पाचव्या राणीचे साम्राज्य..

काहीही झालं तरी एक गोष्ट आहे, सगळ्या जगातली राजेशाही पद्धत जरी रसातळाला गेली , नष्ट झाली , तरीही पाच राण्या मात्र कायम रहाणार आहेत.  त्यापैकी एकही राणी जनता कमी होऊ देणार नाही.  त्या पाच राण्या आहेत :- ’पत्त्याच्या कॅट ’मधल्या चार राण्या आणि पाचवी राणी अर्थात ’इंग्लंडची राणी”!

इंग्लंडची जनता मोठ्या प्रेमाने हे बांडगूळ  का पाळत असते ते मला माहीती नाही, आणि एवढंच नाही तर त्याचा अभिमान पण बाळगते.बांडगुळ पाळणं, आणि त्याचा अभिमान बाळगणं अशा दोन्ही गोष्टी ’रेसिस्ट’ असलेली ब्रिटीश जनताच करू शकते.   जगात कुठेही गेलात तरीही ही अशी मनोवृत्ती दिसून येते.

दूर कशाला आपल्या भारता मध्ये आपल्या नेत्यांची पोरं बाळं, त्यांची लायकी नसतांना पण  आपण डोक्यावर घेऊन नाचतो,    त्यांचा बाप नेता आहे, म्हणून त्यांना पण नेते बनवतो, आणि नंतर काही वर्षांनी आपल्याच रक्तावर पोसलेली ती बांडगुळे इतकी मोठी होतात की…… असो.. तसेच आहे हे पण.

ब्रिटनच्या राणीचे गोडवे गात अजूनही गॉड सेव्ह द क्विन म्हणून आळवत युनियन जॅक फडकवणाऱ्या बसणाऱ्या ब्रिटीश जनतेची मानसिकता, आणि आपल्या कडे नेत्यांच्या परिवाराची  (इथे मुद्दाम कुणाचे नांव लिहत नाही पण तुम्ही अगदी कोणाचेही नांव घालू शकता 🙂 )  भाटगिरी करणाऱ्यांची जातकुळी एकच आहे असे म्हणावे लागेल.  नेत्याने काहीही केले तरी, “राजकारणात असे करावेच लागते “, म्हणून  नेत्याच्या चुकीच्या विचारांची पाठराखण करणारे  निर्बुद्ध “चमचे” कार्यकर्ते असल्यावर  दुसरं काय होणार??????

राणीची  तारीफ करतांना हे ब्रिटीश लोकं सगळं काही विसरतात. सुरु असलेले युद्ध, इराक मधे मेलेले सैनिक, ब्रिटन मधले घरांचे प्रॉब्लेम्स, नोकऱ्या, हेल्थ केअर  वगैरे सगळ्या गोष्टी विसरून जातात, अगदी भारतातल्या प्रमाणेच, आणि मास हिस्टेरीयाचा विजय होतो.भारतात  लोकांची ही  अशीच मनःस्थिती क्रिकेटच्या वेळेस असते.

टीव्ही वर लग्नाचे  थेट प्रक्षेपण,( जवळपास प्रत्येक चॅनल)  आणि त्या आधी प्रिन्स चा्र्ल्स च्या लग्नाची व्हिडीओ कॅसेट पण दाखवली जात होती, आणि ती बहुसंख्य लोकांनी पाहिली.  आपल्या देशातल्या लोकांना पण या लग्नात  इतका इंटरेस्ट आहे म्हणून हे  पोस्ट लिहायला घेतले.तसाही गोरा रंग आणि त्याचं महत्त्व आपल्याकडे इतकं जास्त आहे की पुरुषांचे पण गोरे होण्याचे क्रिम्स मार्केटला  भरपूर विकले जातात.  आपल्याकडे गोरं म्हणजे चांगलं, सुंदर, उच्च वर्णीय असं समजलं जातं.

अजूनही आपण ब्रिटीशांच्या मानसिक गुलामगिरी मधून  मुक्त झालेलो नाही, गोरे  म्हणजे सुपीरिअर रेस असं समीकरण आहे आ्पल्याकडे. सगळ्या जाहीरातीनं काळ्या लोकांची मानखंडना करणाऱ्या  असतात, आणि त्या चवीने पाहिल्या जातात.  गोऱ्यांच्या देशात गेल्यावर, एक भारतीय इतर भारतीयांशी व्यवस्थित   बोलणार नाही, पण (अमरू बरोबर) गोऱ्या कातडीच्या लोकांशी ( अगदी प्लंबरशी पण ) मात्र अदबीने बोलताना दिसतात.

प्रिन्स चार्ल्स चे दुसर लग्न, त्यामधे आपल्या डबेवाल्यांना बोलावल्या बरोबर ती पण बातमी झाली होती. त्या डबेवाल्यांनी पण जातांना पैठणी आणि मंगळसूत्र दिलं प्रेझेंट. ते तिने वापरले नसेल ह्याची खात्री आहेच .पण डबेवाल्यांना राजपुत्राने बोलावले याचे केवढे अप्रूपच… कारण पांढरी कातडी.

ह्या सगळ्यात जास्त रेसिस्ट असलेल्या कुटुंबा बद्दल फार कमी बोललं जातं.  त्यांच्या विरुद्ध जाणारे सगळे मुद्दे सोयिस्कर पणे बाजूला ठेवले जातात.  असं म्हणतात, की १६०३ मधे पहिली एलिझाबेथ ही सिफ्लिसीस ने मरण पावली. तिची परिस्थिती इतकी वाईट होती, की चेहेऱ्यावर कित्येक पुटं चढवायची मेकपची.

राणी स्वतः मात्र आपले मत कधीच प्रदर्शित करत नाही. प्रिन्स फिलिप च्या रेसिस्ट कॉमेंट्स मुळे तर भरपूर टिका झालेली आहे.  १९८६ मधे चिन मधल्या काही ब्रिटीश विद्यार्थ्यांना तो म्हणाल होता, की जर तुम्ही अजुन काही दिवस चायना मधे रहाल तर तुमचे डोळे पण स्लिट आईज होतील.

१९९४ मधे एका केमॅन आयलंडच्या रहीवाश्याला विचारले होते, की “तुझे पूर्वज समुद्री चाचे होते का??”१९९९ मधे इडनबर्ग ला एका फॅक्ट्रीचे उदघाटन करण्यासाठी हाच प्रिन्स गेला असता, तिथे त्याला काही वायर्स लुझ लागलेल्या दिसल्यावर म्हणाला होता, की” हे काम बहुतेक एखाद्या भारतीयाने केलेले दिसते”.

. राणीची आई भारतीयांचा खूप द्वेश करायची , भारतीयांनाही  ’ब्राऊन पिपल’ म्हणायची  ती. निग्रोंचा उल्लेख पण नेहेमी बोलतांना ती ’निगनॉग्स, किंवा ब्लॅकमुर्स’ असा  करायची. इंग्लंड मधे काळ्या/ ब्राऊन लोकांच्या  इंग्लंडला इमिग्रेशनला तिचा सक्त विरोध होता. गोऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणीही  राज्य करण्याच्या लायकीचे नाही, असे मत ती नेहेमीच व्यक्त करत असे.  आजही भारतीयांवर होणारे रेसिस्ट हल्ले  (ब्रिटन, ऑस्ट्रेलियामधले) म्हणजे ब्रिटीशांचा सुपीरीआरीटी कॉ्म्प्लेक्स दाखवतो.

जसे रशिया मधे झार चे साम्राज्य खालसा करण्यात आले, आणि त्या नंतर झार चे नामोनिशाण पूर्णपणे मिटवले, आणि त्याची सगळी संपत्ती सरकार जमा केली, किंवा मंगोल सम्राज्याचे जसे धिंडवडे निघाले  तसे इंग्लंड मधे झाले नाही. तिथे ही पाचवी राणी कायम जनतेच्या डॊक्यावर बसलेली असते.

तिथल्या जनतेला पण ह्या कुटुंबा बद्दल अतीशय जास्त   कौतुक /उत्सुकता असते. मग प्रिन्स ने काय केले? राणीला शिंक आली, प्रिन्स ने अमुक मुलीचे चुंबन घेतले, त्याने हिरवी जर्सी घातली वगैरे अशा प्रकारच्या सगळ्या ” अती महत्त्वाच्या “बातम्या  मिडीया कव्हर करत असतो. इंग्लंड मधल्या टॅब्लॉइड्स ने तर या प्रकाराला खूप खत पाणी घातलेले आहे. प्रिन्सेस डायना पण अशाच पापाराझी मुळे मरण  पावली  होती.

ब्रिटीश सरकार कडून राणीला तिच्या खर्चासाठी ३५ मिलियन पाउंड्स देण्यात येतात. तिचे इंग्लंड मधले असलेले सगळे महाल जरी जनतेला दिले तर इंग्लंडमधला रहाण्याचा प्रॉब्लेम नेहेमी साठी संपेल असे गमतीने म्हटले जाते.

आपल्याकडे जर  तेंव्हा सरदार  वल्लभभाई पटेल नसते तर अशीच परिस्थिती राहिली असती. आजही कित्येक राजे दिसले असते महाल बाळगून.   पण राजे नाही तर  राजांची जागा ही नेत्यांनी घेतली. आपणही इतके मानसिक दृष्ट्या षंढ झालो आहोत, की जेंव्हा हे नेते आपली करोडॊ रुपयांची मालमत्ता जाहीर करतात, तेंव्हा एकही माईचा ला हे विचारत नाही की इतके पैसे तुमच्याकडे आले तरी कुठून??

राणीला  दर वर्षी ३५ मिलीयन्स पाउंडाची मदत सरकारी खजिन्यातूनच दिली जाते.या इतक्या म्हणजे ३५ मिलियन पाउंड्स च्या सरकारी खैरातीची गरज आहे का? कारण तिच्याकडे आज असलेली ज्ञात संपत्ती ही खाली देतोय, ती बघा आणि तुम्हीच ठरवा.तिची पर्सनल प्रॉपर्टी ही १.१८ बिलियन्स आहे . या मधे तिचे पॅलेसेस वगैरे पकडलेले नाहीत. बकिंगहॅम पॅलेस, आणि तिची इतर ठिकाणी असणारे पॅलेसेस ची मोजदाद केली तर त्या प्रॉपर्टीची किम्मत ही कित्येक करोड पाउंड होईल.

राणीकडे असलेले तिकिटांचे कलेक्शन हे ३०० अल्बम आणि २०० बॉक्स भरून आहे. त्याची अनुमानित किम्मत १०२ मिलियन पाउंड्स आहे. ७२ मिलियन पाउंड्स चे जडजवाहीर. जवळपास १.४ मिलियन पाउंड्स चे फर कोट, आणि ते ठेवण्यासाठी एक रेफ्रिजीरेटॆड हॉल आहे बकिंगहॅम मधे. ८ मिलियन पाउंड्स च्या कार्स, २ मिलियन पाउंड्स ची वाईन, आणि ६१ मिलियन्स ची ऑफिशिअल रेसीडेन्शिअल प्रॉपर्टी- आणि सगळा समुद्र!

५० वर्षापुर्वी राणी जेंव्हा राणी झाली, तेंव्हा तिने त्या काळच्या प्राइम मिनिस्टर चर्चिल बरोबर केलेल्या  करारा नुसार  राणीला डिव्हिडंट्स आणि इंटरेस्ट्स वर टॅक्सेस भरायची गरज पडणार नाही. ह्या टॅक्स न भरल्या मुळे तिची साधारण एक बिलियन ची वर्षाला बचत होते.प्रिन्स चार्ल्स ची स्वतःची संपत्ती ३४६ मिलियन पाउंड्स आहे.दोन चंगु मंगु प्रिन्स ची पण ३० मिलियन्स च्या आसपास संपत्ती आहे.

राणीला दर वर्षी पब्लिक फंडातून ३५ मिलियन पाउंड्स दिले जातात.या व्यतिरिक्त ८ मिलियन पाउंड्स तिच्या जमिनीच्या वापराबद्दल सरकार तिला देते.एक लाख विस हजार हेक्टर जमीन आणि ब्रिटनच्या शेजारचा सगळा समुद्र हा राणीच्या मालकीचा आहे.  एक लक्षात आलं का?   की हाउस ऑफ कॉमन्स ने तिची संपत्ती सरकार जमा करुन घेतली नाही.

नुकत्याच झालेल्या लग्नाचं आणि श्रीमंतीचे भोंडं प्रदर्शन आणि  लोकांचा मूर्खपणा पाहिल्यावर हे पोस्ट लिहिल्याशिवाय रहावलं नाही. आपल्या कडे पण सगळ्या पेपर मधे त्या दोघांचे चुंबन घेतानाचे फोटॊ पहिल्या पानावर दिलेले आहेत. आपल्या संस्कृती मधे अशा प्रकारे पब्लिक डिस्प्ले मधे चुंबन  सामान्यपणे घेतले जात नाही.  मिररच्या आतल्या पानावर तर नंतर त्या दोघांनी लग्न झाल्यावर संध्याकाळी बाल्कनीत चुंबन घेतले, त्याचा पण  फोटॊ आहे. नशीब, त्यांच्या बेडरूम मधे कॅमेरे बसवलेले नाहीत, नाहीतर जनतेने ते पण आवडीने पाहिले असते.

असो, थांबतो इथेच.. जितकं लिहावं तितकं कमीच आहे यावर..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स. Bookmark the permalink.

30 Responses to पाचव्या राणीचे साम्राज्य..

 1. अरुणा says:

  असं असलं तरी तिथले लोक राणीला डोक्यावर घेतील पण तिचे जोडे उचल्णार नाहीत. ते काम आमचे लुब्रे राजकारणीच करू जाणे!

 2. नानिवडेकर says:

  > गॉड सेव्ह द क्विन म्हणून तिची तारीफ करतांना हे ब्रिटीश लोकं सगळं काही विसरतात.
  >
  राजघराण्याची प्रथा रद्‌द करावी, अशी मागणी करणार्‍यांचा मोठा गट ब्रिटनमधे आहे. ही मंडळी सहसा गार्डियन-धार्जिणी असतात. मला तो पेपर आवडत नाही, म्हणून त्या लोकांचे लेख कमी प्रमाणात वाचलेले आहेत. मात्र राजघराण्याचा देशाला फायदा आहे, हे मानणार्‍यांचाही मोठा गट आहे. विल्यम रीस-मॉग (Rees-Mogg), लिबी पर्व्ह्‌ज (Purves) हे लंडन टाइम्समधे स्तम्भ लिहिणारे विचारवंत या गटात आहेत. या विषयावर रीस-मॉगनी काही वर्षांपूर्वी एक छान लेख लिहिला होता. तो वादासाठी वाद (contrarian line) असा नव्हता.

  > राणी स्वतः मात्र आपले मत कधीच प्रदर्शित करत नाही.
  >
  हा एक शिस्तीचा भाग आहे. आपले राष्ट्रपती, राज्यपाल हे अ-राजकीय पदांवर असताना ज्याप्रमाणे अनेक गोष्टींवर मत देत नाहीत, त्यातलाच हा प्रकार आहे.

  या एलिझाबेथ बाई आपल्या कर्तव्यांचं कडक पालन करतात. आज़ ८४ वर्षं उलटल्यावरही खांद्‌यावर घेतलेली ज़बाबदारी यथाशक्ती पार पाडतात. वल्लभभाई पटेलांनी संस्थानिकांचे हक्क धुडकावले, ती क्रान्ती क्रॉमवेलनी शिवाजीच्या काळातच ब्रिटनमधे केली. उत्तरेकडल्या लोकांनी मद्रासी लोकांना शिव्या द्‌यायच्या, दक्षिण भारतीयांनी भय्यांना हसायचं, हा मानवी स्वभावच आहे. जगावर राज्य केलेल्या राणीच्या आईच्या स्वभावात तसे कंगोरे असतीलही, पण ती बाई कर्तव्यकठोर होती. शंभरी ओलांडल्यावरही ती शक्य तितक्या कार्यक्रमांना उपस्थित राहत असे.

  – नानिवडेकर

  • धन्यवाद..
   राजघराण्याचा देशाला फायदा काय होऊ शकतो हे समजलेले नाही.
   शेवटपर्यंत प्रत्येक प्रोटोकॉल ती कसोशीने पाळायची हे मान्य!

 3. mazejag says:

  Kaka…aapan mhnato ki UK ek pragat rashtra aahe…saaf chuk…aaplya itkach bhongal karbhar ithehi aahe…ukmadhe pensions plan hi ek complusory gosht….tyasathi janata javal javal aplya milkaticha 3/4th hissa dete agadi darwarshi pan jevha retirement yete tevha matra ha tax to tax karun haati dhupatna yet hyanchya……hya plans war mi gele tin warsh kam karit hote…..kharach bada ghar pokal wasa mhantat hyacha anek undaharan paike ek aahe ha….

  • अश्विनी,
   ह्या सगळ्या प्रकाराबद्दल कधी वाचनात आलेले नाही. 🙂 आपल्या कडे पण तसेच प्रकार सुरु केलेले आहेत. कॉंट्रीब्युटरी पीएफ मधे पुर्वी जितकं कॉंट्रीब्युशन एम्प्लॉयीचे असायचे, तेवढेच एम्प्लॉयरचे पण असायचे. आता त्या पैकी जवळपास ६ टक्के पैसे हे पेन्शन स्किम कडे वळवले जातात. एक कॅल्क्युलेटॆड मुव्ह म्हणता येईल याला..

 4. काका, एकूण एका ओळीशी सहमत… ब्रिटिशांएवढे रेसिस्ट खरंच कोणीच नाही !! आणि त्या लग्नाचा गाजावाजा म्हणजे तर नुसता कहर होता !! ब्रिटीश लोकांकडे (आणि आपल्या लोकांकडेही) मेंदू वगैरे आहे की नाही असा विचार करायला भाग पाडणारा प्रकार चालू होता गेले काही दिवस !!

  • गेले काही दिवस दररोज होणारा तो राजेशाही लग्नाच्या व्हिडीओ चा मारा अगदी असह्य झाला होता , प्रत्येक चॅनलवर तेच सुरु असायचं. पाचवी राणी नेहेमी साठीच रहाणार हे त्रिकालाबाधित सत्य आहेच- पण आपल्या कडे त्याचं इतकं कौतुक कशाला हवे??

 5. तुमच्या ब्लॉगचा आराखडा आवडला आणी हो लेख सुध्हा 🙂

 6. thanthanpal says:

  एक म्हण आहे इंग्रज गेले तरी आपल्या इंडियन ची इंग्रजां बद्दल असलेली मानसिक गुलाम गिरी गेली नाही. या विवाहाचा आणि भारतीयांचा दुरून ही संबंध येत नाही. भारतात अनेक घटना घडत असताना मिडीयाच्या बाजारीकरणा मुळे या घटनेला भारतात अवास्तव प्रसिद्धी दिली गेली. मुळातच आपण लोकशाही करता लायक नाही आहोत हे कोण्यातरी ओसाडगावच्या राजावरील आपल्या निष्ठा पाहून स्पष्ट होते. आणि या शाही विवाहाचे संबंध कोणत्या पातळीवरचे असतात हे डायना आणि चार्ल्स च्या विवाहावरूनच स्पष्ट होते.सौ चुहे खाके बिल्ली चली हज को असे यां राजांचे वागणे .काळ्या गोऱ्या रंगा बद्दल म्हणाल तर आपण ज्या विषुववृत्त आडव्या अक्षांश परिसरात राहतो तो उष्ण तापमानाचा पट्टा आहे. साहजिकच याचा आपल्या कातडीवर परिणाम होतो. म्हणून आपला रंग सावळा काळपट दिसतो आणि हे नैसर्गिक आहे. उद्या आफ्रिका खंडातील जनता गोरेपणाचा हव्यास धरेल तर ते जगातील कोणत्याही गोऱ्या बनवणाऱ्या क्रीम ने साध्य होणार नाही , हे त्रिकाल बाधित सत्य आहे. भारतात प्रत्येक नागरिकाच्या रंगाच्या छटा विविधरंगी आहेत. तर गोऱ्यांचा रंग भुरकट पांढरा असतो . घोडा आणि गाढव यात हाच फरक आहे. प्रत्येक घोडा वेगळ्या रंगाचा असतो तर गाढवे सारख्याच भुरकट पांढर्या रंगाची असतात. पण ही गोष्ट जाणून बुजून लपविली जाते आणि गोर ते सोन म्हणत कंपन्या जनतेस लुबाडण्यास मोकळ्या. असो हे विषयांतर झाले.

  • मिडीयाचे बाजारी करण, आणि एक थोडी वेगळं पण कटू सत्य.. म्हणजे विकला गेलेला मिडीया. दोन्ही गोष्टी जरी सत्य असल्या तरी सहजासहजी मान्य केल्या जात नाहीत.
   पूर्वी इंग्लंड मधे बर्फ पडला की आपल्या कडे कोट घालणारे लोकं पण होतेच 🙂

 7. राणी निदान राजघराण्याची तरी आहे आपल्याकडे एकूण एक गुंड राजासारखे जगतात ते देखील आपल्याच पैशावर. राणीचे उत्पन्न कुठून येते आणि किती येते हे आपण भारतात बसल्या बसल्या सांगू शकतो. ते उगाच असले तरी त्याचा हिशोब ठेवला जातो पण आपल्याकडे गल्लीतल्या नगर सेवकाकडच्या पैशाचा हिशेब खुद्द त्याला देखील सांगता येणार नाही.

  • सिद्धार्थ
   🙂 हेच मला म्हणायचं होतं, जेंव्हा हेच गुंड, नेते, इलेक्शनचा फॉर्म भरतात, तेंव्हा त्यांची संपत्ती ही किती आहे हे पण सांगतात. तिथे जेंव्हा करोडॊ रुपयांची संपत्ती डिक्लिअर होते तेंव्हा कोणी का विचारत नाही त्यांना? इनकमटॅक्स वगैरे डिपार्टमेंट्स काय करतात त्याचं पुढे??

 8. Nikhil Joshi says:

  Parampara japane hi ek garaj aahe; i guess 35M tyasathi rani la dile jatat

  Mala shivaji maharajachya mukutatla futka mothi dakhva; tumacha sagla mhana manala.

  • निखिल
   परंपरा जपणे ही गरज आहे हे जरी मान्य केलं तरीही तिच्याकडे इतके पैसे असतांना जनतेचे ३५ मिलियन पाउंड देउन परंपरा कशी काय जपली जाऊ शकते?
   जर सगळी संपत्ती सरकार जमा केली तरीही तिचे रक्षण होऊ शकते.

   शिवाजी महाराजांकडे कुठलीच संपत्ती नव्हती. सगळी संपत्ती त्यांनी राज्याच्या विकासासाठी , किल्ले बांधायला वापरली होती. जी सगळ्यात मह्त्त्वाची म्हणजे ’ भवानी’ तलवार , ती पण आज ब्रिटन मधे आहे. इतर काही जे असेल ते, वारसांनी संपवले असावे .

   दुसरी गोष्ट राणी कधीच युद्ध वगैरे हारलेली नाही, त्यामुळे तिची संपत्ती लुटल्या जाण्याचा प्रश्नच येत नाही. दुसऱ्या महायुद्धात पण जेंव्हा इंग्लंड वर हल्ला झाला, तेंव्हा पण इंग्लंड हरले नव्हते, म्हणून संपत्ती टिकली राणीची.या युगात , क्राऊन चे महत्त्व उरले आहे असे मला तरी वाटत नाही.

   भारता मधे मध्यंतरी कुठल्यातरी एका राजाने आपले जडजवाहीर ऑक्शन करायचा प्रयत्न केला होता असे वाचनात आले होते. असो.. ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी आभार.

 9. गुरुनाथ says:

  जे आज ब्रिटन चे आहे ते तर होणारच होते, मला आजच इकॉनॉमी वाचताना एक वाक्य वाचलेलं इथे उद्दृत करावंस वाटतंय. इंद्रकुमार गुजराल जेव्हा भारतीय पंतप्रधान होते तेव्हाचा कुठलातरी मुद्दा होता ज्यावर इंग्लंड ने काहीतरी आगाऊ टिपणी केली होती. ह्या वर गुजराल ह्यांनी थेट “नाऊ वी डू नॉट टेक कॉग्निझंस ऑफ़ एनी थर्ड ग्रेड सेल्फ़ डीक्लेर्ड सुपर पॉवर सेईंग एनीथिंग अबाऊट अस” असे म्हणले होते, एके काळी ज्यांच्या टाचे खाली आपण होतो त्यांना हे ऐकवणे ह्यातुन तरी ब्रिट्स नी काही शिकायला पाहीजे होते, पण नाही, आमचीच लाल हा त्यांना लागलेला रोग आहे,राणीच्या सिफ़िलिस सारखा!!!!! “मुळात, ब्रिटानिया रुल्स द वेव्ह” हा फ़ंडाच अस्तित्वात राहीलेला नाही. हे एक्सेप्ट करणे त्यांना जिवावर येते आहे, अमेरिकन प्रेसिडेंट जितका कॅजुअल असतो तितके कॅजुअल राहणे ह्यांना लो प्रोफ़ाईल वाटते. किती ही भ्रष्टाचार असु द्या, नेते घराणेशाही असु द्या पण भारतात नेत्यांच्या पोरांना का होईना “अधिकृत उमेदवार होऊन प्रचाराची धुळ चाखावीच लागते”…. हे ही नसे थोडके ह्यांच्यात तर चंगु (स्त्रीलंपट) व बारका मंगु (चरसी ,बेवडा) असताना पण त्यांना रॉयल मिलिट्री व एयरफ़ोर्स मधे फ़ुकट कमिशने मिळतात. समाधान एका गोष्टीचे आहे भारत (पर्यायाने आपण “वुई द पिपल”) देशाने कमीत कमी संघराज्य किंवा रिपब्लिक (ईलेक्टेड हेड ऑफ़ स्टेट) ही संकल्पना इतकी हाडीमाशी रुजवली आहे की आज आपल्याला राजेशाही ही कल्पनाच झीट आणते. सध्या तरी हे चित्र पॉझिटीव्ह आहे. नेते भ्रष्टाचार, बांडगुळे ही समाजाची काही निष्क्रिय नट-बोल्टे आहेत ती असणारच पण अण्णा नावाचा नवा स्पेअर पार्ट आपण आणु शकतो हे ही नसे थोडके. (प्राचीन काळी भारत फ़ारफ़ार मोठा देश होता वगैरे सोडा) आपण आज नव्या संकल्पना आजमावणे सुरु करतो आहे हे महत्वाचे.

  • तुझ्या कॉमेंट मधले एकच वाक्य खूप आवडले “किती ही भ्रष्टाचार असु द्या, नेते घराणेशाही असु द्या पण भारतात नेत्यांच्या पोरांना का होईना “अधिकृत उमेदवार होऊन प्रचाराची धुळ चाखावीच लागते”…. हे ही नसे थोडके”

   एक सांगतो, जरी राजेशाहीची संकल्पना झीट आणत असली, तरीही जर आज जसे भ्रष्टाचारी वागणे सुरु आहे, तसेच सुरु राहीले तर थोड्याच दिवसात पेरिस्त्रायका प्रमाणे आपल्यावर वेळ येईल का असाही विचार नेहेमीच मनात येत असतो, म्हणून थोडी जास्त चिडचिड होते.. 😦

 10. गुरुनाथ says:

  माफ़ करा, आधीच मी राज्यघटनावादी त्यात अगदी अगदी म्हणजे अगदी होपलेस म्हणावा इतका आशावादी त्यात पुन्हा सिस्टीम् चांगली आहे फ़क्त ती ट्युन करणे ही गरज आहे असे मानणारा वेडा पीर हे सगळे कमी म्हणुन एका कांतिका~याच्या घरात पैदा झालेलो “हे जे काही आहे (चांगले वाईट साधक बाधक) ते मिळवायलाच काय किंमत द्यावी लागली आहे हे माझ्या अल्पमतीने समजुन घेण्याचा प्रयत्न करणारा, त्यामुळे पोस्ट अन कॉमेंट फ़रक जरा ढीला करुन लिहिता झालो त्यात परत ब्रिट्स ना शिव्या देणे म्हणजे आम्हास पर्वणी!!!!! .

  • सिस्टीम बद्दल दुमत नाहीच नाही! सिस्टीम चांगली आहेच , पण सिस्टीमचा एक भाग म्हणजे ब्युरोक्रसी – त्या ब्युरोक्रसी च्या मेंटॅलिटी मधे संपूर्ण बदल आवश्यक आहे.

   जगात दोन प्रकारचे लोकं असतात:-
   पैसा खाणारे आणि न खाणारे,

   त्या मधे पण दोन प्रकार आहेत.
   चान्स आहे म्हणून पैसा खाणारे,
   किंवा चान्स असूनही न खाणारे .

   अविनाश धर्माधिकारी< किरण बेदी असे काही हातावर मोजण्याइतके लोकं सोडले, तर इतर मात्र शर्मा सारखे चोर, गिल सारखे स्त्रिलंपट ( बजाज मॅडम ची केस) आहेत.. असो..

   • गुरुनाथ says:

    दादा, हे मात्र सौ टका खरे आहे, मुळात नोकरशाहीचे होते काय तर आपण “पब्लिक सर्व्हंट” आहोत हेच ऍड्मिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिसेस चे लोक विसरतात
    कारणे माझ्यामते काही अशी असावीत
    १. संघ लोकसेवा आयोगासारखी जगातली एक सर्वाधिक कठीण परिक्षा पास होऊन आत आल्या नंतर “सेन्स ऑफ़ रिलिफ़ मुळे येणारी इनिशियल लिथार्जी
    २. घटनात्मक संरक्षण असलेली नोकरशाही अभेद्य होते, सहज लोकांना उघडत नाही
    ३.राजकीय हस्तक्षेप (हा एक कळीचा मुद्दा आहे, बरेचदा बरेच आय.पी.एस विशेषतः बळीचे बकरे म्हणुन वापरल्या जातात उदाहरण शिवानी भटनागर मर्डर केस)
    ४. मुळात जी पब्लिक मधे एक नकारात्मक भुमिका झाली आहे ती पण मिटवली पाहीजे (जे चोर आहे त्यांना शिव्या घालायच्या नादात आपण जे चांगले काम करत आहेत त्यांना ऍप्रिशियेट करणे विसरतो, मग एक विशिष्ठ निब्बर पणा जन्माला येतो की “आयला चांगले केले तर कौतुक सोडाच पण जे हलकट आहेत त्यांच्या पाई आपल्याला पण शिव्या मग “मला काय त्याचे” “माझे सिक्स पे कमिशन अन मी” असे ही होते.
    एकच सारभाग म्हणेन मी सुशिक्षित जनतेने तरी आपला “नीरक्षीरविवेक” वापरुन ह्या लोकांना जज करावे.

 11. काका…प्रत्येक ओळीशी सहमत आहे.

  स्वातंत्र्य मिळाल वैचारिक गुलामगिरीतुन मात्र मुक्तता नाही. 😦

 12. Poorva Kulkarni says:

  Mala tumche lekh aavdtat..Osama bin Laden -America & India relation madhye kay farak padu shakto ? ka ha Us cha game aahe ? world war hovu shakte ? mala tumche opinion aikayla nakkich aavdel.

  Poorva

  • पूर्वा, या विषयावर बरंच लिहिलं गेलंय, म्हणून मी लिहिलं नाही.तसे विचार बरेचदा आला लिहायचा… पण..

 13. Smita says:

  Mala vaTata te fakta tourism attraction mhaNun jivant thevalela asava. dar varshee barach revenue puN miLat asel as a result of maintaining all thos epalaces, the ceremonies. details numbers kadhee check karaNyaitakee utsukata tyabaddal vaTalee nahee, pun ek andaaj vyakta kela evadhach..

 14. रोहन says:

  इंग्लंड मधल्या लोकांनी लग्नाला उदो-उदो करणे आणि त्याला आपल्या इथल्या मिडियाने आपल्या डोक्यावर मारणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तिथल्या बहुतांशी लोकांच्या मते राणीला अजूनही मान आहे. ह्याचे कारण इतिहासात त्या राजघराण्याने जे सोनेरी दिवस इंग्लिश जनतेला दाखवले ह्यात आहे. आजच्या इंग्लंडच्या जडण घडणीत त्या राजघराण्याचा मोलाचा वाटा आहे हे नाकारून कसे चालेल? मग आज ते बांडगुळ कसे? लोकांना राजघराण्याचा अभिमान आहे मग ते का नाही लग्नाला उत्स्फूर्त पाठींबा देणार? आपल्या दृष्टीने हे चुकीचे वाटत असले तरी त्यांच्या दृष्टीने ते मला काही गैर वाटत नाही.. हा आता ते सर्व मिडीयाने इथे आपल्या माथी मारणे हे गैर आहे…पण ते मानसिक गुलामगिरीचे वर्तन नाही वाटत. हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. जगातील कुठलीही मोठी बातमी तशीही सर्वत्र प्रसारित होतेच की… मग ह्याच बातमीचा राग का? आपल्यावर राज्य केल्याचा हा परिणाम तर नव्हे?

  हा आता जनतेच्या पैशातून राणीला पैसे पुरवणे हे गैर नक्कीच वाटतंय… सिद्धार्थचा मुद्दा पटला.. आणि हो शिवाजी महाराजांची स्वतःची संपत्ती, मालमत्ता होती. त्यांच्याकडे काही गावांची पाटीलकी देखील होती… मासाहेब जिजामातांची देखील बरीच संपत्ती होती… त्यातून त्यांनी राजांची ८ लग्ने लावली.

  • Pradeep says:

   Rohan,
   I think you need to get your facts right. The pirates of the Carribean were sponsored by the English royal family. These are the same pirates (as shown in the movies) who sank the Spanish ships which used to loot the Mexican/South American colonies for gold and send back to Spain. With this loot ,The Royal Family and other lords started the East India Company. Is it the same Royal family which earned millions by capturing and selling millions of poor Africans as slaves. If you have been to Liverpool, each and every corner of that city has been built from the profits of the slave trade as it was the largest port of sales. the Royal Family has undoubtedly opened opportunities for the other Brits by forceful colonisation of Wales, Scotland, Ireland, India and countless African/Asian countries. This family has a history of plundering the entire world for its own profits. Britain has been built by plundering the world and stealing other nations over 500 ‘glorious’ years. I do take some time to get these facts into the heads of the Brits I come across in the UK.
   Your comment about Shivaji Maharaj and Jijabai is surprising. Maharaj did not plunder other people to build his castles and live a fairytale lifestyle like the Royal families do in Europe. He was defending his own motherland. Your comment about his 8 marriages is equally irrelevant. Dih he put additional taxes on his state to get married 8 times?
   As a temporary UK taxpayer, I have to pay about £10 pounds to the Royal family’s upkeep. I think it is absolutely wrong for the royal family to ask for the taxpayers money while this country is in unprecedented economic crisis and has billions of pouds worth of real estate in UK and around the world.
   As an Indian, I do feel embarrassed to see that the Indian media paid so much of attention to the Royal marriage, as if it was our own festival. The Royal propoganda machine called the BBC always starts its India related news by showing the slums of Mumbai. I have personally been asked by many English colleagues whether we live as shown in the Slumdog movie. This is not globalisation mate, this is called market and propoganda. The marrigae was a bid marketing opportunity for the Royal family to remain as the tourist attraction and mint money from selling rights to the magazines etc. Hope you get the facts right the next time.

 15. aruna says:

  Pradeep is absolutely right on all points. the british kings too have a history of coming to the throne by murders and intrigue.And the the less you say about their morals ( with the exception of the present Queen perhaps), the better. again their history is replete with their interesting stories. many of the present royalty/noblemen trace their ancestry to the unlawful sons of the kings of the time.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s