कार्पोरेट लाईफ सायकल..

कार्पोरेट लाइफ.. नेट वरून साभार.

विचारमग्न बसलेले होते साहेब. समोर एक ब्राऊन पेपरचं पाकिटं पडलं होतं . हे असं पाकिटं येणं काही नवीन नव्हतं, या पूर्वी पण अशाच पाकिटांशी संबंध आला होता.  या पूर्वी दोन वर्ष अशाच पाकिटातून आलेल्या मेसेजेस ने त्यांना वाचवलं होतं. एक वेगळाच धीर मिळत होता, त्या पाकिटाकडे पाहिल्यावर. काय असेल बरं त्या पाकिटात  ?? इंटरकॉम वर पॅंट्री मधे फोन केला, आणि  चहाची वाट पहात त्या पाकिटात काय लिहलं असेल याचा विचार करत बसले.

इथे जेंव्हा जॉइन झाले होते साहेब, तेंव्हा इथले जुने जी. एम.  राघव साहेब, जे  तीन वर्ष जी. एम.  म्हणून काम करत होते. त्यांच्या  सेंड ऑफ पार्टी नंतर   त्यांनी जाता जाता तीन पाकिटं हातात दिली. प्रत्येक पाकिटावर १ मार्च तारीख होती- फक्त वर्ष पुढली तीन वेगवेगळी होती.

राघव साहेब म्हणाले, की मी इथे तिन वर्ष काम केलंय. इथे तुम्हाला जाता जाता माझ्याकडून एक थोडी मदत म्हणून ही तीन पाकिटं देऊन जातोय. यातलं पहिलं पाकिटं हे पुढल्या वर्षी एक मार्चला उघडायचं, दुसरं त्याच्या पुढल्या वर्षी एक मार्चला, तिसरे त्याच्या पुढल्या वर्षी एक मार्चला .  काही न बोलता साहेबांनी तिन्ही पाकिटं कोटाच्या खिशात घातली.

आज दोन वर्षा नंतर मनोमन धन्यवाद देत होता तो त्या “एक्स जी. एम.  राघवला” . गेली दोन वर्ष ह्या अशाच दोन पाकिटांनी त्याला वाचवलं होतं. आता हे तिसरं वर्षं ! हे शेवटचं पाकिटं घेऊन बसले होते साहेब.

२८ फेब्रूवारी… मार्च महिना जवळ आला  शेअर होल्डर्स ला उत्तर द्यावं लागायचे ’एमडी ’ला, प्रॉफिट वाढायला हवे, टर्न ओव्हर तर हवेच हवे! कुठला शेअर होल्डर काय विचारेल ते सांगता येत नाही- त्या साठी  एमडी खूप प्रेशर करायचे.  ग्रोथ तर दाखवायलाच हवी शेअर होल्डर्स ला!

आल्या पासूनची पहिली दोन वर्ष    पर्फॉर्मन्स  काही फारसा बरा नव्हता – पण त्या पाकीटां मधे दिलेल्या इन्स्ट्रक्शन मुळे वाचलो-   पण आता या वर्षी कसं??

पहिल्या वर्षी ची गोष्ट आहे.  या कंपनी मधे ’एम डी’ ने जी. एम. च्या पोस्ट साठी  इंटरव्ह्यु घेतला, तेंव्हा  खूप स्वप्न दाखवली एमडीला. त्यालाही असं वाटलं, की हा एका प्रोफेशनली मॅनेज्ड कंपनीतून आला आहे, तेंव्हा हा खरंच काही करेल् म्हणून, तसंही ’बोलबच्चन गिरी’ मधे कोणी हात धरू शकत नाही आपला.   आपण त्याला  आपण ही कंपनी ’प्रोफेशनली’ चालवून दाखवून  ,  प्रॉफिट आणि टर्न ओव्हर  मधे ३० टक्के वाढ दर वर्षी,  म्हणजे तीन वर्षात   टर्न ओव्हर मधे  साधारण ’दुप्पट  वाढ ’करून दाखवू म्हणून दिलेले अश्वासन आठवले.

जंग जंग पछाडले, तरीही काही फरक पडला नव्हता. टर्न ओव्हर तितकंच होतं . नो इम्प्रुव्हमेंट!! एसी केबीन मधे पण कपाळावर आलेला घाम पुसला खिशातल्या रुमालाने आणि इंटरकॉम वर “ब्लॅक टी विथ लेमन स्लाईस ऍंड इक्वल’ ची ऑर्डर दिली  . गेली तीन वर्ष एका क्षणात नजरेसमोरून गेली साहेबांच्या.

———————-

पहिल्या वर्षी जेंव्हा साहेब कंपनी मधे मार्च अखेर जॉइन झाले, तेंव्हा कंपनी ही बऱ्या पैकी पर्फॉर्मिंग कंपनी होती. शेअर होल्डर्स  तसे फार खुष नव्हते- पण दुःखी पण नव्हते.  दर वर्षी न चुकता दिला जाणारा डिव्हिडंड , दर चार पाच वर्षातून एकदा बोनस शेअर.. कंपनी बरीच म्हणायची!

बी गृप मधे लिस्टींग  जरी असली, तरी शेअर्स चे भाव तसे चांगलेच होते -पण एमडीला एक दुःख होतं, की अजिबात काही मुव्हमेंट नसायची स्टॉक मधे. मार्केटला सोडलेली प्रत्येक न्यूज सरळ सरळ डिस्काउंट केली जायची. आपण दाखवलेल्या गुलाबी स्वप्नात  एमडी ला कंपनी एकदम वर गेलेली दिसेल याची काळजी घेतली होती. ’क्रिसिल रेटींग’ वाढायला हवं, लोकांनी विश्वासाने पैसे ठेवावे आपल्याकडे एफडी मधे वगैरे वगैरे .. हजारो गोष्टींबद्दल एमडीच्या मनात  भरपूर अपेक्षा निर्माण करण्याचे चोख काम मात्र केले  होते.

टर्न ओव्हर वाढवून दाखवू म्हणून दिलेले अश्युरन्स – पण प्रत्यक्षात?

सेल फोन मधला तो अलार्म वाजला . “रिमाइंडर” .. त्यात लिहिलं होतं,  “टु ओपन द एन्व्हप गिव्हन बाय राघव” !! साहेबांना एकदम आठवलं नाही कुठलं एनव्हलप ते, पण एकदम स्ट्राइक झालं, आणि  पहिलं पाकिटं  त्यांनी ड्रॉवर मधून बाहेर काढलं.  एक वर्ष झालं या कंपनीत येऊन. मनाशीच पुटपुटले साहेब. आपण आल्यावर पण काही फारसा फरक पडलेला नाही ना टर्न ओव्हर वाढलं, ना पीबीआयटी(प्रॉफिट)!

समोरचा ब्लॅक टी विथ लेमन स्लाइस चा कप होता. त्यांनी कप उचलला, आणि एक घोट घेत, पहिलं पाकीट उघडलं- त्यात राघव ने लिहून ठेवलं   होतं, ” अभिनंदन!, तुम्ही एक वर्ष पुर्ण केलंय आज इथे या कंपनीत, तुमच्या सगळ्या प्रयत्नांनी सुद्धा कंपनीचे टर्न ओव्हर वगैरे काही वाढले नसेल, आता एमडीला काय सांगायचं हा विचार करत बसले असाल, काळजी करू नका,

एमडीला, सांगा की “इथल्या मॅनपॉवरचे रिस्ट्रक्चरींग करणे आवश्यक आहे,  आपण पर एम्प्लॉइ कॉस्ट कमी करू या. पर एम्प्लॉइ टर्न ओव्हर हे वाढायलाच हवे, त्यासाठी आपण  रिस्ट्रक्चरींग केले की प्रॉफीट वाढेल.  आर ऍंड डी चा माणूस प्रॉडक्शन, प्रॉडक्शनचा माणुस से्ल्स, सेल्स चा क्वॉलीटी, क्वॉलीटी चा मार्केटींग असे करा.  शक्य असल्यास एमडी च्या गळी व्ही आर एस ची योजन पण उतरवण्याचा प्रयत्न करा.”

व्ही आर एस मुळे मॅनपॉवर कमी झाली की पैसा वाचेल , त्यातलाच थोडा पैसा, शिल्लक  असलेल्या लोकांना  थोडासा पगार वाढवून द्या म्हणजे ते पण खूश होतील.   त्यांच्याकडून दुप्पट काम करून घेता येईल. सोडून गेलेल्या लोकांच्या जागी नवीन भरती करू नका.. एक वर्ष तर निभेलं.  साहेबांचे डोके एकदम  शांत झाले .

———————————–

होता होता एक वर्ष निघून गेलं. दुसरे वर्ष आलं. पुन्हा फेब्रुवारी संपला.  मागच्या वर्षी घेतलेल्या ऍक्शन्स मुळे नाही म्हटलं तरी थोडा फार प्रॉफिट वाढला होताच, पण ’टर्न ओव्हर’ मात्र कमी झालेला होता. काम करणारी माणसंच नाही म्हटल्यावर दुसरं काय होणार??  पण माणसं कमी करायचं सजेशन तर आपलंच होतं.. आता काय करायचं??

दुसरं पाकिटं आठवले साहेबांना, त्यांनी पाकिटं काढलं, आणि आतुरतेने पाकिटं उघडलं. त्या पाकिटा मुळेच तर एक वर्षा आरामात गेलं होतं.  ह्या दुसऱ्या पाकिटात काय असेल? मनातल्या मनात राघवांना धन्यवाद देत ते पाकीट उघडलं.

पाकिटातील पत्र बाहेर काढलं आणि साहेब वाचू लागले . ” अभिनंदन! तुमचे दुसरे वर्ष पुर्ण होत आहे.या वर्षी काय करायचं? तुम्ही कमी टर्न ओव्हर ’जस्टीफाय’ करा-   म्हणावं, की ग्लोबल स्लो डाउन मुळे आपण घेतलेल्या ऍक्शन्स मुळेच आपण सेफ आहोत, नाहीतर स्टॉक ’पाइल अप’ झाला असता- जर स्टॉक  विनाकारण जमा झाला असता तर फिनान्शिअल चार्जेस वाढले असते. ते जे २% चार्जेस लागलेले नाहीत, त्या मुळेच आपण  अजुन ही  चांगल्या परिस्थितीत आहोत.. जरी टर्नओव्हर कमी झालेलं असलं तरीही ’प्रॉफीट पर एम्प्लॉइ’ वाढलंय. म्हणजे आपण योग्य मार्गाने जात आहोत.

हे पण सांगून टाका की, या वर्षी बरेच लोकं नॉन पर्फॉर्मिंग आहेत त्यांना पिंक स्लिप देऊ या, म्हणजे त्या ठिकाणी इतर कंपन्यातून “हेड हंटर्स” च्या मदतीने चांगले लोकं घेता येतील, म्हणजे  पुढल्या वर्षी पुन्हा प्रॉफिट बरोबरच टर्न ओव्हर सुद्धा वाढेल”

वाह.. क्या बात है. साहेबांच्या मनात विचार आला, की ह्या राघव साहेबांच्या आयडीया एकदम सॉलिड आहेत !

———————————–

तिसरं वर्ष आलं. फेब्रुवारीचा शेवट आला, की साहेबांना पुन्हा राघव साहेब आणि त्यांचं एनव्हलप आठवायचं. साहेब समोर चहाचा कप घेऊन बसले होते. समोर ते पाकिटं पडलेले होते, चहाचा कप उचलला, आणि थंडपणे ते पाकिटं उघडले. त्यातला कागद बाहेर काढून कपाळावरचा चष्मा डोळ्यांवर लावला , आणि वाचू लागले.

राघव ने लिहिले होते, ” आता हे तिसरं वर्ष तुम्ही पूर्णं केलंत, त्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन! मागच्या वर्षी तुम्ही कंपनीतले जुने ऑफिसर्स काढून त्या ऐवजी बाहेरून जास्त पगारावर कॉम्पिटीटर कडची माणसं घेतली होती. त्याचा परिणाम म्हणजे पुन्हा तुमचे ’टर्न ओव्हर टू एम्प्लॉइ कॉस्ट’  हा रेशो आता पुन्हा वाढला असेल. टर्न ओव्हर पण कमीच झाले असेल, कारण पहिल्या वर्षी दिलेली व्हिआरएस!  अशी परिस्थिती आहे, की तुम्ही काहीही केले तरीही काही फारसा फरक पडू शकणार नाही.”

” आत एक करा, मी जसे हे तीन पाकिटं तयार केली तुमच्या साठी तशीच तीन पाकिटं तयार करा- तुमच्या नंतर येणाऱ्या व्हिपी साठी. पहिल्या  पाकिटात लिहा, की नवीन कामगार भरती केल्याशिवाय काही टर्नओव्हर वाढणार नाही, दुसऱ्या पाकिटात ………………………….. आणि आपला राजीनामा तयार करा!”

(संपूर्णपणे काल्पनिक )

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कार्पोरेट वर्ल्ड and tagged , , , , . Bookmark the permalink.

50 Responses to कार्पोरेट लाईफ सायकल..

 1. Gurunath says:

  कॉर्पोरेट गव्हर्नन्स कसा असतो ,काय असतो हे उत्तम मांडले आहे दादा………. फ़क्त सिव्हिल अन कॉर्पोरेट गव्हर्नन्स मधे एकच फ़रक असतो सिव्हिल हे नैतिक कारणांवर आधारित असते (व त्यामुळे अधिक टिकेचे धनी पण असते) तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे शुद्ध आर्थिक गणितांवर असते (क्वचित प्रसंगी म्हणुन हे क्रौर्यपुर्ण पण असु शकते)

  • गुरु
   इथे त्यातलं डार्क ह्युमर पकडायचा प्रयत्न केलाय. कितपत जमला ते समजलं नाही, पण कुठलीही कंपनी घे, असेच काहीतरी सुरु असते.आर्थिक गणितावरच प्रत्येक निर्णय घेतला जातो, प्रश्न फक्त हा आहे, की मॅनेजमेंटला पाण्याने भरलेला अर्धा ग्लास तुम्ही दाखवता, की अर्धा रिकामा ???? हे मह्त्त्वाचे.. हे दाखवणारे खरे थिंक टॅंक्स असतात कंपनीचे..

 2. Gurunath says:

  ही कॉमेंट थोडी डीटेल करतो,

  १९९१ मधे भारत देशाने “एल.पी.जी” मॉडेल आत्मसात केले, एल=लिबरलायझेशन, पी=प्रायव्हेटायझेशन
  जी=ग्लोबलायझेशन…., ह्याचा स्पष्ट अर्थ म्हणजे आर्थिक बाबतींमधे आपण ऍडम स्मिथ कडे एक अजुन पाऊल टाकले होते, खरेच काळाची गरज अन त्या काळी सुदैवाने भारताला लाभलेले तैलबुद्धी अर्थमंत्री श्री.मनमोहन सिंग ह्यांनी जे जे बदल घडवुन आणले ते स्तुत्य आहेत, आज सर्व्हिस सेक्टर बुम हा फ़क्त आय.टी पुरता मर्यादित राहीला नसुन कोर इंजिनियरींग इंडस्ट्री मधे पण आहे, जसे व्हिडीओकॉन कंपनी ने फ़्रांस मधे “थॉमसन” ही व्हिडीओ पिक्चर ट्युब ची कंपनी टेकोव्हर केली आहे तसेच मोबाईल ते एल.सी.डी रेंज मधे दर्जेदार अंतराष्ट्रीय प्रॉडक्ट्स देत आहे. सोनालिका ह्या ट्रॅक्टर च्या कंपनीने युरोपात आपली प्रॉडक्ट्स लॉंच केली आहेत. ह्याचे एक कारण आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स ही मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापनाची पुढची पायरी आहे, जश्या जश्या कंपन्या मोठ्या होत जातात तसे तसे तात्कालिक निर्णय घेणे, नवे ग्राहक जुळवणे इत्यादी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढते की त्याला मॉनिटर करण्यासाठी काही प्रशासक लागतात ह्यांना म्हणतात कॉर्पोरेट लिडर्स, मॅनेजर्स हे कंपनी चे रुटीन बघतात, अन मॅनेजर्स कडे लिडर्स लक्ष देतात…… हे झाले ठोकळेबाज, पण खरेच काही उणे काही दुणे हे काय असते ते तुमच्या पोस्ट मधुन कळले. नाईस पीस ऑफ़ नॉलेज.

  • सगळ्या डेव्हलपमेंट्सचा बेस आहे राजीव गांधी.. जर राजीव गांधी नसता, तर इतके पुढे गेलोच नसतो आपण. मनमोहन सिंगांना पूर्ण साथ दिली होती राजीव ने, म्हणूनच ते काही करू शकले..

   • Smita says:

    Actually Narsimh Rao nee free hand dila hota Manmohan Sing na- so credit goes to him for empowering the right person.

    • Gurunath says:

     राजीव गांधींची क्रिटीकल टेक्नॉलॉजी पॉलिसी भारी होती, परत नरसिंहराव ह्यांनी तर मनमोहन सिंह ह्याना इतकी ऑटोनॉमी दिली होती की एका प्रसंगी त्यांना मिडीयाने छेडले होते “तुम्ही काही निर्णय घेता की नाही” तर ते म्हणाले होते “सगळे धोरणात्मक निर्णय मनमोहन घेतील ,हा निर्णय मी घेतला आहे”.

 3. हाहा.. भारी लिहिलंयत.. म्हंटलं तर ह्युमर, म्हंटलं तर डार्क !!! एकदम मस्त..

  • हेरंब
   लिहीताना डार्क ह्युमर होतं मनामधे.. पण लिहिल्यावर खात्री वाटत नव्हती की आपण हे जे काही लिहिलय ते बरोबर झालं की नाही??
   धन्यवाद..

 4. poorva kulkarni says:

  कथा छान आहे . काल्पनिक आहे परंतु turnover आणि profit साठी आणखीन बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मार्केटिंग, advertising , economical factors ,quality ऑफ product etc etc ..

  पण गोष्ट मनाला स्पर्शून गेली. जिवघेणी स्पर्धा आहे corporate life मध्ये हे खर आहे.

  • पूर्वा
   इथे सगळं इकॉनॉमिक्स लिहित बसलो असतं, तर कदाचित अजुन कंटाळवाणं झालं असतं. म्हणून थोडक्यात आवरलं. जे कन्व्हे करायचं होतं, ते म्हणजे निर्णय कसे घेतले जातात…. या बद्दल.. !
   धन्यवाद..

 5. वाह वाह…. काय सही लिहिलंय 🙂

  • सुहास,
   वर कुठल्याही कंपनीचे नांव टाक, हे अगदी बरोबर फिट बसतं प्रत्येकच कंपनीला. एका कंपनितून बाहेर पडलेला ब्लॅक शिप, दुसऱ्या कंपनीत फ्लॅग बेअरर होतो.. !!

 6. Amol says:

  Totally agree with Poorva.

 7. शुभम says:

  मोठ्या कंपन्यांचा ‘anyhow’ attitude मुळेच प्रगती होते की काय, असं वाटू लागलंय आता. उदा. pharma कंपन्या.

  फॉलो मराठी ब्लॉग्स http://blogkatta.com

  • शुभम
   तो तर वेगळाच प्रश्न आहे. फार्मा कंपन्यांवर तर एक मोठी दिर्घ कथा लिहीली जाऊ शकते.

 8. Vinayak Belapure says:

  छान आहे कथा.
  काल्पनिक असली तरी त्याला वास्तवाचे भान आहे. काही काही कंपन्या अश्या असतात कि तिथे काय वाटेल ते केले तरी टर्न ओव्हर वाढत नाही. कारण त्यांचे मार्केटच तितके मर्यादित असते. प्रोडक्टच्या किंमती वाढवल्याशिवाय टर्न ओव्हर मध्ये वाढ झालेली दिसताच नाही. अश्या वेळी एमडी , बोर्ड , युनियन सगळे तारेवरची कसरत ठरते.

  • विनायकजी
   बऱ्याच गोष्टी असतात की ज्यांचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो पीबीआयटी वर. अदर एक्स्पेन्सेस आणि अदर इनकम हा एक मुद्दा पण महत्त्वाचा असतो, पण हे सगळं लिहीणं शक्य नव्हतं एका लघुकथे मधे.

 9. राजे says:

  सही लिहिलंय!!!!!!!!

 10. Smita says:

  ase job hoppers pahilet mee puN – puN te 3 varshancha koDa kahee mala suTalela nahee. tyancha average tenure in a given company 3 varsha hech asata, mug dusrya kuThetaree fasavayala jatat… aNee jasta pagaravar of course. naveen challenge hava mhaNun:-)

  • असे बरेच लोक दिसतात. एका कंपनीत अगदी वाईट पर्फॉर्मन्स देऊन मग दुसऱ्या कंपनीत गेल्यावर बेस्ट पर्फॉर्मन्स चं प्राइझ घेणारे पण माहीत आहेत. असे लोकं दिसले, की त्यांच्या नशिबाचं कौतुक वाटतं.

 11. शुभम says:

  नाईस पोस्ट..

 12. स्नेहल जोशी says:

  मस्त जमलीये काल्पनिक कथा!

 13. bolmj says:

  आपण काल्पनिक म्हणता तरी एकदम रिअल वाटतं….जगा आणि जगू द्या नवे कॉर्पोरेट सूत्र..

  • कुठल्याही कंपनीचे नांव वर टाका, ही कथा त्या कंपनीची म्हणून सहज खपून जाईल. जगा आणि जगू द्या.. हे नाही, तर वर कार्टुन मधे जे दाखवलंय चित्रात, ते आहे खरं कार्पोरेट वर्ल्ड!

 14. sumedha says:

  खरे आहे महेंद्रजी तुमचे. इथे सगळेच आपल्या डोक्यावरचे ओझे दुस-याच्या डोक्यावर कसे थापता येईल हे पाहत असतो. प्रत्येक वेळी दुस-याकडे बोट दाखवले जाते , पण एक वेळ अशी येते की चार बोटे आपल्याकडेच आहेत हे मान्य करून खुर्ची खाली करावी लागते….पुन्हा दुस-या खुर्चीच्या शोधार्थ !!!!

 15. प्रणव says:

  काका,
  खर तर corporate जगात असेही काही नग असतात जे फ़क्त चाटूगिरी करून अनेक गोष्टी साध्य करतात जसे बढाती, बोनस वगैरे. अशा पब्लिकला कामापेक्षा एकमेकामधे काड्या लावणे, उगाच दुसर्याची अडवणूक करणे यातच धन्यता वाटत असते. बाकी पोस्ट एकदम झकास झाला आहे नेहमीसारखा!!!
  प्रणव

 16. ankur says:

  Aadhi vachli hoti………….

 17. कथा जरी काल्पनिक असली तरी ते वास्तवच आहे…सगळ्या ठिकाणी हेच सुरु आहे.

 18. swapna says:

  kaka.. aadhi vachlay ha lekh… same to same… net var hota..mail madhye vachla asar…

  • एका मॅनेजमेंट प्रोग्राम मधे फॅक्ल्टीने एक डीसिजन मेकिंग वर एक स्लाईड शो दाखवल होता, त्यावरून बेतलेला आहे.

 19. काय वाट्टेल ते वरच्या नेहमीच्या लेखांपेक्षा एकदम हटके!!!
  सुरुवात जमली आहे… येऊ द्यात काका… 🙂

 20. Unsui says:

  नव्या बाटलीत जुनीच दारू. जुन्या दारूची नशा न्यारी होतीच, पण त्याला मराठमोळा शब्द्साज आणि आधुनिक बिझनेस स्कूलनी तयार केलेल्या कॉर्पोरेट संस्कृतीचे संदर्भ देऊन मजा आणलात.

 21. आनंद पत्रे says:

  अगदी अगदी… मस्त जमलाय डार्क ह्युमर

 22. Dinesh Pawar says:

  pharach chaan…..kharach reality aahe

 23. geetapawar says:

  sir corparet life mhane googli tipe aaste,,, marketing. plus jo mota aasto cupnycha tyacha var sad avlambunch nahi ka? tyat to moodi aslat tra thik nahi tar awas bai majya kade punav bai majy kade aase aaste,,,

 24. maheshw says:

  really cool article….

 25. but what about the life of the company? we think about the man who work for the company, bt not think for that man who employed you.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s