙂

 17. गुरुनाथ says:

  ते कसे आहे न आका, तुमचे खंब्याचे ऐकुन मलापण क्लासला यायची विच्छा होती आहे बघा, पण आमच्या विज्याचा अनुभव ऐकला अन सर्दच झालो, आमचं विज्या एकदा आमच्यात (म्हणजे ब्रह्मचारी गॅंग मधे) बसला होता, पोट्ट्यांनी दिले चढवुन तर भाऊ ने एकट्याने हाफ़साईझ लावला कोरा!!!!! तो ही सिग्नेचर चा!!!! अन आरडाओरडा करत घरी, दुस~या दिवशी सौ शांत, ह्यांनी हळुच विचारले “काल रात्री काय झाले गं?” तसे वैनी साहेबांनी विकेट काढली, “तुम्हाला प्यायची तेवढी प्या, पण ह्या पुढे लक्षात ठेवा ,तुम्ही हाफ़ मारुन आलात तर घरी तुमच्यासमोर बसुन मी फ़ुल खंबा मारेन!!!!!!!” विज्या नि:शब्द!!!!, आता विज्या वरणभात खाऊन रात्री ९ लाच झोपतो!!!!

  • विज्या नि:शब्द!!!!, आता विज्या वरणभात खाऊन रात्री ९ लाच झोपतो!!!!

   आणि तू???

   • गुरुनाथ says:

    मी काय करतो ते नका विचारु हो!!!!!, हेच ते सुखाचे दिवस आहेत महाराजा!!!!, एकदा दुसरे चाक जोडले की गाड्याला की संपले मग!!!! तोवर बेस्ट!!!!, खंड्या (किंगफ़िशर), म्हातारा संन्याशी (ओल्ड मॉंक) , वारक~याचा जॉनी (जॉनी वॉकर!!!)…. हे आपले सखे सोबती बनतात महाराजा!!!

 18. रविन्द्र जाधव says:

  कल्पना आवड्ली. लेख फ़ारच छान झाला आहे.

  र.ग.जाधव.

 19. sumedha says:

  ता. क.
  एक विसरलोच , ह्यातलं काहीही प्रत्यक्षात घडेल तेव्हा योग्य ते सेशन कसे आठवावे याचे आणखी एक प्रेझेंटेशन !!
  राजाभाऊ 😉

  • हे बघा.. हे असा फरक पडतो. एक हाडाचा प्राध्यापक , आणि आमच्यासारखा ओढून ताणून प्रयत्न केलेला यांच्यामध्ये. .. 🙂

 20. Tanvi says:

  मुद्दा ९ आणि ११ तर जाम पटला… 🙂 … कुकरचे झाकण लावणे हे दिव्य असू शकते हे हल्ली हल्लीच मला समजलेय (अमितला ते लावता येत नाही असे कळल्यावर 😉 ) …..

  महेंद्रजी आरशासमोर बायको उभी राहिल्या राहिल्या, अगं नाही तूझे वजन वाढलेले हे तिने विचारण्याआधिच सांगणे हा मुद्दा अभ्यासक्रमात टाकावा असे राजाभाऊंना सुचवावे वाटतेय 😉 … बाकि राजाभाउंचे क्लासेस तुफान चालणार शंका नाही…. 🙂

  गुरूनाथ 🙂

  • तन्वी,
   अतीशय अवघड काम वाटायचं ते. आणि कुकर मधली भांडी त्यातलं वरण न सांडू देता बाहेर काढणं म्हणजे दिव्यच असतं!!( अ्नुभव आहे मला ). चांगला मुद्दा आहे – अतीशय जवळचा.. 🙂

 21. Manisha says:

  mast lekh jhala ahe tumchya lekhan mule mi mazya bahinila javlun olkhu shakate ahe hi matr gamt mi facebook suru kelya pasun tumche lekh niymit vachte

  • मनिषा
   आभार.. अगं प्रत्येकच गोष्ट काही अनुभव नसते, बरंचसं काल्पनीक पण असतं बरं कां!! 🙂

 22. akshay ahuja says:

  dfffffffff
  Thanks

 23. स्नेहल says:

  इतका अफलातून पोस्ट मी इतक्या उशिराने वाचते आहे……… बाप रे मी एकटीच वेड्या सारखी हसतेय!!!
  कल्पना खरच खूपच चांगली आहे
  राजाभाऊ तर ग्रेट आहेत

 24. Shweta Nare says:

  अफलातून पोस्ट…!!!
  एक एक chapter study केला तर कुठलाही मुलगा हमखास मेरीट लिस्ट मध्ये येईल…!! :द 😀

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s