आभार….

फार जुनी नाही, तर दोन- सव्वा दोन   वर्षापूर्वीची गोष्ट आहे.  ब्लॉगिंग म्हणजे काय हे नीटसं माहीत पण नव्हतं. थोडा फार सोशल साईट्स वर असायचो,  ते पण ते केवळ मित्रांशी संपर्कात रहाता यावे  म्हणून.

ब्लॉग म्हणजे काही तरी ग्रेट असावं, असे वाटायचे. खरी ब्लॉगिंगची ओळख झाली ते दिपक मुळे.  त्याने सुरु केलेला पुलं प्रेम नावाचा पुलं देशपांडॆंच्या साहित्यावरच्या ब्लॉग पाहिला, आणि वाटले की आपलाही असाच  एखादा ब्लॉग असावा, आणि त्यातूनच “काय वाटेल ते” हा ब्लॉग    सुरु केला.

मराठी ब्लॉग सुरु केल्यावर  जेंव्हा मित्रांना मेल ने लिंक पाठवली तेंव्हा बरेच मित्र, “ब्लॉग म्हणजे तो अमिताभ बच्चन लिहीतो त्या सारखा कारे??” म्हणून विचारणारे पण होतेच – पण  काही खास मित्र जसे माझा एक सहयोगी   सचिन संघई मात्र, ब्लॉग सुरु केल्यावर आवर्जून वाचायचा आणि प्रतिक्रिया द्यायचा. जर एखाद्या दिवशी काही लिहले नाही, तर इंटरकॉम वर ” आज काही लिहलं नाहीस??” म्हणून विचारायचा. बरेचदा तर केवळ त्याने विचारले तर काय सांगायचे?? म्हणूनही काहीतरी लिहून ब्लॉग वर  पोस्ट टाकत होतो.

काही व्यक्ती खूप लक्षात राहील्या आहेत, ज्यांना मी कदाचित नावाने पण ओळखत नाही- त्या पैकी एक व्यक्ती जी कायम मनाला चुटपुट लावून गेली आहे ती म्हणजे ’फॅन फेअर’ या नावाने नियमीतपणे कॉमेंट्स देणारी व्यक्ती. हा गृहस्थ सुरवातीच्या काळात नियमीतपणे   ब्लॉग वर   कॉमेंट्स द्यायचा. खरं नांव काय आहे त्या व्यक्तींचे ते मलाही माहीती नाही. पण एक स्नेही- इतकीच  ओळख आहे शिल्लक!  पण नंतर अचानक अदृष्य झाला.  काही  लोकं असेच संपर्कात आले आणि मनाला थोडा चटका लावून गेले. अजूनही बरेच लोकं  आहेत की ज्यांना पर्सनली पण भेटलोय ब्लॉगर मिट , आणि ट्रेकिंगच्या निमित्याने. ब्लॉगिंग मुळे  मी आधीही लिहिलेले आहेच, की कुठलाही स्वार्थ नसलेले    मित्र मिळाले आहेत मला.

“मराठी ब्लॉग विश्व” म्हणजे काही तरी ठरावीक विषयाशी निगडित निरनिराळे ब्लॉग    खाण्याच्या पदार्थाचे  ,राजकीय, साहित्यिक लिहलेले , कविता ,  ऐतिहासिक अशा    विषयांना वाहिलेले   वेगवेगळे ब्लॉग  होते, पण सगळे प्रकार एकत्र असणारे ब्लॉग मात्र फारसे दिसत नव्हते .

सगळ्याच प्रकारचे लेख एकाच ब्लॉग वर का नसावेत?? म्हणून   प्रातिनिधिक  स्वरूपातल्या ब्लॉग च्या संकल्पनेला बाजूला ठेवून सरळ जे काही आपल्या मनात येईल ते लिहायचे असे ठरवले , आणि त्यातूनच  ’ काय वाटेल ते’ चा जन्म झाला.     थोडी मनात धाकधुक तर होतीच, की आपण जे काही करतोय, ते लोकांना आवडेल की नाही? पण हा प्रकार पण सहजतेने स्विकारला गेला .  आणि   लवकरच असे अनेक विषय एकत्रित लिहणारे बरेच ब्लॉग्ज तयार झाले आहेत.

ब्लॉग सुरु केला तेंव्हा तो  कसा असावा?? ह्या प्रश्नाचे स्वतःलाच दिलेले उत्तर  :- ” ब्लॉग असा  असावा, की प्रत्येक लेख हा  स्वतःशीच प्रामाणिक राहुन लिहिलेला”   ! आजपर्यंत ते पथ्य पाळत आलोय.

ब्लॉग वर  कुठल्या प्रकारचे लेख लिहायचे   हे ठरवले नव्हते. कंप्युटर सुरु करायचा, आणि  जे काही मनात येईल ते आणि  जसे काही विषय सुचत गेले जातील तसे लिहित गेलो. ललित, लेख, कथा, सिनेमाचे परीक्षण, कविता, व्यक्ती चित्रं, तत्कालीन समस्यांवर राजकीय भाष्य, विनोदी, सेक्स, अशा    असंख्य विषयांवर  इथे लिहले आहे . माझा स्वभाव जरी जात्याच थट्टेखोर , कायम चिमटे काढणारा,  पिजे मारणारा असला, तरीही मी कधीच कोणावर व्यक्तिद्वेषाने   टिका केलेली नाही.

रोमॅंटीक कथा वगैरे पण लिहितांना आपल्या लेखनात कुठेच अश्लीलतेकडे झुकणारे होईल का- याची काळजी वाटत असायची.   इथे जे काही  लिहितोय, ते   सगळ्याच वयोगटातले लोकं  वाचतील, तेंव्हा ते वाचतांना  त्यांना   अवघडल्यासारखं होऊ नये ह्याची जाणीव  असायची.

इथे जे काही खरडलंय त्याला लेख म्हणावे, की निबंध, की ललित  काय ते मला कधीच समजलेले नाही. फक्त या सगळ्या लिखाणाला एकच योग्य शब्द दिसतोय तो म्हणजे ” काय वाटेल ते” !!

या लिखाणाला लेख वगैरे म्हणणे म्हणजे  शामभट़्टाच्या तट्टू ला  ऐरावत म्हणण्यासारखे आहे. स्वतःच्या लेखनाची व्याख्या करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही . उगाच शब्दांचे प्रदर्शन मांडण्यापेक्षा मनातले थोडक्यात नेहेमी बोलतो तसे लिहण्य़ा कडे माझा कल जास्त असायचा.

आई शारदेची( सरस्वतीची ) कितीही मनधरणी केली तरी शाब्दिक अलंकार कधी तिने माझ्या लेखणीतून पाझरू दिले नाहीत याचं बरेचदा वैषम्य वाटतं. स्वतः ला  ’काय वाटेल ते’ लिहायचे, आणि “ज्या पद्धतीनेच” लिहीतो, त्याच पद्धतीला “आपली शैली” म्हणून आपल्यात असलेली कमतरता लपवायची  असं सुरु आहे माझं!

एक माझं फेवरेट वाक्य आहे, “तुमच्या समोर असलेला माणुस कितीही मोठा असला, तरीही त्याला , तुम्ही सकाळी कमोडवर बसलेला इमॅजिन करा”- बस्स.. त्याच्याबद्दलची भिती निघून जाईल, आणि तुम्हाला लक्षात येईल की तो माणुस  पण तुमच्यासारखाच एक  सामान्य मानव प्राणी आहे. आणि एकदा हे समजलं की मग मात्र   कोणाही बद्दल लिहताना अजिबात काही भिती, संकोच वाटत नाही.

ब्लॉग सुरु तर केला, पण लिखाणात खूप इंग्रजी शब्द यायचे, ऑफिशिअल वापरात फक्त इंग्रजी भाषा असल्याने एकदम मराठी शब्द आठवत नसत, पण नंतर हळू हळू इंग्रजी शब्दांचा वापर आपोआपच कमी झाला, आणि योग्य मराठी शब्द आठवू लागले.  माझ्या लिखाणात शुद्धलेखनाच्या पण बऱ्याच चुका व्हायच्या. पण नंतर ब्लॉगर मिटच्या वेळेस शंतनू ओक मदतीला धाऊन आला, आणि त्याने  तयार केलेल्या  प्लग इन  बद्दल त्याने सांगितले. फायरफॉक्स मधे  ते प्लग इन जोडल्यावर  शुद्धलेखनाच्या   चुका बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्या.  आज इथे जे काही शुद्ध लिहलेले दिसते आहे त्याचे श्रेय शंतनुला!!

शक्यतो प्रवास वर्णनं वगैरे लिहायची नाहीत असे ठरवले होते . पण कामानिमित्त बराच प्रवास करावा लागतो , आणि मग प्रवासात जर एखादी जरा वेगळी गोष्ट दिसली तर त्याबद्दल लिहीणे सुरु केले  .बाहेर निघालो की हातातला मोबाईल कॅमेरा नेहेमीच सज्ज असायचा. कुठेही काही वैविध्य पुर्ण दिसले की पटकन फोटो काढण्याची सवय लागलेली आहे मला. फोटो काढण्याची सवय, आणि खाण्यावर प्रेम असल्याने, खादाडीच्या पोस्ट्स पण बऱ्याच लिहल्या गेल्या. नंतर तोच तो पणा येऊ लागतोय का असे वाटले म्हणून तशा पोस्ट्स कमी केल्या .

इथे येणाऱ्या कॉमेंट्स नेहेमीच काही चांगल्या नसायच्या. बरेचदा तर पर्सनली  अब्युझिव भाषा  वापरून कॉमेंट्स देणारे काही लोकं येऊन गेले, पण त्यांच्या कॉमेंट्स सरळ डीलिट करून लिहीणे सुरु ठेवले आहे.

हे इतकं सगळं स्वगत आज का??  नुकतेच या ब्लॉगचे पाच लाख  हिट्स पुर्ण झालेत. उण्यापुऱ्या सव्वादोन वर्षाच्या कालावधीत   या ब्लॉगला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्या   वाचकांचे  आभार मानायला म्हणून हे पोस्ट.  या पाच लाखाच्या पोस्टच्या निमित्याने सगळ्या वाचकांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि हे पोस्ट संपवतो..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , . Bookmark the permalink.

87 Responses to आभार….

 1. Gurunath says:

  आभार, ब्लॉगिंग आम्हाला पण शिकवल्या बद्दल!!!!!, बराहा ते विजेट्स अशी पुर्ण “फ़ाईव्ह कोर्स” ट्रिट दिल्याबद्दल!!!!!!…….

  पाचा चे पन्नास होवो हिच शुभकामना

  • गुरुनाथ
   माझ्याकडे जे होतं, ते तुला दिलं.. त्यात आभार कसले? 🙂

   • Gurunath says:

    अजुन सगळे कुठे दिले आहे तुम्ही, शॅम्पेन बाकी है!!!! 🙂 😀 😀 😀 😀 😀

    • च्यायला, ते आंबट पाणी तूला आवडतं???? शीः, काय रे तुझी चॉइस… !! 😀

     • राजे says:

      शॅम्पेन !!!!
      जैनाला विसरू नका 😉
      पाचाने ५ करोड होऊ देत… हीच कामना!

     • Gurunath says:

      ब्रॅंड दादा ब्रॅंड!!!!!!….. स्पार्कलिंक व्हाईट वाईन नाशकात पण होते पण फ़ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट करुन झाकण उडवायचे असेल विजय साजरा करायचा असेल किंवा नव्या शिपवर फ़ोडायची असेल नारळासारखी तर फ़्रेंच शॅंपेन ला पर्याय नाही!!!!

      • हिंदी सिनेमे, इंग्रजी सिनेमे जास्त पाहिल्याचे हे दुष्परीणाम. पंचविशितला तरूण शॅंपेन म्हणतोय, अरे तुमच्या वयात असतांना “म्हाताऱ्या सन्याशाला” काही पर्याय नसायचा. ओल्ड मॉंक युज टु बी द ब्रॅंड!!
       काहीही असो, फक्त ओल्ड मॉंक असायची. 🙂
       नाशिकला गेलो होतो. घरच्या सगळ्या भाचे कंपनी बरोबर. एक ग्लास शॅंपेन घेऊन सगळ्यांना टेस्ट करवली होती. एकालाही आवडली नाही. मला तर रेड वाइन आवडते जास्त.

 2. अरुणा says:

  सर्व प्रथम पाच लाख हिट्स घेतल्याबद्दल अभिनंदन. यात माझा पण खारीचा वाटा.
  तुम्ही जसे लिहिता तसेच लिहित रहा.अलंकारिक वगैरे वाचायला ठिक असले तरी कधि कधि त्याने रस-भंग होतो.सरळ आणि प्रवाही भाषा जास्त भावते. तेंव्हा, तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा.

  • अरुणा
   तुमच्या कॉमेंट्स म्हणजे एक प्रकारे ऑक्सिजन असतो, पुन्हा नवीन काही लिहीण्यासाठी!! आभार.

 3. रोहन says:

  मन:पूर्वक अभिनंदन… आज तुझाच ब्लॉग वाचत बसलो होतो…. 🙂

  • धन्यवाद.. पोहोचलास वाटतं शिपवर?? 🙂
   माझ्या लक्षात आलं ते, तुझ्या कॉमेंट्स पाहिल्यावर! 🙂

 4. मन:पूर्वक अभिनंदन महेंद्रजी! उणापुर्‍या दोन-सव्वा दोन वर्षांत पाच लाख हिट्स म्हणजे काय च्या कायच! तुम्ही या लेखात म्हटलेलं सर्व काही पटलं.एखादा ब्लॉग प्रचंड लोकप्रिय होण्याचं रहस्यच तुम्ही इथे सांगितलं आहे.मन:पूर्वक शुभेच्छा आणि आभार!

  • विनायकजी
   इतरांना काय वाचायला आवडेल ते लिहीण्य़ाचा प्रयत्न केला, की लिखाणातला ओघवते पणा निघून जातो. माझे असे काही पोस्ट आहेत ड्राफ्ट मधे, जे पब्लिश केले नाहीत – याच कारणामुळे.

   बरेचदा असे म्हटले जाते की मराठी लोकांना फक्त विनोदी लेख वाचायला आवडतात. पण इथे माझ्या ब्लॉग ने हे सिद्ध केलंय की तसे नाही. मराठी वाचक सगळ्याच प्रकारच्या लेखनाला सारख्याच समरसतेने दाद देऊ शकतो.. 🙂
   मनःपुर्वक धन्यवाद..

 5. vikram says:

  kaka sagal kas sahaj aani manasarkhe hot gele na !

  tumhi kay vatel te lihit gelat aani lok te vachat gele 😉

  baki 5 laksh shubhecha punha ekada 🙂

  aapali bhet rahun jate sarkhi kadhi punyat yenar asaltar sanga aadhi 🙂

  • विक्रम
   खरं आहे!! अगदी सहज पणे सगळं घडत गेलं… काहीही न ठरवता इथपर्यंत पोहोचलोय!! पुढल्या वेळेस नक्की भेटू या. किंवा, एक काम कर, सरळ ब्लॉगर्स मिटला येऊन जा या वर्षी?

 6. महेंद्र, दोन वर्षात पाच लाख म्हणजे खरंच अशक्य आहे…..!! तुझ्या साध्या, सोप्या, प्रामाणिक आणि ओघवत्या लेखणीमुळे ते शक्य झालंय. तुझ्या हातातली ही लेखणी अशीच लिहिती राहो….!! मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🙂

  • जयश्री
   एक कन्फेशन.. मला पण खरंच वाटत नाही बरेचदा. 😀 की आज पर्यंत इतके लोक वाचून गेलेले आहेत म्हणून.
   शुभेच्छांसाठी आभार..

 7. काका,

  पाच लाख अभी आणि पाच लाख नंदन !!! 🙂

  लवकरच पाचाचे पन्नास (लाख, कोटी वगैरे वगैरे) होवोत या शुभेच्छा !!

  असेच लिहीत राहा आणि आम्हाला नवीन नवीन वाचनाचा आनंद मिळत राहो !!

  • हेरंब,
   लिहीण्याची तर खूप इच्छा असते, स्पेशली करंट अफेअर्स वर लिहायला मला खूप आवडते, पण हल्ली कामामुळे सारखे दौरे असल्याने फारसा वेळ मिळत नाही.
   तरीही आठवड्यातून एक दोन पोस्ट टाकण्याचा रिवाज मात्र सुरु ठेवलाय.. आभार.

 8. प्रसाद पाटील says:

  अभिनन्दन!
  आमच्यासाठी असेच लिहित राहा,ही विनन्ती!आणि त्यासाठी शुभेच्छा!

 9. आल्हाद alias Alhad says:

  म्हणजे ७३० दिवसांत पाच लाख!
  सारे ब्लॉग्ज एक तरफ और आपका ब्लॉग एक तरफ अशी परिस्थिती आहे ही!

 10. jyoti says:

  अभिनंदन काका आणि खूप खूप शुभेच्छा…. 🙂

 11. अजय says:

  महेंद्रजी अभिनंदन !
  तस बघितल तर गेले काही महिने “काय वाटेल ते” झाल तरी तुम्ही काय नविन लिहील आहे हे वाचायला इथे येत गेलो. इतक सहज लिहीण खरच अवघड आहे पण आपल्याला ते साध्य झाल आहे.
  आई शारदेची कृपा असल्याशिवाय हे कसे शक्य आहे ? आपल्यावर आई शारदा प्रसन्न आहेच ती अशिच प्रसन्न राहो व पाचाचे पाचशे होवोत ही शुभेच्छा. पाचशे झाल्यावर परत शुभेच्छा द्यायला आम्ही सर्व आपल्या सोबत असणारच !

  • अजय,
   अगदी माझ्या मनातलं, खरं खरं काय ते वर लिहिलंय, खरंच मला बरेचदा असं वाटतं की थोडं अलंकारिक लिहीता आलं असतं तर बरं झालं असतं. स्पेशली , जेंव्हा इतरांचे ब्लॉग वाचतो, तेंव्हा तर हमखास जाणवते. शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार.

 12. s.k. says:

  इथे जे काही खरडलंय त्याला लेख म्हणावे, की निबंध, की ललित काय ते मला कधीच समजलेले नाही. फक्त या सगळ्या लिखाणाला एकच योग्य शब्द दिसतोय तो म्हणजे ” काय वाटेल ते” !! liked….

  abhaar kaka… 🙂

 13. ngadre says:

  tumachya blog varun inspire houn me blog suru kela..

  Aani kaay bolu..

  Asech khoop mitr jodat raha hee sadichchaa.

  • नचिकेत,
   तुमच्यामधे एक वेगळाच स्पार्क आहे लिहीण्याचा, मी फक्त निमित्त झालो असेन त्यावर फुंकर मारून प्रज्वलित करायला. मनःपूर्वक आभार..

 14. महेश कुंभार says:

  नमस्कार काका,
  सर्वप्रथम तुमचे अभिनंदन.
  तुमचा ब्लॉग म्हणजे माझे relax व्हायचे आवडते ठिकाण. गेल्या वर्षभरापासून तुमचा ब्लॉग चा नियमित वाचक आहे.
  आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत आहे. गेल्या वर्षभरात तुमच्या ब्लॉगमुळे बर्याच वेळेला माझ्या मनाला उभारी मिळाली आहे.
  धन्यवाद असेच लिहित राहा………

  -महेश

  • महेश,
   ब्लॉग वर स्वागत!! आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार. अहो ह्या प्रतिक्रिया म्हणजे ब्लॉगर्स साठी एक प्रकारचं टॉनिक असतं, पुन्हा नविन काहीतरी लिहीण्य़ासाठी उद्युक्त करणारं.. येत रहा..

 15. तुमच्यामुळे ब्लॉगिंग करायला सुरुवात केलीय…खुप बदल घडत गेले आणि त्यांना तुम्ही खुल्या मनाने दाद दिलीत. तुमचे काय वाटेल ते लिखाण अजून बहरत जावो आणि आम्हांस वाचनाचा आनंद असाच मिळत राहो. खुप खुप शुभेच्छा काका… शॅम्पेन उघडायला हवी खरंच आता 🙂

  “तुमच्या समोर असलेला माणुस कितीही मोठा असला, तरीही त्याला , तुम्ही सकाळी कमोडवर बसलेला इमॅजिन करा” वाह काय सही सांगितलत 😀

  • सुहास
   अरे बदल तर खूप होत जातात. लिखाणाची शैली पण बरीच बदलते. ्मी आता जेंव्हा माझे जूने पोस्ट वाचतो ,तेंव्हा मलाच बरेचदा विचित्र वाटतं वाचताना.. 🙂 खूप इंग्रजी शब्द लिहायचो मी देवनागरी मधे..

   “तसं इमॅजिन करतो, म्हणूनच लिहू शकतो.

 16. nutan chavan says:

  mala tumhi samuhgan madhe pahilyapasun avdata with ashwini bhave

 17. Vinayak Belapure says:

  अभिनंदन !
  ५ लाखच काय ५ कोटी होतील.
  ब्लॉगचे नाव ‘काय वाटेल ते ‘ असले तरी ते विषयाबद्दल आहे, लिखाणाच्या क्वालिटी बद्दल नाही हे लगेचच लक्षात येते आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा यावेसे वाटते नवीन काय लिहिलंय ते बघायला.
  शुभेच्छा आणि अभिनंदन पुन्हा एकदा.

 18. दिपक says:

  अरे वा! पाच लाखांचा पल्ला पार झाला तर…!
  अभिनंदन .. अभिनंदन!!

  • दिपक
   माझ्या ब्लॉग वर पहिली कॉमेंट तुमची होती. आज पुन्हा पाच लाखाव्या पोस्ट वर कॉमेंट पाहून आनंद झाला. 🙂 धन्यवाद..

 19. महेश कुलकर्णी says:

  अभिनदन,असेच लिखाण करीत राहा,

 20. Tanvi says:

  महेंद्रजी तुमच्या ब्लॉगला पाहून , प्रेरण घेऊन मी ब्लॉग लिहू लागले/लागलो अश्या खूप प्रतिक्रीया येणार पहा या पोस्ट्वर … मी ही तशीच एक…

  तुम्ही नुसती प्रेरणाच नाही दिली तर वेळोवेळी मार्गदर्शन केलेत… आणि कधी तुमचे कमेंट एखाद्या पोस्टवर नाही आले तर ’का हो कमेंट नाही टाकले’ असे तुम्हाला हक्काने विचारले जावे असा एखाद्या मोठ्या भावासारखा वडीलकीचा अधिकार आम्हाला दिलात… मला वाटतं ’आभार’ हा शब्द आम्ही तुम्हाला म्हणणे जास्त योग्य व्हावे 🙂

  पाच लाखाच्या पल्ल्यासाठी त्रिवार पाचवार अभिनंदन… लिहीत रहा 🙂

  • तन्वी
   तुम्हा सगळ्यांना लिहीण्य़ाची आवड होतीच- तसंही तू स्वतः नेहेमीच काही ना काही तरी लिहीत असायचीच. मी फक्त तुला ब्लॉग सुरु कर म्हंटलं होतं..बस्स.. बाकी सगळं तुच केलंस. एक बघ, गेल्या वर्षात किती ब्लॉग सुरु झाले- आणि त्यापैकी किती सुरु आहेत?? बरेच लोकं ब्लॉगिंग सुरु करतात, पण नंतर मात्र काही लिहीत नाहीत. कन्सिस्टन्सी ही तुझ्यामधे आहे, म्हणून तू लिहू शकतेस.

 21. Smita says:

  congratulations, aNakhee ek milestone gaThalyabaddal!:-)

 22. rajendra ukirade says:

  महेंद्रजी अभिनंदन !

 23. Aparna says:

  Kaka….

  Hardik hardik abhi nandan +5L

  Aaj nemka moving suru aahe tyamule mobile device warun comment minglish madhe detey…… Tumcha blog mhanje ek granth aahe aani to asach sagali Jana wachnar yaat kaahich shanka nahi. Shudhlekhnawarun aapla zalela emel sanwaad aathawato…..:)

  • अपर्णा
   😀 काही हरकत नाही. भावना महत्त्वाची!
   काय बोलू?? पण खरं आहे, आता आज बरेच काही बदल घडले आहेत विचारात. जर शंतनू त्यादिवशी भेटला नसता तर अजूनही शुद्धलेखनाची बोंब राहीली असती. अजूनही काही चूक असल्या तरी , बहुतेक बरोबर असतंच..

 24. मनापासून अभिनंदन, महेंद्रजी.
  असंच लिहित रहा. आम्ही वाचत आहोतच.

 25. Gayatri says:

  Hardik Abhinandan, kaka!!!

  Tumach saadh, sopp likhan ch khoop chhaan ahe…
  Te tas ch asu de….

  Khoop khoop shubhechchha…!!!!!

  • गायत्री
   धन्यवाद.. सामान्य माणूस साधी सरळ भाषा. माझी मराठी ची शब्दसंपदा कमी पडते असे नेहेमीच वाटत असते, पण तरीही विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही , आणि खांद्यावर प्रेत घेऊन चालायला लागला… अशी एक गोश्ट यायची ना चांदोबा मधे?? तसाच मी पण आपला हट्ट सोडला नाही;… आणि लिहीणं सुरु ठेवलं!

 26. anuja says:

  सौख्य लाभले ब्लॉगला पंचलक्षी, मी त्यातीलच वाचक आपली,
  होतील बहुकोटी लवकरी, शुभेच्छा मज कडून देते महेंद्रजी,

 27. दादा, जेव्हा माझा ब्लॊग मी सुरु केला तेव्हा फ़क्त आत्तापर्यंत लिहून ठेवलेला कचरा साठवण्याचं एक साधन एवढाच दृष्टीकोन होता. मग नंतर ’काय वाट्टेल ते…’ आणि त्यानंतर ’आतल्यासहित माणुस’ पाहण्यात आला आणि लक्षात आलं की अरे ही केवळ एक स्टोरेज डिस्क नाही तर व्यक्त होण्याचं एक प्रभावी आणि सोपं माध्यम आहे. मग त्या अंगाने ब्लॊगचा वापर सुरू झाला. त्याचं पर्यावसान यावेळी स्टार माझाच्या स्पर्धेत ब्लॊगची निवड होण्यात झालं. या प्रवासाचं सर्व श्रेय तुम्हाला जातं. तेव्हा खरेतर तुमचेच आणि नीरजाचेही मन:पूर्वक आभार ! 🙂

  • विशाल
   इतका मान मला दिलास त्यात तुझाच मोठेपणा आहे, कारण तुझं यश हे तुझ्या उत्कृष्ट लिखाणाचे आहे. त्यात माझा काहीच सहभाग नाही.फक्त इतरांचे लेख ब्लॉग वर ठेऊ नकोस एवढंच मी सजेशन दिलं होतं.
   आता स्टार माझा चं बक्षिस मिळालंय , मी पाहिलंय की एकदा बक्षिस मिळालं की लोकांचं लिखाण कमी होतं- तसं होऊ देऊ नकोस… हात लिहीता ठेव..

 28. आणि हो महत्वाचं राहीलंच….
  प्यार्टी कधी, म्हणजे नुसतं अभिनंदन म्हणायचं की हार्दिक अभिनंदन म्हणायचं तेही ठरवता येइल. 😉

 29. आनंद पत्रे says:

  पंच लक्ष अभिनंदन..

 30. महेंद्रजी,
  नमस्कार. तुम्ही उत्तम लिहीता म्हणुनच पाच लक्ष वाचक वर्ग लाभला आहे. तुमचं लेखन आवर्जुन वाचावसं वाटतं.तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. आणि धन्यवाद.

 31. काका, आज स्वप्नात तुमचा ब्लॉग आला होता. का ते माहित नाही, पण आला होता. काहीतरी विचित्र स्टोरी होती. तुकड्या-तुकड्यांमध्ये आहे. लवकरच सगळे तुकडे जुळवून काही काल्पनिक टाकून लिहून काढेन.

  • पंकज
   अरे बापरे आता स्वप्नातही ब्लॉग??
   लवकर लिही .. वाचायला आवडेल तूझे स्वप्न..

 32. प्रणव says:

  नमस्कार महेंद्रकाका,
  माझा स्वत:च ब्लॉग नाहीये, पण मला ब्लॉग वाचायला खुप आवडतात. माझ्या कही ठराविक आवडत्या ब्लॉगपैकी तुमचा हा एक ब्लॉग. अक्षरश: मी व्यसन लागल्यासारखा तुमच्या पोस्टची वाट बघत असतो. हेट्स ऑफ टू यू. असेच तुम्ही लिहित रहा. पाच लाखांचा पल्ला गाठाल्याबद्दल हार्दिक अभिनन्दन. तुमच्या या वाटचालिला खालील शब्द तंतोतंत लागु पडतात.

  आप भी आइए, हम को भी बुलाते रहिए
  दोस्‍ती ज़ुर्म नहीं, दोस्‍त बनाते रहिए।

  ज़हर पी जाइए और बाँटिए अमृत सबको
  ज़ख्‍म भी खाइए और गीत भी गाते रहिए।

  वक्‍त ने लूट लीं लोगों की तमन्‍नाएँ भी,
  ख्‍वाब जो देखिए औरों को दिखाते रहिए।

  शक्‍ल तो आपके भी ज़हन में होगी कोई,
  कभी बन जाएगी तसवीर, बनाते रहिए।
  — जगजीत सिंग

  आपला एक वाचकमित्र,
  प्रणव

  • प्रणव
   क्या बात है.. चक्क गझल?? धन्यवाद//
   काय कोणासठाऊक, पण कवितेशी कधी तार जुळली नाही माझी. म्हणजे कविता करावी वगैरे कधीच वाटले नाही.. पण एकदा कविता पण करायची आहे ..

 33. Pramod Mama says:

  Dear Mahendra Kaka

  Tumhi Kharokar mahan Aahat…5 Lakhacha Palla ekdam super fast Vegat gathla …mhanje Nakkich sarswati devi tumchya kade krupa drushti thevoon aahe …Abhinanandan & Abhinadan. Tumcha Blogchi me nehmi wat pahat asto …ekda ka to wachoon zala ki maze man ekdam halke fulke hote & anandane sarvtra vihar karte. Asech Lihit ja Pan mala Khadadi blog khoop khoop awadato.. Dhanyawad & Shubhechya.

  Pramod mama

  • प्रमोद मामा
   अहो तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळेच तर पुन्हा काहीतरी वेगळं लिहीण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेस काही वेगळा प्रकार लिहीला, की वाटतं, जमलं असेल की नाही ?? पण जमतंय असं वाटतं.
   शुभेच्छांसाठी मनःपुर्वक आभार.

 34. श्रीमंत,
  सुरूवातीला जेव्हा तुम्ही रोज एक या नियमाने पोस्ट लिहायचात ना , तेव्हा कमाल आहे बुवा, काय लिहितो तरी काय हा माणूस आणि कसा ? ते देखील रोज असा प्रश्न पडायचा. पण रोज तुमची कोणत्या ना कोणत्या विषयावर पोस्ट आलेली असायचीच. सगळंच पटायचं किंवा आवडायचं असं नाही पण लेखनातली ओघवता मात्र सहज असायची. आहे… हे…. असं आहे…. असं मांडायचा प्रामाणिकपणा त्यात होता. कोणताही विषय तुम्हाला वर्ज्य नव्हता. अश्याच माझ्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन. गंमत अशी आहे की माझ्या ब्लॉगने तीन लाख पूर्ण केले तेव्हा तुमचा ब्लॉग याच्या जवळपासही नव्हता. पण आता मात्र ’काय वाट्टेल ते’ करून तुम्ही पाच लाख पूर्ण केले आहेत, तेव्हा माझा ब्लॉग या शर्यतीत मागे पडला आहे. फारशी अलंकारीक भाषा न वापरता देखील साधं, सरळ, सोप्पं लिहून माणूस ब्लॉग लिहू शकतो, ५ लाख वाचक येऊन तो वाचू शकतात हे तुम्ही दाखवून दिलंत.

  • श्रेया
   मराठी लोकं फक्त विनोदीच वाचतात, किंवा फक्त विनोदी ब्लॉगच वाचला जाऊ शकतो हे चुकीचे आहे हे लक्षात आले माझ्या ब्लॉगिंगच्या दोन् वर्षात.
   एक लक्षात आलंय , की कथा लिहीली की भरपूर हिट्स असतात ब्लॉग ला. जर कथांचा स्पेशल ब्लॉग सुरु केला तर छान तयार होईल..
   ब्लॉग हिट्स चं कारण म्हणजे नियमीत पणे लिहीणे इतकंच असावं माझ्या मते..
   असो.. मनःपुर्वक आभार..

 35. mau says:

  सर्व प्रथम पाच लाख हिट्स घेतल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन!!!!!
  असेच “काय वाट्टेल ते ” ला खुप खुप यश मिळो….
  तुमच्या प्रत्येक लेखाची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत…
  पुन्हा एकदा अभिनंदन !!!

 36. Tejas says:

  Abhinanadan. Asech mast lihit ja mhanje aamha pamrana asech chagale vaachata yeil. 🙂
  Ithe gujarat madhye marathi books vaachayala milat nahit, tyanchi bhook tumchaysaarkhe che blogs vachun bharun kaadhato.

 37. MADHURI GAWDE says:

  abhinandan. lahanpani jashi aamhi khauchi vaat pahaaycho. pan aata kaahitari chaangle vaachayla have ase vaatat rahaate. kaaran vaachnyat aamhi tahaanbhuk visarto. tumcha blog haa aamchyasaathi khauch aahe.

  • माधुरी
   खूप खूप छान वाटलं, तुमची उत्स्फुर्त प्रतिक्रिया पाहून.
   मनःपूर्वक आभार.

 38. tejaswini joshi says:

  vah !
  manal ustad !!!
  sahaj bhtakat mhanun aale hote .pan ardhya -ek tasasathi adakunch padale ki.
  sundarach lihita.pahilyandach blog vachala.punha punha yayala nakki aavadel.etakya sagalya blogs chya panktit vachavach ase vatanare ase phar kami ahet .tyat kaminmadhye tumache varni lagate.

  • तेजस्विनी
   ब्लॉग वर स्वागत, आणि इतक्या सुंदर प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.( कॉलर एकदम टाईट झाली 🙂 ) धन्यवाद…

 39. सोनाली केळकर says:

  महेंद्रकाका,
  खूप खूप अभिनंदन!
  तुम्ही असेच छान छान लिहीत रहा, आम्ही वाचत आहोतच.

 40. Leena says:

  Congrts to you and your FAMILY ( without their co-operation it would not have happened .)

  • लीना
   अगदी बरोबर, माझं सारखं लॅप्टॉप घेऊन बसणं जर त्यांनी दुर्लक्षित केलं नसतं, तर कधिच लिहू शकलो नसतो ब्लॉग वर.

 41. Santosh says:

  “तुमच्या समोर असलेला माणुस कितीही मोठा असला, तरीही त्याला , तुम्ही सकाळी कमोडवर बसलेला इमॅजिन करा”- बस्स.. त्याच्याबद्दलची भिती निघून जाईल, आणि तुम्हाला लक्षात येईल की तो माणुस पण तुमच्यासारखाच एक सामान्य मानव प्राणी आहे.

  Mala tumcha wichar faar inspirational watla… Maaf kara apali parwanagi na gheta Facebookat post kelay… Pan ho khali apnaas Thanks mhatlay… Plus bolg chi link sudhha publish keli ahe 🙂

  Hope tumhi ragawnaar nahi ya war.

  Apla follower;
  Santosh Kudtarkar 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s